ब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया

भारताबाहेर राहून, उच्चजातीत जन्माला येऊन किंवा 'एसी ऑफिसात गुबगुबीत खुर्चीत बसून'ही भारतात, आपल्या घरापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या वस्तीत आणि अगदी आपल्या शेजारच्या खुर्चीत बसलेल्या सहकर्मचाऱ्यांच्या मनात खरोखर काय विचार आहेत, हे समजून घ्यायचं असेल तर आज सोशल मिडीया - लोकमाध्यमांना पर्याय नाही. माणूस समोर असताना त्यांच्या बोलण्याची, वर्तनाची समीक्षाही न करणारे लोक आंतरजालाच्या आभासी मितीमध्ये जातात तेव्हा विषारी, विखारी बोलायलाही त्यांना अडचण वाटत नाही. आपल्याला कोणी बघत नाही तर आपण कसंही वागू शकतो; त्याऐवजी माणसाच्या चेहऱ्याचं चित्र चिकटवलं तरीही समाजाचे बरेच नीतीनियम पाळले जातात; असं दर्शवणारं संशोधन मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. याचा प्रत्यय अनेकांना आभासी जगात वावरताना येत राहतो.

दुसऱ्या बाजूनं, सोशल मिडीया आपलं, माणसांचं ध्रुवीकरणही करत आहे. राजकारणी टाळ्याखाऊ वक्तव्यं करून, काहीशा हिंसक मार्गांनी समाजाचं ध्रुवीकरण करतात; हा जुना नुस्खा आहे, तो सहज ओळखता येतो. सोशल मिडीयामधून होणारं ध्रुवीकरण हिंसक किंवा धडाकेबाज पद्धतीचं नाही. ते चुपचाप होतं. आपल्यासारखा विचार करणाऱ्या किंवा आपल्याच आर्थिक-सामाजिक गटातल्या लोकांसोबत आपण मिसळतो; त्यांचंच बोलणं ऐकून घेतो. धार्मिक-अधार्मिक, राष्ट्रवादी-उदारमतवादी असे परस्परविरोधी विचार करणारी माणसं एक तर विरोधी गटांत जाऊन बोलत नाहीत किंवा बोलली तरीही 'मी थोर का तू थोर' या रस्सीखेचीपलीकडे त्यांचा आवाका नसतो.

'ऐसी अक्षरे'वर या पलीकडे जाऊन, आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेरचं, आपल्याला अजिबातच न पटलेलं किंवा आपल्यापेक्षा निराळ्या पार्श्वभूमीच्या लोकांचे मूलतः निराळे विचार मांडले जावेत; अशी सुरुवातीपासून ऐसी-प्रवर्तकांची इच्छा होती, आहे. सोशल मिडीया, आंतरजालावर अशा प्रकारचं लेखन जरा कमीच दिसतं, ज्यातून 'आम्हीच थोर' यापेक्षा 'काही तरी चुकतंय आणि ते बदलण्याची गरज आहे', असा विचार मांडलेला असतो. हे असं लेखन दिसतं तेव्हा ते मुद्दाम 'ऐसी'वर मागवून प्रकाशित केलं जातं.

असाच एक लेख राऊंड टेबल इंडिया या संस्थळावर सापडला. भाग्येशाच्या परवानगीनं तो पुनःप्रकाशित करत आहोत.

-- ऐसी अक्षरे व्यवस्थापक

---

सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा सध्या एक अविभाज्य घटक झालेला आहे. सोशल मीडियाचा वापर करावा की करू नये अथवा कशाप्रकारे करावा याबद्दल समाजामध्ये अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जातात. काही व्यक्तींना वाटतं सोशल मीडिया हे टाइमपास करण्याचं एक साधन आहे. उगाच त्यावर वेळ खर्ची करू नये. अनेक मुलींच्या पालकांना असं वाटतं की सोशल मीडियाद्वारा समाजकंटक मुलींना त्रास देऊ शकतात. यामुळे मुलींनीच या माध्यमांपासून दूर राहावं. या गोष्टींचा विचार करता असं लक्षात येत की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक व्यक्तिंशी एकाचवेळी जोडले जावू शकतो. भलेही आपला त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध असो अगर नसो. आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. प्रस्थापित माध्यमांना एक पर्याय उभा करता येईल का हा विचार करत मी देखील सोशल मीडिया जॉईन केलं. फ़ेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून लोकांशी संबंध ठेवू लागले. गेली सहा वर्षे मी फ़ेसबुकवर आहे. पर्यायी माध्यम असा सोशल मीडियाचा विचार करत असतानाच ही माध्यमे मुलींच्या बाबतीत कितपत सुरक्षित आहेत याबद्दल मला थोडी विस्ताराने चर्चा करावीशी वाटते. अर्थात नुकत्याच घडलेल्या अमर खाडे प्रकरणाचा यास संबंध आहे.

प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या ब्राह्मणी पितृसत्ताक समाजामध्ये मुलींनी मोबाईल कसा वापरावा, कितपत वापरावा याचे काही नियम ठरलेले आहेत. अनेकवेळा काही अडचण येऊ नये म्हणून मुलींना मोबाईल वापरण्यास देण्यात येतो. पण मुलीच्या मोबाईलच्या वापरावर कठोर निर्बंध घातले जातात. कारण आपला स्त्री-जात्याधारीत समाज मुलीला कुटुंबाची 'इज्जत' मानतो. त्यामुळे तिचा मोबाईलद्वारा अन्य व्यक्तिंशी संबंध येऊन ती कोणाशी भावनिक दृष्टीने जोडली गेली व जर तिने स्व:मर्जीने विवाह करण्याचा निर्णय घेतला तर कुटुंबाची 'अब्रू' जाईल असे पालकांना वाटते. यामुळे मुलीचे हे संपर्काचे साधन मर्यादित राहावे यासाठी पालक प्रयत्न करतात. यातूनच मग मुलींचे मोबाईल तपासले जातात. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जातात. या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक मुलींसाठी सोशल मीडियाचा सहजरित्या वापर करणं हीच एक मोठी गोष्ट असते. समाजाचे पारंपरिक निर्बंध झुगारुन ती समाजमाध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते परंतू आपला ब्राह्मणी पितृधारी समाज तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून न बघता मनोरंजनाचे आयते उपलब्ध झालेले साधन असंच पाहत असतो. यामुळे मुलींना ऑनलाइन जगात अनेकवेळा लैंगिक शोषणास सामोरं जावं लागतं.

