मोरल हझार्ड म्हंजे काय ?

.
मोरल हझार्ड ही तांत्रिक संद्न्या आहे. उदाहरण देऊन ती जास्त व्यवस्थितपणे विशद करता येईल. कल्पना करा की तुम्ही डॉक्टर कडे उपचारासाठी पेशंट म्हणून जाणार आहात. आता डॉक्टर ला सर्वसामान्यपणे मानवी शरीराबद्दल व इन जनरल तुम्हाला असलेल्या आजाराबद्दल जास्त माहीती असते. सर्वसामान्यपणे तुम्ही स्वत: डॉक्टर नसाल तर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल व आजारपणाबद्दलच्या शरिरांतर्गत जटिलतेबद्दल् डॉक्टरपेक्षा जास्त द्न्यान असण्याची शक्यता अत्यंत कमी असते. बहुतेकदा तुम्हाला तुमचं वय, लिंग वगैरे माहीती असतं. आणि आजाराबद्दलच बोलायचं तर तुम्हाला फक्त लक्षणं दिसत असतात. बाकी फिजिऑलॉजिकल तपशील माहीती नसतो. आता डॉक्टर तुमच्या या अद्न्यानाचा गैरफायदा घेऊ शकतो. व तुम्हाला गैरवाजवी उपचार (औषधे, गोळ्या) शिफारस करू शकतो किंवा गैरवाजवी चाचण्या करण्यास सांगू शकतो. अर्थातच त्याला त्यात नफा दिसतो म्हणुन. चाचण्या करणाऱ्या लॅबोरेटरीकडून त्याला कदाचित पैसे किंवा इतर फायदे मिळू शकतात. किंवा ज्या कंपनीची औषधे तो डॉक्टर लिहून देतो त्या औषधे विकणाऱ्या कंपनीकडून त्याला पैसे मिळू शकतात.

.
दुसऱ्या बाजूला - अनेकदा उपचार होण्यापूर्वी किंवा डॉक्टर ला भेटण्यापूर्वी दवाखान्यात फी दिली/घेतली जात नाही. आता डॉक्टर ला भेटून झाल्यावर व डॉक्टर ने केलेले निदान व त्यावरचा सल्ला ऐकल्यावर, व प्रिस्क्रिप्शन हातात आल्यावर पेशंट डॉक्टर ची फी न देता निघून जाऊ शकतो. तिथे दवाखान्यात चेकिंग करायला पोलिस नसतो (पेशंट ने फी दिलिये की नाही त्याबद्दल चेकिंग करायला).

.
या दोन्ही केस मधे समस्येचे स्वरूप एकच आहे. व या समस्येला मोरल हझार्ड असं म्हणतात.
.

याचे परिणाम काय होऊ शकतात ?

(१) डॉक्टर वर विश्वास कमी असल्यामुळे डॉक्टर ने शिफारस केलेल्या औषधांपैकी निम्मीच औषधे विकत घेणे
(२) डॉक्टर वर विश्वास कमी असल्यामुळे डॉक्टर ने शिफारस केलेल्या चाचण्यांपैकी फक्त काहीच चाचण्या करवून घेणे
(३) एकदोन डॉक्टर वर विश्वास नसल्यामुळे सगळ्या डॉक्टर लोकांवर अविश्वास ठेवण्याकडे मत झुकणे व डॉक्टरकडे न जाणे किंवा उशीरा जाणे
(४) डॉक्टर वर विश्वास कमी असल्यामुळे पहिल्या व्हिजिट मधे डॉक्टरने पुढच्या १ वर्षात् ३ वेळा व्हिजिट ला या असं सांगितलेलं असूनही पहिल्या भेटीनंतर न जाणे.
(५) डॉक्टरवर विश्वास नसल्यामुळे डॉक्टरकडे न जाणे - ही टोकाची केस झाली.
(६) व याचा दुष्परिणाम आरोग्यावर होणे.
.
आता वर दिलेले सर्व परिणाम हे दाखवतात की मागणी व पुरवठा असूनही काम होत नाही कारण दोनपैकी एक पार्टी ही लबाडी करू शकते. यावर सामान्यपणे उपाय हा की डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आपण मित्रांचा व/वा आप्तांचा सल्ला घेतो - की हा डॉक्टर विश्वसनीय आहे का ?

