तक्रारींचा पाढा

संस्थळ बंद असणं आणि गुलाबी पिंका दिसणं हे दोन त्रास सध्या सुधारलेले आहेत. २९ डिसेंबर २०१६ ते ४ जानेवारी २०१७ या सहा दिवसांमध्ये केलेलं लेखन परत मिळवता आलं नाही. या सगळ्याबद्दल दिलगिरी.

अजूनही संस्थळ पूर्णपणे दुरुस्त झालेलं नाही. काम सुरू आहे. पुन्हा संस्थळ बंद करण्याची गरज असल्यास आधी कळवून मगच संस्थळ बंद होईल. लेखन नष्ट होणार नाही याचीही काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न होईल.

<धमकी सुरू>या अडचणींबद्दल सविस्तर लेख येऊ शकतो. <धमकी संपली.>

--

या धाग्याचं प्रयोजन म्हणजे आधी ज्या चालत होत्या त्या गोष्टी आता हव्या आहेत आणि बंद पडल्या आहेत त्यांची यादी करणे. सुरुवात म्हणून यादी -
१. देवनागरी टंकन
२. टेक्स्ट बॉक्सचा आकार
३. एचटीएमेल कोड लिहिण्यासाठी बटणं
४. मुखपृष्ठ
५. स्मायली, इनपुट फॉरमॅट हे खोके कोलॅप्स होत नाहीत.
६. श्रेणीसुविधा

प्रतिक्रिया लिहिण्याचा खोका आपसूक दिसत नसल्यास, खाली 'नवी प्रतिक्रिया द्या' असा दुवा दिसतो, त्यावर टिचकी द्या.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मलाही उगाच क्लिकक्लिकाट

मलाही उगाच क्लिकक्लिकाट करायची खोड लागून संस्थळं ,साइट्सचे सर्वर कुठे कोणत्या प्रकारचे आहेत दाखवणारे अॅप वापरून पाहात होतो तेव्हा ही ऐसीच्या साइटची तारीख(expires on 3 January 1978!) ३ जानेवारी दिसलेली. परंतू वर्ष 1978 दाखवत होते.! हे मी विचारले नाही/नव्हते.
असो.
आमचं वरातीमागून घोडं.

काही इतिहास

आता बहुतेक तक्रारी दुर्लक्षणीय पातळीवर आल्यामुळे धमकी खरी ठरवण्याची घटिका समीप आल्याचं जाणवत आहे.

ऐसीच्या डेटाबेसचा आकार, विकत घेतलेल्या जागेपेक्षा वाढला होता. त्याबद्दल सेवादात्याकडून इमेल आलेलंही होतं, पण ते इमेल खातं बघण्यात माझ्याकडून हलगर्जीपणा झाला होता. इमेलात दिलेली धमकी खरी करत, सेवादात्यानं ३ जानेवारीच्या रात्री १२ वाजता (अमेरिकी इस्टर्न टाईम) डेटाबेस-विदागार नेहमीच्या जागेवरून हलवलं होतं. ३ जानेवारीला सकाळी उठल्यावर, इमेलं आणि व्हॉट्स़ॅपवर 'ऐसी बंद पडलं' आहे, लगेचच समजलं. पण नक्की का बंद आहे, हे तेव्हा समजत नव्हतं. म्हणून फोनाफोनी सुरू झाली. सेवादात्याकडे ज्यांना फोन केला होता, त्यांच्याकडूनही ही गोष्ट समजलेली नव्हती. मात्र, मधल्या वेळात फोनवर रँडम जॅझ संगीत ऐकून मुक्तसुनीत आणि माझा आयक्यू वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न सेवादात्यांनी केला. त्यांचे आभार.

