सातारचे छत्रपति?

आजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये पुढील उल्लेख आहे त्यावरून मला सुचणारे काही विचार येथे नोंदवीत आहे:

२० फेब्रुअरी १८१८च्या अष्ट्याच्या लढाईत मराठा पक्षाचा पूर्ण पराभव झाला, सेनापति बापू गोखले लढाईत पडले आणि प्रारंभी मराठा बाजूला असलेले तत्कालीन छत्रपति प्रतापसिंह, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तदनंतर इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून ज्या अनेक योजना केल्या त्यांपैकी एक म्हणजे छत्रपतींना सातार्‍यात परत स्थानापन्न करून वारणेच्या उत्तरेकडील भाग कृष्णा-भीमासंगमापावेतोचा हा स्वराज्य म्हणून त्यांच्या स्वाधीन केला. त्याच वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून कॅ.ग्रँटला रेसिडेंट म्हणून सातार्‍यात नेमले,

अशा रीतीने सातारचे १८१८ नंतरचे तथाकथित राज्य हे केवळ इंग्रजी मेहेरबानीने निर्माण झालेले संस्थान होते. त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेहि राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत चालले. प्रतापसिंहास तो गैरसोयीचा वाटल्यामुळे इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ ह्या दिवशी पदच्युत करून बनारसला पेन्शनीवर पाठवले आणि त्याचा धाकटा भाऊ आप्पासाहेब ह्यास छत्रपतिपदावर बसविले. ते निपुत्रिक होते. त्यांव्या १८४८ मधील मृत्यूनंतर त्यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी अखेर सातारचे संस्थान आणि शिवाजीच्या स्वनिर्मित राज्याचा अखेरचा दुवा १६ मे १८४९च्या जाहीरनाम्याने अखेरचा नष्ट केला आणि सातारा ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. ईंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी निर्मिलेले हे राज्य त्यांना वाटले तोवर टिकले आणि नंतर त्यांच्याच इच्छेने विलयास गेले.

अशी परिस्थिति असतांना सातार्‍यातील तथाकथित छत्रपति घराणे आपली बेगडी बिरुदावलि मिरवत त्याचा राजकीय लाभ उठवत असतांना दिसते. छ.(?) उदयनराजे आणि छ.(?) शिवेन्द्रराजे हे राजेपणाचे किताब मिरवीत छत्रपतिपदाचा आपणास निसर्गदत्त अधिकार आहे असे मानतात. भोळसट जनताहि - त्यामध्ये छत्रपतींपुढे मुजरे करणारे बाबासाहेब पुरंदरेहि आले - ते मान्य करते आणि छत्रपतींचे छात्रतेज अजून कसे जाज्वल्य आहे ह्याचे गुणगान करतांना दिसते. सगळीच मौज आहे!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

डेंजर बोलताय हो काका .जास्त लिहीत नाही . कालच राणा प्रतापाने हळदीघाट ची लढाई जिंकून मग वनवास घेतला असं ठरलय .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्याच्या सातारकरांबद्दल उघड काही बोलायचे म्हणजे अवघड काम आहे त्यामुळे असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छत्रपती आपापले खिताब मिरवीत असतीलही. पण जर इतरांनी (भोळ्या भाबड्या प्रजेने वगैरे)त्यांना भाव दिला नसता तर हे मिरवणे आपोआप थांबले असते. गेल्या एक दोन दशकांत क्षात्रतेजाचे आणि पोकळ वीरश्रीचे त्याच्या पोकळ अभिमानासह पुनरुज्जीवन केले गेले. छत्रपती शिवाजी हा हमखास गर्दी आणि यश खेचून देणारा परवलीचा शब्द बनला.'जाणता राजा'साठी २५ लाखांचे अनुदान मनोहर जोशींनी दिले.क्षात्रतेज आणि हिंदुधर्माभिमान जागवण्यासाठी शिवाजी महाराजांना तर हाय्जॅक केले गेलेच पण त्यांच्या वंशजांनाही वेठीस धरले गेले. त्यांची उपस्थिती कुठल्याही समारंभाचा मानबिंदू ठरू लागली. त्यांना अध्यक्षपदे मिळू लागली, त्यांच्या शुभहस्ते उद्घाटने, पारितोषिकवितरणसमारंभ पार पडू लागले. अशारीतीने या 'लोकनेत्यांचा उदय' झाला. मग राजकारण आपोआप आलेच.
संस्थाने शिवरायांपासून परंपरागत आहेत की नाहीत हा प्रश्न नव्हताच. ते शिवरायांचे वारस इतकेच क्वालिफिकेशन पुरेसे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छत्रपती आपापले खिताब मिरवीत असतीलही. पण जर इतरांनी (भोळ्या भाबड्या प्रजेने वगैरे)त्यांना भाव दिला नसता तर हे मिरवणे आपोआप थांबले असते. गेल्या एक दोन दशकांत क्षात्रतेजाचे आणि पोकळ वीरश्रीचे त्याच्या पोकळ अभिमानासह पुनरुज्जीवन केले गेले. छत्रपती शिवाजी हा हमखास गर्दी आणि यश खेचून देणारा परवलीचा शब्द बनला.