.
किमान समान वेतनाच्या केस मधे मोरल हझार्ड कसा येतो ? जो जास्त कार्यकुशल आहे त्याला असं दिसतं की त्याच्यापेक्षा कमी कार्यकुशल असलेल्या व्यक्तीला तेवढाच पगार मिळतोय जेवढा त्याला मिळतोय. व त्याची प्रेरणा कमी होते. व जो कमी कार्यकुशल आहे त्याला असं दिसतं व जाणवतं की कार्यकुशलतेची कमतरता असूनही ती चालवून घेतली जातीये. म्हंजे अधिक यत्न करून कार्यकुशलता वाढवण्यासाठीची जी त्याची उर्मी आहे ती कमी होते.

.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात मोरल हझार्ड कसा येतो ? जे शेतकरी इमानेइतबारे कर्जफेडीचे हप्ते भरतात त्यांना असं दिसतं व जाणवतं की त्यांच्या प्रामाणिकपणाला, व इमानदारीला बाजूला सारून जे हप्ते भरू शकत नाहियेत त्यांना कर्जमाफी दिली जात्ये व इमानेइतबारे हप्ते भरणाऱ्यांना मात्र काहीच मिळत नाहीये. व परिणामस्वरूप त्यांची हप्ते भरण्याची प्रेरणा कमी होते. ज्यांना कर्ज माफी मिळते त्यांना असं वाटतं व जाणवतं की आपण काळजीपूर्वक कर्ज घेतलं नाही तरी आणि कर्जाची फेड केली नाही तरी फार फरक पडत नाहीये. व ते त्यांचा निष्काळजीपणा तसाच चालू ठेवतात. व पुढच्या वर्षी असेच न फेडता येणारे कर्ज घेण्याची तयारी सुरु करतात. राजकारणी लोकांना हे वरदान वाटतं कारण त्यांना शेतकऱ्यांची मतं मिळतात व कर्जमाफी देताना त्यांच्या खिशातनं फारसं काहीच जात नसतं... त्यांना काहीच कॉस्ट्स द्याव्या लागत नाहीत कारण् कर्जमाफीसाठी लागणारा निधी हा करदात्यांच्या डोक्यावर लादला जातो (जो निधी खरंतर इतर विकासात्मक कामांसाठी वापरला जायला हवा होता). शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकार समाजात एक अत्यंत धोकादायक संदेश पाठवते - की काळजीपूर्वक, जबाबदारीने वागणे हे महत्वाचे नाही. That : one is not supposed to be held responsible for one's actions or in-action.

.
एखाद्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेसाठी फायर इन्श्युरन्स घेतला तर ती व्यक्ती त्या मालमत्तेत वावरताना संभाव्य आग लागण्याच्या शक्यते प्रति उदासीन राहू शकते किंवा निष्काळजीपणा करू शकते व साध्यासाध्या प्रतिबंधक बाबींकडे दुर्लक्ष करू शकते कारण तिला माहीती असते की आग लागली तर होणारे नुकसान हे भरुन दिले जाणार आहे.

.
इतरही अनेक उदाहरणे दिली जाऊ शकतात. प्रतिसादांमधे येतीलच. उदा. ह्याचा समाजवादाशी संबंध कसा ? - हा प्रश्न चर्चेत येऊ शकतो.

.
मोरल हझार्ड चा अप्रकट दुष्परिणाम हा की जे व्यवहार प्रत्यक्षात येऊ शकले असते ते होत नाहीत. व अनेकांच्या अनेक गरजा ज्या पुरवल्या जाऊ शकल्या असत्या त्या पुरवल्या जात नाहीत.
.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

गाडी सर्व्हिसींगलला टाकताना पण हेच होत. मोरल हझार्डचा परीणाम म्हणजे विणाकारण भुर्दंड असा मला लागलेला अर्थ. मग तो कुण्याही पार्टिला असो.
(शब्दशः नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

गाडी सर्व्हिसींगलला टाकताना पण हेच होत

हे पण एक चांगले उदाहरण आहे. टायलर कोवेन नी हे उदाहरण दिलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फायर इन्शुरन्स (किंवा कोणताही इन्शुरन्स) हे मॉरल हॅजार्डचे उदाहरण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फायर इन्शुरन्स (किंवा कोणताही इन्शुरन्स) हे मॉरल हॅजार्डचे उदाहरण आहे?

