मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७४

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.

----

इतरांना लिंका डकवायला विरोध न करणे म्हणजे स्वतः पिंका न डकवणे नव्हे.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अरुणजोशी, परवाच खरडफळ्यावर

हलवला आहे प्रतिसाद

रेल्वेचा खडखडाट फार असतो आणि

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

मेट्रो घराजवळून जात असल्यास

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

भयानक आहे.

मासे खरच आत्महत्या करतात, त्यांना मानसिक ट्रॉमा होतो असे या लेखावरुन दिसते. Sad Sad
http://www.ecowatch.com/sea-shepherd-captive-dolphins-2159549466.html
.
खरच वॉटरपार्क्सवरती काहीतरी निर्बंध हवेत.

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७४

पुण्यात हडपसर मध्ये " ज्ञानेश्वर लाँड्री " ची छान पाटी मी वाचली आहे. आता एव्ह्ढेच बाकी राहिले होते ! !

माझ्या एका तेलुगु

माझ्या एका तेलुगु मैत्रिणीच्या मुलाचे नाव ज्ञानदेव होते. पालक किती प्रेमाने अशी नावे ठेवतात. प्रत्येकालाच वाटते आपले मूल भाग्यवान, बुद्धीमान, राजस व्हावे. त्याचे सर्व चांगले व्हावे (स्माईल)
मला मात्र त्या नावाचे (मनातल्या मनात) हसू येई Sad. आय मीन आपण शहरी मराठी लोक ज्ञानेश्वर वगैरे नावे फारसे ठेवत नाही म्हणुन . पण आहे छान नाव.
.
बाकी लाँड्रीला ते नाव (स्माईल)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

अहिल्यादेवी मटण शॉप असतं ना!

अहिल्यादेवी मटण शॉप असतं ना!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

बिडी

सम्भाजी बिडी !! शिवाजी किराणा ई.

यात

यात एवढे आश्चर्यजनक काय आहे?

हे

हे 'अलीकडे काय वाचलंत'मध्ये हवं होतं ना?

चौथीतला प्रश्न: कोकणात

चौथीतला प्रश्न: कोकणात धाब्याची घरे का नसतात?
उत्तर: फार पाऊस पडतो म्हणून.

हाहाहा हो वाटतं असं काहीतरी

हाहाहा हो वाटतं असं काहीतरी होतं (स्माईल)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

धाबं दणाणलं याचा शब्दशः अर्थ

धाबं दणाणलं याचा शब्दशः अर्थ काये? धाबं बोले तो?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धाब्याची घरं

माझ्या आजोबांनी बांधलेले घर धाब्याचे होते. ते मी पाहिलेले आहे. ते घर 'धाब्याचे' असणे याबद्दलचे माझे आकलन सांगतो.

१. धाबे म्हणजे स्लॅब, वर थत्ते काकांनी म्हटले आहे तसे आडवे, गच्चीसारखे. माझ्यामते पूर्वी खेड्यात घर बांधत असतांना, बांधणार्याच्या बजेट नुसार घरांवर धाबे असावे, पत्रे आणि कौलं असावीत का नुसती कौलं किंवा पत्रे असावीत हे ठरत असावे.
२. हे धाबे बल्ल्या, फळ्या आणि माती या तीन गोष्टींनी बांधत असावेत. आमच्या घरातला जो समोरचा मोठा हॉल होता त्यात त्या धाब्याला आधार द्यायला ४ खांब होते हेही आठवतेय.
३. भिंती बांधून झाल्यावर त्यावर आडव्या बल्ल्या (उभे रोवलेले तासलेले खोड म्हणजे खांब आणि आडवे लावलेले ती बल्ली असे) टाकुन मग त्यावर फळ्यांचे छत बनवले जात असावे.
४. त्या छतावर माझ्यामते गोणपाट किंवा कोणतेतरी कापड अंथरले जात असावे अन मग त्यावर मातीचा मोठा थर टाकला जात असावा.
५. त्या मातीच्या थरावर कसलासा गिलावाही होता असे अंधुक आठवतेय. कदाचित ते शेणाने सारावलेलेही असावे.
६. पावसाचे पाणी त्या गिलाव्यावरून वाहून पन्हाळ्यातून खाली पडे. माझ्या अंदाजे वाहणारे पाणी ढाब्यात फार किंवा काहीच जिरत नसावे.
७. छताच्या फळ्या, बल्ल्या आणि खांब कसल्याश्या पॉलिशने रंगवलेले होते.

या धाब्यावर आदळआपट केली, पाय आपटून चालले किंवा मुलांनी उड्या मारल्या की ती खरेच दणाणत असे. कधीकधी फळ्यांच्यामधून मातीही निसटून पडे. छतावर होणाऱ्या आवाजाची तक्रार 'का उड्या मारता रे पोरांनो, माती पडतीये ना!' अशी होत असे. ती तक्रार करणारी माणसं पुढं शहरात येऊन सिमेंटच्या स्लॅबच्या घरात राहायला लागली तरी अगदी त्याच शब्दात करत, आणि ते घर न पाहिलेल्या तुलनेने लहान असलेल्या चुलत-मावस भावंडांना 'हि माती म्हणजे नेमकी कशी पडतीये' हे कोडे काही सुटत नसे.

हे धाबे घरातुन अगदिच नाही पण साधारण असे दिसे.

dhabe

ती तक्रार करणारी माणसं पुढं

ती तक्रार करणारी माणसं पुढं शहरात येऊन सिमेंटच्या स्लॅबच्या घरात राहायला लागली तरी अगदी त्याच शब्दात करत,

मस्त मस्त (स्माईल)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

धन्यवाद

वाह! मस्तं प्रतिसाद.

थत्ते, राही यांनाही धन्यवाद!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पण ते चित्र कडेपाट छपराचं

पण ते चित्र कडेपाट छपराचं (सिलिंग) आहे, यावर गच्ची नसणार. माडी असेल.
अगदी निव्वळ धाब्याचं ( आणि स्वस्तातलं)-
चार भिंती वर आणून त्यावर थोडी मोठी लाकडं एक फुटभर अंतर ठेवून बसवायची,
त्यावर तुरकाट्या आडव्या आणि जवळजवळ थर द्यायचा,
यावर गाळाचा,पांढय्रा मातीचा चिखल ओतायचा.,
धोपटून घट्ट करायचं. यावरचं पावसाचं पाणी खाली झिरपत नाही.वरती उन्हाळ्यात सांडगे पापड वाळवतात. मुलं नाचली तर धाबं दणाणतं,खाली माती पडते.
/* तुरकाट्या = तुरीच्या शेंगा काढून झाल्यावर वाळलेली झाडं.

धाबं म्हणजे छप्पर (सपाट-

धाबं म्हणजे छप्पर (सपाट- उतरतं नसलेलं)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ह्म्म्म

पन्जाबी ढाबा आणी हा धाबा यान्च्यात काही सम्बन्ध असेल की केवळ योगायोग?

म ते दणाणतं म्हणजे काय?