मुलींच्या फोटोचा गैरवापर करणे, ह्या फोटोचा वापर अश्लील संदेश पाठवण्यासाठी करणे, मुलींची संमती नसताना तिला नग्न फोटोमध्ये टॅग करून तिची बदनामी करणे, असे प्रकार दररोज सुरू असतात. व्हॉट्सअॅपवरील ग्रूपवर देखील मुलींविषयक निर्भत्सना करणारे विनोद फिरत असतात. परंतु ब्राम्हणी पितृसत्ताक मानसिकतेमध्ये अडकलेल्या समाजाला हे असे प्रकार आक्षेपार्ह वाटत नाहीत. त्यामूळे लाइक आणि शेअर करून असे संदेश लगेचच व्हायरल होतात. एका नवबौद्ध कुटुंबातून आलेली स्त्री या नात्याने मी जेव्हा ह्या सर्व घटकांचा विचार करते तेव्हा असं लक्षात येतं की या समाजमाध्यमात जातीय भेदभाव व पुरुषसत्ता अशा दोन्ही प्रकारच्या अन्यायाला दलित आदिवासी मागासवर्गीय स्त्रियांना सामोरं जावं लागतं. 'आरक्षणाची अवलाद' अशा पोस्टना तोंड देत असतानाच 'लड़कियां ऐसीही होती है' यांसारख्या तर्कहीन गोष्टींना सामोरं जावं लागतं. नुकतेच जेव्हा लातूरमधील संविधान मोर्चामध्ये एका मुलीचं भाषण झालं तेव्हा त्याला आलेली प्रत्यूत्तरे भयानक होती. "तुम्ही दलित आदिवासी बायका तुमची लायकीच आहे रांडा म्हणून रहाण्याची... माझ्या बापाने एक नाही चार चार रांडा ठेवल्या आहेत," असं लोक उघडपणे म्हणत होते. या घटनेचा विचार करता दलित आदिवासी स्त्रियांना या व्यवस्थेत अधिक मानहानीला सामोरे जावे लागते असे मला वाटते.

मुळात एक आंबेडकरवादी या नात्याने आम्ही अनेक तरुण मुली सोशल मीडियाचा एक पर्यायी माहीती प्रसार यंत्रणा असा वापर करतो. देशभरात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकणारा वर्ग, प्राध्यापक, अधिकारी, लेखक, विचारवंत यांच्या संपर्कामध्ये राहून त्यांचे लेख, नवीन संशोधन यांचा उपयोग करून स्वतःचे ज्ञान कालसुसंगत करणे असा आमचा उद्देश असतो. शिवाय छोट्या-छोट्या गाव भागात शहरात राहणा-या लोकांशी संवाद साधता यावा, त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण व्हावी हासुद्धा एक उद्देश असतो. याचा मला आजवर मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे हे मी प्रथमतः मान्य करते. परंतु असा उद्देश ठेवून मार्गक्रमण करत असताना अनेक अपिरिचित व्यक्तिंशी संबंध ठेवावा लागतो. यावेळी अनेक अडचणी येतात. कारण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली केली की धडधड हाय, हेलो हाय... असे मेसेजेस येणं सुरू होतं. कधीकधी लोक स्त्रीयांच्या लैंगिकतेवरून आक्षेपार्ह विधाने करतात. नुकताच माझ्या एका आंबेडकरवादी मैत्रिणीला स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या एका मुलाने असाच त्रास दिला. तिने प्रत्यक्ष ओळख नसताना देखील समविचारी वाटल्याने फेसबुकवर त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला व त्याने मात्र याचा गैरफायदा घेतला. त्याच्या अनेक मित्रांसाठी ही गोष्ट धक्कादायक होती कारण ही व्यक्ति सामाजिक प्रश्नावर तावातावाने गप्पा मारायची. लोकांना उपदेशाचे डोस द्यायची. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा त्याच्या बऱ्याच मित्रांनी त्याचे फेसबुक अकाउंट हॅकतर झाले नसेल ना अशी शंका व्यक्त केली. पण पुढे या व्यक्तीने अनेक मुलींना त्रास दिल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला एक विचारावंसं वाटतं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेऊन काही लोक आपल्याच आंबेडकरवादी मैत्रिणींना त्रास देत असतील तर यांचा बंदोबस्त आपण कसा करणार् आहोत? माझ्या अनेक मैत्रिणींनी असं मत व्यक्त केल की यापूर्वीही हा व्यक्ती लिंगभावातीत (gender biased) पोस्ट टाकायचा तेंव्हा मात्र अनेक आंबेडकरवादी तरुण शांत रहायचे... आज अनेक आंबेडकरवादी तरुण ह्या तरुणाच्या कृत्याने व्यथित झालेले आहेत. त्यांनी त्याच वेळी जर कठोर भूमिका घेतली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती.

आणखी एक मुद्दा मला इथे उपस्थित करावासा वाटतो, तो म्हणजे विश्वासार्हता. जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आले तेव्हा अनेक लोकांनी हे अकाउंट हॅक झालेले असेल असे मानून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा चार पाच मुलींनी त्याच्या विरोधात तक्रार केली तेंव्हादेखील तुम्ही दुर्लक्ष करा, त्याला ब्लॉक करा, हे मुद्दे खूपच लहान आहेत, आपल्याला अजून बरेच मोठे विषय हाताऴायाचे आहेत, असं सांगून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर यास निष्फळ चर्चा मानली. काहींना हे वैयक्तिक भांडण वाटले. याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? तुमच्यासारख्या एका दलित आदिवासी कुटुंबामधून आलेल्या स्त्रीयांवर तुमचा विश्वास कमी आहे का? की एखादया स्त्रीची सार्वजनिक जीवनात लैंगिक निर्भत्सना होणे हे प्रकरण तुम्हाला शुल्लक वाटते? ज्या फुले आंबेडकरांनी स्त्रीयांच्या प्रतिष्ठेकरता आयुष्यभर लढा दिला, त्या स्त्रियांची सार्वजनिक जीवनात होणारी अप्रतिष्ठा आपण शुल्लक कशी काय मानू शकता?

शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं की या घडलेल्या प्रकरणाचा आपण समूऴ विचार करावा. ह्या गोष्टीतून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे. मुलींनीदेखील अनोळखी मुलांशी मैत्री करताना सावधगिरी बाळगावी. कारण आपले विचार जरी बदललेले असले तरी समाज मात्र अजूनही त्याच बुरसटलेल्या पारंपारिक मानसिकतेचा आहे व हा समाज सोशल मीडियामध्ये प्रतिबिंबीत होतोय.

