गोडसे भटजीसुद्धा आधुनिक वाटतील...

तर झालं काय की ऐसीच्या खरडफळ्यावर चर्चा चालू होती - लेखनातून माणसाचं वय दिसतं का? त्यावर अभ्याने 'अस काही नसतं' म्हणून घेतलं. आणि वर म्हटलं की 'गोडसे भटजी पण आधुनिक भासतील असं मला लिहुसं वाटतं पण लोकं लिहु देत नैत.' आता ऐसीसारख्या ठिकाणी कोणीतरी 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही' अशी तक्रार केली म्हटल्यावर आमचे उदारमतवादी अश्रू भळभळा वाहायला लागले. अभ्यालाच अभिव्यक्ती नाही? अभ्यालाच भ्या वाटतं? ही कितीतरी पातळीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती आहे. सानेगुरुजी म्हणाले होते 'माझ्या अश्रूंना हसू नका. त्यांच्यात खूप शक्ती आहे.' आता आमचे अश्रू किती पावरफुल हे आम्हाला माहीत नाही. तेव्हा म्हटलं की काहीतरी करावं याबाबतीत.

म्हणून ऐसीवर एक स्पर्धा घेत आहोत. तिचं नाव आहे 'गोडसे भटजीसुद्धा आधुनिक वाटतील...' स्पर्धा म्हटल्यावर बक्षिस काय असा तुम्ही विचार करत असालच. तर सांगतो. काही नाही. मुळात कोणीतरी विजेता ठरवू की नाही हेही अजून ठरलेलं नाही. 'स्पर्धा ही जिंकण्यासाठी नाही तर भाग घेण्यासाठी असते', असा सुविचार मला आत्ताच सुचला. (असे साताठ एकत्र केले तर त्याचं एक व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड निश्चित बनेल. कदाचित आपण पुढेमागे व्हॉट्सअॅपी लिखाणाचीही स्पर्धा घेऊ.)

तर स्पर्धेचं स्वरूप असं - सुमारे दोनशे शब्द (किंवा जास्तही) लिहायचे, ज्याच्यातून तुमचं वय कळता कामा नये. म्हणजे 'गोडसे भटजीसुद्धा आधुनिक वाटतील' असं लिखाण तर हवंच. पण 'एखादी उललेली कॉलेजकुमारीही रुक्ष वाटेल' असं फुलपाखरी किंवा 'टिळकांचं लिखाणही थंड वाटेल' असं ज्वालाग्राही तिशीतल्या धडाडीच्या पत्रकारासारखं. आणि ही बिनबक्षिसाची स्पर्धा आहे, त्यामुळे वयाचा नियम थोडा वाकवून 'घासकडवींपेक्षाही आकडेवारीने परिप्लृत' वगैरे क्याटेगऱ्याही तुम्हाला तयार करता येतील.

मजा करा साल्यांनो.
(मुद्दामच साल्यांनो हा शब्द वापरला आहे. कारण तो साल्याला उद्देशून आहे की सालीला उद्देशून म्हटला आहे हे गुलदस्तात राहातं. म्हणूत तो अदिती सर्टिफायिड युनिसेक्स शब्द आहे.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नामी शक्कल ऐसीकरांस लिहितं करण्याची!