म ते दणाणतं म्हणजे काय? थरथरतं?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धाबं

घराचं धाबं दणाणताना याचि देही याचि कानी ऐकलं आहे कोल्हापुरात. टेबल टेनिसच्या चेंडूएवढ्या गारा मातीच्या छपरावर आदळत होत्या तेव्हा. आवाज अगदी दण्ण दण्ण असा नव्हता. ठपाक-टण्ण असा काहीसा होता.

तुमचा वाद काही मिटायचा नाही

तुमचा वाद काही मिटायचा नाही बहुतेक.
स्त्रिभृणहत्या नको कारण निसर्ग जो काही जुगार खेळतो त्यात ढवळाढवळ नको. दहा पंधरा वर्षांनी संतुलन बिघडलेलं दिसेल.

#नावातली गम्मत:- शारुखच्या एका एका कुत्र्याचं नाव एमिर आहे. अमिरच्या वाड्यात एका कुत्र्याचं नाव शारुख आहे यावर त्याला विचारलं तर त्याने सांगितले कुत्रा माझा नाही ,माझ्या आचाय्राचा आहे त्याला विचारा.ही श्टोरी सिनेब्लिट्झ अंकातली वाचलेली.

# आमच्याकडे येणाय्रा प्लंबरचं नाव ज्ञानेश्वर आहे.सटीप काम करतो.
# एका xxx yyy नावाच्या चोराला पकडल्याची बातमी आमच्या सहकाय्रांनी मुद्दामहून सायबाला वाचून दाखवली कारण सायबाचे तेच नाव होतं. "ह्या आमचो गावचो नाय , तो पलिकडचो!" - सायेब.

मुलांची नावं

हल्ली मुलग्यांची नावं आर्य किंवा आर्यन ठेवण्याची फॅशन आहे. (अ)भारतीय ज्यूंच्या भावना त्या नावांमुळे दुखावत असतील काय? कोणी मराठी ज्यू लोक ऐसी वाचतात का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या नवर्‍याच्या चुलत

माझ्या नवर्‍याच्या चुलत बहीणीची आई ज्यु आहे आणि त्या अस्खलित मराठी बोलतात (स्माईल)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

माहितीपूर्ण पण निरुपयोगी.

अस्खलित मराठी बोलणारे ज्यू ठाण्यातही चिकार आहेत आणि त्यांतले काही परिचयाचेही आहेत. म्हणूनच ज्यू लोक मराठी बोलतात का, वगैरे चौकशा केल्या नाहीत.

करीना आणि सैफनं आपल्या मुलाचं नाव 'तैमूर' असं ठेवल्यावर भगव्यांचा भावना भडकल्याचं दिसतंय; किंवा त्या नावामुळे भावना भडकवून घेणारे ते भगवे, असं मी म्हणत्ये. तर 'आर्यन' नावामुळे ज्यूंच्या भावना भडकतात का, असा प्रश्न आहे. तुमच्या नातेवाईकांना विचारू शकता का?

---

'आराध्या' असं नाव ऐश्वर्या आणि अभिषेकनं ठेवल्यामुळे नास्तिकांच्या भावना भडकल्याचं दिसलं नव्हतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अस्खलित मराठी बोलणारे ज्यू

अस्खलित मराठी बोलणारे ज्यू ठाण्यातही चिकार आहेत

त्याही म्हणजे नवर्‍याचे काका-काकू (काकू ज्यु) ठाण्याचेच आहेत.

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

त्या ज्यूंची प्रतिक्रिया

त्या ज्यूंची प्रतिक्रिया हिटलर या नावाबद्दल कशी होते ते पहा आणि कळवा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ऐसीवर फॅनडम असलेले इतिहासकार आणि त्यांच्या फ्यानांसाठी

या लेखात निःक्षत्री पृथ्वी करणारा परशुराम, खांडववन जाळून नागवंश नाहीसा करणारा कृष्ण अशा हिंदू देवतांची, विष्णू-अवतारांची दखलच घेतलेली नाही. पण तरीही हा लेख एकदा वाचायला हरकत नाही - The Taimur controversy illustrates Hindutva's self-inflicted neurosis regarding Islamic history

उगाच स्वप्नरंजन - तर लेखात म्हटलंय की तैमूरलंगाने तुघलकांच्या दिल्लीवर हल्ला केला आणि तिथे मोठी नासधूस केली. हा नवा तैमूर सध्याच्या नोट-तुघलकांचा कर्दनकाळ बनून नव्या इतिहासात कल्की बनेल का?

एडॉल्फ हे नाव जर्मनीत किती लोकप्रिय आहे, हे गूगलून सहज दिसेल. (जरा कष्ट करा बै!) एडॉल्फ हे नाव आणि हिटलर हे आडनाव यांतला फरक अस्वलानं आधीच लिहिला आहे. फेसबुकवर वाचनात आलेली मल्लिनाथी - निर्भयाचा प्रमुख गुन्हेगार, बलात्कारी आणि आरोपीचं नाव राम सिंग होतं. आता बोला, नावात काय आहे!

(अवांतर विनंती - कृपया इथल्या विषयांशी संबंधित नसलेले, पुढचे छोटे-मोठे विचार पुढच्या धाग्यांवर लिहावेत.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जर्मनीत एडॉल्फ किती आहेत हे

जर्मनीत एडॉल्फ किती आहेत हे बघण्यापेक्षा इस्राएलमध्ये एडॉल्फ किती आहेत हे बघणं रोचक ठरेल.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ढेरेशास्त्री एका वाक्यात

ढेरेशास्त्री एका वाक्यात तुम्ही निरर्थक युक्तीवादातला फोलपणा दाखवून दिलात. सॉलिड.

अवांतर

यावरून वाचलेला एक विनोदः
(In German)

A man goes to the municipal building and speaks to a clerk. He says that he's been living with a shameful name for too long, and he's finally had too much so he wants his name legally changed immediately.

The clerk looks at him in shock and asks, "What on earth could your name be to cause you to act this way?" To which the man answers, "My name is Adolf Fuckhead."

The clerk draws back and says, "Ah, I see what you mean, Herr Fuckhead. What shall your new first name be?"

मुळात इस्राएलमध्ये अडॉल्फ का असावेत?

बोले तो, हिटलरचे एक सोडा, परंतु हिटलरपूर्व किंवा हिटलरच्या बापाच्या समकालीन युरोपीय/अश्कनाझी ज्यूंमध्ये आपल्या मुलाचे नाव सामान्यत: 'अडॉल्फ' असे ठेवण्याची प्रथा कितपत होती? (सेफार्दी ज्यू तसेच भारत/इथियोपिया/येमेन/इराण आदि राष्ट्रांतून इस्राएलला स्थलांतरित झालेले ज्यू किंवा ओटोमन काळापासून प्यालेष्टाइनमध्येच वास्तव्यास असलेले 'भूमिपुत्र' ज्यू यांचा तूर्तास विचार केलेला नाही, परंतु त्यांच्यातही मुलास 'अडॉल्फ' असे नाव ठेवण्याची प्रथा असण्याबद्दल, आपण ऐकले असल्यास कल्पना नाही, परंतु निदान मी तरी ऐकलेले नाही. आणि, हि.पू. काळातसुद्धा अश्कनाझी ज्यूंमध्ये 'अडॉल्फ' हे मुलास देण्याचे नाव म्हणून रूढ असल्याबद्दल ऐकण्यात आलेले नाही. म्हणजे, तो विकल्प अर्थात असावाच, परंतु त्या विकल्पाचा फायदा बहुधा कोणी घेत नसावे. असो.)