ऐसी बंद पडल्यावर बऱ्याच लोकांकडून आपण होऊन मदतीचा हातही पुढे आला. ऐसीवर पडीक नसणारा, पण अधूनमधून उगवणारा राहुल बनसोडेही त्यांतला एक. एरर मेसेज वाचून, नक्की काय झालं असावं याचा अंदाज त्यानं दिला. मग ते इमेल खातं तपासलं तेव्हा ही बातमी समजली. (आता ते इमेल खातं दुर्लक्षित राहणार नाही याची पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.) मग ऐसीसाठी नवीन विदागार मागवण्यात आलं. ऐसीच्या नवीन विदागाराशी संबंध प्रस्थापित करण्यात दोन दिवस गेले. त्यामुळे मंगळवार ते शुक्रवार ऐसी बंद होतं. या काळात उदयनं बरीच हौसलाअफजाई (हा शब्द एकदातरी वापरायचाच होता) केली.

ज्यांना तांत्रिक बाबी समजत नाहीत, त्यांच्यासाठी राजेश घासकडवींच्या सोप्या शब्दांत - घरात बरेच दिवस राहिल्यानंतर सामान वाढत गेलं. त्याला घर कमी पडायला लागलं. म्हणून नवीन घर शोधलं आहे. आता नवीन घरात सामानासाठी योग्य जागा शोधण्यात वेळ गेला, तोवर ऐसी बंद होतं. सगळ्या गोष्टींसाठी नवीन घरात जागा शोधली तरीही, नवीन जागी गेल्यावर वस्तू पटपट सापडत नाहीत. त्यामुळे देवनागरी टंकन बंद होतं. अजूनही श्रेणीव्यवस्था सुरू नाही. हे काम श्रवण करत आहे. त्याच्याशी ओळख करून देण्याबद्दल निळोबांचे आभार. (या बदल्यात निळोबांना बॅन करायचं का कसं, याबद्दल उच्चस्तरीय शिखर परिषद सुरू आहे.) मराठी लेखन-वाचनाशी अजिबात संबंध नसताना, केवळ ओळखीखातर काम करणाऱ्या श्रवणचे मनापासून आभार.

गेल्या काही दिवसांत, देवनागरी टंकन, टेक्स्टबॉक्सच्या वर असणारी बटणं (लिंका देणं, फोटो लावणं ही बटणं), यांसाठी ड्रूपालचा कोड सुधारणं गरजेचं होतं. हे काम माझ्या पेग्रेडच्या वरचं आहे. श्रवण हा मात्र उत्साही मुलगा आहे; त्यानं फक्त गमभनचं टंकन नाही तर इनस्क्रिप्ट आणि गूगल ट्रान्सलिटरेटची सोयही करून दिलेली आहे. (तो तर माझ्याही पुढे गेला!)

सिरीयसली, मराठी बोलण्यात इंग्लिश शब्द आलेले ठीक. मटारी मराठीही चालेल. पण मराठी संस्थळ आणि देवनागरी टंकनाचा पर्याय उपलब्ध नाही, हे अगदीच लाजिरवाणं!

---

अजूनही -
ऐसी ड्रूपाल ६वर आहे. ड्रूपाल ७वर जाण्याची गरज आहे. त्याची दोन कारणं -
१. ड्रूपाल ही गोष्ट कम्युनिटीनं चालवलेली आहे. कोणी चार जाणते लोक ठरवून काही गोष्टी घडवून आणतात, असं १००% चालत नाही; काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी चालवलेली सीएमएस - content management system - आहे. त्यात ड्रूपाल ६ कालबाह्य ठरलेलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं ड्रूपाल ७वर जाणं इष्ट.
२. ऐसी मोबाईल, टॅबलेटवर धड दिसायचं असेल आणि उपलब्ध असलेल्या सजावटी-थीम्स वापरायच्या असतील तर ड्रूपाल ७वर जावं लागेल.

