पु लं - लिखाण आणि इतर विषयक चर्चा

धागा सुधारला आहे. मजकूर डकवत जाईन .

पुल मला प्रचंड आवडतात. प्रचंड. पण त्यातही टप्पे होते.
टप्पा एक -
एकेकाळी मी त्यांचा जबरा फॅन होतो. त्यांची सगळी पुस्तकं कोण कलेक्ट करतंय अशी आम्हा मित्रांत चढाओढ वगैरे चालायची.
आणि "काय वाट्टेल ते होईल" माझया एकट्याकडेच असल्याने मी शर्यतीत नेहेमीच आघाडीवर राहिलो. हे दिवस पुलंनी भारावून जाण्याचे होते. कुणी पुलंविरूद्ध किंवा पुलंविषयी कौतुक सोडून इतर काही बोललेलं मला खपायचंच नाही. त्यांचं प्रत्येक वाक्य प्रमाण आणि त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ ग्रेट. बास. विषय संपला.

टप्पा दोन -
ही फेज संपली आणि पुल पाठ झाले. पुस्तकं वाचून आणि त्यापेक्षा जास्त ऐकून अतिपरिचयात अवज्ञा झाली. मग पुल म्हणून आवडत असले असले तरी त्यांची पुस्तकं वाचायचा कंटाळा आला. नवे लेखक सापडले, चित्रपट, गूढ किचकट डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या गोष्टी आवडायला लागल्या आणि पुल काहीसे बाळबोध, नॉस्टाल्जिक आणि गुडीगुडी वाटायला लागले. पुलंच्या पुस्तकांवर धूळ जमली.

टप्पा तीन -
बरंच काही वाचून पुन्हा पुलंकडे आलो. पुस्तकातले संदर्भ वगैरे पुन्हा वाचावेसे वाटू लागले. सध्या इथे आहे. पण आता काही विनोद अस्सल वाटतात आणि काही कमाअस्सल. काहीकाही निव्वळ शाळकरी. थोडक्यात पुलंच्या लिखाणाबद्द्लचं भाबडेपण जाऊन आता थोडं कुतुहल वाटतंय आणि "हे असं पुलंनी का लिहिलं असेल?" असे प्रश्न वाचतानाच पडतायेत.
त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आणि जमलं तर इतरांची त्याबद्दलची मतं काय आहेत ते जाणून घ्यायला आवडेल म्हणून हे लिखाण.
------------------------------------------------------------------------------
प्रस्तुत चर्चेचा विषय पुलंचं साहित्य आणि त्यातील त्रुटी/उणीवा/मर्यादा असा आहे. म्हणजे इतक्यांदा पुल वाचून त्यांच्या पुस्तकांबद्दल काही मतं तयार झालीत ती तपासून पहावी असं वाटतंय. खाली "मिसळपाव" ह्यांनी म्हटल्याप्रमाणे पुलंबद्दल चर्चा करणारे आपण कोण टिकोजीराव? कुणीच नाही. एक वाचक म्हणून मला पुलंबद्द्ल जे वाटतं तितकंच, त्यापेक्षा जास्त काहीच नाही.

१. मेघना भुस्कुटे ह्यांनी मोलाची भर घातलीये हा लेख लिहून. तो वाचला आणि खूप बरं वाटलं. मला वाटणारं बरंच काही तिथे आलं आहे.
मस्त मस्त लिहिलंय, जियो!
--------------------------------------------------------------------------------
आता माझं तुणतुणं वाजवतो.

मला पुलंबद्दल जाणवलेल्या काही नोंदी.

१. विनोदी पुस्तकं - "
व्यक्ती आणि वल्ली" ला तोड नाही.
Tier 1 - त्यानंतर क्रमाने कदाचित "असा मी असामी" "हसवणूक" "मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास" "काय वाट्टेल ते होईल" ही पुस्तकं येतील. ह्यातले जवळपास सगळे लेख उत्तम आहेत. "काय वाट्टेल ते होईल" हे माझं अतिशय आवडतं पुस्तक असल्याने मी इथे टाकतोय Smile

.
Tier २
"खोगीरभरती" "गोळाबेरीज" "खिल्ली" "अघळपघळ" "उरलंसुरलं"
ह्यातले काही लेख उत्तम आहेत तर काही सुमार.
उदा. गोळाबेरीज मधला "म्हैस" हा लेख ए१ आणि पुलंच्या सर्वोत्तम लेखांपैकी म्हणता येईल असा असला तरी त्याच पुस्तकातला "महाभारतकालीन वृत्तपत्रे"/"जाल्मिकीचे लोकरामायण" हे लेख शाळकरी वाटतात.