इन्श्युरन्स घेतल्यानंतर मोरल हझार्ड निर्माण होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्व्हेस्टोपेडीया वर मॉरल हॅजार्ड ही संकल्पना समजावतांना खालील उदाहरण दिलेले आहे. ते असे आहे.

Moral Hazard and the 2008 Financial Crisis

Prior to the financial crisis of 2008, certain actions on the parts of lenders could qualify as moral hazard. For example, a mortgage broker working for an originating lender may have been encouraged through the use of incentives, such as commissions, to originate as many loans as possible regardless of the financial means of the borrower. Since the loans were intended to be sold to investors, shifting the risk away from the lending institution, the mortgage broker and originating lender experienced financial gains from the increased risk while the burden of the aforementioned risk would ultimately fall on the investor.

Borrowers who began struggling to pay their mortgage payments also experienced moral hazards when determining whether to attempt to meet the financial obligation or walk away from loans that were difficult to repay. As property values decreased, borrowers were ending up underwater on their loans. The homes were worth less than the amount owed on the associated mortgage. Some homeowners may have seen this as an incentive to walk away, as their financial burden would be lessened by abandoning the property. In walking away, the borrowers assumed a risk where some of the penalty would fall back on the financial institutions holding the loans.

तर प्रश्न आहे की वरील परीच्छेदाचा वापर करुन विजय माल्ल्या ची केस जर घेतली तर ती एक मॉरल हॅजार्ड चे उत्तम उदाहरण होऊ शकते का. ?
दुसरा प्रश्न हे समाजवादाच्या अपोझिट उदाहरण होइल का ?
वरील बाबतीत सरकार कडुन अधिकृत कर्ममाफी शेतकर्याला मिळते व माल्या वर कारवाई होते हा मुलभुत फरक आहे हे मान्य आहे.
प्रश्न असा आहे की यानेही अल्टीमेटली मॉरल हॅजार्ड या दिशेने झाल्यास समाजाचे अंतिमत: नुकसान होते का ?
ही लिंक यातील मॉरल हॅजार्ड ची व्याख्या ही अतिशय सुस्पष्ट आहे तुमच्या डॉक्टर च्या उदाहरणात ती क्लिष्ट वाटते.
https://www.investopedia.com/terms/m/moralhazard.asp

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

Since the loans were intended to be sold to investors, shifting the risk away from the lending institution, the mortgage broker and originating lender experienced financial gains from the increased risk while the burden of the aforementioned risk would ultimately fall on the investor.

(१) मल्याच्या केस मधे व २००८ च्या क्रायसिस मधे महत्वाचा फरक* आहे. तुमच्या प्रतिसादातला काही भाग मी वर डकवला आहे व त्यातला काही तांबड्या रंगाने रंगवलेला आहे. हा तांबडा मजकूर ज्याकडे बोट दाखवतो तो मुख्य फरक आहे. ज्याकडे बोट दाखवतो ते आहे - CLOs, CMOs.
(२) पण फरक आहे म्हणून मल्याच्या केस मधे मोरल हझार्ड नाही असं नाही. मल्याच्या केस मधे मोरल हझार्ड आहेच.
(३) फरक हा फक्त मुद्द्यात स्पष्टता यावी म्हणून दिलेला आहे. फरक नेमका हा आहे की मल्याने घेतलेली कर्जे इन्व्हेस्टर्स ना CLOs, CMOs बनवून विकली गेलेली नाहीत. निदान माझ्या माहीतीत तरी नाही. आयमिन ज्या (राष्ट्रियिकृत) बँकांकडून मल्ल्या ने कर्जे घेतली होती त्या बँकांनी मल्याची व इतरांची कर्जे पूल करून त्यांची CLOs, CMOs बनवून विकलेली नाहीत (असा माझा समज आहे).