अगदी अगदी.
पूर्वी संस्थानिकांचा बडेजाव, पोकळ आव ह्यावर नाटके वगैरे लिहिली जात, चित्रपटात तशी पात्रे असत. एकूणच विनोदाचा प्रकार म्हणून तो प्रकार कमी होत गेला पण सध्यस्थितीत त्याचे पुनरज्जीवन केले जातेय का असे वाटते. जुन्या परंपरा, वीरश्री अन क्षात्रतेजाचे इतके प्रदर्शन चालू असते की आता ते बघवत नाही.
केवळ माझ्या व्यवसायाचा विचार करताना असे वाटते की पूर्वी राजे महाराजे आपल्या कीर्तीकथा रचायचे अन गाऊन घ्यायचे. भाट, शाहीर हे अतिरंजित स्वरुपात त्या मांडायचे तेच काम आजकाल आम्ही ग्राफीकवाले करतोय की काय. पूर्वी संस्थानिकांची स्वतःची राजचिन्हे असत. वीरश्रीने युक्त अशा त्या चिन्हांचा जनतेला परत मोह पडत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्रचलित संस्थांची, समूहांची मानचिन्हे सेवा करणारे हात, दिवा, सूर्यप्रकाश, पुस्तके, कामगारांची चक्रे अशी असायची. आता सिंह, वाघ, साप, तलवारी अशा चिन्हांचा वापर करुन ग्रुपचे लोगोज बनवले जातात. कुणालाच सेवा, चारित्र्य, ज्ञान, करुणा आदि गुणांचे कौतुक राहिलेले नाही. जो तो दाखवतो तो वीरश्री. महापुरुषांचे वीरश्रीकरण तर उल्लेखनीय. दहा वर्षापूर्वी अहिल्यादेवींचे चित्र हे एक शांत, शालीन स्वरुपाची हातात शिवपिंड धारण केलेली स्त्री म्हणून मला ज्ञात होते. आजकाल अह्ल्यादेवी हातात तलवार घेऊन झाशीराणीप्रमाणेच लढाई करताना चित्रात दिसतात. अहिंसेचे धारण अन बुध्दाचा स्वीकार केलेला अशोक नकोय आजकाल. आज चक्रवर्ती सम्राट अशोक हवाय. शिवाकाशिद ह्यांचे रुपसाधर्म्याने केलेले बलिदान राहिले बाजूला. त्यांचा हातात तलवार फिरवताना पुतळा जास्त प्रसिध्द. आण्णाभाऊ साठे मागे पडले. क्रांतीवीर लहुजी वस्तादाचे शस्त्रे धारण केलेले चित्र लोकप्रिय झाले. लहानपणी शिवाजीच्या चित्रानेच आमची चित्रकला सुरु झाली पण आजचे शिवाजीचे चित्र भलतेच हायफाय. शिवराय हे केवळ वॉरीयर, लढवय्या होते असे. ते प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते, त्यांची दूरदृष्टीची धोरणे हा भाग सोयीस्कर टाकला जातो. संभाजी महाराज चित्रात सिक्स पॅकसहित येऊ लागले. नुकतंच एक फ्लेक्सचे डिझाईन आलेले. क्लायंट म्हणे संभाजी महाराज आणि सहा मावळे दौडत चाललेले बनवा चित्र. आणि लिहा वेडात मराठे दौडले सात. मी म्हणले अहो ती प्रतापराव गुजरांची कथा ना?. क्लायंट म्हणे नाही नाही, संभाजी महाराजांनी सहा मावळ्यासहित १० हजाराच्या फौजेला हरवले. आमचाही सात जणांचा ग्रुप आहे. म्हणून टाका. आता ह्यावर काय बोलणार? माझा एक मित्र टॅटूचा बिझनेस करतो. दिवसाकाठी ३-४ टॅटू होतात. त्यात सिंह, वाघ, साप, ड्रॅगन, ढाल तलवार, क्षत्रियकुलावतंस, शिवप्रभू, छत्रपती, राजे अशी कॅलिग्राफिक डिमांड जास्त असते. फेस्बुकावरच्या वॉल्स म्हणा की वॉस्स्पवरचे डीपी अन स्टेट्स अन मेसेज. ह्या दिखाऊ वीरश्रीची अनेक रुपे दिसतात. फोटोशॉपसारखी अ‍ॅप्लिकेशन्स ह्यासाठी भरपूर राबवली जातात. कॅलिग्राफीसारखी कला दणकून पैसे मिळवते. लोकांना जोपर्यंत अशा बेगडी दागिन्यांची हौस राहणार तोपर्यंत हे चालूच राहणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या थोर आहेस , काय लिहिलेस ( मर्दा असं लिहायचा मोह टाळला , त्या शब्दाला जोडून येणार वाघ , सिंह , मुजरा वगैरे आठवून ) !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर प्रतिसाद.
तलवार ह्या प्रतीकाचा इतका अतिरेक चाललाय की उद्या लक्ष्मी आणि सरस्वतीसुद्धा भारतमातेसारख्या हातात तलवार घेतलेल्या दिसू शकतील. नयी आय्डिया म्हणून लक्ष्मीची तलवार कदाचित सोन्याची असेल आणि सरस्वतीच्या हातातली लेखणीच तलवारीच्या रूपात अवतरेल!
गेल्या एक दोन महिन्यांतल्या एका लग्नात पाहुण्यांची सरबराई करणारी ठेकेदाराची माणसे मावळ्याच्या वेषात होती. फेटा,कमरबंद वगैरे नवीन नाहीत. आजकाल दिसतात. पण या लोकांच्या कमरेला एक म्यानही लटकत होते. आता त्यात तलवार होती की नाही ते ठाऊक नाही.
आणखी म्हणजे काही लोकांत लग्नामध्ये कट्यार/सुरा/खंजीर व त्यावर लिंबू टोचलेले असे घेऊन दोन बाजूंना दोन नातेवाईक उभे असतात. कधी कधी एकच माणूस असतो.पण अलीकडे यांच्या हातात उपसलेल्या तलवारी असतात आणि त्या दोन्ही बाजूंना कमानीसारख्या धरून(शिंग फुंकताना दाखवतात तश्या)ते उभे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते कट्यार लिंबू वगैरे अगोदरपासूनच होतं. त्यात नवीन काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कट्यार वगैरे गोष्टी पाहिल्या आहेतच. पण उपसलेल्या नंग्या तलवारी नव्हत्या बघितल्या. कदाचित त्याही आधी होत्या असतील. माझ्या बघीवात नव्हत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रेंकीग न्यूज

थोड्याच वेळात उध्दव ठाकरे यांची सभा आहे.

सभा सुरु........

तुळजाभवानिची लेकरं
ढाण्या वाघ
खंजीर
हिंदु
लांड्या
अखंड महाराष्ट्र
बाळासाहेबांना श्रध्दाजंली
कट्टर मावळा कावळा
पाकड्या
वाघ-शेपूट-शिववडा-शिवबंधन
अफझलजखान
दिल्लीश्वर
तलवार
फौज
मनगटातील ताकत
स्वाभिमान
निधडी छाती
अंगार
शिवराय
मावळे-स्फुल्लिंग
ढेकूण-हिरा-ठिणग्या-मर्द
ज्वालामुखी
वाघझेप
स्वाभिमानाचा चुडा
छाताडे-मशाल-गंगोदक-वाटमारी
वाघनखे
वज्रमूठ
बलिदान
आहुती
बाप-वीर-फडशा
करून दाखवलं
मुंबईला तोडण्याचा डाव
सभा संपली ..
जय महाराष्ट्र
शिवसैनिक घरी चालेत..
अरे विकास???
तो मोदीजी आणि फडणवीस करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

वरचं सगळं मस्त आहे हो ... पण
>>अरे विकास???
तो मोदीजी आणि फडणवीस करतील. याला काय म्हणावं ? दुर्दम्य आशावाद का का अजून काही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्योक मारला हो बापट...
शिवसेनेनं कोणाच्या तोंडाकडे बघावं आता हे लोक सोडून? हा त्यातला विनोद.

आशावाद-बिशावाद काय नाय. काय्येक विकास होऊचंय नाय. मगी कोणेक सत्तेर येवां दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

I read this on Tarya's FB today.

word Kothala is missing.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उद्या लक्ष्मी आणि सरस्वतीसुद्धा भारतमातेसारख्या हातात तलवार घेतलेल्या दिसू शकतील.

भारतमातेच्या हातात तलवार???

पण... पण... पण... भारतमाता तर प्याशिफिष्ट वगैरे असते ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हांला नवरात्रातले भारतमातेचे देखावे पाहाण्याची संधी मिळालेली दिसत नाही. या माता चंडी किवा कालीप्रमाणे हातात शस्त्र घेतलेल्या असतात. अर्थात हे अलीकडचे वळण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद नविन काळातली मूल्ये कशी बेकार आहेत ते सांगतो. जस्ट रिसेंट पास्टच्या तुलनेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा प्रतिसाद जुन्या काळातील फडतूस स्युडोमूल्यांचे सरसकट कौतुक दर्शवतो. जस्ट वर्तमानकाळाच्या तुलनेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा प्रतिसाद जुन्या काळातील फडतूस स्युडोमूल्यांचे सरसकट कौतुक दर्शवतो. जस्ट वर्तमानकाळाच्या तुलनेत.

श्री. बॅटमन, योग्य शब्दाचा चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने वापर केल्याबद्दल आपल्याला कादानो बजावण्यात येत आहे. त्या शब्दाचा वापर काटकसरीने केला जावा व योग्य पद्धतीने केला जावा अशी अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लय भारी लिहिलंयस अभ्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

अभ्या, प्रतिसाद आणि मुळातलं निरीक्षण भारीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हाला तुमच्या क्लायंट लोकांची रुचि इतकी अप्रिय वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत (किंवा स्वतःसोबत) चिटिंग करत आहात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शहरात राहूनही शहरांना दररोज शिव्या देणार्‍यांनी दुसर्‍यांना उपदेश करणे हा अत्युच्च प्रकारचा फुरोगामी ढोंगीपणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतात राहून अमेरिकेचा जी डी पी भारतापेक्षा जास्त आहे म्हणणे चूक कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चुकीची तुलना. जीडीपी वगैरे फक्त ऑब्जेक्टिव्ह विधान आहे.

भारतात राहून भारतातले जीवन कसे झाटबराबर, अमेरिका कशी भारी, हा जप जे लोक आळवतात त्याचीच तुलना शहरात राहून शहराला शिव्या घालण्याशी होऊ शकते. किंवा स्वतः नास्तिक असलेल्यांनी इतरांना नास्तिकपणा बाळगणे कसे चूक आहे यावर लेक्चर देण्याशी. किंवा पाकिस्तानने टेररिझम कसा वाईट यावर लेक्चर देण्याशी. कारण इथे नुसत्याच शिव्या आहेत. कृती शून्य. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

===
बादवे 'शांत, शालीन, हातात शिवपिंड धारण केलेली अहिल्या ही ब्राह्मणी पितृसत्ताक पद्धतीतून तयार झालेली इमेज म्हणता येईल का? Blum 3 मग तर हातात तलवार घेऊन लढतानाचीच अहिल्या चांगलीय की!