समताधारक समाजाच्या उभारणीकरता धडपडत असताना दलित आदिवासी इतर मागासवर्गीय स्त्रीयांना जात आणि स्त्रीदास्य ह्या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. कुटुंब आणि समाज अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत असताना अनेक वेळा त्यांचं मनोबल कमी-जास्त होत असतं. पितृसत्ताक कुटुंबातून संघर्ष करून बाहेर येऊन स्त्रिया आता कुठे विचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं मत ठळकपणे मांडत आहेत. तेव्हा आपला व्यवहार त्यांच्याशी सौहार्दतापूर्ण असला पाहिजे. उदाहरणार्थ, त्या जेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलनातून आपले मागणे मांडण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा "रस्त्यावर उतरून काय फायदा" अशी टीका करण्यापेक्षा हा रस्त्यावर येण्याचा हक्कसुद्धा त्यांनी कुटुंबियांशी आणि समाजाशी भांडून प्राप्त केला आहे याचे आपण भान ठेवायला हवे. त्यांच्या चुका आपण टिंगलटवाळी न करता समाजावून सांगितल्या पाहीजेत नाहीतर कदाचित त्यांचं खच्चीकरण होऊन त्या भविष्यात व्यक्त होणेही टाळू शकतात. तेव्हा एकंदरीत त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन असावे. बाबासाहेब म्हणाले होते की "एखादया समाजाची प्रगती मी त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून मोजतो." तेव्हा समाजातील स्त्रियांचा लढा हा प्रत्येकाचा लढा आहे व तो आपल्या प्रत्येकाला लढावा लागेल हे आपल्या लक्षात असू द्या.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

आखिल भारतीय भाषाविद्रोह सुधार समितीने हिंदुव्य शब्द अधिक सुलभ असून हैंद्व्य शब्दाला पर्याय म्हणून वापरावा असा जीआर काढला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेखातल्या कुतर्कांना विरोध आहे.
ब्राह्मणांनी जर पितृसत्ताक व्यवस्था एखादा फतवा वगैरे काढून जाहीर केली असती आणि त्याची फोटोकॉपी लेखाबरोबर मिळाली असती तर, त्याचा प्रतिवाद करण्यात आला असता.
लेखाच्या गाभ्याला हरकत असण्याचं कारण नाही. कोणीही घेणारही नाही. पण मुळात हा विषय इतका चावून चोथा झालेला आहे की, त्यावर, 'पटलं, आवडलं, बरोबरे!' इत्यादी एकशब्दी प्रतिक्रिया पुरे झाल्या असत्या. एका शब्दामुळे येणार्‍या ज्वलंत प्रतिक्रिया पाहून बाकी लोकांनी फाऊल फाऊल ओरडायला सुरुवात कधीच केलीये. त्या शब्दामुळे लेखाचा मूळ उद्देश कितीपटीने, आणि कोणत्या दिशेने बदल्तो आहे, आणि म्हणून त्याला इतका विरोध आहे हे वरील लोकांच्या ध्यानात आलेलं दिसत नाहीये.

'ज्या मुद्द्यांना कोणीही विरोध करणार नाहीत असे' मुद्दे (उदा. ह्या लेखात स्त्री-स्वातन्त्र्य, सोमि वरची स्त्री-सुरक्षा इ.), ह्यांची ढाल वापरून (राजकीय) आपले (ब्राह्मणद्वेषी. असोत बापडे.) हेतू, लोकांच्या गळी उतरवण्यासाठी सारखा एक 'की-वर्ड' वापरत राहणे, ह्या चीप प्रवृत्तीला विरोध आहे. म्हणजे कोणी त्यातल्या (नसलेल्या) लॉजिकला जरी विरोध केला, की ह्याविरुद्ध बोलूच कसं शकता वगैरे अगतिकतेने गळे काढायला मोकळे.

ब्राह्मण्य ब्राह्मणी हे शब्दच्छलाचे विषय आहेत. मायबोलीवर एके ठिकाणी चर्चा केली आहे. http://www.maayboli.com/node/52369 ऐसी वर ही ती झाली असणार. प्रा प्रतिमा परदेशी या विद्रोही चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. ब्राह्मण ब्राह्मण्य या शब्दांचे विद्रोही चळवळ वेगळेच अर्थ लावते असते ते भाषा शास्त्राशी सुसंगत असतातच असे नाही.

हा लेख वाचला. तंतोतंत पटला. त्याखालच्या प्रतिक्रियाही बर्‍याच बोलक्या आहेत. लेख वाचल्या वाचल्या त्याबद्दलचं जे मत होईल त्याला विरोध आहे, कारण जनरल पब्लिक, जे असे लेख वाचतं ते, मग ते ऐसी असो, मिपा, माबो, फेबू, व्हॉट्सॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम इथे, कुठेही 'विद्रोही शब्दकोष' घेऊन बसलेलं नाही. प्रमाण भाषेतल्या सायटींवर लिहीताना तेव्हढं भान लेखिकेने बाळगलं पाहिजे. ऐसीवर बराच लेखिकेच्या 'उद्देशांचा, पार्श्वभूमीचा, त्या शब्दवापरामागचा तर्क, विचार, मतं आणि विदा' ह्याचा जितका सखोल, मूलगामी, भौतिक-अधिभौतिक विचार होतो, तो सगळीकडे होणारे का?

इथे, ऐसीवर, भावना 'अ‍ॅक्चुअली' कोणाच्याही दुखावल्या गेलेल्या नाहीत म्हणणे सयुक्तिक ठरेल. उद्या कोणत्या दलित लेखकाने अनिष्ट रुढी, अस्पृश्यता ह्यांबाबत ब्राह्मणांना उघड दोष लेख जरी लिहीला, तरी त्यात लेखकाला दोष देता येणार नाही, त्यातल्या 'ब्राह्मण' शब्दाबाबत आक्षेप घेता येणार नाही. उगीच 'कित्ती बा आम्च्याकडून त्यांच्यावर अन्याय झालेSSS' म्हणून स्वतःच्या जातीची लाज वाटणार्‍यांची संख्या कमी नाही.