----

मल्य्याच्या केस मधे मोरल हजार्ड नेमका कसा आहे ?

उत्तर -

If you borrow 100 rupees from the bank then the bank has the hold on you and if you borrow 100 million rupees from the bank then you have the hold on the bank असा एक क्लिशे आहे तो इथे उपयोगी पडतो.

----

दुसरा प्रश्न हे समाजवादाच्या अपोझिट उदाहरण होइल का ?

मल्या चे उदाहरण हे क्रोनि कॅपिटलिझम चे असू शकते कारण त्याला कर्जे देताना (त्याला झुकते माप दिले जावे या दिशेने) राजकीय हस्तक्षेप झाले होते असा आरोप आहे. आरोप सिद्ध झाला तर तो क्रोनि कॅपिटलिझम च होतो.

समाजवादाच्या उलट म्हंजे काय ?
If socialism means government intervention in markets then Mallya case is technically opposite of socialism. किमान काही प्रमाणावर तरी.

----

प्रश्न असा आहे की यानेही अल्टीमेटली मॉरल हॅजार्ड या दिशेने झाल्यास समाजाचे अंतिमत: नुकसान होते का ?

हो.

माझ्या लेखाची शेवटची २ वाक्ये पुन्हा वाचावीत. व हे अप्रकट नुकसान दुर्लक्षिले जाऊ नये.

----

ही लिंक यातील मॉरल हॅजार्ड ची व्याख्या ही अतिशय सुस्पष्ट आहे तुमच्या डॉक्टर च्या उदाहरणात ती क्लिष्ट वाटते.

ती तुम्हाला सुस्पष्ट वाटते. इतरांना क्लिष्ट वाटू शकते कारण त्यात जार्गन जरा जास्त आहे.
.
-----

* आणखी फरक हा की मल्या ने घेतलेली कर्जे ही मुख्यत्वे बिझनेस साठी होती. २००८ चा क्रायसिस हा गृहकर्जासंबंधी जास्त होता.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा म्रहत्वाचा फरक माझ्या अजिबात लक्षात आला नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

किमान समान वेतनाच्या केस मधे मोरल हझार्ड कसा येतो ? जो जास्त कार्यकुशल आहे त्याला असं दिसतं की त्याच्यापेक्षा कमी कार्यकुशल असलेल्या व्यक्तीला तेवढाच पगार मिळतोय जेवढा त्याला मिळतोय. व त्याची प्रेरणा कमी होते.

वाक्यरचना अत्यंत पुरुषप्रधान आहे. तो चेंडू ऑफस्टंपाच्या बाहेर असल्यामुळे सोडून देत्ये. पण ते वगळता ...

कोण कोणापेक्षा कमी कार्यकुशल हे ठरवणार कोण? ठरवणाऱ्या व्यक्तीची पात्रता कोणी ठरवायची? (देव असेल तर तो निर्माण कोणी केला, देवाच्या आधी काय होतं, इत्यादी इत्यादी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोण कोणापेक्षा कमी कार्यकुशल हे ठरवणार कोण? ठरवणाऱ्या व्यक्तीची पात्रता कोणी ठरवायची?