आणि मला आठवतंय ते अहिल्या'बाई' होतं त्याचं देवी कधी झालं ;->

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

आणि मला आठवतंय ते अहिल्या'बाई' होतं त्याचं देवी कधी झालं ;->

कधी?
..........
बादवे, मला आठवतेय तेव्हापासून (म्हणजे माझ्या हायस्कूलाच्या दिवसांपासून तरी - सर्का १९७५-८१) शनवारात अहिल्यादेवी मुलींची हायस्कूल आहे ब्वॉ. (आमच्याच मुलांच्या हायस्कुलाची शिष्टर शाळा, म्हणून आम्हांस ठाऊक.) आणि, अधिक खोलात संशोधन केले असता (बोले तो, शाळेची पालकसंस्था जी डेएसो, तिच्या वेबसैटीवर जाऊन पाहिले असता. इतपतच खोलातले संशोधन आम्हांस झेपते. कारण, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, शेवटी आम्ही, इ.इ.) ती शाळा गेलाबाजार १९३९पासून तरी आहे, असे कळले. (तुमची आठवण तितकी जुनी आहे काय? ;-))
..........
बाकी, (म्हणायचेच म्हटले तर) डेएसो हा एक (बहुतांशी) भटांचा कारभार आहे, असे म्हणता येईलच म्हणा. (तत्त्वत: त्यात तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही, परंतु तरीही.)
..........
एक (अवांतर, परंतु) मौजेची गोष्ट: डेएसोच्या सैटीवर "In the year 1880, the late Shri V. K. Chiplunkar with Lokmanya Tilak and M. B. Namjoshi started 'New English School' in Pune with the objective of 'cheapening and facilitating education'." असे उघडउघडपणे म्हटले आहे. त्या शाळेचे अलम्नस असणाऱ्या आमच्या जिवंतात्म्यास काय वाटेल, त्याची पर्वा न करता. असो चालायचेच. त्या निमित्ताने सत्य (एकदाचे) बाहेर आले, हेही नसे थोडके. (अतिअवांतर: यासच 'फ्रॉयडियन स्लिप' की कायसेसे म्हणत असावेत काय?)
..........
फर्ग्युसन१अ कॉलेजाकरिता जागा म्हणून आपल्या इष्टेटीचा भलामोठा भाग दीर्घ मुदतीच्या लीज़वर उपलब्ध करून देणाऱ्या शिरोळ्यांसारखा एखाददुसरा सन्माननीय अपवाद वगळता. आणि, समबडी करेक्ट मी इफ आय याम रॉंग, पण, हे शिरोळे फर्ग्युसन कॉलेजात प्रोफेसरसुद्धा नव्हते काय?

१अ होय, आमच्यात 'फर्ग्युसन' असेच म्हणतात. (येस, वुई आर द म्हणिंग ऑफ द 'फर्ग्युसन'.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते अहिल्या'बाई' होतं त्याचं देवी कधी झालं

हेहेहेहे, सध्या हे दोन्हीपेक्षा 'राजमाता' हे संबोधन जास्त इन आहे. नंबरप्लेटांवर, रिअर विंडोवर राजमाता लिहिलेल्या अनेक गाड्या सोलापूर उस्मानाबाद भागात आढळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजमाता या शब्दास हसण्यासारखे काय आहे? अहिल्यदेवी हा शब्द इन्दुर भागात प्रचलित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता त्या हास्याचा अर्थ अभ्याच सांगू शकतील पण मला वाटतं ते हास्य उपरोधिक आहे की अरे लोकांनो तुम्ही देवी की बाई वर वाद घालत बसलाय ते नामकरण केव्हाच तिसरच म्हणजे "राजमाता" होऊन बसलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अहिल्यादेवी मुलींची हायस्कूल

या अहिल्या देवी म्हणजे होळकरच की आणखी कोणी?
आमच्या शाळेच्या (पक्षी- डॉ बेडेकर विद्या मंदिर) मातृसंस्थेने (पक्षी- विद्या प्रसारक मंडळ) सुमारे १९७५ च्या आसपास इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आणि तिचे नाव आनंदीबाई जोशी असे ठेवले. तेव्हा या आनंदी बाई जोशी म्हणजे भारताच्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई असणार अशी आम्हाला खात्री होती. नंतर त्या आनंदीबाई गोपाळ जोशी नसून आनंदीबाई केशव जोशी अशा शाळेस देणगी देणार्‍या कुणा केशव जोशींच्या पत्नी असल्याचे समजले. आता त्या शाळेला आनंदीबाई जोशी शाळा न म्हणता ए के जोशी शाळा म्हणतात. नाऊ देअर इज नो कनफ्यूजन.

: असा समज होण्याचे कारण त्या प्रथम डॉक्टर आनंदीबाई (गोपाळरावांशी लग्न झाल्यावर काही काळ) ठाण्याला रहात होत्या असे आनंदी-गोपाळ कादंबरीत वाचलेले होते
सध्या हायस्कूल म्हणतात. पूर्वी काय म्हणत ते आता आठवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या अहिल्या देवी म्हणजे होळकरच की आणखी कोणी? >> +१. ती रामाच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री बनणारी अहिल्यादेखील असू शकते. 'तुम्ही दगड आहात! आमच्या शाळेत शिकून मनुष्य बनाल' असा संदेश द्यायचा असेल.

अहिल्याबाई होळकर आणि अहिल्यादेवी होळकर दोन्ही गुगलून पाहिले 'बाई'च जास्त बरोबर आहे.

राजमाता हे जिजाबाईंसाठी वापरले जाते. जिजाई. जिजाऊ.

जर अहिल्याबाई -> अहिल्यादेवी -> राजमाता अहिल्या असे झाले असेल तर ते सेक्युलर -> ब्राह्मणीहिंदुत्ववाद -> मराठाहिंदुत्ववाद वाटतंय.

===
एनीवे फर्ग्युसन - शितोळे माहितीसाठी आभार. आत कोणी 'फुलेंना जागा देणारे भिडेच होते' टिमकवलं तर 'टिळकांना जागा देणारे शितोळेच होते' ठणकवता येइल.

फ्रँकली आपले, आपल्या कार्याचे प्रमोशन अँड मार्केटींग करण्यात मराठे कमी पडतायत असे वाटू लागले आहे. अन् ब्राह्मण स्वतःसाठीच इवलुसं कायतर करुन जोरजोरात ढोल बडवत सुटलेत. स्वकष्टाने..स्वबळावर.. केवळ गुणवत्तेच्या आधारे..कोणाकडून काडीचीही मदत न घेता..शुन्यातून सुरवात..आख्ख्या भारत देशाचा जीडीपी..... yeah right.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

आपल्या कार्याचे प्रमोशन अँड मार्केटींग करण्यात मराठे कमी पडतायत असे वाटू लागले आहे.

हे तर आहेच आहे शिवाय शिवाजीचं खोटंखोटं कौतुक मराठ्यांच्या भयाखातर करावं लागतं, आंबेडकरांचं खोटंखोटं कौतुक महारांच्या भयाखातर करावं लागतं असं देखिल लोकांना सुचवायचं आहे कि काय असं वाटतं. इतिहासकालीन ब्राह्मणांचं कौतुक करणं देखिल निषिद्धच मानलं जातं. या ढोलवाल्यांना वैचारिक मागासच समजलं जातं. देव करो मला वाटतं ते खोटं असो पण असं मला वाटतं खरं. म्हणजे जे काय मार्केटींग आणि प्रमोशन चाललं आहे ते देखिल प्रॉडक्ट फूगवून , बढवून चाललं आहे असा अभिव्यक्तिचा सूर दिसतो. याचाही कहर म्हणजे भारतीय लोकांचे, मग ते कोण्या का जातीचे असेनात, कर्तृत्वच नव्हतं असा नविन विचार अत्यंत सबलपणे मांडला जातो.
===================
फुले, भिडे, टिळक, शितोडे ही सात्त्विक वृत्तीची माणसं असावित. त्यांच्या जातीय अस्मिता होत्या असं मानलं तरी त्या अस्मितांना एक सन्मान्यता आहे असे वाटते. मात्र 'फुलेंना जागा देणारे भिडेच होते' असं वा 'टिळकांना जागा देणारे शितोळेच होते' असं टिमकावणारे वा ठणकावणारे त्यांच्या वंशजांच्या त्याच अस्मिता तुलनेने हिन वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिवाजीचं खोटंखोटं कौतुक मराठ्यांच्या भयाखातर करावं लागतं, आंबेडकरांचं खोटंखोटं कौतुक महारांच्या भयाखातर करावं लागतं असं देखिल लोकांना सुचवायचं आहे कि काय असं वाटतं.

