सातारचे छत्रपति?

आजच्या दिनवैशिष्ट्यामध्ये पुढील उल्लेख आहे त्यावरून मला सुचणारे काही विचार येथे नोंदवीत आहे:

<१८१९ : मराठ्यांची एकेकाळची राजधानी असणारा सातारचा किल्ला इंग्रजांनी काबीज केला.>

२० फेब्रुअरी १८१८च्या अष्ट्याच्या लढाईत मराठा पक्षाचा पूर्ण पराभव झाला, सेनापति बापू गोखले लढाईत पडले आणि प्रारंभी मराठा बाजूला असलेले तत्कालीन छत्रपति प्रतापसिंह, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तदनंतर इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून ज्या अनेक योजना केल्या त्यांपैकी एक म्हणजे छत्रपतींना सातार्‍यात परत स्थानापन्न करून वारणेच्या उत्तरेकडील भाग कृष्णा-भीमासंगमापावेतोचा हा स्वराज्य म्हणून त्यांच्या स्वाधीन केला. त्याच वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून कॅ.ग्रँटला रेसिडेंट म्हणून सातार्‍यात नेमले,

अशा रीतीने सातारचे १८१८ नंतरचे तथाकथित राज्य हे केवळ इंग्रजी मेहेरबानीने निर्माण झालेले संस्थान होते. त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेहि राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत चालले. प्रतापसिंहास तो गैरसोयीचा वाटल्यामुळे इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ ह्या दिवशी पदच्युत करून बनारसला पेन्शनीवर पाठवले आणि त्याचा धाकटा भाऊ आप्पासाहेब ह्यास छत्रपतिपदावर बसविले. ते निपुत्रिक होते. त्यांव्या १८४८ मधील मृत्यूनंतर त्यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी अखेर सातारचे संस्थान आणि शिवाजीच्या स्वनिर्मित राज्याचा अखेरचा दुवा १६ मे १८४९च्या जाहीरनाम्याने अखेरचा नष्ट केला आणि सातारा ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. ईंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी निर्मिलेले हे राज्य त्यांना वाटले तोवर टिकले आणि नंतर त्यांच्याच इच्छेने विलयास गेले.

अशी परिस्थिति असतांना सातार्‍यातील तथाकथित छत्रपति घराणे आपली बेगडी बिरुदावलि मिरवत त्याचा राजकीय लाभ उठवत असतांना दिसते. छ.(?) उदयनराजे आणि छ.(?) शिवेन्द्रराजे हे राजेपणाचे किताब मिरवीत छत्रपतिपदाचा आपणास निसर्गदत्त अधिकार आहे असे मानतात. भोळसट जनताहि - त्यामध्ये छत्रपतींपुढे मुजरे करणारे बाबासाहेब पुरंदरेहि आले - ते मान्य करते आणि छत्रपतींचे छात्रतेज अजून कसे जाज्वल्य आहे ह्याचे गुणगान करतांना दिसते. सगळीच मौज आहे!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

सहमत.

माझा मिपा अभ्यास कमी आहे पण इथे आत्मुगुर्जींचे उदा द्यावेसे वाटते. आपल्याच ग्राहकांवर टिका करताना मीतरी त्यांना कधी पाहीलं नाही. समव्यवसायीकांची मालप्रैक्टीस, सनातन वगैरेवर ते टिका करतात.

एनीवे आपल्या पोटापाण्याची सोय करणार्यांवर टिका, तीही बोलाचेच चानचान करणार्यांसमोर करणे मलातरी आवडले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत अभ्या. इतका सरळ प्रकार असूनही लोकांना कळत नाही म्हणजे एकतर वेड तरी पांघरलेय किंवा डोक्यावर तरी पडलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभ्या यांचा हा प्रतिसाद ग्रेट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम, वर्तमान निरीक्षण आहे. आम्हीही थोडेसे अमॅच्यर कॅलिग्राफर. 'घरदार टाकूनी जाईन दूर गावा, चुकली दिशा तरीही, औदुंबर' इत्यादींवर केलेले पिसेस मित्रमंडळींस फारसे आवडत नाहीत. तेच 'हृदयात नांदती आमच्या, रक्तात राहती राजे' वगैरे लिहीलेला, महाराजांचं फार (आर्टिस्टीकली लाऊड) तलवारी हातात घेतलेलं चित्र असलेला टीशर्ट प्रचंड भाव खाऊन जातो. असा मलापण करून पाहिजे वगैरे मागण्या होतात.

ज्या देशात कायदे तोडणं हे सर्वोच्च पुरुषत्वाचं प्रतीक गणलं जातं तिथे अभ्या ह्यांनी लिहीलेल्या गोष्टी बर्‍यापैकी नॉर्मल म्हटल्या पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

तुमच्या मित्रमंडळीत मुली कमी आहेत का? Blum 3
<पळा ....पळा>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या आहेत त्यांना
कॉफी, म्युझिक, टेरिबली टायनी टेल्स, डॉग क्वोट्स, गेम ऑफ थ्रोन्स, शेरलॉक किंवा टिपीकल स्ट्राँग वुमन क्वोट्स ('कुरीअर न्यू' फॉन्ट मध्ये लिहीलेल्या...she believed she could, so she did... इत्यादी! feel familiar yet? Wink ) मध्येच फक्त ईंटरेस्ट असतो. मराठी जुन्या कविता आर डेड नाऊ.