मला असे वाटते ठरवणाऱ्या व्य्क्तीची पात्रता ती सरकार वा तत्सम संस्था नसेल व खासगी उद्योजक असेल तर , जो स्वत:च्या उत्पन्नातुन भांडवलातुन जो पे करत आहे त्याची पात्रता नसुन अधिकार आहे. ( अधिकार म्हणजे इथे निवडण्याचा/ ठरवण्याचा सब्जेक्टीव्ह् अधिकार अभिप्रेत आहे ) आता समजा त्याने कार्यकुशलते संदर्भात चुकीचा निर्णय घेत घेत कमी कार्यकुशल व्यक्तीला अधिक पगार देण्याची चुक केली.
आणि मुक्त स्पर्धा सुरु आहे तर त्या स्पर्धेच्या दबावात तो हळुहळु व्यवसायात मागे पडत जाणार. म्हणजे उद्योजक जेव्हा चुकीचा निर्णय घेइल त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल. त्याचे स्पर्धक कमी कार्यकुशल व्यक्तीला अचुक जोखुन कमी पगार ऑफर करतील वा उलट दिशेने कार्यक्षम व्यक्तीला अधिक पगार देत स्वत:कडे खेचतील. मार्केट फोर्सेस त्याला दाखवुन देतील की त्याचे जजमेंट बरोबर होते की नव्हते.
सरकार वा संस्थेच्या बाबतीत थोडी वेगळी बाब आहे. म्हणजे अशासाठी की एखादा संस्थात्मक निर्णय जर एखादा विशीष्ट समाजघटक हा मुळातच पात्र नाही अशी मांडणी करत असेल वा धोरणे राबवत असेल तर ती बाब अधिक गंभीर/ व्यामिश्र स्वरुपाची दुरगामी परीणाम करणारी आहे. किंवा एखादी धर्म संस्था असे ठरवत असेल ( जसे मनु शुद्रांसंदर्भात ठरवतो ) तर त्याचे एकंदरीत सामाजिक परीणाम दुरगामी होतील.
मग तो संपुर्ण समाज / देश च इतरांच्या मानाने मागास राहुन त्याची किंमत चुकवेल.
असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

समजा सगळ्या समाजानंच ठरवलं की ठरावीक समाजगटाची कौशल्यं, बुद्धी आम्हाला नकोतच. उदाहरणार्थ दलितांनी शाळेत शिकायचं/शिकवायचं नाहीच. किंवा स्त्रियांना घराबाहेरचे व्यवसाय/नोकऱ्या करायच्या नाहीतच. तर मग मुळातली विदाच दूषित असेल आणि मग त्यातून निघणारे निष्कर्षही दूषितच असणार.

सध्याचं उदाहरण द्यायचं तर हार्वी वाईनस्टाईन यशस्वी व्यावसायिक होता; पण त्याच्या यशामुळे आणि त्या व्यवसायातल्या संस्कृतीमुळे व्यावसायिक यशाची किंवा वाळीत न पडण्याची जी किंमत ८०-९० किंवा आणखी जास्त स्त्रियांना चुकवावी लागली, ती न चुकवण्यासाठी जी उपाययोजना करावी लागेल तिला मॉरल हॅजर्ड म्हणणार का हार्वी वाईनस्टाईनला भिकारचोट म्हणणार?

बाजाराचा रेटा हे एकमेव बल कार्यरत असतं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीवर श्रेणी देण्यांत व न देण्यात मोरल हझार्ड आहे का ?
श्रेणी न दिल्यामुळे कित्येकदा आपला प्रतिसाद दुर्लक्षिला गेला आहे असं वाटतं. काहींना शिवी हे जशी ओवीसारखी वाटते, तसेच खवचट, पकाऊ अशा श्रेणींनीही दाद मिळाल्यासारखी वाटते. काही निरर्थक प्रतिसादांवरही, रोचक अशी श्रेणी मिळाल्याने कुत्सितपणाचा वास येतो. अशा प्रकार, दोन्ही प्रकारे प्रतिसादकावर अन्याय होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तिरशिंगराव, उत्तम प्रश्न विचारलात.

ऐसी हे नि:शुल्क संस्थळ आहे त्यामुळे इथे व्यक्त होणाऱ्या व्यक्तीला नियम नसले तर ते ट्रॅजेडि ऑफ कॉमन्स च्या दिशेने जाईल. ट्रॅजेडि ऑफ कॉमन्स हा खूप स्ट्राँग शब्द वापरला मी. पण Let me rephrase the definition of Moral Hazard - If a person is shielded from risk (and if the person knows it) then the person takes irrational risk. Here irrational means risk which he cannot justify by returns. मी ही जरा ओव्हरसिम्प्लिफाय केलेले आहे.

म्हंजे गब्बर ला असं वाटलं, जाणवलं की ऐसी वर त्याला फटकारणारे कोणीही नाही तर तो बेजबाबदार, हिंसक विधाने करत सुटेल. त्यामुळे फटकारले जाणे हे गव्हर्न केल्याप्रमाणे काम करते. तसेच गब्बर च्या सुमार प्रतिसादांना मार्मिक व रोचक श्रेणी देणे हे सुद्धा मोरल हझार्ड निर्माण करते.