हे नक्की काय आहे? की उचलली बोटे अन दाबला कळफलक असं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जे लोक आंबेडकर आणि शिवाजी यांचे फोटो घरात, ऑफिसमधे लावतात त्यांना मी सहज त्याकडे पाहून एक दोन गोष्टी विचारतो. त्यावर 'आजकाल टिकून राहायचे तर हे आवश्यक झाले आहे' असे म्हणायचे आहे कि काय असे उत्तर येते. माझं आडनाव जोशी असल्यामुळे समोरच्याला मी ब्राह्मण आहे हे पटकन कळतं, शिवाय त्याला स्वतःची जात बहुधा माहित असतेच. म्हणून तो (एक विशिष्ट अंतर राखून का होइना) सूचक उत्तर देतो. हे माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे. 'शिवाजीबद्दलच "बोलता" येत नाही" ही रड बुद्धीप्रामाण्यवादी, वैचारिक इ इ लोकांची असते. 'मराठ्यांबद्दल "बोलता" येत नाही' ही रड अन्य सामान्य लोकांची असते.
===========
माझी व्यक्तिगत निरीक्षणे म्हणजे समाज नव्हे. तुमचं काय वेगळं मत असेल तर आदर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पैकी कैकांचे मत आंबेडकरांबद्दल असेच आहे याच्याशी सहमत. शिवाजी महाराजांबद्दलही असे कुणाचे मत असेल पण ते मराठ्यांच्या द्वेषामुळेच त्यातल्यात्यात. मराठाज़ आर नॉट मेकिंग सिच्वेशन एनी बेटर आयदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

फुले, भिडे, टिळक, शितोडे ही सात्त्विक वृत्तीची माणसं असावित.

'टिळकांना जागा देणारे शितोळेच होते'

बाकी, या धाग्यावर शिरोळ्यांच्या आडनावाची इतकी विविध (आणि चुकीची! 'शितोळे' काय, 'शितवळे' काय नि 'शितोडे' काय.) व्हर्जन्स ऐकली, की त्यावरून ब्यांका कास्ताफियोरे आणि क्याप्टन ह्याडक यांची आठवण आली. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ्रँकली आपले, आपल्या कार्याचे प्रमोशन अँड मार्केटींग करण्यात मराठे कमी पडतायत असे वाटू लागले आहे.

ब्रिगेडादि लोकांचा प्रोपोगंडा ज्या सातत्याने आणि व्यापकपणे चालतो ते पाहता वरील विधान अतिशय शंकास्पद ठरते. पेशवाई कशी वाईट, ब्राह्मणच कसे मुख्य कल्प्रिट, इ.इ. कल्पना बहुतेकांच्या मनावर ठसवण्यात ब्रिगेडी यशस्वी झालेले आहेत. उलट ब्राह्मणच त्या तुलनेने मागे पडताहेत. कारण त्यांना मराठे, दलित आणि लिबरल अशा तीनही आघाड्यांवर सामना द्यावा लागतो. बाकीच्यांना तो प्रॉब्लेम नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिरोळे (आधीच्या प्रतिसादात नाव चुकलं) आणि त्यांच्यासारखेच इतर मराठा, ज्यांची नावंदेखील कोणाला माहीत नसतात, पण ज्यांनी जातीधर्म न पाहता सगळ्याच समाजाच्या भल्यासाठी प्रचंड काँट्रीब्युशन केलंय अशांचे कार्य, विचार प्रअँमा करावेत म्हणतेय मी! ब्रिगेडचा ब्राह्मणविरोध कुठून आणला मधेच? आणि उगाच विक्टीम कार्ड कशाला? सध्या BJP, RSSचीच चलती आहे. आणि ते हिंदुत्ववादाच्या नावाखाली ब्राह्मणवादच प्रअँमा करतायत.

Brigade = Maratha mhanayache asel tar Brahmin = Sanatan mhanave lagel. Aani Brigade chya aadhi kadhich brahmanana shivya padalya nahit ka?

बाकी शिवाजीबद्दल सर्वच जातीच्या लोकांना कौतुक, आदर बर्याच काळापासून आहे. आणि ज्यांना तो नाहीय त्यांनादेखील आपापली आवडनिवड जपण्याचा हक्क आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

शिरोळ्यांचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर तो तुमचा इन्गोरंस आहे. फर्ग्युसनची जागा शिरोळ्यांची आहे हे कॉनम ज्ञान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किंवदंता अशी आहे की सध्या मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या फर्ग्युसन-मॉडर्न सारख्या शिरोळ्यांच्या पूर्वीच्या जागांचे भाव आता सोन्याहून जास्त झालेत आणि त्याचा शिरोळ्यांना (म्हणजे वारसदारांना) आणि त्यातून मिळू शकणार्‍या व्यावसायिक नफ्याचा पुण्यातल्या यच्चयावत बिल्डरांना मोह सुटलाय. फर्ग्युसनचं लीज कधीच संपलंय, प्रकरण कोर्टात आहे बहुतेक. प्रोएसोचं (मॉडर्न) लीज बहुधा पुढच्या दशकात केव्हा तरी संपणारे. सगळ्या लीजधारकांना रीतसर कायदेशीर नोटिसा पाठवल्यात शिरोळ्यांनी. ऐकीव माहिती अशी आहे की साल २००८-९ सालापर्यंत मोकळं असलेलं मॉडर्नचं ग्राऊंड (कॉलेज आणि शाळा दोन्हीचं) अचानक निरनिराळ्या कॉलेजच्या (लॉ, मॅनेजमेंट वगैरे) इमारतींनी भरण्यामागेही हेच कारण आहे. खखोदेजा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या फर्ग्युसन-मॉडर्न सारख्या शिरोळ्यांच्या पूर्वीच्या जागांचे भाव आता सोन्याहून जास्त झालेत आणि त्याचा शिरोळ्यांना (म्हणजे वारसदारांना) आणि त्यातून मिळू शकणार्‍या व्यावसायिक नफ्याचा पुण्यातल्या यच्चयावत बिल्डरांना मोह सुटलाय.

बिल्डरांचे तूर्तास एक वेळ सोडून द्या, परंतु शिरोळ्यांच्या वारसदारांनी आपल्या मालमत्तेची चालू बाजारभावाने हवी तशी विल्हेवाट लावून येणार्‍या प्रोसीड्सचा हवा तसा उपभोग घेण्याचे ठरवले, तर त्यात नक्की काय गैर आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवश्य प्रमोट करावे कार्य. नको कोण म्हणतंय?

आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद-- म्हणजे नक्की काय? ब्राह्मणेतरांची मुस्कटदाबी होतेय का त्यात? किंवा कमी प्रतिनिधित्व वगैरे आहे काय?

मुद्दा इतकाच की आपण लिबरल असल्याचे ब्राह्मणांना कायम प्रूव्ह करत बसावे लागते, ब्राह्मणेतर म्हणजे बाय डिफॉल्ट नाही रे वाला असतो असे पर्सेप्शन आहे सबब त्यांना त्याचे टेन्शन नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Dhere na je mahitiy te common gyaan aahe. Amy la je mahit nahi to ticha ignorance aahe. >> Thanks for this info.

Marathayani apale contribution promote karave mhanale tar 'brigade dalit liberal brahmanala badawatat' chalu karayach. aani var 'नको कोण म्हणतंय? ब्राह्मणेतरांची मुस्कटदाबी होतेय का त्यात? किंवा कमी प्रतिनिधित्व वगैरे आहे काय?'