( पांढरू वाचल्यावर एक प्रश्न पडला की एवढे सर्व वाचक गेले कुठे. इतर संस्थळांवरही हाच प्रकार आहे.
का असे वाचक कोषांत जातात?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहाहाहाहा,
कसला आनंद झालाय म्हणून सांगू गुर्जी तुम्हाला,
ते स्पर्धेचे सोडा, पण ऐसीच्या बोर्डावरच्या धाग्यात् माझे नाव आले हो,
आजपर्यंत शाळेत कध्द्दी कध्दी म्हणून आले नाही, कॉलेजच्या नोटीस बोर्डावर नाही, कुठल्या लोकल पेपरातही आले नाही, मेलं आमचं कुणाला कौतुकच नाही असं वाटायलं होतं.
स्पर्धेचं काय....होतील ना होतील.. आवर्जून माझा उल्लेख केल्याबद्दल लाखो, करोडो, अब्जो धन्यवाद बर्का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त स्पर्धा आहे पण मला सुचत नाहीये. आबा लिवा की कायतरी काय्पन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नातं म्हणजे एखाद्या कवितेला पडलेलं तलम, अलवार स्वप्नच जणू... लाखो गुलाबांच्या पाकळ्यांवर जमलेले दवबिंदू मोत्यांत रूपांतरित व्हावेत आणि त्यांच्या सरी बनून एकमेकांत गुंफून जाव्यात तशी नात्यांची वीण असते... आपुलकीच्या तंतूंनी गुंफलेलं एक घनश्यामल, गर्भरेशमी वस्त्रच जणू... असं वस्त्र, जुन्या, माहेरच्या आठवणी ल्यालेल्या संदुकीच्या मोहरकोपऱ्यात वर्षानुवर्षं ठेवलं तरी त्याचा पोत, झळाळी, आणि ताजेपणाचा गंध जात नाही... पुन्हा हातात घेतलं की त्याची तलमउब, स्निग्धचांदणी स्पर्श तसाच लोभसवाणा असतो. एखाद्या कुशल कुंभाराने आपल्या चाकावर माती टाकावी, आणि सराईत हाताने पाहाता त्यातून एक घट घडवावा तशी नाती घडतात. दुःखांच्या आवीत तावून सुलाखून दृढ होतात. आणि अचानक एखाद्या धक्क्याने त्यांचे तुकडेतुकडेही होतात.

(ऐसीवर पूर्वप्रकाशित)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोहरकोपरा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद कसा असावा तर अगदी मनकवडा. लेखकाच्या मन:प्रतलावर दाटलेल्या शामल मेघांच्या सरी ल्यालेला. इतका सहजसुंदर की लेखकानेच जणू डु-आय डी ने प्रतिसाद दिला असा भावविभोर भ्रम वाचकांच्या मानसी निर्माण व्हावा. प्रतिसाद म्हणजे जणु लेखरुपी ईश्वरास अतिव श्रद्धेने, असीम प्रेमाने वाहीलेले पुष्प.
__________
तेजायला, दररोज जिलब्या पाडणाया आंतरजालिय लेखकुंच्या शाब्दिक डायरीया झालेल्या लेखांना ** प्रतिसादच देयला पायजे. रोज साले रतीब घालतात. संस्थळ यांच्या बापाचंय काय? ** बॅन्डविडथ खातातच वर यांना प्रतिसाद पायजे तेच्यायची थोरतरीत लावली पाय्जेल एकेकाच्या. आपन तर असल्या जुलाबी लेखान्ला बरोबर वठणिवर आणणारे ढुसके प्रतिसाद हान्तो. वर कोणि काय वादावादी केली की त्याची लुंगि सुटलीच म्हनुन समजा.
_________
काय एकेक प्रतिसाद तरी बाई. लेखक काय म्हणु इच्छितो हे यांच्या गावीही नसतं की अडाणीपणाचं सोंग वठवतात ते एक इथले वाचकच जाणोत. संयत भाषा ती कशी नाही. लेखक काय सांगू इच्छितो, आपण काय विषय लावुन धरलाय याची काहीतरी सांगड असावी की नाही. पण मेला पाचपोच असा तो नाहीच कोणाला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्भ रेशमी गुलाबकविता ,स्निग्धचांदणी अलवर...
तुकडे तुकडे दवबिंदूंचे ,लोभसवाणे मोहरकोपर्यात ।
दृढ घटाची तलम ऊब असे जी संदुकीच्या कप्प्यात ...
घनश्यामल कविता झळाळी दार पूर्व प्रकाशित !!!!!

गिरणीमध्ये गुर्जींच्या दवणीय पोस्टींतील रँडम शब्द टाकले की हे पीठ निघत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुकडे तुकडे दवणबिंदूंचे

असे करा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सासरी दोनतीन वर्षं काढलेल्या मुलीचे स्वगत जमलय.

*हाणामारी प्रतिसादही जमलेत.

*

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सासरी दोनतीन वर्षं काढलेल्या मुलीचे स्वगत जमलय.

*हाणामारी प्रतिसादही जमलेत.

*

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0