हे वरचं विधान जनरल मराठी मुलींबाबत आहे. अन्य भाषीयांमध्ये बरेच टॉपिक तेच, थोडाफार इथेतिथे बदल. चालायचंच.

<मीही पळतो...>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

पुरोगाम्यांचा नेमका हाच दांभिकपणा मला आवडत नाही. अरे तुम्ही स्वातंत्र्यवादी आहात ना? मग लोकांना असू द्यात ना हव्या तशा भावना! जुन्या परंपरा, वीरश्री अन क्षात्रतेज लोकांना आवडलं तर काय बिघडलं? हे आवडू नये असा काही नियम आहे का?
================================
पुरोगाम्यांचा अजून एक गुण, त्याला भाषेत एकशब्दीय वर्णन नसावं. दांभिकपणा + मूर्खपणा अश्या अर्थानं मला शब्द हवा होता. प्रतिगाम्यांना कायद्याप्रमाणे हव्यात त्या गोष्टी आवडायचा, भावना ठेवायचा "अधिकार/स्वातंत्र्य" जसा/जसे आहे तसा त्याचा निषेध करायचा "अधिकार / स्वातंत्र्य" आम्हाला आहे!! असे पुरोगामी म्हणतात. अरे, आम्ही काय पुरोगामी-प्रतिगामी अभिव्यक्ति प्रकटीकरण सामना बघायला आलोत का? वर प्रतिगामी लोक काय काय गाढवपणा करतील याचा काहीही भरोसा नसतो. त्यामुळे ते काय बोलतील ते असोत, पण पुरोगामी लोकांनी नै का "आमच्याही मतप्रदर्शनाचा हक्क" यावर भर देण्यापेक्षा "योग्य काय, सयुक्तिक काय" हे बोलावं?
=================
तर अभ्या, भारतीय समाजात आपली संस्कृती, आपला इतिहास, आपले राजे, आपली चिन्हे, वीरश्री, क्षात्रतेज, इ इ भावनांबद्दल लोकांत आपुलकी वाढली म्हणून सामाजिक व राजकीय नेते (माध्यमांतून) या गोष्टींच्या जवळ जाऊ लागले तर त्यात अयोग्य काय? अशा जनभावनांवर प्रेम करत आपण आपला व्यवसाय का करत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जोशीसाहेब तुम्ही कसले हुशार आहात हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या यांचा प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छत्रपती आपापले खिताब मिरवीत असतीलही. पण जर इतरांनी (भोळ्या भाबड्या प्रजेने वगैरे)त्यांना भाव दिला नसता तर हे मिरवणे आपोआप थांबले असते. गेल्या एक दोन दशकांत क्षात्रतेजाचे आणि पोकळ वीरश्रीचे त्याच्या पोकळ अभिमानासह पुनरुज्जीवन केले गेले. छत्रपती शिवाजी हा हमखास गर्दी आणि यश खेचून देणारा परवलीचा शब्द बनला.'जाणता राजा'साठी २५ लाखांचे अनुदान मनोहर जोशींनी दिले.क्षात्रतेज आणि हिंदुधर्माभिमान जागवण्यासाठी शिवाजी महाराजांना तर हाय्जॅक केले गेलेच पण त्यांच्या वंशजांनाही वेठीस धरले गेले. त्यांची उपस्थिती कुठल्याही समारंभाचा मानबिंदू ठरू लागली. त्यांना अध्यक्षपदे मिळू लागली, त्यांच्या शुभहस्ते उद्घाटने, पारितोषिकवितरणसमारंभ पार पडू लागले. अशारीतीने या 'लोकनेत्यांचा उदय' झाला. मग राजकारण आपोआप आलेच.

(१) छत्रपती शिवाजी हा हमखास गर्दी आणि यश खेचून देणारा परवलीचा शब्द बनायला नको होता - असं तुम्हाला म्हणायचंय का ?
(२) क्षात्रतेज आणि हिंदुधर्माभिमान जागवण्यासाठी शिवाजी महाराजांना तर हाय्जॅक केले गेलेच पण त्यांच्या वंशजांनाही वेठीस धरले गेले --- म्हंजे काय ?? त्यांच्या वंशजांना वेठीला धरले गेले म्हंजे काय ?? त्या वंशजांच्या इच्छेविरुद्ध वेठीला धरले गेले का ?? तसे असल्यास त्या वंशजांनी त्या वेठीला धरले जाण्याविरुद्ध आवाज का उठवला नाही ??