घाटावरचे भट >> Calling Gabbar.

===
Anyway tata. Tumach chalu dya.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

@Amy : >>>Dhere na je mahitiy te common gyaan aahe. Amy la je mahit nahi to ticha ignorance aahe. >> Thanks for this info.

पुण्यात बऱ्याच जमिनी असणारी जुनी पाटील घराणी आहेत. , शिरोळे पाटील , बहिरट पाटील , शितोळे पाटील , खिलारे पाटील वगैरे .
कुठल्या भागात त्यांच्या खूप जमिनी होत्या हे पूर्वीपासून पुण्यात राहणाऱ्या लोकांना माहिती आहे . तुम्ही पुण्यातील नसलात तर माहिती नसेल एखाद्या वेळी , तर त्रागा का करताय ?
तसेच पूर्वापार काही भटांच्या जमिनी होत्या , त्याही लोकांना माहिती आहेत . पंडित , पंत वगैरे
शिरोळे पाटलांनी उदात्त हेतूने , मोठ्या मनाने , काही देशप्रेमी मंडळी शिक्षणसंस्था काढत आहेत म्हणून ती जमीन दिली असावी . मला नक्की माहित नाही पण एसपी कॉलेज ची जमीन सुद्धा बहुधा पंडितांची असावी .
त्याकाळी बहुधा शिक्षण क्षेत्र हे महत्वाचे व पवित्र समजले जात असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठे कमी मार्केतींग करतात नि ब्राह्मण व्हिक्टमहूड* करतात या (अमेझिंग) अ‍ॅमीच्या म्हणण्याला सहमती.
===========
ऐसीसारख्या साईटवर कोण्या एका मुलीने एका लेखात ब्राह्मणी हा शब्द निगेटीव अंगाने वापरला तेव्हा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कायम इतरा़ंकडून टीकाच होते तेव्हा व्हिक्टिमहूड मेंटॅलिटी येणारच. ते दलित असोत किंवा ब्राह्मण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+2

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

बापट, त्रागा कसला आलाय त्यात?

अजो, थँक्स Smile

===
या सगळ्यातली गंमत लक्षात येतीय का कोणा त्रयस्थ निरीक्षकाच्या?

आधीच साडेतीन टक्के > त्यातले पुण्यात राहणारे > त्यातल्या काहींना शिरोळेंबद्दल माहिती आहे (त्यांच्या मते हे कॉमन ग्यान आहे आणि हे माहीत नसणारे इग्नोरंट लेसर मॉर्टल्स आहेत. ते एक असो) > पण या माहितीचा उपयोग कशासाठी केला जातोय? तर शिरोळेंच्या वारसांना हाव सुटलीय हे सांगायला.

:-O ऑ? वापरली ना इतकी वर्ष जमीन? तिचं भाडं मार्केटरेटने वाढत होतं का दरवर्षी?
आणि एवढाच जर कळवळा असेल तर फर्ग्युसनच्या अॅल्मनीनी एकत्र यावं (स्पेशली दोज व्हु फ्लाँट स्वकष्टाने स्वबळावर अँड ऑल दैट) आणि करंट मार्केटरेटने ती जमीन विकत घ्यावी शिरोळ्यांकडून + जुन्याच T&Cवर जुन्याच भाड्याने पुढील शंभर वर्ष द्यावी. ते काही करणार नाही फक्त स्वतःचा ढोल आणि इतरांची हाव सांगत फिरणं एवढं मात्र जमतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

ऍमी ,
गंमत आहे .
">>काहींना शिरोळेंबद्दल माहिती आहे. त्यांच्या मते हे कॉमन ग्यान आहे आणि हे माहीत नसणारे इग्नोरंट लेसर मॉर्टल्स आहेत. ते एक असो ?? पुण्यात पहिल्यापासून राहणाऱ्या बऱ्याच लोकांना ( तुमच्या भाषेत , साडेतीन , एकोणीस , आठ , तेहेतीस जे काही आवडतील ते आकडे लिहा ) आमचे शिरोळे पाटील , त्यांच्या जमिनी वगैरे हे खरेच कॉमन ज्ञान आहे . त्याला काय करणार ?

वैयक्तिक मत असे , ती जमीन हा शिरोळें पाटलांच्या ( मूळ जमीन मालकाच्या ) वंशजांचा प्रश्न आहे , त्यांनी काय करावे .
हे लिहितानाच असे पण वाटते कि सर्व शिक्षण संस्था ज्यांनी सवलतीच्या दरात सरकारकडून जमिनी घेऊन नंतर व्यावसायिक दराने शिक्षणसंस्था चालू केल्या त्यांनीही सरकारला व्यावसायिक दराने जमिनीचे पैसे द्यावे ( उदा . DY , भारती , सिम्बायोसिस , आणि अजून कोण असतील ते )

हे सगळंच खूप अवांतर होतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'टिळकांना जागा देणारे शितोळेच होते' ठणकवता येइल.

अ‍ॅमीच्या या धमकीमुळे विकिपिडियावर जाऊन बघितले आधी की माझ्या कॉलेजला पण जागा शितोळ्यांनी दिलीय की काय? पण तशी काही माहिती मिळाली नाही.
पण थोडी रोचक माहिती मिळाली. आता माझे कॉलेज "सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी"शी संलग्न आहे अशी नवीन माहिती कळली.
ही कुठली नवीन युनिव्हर्सिटी, म्हणून शोध घेताना कळले की तीच ती पूर्वाश्रमीची "युनिव्हर्सिटी ऑफ पुणे" जी आधी "युनिव्हर्सिटी ऑफ पूना" होती.
म्हणजे वरच्या एका मुद्द्यातून जरा नवीन माहिती तरी कळली. आता "सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी"चे नाव बदलून ""सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी" केले की कसे छान छान आणि सुटसुटीत वाटेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>"युनिव्हर्सिटी ऑफ पुणे" जी आधी "युनिव्हर्सिटी ऑफ पूना" होती.

हे कधीचं हो? माझ्या माहितीप्रमाणे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ होईपर्यंत युनिव्हर्सिटी ऑफ "पूना" च होती. १९८४ मध्ये मी बाहेर पडलो तेव्हा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग "पुणे" असलं तरी युनिव्हर्सिटी पूनाच होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पूना चं पुणे झालेल बरच आधी. दोन वर्षांपूर्वी सा.फुलेंचं नाव अ‍ॅड झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अ‍ॅमीच्या या धमकीमुळे विकिपिडियावर जाऊन बघितले आधी की माझ्या कॉलेजला पण जागा शितोळ्यांनी दिलीय की काय?

शितोळे नाही, शिरोळे. पण ते एक असो.

तीच ती पूर्वाश्रमीची "युनिव्हर्सिटी ऑफ पुणे" जी आधी "युनिव्हर्सिटी ऑफ पूना" होती.
म्हणजे वरच्या एका मुद्द्यातून जरा नवीन माहिती तरी कळली. आता "सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी"चे नाव बदलून ""सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी" केले की कसे छान छान आणि सुटसुटीत वाटेल.

पुणे विद्यापीठाचे पुनर्नामकरण 'सावित्रीबाई फुले विद्यापीठ' असे केल्यास त्यात नक्की काय गैर आहे?

(मुळात पुनर्नामकरणच कशासाठी करायचे, हा मुद्दा असल्यास गोष्ट वेगळी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शितोळे नाही, शिरोळे. पण ते एक असो.

शिरोळ्यांपैकी कमीत कमी एकाची सासुरवाडी शितोळे आहेत. ज्याची सासुरवाडी शितोळे आहे तो माझा फार पूर्वीचा मित्र आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...त्याचा इथे संबंध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा- अश्या प्रतिसादांना "माहितीपूर्ण" श्रेणी द्यायची असते.

खरं सांगा, तुम्हाला माहिती मिळाली नाही का नविन? अजुन सांगते.