तर सांगण्याचा मुद्दा, मुळात आडातच नाही, तिथे पोहऱ्यात कुठून येणार?

(उलटपक्षी, इस्राएलमध्ये 'अडॉल्फ' हे नाव प्रचलित व्हावयास पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. कारण, 'अगर शिवाजी ना होते तो सुनति होती सब की'च्या चालीवर, 'अगर हिटलर ना होते तो ना होता इस्राइल'. बोले तो, प्यालेष्टाइनमध्ये ज्यूराष्ट्र स्थापन करण्याची (युरोपीय) ज्यूंची मागणी तशी बरीच जुनी, हिटलरच्या बऱ्याच आधीची आणि हिटलरच्या कृत्यांशी काहीही संबंध नसलेली आहे. परंतु तिला आंतरराष्ट्रीय बाजारात कोणीही भीक घालत नव्हते. पण हिटलरनंतर तिचा भाव वधारून मग इस्राएलची स्थापना होण्यास पाठिंबा मिळणे शक्य झाले. यास्तव वस्तुत: इस्राएली राष्ट्राने हिटलरास कृतज्ञतापूर्वक राष्ट्रपिता म्हणून घोषित केले पाहिजे, नि प्रत्येक राष्ट्राभिमानी इस्राएलीने आपल्या एका तरी मुलाचे नाव 'अडॉल्फ' असे अभिमानपूर्वक ठेवले पाहिजे. पण लक्षात कोण घेतो?)
..........

यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात किती जणांना दिले जात असावे हा एक संशोधनाचा विषय ठरावा. (नाही म्हणायला मिंटो ब्रिजचे नाव बदलून शिवाजी ब्रिज केले खरे.) असो.

जालावर शोध घेता युरोपीय ज्यू

जालावर शोध घेता युरोपीय ज्यू लोकांमध्ये एडॉल्फ हे सेक्युलर नाव ठेवलं जायच असं दिसतं. सो आडात आहे. युद्धानंतर नसेल ठेवत कोणी मेबी.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

:-)

'न'बा हे आमचे राजहंस आहेत. दूध का दूध करतात!

(तुम्हाला माझं लेखन वाचून केस उपटावेसे वाटत नाहीत, याचं परिमार्जन करण्याचा क्षीण प्रयत्न! (डोळा मारत) )

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात

यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात किती जणांना दिले जात असावे हा एक संशोधनाचा विषय ठरावा.

बंगाल आणि तमिळनाडूत तरी हे नाव अधूनमधून बघावयास मिळते खरे. सिवाजी बंदोपाध्याय, सिवाजी गणेशन, इ.इ. उत्तरेचे माहिती नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

माजी बसवाहक सिवाजी गायकवाड

माजी बसवाहक श्रीयुत सिवाजी गायकवाड यांचं नाव टाळल्याबद्दल/न आठवल्याबद्दल तुम्हाला काळा चष्मा आणि लुंगी नेसून चेन्नैच्या अण्णासलाईवर नाच करण्याची शिक्षा देण्यात येत आहे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ते तर मराठीच (बोले तो यू कॅन

ते तर मराठीच (बोले तो यू कॅन टेक अ मराठी औटॉफ महाराष्ट्रा बट...इ.इ.) म्हणून त्यांचे नाव घेतले नाही ओ.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

साम्यं?

आता मला काही गोष्टींचा खुलासा हवाय, म्हणून हे थोडं जाहीर विचार करणं. प्रतिसादातल्या विस्कळीतपणाबद्दल माफ करा.

तैमूरलंगानं हल्ला केला त्या दिल्लीवर तुघलकांची सत्ता होती. सध्याचे तुघलक - मोदी - असा विचार केला तर भारत आणि इस्रायलची तुलना, अवकाश आणि काल या दोन्ही मिती एकत्र करता रास्त वाटते. म्हणजे काहीशे वर्षांपूर्वी दिल्लीत तैमूरलंगानं थैमान घातलं, त्याच दिल्लीत आता मोदी राज्य करतात. एडॉल्फनी ज्यांना त्रास दिला त्यांचे वंशज आता काही प्रमाणात इस्रायलात आहेत (रशियन, भारतीय, इत्यादी ज्यू इस्रायलमध्ये आहेतच आणि काही वंशज अमेरिका आणि अन्य जगात राहतात). पण तैमूरशी भारतीयांचं वैर असलंच तर ते काळ या मितीमध्ये बऱ्याच वेगळ्या ठिकाणी घडलं आणि एडॉल्फशी ज्यू लोकांचं वैर निराळ्या अवकाशात - निराळ्या देशातच, ठिकाणी घडलं.

Behind the Name: Meaning, origin and history of the name Adolf. From the Germanic name Adalwolf, which meant "noble wolf" from the Germanic elements adal "noble" and wulf. It was borne by several Swedish kings as a first or second name, most notably by Gustav II Adolf in the 17th century. (संदर्भ)

तर इस्रायली लोकांनी जर्मन भाषा आणि तिथल्या ख्रिश्चन राज्यकर्त्यांचा इतिहास कधीच आपलासा मानलेला नाही. भारताचं मात्र असं नाही. अगदी पंतप्रधानांची तुलनाही परदेशी वंशाच्या राजांशी होते; अकबराच्या कलासक्ततेबद्दल भारतीय प्रेमानं बोलतात. तुर्की, अफगाणी वंशांपर्यंत मुळं शोधता येतील असे लोक भारतात गुण्यागोविंदानं राहतात. तर ये बात हजम नहीं हुई!

शिवाय मोदी तुघलक नसतील तर मग तुलना कशाच्या आधारावर होत्ये, हे समजून घेणं आणखी कठीण जातंय. मदत कराल का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तर इस्रायली लोकांनी जर्मन

तर इस्रायली लोकांनी जर्मन भाषा आणि तिथल्या ख्रिश्चन राज्यकर्त्यांचा इतिहास कधीच आपलासा मानलेला नाही

आम्हीतरी नाही मानला अफगणीस्तान आणि तुर्कस्थान चा इतिहास आपला वगैरे. तुम्ही तो तुमचाच इतिहास असल्यासारखे डीफेड करत असलात तर ते तुम्हाला शोभेसे आहे.

इतके वर्ष भारतालल्या वाळवंटी लोकांनी सुद्धा शक्यतो तैमुर, औरंगजेब, बाबर वगैरे नावे ठेवण्याचे टाळले होते.