शेवटची कमेंट माझीही. लेखापेक्षा प्रतिक्रियांना, त्या देणार्‍यांना judge करणारी.
ब्राह्मणांनी एका असमान, अन्याय्य व्यवस्थेचा सन्मान केला म्हणून त्यांना त्याचं जितकं क्रेडिट मिळालंय; तेव्हढं बाकी जातीतल्या लोकांना मिळालेलं नाही हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याला मात्र तर्कनिष्ठ प्रतिसाद हवे तेव्हढे दिसले नाहीत. फाऊल फाऊल फाऊऊऊऊल वाल्यांचीच संख्या जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

बाकी काही असो, ब्राह्मण हा विषय ज्याम टीआरपीखेचक आहे हे कबूल केलेच पाहिजे. अगदी कट्टर ब्राह्मणवाद्यांपासून ते ब्राह्मण पुरुष ठार मारून स्त्रियांना बहुजनांत वाटून घेतले पाहिजे वाल्यांपर्यंत सगळ्यांनाच हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रीवादाची मांडणी स्त्रियांनी कशी करावी याबद्दल पुरुषांनी भावना दुखावून घेतलेल्या सल्ले दिलेले बघून फारच मज्जा आली. त्यातही ज्या मुली-स्त्रियांच्या आयुष्य-अडचणींबद्दल आपल्याला (घंटा) काही माहीत नाही, त्यांना स्त्रीवादी सल्ले दिलेले बघून तर 'कुडियों का है जमाना' हे तर अगदी मनाऽऽऽपासून पटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुली-स्त्रियांच्या आयुष्य-अडचणींबद्दल आपल्याला (घंटा) काही माहीत नाही, त्यांना स्त्रीवादी सल्ले दिलेले

अश्याच प्रकारे पारंपरिक वृत्तीच्या पुरुषांना, त्यांच्या आयुष्य अडचणींबद्दल घंटा महित नसताना, त्यांनी कसे स्त्रीवादी बनले/असले पाहिजे याचे डोस तुम्ही देखिल नियमित देत असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते लिंबूटिंबूंचं प्रिविलेज आहे अजो, घेऊद्यात त्यांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टाळ्या!
+१०००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

>>त्यातही ज्या मुली-स्त्रियांच्या आयुष्य-अडचणींबद्दल आपल्याला (घंटा) काही माहीत नाही,

स्वतः मुलगी किंवा स्त्री नसल्यास स्त्रियांच्या आयुष्य अडचणींबद्दल घंटा माहीत नसणार हे गृहीतक अंबळ रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धाग्यावरच्या पहिल्या प्रतिसादामध्येच हे उघड झालेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढचा अभ्यास
ब्राह्मणी चळवळी,ब्राह्मणी प्रबोधन,ब्राह्मणी संस्कार,ब्राह्मणी शिक्षण,ब्राह्मणी वातावरण्,ब्राह्मणी कला,ब्राह्मणी साहित्य,ब्राह्मणी आचार,ब्राह्मणी विचार,ब्राह्मणी पोशाख,ब्राम्हणी स्वैपाक....
यातील ब्राह्मणी शब्द काढून व न काढता निर्माण होणार्‍या अर्थछटा यातील भेद व साम्ये लिहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सुमारे १७० वर्षांपूर्वी गोपाळ हरि देशमुख यांनी 'शतपत्रे' लिहिली. तत्कालीन कुप्रथा, त्यात ब्राह्मणांचे योगदान आणि यावर 'सरकारनें काय करावें' याविषयीची गोपाळ हरींची मते यावर रविवारच्या (५/२/१७)गोपाळ हरिंचे एक सुंदर पत्र छापले आहे. या धाग्यावरच्या बहुसंख्य प्रतिसादांतल्या मुद्द्यांशी त्यातला पहिला भाग संबंधित आहे म्हणून येथे ती लिंक द्यावीशी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या दुव्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुव्याबद्दल आभार. शतपत्रे सहज बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही याबद्दल तुम्हाला माहीती असल्यास द्यावी. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>> शतपत्रे सहज बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही याबद्दल तुम्हाला माहीती असल्यास द्यावी <<

शतपत्रे मस्त आहेत आणि आता कॉपीराइटच्या बाहेरही आहेत.

लोकहितवादी समग्र वाङ्मय महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडून ऑनलाइन उपलब्ध आहे -
समग्र वाङ्मय खंड १ : पीडीएफ, इपब, मोबि
खंड २ : पीडीएफ, इपब, मोबि

काही पत्रांची ऑडिओ आवृत्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बहूत धन्यवाद! पीडीएफ उतरवून घेतले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

त्या शतपत्रांच्या दुव्यामधे खालील मजकूर सापडला....

आज ते हयात असते तर आम्ही त्यांचे मनःपूर्वक पाय धरले असते -

सरकार चालविण्यामध्यें मुख्य मर्म असें आहें कीं, सरकार जितकें घटत जाईल तितकें बरें आहे. व लोकांची सत्ता जितकी वाढत जाईल तितकी चांगली आहे. अगदी सरकारची गरज नाहीं अशी स्थिती असावी, असें मनांत येतें; पण अशी स्थिती लोकांस प्रत्यक्ष कधीं येईल असें तर दिसत नाहीं. पण जितकी सरकारचे गरज कमी होऊन लोकांचे हातीं कारभार येईल तितकें चांगलें आहे.. केवळ अडाणी देशांत सरकार मायबाप असतें. किंवा सरकार चोर असतें. मध्यम सुधारलेले देशांत सरकार मित्र असतें. व फार सुधारलेले देशांत सरकार चाकर आहे असें मानून सरकाराशीं लोक वागतात. सरकारचे गैरवाजवी सत्तेची वृध्धी होऊं देत नाहींत व सरकारच्या चुक्या सरकारास सांगतात. व त्यांचे दोष छापून प्रसिद्ध करितात. वाईट सरकारांत अशी कारभाराची प्रसिद्धि नाहीं. तेथें सर्व गुप्तपणा असतो. परंतु चांगले सरकारांत सर्व कारभार उघडा असतो. पाहिजे त्याणें पाहावा. ज्ञानावर सरकारचा प्रतिबंध नसतो. परंपरेचे राज्याचें सरकार असो किंवा कारभारी यांचें सरकार असो किंवा सत्तात्मक सरकार असो, त्यांत कांहीं चोरी नसते. सरकार आपले कारभाराचे प्रसिध्धीस अनुकूल होऊन लोकांस माहिती सांगतें. आणि हेंच चांगलें राजाचें लक्षण आहे. राज्य कोणाचेंही अजरामर नाहीं. परंतु अशा पायावर बांधलेली इमारत फार दिवस टिकते व पेंढारीपणाचें चोरटें राज्य व त्या राज्यांतील प्रजा निर्बळ होऊन त्वरित नाशाप्रत पावते.’’

