"माझ्या घरी स्त्री-नातेवाईक आहेत."
सूचना : अमेरिकी निवडणुकांबद्दल चर्चांचा ज्यांना कंटाळा आहे; अशांसाठी ही चर्चा सुरक्षित आणि असुरक्षित ह्यांच्या मधल्या न-चर्चा-भूमीत आहे.
(अमेरिकन वेळेनुसार) शुक्रवारी संध्याकाळी डॉनल्ड ट्रंपने स्त्रियांसंदर्भात उधळलेली मुक्ताफळं जगजाहीर झाली. (मुक्ताफळांचा एक दुवा.१) ट्रंपने जी बडबड केली आहे त्याचं थोडक्यात वर्णन 'लैंगिक अत्याचार' असं करता येईल. (हे वर्णन ट्रंपने नाकारलं तरी अमेरिकन न्यायमंडळानुसार हे वर्णन ग्राह्य आहे.)
पुरुष अशा प्रकारच्या, छटाक गप्पा मारतात, ह्यात काही नावीन्य नाही.२ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू पाहणाऱ्या इसमाने अशा छापाच्या गप्पा मारल्या होत्या आणि ह्या गप्पांचं रेकॉर्डींग फुटलं ह्यातही आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही वाटत नाही.३ विशेषतः, पहाटे ३ ते ५ च्या मध्ये माजी मिस युनिव्हर्सला नावं ठेवणं, आणि तिची सेक्स टेप बघायला लोकांना सांगणं, असं वर्तन करणाऱ्या माणसाने, त्याच्या सुकुमार, कोवळ्या, एकोणसाठीत, आजपासून साधारण दहा वर्षांपूर्वी स्त्रियांबद्दल असे उद्गार काढावेत ह्याचंही काही नवल वाटत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल असणाऱ्या आपल्या अपेक्षा अगदी पाताळात पोहोचलेल्या असतील, तर त्यांच्या बाळलीलांबद्दल नवल वाटतच नाही. ट्रंपच्या बाबतीत माझं हेच झालेलं आहे.४
रविवारी टीव्हीवर चर्चांचे काही कार्यक्रम बघितले. हौसेने काही वृत्तपत्रंही वाचली. ट्रंप ज्या रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे, त्यांतल्या अनेकांची झालेली पंचाईत बघताना मला मजा आली हेही नमूद करायला हरकत नाही.५ ह्यांत बहुतांश लोकांचं म्हणणं असं होतं, घरी आमच्या मुली, बायका, बहिणी, आया आहेत. 'मी ट्रंपला मत दिलं', असं मी ह्या स्त्री-नातवाईकांच्या डोळ्यांत बघून कसं सांगू? तुलनेत, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅन्सी पेलोसी, हिलरी क्लिंटन आणि अगदी ट्रंपच्या गोटातल्या मेलानिया ट्रंप, केलीअॅन कॉनवे ह्या स्त्रियांनी ह्या विधानाचा सरळ धिक्कार केला.
हा इमोसनल अत्याचार सहन करणं खरंच कठीण होतं६.
गेल्या महिन्यात बातमी होती, दोन पुरुषांना मिळून अपत्याला जन्म देता येईल. विचार करा७, समजा हे अपत्य पुुरुष अपत्यच असेल८, ह्याला कोणी बहिणी नसतील, हा पुरुष समलैंगिक असेल, तर त्याच्या आयुष्यात जवळच्या नात्यातल्या स्त्रिया नसण्याची शक्यता खूप जास्त आहे९. ह्या माणसाला समजा ट्रंपचे सदर उद्गार किळसवाणे, घृणास्पद वाटले, त्याबद्दल त्याने कोणाच्या डोळ्यात डोळे घालण्याबद्दल इमोसनल अत्याचार करावा? ह्या विचाराने माझं स्त्रीहृदय कातर कातर१० झालं. ;;)
---
सिमोन दी बोव्हार तिच्या 'द सेकंड सेक्स'मध्ये स्त्रियांचा उल्लेख 'रिलेटीव्ह बीईंग' असा करते. कोणाचीतरी कोणीतरी. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसतं. आपल्याकडचा प्रसिद्ध क्लिशे, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. ह्या जागी कोणी 'स्त्री ही सोयीसवडीनुसार पत्नी, माता आणि स्वतः असते; सगळ्या माणसांसारखीच' असं म्हणालं तर मी त्यांचं कौतुक करायला तयार आहे११. १९४६ मध्ये लिहिलेल्या 'द सेकंड सेक्स'च्या तुलनेत आताचं जग बदललेलं नाही, असा माझा दावा नाही. पण आजही स्त्रिया आई, बहिण, बायको अशा रूपांमध्येच अडकलेल्या आहेत का, ह्याचं उत्तर, ह्या स्कँडलमुळे 'काही अंशी हो' असंच द्यावं लागेल.