---

संस्थाने शिवरायांपासून परंपरागत आहेत की नाहीत हा प्रश्न नव्हताच. ते शिवरायांचे वारस इतकेच क्वालिफिकेशन पुरेसे होते.

त्यांचे "शिवरायांचे वारस" हे क्वालिफिकेशन असणे हे न विचारात घेण्याजोगे आहे असं म्हणायचंय का ?
त्या वारसांना जो सन्मान मिळतो तो अनाठायी आहे असं म्हणायचंय का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचे "शिवरायांचे वारस" हे क्वालिफिकेशन असणे हे न विचारात घेण्याजोगे आहे असं म्हणायचंय का ?
त्या वारसांना जो सन्मान मिळतो तो अनाठायी आहे असं म्हणायचंय का ?

वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय? स्वतःचे जितके कर्तृत्व तितका मान मिळावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय? स्वतःचे जितके कर्तृत्व तितका मान मिळावा.

ब्याट्या, तुझा मुद्दा ओव्हरली बेसिक आहे.

Look at the institutional details. आपल्याकडे -- स्वतःहून स्वतःचे कर्तृत्व सांगायचे नाही असा प्रघात आहे. म्हंजे ती व्यक्ती स्वतःहून सांगणार नाही. मग इतरांसाठी जर त्या व्यक्तीने काही केलं असेल तर लोकांना कळणार कसे ? -- की या माणसाचे हे हे कर्तृत्व आहे.

वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व नाही हे बेसिक झाले. पण वंशज म्हणून जे काही residual स्थान असेल त्यातून मिळणार्‍या clout चा जनतेच्या कल्याणासाठी वापर केला गेलेला असेल आणि स्वतःहून स्वतःचे कर्तृत्व सांगायचे नाही अशा प्रघातामुळे त्यांनी स्वतः जर सांगितले नसेल तर इतरांनी ते कर्तृत्व ओळखून त्यांना सन्मान द्यावा अशी अपेक्षा सुयोग्य नाही का ?

व म्हणून त्यांना जो काही सन्मान दिला जातो तो त्यांनी केलेल्या जनकल्याणात्मक कामाच्या लाभार्थींनी दिलेला असू शकतो ना !!!

My point is that the good work that they might have done ... you and I may be unaware of their good work. व जे त्यांच्या नावाने जयघोष करतात ते लोक लाभार्थी असू शकतात व त्यांच्या दृष्टीने आभार व्यक्त करण्यासाठी त्या वंशजांना सन्मान देऊन पोहोचपावती देत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे लाभार्थी आहेत त्यांनी खुशाल तिन्हीत्रिकाळ डांगोरे पिटावे, आम्हांला काय त्याचे? आमच्यापर्यंत यांच्या अनुयायांचा आणि यांचाही नुसता माजुरडेपणा पोहोचलेला आहे. आम्हांला यांचे कौतुक का म्हणून असावे?

मुद्दा इतकाच आहे की लोक देवत्व बहाल करतात. शिवाजी महाराजांचा वंशज असणे हा एकमेव क्रायटेरिया सन्मानाला पात्र असण्यासाठी पुरेसा आहे अशी बर्‍याच लोकांची अजूनही धारणा आहे. ते कितपत योग्य आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते कितपत योग्य आहे?

योग्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजी महाराजांचा वंशज असणे हा एकमेव क्रायटेरिया सन्मानाला पात्र असण्यासाठी पुरेसा आहे अशी बर्‍याच लोकांची अजूनही धारणा आहे.

क्रायटेरियॉन.

बाकी ठीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हिंदुधर्माभिमान जागवण्यासाठी शिवाजी महाराजांना तर हाय्जॅक केले गेले

महाराज मूळचे गांधीवादी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>>"हिंदुधर्माभिमान जागवण्यासाठी शिवाजी महाराजांना तर हाय्जॅक केले गेले" <<<
हे वाक्य म्हणजे सांप्रत काळातील महाराजांच्या बद्दलच्या राजकारणाविषयीचे भाष्य असावे . स्वतः महाराजांबद्दल नसावे
>>>महाराज मूळचे गांधीवादी का?<<<

असे वाटते कि महाराजांना असल्या कुठल्याही "वादी " पणापेक्षा अतिशय मोठी आणि महत्वाची कामे असावीत .

' स्वातंत्र्य' हि संकल्पना बहुधा असल्या कुठल्याही वादी होण्यापेक्षा महत्वाची आणि मोठी असावी .
असो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. ते वाक्य सध्याच्या राजकारणासंबंधीच होते. स्वतः महाराज या सगळ्याच्या पलीकडे होते. त्यांना असल्या पोकळ दिखाऊगिरीची गरजच वाटली नसती. त्यांचे कर्तृत्वच खणखणीत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजी महाराज हा इतका 'सॅक्रोसँक्ट' विषय आहे की साधं त्यांचा एकेरी उल्लेख झाला तरी शिव्या पडतात. हिन्दुत्ववादी असोत, बहुजन असोत किंवा अलिकडचे मूक मोर्चे असोत, सगळ्यांनीच हवं तितकं त्यांना वापरून घेतलेलं आहे. मध्ये एक व्हिडीओ असाच पाहत असताना त्यात काहीतरी रेफरन्स आला आणि एक डॅश लाख डॅश लोकांनी लग्गेच कमेंट्स मध्ये गरळ ओकायला सुरुवात केली.

