बागकामप्रेमी ऐसीकर - २०१७

या वर्षी काय-काय पेरलंय/पेरणार?

मी (गावठी वाणाचे) टोमॅटो, भेंडी, (कमी तिखट जातीच्या) मिरच्या, कुर्जेटं आणि बेझिल लावले आहेत. फुलांमध्ये या वर्षी लिल्यांचे कंद लावलेले उगवून आले, फुलंही आली आहेत. ग्लॅडीओलाचे कंद उगवून आल्येत, पण फुलं यायला वेळ आहे. गेल्या वर्षी लावलेल्या झिनियाची फुलं तिथे टाकली होती, त्याची तीन झाडं उगवून येत आहेत. जर्बेराची दोन झाडं थंडीत टिकली, तीही फुलायला लागल्येत. सगळ्यांचे फोटो सवडीनं.

आजच गेल्या वर्षी लावलेल्या स्ट्रॉबेरीची दोन फळं आणि मोगऱ्याची तीन फुलं मिळाली. या वर्षी सायली (स्टार जाझ्मिन) लावली, त्यांचे फोटो.

सायली

स्ट्रॉबेरी मोगरा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

सुंद‌र तू ही फुलांचे द‌व‌णिय‌ फोटो टाकू लाग‌लीस‌ का?
अरे या बाग‌कामाने कुठे नेऊन‌ ठेव‌लीये आम‌ची अदिति? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसऱ्या फोटोत धुणी धुतलेली दिसली नाहीत का काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फळं फुलं झकास!
सायलीचा वेल छान वाढवला आहे.
( न्यु यॅार्करची तारीख April 17 2017 कशी आली?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा | स्ट्रॉबेरी .. म‌स्त‌च‌

माझ्या बाल्क‌नी गार्ड‌न‌ची अव‌स्था अंम्म‌ळ‌ ब‌री नाहीये. गेले ५-६ म‌हिने ज‌रा दुर्ल‌क्ष‌ झाले.

मिर‌च्या येताय‌त‌ चांग‌ल्या. कोथिंबिर‌ दोन‌दा तिन‌दा चांग‌ली झालेली. कुणी सांगित‌ल‌ प‌क्षी खाउन‌ जातात म्ह‌णे. आता प‌र‌त‌ थोडी दिस‌ते आहे.
क‌ढीपत्त्याला आणि बेझील‌ ला प‌र‌त‌ न‌विन‌ पाल‌वी फुट‌ली आहे.
मोग‌ऱ्याला अजून‌ काही नाही . म‌धे ३-४ फुले आली होती.
तांब‌ड्या भोप‌ळ्याचा वेल‌ भ‌र‌पूर‌ वाढ‌लाय, क‌ळ्या आणि फुले प‌ण‌ येतात, प‌ण‌ अजून‌ फ‌ळ‌ नाही ध‌र‌ले.
भिंती ल‌ग‌त‌ लाव‌लेले म‌नीप्लॅन्ट (याला म‌राठीत‌ काय‌ म्ह‌ण‌तात्?) खूप‌ प‌स‌र‌ले आहे. जाळीच‌ झालीय‌. म‌ला ते काढाय‌च‌य‌, प‌ण‌ स‌ध्या त्याव‌र बाळ‍- बाळंतिण‌ (स‌न‌ब‌र्ड‌) असल्याने थांब‌लीय‌ . Smile
फोटो आहेत्... नंत‌र‌ देईन‌ इथे .
ओवा आणि टोमॅटो प‌ण‌ लाव‌लेत्.. ह‌ळू ह‌ळू वाढ‌ताय‌त, प‌ण‌ अजून‌ दाख‌विण्या इत‌के नाही झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इथे फुलांना म‌र‌ण‌ ज‌न्म‌ता - द‌ग‌डांना प‌ण‌ चिरंजिविता |
बोरी बाभ‌ळी उगाच‌ ज‌ग‌ती - चंद‌न‌ माथी कुठार‌ |
अज‌ब‌ तुझे स‌र‌कार‌ ...

बरीच वर्षं मोगरा आणि अनंत या दोन भारतीय फुलांची फार आठवण येत होती. आकर्षक रंगांची पण गंध नसणारी फुलं दिसायला छान असली तरी आपल्या बागेत वासाची फुलं हवीतच, असं वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी मोगऱ्याचं रोप एका मैत्रिणीनं पाठवलं; आता एकाची दोन झाल्येत. आज अनंताचं झाडही लावलं. (किती टिकतंय ते बघू; कारण त्याला थोडी सावली मिळालेली बरी, असं जालावर वाचलं. पण मी ते लख्ख उन्हात लावलंय. भरपूर फुलांच्या हव्यासासाठी. त्यासाठी रोज पाणी घालण्याचे कष्टही करायला मी तयार आहे.)

हे आज बनवलेलं अनंत यज्ञकुंड. (विटा कमी पडल्यामुळे तिथे कुंडी आणि खणताना बागेत सापडलेले दगड लावल्येत. पण ते बघितल्यावर, एका बाजूनं दोन कोरफडीच्या कुंड्या वाईट दिसणार नाहीत, असं वाटतंय. शिवाय आजूबाजूच्या गवताचं तिथे आक्रमण होऊ नये म्हणूनही उपयोग होईल.)
अनंत यज्ञकुंड

अनंताला किंचित आम्ल असणारी जमीन चांगली असं वाचनात आलं. शिवाय सतत ओलसर मुळं असावी लागतात. म्हणून दारच्या लाईव्ह ओकाची काही पानं जपून ठेवलेली होती, जमिनीवर आच्छादन म्हणून. ती मातीवर पसरली. या पानांचं विघटन सहज होत नाही; किमान तीनेक वर्षं लागतात म्हणे. पानांमुळे म्हणे, जमिनीचं पीएच कमी होतं (आम्लता वाढते), अशी जालमाहिती. म्हणून पानांचा तीनेक इंचांचा थर मातीवर पसरला. मग दिसायला बरं म्हणून विकतचं आच्छादन त्यावर पसरलं. ही आरास पसरू नये हेसुद्धा यज्ञकुंडाचं प्रयोजन.

गवताचा एक छोटा भाग पूर्ण रिकामा करून तिथे शेवंतीचा वाफा बनवायला सुरुवात केली आहे. अजून रिकामी जागाच जास्त आहे. पण उन्हाळ्यात फुलं कमी झाली की आहेत त्या झाडांची छाटणी करून, त्यातून नवीन रोपं बनवेन. नवरात्रीच्या सुमारास बाजारात नवीन झाडं येतील. ती तेव्हा विकत घ्यायची नाहीत; दुकानातल्या झाडांचा बहर ओसरला की तीच झाडं कमी किंमतीला मिळतात. तेव्हा विकत घ्यायची. पुढच्या वर्षी झाडांना पुन्हा बहर आला की मग फोटो काढून आंजावर मिरवायचं.

शेवंतीच्या बियाही दुकानात मिळाल्या. पण त्यांतली एकही उगवून आली नाही. माझंच काही तरी चुकलं असणार. कोणी हा प्रयोग केला आहे का?

शेवंती वाफा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळ्यात महत्त्वाची कुंडी दाखवायची राहिलीच होती. कॅटनिपची. बऱ्याच मांजरींना या झाडाचा वास आवडतो. शेवंती, पुदीन्याच्या जातीचं हे झाड असतं. पानांचा वास साधारण च्युइंगगमची आठवण करून देणारा असतो. मांजरी ही पानं खात नाहीत, पण तो वास अंगाला लागावा म्हणून पानांवर अंग घासणं, पानांची शिकार करणं वगैरे प्रकार करतात. आमच्या तिर्रीबाईंनाही हा प्रकार आवडतो. त्यामुळे दोन आयताकृती कुंड्यांमध्ये बिया पेरल्या होत्या.

त्यांतली एका कुंडीतली दोन झाडं तिनं मारामारी करताना पार मोडूनतोडून टाकली होती. मला वाटलं होतं की संपली आता ही झाडं. म्हणून दुसऱ्या कुंडीतही बिया पेरल्या. पण त्या झाडांना पुन्हा पालवी फुटली आहे.

आमच्या बाईंना आपण होऊन त्या झाडांची फार आठवण येत नाही. मी कुंडीत सोडलं की तिथे त्या रमतात. कधी तिला गिफ्ट म्हणून मी दोन-चार पानं खुडून घरी आणते. त्यामुळे झाडंही उंच, किडकिडीत होण्याऐवजी अंगानं भरतील, अशी आशा आहे.

कॅटनिप तिर्री

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फुलांचा वाफा छान दिस‌तोय‌. रोप वाढून फुले आली की सुंद‌र‌चा दिसेल .
तुम‌ची माऊ तुम‌च्या सोब‌त बागेत प‌ण येते ... किती चांग‌लीय,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इथे फुलांना म‌र‌ण‌ ज‌न्म‌ता - द‌ग‌डांना प‌ण‌ चिरंजिविता |
बोरी बाभ‌ळी उगाच‌ ज‌ग‌ती - चंद‌न‌ माथी कुठार‌ |
अज‌ब‌ तुझे स‌र‌कार‌ ...

म‌ला फोटो दिस‌त नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुझ्याकडे फेसबुकबंदी आहे का? फेसबुकवरून फोटो लावले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म‌ला फोटो दिस‌त नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅटनिपबद्दल मजा वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0