तेव्हा श्रेणी देण्यात व न देण्यात मोरल हझार्ड आहेच.
पण श्रेणी देणे हे एकप्रकारे गव्हर्नन्स च असतो कारण वाचकाने मार्मिक प्रतिसादांना मार्मिक म्हणणे हे त्या प्रतिसादकाला प्रेरणादायीच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बसमध्ये बराच वेळ ताटकळत उभे राहून चांगली जागा 'भेटल्यावर' नंतर कुणी लाघवी स्त्री उभी दिसल्यावर तिला उठून आपली जागा द्यावीशी वाटणे या मॅारल हजाडला सामोरे जाऊ न लागण्यासाठी मी लगेच डुलक्या काढतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कार्यकुशलतेचा विषय येतो तेव्हा मालकलोक सरळ जॅाबवर्क देत असावेत. हे-एवढे-काम-इतक्या-वेळात-किती-घेणार अवलंबत असावेत. बाकी पाट्या टाकण्यासाठी आम्हाला बोलावतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फायर हजाड म्हणजे योग्य काळजी न घेतल्याने, कामात ढिलेपणामुळे आग लागून स्वत:चे/इतरांचे/मालमत्तेचे नुकसान होते. वैद्यकीय व्यवसायात आपली नैतिकमुल्ये घसरू दिल्यास होणारे नुकसान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किमान समान वेतन याविषयात जे लिहिलं आहे त्यातून असा भास होतोय की "कमी कुशल व्यक्तीला जबरदस्तीने किमान वेतन दिल्यावर" अधिक कुशल व्यक्तीला अधिक वेतन देण्यास सरकारने बंदी वगैरे घातलेली आहे. कुशल व्यक्तीला अधिक वेतन देऊन तो तथाकथित इन्सेन्टिव्ह निर्मण होतोच. तसे अधिकचे वेतन एम्प्लॉयर कुशल व्यक्तीला देत नसेल तर तो एम्प्लॉयरचा दोष आहे. एन्फोर्स्ड किमान वेतन असण्याचा नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गब्बु, एक बेसिक प्रश्न.

तू पहिलेच दिलेले डॉक्टर आणि पेशंटच उदाहरण हे कुठल्या पुस्तकातले आहे का तुझे तुच तयार केले आहेस. कारण माझ्यामते ते काही मोरल हॅझार्ड चे ॲप्ट उदाहरण नाहीये. तू दिलेले हे उदाहरण म्हणजे निव्वळ फसवणुकीची उदाहरणे आहेत ( स्पेसिफिकली पेशंट नी पैसे न देता पळुन जाणे ).

मोरल हॅझार्ड हा प्रकार किंवा शब्द जनरली अश्या ठिकाणी वापरला जातो जिथे फसवणुक तर असते पण ती फसवणुक किंवा वर्तणुक करार पाळुन केलेली असते. करार पाळुन म्हणजे ती वर्तणुक क्रिमिनल किंवा बेकायदेशीर नसते. तर ती मॉरली चुकीची असते.

ह्याची उदाहरणे द्यायची तर ती अशी
१. क्रेडिट कार्ड चे कर्ज हे सिक्युअर्ड नसल्यामुळे ते पैसे परत न करणे आणि बँक्रप्ट होणे. ह्यात तो क्रेडिट कार्ड धारक कायदेशीरच वागतॉ आहे, पण मोरली ते वागणे चुकीचे आहे.
२. ॲसेट टॉक्सिक आहेत हे माहिती असुन ते गिऱ्हाइकांना विकणे, ह्यापेक्षा पुढे जाऊन ते ॲसेट स्वता शॉर्ट करणे.
३, ग्राहकाच्या गरजे पेक्षा वेगळ्या स्कीम, इन्सुरंस वगैरे त्याच्या गळि मारणे ज्यात विकणाऱ्याला जास्त कमिशन असेल.
४. फायर इन्सुरंस आहे म्हणुन बेपर्वा वागणे

शेतकऱ्यांचे तुझे उदाहरण ठिकठाक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू पहिलेच दिलेले डॉक्टर आणि पेशंटच उदाहरण हे कुठल्या पुस्तकातले आहे का तुझे तुच तयार केले आहेस. कारण माझ्यामते ते काही मोरल हॅझार्ड चे ॲप्ट उदाहरण नाहीये. तू दिलेले हे उदाहरण म्हणजे निव्वळ फसवणुकीची उदाहरणे आहेत ( स्पेसिफिकली पेशंट नी पैसे न देता पळुन जाणे ).