ऐसा लगता है .... के .... ह्या लिबर्टेरियन माणसाचे ... आयमिन लोकहितवादींचे आम्हाला फक्त नाव माहीती होते. विचार माहीती नव्हते. राही मॅडम, धन्यवाद !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु - ह्या माणसाला १५० वर्षापूर्वी हे विचार कसे सुचले असतील हे फार रोचक आहे. खाली लिहील्याप्रमाणे देश १५० वर्षापूर्वी होते असे दिसतय.

मध्यम सुधारलेले देशांत सरकार मित्र असतें. व फार सुधारलेले देशांत सरकार चाकर आहे असें मानून सरकाराशीं लोक वागतात. सरकारचे गैरवाजवी सत्तेची वृध्धी होऊं देत नाहींत व सरकारच्या चुक्या सरकारास सांगतात. व त्यांचे दोष छापून प्रसिद्ध करितात.

---------------
माझी स्मृती जर दगा देत नसेल तर लोकहितवादींच्या मते इंग्रजांचे सरकार ही भारतासाठी दैवी देणगी आहे. त्यांच्या मते, भारतातले लोक हे राज्य करण्यास नालायक असुन देवानीच भारत सुधारण्यासाठी इंग्रजांना पाठवले आहे.

ह्या मताबद्दल पण माझी आणि त्यांची एकदम सहमती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बु - ह्या माणसाला १५० वर्षापूर्वी हे विचार कसे सुचले असतील हे फार रोचक आहे. खाली लिहील्याप्रमाणे देश १५० वर्षापूर्वी होते असे दिसतय.

ब्रिटिश तत्त्ववेत्ता जॉन लोक याने १६८९ मधे प्रकाशित केलेलं Two Treatises of Government हे पुस्तक पाहिलंस तर तुला आश्चर्य वाटणार नाही. जेमतेम शंभर सव्वाशे पानांचं पुस्तक आहे.

लिबरलिझम चा पिता मानला जातो तो - असं विकिपेडिया म्हणतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला कठीण आहे. २ वर्ष्यानंतर पाह्यलं तरी ऐसीवर तेच.

बरे झाले देवा कुणबी केलो..नाही तरी दंभे असतो मेलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

asaa प्रतिसाद पाहीजे. धनुष यांचा प्रतिसाद आवडला.
________________
माझी जात श्रेष्ठ - तू कनिष्ठ करणार्‍या लोकांच्या वायुचा असह्य दर्प व्हर्च्युअल नेटवरही येतो. त्यावर विलाज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वस्तुत:, दंभ हा एक सामान्य मानवी दोषधर्म असल्याकारणाने, (१) कोणत्याही एका विशिष्ट ज्ञातिसमूहाची मक्तेदारी नसावी, तसेच (२) कोणताही एखादा विशिष्ट ज्ञातिसमूह त्यास 'इम्यून' (मराठी?) असण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.

उलटपक्षी, दंभ हा बाय इटसेल्फ (पुन्हा: मराठी?) काही प्राणघातक रोग असल्याबद्दल विदा नाही. मात्र, एड्स झाल्यावर ज्याप्रमाणे खुद्द एड्सने मनुष्य मरत नाही, परंतु एकंदर रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याकारणाने एड्सच्या उपस्थितीत इतर (अन्यथा विशेषत: प्राणघातक नसलेल्या) रोगांनी मनुष्य मरू शकतो, तद्वत, 'लज्जा' नावाच्या अन्य एका रोगाचा प्रादुर्भाव झाला असता त्या रोगाच्या उपस्थितीत दंभानेसुद्धा (दंभाची शरम वाटून) मनुष्य मरणे शक्य असावे. आता, 'लज्जा' नावाच्या रोगाचा प्रसार तथा त्यापासून इम्यूनिटीचे सामाजिक डिस्ट्रिब्यूशन यांचा अधिकृत अभ्यास फारसा झालेला नाही. तरीसुद्धा, त्यापासूनच्या इम्यूनिटीचे वितरण विषम असणे अगदीच अशक्य नसावे. (अर्थात, ही केवळ अटकळ आहे.)
..........

हे तथ्य न मानणे हे साधारणत: जेव्हा एड्सचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर घ्यायच्या प्रतिबंधात्मक सामाजिक उपाययोजनांची जागतिक पातळीवर चर्चा व्हावी, तेव्हा संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 'आमचा इस्लामी देश असल्याकारणाने आमचे येथे ही समस्या मुळातच अर्थात नाही, सबब हे सर्व आम्हांस लागू नाही' अशी भूमिका घ्यावी, त्याची आठवण करून देणारे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:). मला धनुष यांचे गर्वसे कहो हम कुणबी है असा अ‍ॅप्रोच आवडला. मलासुद्धा सी के पी असल्याचा (खरंतर हायब्रिड - कोब्रा व सी के पी) अभिमान आहे. पण कोणती जात मी कमी लेखत नाही. बाय द वे आमच्याकरता १२ जाती - मेष, वृषभ , .... मीन :)याच खर्‍या. त्यातही नेप्चुनिअन आदर्शवादीमीनेचे स्पिरिच्युअल लोक म्हणजे सर्वश्रेष्ठ असा भेदभाव Smile .मीन म्हणजे फक्त सूर्य-चंद्र मीन रासवाले नाहीत तर अँगल्स, डिग्रीज, आस्पेक्टस आदिंनी कुंडलीत नेप्च्युन प्रबळ असणारे लोक आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कुणबीपणाचा अभिमान वगैरे भानगड ह्यात काही नाही. गर्वसे कहो तर नाहीच, पण एकूणच इथल्या विसंवादाचा विचार करता हे ठीकच आहे.

बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

ओके :). खरं तर ते वाक्य माझे चुकलेच आहे. तुम्ही गर्वसे अन अमक< ढमक< म्हणालाच नव्हता Sad
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहानुभूती. सह-अनुभूती. बाकी काही बोलणं शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वस्तुत:, दंभ हा एक सामान्य मानवी दोषधर्म असल्याकारणाने, (१) कोणत्याही एका विशिष्ट ज्ञातिसमूहाची मक्तेदारी नसावी, तसेच (२) कोणताही एखादा विशिष्ट ज्ञातिसमूह त्यास 'इम्यून' (मराठी?) असण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.
: मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

वस्तुत: बौद्धिक दिवाळखोरी हा एक सामान्य मानवी दोषधर्म असल्याकारणाने, कोणत्याही एका विशिष्ट ज्ञातिसमूहाची मक्तेदारी नसावी; तसेच कोणताही एखादा विशिष्ट ज्ञातिसमूह त्यास 'इम्यून' असण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही. अर्थात, आपल्यापाशी बुद्धी असल्याचा दावा असलेल्या लोकांत त्याची लागण होण्याचा धोका अधिक असावा. (अर्थात, ही केवळ अटकळ आहे.)

उलटपक्षी, बौद्धिक दिवाळखोरी हा बाय इटसेल्फ काही प्राणघातक रोग असल्याबद्दल विदा नाही. मात्र, एड्स झाल्यावर ज्याप्रमाणे खुद्द एड्सने मनुष्य मरत नाही, परंतु एकंदर रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याकारणाने एड्सच्या उपस्थितीत इतर (अन्यथा विशेषत: प्राणघातक नसलेल्या) रोगांनी मनुष्य मरू शकतो, तद्वत, 'वास्तवाच्या आकलनाचा अभाव' नावाच्या अन्य एका रोगाचा प्रादुर्भाव झाला असता त्या रोगाच्या उपस्थितीत बौद्धिक दिवाळखोरीनेसुद्धा मनुष्य मरणे शक्य असावे. आता, 'वास्तवाच्या आकलनाचा अभाव' नावाच्या रोगाचा प्रसार तथा त्यापासून इम्यूनिटीचे सामाजिक डिस्ट्रिब्यूशन यांचा अधिकृत अभ्यास फारसा झालेला नाही. तरीसुद्धा, त्यापासूनच्या इम्यूनिटीचे वितरण विषम असणे अगदीच अशक्य नसावे. (अर्थात, ही केवळ अटकळ आहे.)

१ - किंबहुना, आमची वाणी अधिकारवाणीने कशाविषयीही बोलते तेव्हा ती अटकळ असण्याचीच शक्यता अधिक, कारण 'अभ्यासोनि प्रकटावे' आमच्या गावी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझी जात श्रेष्ठ - तू कनिष्ठ करणार्‍या लोकांच्या वायुचा असह्य दर्प व्हर्च्युअल नेटवरही येतो. त्यावर विलाज नाही.

(१) पारंपरिक व्यवस्थेत व्यक्तीची जात जन्मावरून ठरते, कर्मावरून ठरत नसते व म्हणून व्यक्तीने जन्माधिष्ठित जातीपासून कोणताही लाभ मिळवू नये. जातीचा अभिमान तर अजिबातच बाळगू नये कारण तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात हे तुम्ही ठरवू शकत नाही किंवा आपल्या कर्माने मिळवू शकत नाही. "तथाकथित" उच्च जातीत जन्माला आलात तर त्यातून एकप्रकारचे सोशल रेप्युटेशन तुम्हाला मिळत असते. ते चूक आहे कारण ते जन्माधिष्ठित आहे. अशाप्रकारचे सोशल रेप्युटेशन, सामाजित उच्चत्व हे डिस्करेज केले पाहिजे म्हंजे कर्माधिष्ठित समाजरचनेला चालना मिळेल. म्हंजे उच्च जातीत जन्माला न आलेल्यांना कनिष्ठ वाटणार नाही.

(२) ज्यांचा आवाज जन्मतःच गोड असतो त्यांनी गायन क्षेत्राकडे वळूच नये. कारण त्यांचे ते गुणवैशिष्ट्य हे जन्माधिष्ठित असते कर्माधिष्ठित नसते. त्यांनी रियाज केला म्हणून काय झालं ?? त्यांच्या सुश्राव्य आवाजाची देणगी त्यांना जन्मापासून मिळालेली आहे. त्यांनी जन्मोत्तर कर्मातून कमावलेली नाही. तेव्हा ज्यांचा आवाज भस्साडा असतो त्यांना प्रोत्साहित केले जावे. म्हंजे कर्माधिष्ठित समाजरचनेला चालना मिळेल. म्हंजे भस्साड्या आवाजाच्या लोकांना कनिष्ठ वाटणार नाही.

(३) जे जन्मतःच धिप्पाड असतात त्यांनी खे़ळाडू किंवा सैनिक होऊ नये. कारण त्यांना एक प्रकारचे नैसर्गिक अ‍ॅडव्हांटेज मिळते जे जन्मतःच असते. ते त्यांनी कर्मातून मिळवलेले नसते. त्यांनी त्याउप्पर मेहनत घेतलेली असू शकते पण म्हणून काय झाले ?? जन्मतःच जे अ‍ॅडव्हांटेज मिळालेले असते ते नलिफाय होत नाही. उलट रि-इन्फोर्स च केले जाते. जे खुज्या व कृश लोकांना डिसअ‍ॅडव्हांटेजस असते. व म्हणून जे खुजे व कृश असतात त्यांना खेळाडू, सैनिक वगैरे होण्यास प्रोत्साहन दिले जावे. सैन्यदलांनी आपल्या आयुधांची लांबीरुंदी ही स्थानिक उपखंडातील लोकांच्या स्टँडर्ड उंची व शारिरिक साईझ च्या रेंज च्या निरिक्षणांवर आधारित ठेवू नये. ती अत्यंत कृश, खुजे लोक जे असतात त्यांच्या शारिरिक मापदंडानुसार ठेवावी. म्हंजे जन्माधिष्ठित सैन्यप्रणालीस डिस्करेज केले जाईल व कर्माधिष्ठित सैन्यरचनेला चालना मिळेल. म्हंजे कृश, खुजे लोकांना कनिष्ठ वाटणार नाही.

(४) सुंदर व्यक्तींनी आपल्या सौन्दर्याबद्दल काहीही विशेष वाटून घेऊ नये. व त्या सौन्दर्यामुळे मिळणारी सर्व कमाई (उदा मॉडेलिंग मधून वगैरे) जनार्पण करावी. सौन्दर्याच्या जोडीला त्यांनी मेहनत घेतलेली असू शकते. पण म्हणून काय झालं ? ती मेहनत ही त्यांच्या जन्माधिष्ठित अ‍ॅडव्हांटेज ला रि-इन्फोर्स करते. व त्यातून त्यांना आणखीनच अ‍ॅडव्हांटेज मिळत जाते. व हे सुंदर नसलेल्या व्यक्तींना डिसअ‍ॅडव्हांटेजस असू शकते (त्यांना कनिष्ठता वाटू शकते.)