तैमूरशी भारतीयांचं वैर असलंच तर ते काळ या मितीमध्ये बऱ्याच वेगळ्या ठिकाणी घडलं

नशिबच की तैमुरचे भारतियांशी ( म्हणजे खरे तर हिंदुंशी ) वैर होते हे तरी मुख्याध्यापक बाईना मान्य आहे. मला तर वाटले होते की तैमुर कीती संत माणुस होता असा तास बाई घेणार.

बॅटोबा - ७००-८०० वर्षापूर्वी ज्यानी लाखो लोकांची मुंडकी कापुन त्याच्या टेकड्या बनवल्या ते आता फार जुने झाले म्हणुन सोडुन द्यायला पाहिजे.

बॅटोबा - ७००-८०० वर्षापूर्वी

बॅटोबा - ७००-८०० वर्षापूर्वी ज्यानी लाखो लोकांची मुंडकी कापुन त्याच्या टेकड्या बनवल्या ते आता फार जुने झाले म्हणुन सोडुन द्यायला पाहिजे.

आंगाश्शी. या न्यायाने दोनेकशे वर्षांपूर्वीच्या पेशवाईचे संदर्भ सिलेक्टिव्हली काढून लाज वाटावी असे प्रयत्न होत असतात त्यांची काय वाट? ते बरं चालतं?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नशिबच की तैमुरचे भारतियांशी (

नशिबच की तैमुरचे भारतियांशी ( म्हणजे खरे तर हिंदुंशी ) वैर होते हे तरी मुख्याध्यापक बाईना मान्य आहे.

धन्यवाद.
बाकी सैफ आणि करीनाच्या ह्या आचरटपणाबद्दल ते बिचारं पोरगं आयुष्यभर (त्याला नांव बदलायचा चान्स मिळेपर्यंत) लोकांचे जोडे खाणार आहे.
तो जितक्या लवकर सज्ञान होऊन आपल्या आईबापाला जाब विचारेल तो सुदिन!!!

सहमत आहे

+१

१९९२/२००२ मध्ये काय झालं ते आता विसरून जायला पाहिजे असं आम्हाला २०११-१२ पासूनच सांगितलं जाऊ लागलं होतं. (तसेही मे २०१४ पूर्वी भारतात काय चांगलं घडलं ते विसरून जायचेच दिवस आहेत सध्या).

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

नशीबच की तैमूरचे भारतीयांशी (

शीबच की तैमूरचे भारतीयांशी ( म्हणजे खरे तर हिंदूंशी ) वैर होते हे तरी मुख्याध्यापक बाईना मान्य आहे. मला तर वाटले होते की तैमूकिती संत माणूस होता असा तास बाई घेणार.

थ्यांक्यू.

शोएब दानियालची अडाणचोट,

शोएब दानियालची अडाणचोट, एकांगी आणि पूर्वग्रहदूषित पत्रकारिता मिरवणार्‍यांच्या बौद्धिक अवस्थेबद्दल फार काळजी वाटते. हा फॉल्ट मुळातच आहे की डोक्यावर पडल्यामुळे तयार झालेला आहे?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

शोएब दानियाल

तैमूर नावावरून चिडचिड आणि ही चिडचीड यात साम्य आहे का?

a

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आर्टिकल

'द ठाकरे(ज)' आणि 'अ ठाकरे' यांत फरक आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला उत्तेजन न देणाऱ्या एखाद्या ठाकरेंच्या नावाने रक्तपेढी असेल, (उदाहरणार्थ भाजपचे कुशाभाऊ ठाकरे यांच्या नावावर असं काही गॉसिपही नाही) तर ठाकरे नावाचा अर्थ निराळा असेल. बाळ ठाकरेंच्या पत्नींच्या नावानं रक्तपेढी असेल तर मला किंचित प्रश्न पडेल; त्यांनी स्वतः हिंसा केली नसेल आणि उत्तेजन दिलंही नसेल. पण त्यांच्या नावावर असलेल्या रक्तपेढीसाठी पैसा कुठून आला असेल असा प्रश्न पडेल.

शोएब दानिएलनं अ आणि द मधला फरक जाणूनबुजून केला नाही का मातृभाषा आर्टिकल-रहित असल्यामुळे (किंवा इतर काही कारणामुळे) ही चूक झाली, असा प्रश्न उरतो. 'अ ठाकरे' असं बुद्ध्याच लिहिलं असेल तर ते सरसकटीकरण ठरेल.

त्यातही दोन दिवसांच्या मुलाला लंगडा म्हणत हिणवणं, सैफ-करीनाच्या नावाने लाखोल्या वाहणं आणि 'विरोधाभास दिसतोय' असं म्हणणं या दोन्हींत सभ्यपणा नसण्या-असण्याचा फरक आहे; ही बाब निराळीच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचे

नावडतीचे मीठ अळणी, आवडतीचे तिखटही गोड

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ऐसीची मार्गदर्शक तत्त्वं

१. शोएब दानियलच्या लेखातल्या एकाही मुद्द्याचं तुम्ही खंडन केलेलं नाही. त्याजागी त्याला आणि मला व्यक्तिगत पातळीवर नावं ठेवलेली आहेत.
२. दोन दिवसांच्या बाळाला कर्करोग होऊ दे आणि त्याच्या आईला गर्भारपणी झिका झालेला असू दे (जेणेकरून त्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर दुष्परिणाम झालेला असेल) असं म्हणणं आणि 'विरोधाभास दिसतोय' या दोन्हींमध्ये सभ्यपणा नसणं आणि असणं असा फरक आहे; हे तुम्हाला समजत नाहीये.

हे पुन्हा लिहिण्याचं कारण एवढंच की तुम्ही वारंवार व्यक्तिगत पातळीवर उतरून प्रतिसाद लिहीत आहात. हे वेळीच आवरा अशी विनंती. ऐसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून -

  • - लेखन करताना दर्जाला व साहित्यमूल्यांना महत्त्व द्यावे. खेळ, करमणूक, गप्पाटप्पा व दंगा यांसाठी स्वतंत्र सदर असल्यामुळे ललित लेखनात व चर्चांमध्ये अवांतर विषय टाळावेत.
  • - जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • - अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.
  • - प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. अशा टीकेकडे खिलाडू वृत्तीने, तीतून शिकण्याच्या उद्दिष्टाने पाहावे.
  • - वाचकांनी साईटवरील लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत करावी. त्यासाठी दर्जा मोजण्याची सुविधा पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. हे साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व लेखनाला श्रेणी देण्याची सुविधा अनेक जुन्याजाणत्या सदस्यांना दिलेली आहे.
  • - प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.
  • - सर्वोत्कृष्ट लेखनाची तसेच नियमितपणे उत्तम लेखन करणाऱ्यांची विशेष नोंद घेण्याबाबत व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.
  • - चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन दिवसांच्या बाळाला कर्करोग

दोन दिवसांच्या बाळाला कर्करोग होऊ दे आणि त्याच्या आईला गर्भारपणी झिका झालेला असू दे (जेणेकरून त्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर दुष्परिणाम झालेला असेल) असं म्हणणं आणि 'विरोधाभास दिसतोय' या दोन्हींमध्ये सभ्यपणा नसणं आणि असणं असा फरक आहे.

