मराठा मूक मोर्चा
महाराष्ट्रामध्ये - आणि देशामध्ये - काय चालू आहे हे आम्हासारख्या परदेशस्थ लोकांना मुख्यत्वेकरून वृत्तपत्रांमधून कळते. गेले काही दिवस वृत्तपत्रे 'मराठा मूक मोर्चा' ह्याचे गावोगावचे फोटो दाखवून मोर्चा कसा शिस्तबद्ध होता इत्यादि सांगत आहेत. ह्यांच्या मुळाशी मराठा समाजास राखीव जागांची मागणी हा प्रमुख विषय असावा असे दिसते. पण बरोबरच SC/ST ह्यंना मिळणार्या राखीव जागांबद्दल, त्यांच्या रक्षणासाठी केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जळजळहि दिसत आहे.
मराठा समाज म्हणजे काय ह्याबद्दलहि संभ्रम दिसत आहे. कुणबी म्हणजे मराठा का कोणी अलग असाहि उपप्रश्न येथे आहे असे दिसते. (नागपूरला असा भव्य मेळावा २५ ऑक्टोबरला भरणार आहे पण त्यातून कुणबी समाजाला वगळले जाणार आहे असे दिसते. संदर्भ म्हणून इंडियन एक्स्प्रेसची हेडलाईन "Maratha ‘silent march’ in Nagpur on Oct 25, Kunbis excluded. The Sakal Maratha Samaj, which is organising the silent march in the city, has excluded the Kunbis from the protest." पहा.
(माझे थोडे अवान्तर - कुणबी येथे २००० वर्षांपासून राहात आहेत ह्याची कोणास जाणीव दिसत नाही. अशाच एका 'कुणब्या'ने आणि त्याच्या आईने तळेगावजवळ शेलारवाडीला लेणी कोरण्यासाठी देणगी दिली होती असे तेथील कोरीव लेखावरून दिसते.)
सैराट चित्रपटातून कोपर्डीसारखे अत्याचार होतात तेव्हा तो चित्रपटच बहिष्कृत करावा, कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना त्यांचे हातपाय तोडून भर चौकामध्ये लटकावून द्यावे अशा मागण्या येत आहेत. माता जिजाऊ, रणरागिणी ताराऊ ह्यांचे वेष करून स्त्रिया मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.
असले लाखोंचे मोर्चे सुरुवातीला शांततेने चालले आहेत असे दृश्य दिसले तरी ते हिंसाचारी होण्याची कितपत शक्यता आहे? ह्यातून ब्राह्मण समाज सध्यातरी बाजूस ठेवला गेला आहे असे दिसते पण ब्राह्मण समाज अशा चळवळींचे नैसर्गिक शत्रु असतात. ही चळवळ ब्राह्मणविरोधात केव्हा उलटेल?
सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या 'ऐसी'च्या विचारवंतांकडून माहितीची अपेक्षा बाळगून आहे. पण तूर्तास तरी ते फेमिनाझी, कुंडली असल्या गहन विषयांच्या काथ्याकूटात गढलेले दिसतात.
अनु राव यांच्यासाठी - (१)
अनु राव यांच्यासाठी -
(१) पॉझिटिव्ह (म्हंजे डिस्क्रिप्टिव्ह) - वर्णनात्मक - यात - असे आहे, असे असते, असे होते - अशी वाक्ये येतात. यात फक्त वस्तुस्थितीचे वर्णन केले जाते. ते वर्णन संपूर्ण आहे/असते असा दावा न करता.
(२) नॉर्मेटिव्ह (म्हंजे प्रिस्क्रिप्टिव्ह) - यात - असे असायला हवे, असे करायला हवे, असे करावे - अशी वाक्ये येतात. यात काय करावे, पॉलिसी कशी राबवावी याच्या सूचना, आदेश, आज्ञा, शिफारसी केल्या जातात. अर्थातच त्या (१) वर निदान काही प्रमाणावर अवलंबून असतात.
कोणतेही सामाजिक शास्त्र शिकताना हे दोन फरक अवश्य केले जातात व यावरूनच पॉलीसी मधे चर्चा (वाद) होतात. पॉलीसी बनवणे हे यातील (२) च्या मधे जास्त येते. खरंतर वैद्यकीय क्षेत्रातही - डायग्नॉसिस स्टेज ही (१) मधे येते. व औषधे लिहून देणे, सर्जरी करणे हे (२) मधे येते.
या दोन मधे भाव करणे हे गैरसमज टाळण्यासाठी उचललेले पहिले पाऊल असते.
माझ्या जवळच्या नातलगांमधे
माझ्या जवळच्या नातलगांमधे आताच्या पिढीतील तिघांनी ( म्हणजे एकूणच्या ५०%) गेल्या एका वर्षात शिंपी , मराठा व लेवा पाटील जातीत लग्न केली आहेत . अर्थातच हे सगळे प्रेम विवाह आहेत . यांचे पालक टिपिकल मध्यमवर्गीय सदाशिवपेठी ब्राम्हण आहेत . सुशिक्षित /उच्चशिक्षित आहेत . पालकांनी सुरुवातीला 'विरोध ' वगैरे म्हणण्यापेक्षा परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असणारच ( पण ते बाहेर म्हणजे त्यांच्या चौकोनी कुटुंबाच्या बाहेरच्या कोणालाही कळले नाही ) पण तरीही( मनातल्या मनात नाराज होत का होईना.... हे माझे assumption ) व्यवस्थित लग्न करून दिली .
अवांतर : यात एका विवाहाला विरोध वगैरे व्हायच्या आधीच मुलाच्या आजीने ( बहुधा केवळ ) तो प्रेमविवाह आहे म्हणून जाहीर पाठिंबा देऊन गम्मत उडविली होती ( आज्जीनी ६७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता )
आता जंतूंचा पॉईंट थो SS डा लक्षात यावा म्हणून हे सांगितले . हे सरसकटीकरण वगैरे नाहीये , पण उदाहरण म्हणून सांगितले , जे फार uncommon नाहीये
मला हे वाचताना पोलिस
मला हे वाचताना पोलिस हेडक्वार्टरमधील एका बहुजन समाजातल्या सहकार्याची आठवण आली. त्याने गप्पात हेच मुद्दे त्याच्या भाषेत सांगितले होते. त्याची व माझी पार्श्वभूमी अर्थात खेड्यातील. आपल्या मुलांना मोठ करायच असेल तर खेड्यातील पालक त्यांना ब्राह्मण मुलांशी मैत्री करण्यास प्रवृत्त करतात. हे निरिक्षण त्याने नोंदवले.
जात हा अँगलच मला चारेक
जात हा अँगलच मला चारेक वर्षांपुर्वी मआंजावर आल्यावर मिळाला आहे. पण हळूहळू त्याचे कांगोरे लक्षात येत आहेत.
तू भारतात चारेक वर्षांपूर्वीच आलीयस का?
भारतात ८०% मुलं अजुनही मोफत सरकारी शाळेतच जातात.
हा गैरसम्ज आहे. हल्ली शहरात तरी निम्न मध्यमवर्गातली मुलंही खाजगी शाळेत जातात, म्युनसिपल शाळा हळूहळू बंद पडत आहेत, कमी होतायत.
मग ब्राह्मण व्यक्तीस्वातंत्र्यवादी झालाय वगैरे म्हणण्याला काय अर्थ?
स्वतःपुरता, स्वतःच्या माणसांपुरता असतोच व्यक्तीस्वातंत्र्यवादी. बाकीच्यांनीही व्हावं. मी तेच म्हणतेय की स्वतःचे काही दोष या हलाखीला कारणीभूत आहेत हे लक्षात न घेता 'ब्राम्हण कारण आहेत, आरक्षणामुळ हे झालय', वैगेरे बोलण्यात काय अर्थ आहे? ब्राम्हणांनी काळाप्रमाणे स्वतःला बदलल, बाकीच्यांनीही बदलावं आणि वैय्यक्तिक पातळीवर बदलतही असतात थोडेबहुत. (काळाची पावलं ओळखता येणं हे ब्राम्हणांना जास्त चांगलं जमतं कारण कदाचित स्वतःच उभ्या केलेल्या रूढींचा पो़कळपणा ते मनातून जाणत असावेत. ) हमोंचं ब्राम्हण संमेलन मला खटकत. पण हेही लक्षात घे की त्याला तसा प्रतिसाद नाही. ब्रमहण स्वतः:च भलं करणं जाणतो, करतो म्हणून तर एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुतळे हटवणे काहिंना अजूनही जरूरीचे वाटते आणि त्याविरूद्ध बिलकुल हिंसक वैगेरे न होता ब्राम्हण आपलं शिक्षण/पासपोर्ट/व्हिसा या गोष्टी करत रहातो. इतिहासात रमणं ठिकाय पण़ इतिहासात जगणं कामाचं नाही त्याला माहितीय.
मआंजा, कट्टे, परदेशातदेखील घेट्टो करुन राहणे, BMM
काही माहिती नाही त्यामुळे पास.
मला विदा माहित नाही पण लग्नाच्या बाबतीत मलाही हे बरेचदा दिसून आलंय की सामाजिक जाणिवा वैगेरे असलेले आपल्याच जातीत लग्न करतात. अगदी प्रेमविवाहही. (नेहमीप्रमाणे अपवाद आहेत.) त्यामागे तसं ग्रुमिंग कारणीभूत असावं. आपण सुसंस्कृत, आपल्या चालीरिती अश्या-अश्या उत्तम वैगेरे. ते फार सट्ल असतं. पण बाहेरच्या जातीत लग्न करणारेही असतात की.
ते
आंबेडकरांनी जे म्हटलं तो काळ वेगळा होता. पण आता जाती दूर करायला ब्राम्हणांचं पुढारीपण हवंय कश्याला?
तू भारतात चारेक वर्षांपूर्वीच
तू भारतात चारेक वर्षांपूर्वीच आलीयस का? >> अज्ञानात सुखी होते ;-)
===
हा गैरसम्ज आहे... कमी होतायत. >> नोप्स मधे RTE बद्दल माहिती गोळा करताना मिळालेला ऑफिशिअल विदा आहे तो आकडा.
===
स्वतःपुरता, स्वतःच्या....इतिहासात जगणं कामाचं नाही त्याला माहितीय. >> हा हा परत एकदा श्रीगुर्जी जाणवले ;-)
पण हा फरक लोकसंख्येमुळे जाणवत असावा का? आय मीन ३० लाखातले २० लाख प्रगत झाले तर ते ६६% होतात. पण तेच ३ कोटीतले ५० लाख प्रगत झाले तरी ते १७% च राहतात. मग ब्राह्मणांना मिरवता येतं 'बघाबघा आमच्या २/३ समाजाने प्रगती केली.'
===
म्हणून तर एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुतळे हटवणे काहिंना अजूनही जरूरीचे वाटते आणि त्याविरूद्ध बिलकुल हिंसक वैगेरे न होता >> ऑ? पेठेत कुजबुज केली जाते आणि खोडसाळपद्धतीचा पुतळा बनवला जातो अन् वर परत आम्हीच अहिंसक? जौद्या. सोडा तो विषय. हे थोडं अमेरीका-तालिबानसारखं वाटतंय.
===
पण आता जाती दूर करायला ब्राम्हणांचं पुढारीपण हवंय कश्याला? >> कोण म्हणतंय आम्हाला ब्राह्मणांचं पुढारीपण हवंय? मलातर ब्राह्मणांखेरीज इतरकोणी ब्राह्मणांना महत्व देताना दिसतच नाही.
अॅमी जात हा अँगलच मला चारेक
अॅमी
जात हा अँगलच मला चारेक वर्षांपुर्वी मआंजावर आल्यावर मिळाला आहे. पण हळूहळू त्याचे कांगोरे लक्षात येत आहेत.
हे एक तर निखालस असत्य तरी आहे किंवा तू ४ वर्षांपूर्वी कुक्कुलं बाळ तरी होतीस. कारण भारतात जात सर्वत्र (जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी) आहे. माअंजावर उलट झाले मला अनेक जातींच्या पाककृती कळल्या, त्यांचे जातीबद्दलचे विचार लक्षात आले. खरं तर मी अधिक व्यापक अर्थाने "माणुस" झाले.
विश्लेषण
पुण्यातील रस्त्यावरील गर्दीचे विश्लेषण करुन संख्या फारतर ३० लाखापर्यंतच येते असे गणिती कल असलेल्या एकदोन (नॉनमराठा) सदस्यांनी खेळकरपणे सांगायचा प्रयत्न केला >> खेळकरपणे? विश्लेषण?? फारतर(!) ३० लाख??? असो.
७० लाखाचा दावा (तलवार, वाघाच्या जबड्यात हात वगैरे घालणारे फोटो पाठवून) सतत तापलेल्या डोक्याच्या लोकांनी केल्यानंतर किमान खेळकर असल्याचा आव आणणे आवश्यक असते. असो सहज उत्सुकता म्हणून विश्लेषण केल्यावर ती संख्या निम्म्यापेक्षाही कमी येते. ३० लाख ही संख्याही जास्तच आहे हे मान्य. (बाळ ठाकरे यांच्या प्रेतयात्रेला वीस लाखाची गर्दी अशीच दोन कोटीपर्यंत फुगवून सांगितली गेली होती हे आठवते. )
बाय द वे. महाराष्ट्राबाहेरील हिंदू सारख्या दैनिकांनी मोर्चातील लोकांची संख्या वीस लाख होती अशी बातमी दिली होती. याउलट अशा ग्रूप्सवर नासाचे दाखले देऊन एक कोटी लोक जमल्याचा दावा केला गेला.
http://www.thehindu.com/news/national/other-states/in-pune-marathas-mar…
पेपरात येणाऱ्या आकडेवारीवरही
पेपरात येणाऱ्या आकडेवारीवरही विश्वास ठेवता येत नाही. शिवाजीपार्कवर लाखोंचा मेळावा म्हटलं तरी तिथल्या फोटोंमध्ये पाहिल्यावर लोकं आरामात बागेत बसावं त्याप्रमाणे पाचपाच फूट अंतर ठेवून बसलेले असतात. त्यावरून गणित करून उत्तर चाळीस हजारच्या आसपास आलं की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. (शिवाजीपार्कची लांबी रुंदी साधारण हजार फूटही नाही. त्यातही जिमखाना, देऊळ, व्यायामशाळा, शिवाजीचा पुतळा, बाग अशा अनेक गोष्टी आत आहेत. व्यासपीठ असतंच. हे सगळं सोडलं तरीही फारतर दोनशेच्या दोनशे रांगा होतात)
पण अनेकांना आकड्यापेक्षा भावना महत्त्वाची वाटते. ही भावना किती प्रबळ आहे हे सांगण्यासाठी आकडे मोठे करण्याचीही गरज वाटते.