शितोळे हे मराठा साम्राज्याच्या सरदारांपैकी होते. त्यांची बारामतीला जमिन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे सगळं पेपरात आलेल माझ्या आठावणीने. की डे,ए.सो ला नोटीस वगैरे सो हे सामान्य ज्ञान आहेच. आणि समजा शिरोळ्यांच्या पूर्वजांनीच ती विकत घेतलेली नसेल जमीन तर? इनाम, वतन म्हणून मिळाली असेल तर आज का बाजारभाव द्यावा त्याला लोकांनी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओ , ढेरेशास्त्री , तुम्ही पण आता काय वाढवताय उगा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इफ माय मेमरी सर्व्ज़ मी रैट्ट, लीज़चे पुनर्नवीकरण करायचे असल्यास फ.कॉ.चे पुनर्नामकरण '(दादासाहेब?) शिरोळे कॉलेज' किंवा असे काहीतरी करावे, अशीही काही मागणी शिरोळ्यांच्या वंशजांनी सुरुवातीस केली होती, असे ऐकिवात आहे. त्याचेही पुढे काही झाले नसावे.

(यात अडचणीचा मुद्दा मला एवढाच दिसतो, की जागा वारसाहक्काने शिरोळ्यांच्या वंशजांची आहे, त्यांनी लीज़ वाढवावा वा न वाढवावा अथवा मालमत्तेची अन्य कोणत्या पद्धतीने विल्हेवाट लावावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, इथवर मान्य होण्यासारखे आहे; त्यात वादाचा प्रश्न (निदान माझ्या मते) नसावा. त्याहीपुढे जाऊन, (जागा त्यांच्या मालकीची असल्याकारणाने) तिचा कंटिन्यूड वापर करण्यासाठी काही नवा करार करताना आपणांस योग्य वाटतील त्या अटी घालण्याचा प्रयत्न करणे हेही शिरोळे-वंशजांच्या अखत्यारीत निश्चितच आहे, ते जनरीतीस अनुसरूनही आहे. पण, बाय द सेम टोकन, फ.कॉ. हे (भले त्याची जागा नसली तरी) डे.ए.सो.च्या मालकीचे आहे, सबब त्याचे नाव काय ठेवावे (पर्यायाने, शिरोळे-वंशजांची ही मागणी मान्य करावी की नाही), हा सर्वस्वी डे.ए.सो.चा प्रश्न आहे.

बाकी, तो जागेचा डिस्प्यूट हा सर्वस्वी शिरोळे-वंशज, डे.ए.सो. आणि कोर्ट यांच्यातला आपसातला मामला असण्यास हरकत नसावी.
..........

या 'दादासाहेब' नेमक्या शब्दाबद्दल खात्री नाही. पण 'शिरोळे कॉलेज' एवढे निश्चित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडला प्रतिसाद.

बाकी, तो जागेचा डिस्प्यूट हा सर्वस्वी शिरोळे-वंशज, डे.ए.सो. आणि कोर्ट यांच्यातला आपसातला मामला असण्यास हरकत नसावी. >> +1.

===
बाकीच्यांनाही इथेच एकत्रित उत्तरं:

माझ्या ओळखीतल्या, पुण्यात (पेठ आणि आसपास/हडपसर/खराडी/पिंचि वगैरे) जन्मलेल्या+वाढलेल्या, वेगवेगळ्या जातीच्या १५जणांना विचारलं की 'फर्ग्युसनची जमीन कोणाची आहे हे गुगल न करता सांगु शकता का?' ९जणांनी उत्तर दिलं की 'नाही. माहीत नाही.' बाकीच्यांची उत्तरं यायची आहेत. त्यामुळे 'काहींच्यामते जे कॉमन ग्यान आहे दैट इज नॉट सो कॉमन'.

बाकी 'आमचे शिरोळे पाटील', 'काही आवडतील ते आकडे' वगैरे वाचून ब्याट म्हणतो ते पटलं...

DY, भारती, सिम्बी वगैरेंची जमीन सरकारी असेल तर ते ५०% आरक्षण इंम्प्लिमेंट करुन त्याची भरपाई करतात.
व्यवसायिक दराने शिक्षणसंस्था म्हणजे वाट्टेल ती फी सगळ्या विद्यार्थ्यांना लावतात का? मला वाटतं फी सरकारकडून अप्रुव करुन घ्यावी लागते. आणि फक्त २०% जागा विकल्या जातात; बाकीच्या नानफानातोटा असतात.
सरकारकडून जमीन घेऊन उभारलेल्या खाजगी कंपन्यांचं काय? टाटा, गोदरेज, पतांजली वगैरे.
परवा ऐसीवरच 'कर्नाटकात भुमि'कुत्र्यां'ना आरक्षण' वगैरे वाचलं. चाकणमधली गावगुंड वगैरे चर्चा...

येस. खूपच अवांतर होतंय. एनी प्रॉब? असेल तर रिप्लाय देऊन हातभार लावू नका Wink

===
शिरोळ्यांच्या पुर्वजांना ती जमीन इनाम, वतन म्हणून मिळाली असेल तर आज लोकांनी त्यांना बाजारभाव का द्यावा हा प्रश्न रास्त आहे. पण जर आत्तापर्यंत इतर इनाम/वतनदारांना बाजारभाव मिळाले असतील तर केवळ या केसमधे जमिनीवर कॉलेज आहे म्हणून शिरोळ्यांना बाजारभाव नाकारता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

माझ्या ओळखीतल्या, पुण्यात (पेठ आणि आसपास/हडपसर/खराडी/पिंचि वगैरे) जन्मलेल्या+वाढलेल्या, वेगवेगळ्या जातीच्या १५जणांना विचारलं की 'फर्ग्युसनची जमीन कोणाची आहे हे गुगल न करता सांगु शकता का?' ९जणांनी उत्तर दिलं की 'नाही. माहीत नाही.' बाकीच्यांची उत्तरं यायची आहेत. त्यामुळे 'काहींच्यामते जे कॉमन ग्यान आहे दैट इज नॉट सो कॉमन'.

(पंधरा हा स्यांपलसेट तसा खूपच लहान वाटतो, परंतु तूर्तास तो ग्राह्य धरू. प्रश्न स्यांपलसैझपेक्षासुद्धा कदाचित स्यांपलसेटच्या प्रातिनिधिकत्वाचा असावा.)

बोले तो, वरील निरीक्षण हे साधारणत: 'आजच्या पिढीच्या एकंदर अनास्थे'च्या अगेन्स्ट चॉकअप करता यावे काय? (आस्था का असावी - किंवा असलीच पाहिजे का - हा स्वतंत्र मुद्दा असू शकतो.)

बोले तो, आजमितीस जे ४५/५०+ क्याटेगरीत आहेत, आणि त्यांपैकीसुद्धा विशेषेकरून जे काही पिढ्यांपासून पुण्यात आहेत, अशा गोटांत हे बहुधा खरोखरच कॉमन नॉलेज असावे. कदाचित पुढील पिढ्यांमध्ये त्याबद्दल तितकेसे सोयरसुतक राहिले नसावे, असेही असू शकेल. (अवांतर: ढेऱ्यांचा वयोगट मला ठाऊक नाही.)

तुमच्या स्यांपलसेटचे वयोमानपरत्वे डिस्ट्रिब्यूशन काय असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिरोळ्यांच्या पुर्वजांना ती जमीन इनाम, वतन म्हणून मिळाली असेल तर आज लोकांनी त्यांना बाजारभाव का द्यावा हा प्रश्न रास्त आहे.

शिरोळ्यांना ती जमीन बाबा आदमच्या जमान्यात इनाम म्हणून मिळाली, की त्यांनी ती विकत घेतली, वा अन्य प्रकारे मिळवली, याचा त्यांनी आज ती (त्यांच्या वैध मालकीची असलेली) जमीन चालू बाजारभावाने विकण्याशी नक्की काय संबंध आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारकडून जमीन घेऊन उभारलेल्या खाजगी कंपन्यांचं काय? टाटा, गोदरेज, पतांजली वगैरे.

विक्रोळीमधील सर्व जमीन गोदरेजच्या मालकीची आहे जी त्यांनी फार पूर्वी विकत घेतली आहे, हे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छितो. १००% खात्री नसेल तर कृपया चुकीची माहिती देऊ नये, इतके सांगून खाली बसतो.