हे माझेच उदाहरण आहे. दुसऱ्या पुस्तकातले नाही.
प्रथम त्यात रिस्क आहे का हे पहा. डॉक्टर ने हिप्पोक्रॅटिक शपथ घेतलेली असते व ते काँट्रॅक्ट दुर्लक्ष करू नको. म्हंजे पेशंट ला हे माहीती असते की डॉक्टर हा वचनबद्ध असतो की आलेल्या पेशंट ला तो केवळ पैसे नाहीत म्हणून विन्मुख पाठवणार नाही.

उपचार झाल्यानंतर पेशंट ने फी न देता पळून जाणे ही रिस्क आहे. विशेषत: इन्फर्मेशन असिमेट्रिची. जो मोरल हझार्ड मागचा कळीचा मुद्दा आहे. जर पेशंट ला माहीती असेल की त्याच्याकडे पैसे नाहीत व तरीही तो उपचारासाठी गेला (आणि डॉक्टर ला सांगितले नाही की त्याच्याकडे पैसे नाहीत व तरीही सल्ला/उपचार घेतला) आणि नंतर पळून गेला तर ते मोरल हझार्ड कसे नाही ? उदा. एका मोठ्या हॉस्पिटल चेन/ग्रुप मधे पेशंट ला भरती करताना अनेकदा (सर्वदा नव्हे) डिपॉझिट घेतले जाते. माझ्या इथल्या कलीग ने नुकतीच सांगितलेली केस आहे.

तू जी उदाहरणे दिलेली आहेत ती ॲप्ट आहेत कारण त्यात इन्फर्मेशन असिमेट्रि आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी लिहिले आहे ना गब्बु. फसवणुक आणि मोरह हॅझार्ड ह्यात फरक आहे. मोरल हॅझार्ड क्रिमिनल किंवा बेकायदेशीर नसते.
पेशंट नी पैसे न देता पळुन जाणे हे क्रिमिनल/बेकायदेशीर आहे.
कायदेशीर रित्या बरोबर पण नैतिक दृष्ट्या चुक म्हणजे मोरल हॅझार्ड.
अजुन एक व्याख्या म्हणजे, रिस्क घेणाऱ्याचे नुकसान नाही आणि भुर्दंड मात्र दुसराच भरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कायदेशीर रित्या बरोबर पण नैतिक दृष्ट्या चुक म्हणजे मोरल हॅझार्ड.

तुझं म्हणणं समजलं मला.

पण आता दुसरं उदाहरण घे. १९९५ पर्यंत कार उद्योगात भारतात दोनच कंपन्या होत्या. अँबॅसॅडर व प्रिमियर. नंतर कार उद्योगात एफडीआय ला मुभा देण्यात आली. परीणामस्वरूप अनेक मस्तमस्त ऑप्शन्स निर्माण झाले. पण १९९५ पूर्वी अँबॅसॅडर ने आपल्या मॉडेल मधे काहीही बदल केले नाहीत कारण त्यांना स्पर्धेची रिस्क नव्हती. Their profit sanctuary was not threatened. So they hardly improved their model between 1965 to 1995 because they did not have to improve it. हे कायदेशीर रित्या व नैतिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या बरोबरच आहे (चूक नाही). पण हा मोरल हझार्ड चा परिणाम् आहे का नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण हा मोरल हझार्ड चा परिणाम् आहे का नाही ?

६५-९५ त्यांनी जे केले नाही ( जे करायला हवे होते ) ते थोडेफार मॉरल हॅझर्ड म्हणुन म्हणता येइल. त्यांनी काही न करण्याची रिस्क घेतली पण त्याचा भुर्दंड पण त्यांनाच बसला ९० सालानंतर, म्हणुन फारसे मॉरल हॅझार्ड नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0