___________

१. माझ्या बलॉगची जाहिरातः पहा: https://barachlihaychay.wordpress.com/2017/02/07/sacrosanct-%E0%A4%85%E0...

२. इस्ट इन्डिया कॉमेडी, सोरभ पंत. शिर्षक आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

लोक ज्याला (पोकळ) क्षात्रतेजाचे प्रदर्शन म्हणून नावे ठेवत आहेत त्या पोकळपणाची उदाहरणे मिळतील का?
-----------------------------------
मला इथल्या शिवाजीच्या (पहा मी एकेरी लिहिलं आहे. एकेरी लिहूच नये असा काही कोणाचा धाक नाही. लोकांनी धाकाचा भास करून घ्यायचे टाळावे.) वंशजांबद्दलच्या टिका (मंजे त्यांना महत्त्व येणे, उद्घाटन करणे, राजकारण करणे, इइ यात चूक काय आहे?) कशाला?
-----------------------
पुरोगामी लोकांना आपले खूप जुन्या उत्क्रांतीकालातले आदिम पूर्वज (जे भारतीयच नव्हते) आणि शिवाजी यांच्यात जवळचा आणि दूरचा भेद करावासा वाटत नाही.नका करू. पण ज्यांना शिवाजी महान आणि त्यांचे वारस लाडके वाटतात त्यांना उगाच का झोडताय?
---------------------
याच लेखातली काही विधाने, फ्रेजेस मी इथे पुन्हा लिहितो. तेवढी साध्या लोकांना पुरेशी आहेत.
"प्रारंभी मराठा बाजूला असलेले" "इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून" "त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी" "तथाकथित राज्य" त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता.
"अशी परिस्थिति असतांना सातार्‍यातील तथाकथित छत्रपति घराणे" (घराणं का म्हणे तथाकथित? दत्तक घेतला म्हणून? दत्तक घेतल्याने घराणे चालू राहते. रादर त्यासाठीच दत्तक घेतात.) "राजकीय लाभ" (लाभ शब्द वाईट अर्थाने का?) "छत्रपतिपदाचा आपणास निसर्गदत्त अधिकार" (मंजे भारतात लोकशाही आहे हे त्यांनी कधी अमान्य केलं आहे का?) "छत्रपतींचे (आजच्या दोन? कारण ओरिजनल छत्रपतींचे तर आहेच) छात्रतेज अजून कसे जाज्वल्य आहे ह्याचे गुणगान करतांना दिसते (चूक काय यात? तुम्ही ज्या लंडनात बसलात तिथेच नव्हे तर नवी बाजू ज्या कॅनडात बसलेत तिथे पण ब्रिटिश राणी महाजाज्वल्य तेजाचे गुणगान राजमान्य अधिकॄत रित्या होते ना? ती नै का मौज?)
====================
अवांतर - "भोळसट जनता" (भारताची जनता आता भोळी म्हणाला आहात तर याच पदावर कायम राहा. तुम्हाला उद्वेग आला कि सगळ्यांना नावे ठेवता.)
==================================
कोल्हटकर सर सिनियर, अभ्यासू आहेत, त्याचा मला आदर आहेच, पण त्यांनी इतका बोचरा धागा नाही लिहायला पाहिजे होता. यातला क्षात्रतेज इ इ आणि जनकौतुक इ इ बाजूला ठेउन जे काय मुद्दे मांडा. महान लोकांचे वारस म्हणून लोकांचे प्रेम असणे साहजिक आहे. या लोकांवर प्रेम करून नये असे अक्षम्य दुर्गुण वंशजांत काय असतील तर बिनदिक्कत सांगा. माझे सातार्‍याचे मित्र मला दोन गोष्टी सांगतात ज्या निगेटिव आहेत.
१. हे लोक अतिच दारू पितात. (पण इथलेच पुरोगामी मला दारू पिणे हा एक अधिकार इ इ आहे असे भांडले आहेत. मग हे मोजायचं का नाही?)
२. सातार्‍यात त्यांचा वचक आहे. (आता असा बर्‍याच लोकांचा असतो बर्‍याच शहरात. अगदी जैसलमेर मधे त्या राजाबद्दल आपण कै बोलू शकत नाही. काँग्रसमधे सोनियाबाई आणि भाजपमधे मोदीबद्दल बोलणे हिमतीचे मानले जाते. मग यांना इतकी बोचरी भाषा का?)
==========================

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला इथल्या शिवाजीच्या (पहा मी एकेरी लिहिलं आहे. एकेरी लिहूच नये असा काही कोणाचा धाक नाही. लोकांनी धाकाचा भास करून घ्यायचे टाळावे.) वंशजांबद्दलच्या टिका (मंजे त्यांना महत्त्व येणे, उद्घाटन करणे, राजकारण करणे, इइ यात चूक काय आहे?) कशाला?