अधिक माहितीसाठी: The industrialist Godrej family acquired its land in the eastern suburbs sometime in the early 1940s from the Bombay high court receiver. This land was originally given by the East India Company to Parsi merchant Framjee Banaji in the 1830s and came up for sale in 1941-42. After acquiring this land, the Godrejs started buying adjoining plots by negotiating with 200 plot owners. In the past decade, the Godrej Group has become one of the leading real estate players in Mumbai because of its sprawling land holdings.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ओळखीत (ie फेसबुकात) प्रॉपर पुण्यातली तेवढीच लोकं आहेत ओ. एकुणेक व्यक्तीला विचारलं. वयोगट ३५ ते ४५. ढेरे माझ्यापेक्षा खूप लहान आहे; ३०च्या आसपास. बादवे अपडेट हे की पिंचितल्या ३ मराठ्यांना शिरोळे माहितीयत. पण फक्त नाव. एकाला लीजबद्दलदेखील माहिती आहे. जास्त डिटेल माहिती/मत: केस, मोह, बिल्डर वगैरे नाही.

===
शिरोळ्यांना ती जमीन बाबा आदमच्या जमान्यात इनाम म्हणून मिळाली, की त्यांनी ती विकत घेतली, वा अन्य प्रकारे मिळवली, याचा त्यांनी आज ती (त्यांच्या वैध मालकीची असलेली) जमीन चालू बाजारभावाने विकण्याशी नक्की काय संबंध आहे? >> याच्याशी सहमत आहे. जर इमान, वतन असेल तर ते फार पुर्वीचं (ब्रिटीशपुर्व) असणार. पण सोयीस्कररित्या तो मुद्दा उकरुन काढला गेला. इथे शिरोळ्यांनी स्वतःहून जमीन दिली त्याचं कौतुकतर नाहीच वर 'कशाला पायजे बाजारभाव?' प्रश्न. पण तेच कुळकायद्यात आमची जमीन गेली तो मात्र फार अन्याय... परवा जंतुंनी फुलेंचा लेख शेअर केलेला त्यात साधारण जो विचार होता तो पटला. ब्राह्मण खरंच फैक्ट्स फार ट्वीस्ट करतात स्वतःला हवे तेव्हा हवे तसे.

===
आभार उदयकाका. ते नाव मुद्दामच टाकलेलं अधिक माहिती तुमच्याकडून आयती मिळणार याची खात्री होती ;-).

===
नितिन, हो हो सध्यातरी सकाळ न वाचताच सकाळ बरी जाते Biggrin (पण हे खरंय की मी पेपर वाचणं सोडून दिलंय गेली काही वर्ष).

हौ ना राव! लोकांना काय काय खबरबाता असतात आणि त्या लक्षात राहतात. ते एक अचंबीतच करतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

ए बाई मी आहे की गं प्रॉपर पुण्यातली + तुझ्या फ्रेन्ड लिस्टमध्ये. मला नाही विचारलस ते Smile
पण एनीवे मला माहीत नव्हतेच.
____
हां प्रॉपर सदाशिव/नारयण्/शनिवार पेठेतली नाही मी स्वच्छ आणि सुंदर, काळजीपूर्वक निगुतीने राखलेल्या कॅन्टॉन्मेन्ट एरीयातील आहे. (शिंदे छत्री भाग)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजेच वानवडीतल्या आहात, पुण्यातल्या नव्हेत. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा खरय. पण शाळा प्रॉपर पुण्यातली रे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वतःहून दिली तर परत का मागतायत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कारण ते आधुनिक काळातील कर्णाचे अवतार नाहीत म्हणून Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्ष वर्षांसाठी दिली होती. क्ष वर्षे संपल्यावर मागणे/रिनिगोशिएट करणे काही चुकीचे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शुचि, तू इथेपण आहेसच की. प्रॉपर पुण्यातले आणि इथे नसलेले १५जण आहेत. मला वाटतं माझा सँपल साइझ कमी असला तरी ठिकाणं+जाती यांच्यातली विविधता राखून आहे. त्यामुळे 'कॉमन'ला जास्त इन्क्लुजीव.

===
खरंय. एफ्सी म्हणजे चिकण्या पोरी हीच माहिती 'कॉमन' आहे.

===
ब्याट, केपी-कँप आउटऑफ रीच आहे रे. तिथे दडपण येतं. एफ्सी त्यामानाने बरे.

===
अनुप, सिरीयसली! जागामालक आणि भाडेकरु हा मुद्दा बर्याचदा ऐसीवर आलाय. नेहमीच, सगळ्यांनीच मालकांचे हक्क मान्य केलेत. आणि इमोशनल अत्याचार, नैतिकता वगैरे मार्गांनी त्यांच्यावर दडपण आणतात, अन्याय होतो हेदेखील मान्य केलंय. त्यात तूदेखील होतास. मग उगाच इथे (शिरोळे' आहेत म्हणून?) वेगळा स्टँड कशाला?

शिरोळेंची 'कॉलेजच नाव बदला' वगैरे मागणीदेखील अतिशय रास्त आहे.

===
एनीवे मला वाटतं आता धाग्यावरुन रजा घ्यावी. जाताजाता मुळ विषयाबद्दल:

* उदयनराजे शिवाजींचे वारस आहेत का - हो आहेत!

* केवळ याच एका मुद्यामुळे त्यांना मान मिळावा का - ते ज्यानेत्याने ठरवावं. लोकांना जर ते महत्वाचं वाटत असेल तर देतील मान. विचारवंतांनीमात्र असहिष्णूपणा जरा कमी केला तर बरं असं वाटतं Wink

* उदयनराजेंनी त्या मुद्द्याच भांडवल करावं का - ऑफकोर्स करावं. राजकारणात प्रवेश करताना सुरवातीला या मुद्द्यावर एंट्री, रेक्गनिशन वगैरे सोप्पं जाइल. पुढे काम कसं करतायत त्यावरुन टिकतील न टिकतील.

* बातमी वाचली नाही. पण कोणालातरी उंदीर म्हणले म्हणून त्यांना पुर्ण डिस्कार्ड करावे का - अजीबात नाही. इथे गर्दभश्रोणी वगैरे म्हणलेलं चालतं, चानचान असतं; उंदीर त्यामानाने फारच सौम्य. संस्कृताळलेल्या शिव्या दिल्या की सुसंस्कृत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

>>हे सगळं पेपरात आलेल....

अ‍ॅमी यांना पुण्यात राहून "सकाळ" न वाचतासुद्धा शौचाला होते वाट्टं.
अ‍ॅमी या पुण्यात राहूनसुद्धा "सकाळ" न वाचण्याचा गंभीर गुन्हा करत असाव्यात. या गुन्ह्याला माफी नाही......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Dhere na je mahitiy te common gyaan aahe. Amy la je mahit nahi to ticha ignorance aahe. >> Thanks for this info.

अगदी तसे नाही. बोले तो, ढेऱ्यांचे एक वेळ सोडून द्या. (बोले तो, नक्की खात्री नाही, परंतु ते बहुधा पिढीजात पुणेकर असावेत, असे वाटते. चूभूद्याघ्या. त्यामुळे त्यांना ते कॉमन नॉलेज वाटत असल्यास कदाचित ते साहजिक असू शकते. ते सोडून देऊ.) परंतु ही गोष्ट मलासुद्धा ठाऊक आहे. आता, माझ्यासारख्या जातिवंत इग्नोऱ्यामसाससुद्धा जी गोष्ट ठाऊक आहे (आणि ठाऊकच नव्हे, तर आजूबाजूच्या आम पब्लिकलासुद्धा ठाऊक आहे हे ठाऊक आहे), ती साधारणत: 'कॉमन नॉलेज' या सदरात मोडायला हरकत नसावी, नाही काय?

दुसरी गोष्ट, इग्नरन्समध्ये नक्की काय वाईट आहे? समजा, एखादी गोष्ट (अगदी चारचौघांना माहीत असलेली, कॉमन नॉलेज असलेलीसुद्धा एखादी गोष्ट) मला ठाऊक नसेल, तर त्यात नक्की काय गैर आहे? जगातली प्रत्येक गोष्ट मला कशी ठाऊक असेल? जगातल्या प्रत्येक गोष्टीचे अधिकृत ज्ञान मला जर उपजत आणि ऑपॉप होऊ लागले, तर माझ्यात आणि (केवळ उदाहरणादाखल, से) चिंतातुर जंतूत नक्की काय फरक राहिला? आँ?