असो. मी काही त्या गर्दीचे एकत्रित फोटो पाहिले नाहीत, त्यामुळे त्या तीस लाख आकड्याविषयी काही बोलू शकत नाही. एकंदरीत लोकांचा आकड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो याबद्दल निरीक्षणं मांडू शकतो.
३० लाख हा प्रचंड मोठा आकडा
३० लाख हा प्रचंड मोठा आकडा आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले झाडून एकुणेक ब्राह्मण जमा केले तर ते ३० लाख होतील.
महत्वाचा मुद्दा किती कोटी/लाख/हजार आलेले हा नसून 'लोकं का एकत्र येतायत आणि खरंच त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत का' हा आहे.
खरंच एक जेन्युन शंका 'तीन वर्ष दुष्काळाने पिचलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांचे मोर्चे' यावर ऐसीकरांची रिएक्शन काय आली असती? मग केवळ ते 'मराठा' नावाखाली एकत्र आले म्हणून रिएक्शनमधे एवढा फरक? महाराष्ट्रात जर ३ कोटी मराठा असतील तर त्यातले किती राजकारणी, सम्राट, गुंठामंत्री, महागड्या गाड्या उडवणारे वगैरे असतील? का मुठभर लोकांवरुन बाकीच्यांना जोखताय?
===
आकड्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन: साधारण एक माणूस जेंव्हा रस्त्यावर येण्याइतका उत्तेजित होतो, तेंव्हा त्याच्यामागे किमान दहा समविचारी (पण "तसदी" घेणे नाकारणारे) असतात असे मानले जाते. >> हॉ. असेच काहीसे एका मराठ्याने लिहले की त्यावर कशा 'खेळकर' प्रतिक्रिया येतात ते पहा वर मी जी मिसळपावची लिंक दिलीय तिथले भिडस्तचे प्रतिसाद..
मला हा मोर्चा कोणाचा, त्यांची
मला हा मोर्चा कोणाचा, त्यांची जात काय वगैरेची काहीही पडलेली नाही. मला फक्त आकड्यांबद्दल, आणि पर्यायाने सत्याबद्दल प्रेम आहे. कोणीही काहीही आकडे फेकतं आणि आपण मुकाट्याने ते ऐकून घेतो. 'इतके लोक कसे असू शकतील?' असा प्रश्न आपण विचारत नाही, आणि वृत्तपत्रं काही मोजमाप करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ही परिस्थिती मला अतिशय काळजी करण्याजोगी वाटते. 'आकडा काहीही असो, भावना बघा ना!' असं म्हणणाऱ्यांना, 'मग आकडा लिहिता तरी कशाला?' असं म्हणावंसं वाटतं.
साधारण एक माणूस जेंव्हा रस्त्यावर येण्याइतका उत्तेजित होतो, तेंव्हा त्याच्यामागे किमान दहा समविचारी (पण "तसदी" घेणे नाकारणारे) असतात असे मानले जाते.
म्हणूनच नक्की किती लोक रस्त्यावर आले हे जाणून घ्यायला नको का?
मग केवळ ते 'मराठा' नावाखाली
@ अॅमी
मग केवळ ते 'मराठा' नावाखाली एकत्र आले म्हणून रिएक्शनमधे एवढा फरक?
हो. कारण परत अल्पभूधारक शेतकरी त्या मोर्च्यात दिसतायत कुठे? पेपरात फोटो येतायत ते मोर्च्यानिमित्त हेअरस्टाईल केलेले तरूण, छान नटलेले बाप्ये-बाया. दोन दिवसांपासून बीद-लातुरात दलितांचे मोर्चे निघताय त्याचं चित्रीकरण बघ आणि ह्या मोर्च्यांचं बघ.
का 'मराठा' लेबलखाली पुढे यावं त्यांनी? जी समस्या आहे ती तशी का मानू नये? का इतर जातीत अल्पभूधारक शेतकरी नसतात? त्यांनी काय करावं मग? अशीही एखादी जात असेल जिला आरक्षण नाही, मग अश्या जातीतल्या अल्पभूधारक शेतकर्६याने आत्महत्या करायला तुझी हरकत नाही असं समजावं का?
दुसरीकडील माझी प्रतिक्रिया तशीच्या तशी चोप्य-पस्ते
प्रत्येक जातीधर्मात गरीब- श्रीमंत, माजलेले-नाडलेले सर्व लोक असतात. म्हणूनच भारतीय म्हणून आपल्या समस्येची मांडणी करणार्^या बरोबर रहावं, जातीची लेबलं लावलेलं कार्य कितीही सकारात्मक असो ते करू नये (या विचारांची मी तरी आहे) आता गरज आहे ती मराठा बरोबर आहे की दलित का ब्राम्हण असा नसून या राजकारण्यांचा साठमारीत आपण आपला वापर किती होऊ द्यायचा हे ठरवायची. सुबुद्ध माणसाने असा होऊ देऊ नये असं वाटतं पण तसं चित्र दिसत नाही.
अल्पभूधारक शेतकरी मोर्च्यात
अल्पभूधारक शेतकरी मोर्च्यात दिसत नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉब्लेमकडे लक्षच जाऊ नये? सामाजिक भान असलेल्या डाव्यांचदेखील?
दलितांचे प्रॉब्लेम जेन्युनच आहेत. त्यात काही वाद नाही.
का 'मराठा' लेबलखाली पुढे यावं त्यांनी? जी समस्या आहे ती तशी का मानू नये? >> का येऊ नये 'मराठा' लेबलखाली एकत्र? ब्राह्मणांना तसं वाटतं म्हणून? काय करायचंय ते त्यांचत्यांनाच ठरवूदेत ना. की आता ब्राह्मणांना जातपात गैरसोयीची झाली म्हणून इतरांनीदेखील जाती सोडून द्याव्यात. सगळं जग ब्राह्मणांच्या इच्छेनुसार चाललंच पाहिजे.
का इतर जातीत अल्पभूधारक शेतकरी नसतात? >> मला खरंच माहीत नाही. गावात शेती मुख्यतः मराठा, कुणबींकडे असते आणि दलित, ओबीसी इतर काही कामं करतात असा अंदाज आहे.
अशीही एखादी जात असेल जिला आरक्षण नाही, मग अश्या जातीतल्या अल्पभूधारक शेतकर्६याने आत्महत्या करायला तुझी हरकत नाही असं समजावं का? >> 'अल्पभूधारक शेतकर्यांच्या प्रश्नावर आरक्षण हे उत्तर नाही' असे माझ्या पहिल्याच निरर्थक प्रतिसादात लिहल्याने ही मार्मिक वाक्यं इथे आलीयत का?
दुसरीकडील माझी.... तसं चित्र दिसत नाही. >> तुझ्या अपेक्षा फारच भाबड्या वाटताहेत.
समस्या आणि उपाययोजना
>> अल्पभूधारक शेतकरी मोर्च्यात दिसत नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉब्लेमकडे लक्षच जाऊ नये?
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत ह्याविषयी माझ्या मनात तरी अजिबात संदेह नाही. मात्र मोर्चातल्या मागण्या सरंजामी मानसिकतेच्या निदर्शक आहेत हे विधान केवळ समस्या सच्च्या असल्यामुळे रद्दबातल ठरत नाही.
अल्पभूधारक
किमान पुण्यातला मोर्चा कुठल्याही अँगलने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा नव्हता. अल्पभूधारक शेतकरी या लेबलखाली वेगवेगळ्या जातींचे लोक एकत्र येऊ शकतात. मराठ्यांना ते नकोय. त्यांना मराठा या लेबलखालीच एकत्र यायचंय. या सगळ्या मोर्च्यांचे कर्तेकरविते हे राजकारणी, गुंठामंत्री, महागड्या गाड्या उडवणारेच लोक आहेत. मंचर, नारायणगाव, जुन्नर सारख्या ठिकाणी महागड्या सभागृहांमध्ये एकत्र येऊन या मोर्च्यांचं प्लॅनिंग झालंय. तिथून पुण्यापर्यंत यायला फुकट खाजगी गाड्या, रंगवलेल्या टोप्या, गाड्यांवर लावायला स्टिकर्स, झेंडे हे सगळं अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना परवडणारं नाही. ट्विटरवर #एकमराठा अशा ट्रेंड येऊद्या, किंवा फेसबुकवर लाखो शेअर येऊद्या ही अल्पभूधारक शेतकऱ्यांची आंदोलनाची पद्धत नाही.
सैराट चित्रपटानंतर "'आमच्या मुलीं'कडे वाकड्या नजरेने बघू नका" किंवा "सैराटमध्ये दिलेला संदेश हा मराठ्यांच्या नादी लागाल तर जिवानिशी जाल" वगैरेपासून पद्धतशीर वातावरण तापवायला सुरुवात झाली होती. कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रत्यक्ष कारण मिळालं इतकंच. आंदोलनाचे मुद्दे हे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडीत आहेत असे वाटत नाही.
मराठ्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हे बहुतेकांना माहीत आहे पण ते सांगितलं तर त्यांना राग येतो त्यामुळं गप्प बसतो. असो. मी ब्राम्हण किंवा मराठा दोन्ही नाही.
जेन्युन तफावत
'तीन वर्ष दुष्काळाने पिचलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांचे मोर्चे' आणि 'मराठा मूक मोर्चे' यात प्रचंड तफावत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अन्यायाची प्रत आणि कल्पना. मराठा मोर्चांतली एक प्रमुख मागणी "अॅट्रॉसिटी" रद्द करण्याविषयी आहे. ३ कोटी मराठ्यांना अॅट्रॉसिटीचा त्रास होतोय का? त्यातील मूठभरांनाच होतोय ना? मग ही मागणी समस्त मराठा समाजाची आहे असं भासवून सगळ्या 'इतर-अन्याय'ग्रस्त मराठा लोकांमध्ये एस. सी. एस. टी. विरूद्ध भावना-भडकावणी का केली जातीय? आणि हे कोणत्या अन्यायाला वाचा फोडतं? दुसरा मोठा फरक म्हणजे गोंधळ. सामाजिक आरक्षण, आर्थिक निकषावर आरक्षण या बाबतीत मोर्चांत सहभागी होणार्यांच्यात मूलभूत गोंधळ आहेत. अल्पभूधारक शेतकर्यांच्या मोर्च्यांच्या मागण्यांत हा गोंधळ नसेल.
मराठा मोर्चांतली एक प्रमुख
मराठा मोर्चांतली एक प्रमुख मागणी "अॅट्रॉसिटी" रद्द.... अन्यायाला वाचा फोडतं? >> अॅट्रॉसिटी कायदा मॉडीफाय करा अशी मागणी आहे. माबोवर एका धाग्यात आलेल्या प्रतिसादानुसार महाराष्ट्रात वर्षभरात ३५०च्या आसपास केस अॅट्रोसिटीअंतर्गत दाखल झाल्यात. त्यातल्या फक्त १५% मधे गुन्हा सिद्ध झाला. इतर गुन्ह्यांपेक्षा हा किरकोळ आकडा आहे. पण तरीही त्या कायद्याचा मिसयुज करुन पैसे उकळले जातायत अशी तक्रार असेल तर तो मॉडीफाय करायला हरकत नसावी. हे थोडं सेक्शन ४९८अ सारखं होतं...
दलितांचे प्रॉब्लेम जेन्युनच आहेत. आणि कोणीही सेन्सिबल व्यक्ती अॅट्रोसिटी कायद्याला वा दलित आरक्षणाला विरोध करणार नाही.
===
दुसरा मोठा फरक म्हणजे गोंधळ >> हो गोंधळ आहे खरा. पण मग हा गोंधळच मोर्चा कपटीधुर्तांचा प्लान नाही याची प्रुफम्हणून चालेल असे वाटते ;-)
शहाण्णव कुळी मराठा
खालील आडनावांचे लोक शहाण्णव कुळी मराठे (राजपुतान्यातून स्थलांतर केलेली घराणी) व उरलेले कुणबी (किंवा कसे?). आणि कुणबी हे क्षत्रिय का वैश्य ?
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A…
सुहास पळशीकरांची ही मुलाखत
सुहास पळशीकरांची ही मुलाखत वाचली.
http://scroll.in/article/819374/this-government-is-sitting-on-a-volcano…
मला वाटलेलं ही आंदोलनं फक्त महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, राजस्तानमध्ये होती. पण यात आंध्र मधल्या अशाच आंदोलनाचा उल्लेख आहे.
वर मांडले गेलेले अनेक मुद्दे इथेही आले आहेत. आंदोलनामागचा करविता कोण याबद्दल
I suspect that in Maharashtra the face that would emerge would be less dramatic than in the case of Hardik Patel in Gujarat, but one does not know because silent marches are always deceptive.
पण वर एका लेखात आंदोलन हे एकाप्रकारे हिंदुत्व ड्रिव्हन आहे असा उल्लेख आहे. पण मुलाखतीत हे खोडलं आहे.
शेवटचा परिच्छेद थोडा फार्फेचड वाटला. मराठा किंवा तत्सम आंदोलनांचा जागतिक संबंध लावलेला.
I see it as a curious phenomenon of going back to the community. In a sense, one could link it very broadly to the larger patterns of the onslaught of globalisation, but that does not necessarily justify this going back to the community.
Something is happening around the loss of identity and therefore going back to and recovering the older identities. That is where as a democracy, our process of liberalisation has failed to give us any new secular identity.
It is not just in India, but in many other places also. Ironically, while it is a response to globalisation, it is also a global phenomenon. You can look at it in one way, but at the same time, the answers and solutions would be situation-specific.
विनंती
नकारात्मक श्रेणी देणाऱ्यांना विनंती; ह्या श्रेणींच्या वापर ट्रोलिंगला प्रतिबंध करण्यासाठी आणि फुटकळ गप्पा धाग्यांवरून आवरण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा आहे. न पटणाऱ्या मतांचा विरोध करण्यासाठी प्रतिसाद लिहिण्याची सोय सर्व सदस्यांना, अगदी श्रेणीदात्यांनाही उपलब्ध करून दिलेली आहे.
इथे
इथे चर्चेला भलतेच वळण लागलेले दिसते. मूळ विषय, मराठ्यांचा मूक मोर्चा, असा असताना एकाएकी काही ब्राह्मण फोबिया झालेले, चिजं आणी ऐसीवरील सर्वात रॅशनल सदस्यांना ब्राह्मणवादी ठरवू पहात आहेत. या मोर्चाशी ब्राह्मणांचा काय संबंध ? प्रतिकूल परिस्थितीतही ते कसे टिकून आहेत आणि रडगाणे गात न बसता ते कसा स्वतःचा उत्कर्ष साधत आहेत, हे त्रयस्थपणे सांगितले, तरीही ते सहन का होत नाही ? जातीयवाद कोणाच्या मनांत जास्त भिनला आहे, हेच त्यातून उघड होते.
तिमा मी ब्राह्मण नाही ना
तिमा मी ब्राह्मण नाही ना मराठा ना मागासवर्गिय. मला एक वाटलं ते हे की, मागासवर्गियांमधील अनेकांना तसेच मराठ्यांमधीलही अनेकांना कदाचित आरक्षण नकोही असेल पण अन्य बहुसंख्यकांना हवे म्हणुन ते कदाचित काही बोलू शकत नसतील. पण त्याचा अर्थ ते रडगाणे गात आहेत असा नाही. आणि हे सांगायचेच राहीले बाकी आरक्षण मागणारे / घेणारे, अजुन मागणारे रडगाणे गात आहेतच्च.
बाकी प्रतिसादाशी बर्यापैकी सहमत.
इतरांचं माहीत नाही पण मी काही
इतरांचं माहीत नाही पण मी काही इथल्या कोणाला ब्राम्हणवादी वगैरे म्हणायला जात नाहीये - तितकं टोकाचं कोणी काही लिहिलं नाहीये.
मला रोचक वाटली ते वेगळीच गम्मत आहे
एकीकडे मराठा या जातीवाचक लेबलखाली एकत्र येऊन आपल्या मागण्या मागणं - किंबहुना आपल्या व्यथा/प्रॉब्लेम्स या लेबलखाली येणाऱ्या लोकांसाठी सामायिक आहेत असं म्हणणं- धोकादायक/जातीयतावर्धक वाटतंय मात्र तशाच ब्राह्मण या जातीवाचक लेबलखाली त्या जातीच्या समूहाच्या क्वालिटीजना सांगायला जातीवाचक गृपिंग करणं धोकादायक समजलं जात नाही?
म्हणजे जातीच्या अशा चांगल्या क्वालिटीज असू शकतात पण जातीचे असे प्रश्न व्यथा असता कामा नयेत ( त्या मात्र अबक गृपिंग जसे शेतकऱ्यांच्या हव्यात) असं काहीसं आहे का? मला जातिवाचक गृपिंगने प्रश्न/आंदोलने घातक वाटणार्याला; स्तुती मात्र त्याच गृपिंग क्रायटेरियाने चालावी हे रोचक वाटते.
इथे ब्राह्मण योगायोगाने आले. अन्य कोणा जातीची थोरवी गायली असती तरी तितकेच रोचक वाटले असते.
+1 ब्राह्मणवादी मीदेखील
+1
ब्राह्मणवादी मीदेखील कोणाला म्हणलं नाहीय. माझी वाक्यं परत इथे चोप्यपस्ते करते
'गणूने जो मुद्दा मांडलाय तो इथल्या डाव्या, सामाजिक भान मिरवणार्यांना स्वतःहून जाणवू नये; रादर उजव्याब्राह्मणी लोकांचे अँटीमराठा विचारच त्यांनी वेगळ्या शब्दात मांडावेत हे रोआउ आहे.'
'इंटरेस्टींग! आधी एका प्रतिसादात लिहल्याप्रमाणे उजव्याब्राह्मणी लोकांशी फारच म्याच होतायत तुमचे विचार! श्रीगुरुजी वगैरे... काय कारण असू शकेल यामागे याची थोडी गंमत वाटतेय.'
===
बादवे जंतू, तिरशिंगराव आणि त्यांना श्रेणी देणारे तुमच्या परीघात येतात का ओ? त्यांनापण मी दिलेल्या चारपैकी कुठल्यातरी क्याटेगरी टाकता येइल असे वाटते ;-)
मला वाटते
कृषिव्यवस्थेतून बाहेर पडलेले आणि कृषिव्यवस्थेला चिकटून राहिलेले-स्वतः कसणारे अशी वर्गवारी करता येईल का? बागाईतदार, साखर-वाइन कारखानदार हे 'शेतकरी'पेक्षा व्यापारी, उद्योजक या सदरात मोडतील. राजकारणीसुद्धा जन्माने शेतकरी असले तरी या व्यवस्थेत प्रत्यक्ष राबत नाहीत त्यामुळे तिच्या झळा त्यांना लागत नाहीत. शिवाय शेतकरी ही जन्मसिद्ध जात होऊ शकत नाही. तर असे उद्योजक-राजकारणी-अकृषक गट समृद्ध आहेत आणि केवळ जमिनीत राबणार्यांची विपन्नावस्था आहे असे काही आर्ग्युमेंट आहे काय? या उ.रा.अकृ.गटाची काही वेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत काय? ती या तीनही समाजगटात सारख्या प्रमाणात आहेत काय? तसे असेल तर एकत्र लेबलिंग करता येऊ शकेल. ते कदाचित जातिवाचक न राहाता वर्गवाचक ठरेल. मग पुन्हा क्लास विरुद्ध मास असे आर्ग्युमेंट करता येईल. पण एक पंचाईत आहे. या मोर्च्यांमधून आम्ही क्लासही आहोत आणि मासही, असा दावा केला जातोय. म्हणजे आम्ही शक्तिशाली आहोत, आमची परंपरा गौरवशाली आहे, आमच्याकडे वाकडा डोळा करून बघायची कुणाची हिम्मत नाही असे म्हणताना, त्याचवेळी, आम्ही नाडलेले आहोत असेही म्हटले जातेय. आम्ही प्रबळही आहोत आणि दुर्बळही असा हा अंतर्विरोध आहे. आमची प्रबलता ही आमचा (प्रामुख्याने आर्थिक) दुर्बळपणा हटवण्यास पुरेशी नाही असा अर्थ त्यातून निघतो.
सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
बिनाप्रतिवादी प्रतिसाद
>> एकीकडे मराठा या जातीवाचक लेबलखाली एकत्र येऊन आपल्या मागण्या मागणं - किंबहुना आपल्या व्यथा/प्रॉब्लेम्स या लेबलखाली येणाऱ्या लोकांसाठी सामायिक आहेत असं म्हणणं- धोकादायक/जातीयतावर्धक वाटतंय मात्र तशाच ब्राह्मण या जातीवाचक लेबलखाली त्या जातीच्या समूहाच्या क्वालिटीजना सांगायला जातीवाचक गृपिंग करणं धोकादायक समजलं जात नाही?
म्हणजे जातीच्या अशा चांगल्या क्वालिटीज असू शकतात पण जातीचे असे प्रश्न व्यथा असता कामा नयेत ( त्या मात्र अबक गृपिंग जसे शेतकऱ्यांच्या हव्यात) असं काहीसं आहे का? मला जातिवाचक गृपिंगने प्रश्न/आंदोलने घातक वाटणार्याला; स्तुती मात्र त्याच गृपिंग क्रायटेरियाने चालावी हे रोचक वाटते.
तुम्हाला काय रोचक वाटावं ह्याविषयी काहीही प्रतिवाद नाही. मात्र, धाग्यावर 'काही लोक काय म्हणत आहेत' अशा प्रकारच्या वर उपस्थित केलेल्या मुद्द्यांना माझ्यापुरतं उत्तर द्यायचं तर -
- मराठ्यांनी किंवा कोणत्याही समाजघटकानं शांततेनं मोर्चे काढण्याविषयी माझा कोणताही आक्षेप नाही.
- मराठ्यांकडे किंवा कोणत्याही समाजघटकाकडे एकत्र बघून त्यांच्या समस्यांविषयी किंवा इतर घटकांविषयी आपलं आकलन स्पष्ट करून घेण्यासाठी त्या गटाविषयी सामायिक विधानं करणं ह्याला माझा मूलतः विरोध नाही.
- एक समाजघटक म्हणून मराठ्यांच्या काही सामायिक व्यथा किंवा समस्या आहेत ह्याविषयी माझ्या मनात जरादेखील संदेह नाही.
- मला अडचण असलीच, तर ती समस्यांच्या कथित उपाययोजनेविषयी आहे. मोर्चातल्या मागण्या सरंजामी मानसिकतेतून आलेल्या दिसतात. त्या मागण्या मान्य झाल्या तरी समस्या सुटणार नाहीत हे माझं मत आहे. 'माझ्या समस्या सोडवण्यासाठी माझ्यात आतून बदल घडवण्याची माझी तयारी नाही; केवळ इतरांनी सामायिक धोरणं बदलावीत आणि मला बाहेरून मदत करावी' असं मराठ्यांनी म्हणणं मला सरंजामवादी वाटतं. (असं ब्राह्मणांनी म्हणणंसुद्धा मला सरंजामवादीच वाटेल.)
आभार. इतकं स्पष्ट लिहिलं असतं
आभार. इतकं स्पष्ट लिहिलं असतं तर इतकं फ्रिक्षन होतं ना!तिसरा मुद्दा ठळकपणे लिहिल्याबद्दल आभार.
इतकंच माझंही म्हणणं आहे.
अवांतर: मुळात मी आरक्षण असलाच तर ते जातीला डावलून असू शकत नाही हि माझी खूप जुनी भूमिका आहे. कारण आरक्षणाचं मूळ आर्थिक प्रगती नसून जातीय दुजाभाव आहे आणि तो अजूनही गेलेला नाही.
निव्वळ आर्थिक बाबींवर आधारित आरक्षण हवं का? तर सध्या माझं मत नाही असं आहे मात्र ते पुरेसं पक्क नाही कारण तितका विदा हाताशी नाही.कोणी त्यावर वेगळी चारचा आरंभली तर मत देता येईल.
आर्थिक दुर्बलांना आरक्षणापेक्षा आर्थिक सवलती देणे अधिक उपयुक्त ठरावे. (जसे व्याजरहित कर्ज वगैरे).
या मोर्चाशी ब्राह्मणांचा काय
या मोर्चाशी ब्राह्मणांचा काय संबंध ?
ब्राम्हण भारतीय समाजाचा भाग आहेत, मग संबध नाही असं कसं म्हणता येईल?
मी जात मानत नाही,मी मोर्च्यांना जात नाही, मी आरक्षण घेतलेलं नाही, मी अॅट्रोसिटीचा खटला हा प्रकार फक्त ऐकलाय. तरिही मी इथे माझी मतं का मांडतेय? त्या दृष्टीने कोणालाही हा हक्क आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही ते कसे टिकून आहेत आणि रडगाणे गात न बसता ते कसा स्वतःचा उत्कर्ष साधत आहेत.
सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती ब्राम्हणांना कधीही नव्हती कारण तो बुद्धीजीवी वर्ग असल्याने वेळोवेळी काळाची पावलं ओळखून वागत आला. (इथे वैय्यक्तिक उदाहरणे लागू नाहीत, ती प्रत्येक जातीत असतात)
इथे प्रत्येकजण संयमाने मतं व्यक्त होत आहे. मला तरी भलते वळण वैगेरे लागलय असं वाटत नाही
कारण तो बुद्धीजीवी वर्ग
कारण तो बुद्धीजीवी वर्ग असल्याने वेळोवेळी काळाची पावलं ओळखून वागत आला
मी ब्राह्मण नाही (असलेच तर अर्धी) आणि त्यांच्याबद्दल आकसही मला नाही. पण अंतरा नक्की बुद्धीजीवी असल्याने त्यांना काळाची पावले ओळखू आली की वर्णव्यवस्थेमुळे झुकते माप मिळाल्याने ते अग्रेसर राहीले?
आणि स्वतःचा उत्कर्ष तर सर्वच जाती साधत आहेत की. मला कळलं नाही ब्राह्मण उत्कर्ष साधताहेत म्हणजे नक्की काय जे की अन्य जाती करत नाहीयेत. हा प्रश्न तुला नसून ज्यांनी कोणी (आता वर जाऊन पहायला लागेल कोणी) उत्कर्षाचा मुद्दा काढला आहे त्यांना आहे.
___
ब्रमहण स्वतः:च भलं करणं जाणतो, करतो म्हणून तर एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुतळे हटवणे काहिंना अजूनही जरूरीचे वाटते आणि त्याविरूद्ध बिलकुल हिंसक वैगेरे न होता ब्राम्हण आपलं शिक्षण/पासपोर्ट/व्हिसा या गोष्टी करत रहातो. इतिहासात रमणं ठिकाय पण़ इतिहासात जगणं कामाचं नाही त्याला माहितीय.
अंतरा नक्की ब्राह्मण हे अन्य जातींहून अधिक चांगल्या रीतीने करताहेत याला विदा काय? किंवा आधार म्हण ना. आधार काय?
___
तुझ्याशी आणि अॅमीशी बोलता येतय समहाऊ म्हणुन बोलते आहे. पण "जात" हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे कारण अर्धी ना इकडे ना तिकडे असल्याने मला थोडाफार त्रास झालेला आहे. एकच काळा-पांढरा रंग स्वीकारता आलेला नाही. आणि विवाहोपरान्त ते अजुनच कॉम्प्लिकेटेड झाले आहे. अक्षरक्षः घरात जातींची खिचडी (३) आहे.