बाळांबद्दल असं लिहितात का बॅटमन? आईबाप अज्ञानी, असंवेदन्शील वा भडकाऊ असले तरी डायरेक्ट लहान बाळाला असं नै लिहायचं.
===========================
बाकी अदिती, फक्त उजवे लोक असभ्य लिहितात असं नाही. डावे लोक पण डेंजर प्रकार लिहितात जालावर. तेव्हा सभ्य सभ्य नि असभ्य असभ्य यांची तुलना करावी. तुम्ही असभ्य उजवे आणि सभ्य डावे यांची तुलना करून एकूणात उजवे हिन आहेत असं दाखवता. (म्हणजे याच्या अगदी विरुद्ध काही उजवे देखिल करत असणार.). असं अयोग्य आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

कोण कोणास म्हणाले?

मुद्दा काय आहे, कोण काय म्हणतंय हे काहीही समजून न घेता दिलेल्या प्रतिसादाला मी उत्तर देणार नाही. फक्त श्रेणी देऊन काम भागलं असतं, पण 'परत आल्या-आल्या अजोंना निरर्थक श्रेणी मिळायला लागल्या आहेत' अशी तक्रार वाचली म्हणून मुद्दाम प्रतिसाद. माझा हा प्रतिसाद अजोंच्या प्रतिसादाखाली असला तरीही तो अजोंसाठी नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुद्दा काय आहे, कोण काय

मुद्दा काय आहे, कोण काय म्हणतंय हे काहीही समजून न घेता दिलेल्या प्रतिसादाला मी उत्तर देणार नाही.

Comprehension करिता फार क्लिष्ट असतात तुमचे मुद्दे.
उदा. पहा http://aisiakshare.com/node/5697#comment-145954
http://aisiakshare.com/node/5697#comment-145954
शिवाय मी (मुद्दाम?) समजून घेत असा तुम्ही अगोदरपासून गैरसमज करून घेता.
======================
तुम्ही माझ्या प्रतिसादाखाली दिलेला रिप्लाय मला नाही हे मला ठाउक आहे. मी देखिल उलट तसंच म्हणू शकतो का यावर केव्हाचा विचार करतोय पण ते लॉजिकली इन्कंस्टींट वाटतंय. असो.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

>>Comprehension करिता फार

>>Comprehension करिता फार क्लिष्ट असतात तुमचे मुद्दे.

अंशतः सहमत. कधीकधी "मी विनोद केला होता" असं म्हणूनप्आलेल्या प्रतिवादाची बोळवण केली जाते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

कधीकधी "मी विनोद केला होता"

कधीकधी "मी विनोद केला होता" असं म्हणूनप्आलेल्या प्रतिवादाची बोळवण केली जाते.

अतिशयच सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सवांतर

प्रतिसादाला मी उत्तर देणार नाही

असे म्हणून रँटायची फ्याशन आलीय आजकाल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

शेंगा-टरफले

मी असं लिहिलेलं नाही, मी माफी मागणार नाही. सडक्या मेंदूचा मक्ता हा शांतिप्रिय कत्तलबाजांच्या समर्थकांनी घेतलेला आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तु असं लिहिलं नाहीस तर तुला

तु असं लिहिलं नाहीस तर तुला मार्गदर्शक तत्त्वे का सांगण्यात आलीत? तु नक्की कोणत्या तत्त्वाची सीमा ओलांडलीस?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

ते मला माहिती नाही. प्रतिवाद

ते मला माहिती नाही. प्रतिवाद नसला की "रूल मोडला" वगैरे अर्गुमेंट्स येतात त्यातलाच हाही प्रकार आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

शोएब दानियलच्या लेखातल्या

शोएब दानियलच्या लेखातल्या एकाही मुद्द्याचं तुम्ही खंडन केलेलं नाही. त्याजागी त्याला आणि मला व्यक्तिगत पातळीवर नावं ठेवलेली आहेत.

व्यक्तिगत नावे कशी ठेवावी याची दीक्षा तुमच्याकडून घेतली वं गुरुमाय! _/\_

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हे ट्वीट कुठं दिसलं नाही

हे ट्वीट कुठं दिसलं नाही त्याच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर. लाथा बसल्यावर डिलीट केलंय का? कधीचं आहे?

https://twitter.com/ShoaibDaniyal?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp...

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

डिलीट केलेलं आहे. आता का आधी

डिलीट केलेलं आहे. आता का आधी ते नाही माहिती.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सेमच आहे.

सेमच आहे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

इतिहासाभ्यास

एॅड-होमिनेम करून इतिहासाभ्यास मिरवता येणार नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विना अभ्यास, नुसता बकवास

कुणापुढे काही मिरवायची गरज मला नाही. तुम्हांला असल्यास टेक केअर.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

"हिटलर हे नाव".

तुम्हाला "अ‍ॅडॉल्फ" म्हणायचंय का? इतिहासाबद्दल गम्य असणार्यांकडून ही चूक?
बॉबी देओल ट्विटरवर हेच म्हणाला ते क्षम्य आहे..

बाकी नावावरून गदारोळ म्हणजे कहर आहे. फारफार तर पोरं/लोकं त्या मुलाला बेक्कार चिडवतील. बाकीच्यांना काय झाट फरक पडतो?

बाकीच्यांना काय झाट फरक पडतो?

तैमुर कोणीही असला तरी या म्हाराष्ट्रात तेवढा पापिलवार नाय. नशीब समजा अफजुलखान किंवा शायिस्तेखान नाव नाही ठेवले नाहीतर मुखपत्रांत दोन चार दिवस अग्रलेख झडले असते.

+

अहो. कुणालाच फरक पडला नसता. सध्याचे* भक्तांचे पोष्टरबॉय तारक फतेह यांनी हा मुद्दा काढला आणि तो सगळ्या भक्तांनी उचलून धरला.

*तसलिमा नसरीन या देखील एक पोष्टर बॉय आहेत पण त्या सध्या वापरात** नाहीत.
**तसलिमा नसरीन यांचे वस्तुकरण येथे अपेक्षित नाही.

अवांतर प्रश्न : जर्मनीत अलिकडे कोणी "अ‍ॅडॉल्फ" हे नाव आपल्या मुलाला ठेवत नाहीत का?

तैमूर या शब्दाचा तुर्की/अरबी भाषेत अर्थ काय होतो?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

तैमूर या शब्दाचा तुर्की/अरबी भाषेत अर्थ

'तैमूर' [शुद्ध शब्द 'तिमुर' है, जिसका अरबी भाषा में अर्थ है- लोहा]

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

हिटलर आला, हिटलर आला, हिटलर आला

किंवा मुस्लिम, दलित, बँकांसमोर रांगांमध्ये जीव घालवलेल्यांचे कुटुंबीय, या सगळ्यांबद्दल संवेदनशील असणाऱ्या लोकांची 'नरेंद्र' या नावाबद्दल...