गेले काही महिने, ड्रूपाल ७वर जाण्याबद्दल चर्चा अधूनमधून सुरू असते. पण श्रेणीचं मॉड्यूल ड्रूपाल ७साठी उपलब्ध नाही. ऐसीच्या सर्व व्यवस्थापकांना, (कधी नव्हे ते) एकमतानं श्रेणीचं मॉड्यूल, ती सोय महत्त्वाची वाटते. ते नसल्यामुळे गेले अनेक महिने हे काम बाजूला टाकलेलं होतं. ऐसी पुन्हा 'दिसायला' लागल्यापासून अपग्रेड (पिडांकाकांचा लाडका शब्द उर्ध्वश्रेणीकरण) करण्यासाठी मी काम करत आहे. पण त्यातही कोडच्या तक्रारी आहेत, आणि पीएचपी कोड वाचून त्यात सुधारणा करणं, माझ्या पेग्रेडबाहेरचं आहे.

यावर उपाय शोधायला सुरुवात झालेली आहे. पण स्वयंसेवी पातळीवर चालणाऱ्या गोष्टी, आपल्या वेगानुसार, अपेक्षेनुसार भरभर घडतीलच असं नाही. ऐसीच्या सदस्य, वाचकांपैकी कुणाची यात मदत होणार असेल तर त्या सगळ्यांचं स्वागतच आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अभिनंदन

<कौतुक सुरू> रिसेंट अडचणींवर मात करून संस्थळ पूर्ववत करण्याच्या यशाबद्दल अदिती व इतरांचे हार्दिक अभिनंदन! <कौतुक संपले>
(स्माईल)
नो सिरियसली, हार्दिक अभिनंदन!!

देवनागरी टंकन

देवनागरी टंकन सुरू झालेलं आहे (आणि ते झाल्याचं गुलाबी रंगातल्या संदेशामुळेही सध्या दिसत आहे). F9 ही कळ वापरून रोमन/देवनागरी असा लिपीबदल करता येईल. हे काम करून देणाऱ्या श्रवणचे आभार. त्यासोबतच टेक्स्ट-एडिटींगची बटणंही दिसायला सुरुवात झालेली आहे.

अजूनही श्रेणीच्या मॉड्यूलचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे प्रतिसाद कुठे संपला आणि स्वाक्षरी कुठे सुरू झाली हे नीट समजत नाहीये. प्रतिसादांत स्वाक्षरी लावणाऱ्या सर्व सदस्यांना विनंती की शक्यतोवर स्वाक्षरीच्या मजकुराचा रंग निराळा ठेवला किंवा मध्ये आडव्या रेघा, ** असे काही सेपरेटर्स वापरले तर वाचकांची सोय होईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवीन प्रतिसाद सगळ्यात वर

नवीन प्रतिसाद सगळ्यात वर दिसतो, पण नवीन उपप्रतिसाद खाली खाली दिसत जाताहेत. हे, तसेच एका पानावर किती प्रतिसाद ठेवायचे हे निवडायचा पर्याय दिसत नाही आहे.

+१

या सगळ्या गोष्टी श्रेणीच्या मॉड्यूलमधून नियंत्रित होत होत्या. आणि ते अजूनही मोडलेलं आहे. त्यामुळे ही गैरसोय होत आहे.

(हे सगळं कसं जोडायचं हे मला माहीत नाही. त्यामुळे बाहेरच्या मदतीवर सध्या अवलंबिता आहे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जुना कोड,मोड्युल आणि अॅक्सेस

जुना कोड,मोड्युल आणि अॅक्सेस डेटाबेस अचानक का चालत नाही?ड्रुपलनेच काही बदल केलेत का?

visheshankachya links gandlya

visheshankachya links gandlya aahet

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणत्या?

मी दोन-चार ठिकाणी क्लिकक्लिकाट केला, मला ते ठीकठाक दिसतंय. विशेषांकावर दिलेल्या प्रतिक्रियांमधून सदस्यनाम गायब झालेलं दिसतंय मला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हंसे मुक्ता नेली मग केला क्लिकक्लिकाट काकांनी !

क्लिकक्लिकाट : great coinage! kudos!
हंसे मुक्ता नेली मग केला क्लिकक्लिकाट काकांनी ! वगैरे

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जगत हे आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके.

Go to Top button has gone

Go to Top button has gone missing

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

लॉगिन

देवनागरी टंकनाशिवाय काही लोकांना लॉगिन करण्यासाठी अडचण येत असेल. तुमचं नेहमीचं सदस्यनाम आहे तेच ठेवून रोमन लिपीत पर्यायी लॉगिन आयडी बनवून, ते वापरणं शक्य आहे. यात काही मदत हवी असल्यास aisiakshare@जीमेल.कॉम इथे इमेल करावे.

पर्याय

मी गमभन डाउनलोड केलंय, ते वापरून देवनागरी लिहीता येतंय मला विंडोजमधे.
आणि मोबाईलसाठी गूगल इंडिक कीबोर्ड.

lipee devnagari asunahi

lipee devnagari asunahi devanagari madhe lihita yet naahee. kaay karave?

-अनामिक

वॉर्निंग आयी है आयी है

वॉर्निंग आयी है आयी है स्ट्रिक्ट वॉर्निंग आयी है
बडे दिनों के बाद, उन व्हेरिएबलों को याद
ऐसी की मिट्टी आयी है

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

प्रतिसाद

प्रतिसाद लिहायला गेले की मराठी फॉन्ट उमटतच नाही.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

नवीन लेखनच्या खाली "सर्व नवीन

नवीन लेखनच्या खाली "सर्व नवीन धागे" आणि "माझे नवीन धागे" असे टॅब आले आहेत. त्यातल्या "माझे नवीन धागे" वर गेलं की प्रवेश प्रतिबंधित असं येत आहे.

धाग्याला तारका देण्याच्या सुविधेऐवजी काहीतरी वेगळंच आलं आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

>> धाग्याला तारका देण्याच्या

>> धाग्याला तारका देण्याच्या सुविधेऐवजी काहीतरी वेगळंच आलं आहे. <<

होय. त्यात आकडे आल्येत, त्याचा डिस्प्ले सुधारण्याची गरज आहे.

इनपुट फॉरमॅट फुल एचटीएमेल असला पाहिजे, तो ही बाय डिफॉल्ट फिल्टर्ड दिसतोय.

>> त्यातल्या "माझे नवीन धागे" वर गेलं की प्रवेश प्रतिबंधित असं येत आहे. <<
ही लिंक आता जाजमाखाली सारलेली आहे. (प्रॉब्लेम सोडवायची गरज नाही. )

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाढा वाचला. संस्थळ बंद का

पाढा वाचला. संस्थळ बंद का पडतं हे जाणून घ्यायचं आहे. कोडमधलं काही कळत नाही फक्त मोघम कारण जाणणे हा हेतू. बॅकप घेताना काही कोड उडल्याने नंतर तो कोणता उडला हे शोधताना वेळ वाया जात असावा.
चिकाटीला सलाम.

तया माझिया सायुज्याची चाड ।

तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुयें ॥

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

Sayujya = state of complete

Sayujya = state of complete unification. Advaita.

----
Dnyaneshwar is basically appreciating what Aditi does for this site. Mauli says:

(The site thinks that...)
Only She cares about my seamless union with my readers. Therefore, She provides the code. The service provider might create problems, but it is Her love which will make me better.

|| Say Pundalik is blessed by Hari and Vitthal ||

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

dhamki vaachali naahi ka?

dhamki vaachali naahi ka?

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

भडकाऊ

.

Means she has already

Means she has already threatened to write a post on the problems and solutions, isn't it?

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

माझा आयक्यू बहुदा कमी झालाय.

माझा आयक्यू बहुदा कमी झालाय. आबा आणि नबा काय म्हणत आहेत हे मला समजलेलं नाही. पण तसंही सध्या मी पडद्याआड काम करत आहे. इथे टवाळी करण्यात वेळ फुकट घालवत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.