सौदी अरेबियात जाऊन इस्राएलला शिव्या देऊन म्हणायचे की "बघा बघा ज्यूविरोध केल्यावर कोणी काही बोलत नाही" त्यातलाच मूर्ख प्रकार आहे हा. तुम्ही हिंदुत्ववादी ग्रूप जॉईन करा आणि मग बोला. किती अडाणी विधाने करायची त्याला काही सुमार आहे का?

पुरोगामी लोकांना आपले खूप जुन्या उत्क्रांतीकालातले आदिम पूर्वज (जे भारतीयच नव्हते) आणि शिवाजी यांच्यात जवळचा आणि दूरचा भेद करावासा वाटत नाही.नका करू. पण ज्यांना शिवाजी महान आणि त्यांचे वारस लाडके वाटतात त्यांना उगाच का झोडताय?

शिवाजी फॅन क्लबचा मी आद्य सदस्य आहे. जेव्हा असे असणे फार फॅशनेबल नव्हते तेव्हापासूनचा. पण आजकाल महाराजांच्या नावाखाली जो उन्माद चाललाय तो बघवत नाही. मंगळावर राहिल्यावर ते दिसत नसेल, चालायचंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकूणच आनंद आहे। मुळातच अभाव असला कीं सर्व
प्रकारचे देखावे करावे लागतात। झीtvचा promo पहिला तर अशी वीरश्री ऊतू जाताना दिसते।
उदा.फेटे आणि reban परिधान केलेल्या बुलेट वरील तरुणी। आणि आवेशाने ढोल वाजविणाऱ्या मुली।
वीरश्रीने परिपूर्ण।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

खरा इतिहास दुखराच असतो.
( जाज्वल्य ब्रान्डच्या जखमेवरच्या पट्ट्या खपतील खूप)
आता कोणी एक हात मागे xxवर ठेवून दुसय्रा हाताने सलाम मारतो हे कबूल करत असेल तर या वर्तमान प्रामाणिकपणाचा अभिमान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काेल्हापूरच्या छञपतीं बाबत आपले मत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा "के" ला काना कसा काढला?

अ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला तर को बरोबर दिसत आहे.

पण त्या निमित्ताने दुसरी शंका: 'छञपती' म्हणजे कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या इकडे 'त्र'ऐवजी 'ञ' ही एकच कळ वापरण्याचा शॉर्ट कट फ्याशनीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक. जगदँब.
मान्य आहे ते शिवगंधासारखे दिसते पण.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे अरे अरे!!! मूर्खपणा आहे सगळा. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफी असावी. छत्रपती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै सिंपल. केा असे.
नितिन थत्तेसोा असे पण लिहिता येते.
.
इन्स्क्रीप्ट का कमाल है भय्या. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अािीुअूेैौ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजी महाराजांच्या सातारच्या वंशातील विद्यमान पिढ्यांचं 'कर्तृत्व' सर्वविदित आहे, किमान दहाएक वर्षांपूर्वीपर्यंत होतंच होतं. सध्याच फार उदात्तीकरण झालेलं दिसतंय... निदान आपण कुणाचं उदात्तीकरण करतो आहोत, ते त्याला (किंवा कुठल्याही आदरयुक्त भावनेला) पात्र आहेत का नाही याचा जर सर्वसामान्य लोक विचारच करणार नसतील तर कठीण आहे. या बाबतीत कोल्हटकरांना पूर्णतया अनुमोदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोल्हटकर पात्र का नाहीत यावर काहीही बोललेले नाहीत. त्यांनी हे लोक वारसच नाहीत, ते राज्यच नव्हते , इ इ म्हटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतापसिंहानंतर ते राज्यच नव्हते इ. खरेच तर आहे! कुठे ते स्वराज्यसंस्थापक छत्रपती आणि कुठे बाकीचे, असोच असो. इंग्रजांनी एकदा भारत घशात घातल्यावर जे काही उरले ते त्यांच्यामुळे, स्वपराक्रमामुळे नव्हे. चार पातशाह्या आणि अठरा टोपकरांचे छातीवर शिवलंका उभारणार्‍यांचे कौतुक अख्ख्या महाराष्ट्राला आहे, त्यात काही शंकाच नाही. तो वारसा सांगून निव्वळ मिशीला पीळ दिल्याने काय साधते? कायदा हातात घेणे, लोकांना धमकावणे हीच पराक्रमाची व्याख्या ज्यांची आहे त्यांना भारी वाटत असेल. बाकीच्यांना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कायदा हातात घेणे, लोकांना धमकावणे

हे अयोग्य आहे.
पण...

इंग्रजांनी एकदा भारत घशात घातल्यावर

या लॉजिकला काय अर्थ आहे? समजा इंग्रज नसते आणि राजेंद्र प्रसादांनी भारत घशात घातलाय, तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा इतकाच की चवथी नापास झालेल्या पोराने आपला आज्जा आईन्स्टाईन होता म्हणून माज करू नये. अशा बिनडोक माजाचे कौतुक तुम्हांला असेल तर असो बापडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रेणीव्यवस्थेची उणीव वारंवार जाणवून देणारे प्रतिसाद आवरा, अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतकाच त्रास होत असेल तर श्रेणीव्यवस्था ऊर्फ विरुद्धमतनिर्दालक सुरू करा. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

या लॉजिकला काय अर्थ आहे? समजा इंग्रज नसते आणि राजेंद्र प्रसादांनी भारत घशात घातलाय, तर?

अजो, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते एकदा स्वच्छ व थोडक्यात मांडा. म्हंजे आम्ही आमचा मेंदू युद्धभूमि असल्यासारखा विस्फोटप्रवण स्थितीत बाळगून चालत राहणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या चालू धाग्याशी संलग्न अशी मला असलेली काही माहिती नोंदवून ठेवतो.

सध्याच्या गढूळ वातावरणात 'शिवराज्याभिषेकामागे दक्षिणेचा ब्राह्मणी लोभ प्रामुख्याने कारण होता, गागाभट्टाने महाराजांना लुटले' असे विचार वाचायला मिळतात. 'ऐसीवर'च अशी एक घमासान चर्चा येथे झालेली आहे.

'श्रीशिवराज्याभिषेकप्रयोग' नावाचे एक पुस्तक इतिहासलेखक वा.सी.बेन्द्रे ह्यांनी तयार केले आणि 'निधर्मी' मानल्या गेलेल्या श्रीपाद अमृत डांगे ह्यंच्या Peoples Publishing House ने ते १९६० साली प्रकाशित केले. तत्पूर्वी अनेक शतके वापरात गेलेला आणि विस्मृतीत पडलेला असा राज्याभिषेकविधि गागाभट्टाने संशोधन करून पुनः बांधला आणि तदनुसार आपल्या देखरेखीखाली भोसले कुलोपाध्यायाकडून तो रायगडास घडवून आणला. असे करण्यामागची पूर्वपीठिका आणि प्रत्यक्ष ८ दिवस चाललेल्या ह्या विधीचे Manual असे ह्या पुस्तकाचे स्वरूप आहे.

त्याची दीर्घ प्रस्तावना वाचल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. राज्याभिषेक कशासाठी? तर हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे केवळ सामर्थ्य आहे एवढ्यने कोणी राज्यपदावर पोहोचत नाही. त्यासाठी सर्व समाजाकडून अधिकृत प्रकारे - formally - एक कोणी व्यक्ति इतरांहून वरच्या पायरीची आहे हे प्रस्थापित करून घ्यावे लागते. ते करण्याचा मार्ग म्हणजे राज्याभिषेक. त्याविना सामर्थ्यवान नेत्याला सुद्धा इतरांच्या - विशेषतः सामाजिक दृष्ट्या आपल्याच पायरीच्या अन्य व्यक्तींच्या वरचे स्थान ग्रहण करता येत नाही. तत्कालीन समाजात मालोजी-शहाजींच्या भोसले कुटुंबाशी बरोबरीचा दावा करणारी अन्यहि कुलीन मराठा घराणी होती. उदा. जावळीचे मोरे. ह्या सर्वांच्या वर, इतकेच नाही तर पेशवे पिंगळे, अमात्य रामचंद्र अशा ब्राह्मण धेंडांच्यावर निर्विवाद स्थान मिळविण्यासाठी राज्याभिषेकाचा विधि करवून घेणे इष्ट आहे असे महाराष्ट्रात त्यावेळी आलेल्या गागाभट्टाने शिवाजी महाराजांना पटवून दिले आणि त्यांच्या इच्छेवरून जुन्या ग्रन्थांचे संशोधन करून हा विधि तयार केला. अशा विधीशिवाय सामर्थ्यवान नेत्यालाही इतरांना अपराधाचे शासन करण्याचा अधिकार मिळत नाही. हे सर्व विवेचन प्रस्तुत पुस्तकाच्या दीर्घ प्रस्तावनेमध्ये आहे. शिवाजी महाराजांची ह्या सर्व विचारावर आणि तत्कालीन हिंदु धर्माशास्त्रावर श्रद्धा होती आणि म्हणून त्यांनी हा विधि करवून घेतला.

त्याच वेळेस गागाभट्टाने 'छत्रपति' हा शब्दहि प्रचारात आणला असे दिसते. तपूर्वीच्या रामायण-महाभारत-पुराणे-कालिदासांसारख्यांचे लेखन ह्यात कोठेहि 'छ्त्रपति' असा शब्द 'सत्ताधीश' अशा अर्थाने भेटत नाही. मोनियर-विल्यम्स कोशामध्ये 'छत्रपति' ह्याचा एकच अर्थ 'an officer watching over the royal parasol' असा दिला असून त्याला सिंहासनद्वात्रिंशिका - म्हणजे सिंहासनबत्तिशी - ह्या संस्कृत ग्रन्थाचा आधार दाखविला आहे. आपटे कोशातहि ह्या शब्दाचे '1.a king over whom an umbrella is carried as a mark of dignity, a sovereign, emperor, 2. Name of an ancient king in जंबुद्वीप' असे दोन अर्थ दिले आहेत. पै़की पहिल्या अर्थाला काहीच पूर्वआधार दाखविलेला नाही. शक्यता अशी वाटते की कोशकर्ते वा.शि.आपटे ह्यांनी त्यांना माहीत असलेल्या मराठा राज्याच्या 'छत्रपति'पदावरूनच हा अर्थ घेतलेला असावा. त्यांनी दाखविलेला दुसरा अर्थ फारच दुर्मिळ - obscure - असा दिसतो आणि तेथून 'छत्रपति' हा शब्द गागाभट्टाने घेतला असे म्हणवत नाही.

त्यावरून असे म्हणता येईल की गागाभट्टानेच लुप्त झालेला राज्याभिषेक संस्कार पुरुज्जीवित करतेवेळी 'छत्रपति' हा नवा शब्दहि निर्माण केला. हा शब्द आता मराठी भाषा आणि संस्कृति ह्यांचा एक अविभाज्य घटक बनला आहे हे गाग्गभट्टाने मोठेच कार्य केले असे म्हणावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि बायदवे राज्याभिषेकाच्या अगोदर किमान दहा वर्षे तरी गागाभट्टांचा शिवाजी महाराजांशी संपर्क होता असे सांगणारा पुरावा आहे. १६६४ साली महाराजांच्या उपस्थितीत एक धार्मिक निवाडा झाला त्यात उपस्थितांच्या यादीत गागाभट्टांचे नावही आहे.

आणि राज्याभिषेकाबद्दल थोडेसे स्वैर चिंतन. चुकले असल्यास सांगा.

पारंपरिक हिंदू पद्धतीचा राज्याभिषेक महाराजांच्या आधी लुप्तप्राय झाला होता असे म्हणायला खरे तर आधार नाही. उत्तरेत रजपुतांचा राज्यारोहण विधी हा मुघल बादशहाने टिळा लावल्यावर संपन्न होत असे हे बाकी खरेच. पण ते सोडूनही त्यांचे काही मंत्रतंत्र असतीलच, ते कोणी न पाहताच असे कसे रद्दीत काढू शकतो?

बरं तेही सोडा कारण रजपूत तसेही मुघलांचे मांडलिक. पण दक्षिणेत काय परिस्थिती होती? अतिदक्षिणेत तरी मुसलमानांचे प्रभुत्व नव्हते. विजयनवर साम्राज्याचा शेवटचा राजा श्रीरंगरायुलु माझे स्मरण बरोबर असेल तर कमीतकमी १६५० पर्यंत अगदी चिमूटभर प्रदेश घेऊन का होईना पण अ‍ॅक्टिव्ह होता. त्याचा राज्याभिषेक हिंदू पद्धतीने झाला नसेल याची शक्यता जवळपास शून्य आहे. तीच गोष्ट केरळ-तमिळनाडूतील छोट्या राजांची. किंवा नेपाळमधील राजे असोत अथवा आसामातील आहोम राजे. आहोम राजसत्ता तर मुघलांच्या नाकावर टिच्चून उभी होती. मराठ्यांइतके ठोकले नसले तरी आपापल्या भागात त्यांनी मुघलांना चांगला मार दिलेला आहे- त्यांचा प्रख्यात सेनापती लाछित बडफुकन याने सराईघाटच्या लढाईत त्यांचा पराभव केल्यानंतर मुघलांनी तिकडे वळूनही पाहिले नाही. ते राजे वैष्णव होते. त्यांचा राज्याभिषेक कसा होत होता?

तेव्हा महाराजांच्या अगोदर असा राज्याभिषेक लुप्तप्राय झाला होता असे म्हणणे चूक आहे. त्यांनी स्थापन केलेले राज्य पुढे भारतभर पसरले, त्या राज्याने मुघल साम्राज्याची हाडे खिळखिळी केली आणि भारतावर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्रजांना सर्वांत जास्त खटाटोप मराठ्यांशी लढतानाच करावा लागला. अशा पराक्रमी, चिवट राज्याचा प्रभावशाली संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांना आणि शिवराज्याभिषेकाला महत्त्व आहे. (याबद्दल सर्वांत समर्पक वर्णन आज्ञापत्रात आढळते पण विषय अवांतर होईल म्हणून लिहीत नाही.) गागाभट्टाने भलेही संशोधन केले असेल पण या मुद्द्याचे काय ते पाहिले पाहिजे असे मला वाटते.