..........

एक तर, (अ) पुणे ३०मध्ये लहानाचा मोठा झालो असलो, (ब) आयुष्यातला भारतातल्या वास्तव्याचा बहुतांश भाग पुण्यात (आणि त्यातलासुद्धा बहुतांश पुणे ३०मध्ये) घालवला असला, आणि (क) पुण्याव्यतिरिक्त भारतातल्या इतर कोठल्याच ठिकाणाशी 'माझे गाव' म्हणून आयडेंटिफाय करू शकत नसलो, तरी मी पिढीजात (किंवा फॉर द्याट म्याटर जन्मजातसुद्धा) पुणेकर नव्हे. एक तर माझा जन्म पुण्यातला नाही, आणि आईवडिलांपैकी कोणीही मूळचे पुणेकर नाही. साधारणत: दीड किंवा दोन वर्षांचा असताना आईवडिलांबरोबर पुण्यास प्रथम स्थलांतरित झालो, आणि वयाच्या साधारणत: चौथ्या वर्षी पुणे ३०मध्ये स्थायिक झालो. त्यामुळे, पुणेकर असूनदेखील पुण्यात तसा मी उपरा इमिग्रंटच. शिवाय, जगात कोठेही गेलो तरी आपण राहतो त्या जागेच्या आसपासच्या इतिहासादिविषयक माझ्या सामान्यज्ञानाचा एकंदर अभाव हा तसा पहिल्यापासून लेजेंडरी आहे. त्यामुळे एखाद्या बाबतीत चुकून थोडीफार वरवरची माहिती असलीच, तरी ज़िक्र करायला चाचरतो. कारण चुकून खोलात जायची वेळ आलीच, तर वाट लागायची शक्यता असते. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सुमारे साडेत्रेपन्न वर्षांपासून ठाण्याचा रहिवासी आहे. पण माझ्या ओळखीतले अनेक लोक ठाण्यातल्या ठिकाणांविषयी लोकांविषयी ज्या गोष्टी बोलतात त्या मला मुळीच ठाऊक नसतात.

तेव्हा अमुक वर्षे पुण्यात राहिल्याने फर्ग्युसन कॉलेजची जमीन शिरोळ्यांची असणे माहीतच असायला हवे असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेव्हा अमुक वर्षे पुण्यात राहिल्याने फर्ग्युसन कॉलेजची जमीन शिरोळ्यांची असणे माहीतच असायला हवे असे नाही.

अर्थात!

मुद्दा एवढाच आहे, की तुम्हाला काय किंवा मला काय, एखाद्या ठिकाणी अनंत वर्षे राहूनसुद्धा आजूबाजूच्या अनंत ठिकाणांबद्दल माहिती नसू शकते. (ते तुमचे नि माझे प्रेरॉगेटिव आहे. ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्याबद्दल वाद नाही.) परंतु म्हणून आजूबाजूच्या आम जनतेत ते सामान्यज्ञान असू नये, असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फर्ग्युसन कॉलेजमधे अत्यंत चिकन्या पोरी शिकायला असतात ही माहिती त्यामानाने खूप कॉमन असावी.
=================
बाय द वे, फर्गुसन कॉलेजचा क्लेम टू फेम काय आहे म्हणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाय द वे, फर्गुसन कॉलेजचा क्लेम टू फेम काय आहे म्हणे?

१. ते पुण्यातले आहे
२. तिथे कोणे एके काळी स्वातंत्र्यवीर सावरकर शिकायला होते
३. तिथे आणि एकूणच जवळपास एफसी रोडवर अत्यंत चिकन्या पोरी असतेत

हा त्रिविध क्लेम टु फेम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिसर्‍या मुद्द्याला मनापासून सहमत.
वेळ कसा जातो कळतच नाही तेथे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

है कि नै. पुण्यात बाकी लाख उणं असेल पण एफसी अन केपी ही दोन ठिकाणं तरी एकदम झ्याक हैत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I don't know KP even after staying in Pune for 4 years Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...त्यांना कोरेगाव पार्क म्हणायचे असावे काय? (यू नो, तो रजनीशवाला?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केपी ऊर्फ कोरेगाव पार्क हा प्रकार सीओईपीत असेतोवर आमच्याही नकाशात नव्हता. तो नंतर आला. त्यामुळे जर्मन बेकरीत बाँबस्फोट झाला तरी तो "पुण्यात" झाला असे वाटले नव्हते. जब कि जेव्हा जंम रोडवर छोटा स्फोट झाला तेव्हा मात्र भीती वाटल्याचे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तर माझ्यात आणि (केवळ उदाहरणादाखल, से) चिंतातुर जंतूत नक्की काय फरक राहिला? आँ?

ROFL नबाSSSSSS यु आर सो फनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीही... उद्या एखाद्या हाटेलवाल्याने त्याला भेंडीची भाजी आवडत नाही तरी गिर्‍हाईकाला दिली बनवून तर ती चीटींग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

णोप्स ग्राहकाला भेंडी द्यायची आणि बाहेर येउन काय भेंडी खातय बोकड खायच सोडुन सांगत फिरायच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

एक तर अभ्या सांगत फिरत नाहीयेत. एकदा चुकून बोलले. झालं गेलं गंगेला मिळालं. दुसरं ग्राहकाने जी किंमत मोजली त्यात त्यांनी म्हणजे अभ्या यांनी चुकारपणा केलेला नाही. ग्राहकांनी अभ्या यांचे मतस्वातंत्र्य विकत घेतल्याचे कुठे मला निदर्शनास आलेले नाही.
___________
तसाही मला हा विषय वाढवुन अभ्या यांना टोचे मारत बसण्यात रस नाहीये. पण अगदीच राहावलं नाही म्हणुन बोलले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॉटेल मालकाला भेंडी आवडावी अशी ग्राहकांची अजिबात अपेक्षा नाही. ग्राहकांना भेंडी आवडते, या आवडीचा हॉटेल मालकाला आदर असावा. अन्यथा हॉटेलवर सरळ लिहावे - आमच्या व्यवस्थापनास लोकांना भेंडी आवडण्याचा तिटकारा आहे. तुमच्या रिस्कवर आमच्याकडे खा.
=============================================
अभ्याचे ग्राहक हिंसाप्रेमी असतील पण त्यांना अभ्या हिंसकच पाहिजे असं नको आहे/असावं/संबंध नाही. मात्र अभ्याचे ग्राहक हिंसाप्रेमी नसावेतच असे त्याचे मत असताना तो त्यांचे हिंसेचे लाड पुरवत आहे. ते ही आपल्या भावना गुप्त ठेऊन. म्हणून ती चिटींग आहे.
======================
अभ्याचे डायरेक्ट ग्राहक हिंसाप्रेमी नसले (असे मानू) तरी जे अल्टीमेट ग्राहक आहेत (जनता) त्यांच्याशी चिटिंग आहेच. फायनली पेमेंट तेच करत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक स्वतःचं मत असायला काय हरकत आहे?
आमचा नियमित न्हावीही दररोज डीमांड वाढत चाल्लेल्या 'मशरुम कट'ला दरवेळी(म्हंजे मी जतो तेव्हा) तात्त्विक विरोध दर्शवतो. अख्खी पंचक्रोशी त्याच्याचकडे जाते केस कापायला. त्याने मशरुम कट मागितला म्हणून कोणाचा गळा कापल्याचे ऐकिवात नाही.

हिंसाप्रेमी असावं की नसावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक सामान्य निरीक्षण त्यांनी नोंदवलंय, आणि त्यातल्या उणीवेबद्दल खंत व्यक्त केलेली आहे. त्यांनी लोकांनी आपली विचारधारा सोडावी वा सोडू नये ह्याबद्दल काहीही म्हटलेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

हाहाहा. आय खप्लीटली अ‍ॅग्री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने