आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
'लव्हिंग व्हिन्सेंट' या चित्रपटाची अनेक चोखंदळ ऐसीकरांनी स्तुती केली आहे. पुणेकरांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायची संधी उद्या मिळणार आहे. पुण्यात केवळ दोन खेळ दिसत आहेत. अधिक माहिती 'बुक माय शो'वर मिळेल.

Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे - ३_१४ विक्षिप्त अदिती
तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट ! - सर्व_संचारी

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आता चित्रपटाबद्दल जंतूचं मत समजेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रपट गिमिकी वाटला. अनेक कारणं आहेत. एक तर 'तो बायपोलर होता; त्यानं आपला कान कापून वेश्येच्या हातात दिला आणि नंतर त्यानं आत्महत्या केली' हे तपशील अधोरेखित करणारी कथनं मला गिमिकी वाटतात. तसंच, त्याच्या आयुष्यातला एक विशिष्ट कालखंड (दक्षिण फ्रान्समधलं त्याचं वास्तव्य) आणि त्या दरम्यानचं त्याचं कामच अधोरेखित करणारी कथनंही मला गिमिकी वाटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुद्द कथानायकाच्या आस्थाविषयांना अजिबात हात न घालणारी किंवा केवळ वरवर हात लावून प्रेक्षकांना भावनावश करण्याची आकांक्षा ठेवणारी कथनं मला गिमिकी वाटतात. त्या निमित्तानं ह्याच कालखंडावरचा, पाहिला होता तेव्हा फारसा न आवडलेला चित्रपट पुन्हा आठवला - मोरिस पियालाचा १९९१चा चित्रपट. पियालानं कथानकाला अजिबात सनसनाटी केलं नव्हतं. चित्रं आणि झगझगीत रंग दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यांना खूश करण्याचंही त्यात टाळलं होतं. पण अखेरच्या दिवसांमध्ये काय घडत होतं, ते दाखवून वर्तमानात एक शोकांतिका कशी आकार घेत गेली आणि भविष्यात एक मिथक निर्माण होण्याची सामग्री कशी एकत्र येत होती, त्याचा अतिशय गांभीर्यानं शोध घेतला होता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||