(च्च च्च च्च, घातलात ना घोळ! हिटलर हे आडनाव आहे. एडॉल्फ असं नाव जर्मनांनी वाळीत टाकलेलं आहे का कसं, ते इथे पाहा.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नरेंद्र हे नाव धारण करणारे

नरेंद्र हे नाव धारण करणारे एकाधिक प्रसिद्ध लोक आहेत, उदा. विवेकानंद. तैमूर या नावाचे तसे आहे का?

सैफने पोराचे नाव हिटलर ठेवले असते तर सर्व अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांची गळवे कशी फुगली असती हे पाहणे बाकी रोचक. सिलेक्टिव्ह उमाळ्यांचा विजय असो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तैमूर या नावाचे तसे आहे

तैमूर या नावाचे तसे आहे का?

'तैमूर'बद्दल नक्की माहिती नाही, परंतु एके काळी सोविएत बालविश्वात 'तिमूर आणि त्याच्या बालचमू'ची बालकथा अतिशय लोकप्रिय असे. कथेच्या नायकाचे पात्र हे अंशत: कथालेखक श्री. अरकादी गैदर यांचा मुलगा तिमूर गैदर (हा मोठा झाल्यावर पुढेमागे सोविएत नौदलात उच्चपदावर पोहोचला, असे कळते. तर ते एक असो.) यावर बेतलेले आहे, असे कळते. फार कशाला, या बालकथेवरून/कथानायकावरून प्रेरणा घेऊन सोविएत संघात एके काळी गावोगावी तिमूर बालचळवळीदेखील स्थापन झाल्या होत्या, असेही कळते.

तैमूर अाणि तिमूर हे cognates असावेत, असे वाटते (चूभूद्याघ्या.)

असो.

तैमुर नाव जॉर्जिया,

तैमुर नाव जॉर्जिया, उजबेकीस्तान, मंगोलिय अशा देशात पण चालते. आणी तेंगीज (चेंगीज खान) सुधा.

लंगडा आला रे

सोव्हिएट रशिया म्हणजे पण

सोव्हिएट रशिया म्हणजे पण भक्तांसाठी "ष्ट्रिक्टली नो नो"

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

अलिकडे गोपाळ किंवा नथुराम ही

अलिकडे गोपाळ किंवा नथुराम ही नावे "जुनाट" समजून ती फारशी ठेवली जात नाहीत. पण कुणी नथुराम नाव ठेवलेच तर त्याला आता मी "तू नक्कीच गांधींच्या खुन्यांचा सहानुभूतीदार/समर्थक आहेस" असं जाऊन सांगणार !!!

तामीळनाडूत पण प्रभाकरन/वीरप्पन नाव ठेवणार्‍याला असेच म्हटले जायला पाहिजे !!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

खरे तर "जोसेफ" नाव ठेवले असते

खरे तर "जोसेफ" नाव ठेवले असते किंवा "ब्लादीमीर" तर ऐसी वर बारश्याचा एकच जल्लोश झाला असता.

----
ता.क. "फीडेल" विसरलेच.

चूक

थत्तेचच्चांनी बरोब्बर ओळखलंय, अनुतैंनी नथुराम किंवा गोपाळ नावांसाठी जल्लोष केला असता, किंवा गेला बाजार नरेंद्र. अनुतैंना स्वतःचीही ओळख धड नाही हे स्पष्टच दिसतंय. का अनुतै ऐसीकर नाहीत?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"ब्लादीमीर" मी असं ऐकलंय की

"ब्लादीमीर"

मी असं ऐकलंय की "ब्लादीमीर" म्हंजे शांतताप्रिय सत्ताधीश.

अभ्यास वाढवा.

या विवेकानंदांनी असं म्हटलेलं होतं की बायकांना काय करायचंय विद्यापीठीय शिक्षण! त्यांना एवीतेवी चूल आणि मूलच करायचंय.

सैफने पोराचे नाव हिटलर ठेवले असते तर ... तुम्हाला तुमचा आयडी बदलायला लावला असता, खूष?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या विवेकानंदांनी असं म्हटलेलं

या विवेकानंदांनी असं म्हटलेलं होतं की बायकांना काय करायचंय विद्यापीठीय शिक्षण! त्यांना एवीतेवी चूल आणि मूलच करायचंय.

हे असं त्यांनी म्हंटलं असेल तर ते गलत च आहे.

--

आता तुम्ही स्त्रीवाद यात आणलाच आहे तर मी सुद्धा क्लासिक व्हॉटबाऊट्री करतो ... बघां हं !!!!

One is not born, but rather becomes, a woman.

simone de beauvoir चं वाक्य आहे हे. ही असली वाक्यं उच्चारणार्‍या स्त्रिया फेमिनिझम च्या अध्वर्यू मानल्या जातात.

हे वाक्य लक्षात घेतलेत तर आधुनिक भारतीय फेमिनिझमचा व फेमिनिष्टांचा स्त्रीभ्रूण हत्येस असलेला विरोध अनाकलनीय आहे. ह्या वाक्यानुसारच जायचे तर ज्या भ्रूणाचा जन्मच झालेला नाही ती स्त्री नाहीच. तेव्हा त्या भ्रूणाच्या हत्येस विरोध का ?

स्त्रीलिंगी गर्भाला पुरुषलिंगी गर्भाइतकाच जगण्याचा हक्क आहे

"One is not born, but rather becomes, a woman."
गब्बर गुर्जी ,
याला "व्हॉटबाऊट्री" नाही तर सरळ सरळ विपर्यास म्हणतात . स्त्रीवर "स्त्रीसुलभ मर्यादेने " (म्हणजे काय याची व्याख्या फुटाफुटाला बदलते!) वागण्याचे प्रचंड सांस्कृतिक दडपण असते एवढाच त्याचा अर्थ आहे . पुरुषाची "परफॉर्मटिव्हिटी" धारण करून एखादी बाई जैविक दृष्ट्या "पुरुष" बनू शकत नाही हे आपण सर्व जाणतो . स्त्रीलिंगी गर्भाला (एक मानव म्हणून) पुरुषलिंगी गर्भाइतकाच जगण्याचा हक्क आहे हे नैसर्गिक न्यायाचे साधे तत्व तुम्हाला मान्य असायला हरकत नाही . त्याचे समाजावरील परिणाम हा वेगळा विषय झाला.आपल्या माननीय पंप्र नी "मुली मारल्यात तर तुमच्या मुलांना वधू कोठून मिळणार ?" असा एक अत्यंत पुरुषकेंद्री प्रश्न जाहीर सभेत विचारला होता . (आचरट विधाने करायला त्यांना जराही श्रम पडत नाहीत हे बघून थक्क व्हायला होते!)

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

अत्यंत पुरुषकेंद्री प्रश्न

मिलिंदभाऊ, पंतप्रधान हे फक्त स्त्रीयांचे पंतप्रधान आहेत असं तुम्हाला कोणी सांगीतलं? स्त्री भ्रूण हत्या केल्याने दोन महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात-
१. स्त्रीया मरतात.
२. पुरुषांना बायका मिळत नाहीत.