(५) आपण सगळे एकमेकांपेक्षा कितीही भिन्न असलो तरीही आपण समानच आहोत व आपण असमान असण्याची सुतराम शक्यता नाही असं मानलंच पाहिजे - असा आग्रह धरणार्‍या लोकांच्या वायुचा असह्य दर्प व्हर्च्युअल नेटवरही येतो. त्यावर विलाज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे जन्मतःच धिप्पाड असतात त्यांनी खे़ळाडू किंवा सैनिक होऊ नये. कारण त्यांना एक प्रकारचे नैसर्गिक अ‍ॅडव्हांटेज मिळते जे जन्मतःच असते.

याच आधारावर ऑलिंपिक फाल्तू आहे असा धागा निघालेला की इथेच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या व्यक्तीला जन्मतः लाभलेले गुण-दोष आणि जन्माच्या जातींना सरसकटपणे चिकटलेले गुण-दोष यात काहीच फरक वाटत नाही का??
मुद्दा सरसकटपणाचा आहे.. आणि परत आपापल्या जातींना चिकटवायचे गुण व दुसर्‍या जातींना चिकटवायचे दोष हे ही आहेच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
मीही आज दोन हप्त्याने डोकावले.

धनुषशी बाडीस! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समजा या लेखाचे नाव पितृसत्ताक व ब्राह्मणी सोशल मिडिया असे असते तर काय झाले असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बाकी तो "ब्राह्मणी" पितृसत्ता शब्दही आकसाने वापरला आहे असे मलाही वाटते. त्याबद्दल दुमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१११११११११

इतकेच म्हणायचे होते.

बाकी त्या लेखात काय लिहीले आहे त्या विषयाशी माझा काही संबंध नाही आणि मला संबंध जोडायचा पण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दलित साहित्यात "ब्राह्मण" हा शब्द "वाईट", "पापाचे आदिकारण" इ इ या अर्थाने वापरतात. आजच्या स्वतःला ब्राह्मण मानणार्‍या आणि न मानणार्‍या ब्राह्मणांना ब्राह्मणी इतिहासात काही चांगले आहे अशी धारणा असेल तर ते संदर्भ देखिल दलित साहित्यात फार निगेटिव संदर्भात मांडले जातात. उदा. ज्ञानेश्वरांना जनरली स्वतःला ब्राह्मण मानणारे आणि न मानणारे दोन्ही ब्राह्मण एक दोन कारणांनी चांगले मानतात. मात्र मी दलितांना "आणि ग्रंथोपजिविए, विशेषी लोकिइये , दृष्टादृष्ट ....(जे काय ते)" ओळी बद्दल अत्यंत आकसपूर्ण टिका करताना ऐकलं आहे.
----------------------------------------
लेखिकेला कोणता विशेष आकस इ नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा लेख म्हंजे सगळया गोष्टींचा मिसळपाव असल्यासारखं वाटतंय ...
स्त्रीस्वातंत्र्य , जातीयवाद आहेच भरीस भर सोशल मीडिया ला सुद्धा नावं ठेवण्याचा प्रकार आहे ..
कावीळ झाली जग पिवळ दिसतं अस काहीसं वाटतंय मला हे वाचून . मुळात सोशल मीडिया वर आपण कुणाशी बोलावं काय बोलावं याचं भान स्वतःच स्वतः ठेवलं की फारशी अडचण येत नाही . लोक देतातच कि त्रास पण आपल्याला ब्लॉक , इग्नोर हे ऑपशन दिलेले असतात त्यासाठी. त्याहून पुढे जाऊन सायबर सेल मध्ये तक्रार हि करता येते. आणि कशावरून मुली कांगावा करत नाहीत ?
लोक बोट दिल्यावर हात धरतात हे खरंय पण त्यासाठी आपण बोट हि देतोच हे हि तितकंच खरं. त्यात आंबेडकरांचा काय संबंध आला बुआ ...?
राहिली गोष्ट मुलींना त्रास देण्याची तर ती सगळ्याच थरात असते. माझ्या सोशल मीडिया वर कुठेही जात नाही तरीही हिणकस , विचित्र , लैंगिक कंमेंट्स येतात. हि वृत्ती आहे, आणि ती मुलींमध्ये देखील असते.
"या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला एक विचारावंसं वाटतं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेऊन काही लोक आपल्याच आंबेडकरवादी मैत्रिणींना त्रास देत असतील तर यांचा बंदोबस्त आपण कसा करणार् आहोत" ह्या वाक्या नंतर या बाईना जातीयवादी विधानं करण्याबद्दल अवॉर्ड दिले पाहिजे तुमचे ते आंबेडकरवादी मित्र मैत्रिणी , आणि आमचे काय सर्व धर्म समभावाचे ? एखाद्या मुलीला त्रास दिला असेल तर त्याच्याशी आंबडेकरांचा संबन्ध जोडण्याचे प्रयोजन काय आणि तिच्या जाती चा संबंध कुठे येतो?

। यापूर्वीही हा व्यक्ती लिंगभावातीत (gender biased) पोस्ट टाकायचा तेंव्हा मात्र अनेक आंबेडकरवादी तरुण शांत रहायचे
याला सभ्य भाषेत दुर्लक्ष करणं म्हणू नाही का शकत..?

या लेखात जातीयवाद नाही असं कसं म्हणायचं ,
"दलित आदिवासी इतर मागासवर्गीय स्त्रीयांना जात आणि स्त्रीदास्य ह्या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. "
"आंबेडकरवादी" असले शब्द वगैरे जातीयवादातून वगळले आहेत काय ?
ब्राम्हण म्हणून शेखी मिरवणं वगैरे फार लांबची गोष्ट पण मी ब्राम्हण असल्याचा शोध माझ्या आडनावावरून लावून माझ्या आसपास च्या लोकांना ज्यास्त कॉम्प्लेक्स असल्याचा अनुभव मी घेतलाय. तुम्ही काय बाबा... वेगळे.. हा टोन मी काहीही ना करता मला ऐकायला लागलाय . किंवा तू भटुरडी आहेस हे ठसवलं गेलय. जातीय भेदभाव आणि पुरुष सत्ता हे तुमच्या वाटेला अधिक कारण तुम्ही दलित हा सूर मुळातच चुकीचा आहे. उलट कायद्याने स्त्रियांना त्याहून तुम्ही मागासवर्गीय असाल तर जरा ज्यास्तच संरक्षण दिलेल आहे हि गोष्ट दुर्लक्षित करून कशी चालेल?