बाकी छत्रपती या शब्दाबद्दल मलाही कुतूहल होते. आपटे डिक्शनरीतील पहिला अर्थच योग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

There may be many Hindu Kings. But were they performing Rajyabhishek?

-------------------------------------
BTW- Making water fall in a tiny stream is the method adopted for torture by the investigators. How come that process is considered secred- to be performed on a king?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्थातच राज्याभिषेक होत होता. विना राज्याभिषेक हिंदू राजे कधीच नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

In that case eligibility to become the King should be a common problem (Nandantam Kshatriyakulam etc) with common solution. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी. सवालच नाही. किमान शिवाजी महाराज जन्माने हिंदू होते. आहोम राजे तर हिंदूच नव्हते, आयमीन मूळचे भारतातलेही नव्हेत. कुठून नॉर्थ-ईस्ट कडून आले आणि इथलेच झाले. वट वाढला की भट मिळतोच. इतकंही अवघड काही नसतं. या केसमध्ये भट जो होता तो साधासुधा नसून भट्टाचार्य असल्यामुळे त्याने सगळा लिटरेचर सर्व्हे करून उत्तम पेपर लिहिला आणि त्यामुळे लोकांना ते अश्रुतपूर्व वाटलं इतकंच काय ते. महाराष्ट्रात याअगोदरचा हिंदू राजा साडेतीनशे वर्षांपूर्वी झाल्यामुळे लोकांना जास्त कौतुक वाटले. तेही साहजिकच, फक्त ते 'अखिल भारतीय' वगैरे उगाच आपलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

How come that process is considered secred- to be performed on a king?

Sacred. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सातार्‍याचे नाव आल्याने उत्सुकतेने वाचली चर्चा.
एकंदरित मूळ मुद्दा समजला नाही, तरी आक्रमकता आणि चमकदारपणाचा भाव वाढता आहे याबद्दल सहमत. (ट्रंप हे अवांतर तरी चपखल उदाहरण.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ छत्रपती असामान्य होते म्हणून त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी मिशा पिळण्याचे आता सार्वत्रिकरण झाले आहे. त्याचा इतका अतिरेक झालाय की, काही घराण्यातील मूळ छत्रपतीच असामान्य नसताना, त्यांच्या पुढच्या पिढीतले दिवटे, ते कसे लोकोत्तर थोर पुरुष होते, हे बाकीच्यांना मान्य करायला भाग पाडत आहेत, आणि ह्या त्यांच्या प्रयत्नांना यशही लाभत आहे. 'मेल्या म्हशीला मणभर दूध,' म्हणायला इतर चोरांचे तरी काय जाते ? दुर्दैवाने, उद्या इतिहासही तसाच लिहिला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौज आहे. आजचे छ. याना साताऱ्या बाहेर किती मान्यता आहे? ही भोळसट जनता सातार्या बाहेर नाही. साताऱ्यात तरी किती लोक मानतात? पण ठीक. ठोका बुजगावणे उभं करून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ओळखीत एक गृप आहे जो उदयनराजेंना प्रेरणास्थान मानतो, पुण्यात. पुण्यात बॅनर पाहिलेले आहेत रस्त्यावर "हा माहाराष्ट्र पुन्हा छत्रपतींच्या अधिपत्याखाली यावा ही श्रींची इच्छा" + उदयनराज्यांच्या फोटो या टाईप. सो हा प्रकार फक्त सातार्‍यातच आहे असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्कारी गाड्यांवर जसे महाराष्ट्र शासन, भारत सरकार वगैरे लिहिलेले असते अगदी त्याच फॉन्टात, त्याच जागी 'छत्रपती शासन' असे लिहिलेल्या गाड्या पाहिल्या नाहीत वाटते अजून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा! हे अजून नाही दिसलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

enough said

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकशाहीचा अजून एक प्रादुर्भाव म्हणजे सद्भावनेपोटी सद्गुणी राजे आणि राण्या यांच्या लोकमान्यतेला दूषणे देणे. यात आणि भक्त लोक लोकांनी निवडून दिलेल्या काँग्रेस सरकारची योग्यता/वैधता/आवश्यकता थेट याबद्दलच बोलायला चालू करतात त्यात फार काही फरक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

याबाबत थोडी सहमती. हे आत्ताचे उदयनराजेभक्त आणि रागा/सोगा समर्थक यांच्यात फरक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लोकशाहीचा अजून एक प्रादुर्भाव म्हणजे सद्भावनेपोटी सद्गुणी राजे आणि राण्या यांच्या लोकमान्यतेला दूषणे देणे.

समजुतीचा घोटाळा हाही जूनसमर्थकांचा एक प्रादुर्भाव मानावा काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उदयनराजेंची ही ताजी बातमी बघा.. Smile
नो मोर कमेंट्स..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

वसंतराव मानकुमरे हा उंदीर आहे

लौल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उदयन राजे नी कोणास उंदिर म्हटले म्हणून त्यांना कमी लेखायचे असेल तर तोच नियम नेहरू/खुशवंत सिंग यांना लावावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाने