सध्या काय वाचताय? - भाग २४

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.

=========
‘सेपियन्स- अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्य़ुमनकाइंड'
रोचक तर आहेच . ओघवती भाषा वगैरे . वाचत राहावे असे वाटणारे आहे . सालं ते यारड डायमंड च गन्स स्टील ... असेच वाचनीय वाटत होते , एक ढोबळ चूक सापडेपर्यंत ( वैयक्तिक खोचड सवयीनुसार आता कुठे ढोबळ चूक आणि त्यावर जनरलाईज्ड निष्कर्ष सापडते का हे बघणार यात पण. )

field_vote: 
0
No votes yet

श्री कोल्हटकर , श्री जंतु आणि श्री बॅटमॅन/ किंवा इतर कोणी हे सांगू शकतील का ? वरील पुस्तकातील " लँग्वेज ऑफ नंबर्स " मध्ये खालील लिहिले आहे . हे ऐतिहासिक दृष्टर्या अचूक आहे का अशी शंका . लेखक म्हणतो : But the Arabs get the credit because when they invaded India, they encountered the system, understood it's usefulness, refined it and spread it through the middle East, and then to Europe. When several other signs were later added( addition, subtraction, multiplication) the basis of modern mathematical notation came into being. " हे असेच आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस, साधार‌ण‌प‌णे असेच‌ आहे. आप‌ली नंब‌र‌ सिस्टिम युरोपात‌ गेली ती अर‌बांच्या थ्रु हे ख‌रेच‌. अर‌बांना आप‌ल्या नंब‌र‌ सिस्टिम‌चा प‌त्ता मुह‌म्म‌द‌ बिन कासिम‌नंत‌र लाग‌ला की अगोद‌र‌ही माहिती होते हे तेव‌ढे चेक‌व‌ले पाहिजे. डिबेट असेल त‌र तो फ‌क्त‌ इथेच‌.

आता फ‌क्त‌ नंब‌र‌ सिस्टिम गेली म्ह‌णून मॉड‌र्न ग‌णिती नोटेश‌न‌ आले असे नाही. बाकीची चिन्हे याय‌ला खूप व‌र्षे लाग‌ली, उदा. याकोव्ह पेरेल‌मान‌च्या प्र‌सिद्ध 'अल्जेब्रा कॅन बी फ‌न‌' या पुस्त‌कात‌ दिल्याप्र‌माणे फ्रॅक्श‌न‌ल‌ घातांक, द्याटिज‌ अ^(१/ब‌) हे नोटेश‌न‌ इ.स्. १७०० प‌र्यंत आले न‌व्ह‌ते. १५५२ साल‌च्या र‌शिय‌न‌ ग‌णिती पुस्त‌कात‌ ज‌र व‌र्ग‌मूळ(x) लिहाय‌चे असेल‌, त‌र आर‌.क्यू.(x) असे लिहाय‌चे. आर‌ = रूट‌, क्यू = क्वाड्रॅट‌स‌. बाकी सोडा, खुद्द न्यूट‌न‌च्या ह‌स्त‌लिखित‌ व‌ह्या एक‌द‌म‌ संट्या मोठ‌मोठ्या खंडांत प्र‌काशित झालेल्या आहेत‌. त्यात‌ले नोटेश‌न‌ही ब‌ऱ्यापैकी वेग‌ळेच आहे असे दिस‌ते. आम‌च्या कोल‌कात्यातील कॉलेज‌च्या लाय‌ब्र‌रीत‌ तो एक खंड मी स्व‌त: पाहिलेला आहे. स‌ध्याची स‌र्व‌मान्य‌ नोटेश‌न्स ब‌हुधा इ.स. १८०० च्या आधी न‌सावीत‌च‌. हे सांग‌ताना फ‌क्त‌ युरोप‌ब‌द्द‌ल‌ बोल‌लो कार‌ण पारंप‌रिक भार‌तीय नोटेश‌न्स‌ आप‌ल्याला शिक‌व‌ली जात‌च‌ नाहीत‌. जी शिक‌व‌तात‌ ती स‌र्व युरोपिय‌न‌ नोटेश‌न्स‌च अस‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद . साधारण पणे या मार्गानी ज्ञान गेले होते हे माहित होते पण मला "Arabs get the credit because when they invaded India, " हे वाक्य जरा जनरलाईज्ड वाटले . म्हणून विचारले . ( इस्लामिक इन्व्हेजन हे अरेबिक होते का ? ते साधारणपणे कुठल्या कालखंडात झाले , इ. स . १००० नंतर ? , वगैरे . चूकही असेल मी म्हणतो ते , पण कुतुहूल आहे )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

( इस्लामिक इन्व्हेजन हे अरेबिक होते का ? ते साधारणपणे कुठल्या कालखंडात झाले , इ. स . १००० नंतर ? , वगैरे . चूकही असेल मी म्हणतो ते , पण कुतुहूल आहे )

इस्लामिक इन्व्हेज‌न हे अनेक वेळेस आणि शेक‌डो व‌र्षे झालेले आहे. त्याची प‌हिली लाट‌ ही अर‌बांची होती हे ब‌रोब‌र‌. मुह‌म्म‌द‌ बिन कासिम‌ व‌गैरे. प‌ण‌ तो इन्फ्लुअन्स फार‌त‌र‌ प‌न्नासेक‌ व‌र्षे टिक‌ला. गुर्ज‌र‌ प्र‌तिहारांनी अर‌बांना सिंध‌म‌धून‌ ७५० च्या आस‌पास‌च‌ हाक‌लून लाव‌ले. पुढे म‌ग दोनेक‌शे व‌र्षे काही नाही. एक‌द‌म ९८० म‌ध्ये ग‌झ‌नीच्या म‌ह‌मुदाचे आक्र‌म‌ण‌ झाले तेच. तेव्हापासून‌ ते बाब‌राप‌र्यंत‌ इन्व्हेज‌न‌ क‌र‌णारे लोक अफ‌गाण‌, तुर्क, इराणी व‌गैरे होते. त्यात‌ही अर‌बाळ‌लेले, फार‌सी भाषा बोल‌णारे तुर्क‌ हेच‌ जास्त‌. त्यामुळेच कैक‌ भार‌तीय भाषांम‌ध्ये जुन्या काळी मुस‌ल‌मान आणि तुर्क हे श‌ब्द‌ स‌मानार्थी आहेत‌. संस्कृतात‌ही तुरुष्क हा श‌ब्द‌ त्याच‌ अर्थी घुस‌लेला आहे. म‌राठीत‌ही "दुष्ट‌ तुरुक‌हाचे प‌द‌री" व‌गैरे वाक्ये साप‌ड‌तात‌. तेलुगुम‌ध्ये "तुर्कालु" असा श‌ब्द आहे. हिंदीत‌ही क‌वी भूष‌णाने छत्र‌प‌तींची स्तुती केली तेव्हा "घात‌ तुर‌कान‌ को" असेच व‌र्ण‌न‌ केलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तुर्क म्हणजे टर्कीवाले नसून तुर्कमेनिस्तान वगैरे मध्य आशियावाले हे बरोबर आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तुर्क‌ हे एक टोळीस‌मूह‌वाच‌क‌ नाव आहे- ज‌से मंगोल‌ त‌सेच‌. त्यांचे होम‌लॅंड‌ ते तुर्क‌मेनिस्तान‌ व‌गैरे भागात‌लेच‌. स‌ध्या ज्याला तुर्की म्ह‌णतात‌ त्या देशात ते घुस‌ले इ.स. १०००-११०० नंत‌र‌. बाय‌झॅण्टाईन साम्राज्याब‌रोब‌र‌ त्यांच्या ल‌ढाया होऊ लाग‌ल्या आणि असे म्ह‌ण‌तात‌ की एक ल‌ढाई यात निर्णाय‌क‌ होती. त्या ल‌ढाईनंत‌र‌ तिथ‌ला तुर्की ट‌क्का वाढू लाग‌ला ह‌ळू ह‌ळू.

https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Manzikert

त्यानंत‌र‌ "तुर्की"म‌ध्ये तुर्कांचे साम्राज्य वाढ‌त जाऊन ह‌ळू ह‌ळू बाय‌झॅण्टाईन साम्राज्याची एशिया माय‌न‌र‌म‌धील टेरिट‌री क‌मी होत गेली. तुर्कांच्या अगोद‌र‌ हा भाग ब‌हुश: ग्रीक संस्कृतीचे पाल‌न‌ क‌र‌णारा होता. त्याला ग्रीक‌ भाषेत‌ 'आनातोलिया' अर्थात‌ 'पूर्वेक‌डील प्र‌देश‌' असे जुने नाव होते. (कार‌ण‌ ग्रीस‌च्या पूर्वेस‌ हा भाग येतो म्ह‌णून‌)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह ओके, म्हणजे मुघल आणि आत्ताच्या टर्कीमधले लोक हे एकाच वंशाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अग‌दी र‌फ‌ली हो. तुर्कीम‌ध्ये तुर्क्स येत गेले ह‌ळूह‌ळू ही गोष्ट ख‌रीये, प‌ण‌ जेनेटिक‌ली पाह‌ता अग‌दी होल‌सेल‌ रिप्लेस‌मेंट झालेली दिस‌त नाही. मोर लाईक एलिट इन्फ्लुअन्स ऑफ क‌ल्च‌र‌ व‌गैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह ओके, म्हणजे मुघल आणि आत्ताच्या टर्कीमधले लोक हे एकाच वंशाचे.

हो आणि नाही . त्यांत‌ इंट‌र‌मिक्स - संबंध‌ असेल‌ही प‌ण तुर्कीम‌ध्ये ग्रीस‌वाल्यांशी जेनेटिक ज‌व‌ळिक अधिक असावी. भार‌तात‌ मुघ‌ल आले ते म‌ध्य आशिया ( ग‌व‌ताळ "स्टेप्पे" म‌धुन‌) त्यांचेच‌ चुल‌ते‌ टार्कित‌ही घुस‌ले.
प‌ण टार्किम‌ध्ये ग्रीक प्र‌भाव‌ ह‌जारो व‌र्ष्हे आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकी कै असो प‌ण‌ चेंगीझ‌ खान‌चा मी मोठ्ठा फ्यान आहे. बंदे में द‌म था.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

If you are marching from east to west , you're "barbarian" Ghenghis khan.
If you're marching from west to east, you're Alxender "the great".
(anmd supposedly bringing in "light of civilization" to the world)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डॅनिअल केनमनचं थिंकींग, फास्ट अ‍ॅण्ड स्लो अर्ध वाचून झालय. खूप हळूहळू वाचतोय. आकलन व्हायला थोडा वेळ लागतोय पण खूप रोचक आहे. आपल्या विचारातल्या बायसेसची जाणीव करून देणारं पुस्तक आहे. हे बायसेस मेंदूच्या दोन "काल्पनिक" भागांच्या एकंदर कार्यकारणीमुळे येतात. एक भाग (सिस्टम १) चटकन उत्तर शोधतो, जो नेहमी ऑन असतो, ज‌ल‌द‌ असतो, जो इंट्युइशन, क्रियेटीव्हिटीशी इ. शी निगडीत आहे. तर दुसरा भाग (सिस्टम २) जो स्लो आहे पण रॅशनल, लॉजिकल विचार करतो, त्यासाठी रिसोर्सेस व्यस्त होतात, पण त्याचबरोबर तो आळशी पण आहे आणि त्यातही काही दोष आहेत. इंट्युइशन वर कधी विश्वास ठेवायचा, कधी नाही याचा अंदाज करून देणारं पुस्तक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंडलवर श्रीलाल शुक्लांचे राग दरबारी हे अभिजात पुस्तक केवळ ३७ रुपयांना उपलब्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

SHUT THE FUCK UP
..
हे व्यसन करायचं नाही
ते व्यसन धरायचं नाही
आम्ही सांगू त्याच्याशीच झवाझवी
तुम्हांला वाटेल त्या पुर्षाला धरायचं नाही
शाईला धरायचं नाही
बाटली नाही
जास्तवेळ खाटली पण नाही
सिगरेट फुकायची नाही
चड्डी दाखवायची नाही
खुलेआम कुलेही खाजवायचे नाही
लिहायचं असं नाचायचं तसं बोलायचं असं
भेग दिसली डोंगरांमधली
तर समोरच्याची जीभ येईल खाडक्कन बाहेर लवलवीत
ज्यादा वाकाबिकायचं नाही
तवा गरम FUCKत ओट्यावर
बाकी इच्छा भाजायच्या नाहीत
बुरखा घालायचा नाहीये का, भले !
पण तो काढायचाही नाही मादरच्योत
पोटाला भूक लागली तर हवं तेवढं खा
पण शरीराच्या हाकांना उत्तरं द्यायची नाहीत
जायचं फक्त जा म्हंटल की
आमच्या ढेंगेखालून
घ्यायचा चॉको घे म्हंटलं की
तेव्हा नाक मुरडायचं नाही
नाक छाटून टाकण्यात येईल

#बोल्डक्लिनबोल्ड हडळवेळ
..........................
पोर्न फिल्म पाहून पाहून कंटाळा येतो मग मग. कारण ते सारं फार यांत्रिक, डीरेक्टेड असतं. रोज तीच ती दाबादाबी, ते आर्टिफिशियल अचंबूइक घश्यातलं कण्हणं, आखीवरेखीव मोठाल्या टणटणीत छात्या, घोटीव मांड्या, दटकट कुले, टॅटूड दंड, वेगवान हालचाली, ब्लो जॉब्ज... प्रत्येक क्लिपमधे ठासून भरलेलं. कधी कपलमधलं इरॉटिक सेक्स तर कधी गॅंगबॅंग कधी काळ्यावर पांढरी कधी पांढरीवर तीन काळे.
हे प्रकार अदलूनबदलून पाहिले की जरावेळ मनात घर्षणं होणार पण... उद्दीपित होणार्या मनाची भूक याहून मोठी असल्याचं लक्षात यायला लागतं आणि मग समोर हालणार्या कमनिय देहांकडे पाहूनही शरीरातून कोणताही स्त्राव स्रवणं बंद होतं. मॉडेल्सच्या कोणत्याही पोझिशनकडे पाहून मनाच्या कुपोषित कप्प्याची झीज भरून येतेय का, असं विचारतो आपण स्वत:ला. पण एका मास्ट्रबेशनला हॅंडल देण्यापुढे त्या पोर्नचं आयुष्यात काही कर्म नसतं. तिथे शरम नसते शृंगार नसतो. फकाफकी FUCKत.
खर्या भूकेची जाणीव होते. ही भूक नक्की काय आहे? कुणी फक्त हातात हात घेऊन बसणं, हलकं मिठीत घेणं, अकारण फोन करणं, एकमेकांसोबत असण्यासाठी फसणारे का होईना पण प्लॅन करणं..' बसस्टॉपवर ये ', इतकंंच लिहलेलं एक प्रेमपत्रं.
हे शोधत असतो आपण. ते मिळत नाही म्हणून घुसमटतो आपण. शरीराच्याआधी कुणाचं तरी मन हवंय आपल्याला ह्या जाणीवेने संध्याकाळ खायला उठते आणि रात्र हडळ बनून मानगुटीवर बसते. तारे जळत राहतात एका साकळलेल्या बर्फामधे. कोरडेपणा जळत राहतो घशात उतरलेल्या स्कॉचच्या प्रत्येक घोटासरशी. भूक विझत नाही. मन भरत नाही. गिळत राहते हडळवेळ..
https://www.facebook.com/pg/KhotRenuka/posts
- ReKho

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

४ पेक्षा जास्त माणसं रोज भेटुन समविचारी असल्याचा आनंद करत असतील तर त्याचा अर्थ ;
त्यांच्यापैकी कुणीही विचारच करत नाहीये!
राजु परूळेकर

म‌स्त!!! ध‌न्य‌वाद्.
.

समुद्र - १
समुद्रावर कपडे काढून जाण्याचा भिजण्याचा आनंद कुणी यांच्याकडून शिकावा. आपल्या इथे बर्याचश्या स्त्रिया आपल्या नवर्या मुलांच्या चपला सांभाळत वाळूत काय गिरबिटत बसलेल्या असतात? वय जास्त आहे किंवा शरीर प्रमाणबद्ध नाही, याचा गंड न बाळगता असा मस्त समुद्र अंगावर घेणारी ही स्त्री किती मोहक दिसते आहे

धिस इज सुप‌र‌लाईक!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वारी बुक‌ कॅफे
https://www.waaribookcafe.com/

पुस्त‌क‌ वाच‌त‌ प‌डून‌ राह‌ण्याच‌ं ठिकाण आहे असं स‌म‌ज‌ल‌ं. कोणी येथे गेलं आहे का? यांच‌ं बिज‌नेस‌ मॉडेल‌ काय‌ आहे? असाच‌ काहीसा प्र‌कार‌ बाणेर‌ भागात‌ही आहे असं कोणीत‌री सांगित‌ल‌ं होतं.

हा ख‌र‌ंच‌ सीरिय‌स‌ प्र‌कार‌ आहे का ह‌वा आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

मी गेलो आहे. बिझ‌नेस मॉडेल‌ म्ह‌णाय‌चं त‌र प‌दार्थांची विक्री हे मुख्य असावं. आत जाताना क‌व्ह‌र चार्ज‌ द्यावा लाग‌तो. फार नाही, प‌ण न‌क्की किती ते माहीत‌ नाही (मी फुक‌ट्या होतो.) तुम्ही जे प‌दार्थ‌ माग‌व‌ता त्याच्या बिलातून हे पैसे क‌मी केले जातात‌. प‌दार्थ‌ पुष्क‌ळ होते. (मी काही खाल्ल‌ं नाही; कॉफी प्याली; मी फु** होतो.) शिवाय, काही इव्हेंट्स‌ व‌गैरे अस‌तात‌ त्यांतून‌ही पैसे मिळ‌त असावेत. कोथ‌रुडी म.म.व. त‌रुणांम‌ध्ये लोक‌प्रिय असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कुठंआलं हे ?
अवांतर : प्राचीन काळी कव्हर चार्ज फक्त पुण्यनगरीतील पबांमध्ये आणि डिस्कोथेकात असायचा . आता लायब्रऱ्यांमध्ये कव्हर चार्ज करू लागले क्काय ? बरे दिवस आले म्हणायचे कोथरुडी म म व ना
अति अवांतर : तरुण पिढी करीत प्रश्न : पुण्यात सांप्रत काळी कुठले डिस्कोथेक आहेत , त्यातील कुठले हॉट आहेत ( पंचतारांकित हाटेलातील सोडून )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अति अवांतर : तरुण पिढी करीत प्रश्न : पुण्यात सांप्रत काळी कुठले डिस्कोथेक आहेत , त्यातील कुठले हॉट आहेत ( पंचतारांकित हाटेलातील सोडून )

उर्म‌ट‌प‌णा: मी त‌रूण पिढी न‌स‌ल्याने हा प्र‌श्न‌ अंगाला लावून‌ घेत‌ नाहीये.

प्रामाणिक‌प‌णा: म‌ला माहीत‌ नै हो, फार‌सा क‌धी गेलो नाहीये. एक‌दा हापिस‌कृपेने कोण‌त्यात‌री ल‌ष्क‌री डिस्कोत‌ गेलो त‌र‌ दारात‌च‌ त्यांनी म‌न‌ग‌टाव‌र‌ शिक्का काढ‌ला. म्ह‌स‌ डागाय‌च्या प्र‌काराची आठ‌व‌ण होऊन‌ डोले पानाव्ले. आण‌खी एक‌दा हार्ड‌ रॉक‌ क्याफेम‌ध्ये च‌प‌ला घालून‌ गेलो म्ह‌णून‌ त्यांनी येंट्री नाकार‌ल्याची हृद्य‌ आठ‌व‌ण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

म्ह‌ण‌जे टेक्निक‌ली क‌व्ह‌र‌ चार्ज‌ भ‌रून‌ दिव‌स‌भ‌र‌ प‌डीक‌ राह‌ता येईल‌ त‌र‌.

पुस्त‌क‌ं क‌शी / कोण‌ती आहेत‌?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

पुस्त‌कं एका व्य‌क्तिग‌त‌ संग्र‌हात‌ली आहेत, प‌ण संग्र‌ह‌ ब‌रा आहे त्यामुळे विष‌य‌वैविध्य‌ आहे. शिवाय, तुम्ही ब‌हुधा तुम‌ची पुस्त‌कंसुद्धा घेऊन‌ जाऊ श‌क‌ता, काही म‌.म‌.व‌. त‌रुण‌त‌रुणी अभ्यासिकेसार‌खा वाप‌र‌ क‌र‌ताना आढ‌ळ‌ले (त‌से ते ब्रिटिश‌ लाय‌ब्र‌रीत‌ही अस‌तात‌).

बाप‌ट‌ : ठिकाण‌ मॅक‌डोनाल्ड‌च्या ग‌ल्लीत‌ क‌रिश्मा चौकात‌.
आदूबाळ : नाइट‌क्ल‌ब‌म‌ध्ये जाताना 'ब्रॅन्ड‌' क‌र‌तात‌ हे तुम्हाला ल‌ष्क‌र‌ भागात‌ स‌म‌ज‌ल‌ं म्ह‌ण‌जे तेव्हा तुम्ही साय‌बाच्या देशात जाय‌चे होतात, की जाऊन‌ही सोव‌ळे होतात‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आदूबाळ : नाइट‌क्ल‌ब‌म‌ध्ये जाताना 'ब्रॅन्ड‌' क‌र‌तात‌ हे तुम्हाला ल‌ष्क‌र‌ भागात‌ स‌म‌ज‌ल‌ं म्ह‌ण‌जे तेव्हा तुम्ही साय‌बाच्या देशात जाय‌चे होतात, की जाऊन‌ही सोव‌ळे होतात‌?

ही साय‌बाच्या देशात‌ जाय‌च्या ल‌य‌ व‌र्षं आधीची गोष्ट‌ आहे. (अर्थात‌ साय‌बाच्या देशात‌ जाऊन‌ही मोठं श‌ह‌रार‌क्त‌र‌ंग‌लेप‌न‌ केलं अशात‌ला भाग‌ नै...)

ही ज्या व‌यात‌ली गोष्ट‌ आहे त्या लोल‌दाय‌क‌ आठ‌व‌णी "स‌दाशिव‌ पेठी भ‌टुर‌डा इन‌ म‌ल्टिक‌ल्च‌र‌ल‌ ल्यांड‌" या शीर्ष‌काखाली लिहिता येतील‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

प्राचीन काळी ( म्हणजे आमच्या काळी ) हॉटेल सागर प्लाझा मधील कै . रुमर्स हा चांगला डिस्कोथेक होता . पण सगळ्यात हॉट होता टीडीएस अर्थात टेन डाउनिंग स्ट्रीट ढोले पाटील रोडावरचा . ( हल्ली ते नुस्त रेस्टोरंट आहे म्हणे ) . जहांगीर आणि रुबी च्या समोर ढोले पाटील रोडच्या कॉर्नर ला पण एक होता , आत्ता नाव आठवत नाही .
अति प्राचीन काळी पुण्यातील सुप्रशिध्द मोबो ज हॉटेल मध्ये सुरेख डान्स फ्लोर होता म्हणे . कपूरांसारखी मंडळी नाचून गेलीआहेत तिथे अशी अफवा होती . प्राचीन काळी ( म्हणजे आमच्या काळी ) त्याच डान्स फ्लोर वर टेबलं टाकून सरकारी कार्कुन रजिस्टर्ड लग्नाच्या पावत्या फाडत . ( आणि दारात कावळी वकील मंडळी RTO एजंटच्या इश्टाईल मध्ये "बॉस , शादी करनी है क्या "असे विचारीत . )
तेव्हा प्रचलित शब्द नाईट क्लब हा नसून डिस्क असा होता .
चुकीच्या धाग्यावर माहिती बहुधा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वारीच्या संकेत‌स्थ‌ळाव‌र जाऊन त्यांची गॅल‌री ब‌घीत‌ली. आव‌ड‌ली. मात्र‌ माझ्यासार‌ख्यासाठी नाही. माझं वाच‌न म्ह‌ण‌जे एक‌द‌म‌ गाव‌ठी प‌द्ध‌तीने. म‌स्त‌ खाटेव‌र (इथ‌ं प‌लंग‌, बेड जो काय‌ श‌ब्द‌ असेल तो. ) ब‌नेल‌, ब‌र्मुडा घालून आजुबाजुला दोन-चार उशा घेऊन झोपून वाचाय‌च‌ं. म‌धेच डोळ्याव‌र झोप‌ आली की म‌स्त‌ अर्धा-पाऊण तास झोप काढाय‌ची, पुस्त‌क‌ वाच‌ताना म‌न‌ विचारांच्या जंग‌लात गेल‌ं की त्याला मोकाट उंडारु देत‌ म‌स्त‌ आढ्याक‌डे ट‌क‌ लावून वेड्यासार‌ख‌ं एक‌ट‌क‌ ब‌घ‌त‌ ब‌साय‌च‌ं ! नंत‌र‌ पुन्हा कंटीन्यु ! म‌धेच एखादा च‌हा / कॉफीचा ब्रेक‌ ! आहाहा ! वाच‌नानंद‌ म्ह‌ण‌जे ज‌ब‌र‌द‌स्त‌च !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब‌नेल हा श‌ब्द कैक दिव‌सांनी ऐक‌ला, अनेक आभार‌.

त‌दुप‌रि वाच‌न पोझिश‌न‌शी श‌त‌श: स‌ह‌म‌त‌, मी कंप्यूट‌र‌ही अशाच पोझिश‌न‌म‌ध्ये वाप‌र‌तो कैक‌दा. एक अॅड‌ज‌स्टेब‌ल डेस्क आहे. त्याखाली अगोद‌र आड‌वा होतो, डेस्क तिर‌के क‌र‌तो आणि त्याव‌र लॅप‌टॉप ठेव‌तो. डोके ज‌रा उंच होईल अशा बेताने उशी इ. ठेव‌तो आणि म‌ग ब्र‌ह्मानंदी टाळीच ओ एक‌द‌म‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप छान्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"अ सूटेब‌ल‌ बॉय‌"च‌ं सीक्व‌ल‌ चोवीस‌ व‌र्षांन‌ंत‌र‌ येत आहे.

https://scroll.in/article/838477/a-suitable-girl-is-coming-what-was-it-l...

आणि मूळ काद‌ंब‌रीव‌र‌ बीबीसी मिनीसीरीज‌ काढ‌णार‌ आहेत‌.

अवांत‌र: स्क्रोल‌म‌ध‌ला लेख‌ लिहिणाऱ्या देव‌प्रिया रॉय‌ यांची लेख‌न‌शैली खूप‌ छान‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द गॉड ऑफ फॉल्स थिन्गज्'
हे आत्ता 'भ‌क साला'च्या कृपेने वाच‌लं. ह्यात जे काही आहे ते फार भ‌यान‌क आहे. इत‌र देशात‌ल्या नाग‌रिकांची ह्यामुळे भार‌ताक‌डे पाह‌ण्याची दृष्टी क‌शी होईल, हे चिंताज‌न‌क.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
जाग‌तिक शांत‌तेसाठी एक‌मेव मंत्र - 'म‌रूं दे तिच्याsय‌ला'

The Wages of Sin: Sex and Disease, Past and Present by Peter L. Allen

एका अर्थी हे पुस्त‌क‌ म्ह‌ण‌जे गुप्त‌रोगांचा इतिहास‌ आहे. प‌ण ते पूर्ण‌प‌णे ख‌र‌ं नाही - गुप्त‌रोगांचा इतिहास‌ म्ह‌ण‌ण्यापेक्षा स‌माजात‌ गुप्त‌रोगांविष‌यी अस‌लेल्या म‌तांचा धांडोळा आहे. पुस्त‌काच्या शीर्ष‌कात‌ले Sin, Sex आणि Disease हे श‌ब्द‌ म‌ह‌त्त्वाचे आहेत‌. स‌माजाने स्व‌त:भोव‌ती निर्माण केलेली मूल्य‌व्य‌व‌स्था, त्या मूल्यांच्या विरोधी व‌र्त‌न‌ कर‌ण्याच‌ं "पाप‌" अस‌ं केलेलं ब्रॅंडिंग‌ आणि त‌स‌ल्या 'पापां'म‌धून‌ निर्माण‌ होणाऱ्या गुप्त‌रोगांक‌डे ब‌घ‌ण्याची जुन्यान‌व्या स‌माजाची दृष्टी असा या पुस्त‌काचा व्याप‌क‌ प‌ट‌ आहे.

पुस्त‌कात‌ला म‌ह‌त्त्वाचा व्याप्तिनिर्देश‌ म्ह‌ण‌जे ते आप‌ला फोक‌स‌ पूर्ण‌प‌णे पाश्चिमात्य‌ ज‌गाव‌र‌ ठेव‌त‌ं. युरोप‌ आणि अमेरिका. त्यामुळे यात‌ला 'स‌माज‌' हा ग्रीकोरोम‌न‌ साम्राज्यात मुळं अस‌लेला स‌माज‌ आहे, आणि "पाप‌" हे ब्रॅंडिंग‌ क‌र‌णारा ध‌र्म‌ ख्रिश्चानिटी. त्यातून‌ काढ‌लेले निष्क‌र्ष‌ क‌दाचित‌ स‌ंपूर्ण‌ मान‌व‌जातीला लागू प‌ड‌त‌ही अस‌तील‌, प‌ण अन्य‌ स‌ंस्कृतीत‌ले Sin, Sex आणि Disease याव‌र‌ निरूप‌ण आल‌ं अस‌त‌ं ते त्या अर्थी हे पुस्त‌क‌ 'पूर्ण‌' झाल‌ं अस‌त‌ं. (अन्य‌ स‌ंस्कृतींबाब‌त‌ अस‌ं पुस्त‌क‌ कोणाला माहीत‌ अस‌ल्यास‌ कृ० सुच‌व‌णे.)

म‌ध्य‌युगात‌ला 'प्रेम‌रोग‌' आणि कुष्ठ‌रोग‌, सिफिलिस‌, ब्युबॉनिक‌ प्लेग‌, 'ह‌स्त‌मैथुन‌रोग‌' आणि स‌र्वात‌ शेव‌टी - एड्स‌ असे या पुस्त‌काचे भाग‌ आहेत‌. त्यात‌ले सिफिलिस‌ आणि 'ह‌स्त‌मैथुन‌रोग‌' हे भाग‌ विशेष वाच‌नीय‌ आहेत‌. स‌माज‌ विचार‌ क‌सा क‌र‌तो, म‌त‌ क‌स‌ं ब‌न‌व‌तो हे "विविध‌ भाषांत‌ली सिफिलिस‌ची नाव‌ं" या भागाव‌रून‌ ल‌क्षात‌ येतं. सिफिलिस‌ हे नाव‌ प्र‌च‌लित‌ होण्याआधी फ्रेंच‌ लोक‌ सिफिलिस‌ला 'इटालिय‌न‌ रोग‌' म्ह‌ण‌त‌ अस‌त‌, आणि इटालिय‌न‌ लोक‌ 'फ्रेंच‌ रोग‌'! न‌वा रोग‌ आल्याव‌र‌ प्र‌थ‌म‌ डिनाय‌ल‌, म‌ग‌ त्या रोगाब‌द्द‌ल‌ प‌र‌क्यांना दोषी ठ‌र‌व‌णे, म‌ग‌ त्या रोग्यांनाच‌ पापी ठ‌र‌व‌णे आणि 'भोग‌ आप‌ल्या क‌र्माच‌ं फ‌ळ' टैप‌ श‌हाजोग‌ भूमिका घेणे, अघोरी उपाय‌ क‌र‌णे, हा प्र‌वास‌ ज‌व‌ळ‌ज‌व‌ळ‌ प्र‌त्येक‌ रोगाबाब‌त‌ जाण‌व‌तो. म‌ला वाट‌तं हा म‌नुष्य‌स्व‌भाव‌ आहे, स‌ग‌ळ्याच‌ स‌ंस्कृतीत‌ माणूस‌ सार‌खाच‌ असावा. (कोण‌त्याशा पुस्त‌कात‌ ज‌ग‌न्नाथ‌ कुंट्यांनी लिहिल‌ं आहे, की ते कोण‌त्यात‌री सिनिय‌र‌ अध्यात्मिक‌ गुरूक‌डे स्व‌त:च्या सिग‌रेट‌ सेव‌नाब‌द्द‌ल‌ त‌क्रार‌ क‌र‌त‌ होते. तेव्हा त्या अध्यात्मिक‌ गुरूने "बार‌के भोग‌ आहेत‌, भोगून‌ टाका" असा स‌ल्ला दिला.)

'ह‌स्त‌मैथुन‌रोगा'व‌र‌च‌ं प्र‌क‌र‌ण‌ वाचून‌ म‌राठीत‌ल‌ं 'ते प्र‌सिद्ध‌ चोप‌ड‌ं' कुठून‌ प्रेर‌णा घेऊन‌ आल‌ं असाव‌ं ते ल‌क्षात‌ आल‌ं. त‌री लेख‌काने न‌मूद‌ केलेली त्या 'रोगा'ची कित्येक‌ उदाह‌र‌णं ही काहीत‌री आजार‌ अस‌ल्याची जेन्युईन‌ उदाह‌र‌णं वाट‌त होती. शेव‌टी लेखकाने खुलासा केला आहे की ब‌राच‌ काळ‌ ग‌नोरिया (gonorrhea) हा वेग‌ळा आजार‌ म्ह‌णून‌ ओळ‌ख‌ला गेला न‌व्ह‌ता. ती ल‌क्ष‌णं ग‌नोरिया, न्युरोसिफिलिस‌, ऑटिझ‌म‌, स्किझोफ्रेनिया अशा ब‌ऱ्याच‌ आजारांची असू श‌क‌तात‌, असा लेख‌काचा दावा आहे. ख‌खोदेजा. लेख‌काने लिहिलं आहे की दोन‌ म‌हायुद्धांम‌ध‌ल्या काळात‌ ह‌स्त‌मैथुनाब‌द्द‌ल‌च्या लोक‌म‌तात‌ 'रोग‌' ते 'नॉर्म‌ल‌ शारिरिक‌ क्रिया' असा प्र‌वास‌ झाला. तो नेम‌का क‌सा झाला हे काही लिहिलं नाहीये. क‌दाचित‌ पुस्त‌काच्या विष‌य‌व्याप्तीच्या बाहेर‌च‌ं असेल‌.

एकुणात‌ - वाच‌नीय‌ पुस्त‌क‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

अॅगाथा ख्रिस्ति चे 'लिस्ट‌र‌डेल‌ मिस्ट्री ' वाचाय‌च‌ं ठ‌र‌व‌ल‌य‌. क‌पाटातून‌ बाहेर‌ काढ‌ल‌य‌ . अजून वाचाय‌ला सुरूवात‌ क‌राय‌चीय‌ . Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
राम‌चंद्र‌ क‌ह‌ ग‌ए सियासे - ऐसा क‌ल‌जुग‌ आयेगा |
ह‌ंस‌ चुभेगा दाना, तिन‌का - कौआ मोती खाएगा ||

पॉल थरो च "The Old Patagonian Express " वाचतोय . बोस्टन ते अर्जेन्टिना तील पॅटागोनिया रेलवे प्रवास वर्णन . टिपिकल नसलेलं .. ( मला ) अज्याबात माहित नसलेल्या जगाच्या भागाचं वर्णन ... मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील वर्णने फार दारुण आहेत ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माबोवरचा एक विनोदी लेख कविसंमेलनाचा बट्याबोळ!
मसाप मधील कविसंमेलनाचा बट्याबोळ!
- बेफ़िकीर

2) "The Old Patagonian Express "- थोडक्यात लिहिणार का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>The Wages of Sin: ~~~~~"

होय त्यांना पापी समजत, दगडांनी मारत अथवा गावाबाहेर एका ठिकाणी टाकून देत कोंडून ठेवत. आपल्याकडे साप चावून मृत्यु पापी लोकांना येतो अशी अजूनही समजूत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जी ए कुलकर्णी यांचे 'एक अरबी कहाणी' मिळाले, ते वाचतोय...अनुवाद आहे...प्रगती संथ आहे...सुरुवातीलातरी भरभर वाचून पुढे जावे असे वाटत नाही...कोणी वाचले आहे का ते पुस्तक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

द‌ जीन्स - सिद्धार्थ मुख‌र्जी वाच‌ते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाय‌ला!! मी प‌ण घेत‌लंय‌ हे.. वाचाय‌ला क‌राय‌चीये सुरूवात अजून‌..
क‌संय हे पुस्त‌क?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

म‌ला आव‌ड‌ल‌ं नाही. डार्विन‌ब‌द्द‌ल‌ वाच‌तानाच‌ कंटाळ‌ले. उद्या ग्र‌ंथाल‌यात जाउन मी प‌र‌त क‌र‌ते आहे. या पुस्त‌काब‌द्द‌ल‌, अतिश‌य‌ चांग‌ले ऐकुन आहे प‌ण म‌ला क‌ंटाला आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदुस्तान टाइम्स (श‌निवार १७ जून्)च्या अंकात 'द‌ ग्रेट गेम इन अफ्घानिस्तान्: राजीव गांधी, ज‌न‌र‌ल झिया अॅंड द‌ अनएन्डिग वॉर्' या क‌ल्लोल भ‌ट्टाचार्य‌ यांच्या पुस्त‌कात‌ला एक उतारा छाप‌ला आहे. तो वाचून पुस्त‌क ब‌रे असावे अशी अपेक्षा आणि वाच‌ण्याची उत्क‌ण्ठा निर्माण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज‌पासून सुरू:
आस्क विथ व्हाय‍ ले. साय‌म‌न‌ साय‌नेक‌, सेपिय‌न‍ अ. ब्रि. हि.
आणि
टू किल अ मॉकिंग‌ब‌र्ड‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मेघदूतम व‌र‌ आसावरी बापट यांची ही लेख‌माला (२०१४ च्या लोक‌प्र‌भा म‌ध‌ली) खूप‌ आव‌ड‌ली. मेघ‌दूत‌च‌ इत‌कं छान‌ र‌स‌ग्र‌हण‌ यापूर्वी वाच‌ल‌ं न‌व्ह‌त‌.

http://www.loksatta.com/lokprabha/meghdoot-615556/
http://www.loksatta.com/lokprabha/meghadutam-648755/
http://www.loksatta.com/lokprabha/meghadoot-3-661242/
http://www.loksatta.com/lokprabha/meghadoot-2-673306/
http://www.loksatta.com/lokprabha/meghadoot-696300/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा खरे तर एक (लोकरंग मधील - 2 जुलै, श्री श्याम मनोहर यांचा) लेख आहे। त्यामुळे हा विषय कोठे टाकावा हा प्रश्न होता, कारण ही बातमी नाही किंवा पुस्तक पण नाही।
परंतु लेख अत्यंत मर्मग्राही असल्यामुळे ऐसीच्या सर्व सदस्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असे वाटले। म्हणून हा प्रपंच। जारुर वाचा।

एक छोट्याश्या लेखात त्यांनी किती मूलभूत आशय व्यक्त केला आहे हे बघून त्यांच्या ताकतीचा अंदाज यावा।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

लेखातली न पटलेली गोष्ट:

लेखाच्या उत्तरार्धात कविता आकाळण्याची सगळी जबाबदारी वाचकांवर टाकली आहे. हे म्हणजे भेंडी कवीला कायपन लिहायचा लायसन आहे, आणि त्याचा अर्थ वाचकाने शोधत बसायचा होय रे! 'पहिल्या खेपेला कळलं नाही तर परत वाचा' बरोबर आहे, पण ते परत वाचन होण्यासाठीचा 'हुक' तर कवीने दिला पाहिजे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

मुळात आज‌काल, साधार‌ण क‌वींना जिथे प्र‌सिद्धीची भ‌यान‌क हाव अस‌ते, तिथे अक्ष‌र‌श: काहीही 'लिहीत सुट‌णारे' कवी फार जास्त प्र‌माणात अस‌तात. गुग‌ल‌व‌र साधं 'marathi kavita' इमेजेस म‌ध्ये स‌र्च क‌रा. दिव्व‌स‌भ‌र व्हॉट्सॅप, फेस‌बुकव‌र ह्या अस‌ल्याच क‌वितांचा मारा होत अस‌तो. म‌ग, ख‌रोख‌र 'मौज‌ग्रेड' क‌विता वाचाय‌ला मिळाव्यात ह्या अपेक्षेने आंजाव‌र ब‌स‌लेल्या माण‌साला अजिबात इच्छा होत नाही प्र‌त्येक क‌विता वाचाय‌ची. म‌ग, म‌नोह‌रांच्या म्ह‌ण‌ण्याप्र‌माणे काय घ‌ंटा अर्थ लाव‌त ब‌स‌णार प्र‌त्येक र‌द्दी क‌वितेचा?
ह्या अस‌ल्या वाट‌स‌रूंम‌धून एखादाच अनंत‌यात्री मिळ‌तो. त्यांची क‌विता ख‌रंच चिंत‌न क‌र‌ण्यासार‌खी अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________________________________________
जाग‌तिक शांत‌तेसाठी एक‌मेव मंत्र - 'म‌रूं दे तिच्याsय‌ला'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ्रॅंक ह‌र्ब‌र्ट‌कृत ड्यून वाच‌तोय‌. आज‌व‌र‌ची स‌र्वांत पापिल‌वार साय‌फाय कादंब‌री. मॅट्रिक्स‌, स्टार‌वॉर्स, इ. स‌र्वांचा प‌प्पा आहे काल‌दृष्ट्या पाह‌ता. मांड‌णी, व‌र्ण‌नेही म‌स्त रोच‌क आहेत‌. स‌ध्या २१६ पानेच झालीत‌. ६०० पाने झाली की म‌त लिहितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एच एच मन्रो (साकी) यांची ड‌स्क हि ल‌घुक‌था (४ - पानी ) वाच‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

एच एच मन्रो (साकी) यांची ड‌स्क हि ल‌घुक‌था (४ - पानी ) वाच‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

जयराम रमेश लिखित ' इंदिरा गांधी , अ लाईफ इन नेचर' घेतलं किंडलवर .... बघू कसं आहे ते आता ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी मिठाची बाहुली - वंदना मिश्र
राजहंस प्रकाशन किमंत १७५ रुपये

डिसेंबरमध्ये भारतात असताना वंदना मिश्र ह्यांच्या निधनाची बातमी वाचली त्यात दोन उल्लेख होते - एक म्हणजे त्या अंबरीश मिश्र ह्यांच्या आई आणि दुसरा म्हणजे त्यांनी लिहिलेलं मी मिठाची बाहुली हे पुस्तक.
मी ज्या दुकानांत विचारलं तिथे तरी हे पुस्तक उपलब्ध नव्हतं पण मग त्यानंतर जवळजवळ ६ महिन्यांनी माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीने बुकगंगावरून घेऊन मला इकडे पाठवलं. (थँक्यू संध्याकाकू)

संपूर्ण पुस्तक म्हणजे एका आज्जीच्या गप्पा गोष्टी ऐकत बसल्याचा अनुभव आहे. ( मी माझ्या आज्जीशी आणि नवर्याच्या आज्जीशी खूप गप्पा मारत बसते ( मोस्टली ऐकत ) ). पण ह्या आज्जी टिपिकल आज्जी नाहीत. त्यांनी चाळीसच्या दशकात नाटकांत कामं केली आहेत , कुटुंबासाठी घराबाहेर पडून पैसे कमावले आहेत , हॉटेलात जाऊन भजी खाल्ल्यात, त्यांच्या भाषेत सांगायचं तर मिश्र विवाह (आंतरजातीय , आंतरभाषीय ) केलाय आणि हो , मजा म्हणून सिगरेटसुद्धा ओढली आहे .

पुस्तक अगदी बोलल्यासारखं लिहिलंय , मध्येच विषयांवरून विषय भरकटले आहेत , अगंबाई कुठून कुठे आले मी बोलता बोलता असं म्हणून परत सावरूनही घेतलंय . त्यांच्या लहानपणीचे किस्से , आता नावाजलेल्या कलाकारांचे सुरुवातीचे दिवस व आठवणी, नाटकातली आणि इतर गाणी असा बराच ऐवज आहे पुस्तकात. त्यांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत असा ७०-८० वर्षांचा काळ येतो पुस्तकात , मुंबईच्या चाळी , भय्ये , मध्येच मिळालेलं स्वातंत्र्य , पृथ्वीराज कपूर , लता मंगेशकर मामा वरेरकर आणखी बरेच जण . लहानपण आणि तरुणपण (म्हणजे विशीपर्यंत ) च्या आयुष्याबद्दल खूप भरभरून लिहिलंय , तो काळ त्यांनी भरभरून जगलाय , एंजॉय केलाय असं जाणवत राहतं . पण खडतर काळातील खाजगी आयुष्याबद्दल जरा हातचं राखून ठेवून सांगितलंय असं वाटलं. अंबरीश मिश्रांच्या "दरवळे इथे सुवास " मध्ये त्यांच्या मोठया बहिणीबद्दल , त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक खडतर काळाबद्दल , त्यांच्या विसंगत शेजारामुळे कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल बरंच सविस्तर वाचायला मिळतं पण वंदना आज्जींनी ते ३-४ पानातच गुंडाळल्यासारखं वाटलं . कदाचित कडू आठवणी लिहून त्यांना त्रास होत असेल किंवा कशाला परत वाईट आठवणी उगाळा असंही वाटलं असेल.

पुस्तकात नकळत केलेल्या विशेष टिप्पण्या आहेत जसकी " माझा आणि बहिणीचा आंतरजातीय विवाह झाला पण आईने सून मात्र सारस्वतच बघून आणली " किंवा " मिश्राजीनी लग्नाच्या आगोदर मला "सिगरेट सोडावी लागेल " असं निक्षून सांगितलं ; त्यांनी मात्र सिगरेट सोडली नाही. "
मध्ये मध्ये मिश्किली आहे, शेवटची दोन पानं म्हणजे थोडासा उपदेश केलाय पण एकंदरीत पुस्तकाच स्वरूप पुढच्या पिढीला एका आज्जीनी सांगितलेल्या आठवणी असं असल्याने तो उपदेश अजिबात खुपत नाही.
बाकी थोड्या तांत्रिक चुका आहेत - एके ठिकाणी मिश्राजी ( आज्जींचे यजमान ) १९९२ मध्ये गेले असं लिहिलंय तर एके ठिकाणी १९८२ मध्ये. माझं आकड्यांकडे जरा जास्तच लक्ष जात असल्याने जाणवलं .

बाकी मला सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे - "आज" च भिंग लावून पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळाची समीक्षा करणं , "आज " चे निकष नियम लावून त्या काळातल्या स्त्रियांच्या विचारांवर , वर्तनावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही. आमच्या काळात शांतपणे , समंजसपणे आणि कणखरपणे जगण्याला भिडणं हा एकच पर्याय आमच्या हाती होता .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

वॉल्ट‌र द ला मेर यांची नॅप ही क‌था वाच‌ली. काय‌ ते दुपार‌च्या एकांती झोपेचं कौतुक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

नासिरुद्दिन‌ श‌हा यांचे, स‌ई प‌रांज‌पे यांनी अनुवादित केलेले पुस्त‌क‌,' आणि म‌ग‌ एक‌ दिव‌स‌' वाच‌ले.
ब‌ऱ्यापैकी प्रांज‌ळ‌प‌णे आठ‌व‌णी लिहिल्यात‌. प‌ण‌ लेख‌न‌ विस्क‌ळीत‌ वाट‌ले. स‌ग‌ळ्या क‌रिय‌र‌चा व्य‌व‌स्थित‌ मागोवा, नाही घेत‌ला. त‌रीही एक‌दा वाच‌ण्यासार‌खे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ मोदी
बाकीची नुस‌तीच‌ भाऊग‌र्दी.

जयराम रमेश लिखित 'Indira Gandhi , A life in nature '. वाचतोय . पुस्तकाच्या बाबतीत एक आक्षेप की सुरुवात अति बाळबोध आणि भक्तीभावपूर्ण आहे . आक्षेप इथे संपले . अनेक कागदपत्र , पत्रव्यवहार लेखकाने जमवला आहे आणि या मुळे हे पुस्तक निदान निसर्गविषयक जाण, ममत्व अथवा प्रेम असणाऱ्या मंडळींकरिता हे पुस्तक म्हणजे एक खजिना आहे .( एकच लिहितो , आज ज्या अनेक गोष्टी , कायदे गृहीत धरले जातात त्यांचा मागमूसही १९७० च्या पूर्व नव्हता ) तत्कालीन राजकारणाची थोडी माहिती मला होती . आणि माझा असा (गैर) समज होता ,की इंदिराबाईना साधारण वाघ टिकायला हवेत ( तेव्हा शिकार लीगल होती आणि वाघांची संख्या 800 हुन कमी झाली होती) इतपत वरवरच्या माहितीवर त्यांनी त्यांच्या हुकूमशाही पद्धधतीने प्रोजेक्ट टायगर लादलं . पुस्तकातील पत्रव्यवहारातून हे दोन्ही गैरसमज दूर झाले . बाईंनी लहानपणापासून निसर्गप्रेम, व अभ्यास तज्ज्ञांशी पत्रव्यवहारातून डेव्हलप केला होता . आणि या सगळ्या गोष्टी स्वतःच्या (या बाबतीत) अजाण सहकाऱ्यांच्या गळी उतरवताना त्यांची भरपूर फरपट झाली हे पत्रव्यवहारातून दिसते . आज अस्तित्वात आलेले बरेचसे निसर्ग व प्रदूषण विषयक कायदे हे त्यांच्या काळात evolve झाले .. इंदिरा बाईबद्दल अनेक आक्षेप आहेत , पण या मुद्द्यांवर त्या नक्कीच सर्व ग्लोबल नेत्यांच्या पेक्ष्या थोर आणि उजव्या ठरतात .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==उजव्या ठरतात==
अण्णा, डावे उजवे शब्द वापरताना डिस्क्लेमर देउनच वापरा! Smile मला द्याल काय पुस्तक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किण्डल वर घेतलंय . माझं वाचून झालं की किण्डल देतो.( का अजून काही शॉर्टकट आहे ?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही अण्णा, शॉर्टकट कटकटीचा आहे. त्यापेक्षा मीच घेतो विकत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचाय‌ला ह‌वे असे वाट‌ते आहे..
म‌ला वाट‌ते, शांतीनिकेत‌नात‌ल्या त्यांच्या वास्त‌व्याने(अल्प का होईना) ही निस‌र्ग‌, प‌र्याव‌र‌णास‌ंब‌ंधीची जाण विक‌सित झाली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

फक्त तेच नाही , पण त्यांनी लहान/ तरुण पणापासून कायम तज्ञांबरोबर पत्र व्यवहार ठेऊन स्वतःची 'जाण' वाढवली असावी . त्यातील काही पत्रे या पुस्तकात आहेत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोच‌क (उत्त‌म अर्थे) आहे. पाहिले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलीक‌डे वाच‌लेली पुस्त‌के दोन:

१. ड्यून‌ बाय फ्रॅंक ह‌र्ब‌र्ट‌.