ट्रंपच्या गोतावळ्यातल्या स्त्रियांनीही ह्या विधानांचा सरळच धिक्कार केला तरीही बहुतांश रिपब्लिकन पुरुषांनी१२ 'आमच्या घरच्या स्त्रियांना काय सांगू?' अशी भूमिका घेतली. ही भूमिका, फक्त स्त्रियांसाठीच घातक आहे असं वाटत नाही.
आपल्या गोतावळ्यात, कुटुंबात कोणी मुसलमान, समलैंगिक, एकंदरच LGBTQ, दलित, (अमेरिकन संदर्भात, हिस्पॅनिक, कृष्णवर्णीय) येईस्तोवर आपण ह्या लोकांच्या दुःखाचा, अडचणींचा विचार करणार नाही का?
---
१. vox.com हे संस्थळ आवडत नसेल तर आपापल्या आवडत्या संस्थळांवर ह्याचा शोध घ्या. कोकमं आणि परकरांच्या व्यापारी संस्थळांवरही कदाचित ही फीत सापडेल.
२. "मी नाही त्यांतला" म्हणणाऱ्यांच्या समाधानासाठी, सगळ्या पुरुषांवर हा आरोप नाही. परंतु अशा छापाच्या गप्पा काही व/वा बऱ्याच पुरुषांमध्ये होतात, ह्याबद्दल सदर लेखिकेस शंका नाही.
३. सदर लेखिकेने 'हाऊस ऑफ कार्ड्स' बघितलंय.
४. पाताळापेक्षा यादीत बरीच बाळं आहेत; जाताजाता ही एक उगाच दुगाणीवजा नोंदअ.
४अ. इथे कोणाचीही नावं न घेता व्यक्तिगत टीका टाळली आहे; ह्याची कृपया व्यवस्थापकांनी, सदस्य आणि वाचकांनी नोंद घ्यावी.
५. दुर्दैवाने कोणतीही स्त्री-रिपब्लिकन नेतीआ माझ्या वाचन-दर्शनात आली नाही.
५आ. असा पदार्थ असतो का नाही, ह्याबद्दल मला पुरेशी खात्री नाही. एकेकाळी काँडोलिझा राईस होती. परंतु, वेल्स फार्गोच्या कृपेमुळे डेमोक्रॅट पक्षाच्या इलिझाबेथ वॉरनचं नाव हल्ली बरंच चर्चेत होतं.
६. पॉर्न बघायचं आणि वर 'आनंद' लपवताना त्रास होत होता; अशी तक्रार करू नये; अशी पाटी अजूनपर्यंत कुठेही बघितलेली नाही. माणे गुरुजींनी मणावर घ्यावं.
७. हा विचार भीषण आहे. मी वॉर्निंग दिली नाही, अशी तक्रार चालणार नाही.
८. सैद्धांतिक पातळीवर दोन पुरुषांना मिळून स्त्री अपत्य जन्माला घालता येईल. स्त्रिया अशी भेसळ करू शकणार नाहीत. जितम् जितम् जितम्.
९. 'आपल्या पोरांनी काय दिवे लावले' हे बघून समजा त्याच्या धार्मिक ख्रिश्चन आज्या अकाली गेल्या असतील. एक शक्यता.
१०. काय, जमलंय ना? बी रोमन्स इन रोम आणि बी इमोसनल अत्याचारी इन अमेरिका.
११. माणे गुरुजी, भलत्या (बाईच्या) सापळ्यात अडकून लोकप्रियता कमी करून घ्याल. 'गावात होईल शोभा, हे वागणं नव्हं' आज चार वेळा यूट्यूबवर ऐका.
१२. विदेचं शास्त्रीय मोजमाप केलं नाही.
कठीण ;-) शब्दाचा अर्थ -
पाताळापेक्षा = पाताळात गेलेल्या अपेक्षा = पाताळ + अपेक्षा
स्कॉट अॅडम्स
यांचे महान विचार वाचण्यात आले! ट्रंप समर्थक म्हणून नाव सार्थ केले असे म्हणायला हरकत नाही.