------------------------------------------------------------------------------------
। लगाव बत्ती ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

बहुतेक चर्चा "ब्राह्मणी" या शब्दावर झालेली दिसतेय. स्वत:ला ब्राह्मण समजणाऱ्या काही स्त्रियाही दिसताहेत यात.
स्वत:ला उच्चवर्णीयांपैकी एक समजणाऱ्या माजी उच्चवर्णीयांच्या स्त्रीसारखा विनोदी, निर्बुद्ध आणि हलकट प्राणी या ब्रह्मांडात दुसरा नाही. त्यांना बहुतेक आजचे स्वातंत्र्य व प्रिव्हिलेजेस हे त्यांच्या पूर्वज स्त्रियांना त्यांच्या तत्कालीन मालकांनी स्वत:हून उदारपणे दिले होते म्हणून मिळाले असे भास होत असावेत.
ह्या निर्बुद्धांनाच भारतीय फेमिनिझमचे ॲप्रोप्रिएशन करायची अनार्जित संधी मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या वरची काही टक्के लोकसंख्या सोडली तर अन्यत्र पितृसत्तेला साधा ओरखडाही उमटलेला नाही. आणि आता तर हे प्राणी पुन्हा जुना "सुवर्णकाळ" आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे गुणगान गाण्यात मग्न आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Generalization much?

स्वत:ला उच्चवर्णीयांपैकी एक समजणाऱ्या माजी उच्चवर्णीयांच्या स्त्रीसारखा विनोदी, निर्बुद्ध आणि हलकट प्राणी या ब्रह्मांडात दुसरा नाही.

आपण त्यांची घरे उन्हात बांधू, हं! उगी उगी!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Specific qualification दिले आहे तरी generalization कसे?
भूतकाळात सगळ्या स्त्रियांना शूद्रांचाच दर्जा होता आणि उच्चवर्णीयांच्या स्त्रियांना कोणतेही विशेष अधिकार नव्हते; पण विशेष बंधनं मात्र होती. खालच्या जातीतल्या लोकांच्या स्त्रियांना नवरा मेल्यावर सती जाणे किंवा केशवपन करण्याचे बंधन नव्हते आणि पाट लावणे वगैरे प्रकारांना मुभा होती.
असे असताना उगीचच स्वतःला ब्राह्मण किंवा क्षत्रिय वगैरे समजून इथं “ब्राह्मणी” शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आणि इतरत्र समाजमाध्यमांवर संस्कृतीचे उमाळे काढत तथाकथित हिंदूराष्ट्राच्या समर्थनार्थ घाण पसरवणाऱ्या स्त्रियांना हे उद्देशून आहे.
बाकी महिला कल्याण मंत्रालय व महिला आयोगाची कुस्तीपटूंच्या प्रकरणातली निष्क्रियता पाहून फेमिनिझमचे ॲप्रोप्रिएशन झाले आहे हे मान्य करायला हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी हं

आत्याबाईसुद्धा स्वतःला उच्चवर्णीय समजतात हे माहित नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझीही श्रेणीव्यवस्था चालत नाही. एरवी 'न'बांना माझ्याकडून मार्मिक, विनोदी, खवचट अशी सगळी स्तुती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समाज माध्यम फुकट ,इंटरनेट स्वस्तात , स्वस्तात मोबाईल हे पूर्वी नव्हते.
नाही तर फुल्या न पासून आंबेडकर न पर्यंत जितके महान हस्ती होवून गेल्या ज्यांनी समाजात बदल
घडवून आणला
ते करणे त्यांना जमलेच नसते..
स्वतंत्र लढा पण समाज माध्यम आणि स्वस्त इंटरनेट आणि स्वस्त मोबाईल नव्हते तेव्हा दिला गेला .
आज भारतात ब्रिटिश राजवट असती
आणि स्वतंत्र लढा द्यायचा असता तर स्वतंत्र राहिले बाजूला देशात च लोक एकमेकांच्या उरावर बसली असती
समाज माध्यम ही सशुल्क च असावीत आणि नियमाने बद्ध असावीत.
तर च त्यांचा योग्य वापर होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कोण आयडी असतील त्यांची पोस्ट समस्त ब्राह्मण स्त्री चा अपमान करणारी आहे.
मी ब्राह्मण नाही.पण स्त्री ची इज्जत जात बघून करणाऱ्या लोकांची मत बिलकुल पटत नाहीत.
प्रशासन नी त्यांची कॉमेंट उडवून टाकावी.
ऐसी अक्षरे साठी ते लांच्चांस्पद आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कोण आयडी असतील त्यांची पोस्ट समस्त ब्राह्मण स्त्री चा अपमान करणारी आहे.
मी ब्राह्मण नाही.पण स्त्री ची इज्जत जात बघून करणाऱ्या लोकांची मत बिलकुल पटत नाहीत.
प्रशासन नी त्यांची कॉमेंट उडवून टाकावी.
ऐसी अक्षरे साठी ते लांच्चांस्पद आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पितृ sattak समाज असल्या मुळे स्त्री वर अन्याय होतो.
दावे,स्त्री वादी ,कथित आंबेडकर वादी असा दावा करत असतात.
कसा अन्याय होतो ह्या पद्धती मध्ये कोणी तरी स्पष्ट करा.
स्त्री चे पुरुषाशी अनेक प्रकारे नाते आहे
आई मुलगा
नवरा बायको.
मित्र मैत्रीण.
सून सासरा.
मुलगी वडील.

ही मुख्य
मुलाचे आई वर जीवापाड प्रेम असते.
हे सत्य आहे की असत्य.
वडिलांचे मुलीवर जीवापाड प्रेम असते हे सत्य आहे की असत्य.
सर्वच नवरा बायको व्यवहारी नसतात.
खूप जोडप्या मध्ये खरे प्रेम असते ये हिशोब करत बसत नाहीत.
ते प्रेमाचे नाते आहे.
ही सर्व नाती पितृसत्ताक पद्धती मधिलच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

कंटाळवाणी चर्चा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

पाने