एक पिढी नंतर आरक्षण नको असे
एक पिढी नंतर आरक्षण नको असे म्हणणार्यांना माझा एक प्रश्न आहे. तो योग्य आहे की नाही ते ठाऊक नाही.
मुळात १. आपल्यालाही शिक्षण मिळू शकते कोणी अडवणार* नाही आणि २. शिक्षण घ्यायलाच हवे त्याला तरणोपाय नाही ही जाणीव रुजायला किती काळ जायला लागेल? त्यानंतर पुष्कळ/बहुतांश लोक शिक्षण घेत आहेत अशी परिस्थिती यायला किती काळ लागेल? त्यानंतर त्यातले खूपसे लोक प्रथम श्रेणीत पास होतात अशी स्थिती यायला किती वेळ लागेल?
*मला असे वाटते की अशी खात्री पटायला ७० च्या दशकाची अखेर तरी उजाडली असेल.
यासाठी ज्या समाजात मुळातच शिक्षण घेण्याची परंपरा आहे अशा ब्राह्मण समाजातला इतिहास काय दिसतो? इंग्रजी शिक्षणात ब्राह्मणांना तर अडवणारे कोणी नव्हते. तरी सर्व लोक शालेय शिक्षण घेतातच ही परिस्थिती सुद्धा विसावे शतक उजाडेपर्यंत आली नसावी. त्यातही तत्कालीन मॅट्रिकच्या परीक्षांचे निकाल बरेच कमी लागत असत. त्यात पास होणारे बहुतांश ब्राह्मण असत तसे नापास होणारेही बहुतांश ब्राह्मणच असत. विसाव्या शतकाच्या मध्यात साधारण पणे बहुतांश ब्राह्मण मॅट्रिकच्या परीक्षेत पास तरी होतात अशी परिस्थिती आली असेल.आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस बहुतांश ब्राह्मणांना प्रथम श्रेणी तरी मिळते अशी परिस्थिती आली. म्हणजे शंभर ते सव्वाशे वर्षे गेली असावीत. ऑल धिस विथ परीक्षा अधिकाधिक सोपी आणि पाठांतरप्रधान केल्यावरची कथा आणि शिक्षण घेणे हे परंपरेने ठरवलेले कामच आहे अशा समाजाबद्दल.
अगदी हेच
आरक्षण आता खूप झाले असे म्हणणार्यांना उत्तर देताना अगदी हेच आर्ग्युमेंट असते/असले पाहिजे. एका पिढीत ज्यांना या अल्पशा आरक्षित जागांपैकी काही जागा मिळाल्या त्यांनी त्याच पिढीत दैदीप्यमान प्रगती करून स्वतःला आणि मुलाबाळांना इतर प्रगत समाजाच्या पातळीवर आणावे ही अपेक्षा चुकीचीच नव्हे तर क्रूर आहे. मला यात रोमन साम्राज्यात होणार्या सिंह आणि माणसाच्या लढायांतली क्रूरता दिसते. दुर्बळाला सबळाशी बळेच सामना करायला लावण्याची. कोंकणातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या ब्राह्मणसारस्वतकायस्थादि वर्गालासुद्धा चाळीतून फ्लॅट्मध्ये यायला तीन पिढ्या लागल्या. आणखी शिवाय आरक्षित जागांची संख्या या प्रवर्गातल्या लोकसंख्येच्या मानाने खूपच कमी आहे. (लोकसंख्येच्या मानाने संधी कमी हे सार्वत्रिक असले तरी तिथे समान पातळीचे मैदान असते.) काही मूठभर लोकांना आरक्षण मिळणार, ते शालेय शिक्षण घेणार, त्यांची मुले कदाचित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याइतकी सक्षम आणि उच्च शिक्षणाची निकड जाणवन्याइतकी सज्ञान-विचारी निपजणार, मग पुढे त्यांची मुले वगैरे. तळमजल्यापासून गच्चीवर जाण्यास सुरुवात केलेल्यास पाचव्या मजल्यापासून चढणारा मुळातच मागे टाकणार. सर्वांना आधी पाचव्या मजल्यापर्यंत येऊ दे, मग शर्यत लावा.
मुळात १. आपल्यालाही शिक्षण
मुळात १. आपल्यालाही शिक्षण मिळू शकते कोणी अडवणार* नाही आणि २. शिक्षण घ्यायलाच हवे त्याला तरणोपाय नाही ही जाणीव रुजायला किती काळ जायला लागेल? त्यानंतर पुष्कळ/बहुतांश लोक शिक्षण घेत आहेत अशी परिस्थिती यायला किती काळ लागेल? त्यानंतर त्यातले खूपसे लोक प्रथम श्रेणीत पास होतात अशी स्थिती यायला किती वेळ लागेल? *मला असे वाटते की अशी खात्री पटायला ७० च्या दशकाची अखेर तरी उजाडली असेल.
(हा प्रतिसाद वाचल्यानंतर सहज गैरसमज होण्यासारखा आहे.)
रुजवण्यासाठीची उपाययोजना जर रुजवण्याच्या विरोधी काम करत असेल तर ? भारतात दिले जाणारे आरक्षण हे शब्दशः बोलायचे तर स्पर्धेपासून संरक्षक कवच आहे. जसे भारतीय इंडस्ट्रीला सरकारने एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून संरक्षक कवच परिधान केलेले होते (उदा. अँबॅसॅडर गाडी ही किमान तीन दशके एका संरक्षित कवचाच्या आत होती) व जेव्हा हे कवच काढून घेतले गेले तेव्हा काय झाले ते तुम्हास समोर दिसत आहे. मुद्दा हा आहे की संरक्षक कवच हे असे असते की people begin to factor that into their calculation as opposed to using it as it is intended to be used (helping hand). आता हेल्पिंग हँड म्हंजे नेमके काय ते सांगायचे तर आधी पार्श्वभूमी सांगावी लागेल. अनेकांना ही माहीती आहे/असते. पण मांडणी पूर्ण व्हावी म्हणून नमूद करतो. ब्राह्मणांच्या घरात ज्या पद्धतीने त्यांना वाढवले जाते त्यात शिक्षणावर भर हा मूलभूत व सर्वोच्च घटक असतो. इतकेच नव्हे तर शब्दशः "ब्राह्मणांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" असे वारंवार सांगितले जाते. इतरही बाबी शिक्षणाच्याभोवती गुंफल्या जातात. हे कोणत्याही एका क्षणी, एका दिवशी, एका पुस्तकान्वये, एका सोहळ्याद्वारे केले जात नाही. हे किमान हजार वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मार्गांनी/पद्धतीने मनावर बिंबवले जाते. मनाचे अक्षरशः ध्रुवीकरण केले जाते. मुख्य म्हंजे हे सक्रीय ध्रुवीकरण हा एकंदर ध्रुवीकरणाचा फक्त ३०% भाग असतो. बाकीचे ध्रुवीकरण नॉन-व्हर्बली केले जाते. मायकेल पोर्टर म्हणतो तसे - Strategy is effective if various components of it are reinforcing each other. तसे हे विविध मार्ग एकमेकांना पूरक असतात.
ब्राह्मणेतरांमधे हे कमी घडते असा माझा समज आहे. काही जातींमधे खूप कमी असेल तर काही जातींमधे प्रचंड कमी असेल. सामाजिक श्रेष्ठकनिष्ठता दूर्/कमी करणे हा आरक्षणाचा मुख्य बेसिस आहे. दारिद्र्य निर्मूलन हा नाही. आता एका अर्थाने मानसिक, कौटुंबिक माईंडसेट मधे असलेला डेफिसिट दूर करणे कठिण असल्यामुळे त्यातून सामाजिक मागासलेपणा वाढू नये म्हणून दुसर्या क्षेत्रात एक हेल्पिंग हँड दिला जावा अशी एक भावना** (एक म्हंजे एकमेव नव्हे) आरक्षणामागे आहे. ह्या हेल्पिंग हँड चा वापर करून मागे पडलेल्या जाती पुढे येऊ शकतील व सामाजिक श्रेष्ठकनिष्ठता कमी होईल असा हेतू आहे.
----------
** हे कशावरून ?
उत्तर - उदा. इथे SC असण्यामागचा क्रायटेरिया अतिसंक्षिप्त स्वरूपात दिलेला आहे. त्यात शैक्षणिक मागासलेपण व सामाजिक मागासलेपण हा निकष आहे. व हे शैक्षणिक मागासलेपण दूर व्हावे म्हणून शैक्षणिक संस्थांमधे आरक्षणाची तरतूद आहे.
----------
नितिन थत्तेंचा हा प्रतिसाद हा intention heuristic चे उत्तम उदाहरण आहे.
ब्राह्मणांच्या घरात ज्या
ब्राह्मणांच्या घरात ज्या पद्धतीने त्यांना वाढवले जाते त्यात शिक्षणावर भर हा मूलभूत व सर्वोच्च घटक असतो. इतकेच नव्हे तर शब्दशः "ब्राह्मणांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" असे वारंवार सांगितले जाते.
हा भर येतो याचं कारण आधीच्या पिढ्यांना 'आपलं शिक्षणाने भलं झालं' याचा अनुभव असतो. अधिक शिक्षण घेणारे इतर लोक पुढे जाताना त्यांनी पाहिलेले असतात. थत्तेंनी जे 'रुजणं' म्हटलेलं आहे ते हेच. जर शिक्षणापासून वंचित राहिलेला गट असेल तर एका पिढीत हे होत नाही, अनेक पिढ्या जाव्या लागतात असं त्यांचं म्हणणं आहे.
आरक्षणाने हे नक्की होतं की नाही हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. 'आरक्षणामुळे जर आत्तापर्यंत शिक्षणापासून वंचित असलेले गट शिक्षण अधिक प्रमाणात घेत असतील तर ते फक्त एक पिढी ठेवून चालणार नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ही भावना रुजायला जास्त पिढ्या जाव्या लागतात.' असा मुद्दा आहे.
बाकी तुमच्या प्रतिसादामुळे इंटेन्शन ह्युरिस्टिक हा शब्दप्रयोग कळला, आणि खूप आवडला. (थत्तेंनी केलेला युक्तिवाद तसा नाही असा माझा दावा असला तरीही.) अनेक वेळा त्यामुळे लोक टोकन स्वरूपाचं काहीतरी करून 'आपण आपल्या परीने शक्य तितकं चांगलं काहीतरी केलं' असं म्हणून थोडक्यात समाधानी होतात.
आरक्षणाने हे नक्की होतं की
आरक्षणाने हे नक्की होतं की नाही हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. 'आरक्षणामुळे जर आत्तापर्यंत शिक्षणापासून वंचित असलेले गट शिक्षण अधिक प्रमाणात घेत असतील तर ते फक्त एक पिढी ठेवून चालणार नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ही भावना रुजायला जास्त पिढ्या जाव्या लागतात.' असा मुद्दा आहे.
शि़क्षणापासून वंचित असलेल्यांना शि़क्षण मिळावं, एकाच नव्हे तर अनेक पिढ्यांना मिळावं, सवलतीत मिळावं ह्याबद्दल दूमत नाही. परंतू, आरक्षणामूळे माझ्यातली गुणवत्ता कमी असली तरी माझी प्रगती होऊ शकते, त्यासाठी गुणवत्ता किंवा पात्रता उंचावण्याची गरज नाही ही भावना अंगी बळावत असेल तर आरक्षण त्याचं ईप्सित उद्देश साध्य करतेय असं म्हणता येणार नाही. शिवाय आजुबाजूला जे दिसतेय त्यावरून "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" ही भावना त्या समाजात रुजतानाही दिसत नाही. आरक्षण न मिळणार्या गटांची दिसणारी व्यथा ही कि आम्ही पात्र असूनही आम्हाला शि़क्षण नाकारण्यात येतंय, मग ते मिळण्यासाठी आम्हालाही आरक्षण पाहिजेच.
छे हो.
मुळात आरक्षण ही काही सर्व वर्गीकृतांना मिळू शकेल इतकी मोठी सवलत नाही. इतर अनेक क्षेत्रात जी संधींची-नोकर्यांची-जागांची कमतरता आहे ती इथेही आहेच. सगळ्या आरक्षित सवलती (लायक व्यक्तींसाठी) वापरल्या गेल्या तरी अनेक-खरे तर मोठ्या प्रमाणात- लायक व्यक्ती शिल्लक उरतील. आणि तेव्हा स्पर्धा येणारच. सध्याच्या कलानुसार आरक्षित आणि मुक्त जागा भरल्या जाताना निदान महाराष्ट्रात तरी दोन्हीमधली पात्रतेची तफावत कमी कमी होते आहे. (दोन्हीकडच्या कट-ऑव्ह लिमिट्मधला फरक कमी होतो आहे.) धर्मांतरित दलितांमध्ये शिक्षणाविषयीची जागरुकता वाढली आहे हे माझे आणि इतर काहींचे निरीक्षण जालावर इतरत्र नोंदले गेले आहे. गुणवत्ता वाढवण्याची गरज नाही असा ऐदीपणा नाहीसा होत असून उलट गुणवत्ता वाढवण्याची धडपड वाढते आहे. झाले मोकळे आकाश अशी काहीशी अवस्था आहे. धर्मांतरित दलित आज ताठ मानेने, आत्मसन्मानाने जगू पाहतो आहे.
धर्म न बदललेल्यांबाबत मात्र इतकी ठाम विधाने करता येण्याजोगी परिस्थिती नसावी. तरीही त्यांच्यातही शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे हे नक्की.
मजवळ विदा नाही, तो गोळा करण्याची तशी गरजही नाही. हातच्या कांकणाला आरसा कशाला?
>>त्यासाठी गुणवत्ता किंवा
>>त्यासाठी गुणवत्ता किंवा पात्रता उंचावण्याची गरज नाही ही भावना अंगी बळावत असेल तर आरक्षण त्याचं ईप्सित उद्देश साध्य करतेय असं म्हणता येणार नाही. शिवाय आजुबाजूला जे दिसतेय त्यावरून "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" ही भावना त्या समाजात रुजतानाही दिसत नाही.
असे मला वाटत नाही. कारण आरक्षणाने कमी मार्कात* फक्त कॉलेजात प्रवेश मिळतो. शेवटी विद्यापीठाची जी काही परीक्षा असते ती उत्तीर्ण व्हावेच लागते. बाकीचे मला ठाउक नाही पण इंजिनिअरिंगची परीक्षा नुसती उत्तीर्ण होणे हेही सोपे नसते. म्हणजे जो डॉक्टर किंवा इंजिनिअर होतो त्याची गुणवत्ता आवश्यक तितकी असतेच (उच्चवर्गीय किंवा मागासवर्गीय डॉक्टर किती मार्क मिळवून पास झाला आहे हे कोणी पहात नाही).
पण बढत्यांमध्ये आरक्षण ठेवले तर ही परिस्थिती येऊ शकते हे मान्य आहे.
बाय द वे मागील वर्षी सीओईपी, व्हीजेटीआय, जीएस, बीजे ला अॅडमिशनचे विविध कॅटेगरीचे कट ऑफ कुठे मिळू शकतील?
हा भर येतो याचं कारण आधीच्या
हा भर येतो याचं कारण आधीच्या पिढ्यांना 'आपलं शिक्षणाने भलं झालं' याचा अनुभव असतो.
....
....
..
आरक्षणाने हे नक्की होतं की नाही हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. 'आरक्षणामुळे जर आत्तापर्यंत शिक्षणापासून वंचित असलेले गट शिक्षण अधिक प्रमाणात घेत असतील तर ते फक्त एक पिढी ठेवून चालणार नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ही भावना रुजायला जास्त पिढ्या जाव्या लागतात.' असा मुद्दा आहे.
थत्तेंचा मुद्दा समजला होताच व तुमचाही समजला.
पुढच्या पायरीवर जाण्याची व्यक्तीची इच्छा, मनोवृत्ती डिस्करेज केली जाते असा माझा मुद्दा आहे. ब्राह्मणांवर जे बिंबवले जाते त्याचे स्वरूप नेमके "exerting competitive pressure on them" या दिशेने जाते. हे असत्याधारित आहे की सत्याधारित हा प्रश्न आहे परंतु -it matters less.
व्यक्ती व व्यक्तीसमूह प्रगती करतात त्याचे कारण केवळ हे असत नाही की त्यांना प्रगती करावीशी वाटते (आणि त्यांना मदत मिळते). व्यक्ती व व्यक्तीसमूह प्रगती करतात त्याचे कारण हे सुद्धा असू शकते की त्यांना हे पक्के पटलेले/पटवून दिलेले असते की त्यांना दुसरा विकल्प नाही. राजेश घासकडवी सोडून इतरांसाठी मुद्दा oversimplify करतो - एक कमांडर चे हे उद्दिष्ट होते की एका बेटावर हल्ला करून ते बेट जिंकायचे. त्या बेटावर तो आपले सैन्य बोटींतून घेऊन गेला. बेटावर पोहोचल्यानंतर त्यांने सगळ्या बोटी पेटवून नष्ट केल्या. व सैनिकांना सांगितले की आता तुमच्यासमोर युद्ध करून बेट जिंकणे हा एकमेव पर्याय आहे. नतीजा - सैन्य जिवाची बाजी लावून लढले व जिंकले.
आता पिढ्यांचा मुद्दा. जर काही पिढ्या ह्या We are exempt from competitive pressure या भावनेत वाढत असतील तर ? --- हा माझा प्रश्न आहे.
@थत्ते & @राही
थत्तेंचा प्रतिसाद :- ही जाणीव रुजायला किती काळ जायला लागेल?
आणि ही जाणीव कोणत्या एककात मोजणार म्हणे? ज्याअर्थी ही जाणीव मोजण्याची ब्रिलिअंट पद्धत रुढ झालेली नाही त्याअर्थी आरक्षण हे ओपन एन्डेडच रहाणार की कोणी दलित वैचारीक नेतृत्व त्या अनुषंगाने काही रिसर्च करते आहे? की त्याबद्दल समाजात ब्रेन स्टॉर्मिंग होते आहे? आणि हे नेतृत्व दलितांनीच केले पाहीजे, अन्य जातीच्या लोकांनी केले तर फक्त वैरभावच वाढीस लागेल.
.
मी ८ वी त असताना टीव्हीवरती बोर्डात आलेल्या मुलांच्या व पालकांच्या मुलाखती होत असत आणि त्या मुलाखती आवर्जुन आम्हाला पहायला लावले जाई. पैकी एक SC/ST मुलगी बोर्डात आलेली होती. त्या मुलीच्या वडीलांचा अभिमानी चेहरा मला अजुनही आठवतो आणि हे शब्द की "मी तिला सांगीतले होते आपण आरक्षण घ्यायचे नाही. गुणवत्तेवरती (मार्क) कॉलेजमधे प्रवेश मिळवायचा."
मला ते एवढं टचिंग वाटलं. कौतुकास्पद स्टँड होता. त्यांना एक सॅल्युट.
.
काय्ये नं "देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेणार्याने देणार्याचे एके दिवशी हात घ्यावे." असे पोट भरलेले किती लोक आपल्याला दिसतात जे स्वतः होऊन म्हणतात, आम्ही शिकलो, सावरलोही,आता आमच्याच एखाद्या जातीबांधवाची जागा अडविण्यापेक्षा, त्यांना आम्ही वाट करुन देतो. आणि आम्ही खुल्या स्पर्धेत उतरतो"
.
अजुन एक - मी विश्वास ठेवते की त्या वडीलांनी त्यांच्या मुलीला तसेच शिकवुन वाढविले. आणि मग त्या तशा पोषक शिकवणुकीमुळे, अधिक जोमाने अभ्यास करुन ती कशावरुन बोर्डात आलेली नसेल?
.
खाली मी म्हटले आहे की कदाचित सर्वच Sc/St, सर्वच मराठा लोकांना कदाचित आरक्षण नको असेल. ते लिहीताना मला त्या वडीलांचा चेहरा आठवत होता.
____
वरती गब्बर यांनी दिलेल्या उपयुक्त दुव्यातून- How to get a Caste certificate?Ans: A person belonging to Scheduled Castes has to apply to the designated authority, i.e., Sub-Divisional Officer/Tehsildar of the area where the applicant resides permanently. The Designated Authority will issue the certificate after verification of the claim of the applicant.
मग हे सर्टिफिकेट सरेन्डर करण्याकरताही सरकारने काही इन्फ्रास्ट्रक्चर योजिले पाहीजे.
आणि ही जाणीव कोणत्या एककात
आणि ही जाणीव कोणत्या एककात मोजणार म्हणे?
हा उत्तम प्रश्न आहे. पण गंमत अशी आहे की जेव्हा ही सुधारणा होईल तेव्हा ती मोजमाप करण्याची गरजच राहाणार नाही. सध्या तक्रार अशी असते की बीसी-ओबीसी कोट्यातून कमी मार्क मिळवून सिटा मिळतात. पण त्यांतही त्या कोट्याअंतर्गत स्पर्धा असतेच. जेव्हा शिक्षणाचं महत्त्व तळागाळापर्यंत पोचेल तेव्हा कोट्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क हेही इतर बिगर आरक्षित लोकांइतकेच होतील. मग आमच्यावर अन्याय होतो या तक्रारीलाही जागा राहाणार नाही.
आज्ञार्थ
सुखी भव हा आज्ञार्थ आहे. अर्थी 'तू सुखी हो'. जेव्हा माणूस समोर असतो तेव्हा त्याला संबोधून आदेश किंवा उत्कट इच्छा (खरेतर इच्छेच्या अभिव्यक्तीसाठी तू सुखी व्हावेस असा विध्यर्थ आहे.) व्यक्त करताना द्वितीय पुरुषी कर्त्याची संबोधन विभक्ति असते. 'हे अन्नदात्या, तू सुखी हो' यासाठी संस्कृतमध्ये 'अन्नदातृ'ची संबोधन विभक्ति 'अन्नदातर्' आणि क्रियापदाचे द्वितीयपुरुषी एकवचन वापरावे लागेल. मूळ शब्द (अन्न)दातृ आहे, अन्नदाता नव्हे. सुखी ह्या विशेषणाचे मूळ रूप सुखिन् असे आहे. सुखी हे कर्ताकारक. सर्वे अत्र सुखिनो भवन्तु वगैरे.
अन्नदाता सुखी भवतु म्हणजे अन्नदात्याने सुखी व्हावे(च.) इथे 'तो' अन्नदाता. तृतीय पुरुष एकवचन. म्हणून क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी 'भवतु' आणि वाक्यात कर्ता प्रथमा विभक्ति-नॉमिनेटिवमध्ये- अन्नदाता.
चू.भू.द्या.घ्या.
थत्ते, चिंज, राही, शुची
थत्ते, चिंज, राही, शुची प्रतिसाद आवडले.
@ थत्ते :हो. हा मुद्दाही विचारात घ्यायला हवा म्हणून तर मी एका पिढीत म्हणत नाहीय तर तीन पिढ्यात आणि असं काळाचं तंतोतंत मोजमाप आणि भरपाई करणं तर शक्य नाही ना.
आरक्षणामूळे माझ्यातली गुणवत्ता कमी असली तरी माझी प्रगती होऊ शकते, त्यासाठी गुणवत्ता किंवा पात्रता उंचावण्याची गरज नाही ही भावना अंगी बळावत असेल तर आरक्षण त्याचं ईप्सित उद्देश साध्य करतेय असं म्हणता येणार नाही.
अशी भावना अंगी बळावत नाही. आरक्षण म्हणजे ५०% खालील सर्वांना प्रवेशाची हमी नसते. जागा ठराविक असतात. त्यासाठी घ्यायची तेवढी मेहनत घेत असतात. आता आरक्षित आणि अनारक्षित मार्कांमधली तफावत वरच्या पातळीवर तरी कमी कमी होताना दिसतेय.
@शुची
आम्ही शिकलो, सावरलोही,आता आमच्याच एखाद्या जातीबांधवाची जागा अडविण्यापेक्षा, त्यांना आम्ही वाट करुन देतो. आणि आम्ही खुल्या स्पर्धेत उतरतो"
असे म्हणणारे बरेच जण असतात. या बाबतीत प्रकाश आंबेडकरांनींही दोनचार वर्षांमागे काही वक्तव्य केले होते. नक्की काय ते आठवत नाहीय.
इथे चर्चेला वेगळ वळण लागलं तरी ते तात्पुरतं असतं हे मला फार आवडतं. धन्यवाद कोल्हटकरजी, मला या विषयावर लिहायला, विचार ऐकायला आवडतात, ती संधी अनायसे मिळाली.
खुल्या स्पर्धेत
शुचि,
आम्ही शिकलो, सावरलोही,आता आमच्याच एखाद्या जातीबांधवाची जागा अडविण्यापेक्षा, त्यांना आम्ही वाट करुन देतो. आणि आम्ही खुल्या स्पर्धेत उतरतो"
'असे म्हणणारे बरेच जण असतात' हे अंतरा आनंद यांचे म्हणणे अगदी खरे आहे. स्वतःला गुणवत्तेनुसार जर खुल्या जागांतून हवा तिथे प्रवेश मिळू शकत असेल तर बहुतेक स्पर्धक खुल्या जागांतूनच निवड करतात. यामुळे कमी गुणवत्ता असलेल्यांसाठी एखादी राखीव जागा उपलब्ध होउ शकते. अशा तर्हेने खुल्या जागांसाठी आरक्षित प्रवर्गात स्पर्धा वाढू लागली असेल तर ते हा समाज इतरांच्या बरोबरीत येऊ लागला आहे याचेच द्योतक आहे. अंतिमतः सर्वांनी खुल्या स्पर्धेत यावे हेच तर लक्ष्य आहे.
चांगलच आहे मग तर. फक्त मग
चांगलच आहे मग तर. फक्त मग सर्टिफिकेट सरेन्डर कारावे असे वाटते जे की फेअर आहे. कारण एकच की हे लोक पुढे गेलेले आहेत मग आता त्या सर्टिफेकटच्या गरजेशिवाय चालून जावे. अजुन एक किती % समाज असे सरेन्डर करतो यातुन समाजाला आरक्षणाची अजुन किती आवश्यकता आहे, आहे अथवा नाही हे कळू शकेल.
आपण कोण?
आरक्षित प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गात प्रवेश घेतल्यावर "आमच्या सीट्स आधीच कमी केल्या आहेत, त्यात तुम्ही कशाला गर्दी करता" अशासारखी मुक्ताफळं ऐकायला लागल्याची उदाहरणं कमी नाहीत. अशी, 'गर्दीमुळे घुसमटल्याची' भावना बाळगणारे अनेक लोक माझ्या शाळा-कॉलेजांतल्या वर्गांमध्ये होते.
जातीची प्रमाणपत्रं ज्यांच्याकडे असतात ती आपसूक मिळत नाहीत; ती अर्ज करून, कागदपत्रं सादर करून मिळवावी लागतात. ज्यांना ह्या प्रमाणपत्रांची गरज नसेल ते लोक अशी प्रमाणपत्रं काढतच नसणार. उगाच कष्ट आणि हेलपाटे घालण्याची हौस कोणाला असते!
पण "त्यांनी ही ठरावीक एक गोष्ट करायला पाहिजे", हे सांगणारे आपण कोण! 'त्यांनी' ठरावीक गोष्ट करण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी 'आपण' काही प्रयत्न करतो का? काही बोलायचं-करायचं तर आपण तेवढंच करावं.
---
जातींवरून समाजगट करण्यावरून किंचित गदारोळ होऊन गेल्याचं दिसतंय. इथे प्रतिसाद लिहिताना काही लोकांना आपली जात कोणती आहे किंवा नाही हे लिहावंसं वाटणं, ह्यातूनही आपल्या सामाजिक जाणीवेतून जात हद्दपार न झाल्याचं स्पष्ट होतं. व्यक्तिगत आयुष्यांत आपल्यापैकी बरेच लोक जाती मानत नसलो, जातींमधून येणारी उच्चनीचता मानत नसलो तरीही आपल्या समाजमनात ती अजूनही जिवंत आहे. इतपत वास्तव मान्य करायला काही अडचण नसावी.
अदिती, माझी एक मैत्रिण आहे
अदिती, माझी एक मैत्रिण आहे जिला मी सासूबाईंची सो कॉल्ड अशुद्ध भाषा सांगीतल्यावर तिने मला सांगीतलेले की "बाहेर ठीके पण घरात मला अशी भाषा बोलणारे चालले नसते"
मला वाटतं मग मी पुष्कळ बरी आहे- माझ्या मुलीने उद्या कोणाही जातीच्या सुजाण व्यक्तीशी लग्न केले तरी मी स्वागत करेन.
मी काही खास करते आहे असे नाही पण निदान मी त्या मैत्रिणीपेक्षा जातपात न माणारी आहे हे नक्की.
बाहेर दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे हे "आपण" करत नाही हेही नसे थोडके. बाकी काही करायला आपण काही समाज कार्यकर्ते नाही.
.
दुसरं हे सांगणारे आपण कोण? कोण म्हणजे ज्यांना झळ पोचते अशा समाजाचा मी घटक आहे आणि म्हणुन मला बोलायचा हक्क आहे.
'आपण कोण' म्हणोनि काय पुसता?
पण "त्यांनी ही ठरावीक एक गोष्ट करायला पाहिजे", हे सांगणारे आपण कोण!
"मते ही ढुंगणाप्रमाणे असतात. प्रत्येकाला एकएक (तरी) असतेच. (आणि ते वास मारते.)" - एक अमेरिकन म्हण.
बाकी, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच१ हे संकेतस्थळ कधीपासून मानू लागले?
शिवाय, Minding one's own business is not an Indian virtue हे इतक्यातच विसरलात काय?
अहो, 'आप्णाला वगळा, गतप्रभ झणी होतील ना फेस्बुके!' इ.इ.
..........
१ होय, ढुंव्यस्वा हे अव्यस्वामध्ये अंतर्भूत होते, नव्हे, त्याचा अविभाज्य भाग - त्याचे 'अटूट अंग' - आहे.
नाही, तसं नाही.
शुचिताई, काय आहे, एखादी गोष्ट जवळ आहे म्हणून आपण ती वापरतोच असं नाही ना. पण लगेच ती टाकूनही देत नाही. कधीतरी उपयोगाला येईल म्हणून माळ्यावर टाकतो अडगळीत. आणि जातप्रमाणपत्र अदितीने सांगितलं तसं खूप खटपट करून मिळतं. ते एका झटक्यात कोणी टाकून देणार नाही. उपयोग केला नाही तर ते परत केल्यासारखंच आहे ना. ते काही परवाना आधारित शस्त्र नाही की नको असेल तर त्यापासून चुकून होऊ शकणारा अपघात गृहीत धरून वेळेवर सरकारजमा केलेलं बरं?
पुन्हा एकदा, जास्तीत जास्त लो़कांची खुल्या स्पर्धेत स्वतःला अजमावण्याइतपत प्रगती व्हावी हेच तर अंतिम लक्ष्य आहे ना?
सुविधा हवी तेव्हाच वापरायची ना?
गरज पडली तरच सुविधेचा वापर करायचा, हे योग्यच आहे. ऊठसूट आरक्षणाची काठी कशाला वापरायची?
समजा एका वर्गीकृत व्यक्तीला तीन मुले आहेत. वडिलांना थोरल्याच्या (वय वर्षे १६)कॉलेजप्रवेशाच्या वेळी जातप्रमाणपत्र वापरावे लागले नाही. त्याला त्याच्या गुणवत्तेवर चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला. पण मधल्याला त्याच्यापेक्षा थोडे कमी गुण मिळाले. यावेळी वडिलांना जातप्रमाणपत्र वापरावे लागले. किंवा पुढे थोरल्याला उच्च अभ्यासक्रमात प्रवेशासाठी थोडेसेच गुण कमी पडत होते तर तेव्हा त्याने जातप्रमाणपत्र वापरले. यात बेकायदेशीर काय आहे? आता तर गेल्या वर्षी नव्या सरकारने असा नियम केलाय की ही सवलत एकदाच वापरता येईल. मग लोक जास्त मोठ्या गरजेच्या वेळेसाठी ही सवलत राखून ठेवणारच ना. म्हणजे शाळाकॉलेजात खुला प्रवेश मिळत असेल तर कोण कशाला सवलत वापरेल? वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा दुसर्या कुठल्या पदव्युत्तर (उदा. एम बी ए) उच्च शिक्षणासाठी प्रवेशाच्यावेळी ही सवलत वापरली जाईल. किंवा नोकरीसाठी राखून ठेवली जाईल.
मला तरी हे ठीकच वाटते.
"उच्चवर्णीय' वि. दलित उमेदवारांच्या गुणांमध्ये फरक राहिलेल नाही
दिल्लीच्या एका प्रतिष्ठित संस्थेत पी एच डी साठी येणाऱ्या अर्जात आता "उच्चवर्णीय' आणि दलित उमेदवारांच्या गुणांमध्ये कोणताही फरक राहिलेला नाही, असे मला तिथल्या एका शास्त्रज्ञाने सांगितले . ही शास्त्रद्न्य दलितांविषयी विशेष सहानुभूती बाळगणारी, इतरांनी नाकारलेले दलित विद्यार्थी मुद्दाम घेणारी अशी आहे, हे विशेष .
शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय
शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही ही जाणीव ब्राह्मणांत 'कुळकायद्यात जमिनी गेल्यावर' पक्की झाली असावी. माझ्या एका काकांनी खोती सांभाळायची म्हणून मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले होते. (आणि माझ्या वडिलांनी सोडले नाही म्हणून आजोबांशी मोठा वाद झाला होता असे ऐकले आहे).
पॉइंट हा आहे की परिस्थिती चांगली होती, शिक्षणापासून वंचित असण्याची परंपरा नव्हती तरी उत्पन्नाची इतर साधने असल्याने "शिकून काय उपयोग/शिकायची काय गरज?" अशी विचारसरणी असावी. ती उत्पन्नाची साधने गेल्यावर सार्वत्रिक शिक्षणाची गरज पटली असावी. ही गोष्ट १९४०च्या आसपास घडली. (मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नव्हे).
I see it as a
I see it as a curious....situation-specific. >> फार आवडलं हे. खाऊजा, लोकशाही, अधार्मिकता, व्यक्तीस्वातंत्र्यवाद यासगळ्यामुळे एक प्रकारचा सेन्सऑफलॉस आलाय. त्यातून बाहेर पडायची धडपड चालूय. जर सगळ्या जगातच हे वेगवेगळ्या रुपात होत असेल तर याला मनुष्यउत्क्रांतीतला एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल का? आफ्टरऑल आपण कळपात राहणारे, थोडेसे अल्फामेल आणि बाकी सगळे बिटाच आहोत.
===
दुष्काळग्रस्त भागात येणारी जी अगदी छोटीछोटी गावं आहेत त्यांना नवीन जागी पक्की घरं, विथ बेसिक फ्यासिलिटीज आणि एकेका कुटुंबाला पुरेल इतकी सुपीक जमीन असे पुनर्वसन साधारण किती खर्चाचे, व्हायेबल आहे असा काही अभ्यास झाला आहे का? जुन्या गावावर बुलडोजर फिरवून जंगल बनवायचं आणि नवीन सुपीक, पाऊसपाणी असलेल्या जागी जायचं.
===
गावात शेती मुख्यतः मराठा, कुणबींकडे असते आणि दलित, ओबीसी इतर काही कामं करतात असा अंदाज आहे. >> यावर कोणी प्रकाश पाडू शकेल का?
===
मला वाटतं मराठ्यांत प्रचंड श्रीमंत, श्रीमंत, मध्यम आणि गरीब असे वर्ग सहज दिसतील. ब्राह्मणात तसं नसावं. दारिद्र्यातून मध्यम आणि मग खाऊजानंतर उच्चमध्यम अशी त्यांची वाटचाल आहे.
मला वाटतं मराठ्यांत प्रचंड
मला वाटतं मराठ्यांत प्रचंड श्रीमंत, श्रीमंत, मध्यम आणि गरीब असे वर्ग सहज दिसतील. ब्राह्मणात तसं नसावं. दारिद्र्यातून मध्यम आणि मग खाऊजानंतर उच्चमध्यम अशी त्यांची वाटचाल आहे.
आजिबात नाही. ब्राह्मण फक्त पुण्यामुंबैतले बघितले की असंच वाटणार. बाहेर पडल्यावर कळेल. त्यांच्यातही प्रचंड श्रीमंत ते गरीब असे वर्ग आहेत.
(पुण्यामुंबैबाहेर १८ वर्षे काढलेला) बॅटमॅन.
शेती
गावात शेती मुख्यतः मराठा, कुणबींकडे असते आणि दलित, ओबीसी इतर काही कामं करतात असा अंदाज आहे. >> यावर कोणी प्रकाश पाडू शकेल का?
दलितांपैकी अगदी एकदोन जातींकडे जमिनी आहेत. त्यातही महारवतनासारख्या जमिनी कायद्याने विकता येत नसल्याने दलितांकडे राहिल्या आहेत. ओबीसींपैकी माळी समाजही शेती करतो. मात्र मुख्यतः शेती मराठ्यांकडेच आहे. ही पिढीजात मिळालेली स्थावर संपत्ती, बहुतांशी सर्व सत्तेची स्थाने असूनही ते प्रगती करु शकत नाहीत हे आश्चर्यकारक आहे. दलित-ओबीसींच्या मोठ्या गटाकडे असं काहीही नाही. मराठ्यांपेक्षा मुसलमानांना आरक्षणाची अधिक गरज आहे असं माझं मत आहे.
ब्राह्मणाने स्वतःच स्वतःला
ब्राह्मणाने स्वतःच स्वतःला भटुर्डे, वरणभात म्हणलेलं चालायच; पण आता मराठ्यांच्या त्याच शब्दांवर 'जन्माने ब्राह्मण' रडगाणं गातायत आणि 'विचारवंत' त्यांचे सांत्वन करतायत.
जन्माने अर्ध्या CKPने 'मी ब्राह्मण नाही' म्हणलेल चालतं; पण तेच मराठ्याने सारस्वत, CKPना ब्राह्मणेतर म्हणलं तर ते 'महारोचक' होतं.
तिकडे खफवर एक विचारवंत 'मराठ्यांपेक्षा संघ परवडला' म्हणतोय.
छान चालूय एकंदरच!
===
जरा एकदा शांत बसून थोडा विचार कराल का फॉर अ चेंज?
आपण केवळ विरोधासाठी विरोधतर करत नाहीय ना?
इतर वेळी प्रोकाँग्रेस, अँटीहिंदुत्व, प्रोशेतकरी वगैरे स्टँड घेणारे नेमका यावेळीच पुर्ण उलटा स्टँड का घेतायत?
तुमच्या लक्षात येत नाहीय का की जर योग्य लोकांची सुरवातीलाच इन्वॉलमेंट झाली असती तर या सगळ्याचा एक 'अतिशय स्ट्राँग अँटीहिंदुत्व प्रोदलित प्रोमुस्लिम मासमुव्हमेंट' करता आला असता?
नेहमी बीजेपीविरुद्ध बोलणारे 'या मोर्चांमागे साहेब आहेत' म्हणतायत आणि त्याला विरोधदेखील करतायत. का?
मुस्लिम, ओबीसींनी सुरवातीलाच मोर्चांना सपोर्ट केलंय. तुम्हीमात्र विरोध करताय. का?
जरी कोपर्डी केस या मोर्चांचा ट्रिगरअसली आणि अॅट्रोसिटी वनऑफदइश्यु असला तरी या मोर्चाला प्रोदलित करता आलं असतं असं तुम्हाला वाटत नाही का? कोपर्डी आरोपींना शिक्षा व्हावी हे दलितदेखील मान्य करतीलच ना? तसेच मराठादेखील मान्य करतील की दलितांवर अत्याचार करणारे मराठा असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
अॅट्रोसिटीच्या गैरवापराबद्दलदेखील तेच.
===
दलितांपैकी अगदी एकदोन....मुसलमानांना आरक्षणाची अधिक गरज आहे असं माझं मत आहे. >> दलित-ओबीसींच्या ज्या छोट्या गटाकडे जमीन आहे त्या सगळ्यांनी प्रगती केली आहे का?
केली असेल तर त्यात त्या जमिनीचा किती हातभार होता आणि आरक्षणाचा किती? आणि स्वतः त्या व्यक्तीचा/कुटुंबाचा किती?
सगळ्या मराठ्यांकडे भरपूर वडिलोपार्जीत जमीन, संपत्ती आहे असे तुम्हाला वाटते का? का वाटते? माझ्या तीन पिढ्यांचा शेतीशी शून्य संबध आहे आणि इतर इनहेरीटन्सही शून्य.
राजकारणात असलेल्या मुठभर मराठ्यांनी 'केवळ मराठ्यां'च्या प्रगतीचाच आधी विचार करायला हवा होता असे तुम्हाला वाटते का? का वाटते?
सध्या ब्राह्मण ३.५ मराठा ३० आणि दलितओबीसी ५० टक्के आहेत. शंभर वर्षांपुर्वीदेखील साधारण असेच असेल.
कुळकायदा, १९४८ मुळे जमीन नसलेला पण बाकीचे कोणीच शिकत नसल्याने शिक्षणात अलमोस्ट १०० टक्के आरक्षण उपभोगणारा ब्राह्मण 'दिसेल अशी प्रगती करू शकतो' कारण त्यांची लोकसंख्याच मुळात कमी आहे हे तुम्हाला कळत नाहीय का? का कळत नाहीय?
लोकसंख्या जशी वाढत जाइल तशी वारश्यात मिळणारी जमीन अपुरी पडत जाणार हे तुम्हाला कळत नाहीय का? का कळत नाहीय?
पिकं घेऊन जमीनीची प्रत कमी होणार, पाऊस दुष्काळ यावर कोणाचाच कंट्रोल नाही हे तुम्हाला कळत नाहीय का? का कळत नाहीय?
इतरवेळी तुम्ही जो प्रोशेतकरी स्टँड घेता तेव्हा तुम्ही मराठ्यांबद्दलच बोलत नसता का? 'शेतकरी मराठा आहेत पण मराठा शेतकरी नाहीत; ते फक्त राजकारणी, साखरसम्राट, शिक्षणसम्राट, गुंठामंत्री आहेत' असं म्हणायचंय का?
जाऊदेत कंटाळा आला...जाताजाता गब्बरला या धाग्याचा चांगला उपयोग होइल असे वाटते. यापुढे कोणी फडतुस शेतकर्यांचा कळवळा दाखवला की या धाग्याची लिंक फेकून मारता येइल तोंडावर.
विधान नावाची गुंतागुंत
वरचा प्रतिसाद वाचून श्रावण मोडकांची आठवण होणं अपरिहार्य. हिंदुत्वाला आणि हिंदुत्वधारक म्हणून भाजपला विरोध करणं म्हणजे काँग्रेसची तळी उचलणं नव्हे; भाजप आणि काँग्रेस हे सगळेच एका माळेचे मणी असतात; कोणी डाव्या बाजूला कोणी उजव्या बाजूला. पण 'आपल्या' बाजूचे कोणीच नाहीत अशी विचारसरणी असू शकते.
आणि हे कोणत्याही देशाच्या बाबतीत बहुदा म्हणता येईल. दगडापेक्षा वीट मऊ लागेल, एवढंच फारतर!
जन्माने अर्ध्या CKPने 'मी
जन्माने अर्ध्या CKPने 'मी ब्राह्मण नाही' म्हणलेल चालतं
नाहीच्चे मी. मला सी के पी असल्याचा (खरं तर जाऊ दे सांगतेच) अभिमानच आहे. आणि मी कोणत्याही जातीची असते तरी तसा तो असताच कारण एकच प्रत्येक समाजाची काही वैशिष्ट्ये असतात, पाकृ असतात, एक तोंडवळा असतो. बाकी अमके श्रेष्ठ तमके कनिष्ठ असं मात्र मला मुळीच खरोखर वाटत नाही. Every society has it's own niche (स्पेलिंग बरोबरे का?)
.
मला एक कळत नाही प्रत्येकजण हा अभिमान का बाळगत नाही? :( आय मीन व्हॉट्स रॉन्ग विथ ऑल? जे आपलं आहे त्याच अभिमान जरुर बाळगावा - जात, रुप, गुण, नशीब. कशाचाही.
आवडला.
अॅमी, प्रतिसाद आवडला.
गेल्या पंचावन्न वर्षांच्या काळात महाराष्ट्रातली राजकीय धोरणे अथवा कल्याणयोजना केवळ मराठ्यांसाठी अथवा मराठा-अनुकूल होत्या असे मला वाटत नाही. त्या सर्वसमावेशकच होत्या आणि उपलब्ध परिस्थितीत चांगली निवड होती. अंमलबजावणी मात्र अतिशय ढिसाळ आणि भ्रष्ट होती. या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे चतुर आणि आधीच्याच धनदांडग्यांचे फावले. गावोगावी, गल्लोगल्ली गल्लीदादा, गल्लीगुंड निर्माण झाले आणि यांच्या मेहेरनजरेवाचून एक काडीही हलणार नाही अशी परिस्थिती आली. यामुळे सामान्य माणसांत (यात मराठे आलेच) संताप, असंतोष निर्माण होणे साहजिक होते. ह्या असंतोषावर फुंकरा घालून घालून तो कोणी फुलवला, पळवला आणि आपल्या बाजूला वळवला हे काही काळात उघड होईलच. हे प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून अनेक वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे यात सहभागी होण्यास, मदत आणि पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत. प्रस्थापित भ्रष्ट राजकारणी/गावगाडा/जि.प./सरपंच/पाटील आदि व्यवस्थेविरुद्ध हा असंतोष असेल तर तो सध्याच्या सत्तेच्या विरोधात नसणार, उलट त्यांना साहाय्यकारीच असणार हे उघड आहे. या मोर्चात सरकारविरोधी भाषणे फारशी झालेली नाहीत असे वाचले. हे सर्व जितके उत्स्फूर्त आहे तितकेच नियोजितही असावे.
या मोर्चात ओबीसींना सामील करून घेता आले असते कदाचित, पण नवबौद्धांना नाही असे मला वाटते. या मोर्चांचा चेहरा प्रोदलित अजिबात नाही. संरक्षण म्हणून, पाण्यात राहून माशाशी वैर नको म्हणून काही दलित्/मुसलमान यात सामील झाले असणे शक्य आहे.
आत्तापर्यंत हे मोर्चे का नाही निघाले, आत्ताच का निघाले याचे कारण तात्कालिक आहे. एखाद्या काडीनेही मोठा वणवा भडकू शकतो तसे झाले आहे. हा ट्रिगर माझ्यामते 'सैराट' सिनेमा आहे. पुण्यात काही ठिकाणी पूर्वापार आठवडीबाजार भरतो. बैलगाड्या-टेंपोतून माल घेऊन शेतकरी येतात. त्यांच्याशी सहज बोलताना जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांना वाटत असलेली असुरक्षितता. 'आपल्या पोरीबाळींना जपायला हवे, नाही तर हे असले काहीतरी घडणारच' अशी भावना प्रकर्षाने दिसली. ती बरोबर की चूक ती गोष्ट वेगळी. आणि माझे अनुभव हे निष्कर्षासाठी पुरेसे सँपल होऊ शकत नाही हेही आहेच.
ता.क. सध्याची आरक्षणे अधिक वाढवू नयेत असे माझे मत आहे. त्या उलट, देऊ केलेल्या सवलती खालपर्यंत व्यवस्थित झिरपतील, तळापर्यंत पोचतील, कोणी झारीतला शुक्राचार्य आडवा येणार नाही हे बघितले जाईल तरी पुरेसे होईल.
???
>>ब्राह्मणाने स्वतःच स्वतःला भटुर्डे, वरणभात म्हणलेलं चालायच; पण आता मराठ्यांच्या त्याच शब्दांवर 'जन्माने ब्राह्मण' रडगाणं गातायत आणि 'विचारवंत' त्यांचे सांत्वन करतायत.
मुद्दा कळला नाही. हे अनेक ठिकाणी चालतं. उदा. कृष्णवर्णीय व्यक्तीनं स्वतःच्या वंशाला संबोधताना 'निग्गा' म्हटलेलं चालतं पण तेच इतरांनी म्हटलं तर चालत नाही. इथून साभार -
Some African-Americans only consider nigga offensive when used by Americans of other races, its use outside a defined social group being an unwelcome cultural appropriation.
>>जन्माने अर्ध्या CKPने 'मी ब्राह्मण नाही' म्हणलेल चालतं; पण तेच मराठ्याने सारस्वत, CKPना ब्राह्मणेतर म्हणलं तर ते 'महारोचक' होतं.
हे विधान तर फारच गंमतीचं आहे. ब्राह्मणेतर सवर्णांमध्ये मराठे बहुसंख्य आहेत. त्याउलट सारस्वत सीकेपी वगैरेंचं लोकसंख्येतलं प्रमाण (अल्पसंख्य असलेल्या) ब्राह्मणांहूनही अल्प आहे. त्यांना ब्राह्मणेतर म्हणणं हे एके काळी कर्मठ ब्राह्मणांचं लक्षण होतं. त्यामुळे आज जर मराठे एके काळच्या कर्मठ ब्राह्मणांसारखे वागत असतील, तर ते महारोचक का नव्हे ते समजलं नाही. (तसं मराठे खरंच म्हणताहेत हे कशावरून ते मला समजलेलं नाहीच, पण ते असो.)
>>जर योग्य लोकांची सुरवातीलाच इन्वॉलमेंट झाली असती तर या सगळ्याचा एक 'अतिशय स्ट्राँग अँटीहिंदुत्व प्रोदलित प्रोमुस्लिम मासमुव्हमेंट' करता आला असता?
>>कोपर्डी आरोपींना शिक्षा व्हावी हे दलितदेखील मान्य करतीलच ना? तसेच मराठादेखील मान्य करतील की दलितांवर अत्याचार करणारे मराठा असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
अॅट्रोसिटीच्या गैरवापराबद्दलदेखील तेच.
योग्य लोक कोण? आणि अॅट्रॉसिटीचा पुनर्विचार, कोपर्डी गुन्हेगारांना फाशी (फाशी म्हणजे तात्काळ फाशी! न्यायप्रक्रिया वगैरे आम्हाला नकोच!) वगैरे मागण्या करून मोर्चाचा रोख प्रो-दलित होतो का? त्यामुळेच तर प्रज्ञा दया पवारांना हा सवाल विचारावासा वाटतो ना की कोपर्डीतल्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हे आम्हाला मान्य आहे, पण मग खैरलांजी झाली तेव्हा तुम्ही कुठे होतात?
>>नेहमी बीजेपीविरुद्ध बोलणारे 'या मोर्चांमागे साहेब आहेत' म्हणतायत आणि त्याला विरोधदेखील करतायत. का?
हे तर महाविनोदी वाक्य आहे. कारण भाजपला विरोध करणारा प्रत्येक जण साहेबांचा पाठीराखा असावा अशी अपेक्षा त्यामागे दिसते.
निग्गा किंवा दलितांना
निग्गा किंवा दलितांना जातीवाचक बोलणे हे कायद्याने गुन्हे आहेत. भटुर्डे आणि वरणभात हे कायद्याने गुन्हा आहे का?
CKP, सारस्वतांच्या बाबतीत मराठे एके काळच्या कर्मठ ब्राह्मणांसारखेच वागत आहेत कशावरुन? त्यांना भेटलेले CKP 'आम्ही ब्राह्मण नाही' सांगत असतील. न विचारताच!
आणि एका प्रतिसादावरुन सगळे मराठे तसंच समजतात हे कन्क्लुजन कसं काढलं?
'योग्य लोक' म्हणजे जालिय विचारवंत नाही. लोकांशी संवाद साधू शकणारे आणि त्यांना योग्य दिशेने मुव्ह करु शकणारे.
त्यामुळेच तर प्रज्ञा दया पवारांना हा... तेव्हा तुम्ही कुठे होतात? >> हा 'तब तुम कहाँ थे?' तर भक्तांचा पेटंट सवाल/अप्रोच आहे ना?
भाजपला विरोध करणारा प्रत्येक जण साहेबांचा पाठीराखा असावा अशी अपेक्षा कुठून दिसली तुम्हाला त्या वाक्यांत? लोकसभा निवडणूक प्रचार चालू असताना काहींनी प्रोकाँग्रेस स्वाक्षर्या ठेवल्या होत्या. 'कोणत्यातरी निवडणुका जवळ आल्यात म्हणून ही मोर्चांची खेळी आहे' असा काहीजणांचा (त्यात तुम्हीदेखील आलाच) अंदाज आहे. मग आता या निवडणुकांत तुम्ही कोणाला मत देणार किंवा प्रचार करणारय?
जंतूची शिकवणी
आपण उपस्थित केलेला मुद्दा :
>>ब्राह्मणाने स्वतःच स्वतःला भटुर्डे, वरणभात म्हणलेलं चालायच; पण आता मराठ्यांच्या त्याच शब्दांवर 'जन्माने ब्राह्मण' रडगाणं गातायत आणि 'विचारवंत' त्यांचे सांत्वन करतायत.
त्यावर मराठ्यांनी ब्राह्मणांना असं संबोधण्यात जातीयता कशी दिसते ते मी सांगितलं. त्यावर तुमचा मुद्दा -
>>भटुर्डे आणि वरणभात हे कायद्याने गुन्हा आहे का?
एवढाच असला तर माझी लेखनसीमा. कारण तुम्ही अधिक बोलून माझाच मुद्दा सिद्ध करता आहात.
आपण उपस्थित केलेला मुद्दा :
>>जन्माने अर्ध्या CKPने 'मी ब्राह्मण नाही' म्हणलेल चालतं; पण तेच मराठ्याने सारस्वत, CKPना ब्राह्मणेतर म्हणलं तर ते 'महारोचक' होतं.
त्यावर माझा प्रतिसाद :
>>जर मराठे एके काळच्या कर्मठ ब्राह्मणांसारखे वागत असतील, तर ते महारोचक का नव्हे ते समजलं नाही. (तसं मराठे खरंच म्हणताहेत हे कशावरून ते मला समजलेलं नाहीच, पण ते असो.)
ह्यावर तुम्हाला जर असं म्हणावंसं वाटत असलं,
>>एका प्रतिसादावरुन सगळे मराठे तसंच समजतात हे कन्क्लुजन कसं काढलं?
तर माझी लेखनसीमा.
थोडक्यात, तुमच्या तर्कशास्त्राची नीट आणि दीर्घकाळ शिकवणी घेतल्याशिवाय मला तुमचे प्रतिसाद समजणार नाहीत असा निष्कर्ष मी इथे काढला (कदाचित तुम्हीही तसाच निष्कर्ष काढाल, पण तो तुमचा निर्णय असेल; माझा नव्हे). ती शिकवणी तुम्ही घेऊ शकाल असा निष्कर्ष काढण्यासाठी आतापावेतो ह्या धाग्यावर आलेले तुमचे प्रतिसाद पुरेसे नाहीत. ती शिकवणी इतर कुणी घेऊ शकेल असं ह्या धाग्यावरच्या इतरांच्या प्रतिसादावरूनही वाटत नाही. त्यामुळे आता मी स्वतःला ह्या बाबतीत अज्ञ मानतो, त्याची जाहीर कबुली इथे देतो आणि ह्याउप्पर गप्प बसतो.
मराठ्यांनी ब्राह्मणांना किंवा
मराठ्यांनी ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणांनी मराठ्यांना असं किंवा तसं किंवा कसंही संबोधण्यास माझी आणि कायद्याचीही काहीच हरकत नाही.
पण 'मराठ्यांनी' भटुर्डे शब्द वापरल्याने जर एखाद्या 'केवळ जन्माने ब्राह्मण पण जातपात न मानणार्या'ला वाईट वाटत असेल आणि दुसर्याला त्याचं सांत्वन करावंस वाटत असेल तर ते 'दोघेही' जातपात मानत नाहीत हा फक्त 'देखावा' आहे असं वाटणं लॉजिकल आहे की इल्लॉजिकल?
ie जर तुम्ही दोघेही 'खरंच' जातपात मानत नसता तर 'कोणीतरी कोणालातरी कायतरी' म्हणल्याने तुम्हाला वाईट वाटलं नसतं/सांत्वन करावंस वाटलं नसतं. पण ते तसं वाटतंय याचा अर्थ तुमच्या मनातदेखील खोलवर कुठेतरी जात रुजली आहे.
===
पण तुम्ही जर सारस्वत, सीकेपी वगैरेंना आजही ब्राह्मणेतर समजत असाल, तर हे महारोचक आहे. >> या वाक्यांचा अर्थ मी असा लावला की 'मराठ्यांनी सारस्वत, सीकेपीना ब्राह्मण समजले पाहिजे. पण ते तसे करत नसतील तर ते फारच जातियवादी आहेत.' ie अजयची ती वाक्यं तुम्ही 'बघाबघा मराठे कसे कर्मठ आहेत' हे दाखवण्यासाठी वापरत होता.
मी लावलेला अर्थ चुकीचा आहे का? तुम्हाला वेगळंच काही म्हणायचं होतं का? कारण आता तुम्ही परत मलाच विचारताय की '(तसं मराठे खरंच म्हणताहेत हे कशावरून ते मला समजलेलं नाहीच, पण ते असो.)
===
एनीवे. थांबते. कंटाळा आला.
ताई , तुमचे या विषयांवरचे
ताई , तुमचे या विषयांवरचे लिखाण हे या मोर्चा संबंधीचे अत्यंत representative आहे. जी बाजू जे मुद्दे तुम्ही मांडताय ते तुम्हाला आणि मोर्चा समर्थकांना योग्य, न्याय्य ,आणि अत्यंत तार्किक वाटत आहेत आणि तेच मुद्दे 'इतरांना' बरोब्बर उलट म्हणजे अतार्किक , अयोग्य आणि अन्याय्य वाटत आहेत. या विषयावर समर्थक आणि इतर यांच्यात एकमत होणे मला अवघड वाटते.( आणि हे मत फक्त ऐसीवरच्या लोकांपुरते मर्यादित नाही )
बुच मारल्याने प्रतिसाद अधिक
बुच मारल्याने प्रतिसाद अधिक एक्स्प्लेनेटरी करता येत नाहीय म्हणून हा नवा प्रतिसाद:
मराठ्यांनी ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणांनी मराठ्यांना असं किंवा तसं किंवा कसंही संबोधण्यास माझी आणि कायद्याचीही काहीच हरकत नाही.
पण 'मराठ्यांनी' भटुर्डे शब्द वापरल्याने जर एखाद्या 'केवळ जन्माने ब्राह्मण पण जातपात न मानणार्या'ला वाईट वाटत असेल आणि दुसर्याला त्याचं सांत्वन करावंस वाटत असेल तर ते 'दोघेही' जातपात मानत नाहीत हा फक्त 'देखावा' आहे असं वाटणं लॉजिकल आहे कीइल्लॉजिकल?
ie जर तुम्ही दोघेही 'खरंच' जातपात मानत नसता तर 'कोणीतरी कोणालातरी कायतरी' म्हणल्याने तुम्हाला वाईट वाटलं नसतं/सांत्वन करावंस वाटलं नसतं. पण ते तसं वाटतंय याचा अर्थ तुमच्या मनातदेखील खोलवर कुठेतरी जात रुजली आहे.
रादर कोणीही विचारलेलं नसताना एखादी व्यक्ती 'मी जन्माने ब्राह्मण' सांगतेय द्याट इटसेल्फ इज अ इंडिकेशन की ती व्यक्ती बाकी काहीही असेल पण 'जातपात न मानणारी' नक्कीच नाही.
===
अजय: Also मराठा आणी ब्राह्मण शिवाय दुसरे समाज देखील मारवाड्यंकड़े नौकरी करतात , esp अब्राह्मणीय बुद्धीजीवी समाज सारस्वत,ckp वग़ैरे, आणी ते देखील मोठ्या सांख्येत
त्यावर चिंजंचे उत्तर: पण तुम्ही जर सारस्वत, सीकेपी वगैरेंना आजही ब्राह्मणेतर समजत असाल, तर हे महारोचक आहे. >> या दोन्ही प्रतिसादांचा अर्थ मी असा लावला की 'मराठ्यांनी सारस्वत, सीकेपीना ब्राह्मण समजले पाहिजे. पण ते तसे करत नसतील तर ते फारच जातियवादी आहेत.' ie अजयची ती वाक्यं 'बघाबघा मराठे कसे कर्मठ आहेत' हे दाखवण्यासाठी चिंजं वापरत होते.
म्हणून मी लिहलं की: जसं जन्माने अर्धा CKP 'मी ब्राह्मण नाही' सांगतो तसंच सारस्वत, CKPना मराठ्याने ब्राह्मणेतर म्हणल. त्यातलं पहिलं चालतं पण दुसरं 'महारोचक' होतं?
मी लावलेला अर्थ चुकीचा आहे का?
तुम्हाला वेगळंच काही म्हणायचं होतं का? कारण आता तुम्ही परत मलाच विचारताय की '(तसं मराठे खरंच म्हणताहेत हे कशावरून ते मला समजलेलं नाहीच, पण ते असो.)
===
एनीवे. थांबते. कंटाळा आला.
तर्कशास्त्र शिकून घेण्याचा (कदाचित क्रमशः) प्रयत्न
>>पण 'मराठ्यांनी' भटुर्डे शब्द वापरल्याने जर एखाद्या 'केवळ जन्माने ब्राह्मण पण जातपात न मानणार्या'ला वाईट वाटत असेल आणि दुसर्याला त्याचं सांत्वन करावंस वाटत असेल तर ते 'दोघेही' जातपात मानत नाहीत हा फक्त 'देखावा' आहे असं वाटणं लॉजिकल आहे की इल्लॉजिकल?
एक तर्कशास्त्रीय व्यायाम म्हणून एवढं करा :
- सगळे ब्राह्मण वैट्ट दुष्ट आणि परकोटीचे जातीयवादी आहेत हे गृहितच धरा.
- ब्राह्मणांना उद्देशून 'भटुर्डा' शब्द कुणी एक मराठा वापरत असेल असं माना.
आता मला सांगा : तो मराठा तुमच्या मते जातीयवादी आहे की नाही?
मलापण तर्कशास्त्र समजले नाही.
मलापण तर्कशास्त्र समजले नाही. आधीच आमचं डोकं तापलेलं आणि मेंदु गुढग्यात! इवलासा, छोटुसा... त्याला काय व्यायामबियाम करायला लावायलेत :-(
मराठा जातीबेस्ड मोर्चे काढतोय, जातीबेस्डच आरक्षण मागतोय मंजे तो जातियवादी आहेच.
मग ब्राह्मणांना भटुर्डे म्हणलं काय किंवा CKPला ब्राह्मणेतर म्हणलं काय. या दोन्ही माझ्या मते फारच मायनर बाबी आहेत मराठ्यांना जातियवादी प्रुव करण्यासाठी.
===
मी हा मुद्दा लावून धरला कारण न विचारताच 'खरंतर मी जन्माने मराठा (किंवा इतर कोणती जात) पण जातपात मानत नाही' असे बोलणारं कोणी भेटलं नाही आतापर्यंत. भविष्यातही भेटणार नाहीत अशी आशा आहे.
खरंतर मी जन्माने मराठा (किंवा
खरंतर मी जन्माने मराठा (किंवा इतर कोणती जात) पण जातपात मानत नाही' असे बोलणारं कोणी भेटलं नाही
पण मी जन्माने ब्राह्मण पण जातपात मानत नाही याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की मला समाजातील माझ्या जातीच्या "नीश" तोंंडवळ्याबद्दल अभिमान आहे पण मी उच्च-नीच मानत नाही.
.
असे अनेकजण असू शकतात की.
प्रयत्न
>>या व्यायामानंतर, त्यांचे मत, तर्कशास्त्रानुसार कसे काय सिद्ध होईल?
मला काहीच सिद्ध करायचं नाही. मला जे कळत नाही ते कळून घेण्याचा तो एक प्रयत्न होता. मात्र, मला मदत होईल असा प्रतिसाद त्यावर न आल्यामुळे मी आता हा शिकवणीचा प्रयत्न सोडून देतो आहे. इत्यलम.
मोदी पंतप्रधान झाल्या ची व्यथा आहे का ???
मग esakal.com च्या बातमीच्या खाली आलेली ही comment आवडेल तुम्हाला -
मोदी शहांचं अभिनंदन आणि भारताला शुभेच्छा.
आताचे कल बघीतले तर भाजप स्वबळावर सरकार बनवेल. या विजयासाठी मी मोदी शहांचं अभिनंदन करतो.
भारताला माझ्या शुभेच्छा! त्या अशासाठी की मोदी शहांच्या जिंकण्याने अनेक जिंकणार पण अनेक हरणार आहेत. त्याचा हिशेब मांडला तर अनेकांना शुभेच्छा देणं गरजेचं आहे.
रोहीत वेमुलाची शहादत आणि अखलाख हरले आहेत. अनुक्रमे समता आणि स्वातंत्र्य हरले आहे, उर्वरित समता आणि स्वातंत्र्याला आहे तेवढं टिकून राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
भांडवलशाही प्रचंड बहुमतानं जिंकत आहे. कामगारांना त्यांच्या जिवंत राहण्याच्या धडपडीसाठी शुभेच्छा.
शेतकरी आत्महत्त्या हरल्या आहेत. शेतकर्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी शुभेच्छा.
सव्वाशे लाख हेक्टर वनजमीन नष्ट आधीच नष्ट करण्यात आली आहे. जंगलं, झाडं, पशू पक्षांना त्यांच्या जगण्यासाठी शुभेच्छा.
वैदिक शिक्षण जिंकत असून भारतीय शिक्षण हारत आहे, भारतीय शिक्षणाला शुभेच्छा.
नोटाबंदीत रगडलेल्या गोरगरिबांनीही मोदी शहानाच मत दिले असेल तर त्यांना यापुढील आर्थिक आरिष्टातून वाचण्यासाठी शुभेच्छा.
साध्वी-मोदी-योगी जिंकत आहेत, धर्मनिरपेक्षतेला माझ्या शुभेच्छा.
सीबीआय पासून आरबीआय पर्यंत सगळ्यांचे स्क्रू मागच्या पाच वर्षात ढिल्ले करून ठेवणारे पुन्हा जिंकत आहेत. व्यवस्थेचे डोलारे कोसळणार आहेत म्हणून व्यवस्थेला शुभेच्छा.
संसद, सरकार आणि न्यायालयापेक्षाही स्वतःला मोठं समजणारांचा विजय होत असतांना लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांना शुभेच्छा.
सगळ्यात महत्वाचं. भारतीय राज्यघटनेला खूप खूप शुभेच्छा.
माझ्या मतांचा सारांश: * मराठा
माझ्या मतांचा सारांश:
* मराठा मोर्चा जोपर्यंत अहिंसक मार्गाने, शांततेत चालू आहे तोपर्यंत माझा त्याला पुर्ण पाठिंबा आहे.
* सध्या आहे ते आरक्षण तसेच ठेवून त्याउप्पर मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीलादेखील पाठिंबा.
* मराठा+कुणबीना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाइतके आरक्षण द्यावे. ओबीसीसाठी सध्या असलेल्या १९% मधून कुणब्यांचा वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात वजा करावा आणि तो इकडे अॅड करावा.
* जर सरकारकडून घटना, कायदे मॉडिफाय करुन आरक्षण मिळत नसेल तर सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व मराठा शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन 'मराठा विद्यापीठ' स्थापन करावे आणि 'पुर्ण खाजगीकरणाचा' मार्ग वापरून त्यातल्या १००% जागा केवळ मराठा+कुणबी जातीसाठी ठेवाव्या.
किंवा SC, ST, NT साठी ३१% आणि बाकीचे मराठा असे 'ऐच्छीक' आरक्षण ठेवावे.
* अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर केल्यास शिक्षेची तरतुद करावी या मागणीदेखील पाठींबा.
* ठरावीक काळाने येणारा दुष्काळ, नापीक जमीन वगैरेमुळे गांजलेल्या शेतकर्यांसाठी (ज्यातले बरेचसे मराठा आहेत) काहीतरी दिर्घकाळ उपाययोजना शोधावी. मागे एका प्रतिसादात पुर्ण पुर्नवसनाचा उपाय मी सुचवलेला पण त्यावर अधिक भाष्य करण्याइतका माझा अभ्यास नाही.
===
यापेक्षा अधिक काही बोलण्यासारखे माझ्याकडे नाही त्यामुळे बायबाय.
www.aksharnama.com/client/art
www.aksharnama.com/client/article_detail/42 हा लेख नुकताच वाचला. आवडला.
उद्बोधक
In reply to तुम्ही जीडीपी बद्दल बोललात, by अजयजी
मी मारवाड्यांना सोडत नाहीए. इथे मुद्दा मराठ्यांच्या सामाजिक परिस्थितीचा चाललाय, आणि ब्राह्मणांना त्याबद्दल काय-किती देणंघेणं आहे ह्याबद्दल मी बोलत होतो. म्हणून मारवाडी इथे अवांतर ठरतात.
ठीक, पण तुम्ही जर सारस्वत, सीकेपी वगैरेंना (निदान ह्या मुद्द्यापुरते तरी; बाकी मौंजीबंधन / मर्तिकाचे विधी / रोटीबेटी व्यवहार वगैरे गोष्टी बाजूला ठेवू ;-) ) आजही ब्राह्मणेतर समजत असाल, तर हे महारोचक आहे. :-)
व्हॅल्यूचेनमध्ये ते कुठे आहेत असा मुद्दा होता. सर्व्हिस इंडस्ट्रीत काम करणारे मराठे आणि ब्राह्मण ह्यांच्यात तुलना करता ब्राह्मण लोकसंख्येनं कमी असूनही व्हॅल्यूचेनमध्ये वर असावेत.