If there are no sponsored terror attacks before Election Day, it means ISIS prefers Clinton. They have the means. Think about it. #Trump
— Scott Adams (@ScottAdamsSays) October 25, 2016
बरोबर तोच तो
आणि त्याने ट्रंपबद्दल (तो जिंकू शकतो) लिहिलं तर एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या प्रकाशनांमध्ये त्याच्यावर टीका करणारे लेख प्रकाशित झाले. किती विलक्षण योगायोग! त्याला यापूर्वी ट्रंपचं समर्थन केल्याबद्दल धमकी दिल्याचे फोनही आलेत म्हणे. असो.
त्याचे ट्वीटर अकाऊंट पाहणे
व्यक्ती सद्ध्या गंडलेली आहे असे वाटते. असो, चालायचेच. सुरवातीला ट्रंप समर्थक, का तर म्हणे त्याने हिप्नॉटिसमचा कल्पक वापर केला आहे का काहीतरी (एनपीआरवर मुलाखत ऐकली होती, त्यावरून). ट्रंपची ग्रॅबिंग टेप आल्यानंतर गॅरी जॉन्सनला सपोर्ट. नंतर ट्रंपचे खुपच 'बुलींग' होत आहे म्हणून पुन्हा ट्रंपला सपोर्ट. एकंदरीत सावळा गोंधळ चालू आहे.
अदिती, नाही, ते वाचायला गेलो नाही. इतका वेळ कोणालाए, च्यायला! ;-)
ठायीठायी सापडणारा दुष्टपणा
इथे बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती; आजही फार वेळ नाही. पण काही प्रतिसाद वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली. बलात्कार, लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रिया तक्रार करायला पुढे का येत नाहीत हे स्वच्छ, स्पष्ट समजलं. मला तर ह्यातल्या कसलाच त्रास जालावर लिहून होत नाही; पण तरीही लोकांचं दुःख, वेदना समजण्याची थोडी तरी बुद्धी मला आहे. 'आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीत', 'आपल्यालाच दोष देतील' ही भीती किती खरी आहे ह्याचे ढळढळीत पुरावे धाग्यावर आहेत.
मागे हाना आरण्ड्टचं पुस्तक वाचलं, 'आइशमन इन जेरुसलेम'. त्यात ती 'बेनालिटी ऑफ इव्हिल' अशी संज्ञा वापरते; ठायीठायी सापडणारा दुष्टपणा; दुष्टपणाला एवढी लोकप्रियता असते की त्यामुळे आपण काही दुष्ट, चुकीचं बोलत, वागत आहोत हे समजण्याची बहुतांश लोकांची क्षमताच नष्ट होते, अशा प्रकारची मांडणी ती करते. लैंगिक अत्याचारांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल; आणि हा प्रकार फक्त काही वर्षं आणि ठरावीक भूभागात मर्यादित आहे असंही नाही!
---
निळोबा, स्कॉट अॅडम्सने आधी उधळलेली मुक्ताफळं तुम्ही वाचलेली नाहीत का? उदाहरणार्थ, फिलाडेल्फियात डेमोक्रॅटांची परिषद झाली तेव्हा ह्यांचं म्हणणं होतं, ते शहर, तिथला सभामंडप पुरुषांनी उभारला आहे; त्या पुरुषांनी बाईला मतं का द्यावीत? (हा दुवा) आल्ट-राईटला अभिमान वाटेल असं लेखन करण्याची परंपरा त्यांनी सांभाळली दिसते.
मुक्ताफळं आणि अमेरिकी कायद्यामुळे आलेला लेख
न्यू यॉर्करमधे आत्ताच हा लेख वाचला. The Attorney Fighting Revenge Porn
ह्या धाग्यावर अज्ञान, अडाणीपणा आणि माजुर्डेपणातून जी काही मुक्ताफळं उधळली गेली आहेत, ती पाहता, लेखाचा दुवा इथेच नोंदवून ठेवावासा वाटला. न्यू यॉर्करच्या लेखातली काही उद्धरणं अशा सगळ्या अज्ञ, अडाणी आणि माजुर्ड्यांना समर्पित :
I once asked her how she responds to the argument that people who value their privacy should not send naked pictures in the first place. Goldberg replied that this was judgmental and reductive. She mentioned the case of Erin Andrews, the former ESPN reporter, who was filmed, without her knowledge, by a man staying in an adjoining hotel room. “Are you just supposed to never take your clothes off?” she said. “You can’t get naked, you can’t take a shower?” She spoke of upskirting—the voyeuristic practice of taking unauthorized pictures beneath a woman’s dress. “Are you never supposed to go out in public in a skirt?” Goldberg said. “Or what about images where somebody’s face has been Photoshopped onto somebody else’s naked body? What’s getting distributed isn’t necessarily images that were consented to in the first place. That’s why it’s the distribution you have to focus on.”
The judge, Michael Ravin, addressed the court. “As a parent with a daughter, I could say plenty,” he said. “This kind of conduct is just so over the line. . . .
.
.
.
I mentioned Judge Ravin’s remark about how the facts of this case had hit him as a father. “That actually bothered me,” Goldberg said. “I wish it wasn’t always ‘As the father of a daughter’ or ‘As the husband of a wife.’ I wish it were ‘This kind of assault on someone’s dignity bothers me as a human being with a soul and a conscience.’ ”
And, since the election of Donald Trump, she says, she’s seen a “drastic uptick” in people seeking her firm’s help—evidence of what she worries is a “new license to be cruel.” Some of the cases have an explicitly political cast. One family’s baby pictures, for example, became memes in an anti-Hillary Clinton conspiracy theory alleging the sexual torture of children.
असू देत की
जर एक्सला हीन वगणूक देणं गैरकृत्य असेल तर त्यातून ती व्यक्ती खराब असलयचे सिद्ध होइल. मग त्याला भविष्यात जोडिदार मिळणार नै. मुळात एक्सला त्रास देउ शकता म्हणजे एक्स बलहीन, सामर्थ्यहीन , फडतूस आहे. त्यास रगडून, चिरडून , ठेचून काढलं जात असेल तर चांगलच आहे. लॉन्ग रन मध्ये काय होइल ?
ह्या हीन माणसास जोडिदार मिळणार नाही; त्याच वंश खुंटेल. शिवाय त्यनं दुबळ्याला मारल्यामुळे दुबळ्या व्यक्तीही संपतील.
आपोआप सशक्त व सज्जन्,नेक ,चांगले लोक जिवंत राहतील.
सगळी मानवजात संपन्न, सुखी, उच्च होउन जाइल.
थोडं थांबा, सगळं आपोआप नीट ह्जोउन जाइल. सरकार नको, पोलिस नको. बळी तो कान पिळी.
--डब्बर डिंग
गब्बर दुसर्याच्या
गब्बर दुसर्याच्या हक्कांबद्दल बहुतेक काटेकोर असतो- असे माझे नीरीक्षण आहे. शिवाय "ब्रीच ऑफ ट्रस्ट" बहुतेक तो सर्वाधिक सिरीअसली घेत असावा असा कयास आहे. तेव्हा इथे मनोबांचे लॉजिक गंडलेले आहे. काय रे मनोबा तू मित्र असुन त्याला ओळखत नाहीस असा ट्विस्टेड विचारांचा वाटतो का तुला तो? :(. मला वाटत नाही.
_________
पण तुझा प्रतिसाद विनोदी आहे. मला हसू आले.
गब्बर दुसर्याच्या
गब्बर दुसर्याच्या हक्कांबद्दल बहुतेक काटेकोर असतो-
गब्बु तर फडतुसांना जाळुन मारावे असे म्हणतो. म्हणजे एक तर फडतुसांना हक्क नाहीत किंवा गब्बु दुसर्यांच्या हक्कांना फाट्यावर मारतो.
---------
मुळात गब्बु जे हिंस्त्र बोलतो तसे त्याला अजिबात म्हणायचे नसते. तरी पण तो असे का बोलतो ते मात्र कोडे आहे.
त्यांच्या बोडक्यावरती टॅक्स
त्यांच्या बोडक्यावरती टॅक्स जातो म्हणुन तो राग काढत असावा.म्हणजे फडतूस एकदाचे नष्ट होवोत तेजायला असा.
पण बाकी हक्कांबद्दल इन जनरल तो जागरुक असावा असा कयास आहे. क-या-स.
लोक हक्क-अधिकार आणि जबाबदारी यात गल्लत करतात हे त्याचे आवडीचे वाक्य आहे.
फडतूसांनी आर्थिक जबाबदारी ढकलल्याने त्यांना अस्तित्वाचा हक्क रहात नसावा ब-हु-धा!!
ऑफ्कोर्स
In reply to तसं झालं तर In the morning I by नितिन थत्ते
ऑफ्कोर्स :)
ज्यांना संदर्भ माहिती नाही त्यांच्यासाठी हे कलेक्षन