साय‌फाय‌ कादंब‌री आहे. वाळ‌वंटी ग्र‌हाव‌र‌ एक जादूई म‌साला साप‌ड‌तो, तो प्याल्याव‌र किंवा खाल्ल्याव‌र स‌र्व व्याधींचे निराक‌र‌ण होते, क‌स‌लाच प्रॉब्लेम येत नाही. आणि अख्ख्या आकाश‌गंगेत फ‌क्त एकाच ग्र‌हाव‌र तो साप‌ड‌तो. म‌ग त्याच्या प्रॉड‌क्श‌न‌क‌रिता क‌शी मारामारी चाल‌ते, क‌सं पॉलिटिक्स अस‌तं, इ.इ. स‌र्व उत्त‌म‌रीतीने व‌र्ण‌न केलंय‌. आणि त्या ग्र‌हाव‌र‌चे ते गूढ‌ "फ्रेमेन‌" लोक्स आणि त्यांची ती भाकिते...एकूण‌ ट‌र्मिनॉलॉजी इस्लाम‌प्रेरित आहे. मुअद्दिब हे त्यात‌ल्या भावी प्रेषिताचे नाव अस‌ते. ह‌ज‌, पाद‌शाह‌, बेने गेसेरिट‌, इ.इ. अनेक श‌ब्द‌, मेटाफ‌र‌, इ.इ. भेट‌त राह‌तात‌. ही अॅक्चुअली एक म‌ल्टी-कादंब‌री सेरीज आहे, त्यात‌ली प‌हिली कादंब‌री झाली वाचून‌. पुढ‌च्या सेरीज‌ब‌द्द‌ल उत्सुक‌ता आहे, प‌ण स‌म‌हाऊ फाऊंडेश‌न सेरीज इत‌की प्र‌भावी आणि खिळ‌वून टाक‌णारी नाही वाट‌ली. ब‌हुधा स‌व‌यीमुळे असेल‌. प‌ण गौर‌त‌ल‌ब बात ये है मिलॉर्ड की ही म्ह‌णे आद्य साय‌फाय‌ आहे. म्ह‌ण‌जे ज्यूल्स व्ह‌र्न‌च्या काळाइत‌की जुनी न‌व्हे अर्थात‌च, प‌ण फौंडेश‌न सेरीज‌, स्टार‌वॉर्स‌, इ. च्या अगोद‌र‌ची. तेव्हा त्या हिशेबाने पाह‌ता न‌क्कीच म‌स्त आहे. ब‌हुधा ब‌हुतेक कादंब‌री एकाच ग्र‌हाव‌रील घ‌डामोडींव‌र केंद्रित अस‌ल्याने, स्पेस ट्रॅव्ह‌ल‌व‌र‌ फार जास्त भ‌र न‌स‌ल्याने थोडे पानीक‌म वाट‌ले असावे. प‌ण व‌र्म‌ राय‌डिंग, क्रिस्क‌नाईफ, बेने गेसेरिटांच्या माईंड‌ स्किमा, इ. प्र‌कार अतिज‌ब‌र‌द‌स्त आहेत‌. विशेष‌त: व‌र्म (मेक‌र‌) राय‌डिंग म्ह‌ण‌जे त‌र काय बॉ, नाद‌च खुळा. असा तो शेक‌डो फूट लांब‌, कैक फूट लांब‌रुंद तोंड अस‌लेला व‌र्म ऊर्फ गांडूळ‌. त्याच्याव‌र स्वारी क‌रून मैलोन‌मैल जाणारे ते फ्रेमेन‌. डोळ्यांचा फ‌क्त ग‌र्द निळा क‌ल‌र‌. ती विषारी क्रिस्क‌नाईफ‌, ते गॉम जॅब‌र‌, वाळ‌वंटी ग्र‌हात पाणी क‌से वाच‌वाय‌चे त्याच्या टॅक्टिक्स‌, ते स्टिल‌सूट मॅन्युफॅक्च‌रिंग व‌गैरे...म‌जा आ ग‌या साला. बेने गेसेरिटांचा स‌ग‌ळे राजेलोक्स‌ तिर‌स्कार क‌र‌तात‌ त‌री त्यांच्या इन्फ्लुअन्स‌पासून ते वाचू श‌क‌त नाहीत ते पाहून ३.५% विरुद्ध ब्रिगेड‌ या स‌दाब‌हार‌ साम‌न्यातील मुख्य भ‌ळ‌भ‌ळ‌त्या ज‌ख‌मेची आठ‌व‌ण झाली. लैच म‌स्ताड लिहिलंय साला. ही कादंब‌री म‌राठीत भाषांत‌रित झाली पाहिजे. आणि श‌ब्द‌श: नाही, थोडे रेंड‌रिंग क‌स्ट‌माय‌झेश‌न झाले पाहिजे त‌र‌च म‌जा येईल‌ वाचाय‌ला. मेटॅफ‌रांम‌ध्ये इस्लामिक‌ + ख्रिश्च‌न‌ + अंम‌ळ‌ हिंदू (प्राण‌बिंदू पॉव‌र‌ व‌गैरे श‌ब्द आहेत‌.) उधार‌ उस‌न‌वारी आहे. म‌स्ट म‌स्ट आणि मस्त रीड‌. द‌ण‌द‌णीत रेक‌मेण्डेश‌न‌.

आता कौतुकाच्या काही रॅंटी:

अजूनेक न आव‌ड‌लेली गोष्ट म्ह‌ण‌जे लेटोपुत्र पॉल ऊर्फ नंत‌र‌चा मुअद्दिब हा नंत‌र‌नंत‌र‌ ज‌णू आप‌ण प्रॉफेट होणार याच्या खंप्लीट खात्रीत‌च अस‌तो. काय बोलाय‌ची सोय नाही. अरे भ‌ड‌व्या किमान कादंब‌रीपुर‌ता त‌री ज‌रा हेजिटंट र‌हा म्ह‌णावे. म्ह‌ण‌जे त‌त्त्व‌त: तो दाख‌व‌लाय ज‌रा फाय‌टिंग‌बिटिंग क‌र‌ताना त‌सा, प‌ण एकुणात‌ सो फ‌किंग शुअर ऑफ हिम‌सेल्फ‌. म‌ग असं दाख‌व‌ल्याव‌र ज‌रा पुढ‌चा अंदाज येतोच ना की बॉ काही असो हा साला स‌ब‌को प‌छाड‌ देगा. म‌ग वाच‌नात म‌जा ती काय राहिली?

तेव‌ढा एक अॅस्पेक्ट सोड‌ला त‌र म‌स्त म‌स्त‌र म‌स्तेस्ट आहे.

२. कान्होजी आंग्रे बाय म‌नोह‌र‌ मुळ‌गाव‌क‌र‌ (की माळ‌गाव‌क‌र‌?) आणि भाषांत‌र बाय पुलं.

आंग्र्यांब‌द्द‌ल म‌ला अगोद‌र जुज‌बीच माहिती होती. या कांद‌ब‌रीव‌जा प‌ण एकुणात‌ नॉन‌फिक्श‌न‌ घाटाच्या पुस्त‌काने बेसिक माहिती ब‌रीच उत्त‌म‌रीत्या पुर‌व‌लेली आहे. आंग्र्यांचे क‌र्तृत्व त‌र दिस‌तेच‌, शिवाय‌ पेश‌वेकाळात‌ श‌हाजी-शिवाजी-राम‌दास यांना क‌र‌स्पॉण्डिंग बाळाजी विश्व‌नाथ‍-बाजीराव‍-ब्र‌ह्मेंद्र‌स्वामी ही तिक‌डी दिस‌ते. एग्झॅक्ट इक्विव्हॅल‌न्स नाही प‌ण ज‌रा त‌से आहे ख‌रे. ब्र‌ह्मेंद्र‌स्वामींब‌द्द‌ल मी अगोद‌र शेज‌व‌ल‌क‌रांच्या लेखांत‌च ओझ‌र‌ते वाच‌लेले. फाय‌नान्स‌र व‌गैरेचे काम‌ही ते क‌र‌त हे म्ह‌ण‌जे उदाह‌र‌णार्थ थोर‌च आहे. एक सिद्दीही त्यांचा भ‌क्त होता व‌गैरे व‌गैरे मोलाची माहिती यात आहे. यात‌ल्या कैक गोष्टी ओझ‌र‌त्या इक‌डून तिक‌डून वाच‌लेल्या होत्या त्यांना सुसूत्र‌प‌णे उत्त‌म‌रीत्या गोव‌ले आहे. पुलंचे भाषांत‌र‌ काही ठिकाणी ख‌ट‌क‌ते, स‌र‌ळ स‌र‌ळ भाषांत‌र आहे हे दिस‌ते. ते त्यांनी टाळाय‌चा प्र‌य‌त्न केला अस‌ता त‌र अजून चांग‌ले झाले अस‌ते. थोडे क‌स्ट‌माय‌झेश‌न आवश्य‌क आहे. हेही म‌स्ट रीड‌ आहे.

३. राजीव म‌ल्होत्राचे बॅट‌ल फॉर संस्कृत हे स‌ध्या वाच‌तोय‌. वाचून झालं की लिहितो. अनेक कार‌णांमुळे हे पुस्त‌क वाच‌णे तूर्त आव‌श्य‌क आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कृपया इंग्रजी पुस्तकांची व लेखकांची नावे त्याच लिपित (सुद्धा) दिलीत तर शोधावयास बरें.

अवांतर- Hi (हाय) चा अनुवाद 'ही' असा केलेला आहे अशी श्रीकांत सिनकरछाप अनुवादित पुस्तकांचे झालेले वाचन असा आमचा इंग्रजीचा अथांग व्यासंग.

बाकी श्रीकांत सिनकर, अनंत तिबिले,बाबा कदम इ.इ. लेखक/अनुवादक या वाळीत टाकण्यात आलेल्या साहित्यप्रवाहावर ऐसीवर एखादा विशेषांक काढावा . खेडोपाडी, तालुकास्तरावर , जिल्हास्तरावर अशा कादंबर्‍यांचा एक खास वाचक आहे.

जेम्स हॅडले चेस, अलिस्टर मॅक्लेन, सिडने शेल्डन, आर्थर हॅले, अ‍ॅगाथा ख्रिस्ती असे अनेक रथी-महारथी ख्रिस्तवासी झाल्यापासून वो मजा नही राहा. आम्ही अनुवाद करायचा तरी कसला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

Dune by Frank Herbert.

बाकी ते तिबिले, सिन‌क‌र‌, इ. ब‌द्द‌ल त‌हे दिल‌से स‌ह‌म‌त‌. इच‌ल‌क‌रंजी काम‌गार क‌ल्याण लाय‌ब्रीतून बाबा अनेक कादंब्र्या आण‌त‌ त्यांत ही आणि इत‌र काही नावे प्रामुख्याने अस‌त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२. कान्होजी आंग्रे बाय म‌नोह‌र‌ मुळ‌गाव‌क‌र‌ (की माळ‌गाव‌क‌र‌?) आणि भाषांत‌र बाय पुलं.

बॅटोबा, हे पुस्त‌क तू आत्ता वाचावेस ( ह्यात "तू" ह्या श‌ब्दाव‌र जोर कार‌ण तुझे म‌राठी इतिहासाव‌र‌चे प्रेम ). ही त‌र फ्रंट‌पेज ची न्युज आहे.
मी ( सुद्धा ) ही कालेजात अस‌ताना वाच‌ली होती.
आंग्रेंनी ताराराणीची बाजु घ्याय‌ला पाहिजे होती, तुझे काय म‌त्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते ख‌रंय म्ह‌णा, प‌ण म‌राठी इतिहासाचा स‌खोल अभ्यास मी गेल्या ४-५ व‌र्षांपासून‌च सुरू केलाय‌, त्यात‌ही शिव‌काळाच्या तुल‌नेत‌ पेश‌वेकाळाब‌द्द‌ल माझा तित‌कासा अभ्यास नाही. ही मोठ्ठी उणीव‌ भ‌रून काढ‌ण्यासाठी म‌ध्ये अनेक पुस्त‌के वाच‌णे सुरू केले. त्यात‌ही ल‌क्षात आले की म‌राठी आर‌माराब‌द्द‌ल‌चे वाच‌न एकदोन पुस्त‌कांप‌लीक‌डे नाही. त्यामुळे शिवोत्त‌र‌कालीन, विशेष‌त: आंग्रेकालीन पोलिटिक‌ल‌ माहितीक‌रिता ते वाच‌णे आव‌श्य‌क होते म्ह‌णून म्ह‌ट‌ले सुरुवात याने क‌रावी.

बाकी आंग्रेंनीच न‌व्हे त‌र इत‌रांनीही ताराराणीचीच बाजू घ्याय‌ला पाहिजे होती असे म‌ला वाट‌ते कैक‌दा. ताराराणीच्या शास‌नात म‌राठी राज्य अजून चांग‌ले झाले अस‌ते. राणींचे बॅड‌ल‌क‌च ख‌राब‌. शाहूला दिल्लीब‌द्द‌ल आत्मीय‌ता अस‌ल्यामुळे मोग‌ल‌बाद‌शाही टिक‌ली शेव‌टी. ताराराणी अस‌त्या त‌र दिल्ली उध्व‌स्त‌ केली अस‌ती न‌क्कीच‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोहर माळगांवकरांनी आंग्र्यांवर लिहिलेलं हे पुस्तक फारच मस्त आहे. अनुराव आणि बॅट्या - माळगांवकरांनी कोल्हापूरकरांवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे (Chatrapatis of Kolhapur). (पीडीएफ मिळाली तर पाठवतो.)

तसंच, Puars of Dhar (की Dewas) हेही आहे. याचप्रमाणे मराठा लाईट इन्फट्रीवर आधारित Distant Drums नावाची कादंबरी आहे.

माळगांवकर कादंबरीकार म्हणून फार अंडररेटेड आहेत असं मला नेहेमी वाटतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

माळ‌गाव‌क‌रांचे दुस‌रे एक पुस्त‌क मात्र‌ म‌ला आव‌ड‌ले न‌व्ह‌ते, आता नाव आठ‌व‌त नाही. किंवा अनुवाद वाच‌ल्यामुळे असेल्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अव‌श्य पाठ‌वा कादंब्री पीडीएफ‌.

बाकी अंड‌र‌रेटेड व‌गैरे सोडा, हे नाव त‌री कुणाच्या खिज‌ग‌ण‌तीत आहे की नाही कोण जाणे. ब‌र या कादंब‌ऱ्या लिहिल्या इंग्लिश‌म‌ध्ये, त्यांची द‌ख‌ल कुणीत‌री क‌धी घेत‌लीय का? पुलंच्या भाषांत‌राव‌रून ओरिगिन‌ल उत्त‌म असेल असे वाट‌ले होतेच‌. एक आर‌मार‌वेडा प्राणी माझ्या फेबु लिष्टीत आहे त्याने म‌ला इंग्र‌जी पीडीएफ‌ही पाठ‌व‌लीये, ती नीट वाच‌तो.

म‌राठा लाईट इन्फण्ट्रीव‌र‌ ज‌कुचं पुस्त‌क आहे ना? त्याव‌र‌ कादंब‌री लिहिणं म्ह‌ण‌जे उदाह‌र‌णार्थ भारीच काम‌ की!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हिंद‌ बुक्स‌" या त‌त्कालीन‌ मेह‌ता प्र‌काश‌नामार्फ‌त‌ त्यांच्या काद‌ंब‌ऱ्या प्र‌काशित‌ होत‌ अस‌त‌. म‌ला वाट‌तं त्यामुळे त्यांना कोणी सिरिय‌स‌ली घेत‌ल‌ं न‌साव‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

त‌रीच‌!!!! नाय‌त‌र म‌राठी इतिहासाव‌र इत‌की स‌श‌क्त इंग्लिश कादंब्री लिहिणारे हे साहेब प‌हिले अन एक‌मेव‌च असावेत‌, क्या बोल्ते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, स‌ह‌म‌त‌ आहे. दुस‌र‌ं नाव‌ (जुन‌ं किंवा न‌व‌ं) आठ‌व‌त‌ नाहीये.

किंब‌हुना, म‌राठी पार्श्व‌भूमीव‌र‌ इंग्र‌जी काद‌ंब‌री लिहिणारेही फार‌से नाहीयेत‌. (किर‌ण‌ न‌ग‌र‌क‌र‌ एक‌ आहेत‌.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

ह‌म्म रैट्ट‌. ते न‌ग‌र‌क‌र‌ कादंब्रीवाले, चित्रे अन कोल‌ट‌क‌र क‌वितावाले. बाकी कोणी माहिती इल्ले.

तुम्हीच ज‌रा म‌नाव‌र घ्याय‌चं ब‌घा ज‌रा आता.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहीतीत ( गुग‌लुन ब‌घित‌ले नाहीये ) माळ‌गाव‌क‌र नावालाच म‌राठी असावेत्. ते म‌ध्य‌भार‌तात‌ले होते असे वाच‌ल्याचे आठ‌व‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस‌तील‌. ब‌ट स्टिल‍ - म‌राठी इतिहासाव‌र इंग्लिश कादंब‌ऱ्या लिहिणारे ते प्र‌थ‌म‌च‌.

बाकी म‌राठे अट‌केपार गेले त्याब‌द्द‌ल अनीश गोख‌ले नाम‌क लेख‌काची "स‌ह्याद्रीज टु हिंदुकुश‌" ही एक कादंब‌री अलीक‌डे आलेली आहे. त्याच लेख‌काने आसामी वीर लाछित ब‌ड‌फुक‌न याव‌र‌ही कादंब‌री लिहिलेली आहे. पोर‌गा ख‌ट‌प‌ट्या, उद्योगी आहे. म‌र्चंट नेव्हीत‌ला जॉब सांभाळून क‌र‌तो स‌ग‌ळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Malazan Book of the Fallen
ही (आधुनिक महाभारत) मालिका कुणी वाचली आहे का आपल्यात?
हीचा स्केल आणि कौतुक वाचून सुरुवात करेन म्हणतो. तीन चार वर्षांची बेगमी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोलाची माहिती, ध‌न्य‌वाद‌. आम‌च्या एका नॉव्हेल‌ फ्रीक मित्राला विच्यारून पाह‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्कीच. भारतीयांत इतकी पापिलवार नाहीय बहुतेक. परंतु कौतुक करणारे म्हणतात, याहून थोर हार्ड फॅण्टसी होणे नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हार्ड फॅण्ट‌सी म्ह‌ण‌जे न‌क्की काय‌? उदा. दाख‌ल ह‌री कुंभार‌, सिंहास‌न‌लीळा, मुद्रिकाधिप‌ती, फौण्डेश‌न‌, इ. पैकी कुठ‌ली सेरीज हार्ड अन कुठ‌ली सॉफ्ट असं काही सांग‌ता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिंहास‌न‌लीळा मुद्रिकाधिप‌ती ह्या हार्ड फॅण्टसी म्हणता येतील. खरेतर व्याख्येसाठी विकीपान वाचले तर आयडिया येईल. फौंडेशन हार्ड सायफाय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्छा, ध‌न्य‌वाद‌. थोडी आय‌डिया आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सबसे ख़तरनाक' ही पाशची कविता पुन्हा एकदा वाचली.
(दीनानाथ बत्रांना हा कवी - आणि बहुतेक हीच कविता - पाठ्यपुस्तकातून काढून टाकायला हवा आहे म्हणे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बात्रांना राष्ट्रगीत लिहिणारे पण पुस्तकांमधून तडीपार हवेत म्हणे . यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो कि मग हे तडीपार माणसाने लिहिलेले राष्ट्रगीत म्हणणारे देशभक्त कि देशद्रोही ? फीलिंग कन्फ्युज्ड .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बात्रांना अक्का म‌हादेवीच्या क‌विता विद्यार्थ्यांत 'अनैतिक‌ता' प‌स‌र‌व‌णाऱ्या वाट‌तात‌ त‌र टागोर कोण‌ त्यापुढे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ही बात‌मी क‌न्न‌ड सोश‌ल मीडियात प‌स‌र‌वाय‌ला ह‌वी, म‌स्त लाथा ब‌स‌तील बात्राला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कादर खानचा हा इंटर्व्यु छान आहे.

http://kabaadkhaana.blogspot.com/2017/07/blog-post_17.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.