लोकशाहीत दुसर्‍या समस्येचा उल्लेखही करू नये असे म्हणणे कायतरी वेगळेच (थोडे जास्त आचरट म्हणू का?) वाटते.
=========================
ज्या हरियाणात ते बोलत होते तिथे पुरुषांना बायका न मिळणे ही एक आजची वास्तविक समस्या आहे. आता तुम्ही मला आचरट म्हणण्यापूर्वी सांगतो - एकदा न मारल्या जाता मोठ्या झाल्या तर बायकांना पुरुष आरामात मिळतात, सबब वाक्यरचना अशी केली आहे.
=========================
हरियाणात सांगताना एक नवरा सांगून नंतर सासरा, चुलत सासरा, नवरा, भाव्या (भावाला शिवी नाही, हिंदीतला जेठ) , दिर, चुलत भाव्या, चुलत दिर हे एकत्र एक बाई भोगतात. हे सहसा बायकांसाठी मुस्कटदाबीचे ठरते. म्हणून हरयाणात असले खूप गुन्हे होताहेत. तर एकप्रकारे पुरुषाचे तोंडदेखले नाव घेऊन पंतप्रधानांनी स्त्र्रीयांच्याच प्रश्नाला वाचा फोडली आहे. (त्यांना विद्यार्थीनींचे टॉयलेट, बलोचीस्तान, इ इ वाचा फोडायची सवय आहे.)
=========================
मोदीसारख्या अभ्यासू माणसाला (अभ्यासू मंजे इतिहासकार नव्हे) आचरट म्हणायचा आचरटपणा टाळा. १९९७ ते २००२ मधे त्यांनी उत्तर भारत फूल टू टाइमपास केला आहे म्हणून अभ्यासू.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

अजोंचा षटकार.

मिलिंदभाऊ, पंतप्रधान हे फक्त स्त्रीयांचे पंतप्रधान आहेत असं तुम्हाला कोणी सांगीतलं? स्त्री भ्रूण हत्या केल्याने दोन महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात-
१. स्त्रीया मरतात.
२. पुरुषांना बायका मिळत नाहीत.
लोकशाहीत दुसर्‍या समस्येचा उल्लेखही करू नये असे म्हणणे कायतरी वेगळेच (थोडे जास्त आचरट म्हणू का?) वाटते.

अगदी साध्यासोप्या शब्दात झक्कास प्रतिवाद.

पुरुषांचा इगो सुखावला तर काय बिघडतं?

पुरोगामी लोक वैचारिक दृष्ट्या कसे गंडलेले असतात याचं ते विधान निदर्शक आहे. समजा पंतप्रधान पुरुषकेंद्री आहेत. काय बिघडतं? स्वतःच्या सुखासाठी स्त्रीयांना सुखात ठेवा, आत्मकेंद्रित असा असं ते पुरुषांना म्हणत आहेत असं मानू. यात स्त्रीयांचा नेट नेट फायदाच दिसत आहे.
=================================
विवेकानंदावर टिका करणारे पुरोगामी असेच. स्त्रीयांनी चूल मूल सांभाळू नये मंजे काय? मग दोघांनी कमवावे, दोघांनी शिजवावे, दोघांनी मूल सांभाळावे असा अर्थ निघतो. यात स्पेशलायझेशन ऑफ स्किल्स नष्ट होते. शिवाय बायकांना आपल्या इतकेच कम्वणारा नवरा लागतो (आपल्याकडे अजूनच जास्त कमवणारा. तो जेवढा जास्त कमवील तेवढी फुशारकी जास्त). मग १०० रु उत्पन्न असणारी १०० कुटुंबे नष्ट होऊन २०० रु उत्पन्न असणारी ५० कुटुंबे निर्माण होतात नि विषमता वाढते. मग हेच लोक आर्थिक समता हवी म्हणून ओरडू लागतात.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

विवेकानंदावर टिका करणारे

निळा भाग (अर्थशास्त्राशी संलग्न आहे म्हणून नव्हे) सेन्सिबल आहे म्हणून मान्य.
तांबड्या भागाबद्दल आमचे तीव्र आक्षेप. समता हा बकवास आहे व पुरोगाम्यांना समतेचे अतिच प्रेम असते. व बळजबरीने सरकारकरवी समता राबवण्यास आमचा (लिबर्टेरियनांचा) विरोध आहे.

बाकीचा भाग अमान्य.

आमचा खालील दोन्ही वाक्यांवर आक्षेप आहे.

(१) स्त्रीयांनी चूलमूल सांभाळावी
(२) स्त्रीयांनी चूलमूल सांभाळू नये

-

आमचे (लिबर्टेरियन) म्हणणे हे आहे की - स्त्रीयांनी चूलमूल सांभाळावी की सांभाळू नये - ते त्यांचे त्यांना ठरवू द्यावे. स्त्रियांना त्यांचे हितसंबंध, कौशल्ये, प्रेफरन्सेस अतिशय व्यवस्थित समजतात असा आमचा दावा आहे. इतरांनी (म्हंजे समाजाने) त्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करू नये. परंपरा आहेतच पण परंपरा एन्फोर्स केल्या जात नाहीत व जाऊ नयेत. कायदा एन्फोर्स केला जातो व जावा. कायदा व परंपरा यात हा मुख्य फरक आहे. कायद्याने हस्तक्षेप तेव्हाच करावा जेव्हा स्त्रियांचे त्यांच्या प्रेफरन्सेस नुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बलपूर्वक नाकारले जाते तेव्हा.

व्यवस्थानष्टक व्यवस्था

स्त्रियांना त्यांचे हितसंबंध, कौशल्ये, प्रेफरन्सेस अतिशय व्यवस्थित समजतात असा आमचा दावा आहे.

हे कधी झालं म्हणे? मंजे असं काही असतंच तर हजारो वर्षे त्यांच्येवर (तो तथाकथित) अन्याय कसा बरे होऊ शकला असता? अचानक पुरोगामी चळवळ झाल्यावर या समझेची (हिंदी समझ) उत्क्रांती कशी आणि कोण्या म्युटेशनमुळे झाली? शिवाय हे सगळं त्यांना समजतं नि कायदा देखिल आहे तेव्हा त्यांच्या समस्या संपल्या कि काय?
==================================
लिबर्टेरियन लोक मुळात कसलीच्च व्यवस्था नको म्हणतात. पण हे इंटर्नली इनकंसिस्ट्म्ट आहे, अगदी या करिता देखिल व्यवस्था उत्पन्न झाली कि ती नष्ट करा अशी एक व्यवस्था लागते.
================================
बाकी समता आणि लोककल्याणाला नाव ठेवलेलं अज्जिबात खपायचं नाय.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

बलप्रयोगाच्या व धमकीच्या

बलप्रयोगाच्या व धमकीच्या अनुपस्थितीत स्त्रिया आपले निर्णय व्यवस्थित घेऊ शकतात असा आमचा दावा आहे.

बाकीचा खुलासा इथले इतर लोक (उदा. अनु राव) करतीलच.

--

लिबर्टेरियन लोक मुळात कसलीच्च व्यवस्था नको म्हणतात. पण हे इंटर्नली इनकंसिस्ट्म्ट आहे, अगदी या करिता देखिल व्यवस्था उत्पन्न झाली कि ती नष्ट करा अशी एक व्यवस्था लागते.

नाही. लिबर्टेरियन्स हे व्यवस्थेच्या आवाक्याच्या अतिरेका विरुद्ध आहेत.

कोणी कोणाचे नियम बनवायचे

निर्णयक्षमता, निपक्षपातीपणा यांचा आणि कोणाबद्दल निर्णय चालला आहे त्याचा काही संबंध नाही. विषय काय आहे, अनुभव काय आहे यावरून कोणाकरिता काय इष्ट आहे हे ठरवायला स्वतःचाच निर्णय बेस्ट असतो असं नाही. बलप्रयोग आणि धमकी नसली तरी बर्‍याच बायका आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात.
=========================
इष्ट काय आहे हे प्रत्येक माणसाने (मंजे बाईने) स्वतः शोधावे (डोके पांढरे करून घ्यावे), स्त्रीयांचे इष्ट फक्त त्यांनाच कळते, इतरांना कळू शकत नाही, इतरांचा स्वार्थ असतो, मिळून नियम बनवू नयेत, जेनेरिक नियम नसावेत, सामाजिक नियम नसावेत, इ इ बकवास आहे.
=======================
व्यक्तिची, कुटुंबाची नि सामाजाची जी एकूणात उद्दिष्टे आहेत ती पाहता साधे सामाजिक नियम काय असावेत हे पाहावे. या नियम बनवण्याच्या क्रियेत स्त्री नि पुरुष हे दोन स्पर्धात्मक गट आहेत ही मानसिकता हिणकस आहे.
========================

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

निर्णयक्षमता, निपक्षपातीपणा

निर्णयक्षमता, निपक्षपातीपणा यांचा आणि कोणाबद्दल निर्णय चालला आहे त्याचा काही संबंध नाही. विषय काय आहे, अनुभव काय आहे यावरून कोणाकरिता काय इष्ट आहे हे ठरवायला स्वतःचाच निर्णय बेस्ट असतो असं नाही. बलप्रयोग आणि धमकी नसली तरी बर्‍याच बायका आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात.

पण त्यांच्या आयुष्याचे परिणाम त्यांचे त्यांना भोगावे लागतात. मुद्दा संपला. इतरांना भोगावे लागत नाहीत. व म्हणून इतरांनी हस्तक्षेप करू नये.

==

इष्ट काय आहे हे प्रत्येक माणसाने (मंजे बाईने) स्वतः शोधावे (डोके पांढरे करून घ्यावे), स्त्रीयांचे इष्ट फक्त त्यांनाच कळते, इतरांना कळू शकत नाही, इतरांचा स्वार्थ असतो, मिळून नियम बनवू नयेत, जेनेरिक नियम नसावेत, सामाजिक नियम नसावेत, इ इ बकवास आहे.

जेनेरिक नियम असतात व असावेत. सामाजिक नियम असतात व असावेत.
रूढी, वहिवाटी, परंपरा, नॉर्म्स, कस्टम्स, ट्रॅडिशन्स, टाबू, प्रोटोकॉल्स्/शिष्टाचार, एटिकेट्स, कन्व्हेन्शन्स असतात व असाव्यात. ज्यांना त्या पाळायच्या नाहीत त्यांच्यावर जबरदस्ती नसावी. वटसावित्री ही परंपरा आहे. पण कोणत्याही स्त्री वर ती पाळण्याची जबरदस्ती नसते व नसावी. परंपरा, रूढी, वहिवाटी या इन्फॉर्मल असतात. म्हंजे एन्फोर्स केल्या जात नाहीत. कायदा एन्फोर्स केला जातो.

--

व्यक्तिची, कुटुंबाची नि सामाजाची जी एकूणात उद्दिष्टे आहेत ती पाहता साधे सामाजिक नियम काय असावेत हे पाहावे. या नियम बनवण्याच्या क्रियेत स्त्री नि पुरुष हे दोन स्पर्धात्मक गट आहेत ही मानसिकता हिणकस आहे.

स्पर्धा ही मानसिकता हिणकस आहे ही मानसिकताच अवास्तव, चक्रमादित्य आहे.
स्पर्धा ही अत्यंत सत्यनिष्ठ, भरभराटजनक संकल्पना आहे.

परिणाम चांगले कि वाईट हा

परिणाम चांगले कि वाईट हा मुद्दा आहे. कोणाचे कोणाला भोगावे लागतात हा कसा काय मुद्दा असेल? म्हणजे, एक शक्यता, प्रत्येकाचेच स्वतःच्या निर्णयामुळेचे स्वतःवरचे अत्यंत वाईट परिणाम, समजा जर झाले, ठीकैत?
================================
परंपरा देखिल लूजली का होइना एन्फोर्स कराव्यातच. कायदा गांडू असतो. म्हणून तो देखिल उगाच काटेकोरपणे राबवू नये.
=============================
स्पर्धा हिणकस नाही म्हणलं. काइ काई चांगली पण असते. पण अरुण + अरुणची बायको वि. गब्बर + गब्बरची बायको अशी असावी. अरुण + गब्बर वि. त्यांच्या बायका अशी नसावी.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

परिणाम चांगले कि वाईट हा

परिणाम चांगले कि वाईट हा मुद्दा आहे. कोणाचे कोणाला भोगावे लागतात हा कसा काय मुद्दा असेल? म्हणजे, एक शक्यता, प्रत्येकाचेच स्वतःच्या निर्णयामुळेचे स्वतःवरचे अत्यंत वाईट परिणाम, समजा जर झाले, ठीकैत?

हो.

-----

परंपरा देखिल लूजली का होइना एन्फोर्स कराव्यातच. कायदा गांडू असतो. म्हणून तो देखिल उगाच काटेकोरपणे राबवू नये.

ह्म्म्म.

------

स्पर्धा हिणकस नाही म्हणलं. काइ काई चांगली पण असते. पण अरुण + अरुणची बायको वि. गब्बर + गब्बरची बायको अशी असावी. अरुण + गब्बर वि. त्यांच्या बायका अशी नसावी.

अजो, माझ्या वहीनींना (म्हंजे तुमच्या सौ.) व बायकोला या चर्चेत आणू नको.

अजो, सॉरी म्हण आधी. म्हण सॉरी.

तुला जी चर्चा/वादावादी करायची आहे ती कर. बायकोला (मग ती कोणाचीही असो) मधे आणू नको.

सॉरी बाबा. पण स्त्री व पुरुष

सॉरी बाबा. पण स्त्री व पुरुष हे स्पर्धेचा निकष कसा काय असू शकतो असं म्हणायचं होतं! समाजातले इंटरेस्ट ग्रूप्स तसे क्लासिफाइड आहेत का? We (men and women) are two genders of the same species and we are not two competing species. बायकांच्या गोष्टीत मी नाक खूपसू नये आणि त्यांनी मला काही सांगू नये हे चूक आहे. मेरिट बेसिसवर गोष्टी ठरवाव्यात.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.