खोगीरभरतीमधला उपहास बरेचदा अव्वल वाटतो तर काहीवेळा अगदीच ओढून ताणून (आदर्श समाजसेविका).
खिल्लीमधला "तुम्हाला कोण व्हायचे आहे" आजही पॉप्युलर असला तरी "अंतुले तुम्हारा चुक्याच" सारखा निव्वळ फालतू लेखही त्याच पुस्तकात आहे.
उरलंसुरलंबद्दल बरंच काही खाली आलंच आहे.
.
Tier ३ - बटाट्याची चाळ.
हा प्रकार वेगळा निवडण्याचं कारण म्हणजे त्यावर लोकांची आत्यंतिक टोकाची मतं ऐकली आहेत. "सिंपली ग्रेट" ते "अगदीच टाकाऊ" पर्यंत.
मला त्यातली "भ्रमण मंडळ" "काही वासऱ्या" "आगामी आत्मचरीत्र" वगैरे आवडतात, पण "संगितिका" "काही स्त्रीगीते" मेजर हुकलेत.
चिंतन आता वाचलं तर अजिबात आवडत नाही.
पुस्तक अधेमधे चाळण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यातली चित्रं.
असो. बटाटयाची चाळ हे पुस्तक साधारण किती सालापर्यंत रिलेव्हंट होतं पाहिलं पाहिजे.

२, व्यक्तिचित्रं -
व्यक्ती आणि वल्ली इतकं जबरदस्त निरीक्षण इतर कुठल्याही व्यक्तिचित्रांत न येण्याचं कारण उघड आहे- बाकी सगळं खऱ्या माणसांबद्दल लिहिलंय.
आणि पुल कहर गोग्गोड लिहीतात. एखाद्या माणसाचे गुण इतक्या कमी पानांत वाचले की तो/ती सद्गुणांचा पुतळा असल्यागत आपलं मत व्हावं आणि डोळेबिळे भरून यावेत अशी अपेक्षा असेल तर ही पुस्तकं वाचायला हरकत नाही.

गायकांबद्दल/गायिकांबद्दल बरीच व्यक्तीचित्रं आहेत त्यात किस्से आणि कहाण्या अफाट.(हे स्मरणातून - तेव्हा चू.भू. द्या.घ्या.) विष्लेशण हा प्रकारच पुलंचा नावडता असल्याने एखादा माणूस का ग्रेट वाटला त्याच्या खोलात न जाता पुल भावनिक होऊन कढ काढत रहातात. पुलंची सगळी व्यक्तिचित्रं "गणगोत" "गुण गाईन आवडी" "मैत्र" "दाद" वगैरे एकामागे एक वाचली तर असह्य रिपीटेशन होतं, आणि एकसुरी एकतारी घेऊन पुल गुणगान करताहेत असं एक उगीचच क्षुद्र वाटणारं चित्र डोळ्यापुढे येतं.

म्हणजे अत्र्यांवरच्या लेखात इतक्या स्फोटक मजकूराला जागा (व्यक्तिगत हल्ले नव्हेत पण निदान जे आहे ते तरी लिहा) असताना पुल अत्र्यांना १०००० विशेषणं देऊन लेख संपवतात.

आणखी एक शक्यता म्हणजे व्यक्ती एकबद्दल एखाद्या गोष्टीची टिंगल करणारे पुल व्यक्ती क्रमांक २ च्यावेळी त्याच गोष्टींना सावरून घेतात. (इथे पक्क्या उदाहरणांची गरज आहे. तेव्हा हे थोडं शोधायला लागेल.)

क्रमश:

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

>>लताबाईंच्या धाग्यावरही 'बाई असल्यामुळे अन्याय झाला' वगैरे सूर तुम्हीच लावलात.

माझा प्रतिसाद नीट वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेरेकू भी गाना सुनाई दिया क्या रे थत्ते? मेर्कू लगा मेरेही कान में कुछ गडबड हय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

मलाही ऐकू आले ते गाणे. परंतु त्याचे कारण माझ्यावरती झालेले अनाठायी संस्कार आहेत - कोणाबद्दलही वॅईट बॉलु नॅये वगैरे त्यात नको ते सुविचार जसे की '' Smalla minds discuss people, great minds discuss ideas नको त्या वयात वाचल्याचा परीणाम.
अरे हट!!! मी तर म्हणते आनंदाने व सुखाने जगण्यासाठी गॉसिप, परनिंदा यासारखा टाइमपास उपाय नाही (याचा अर्थ इथे ते चालले आहे असा नव्हे. असूही शकते नसूही शकते. मी ते विश्लेषण केलेले नाही. मीपूर्ण प्रतिक्रिया वाचलेल्या नसल्याने टरफले उचलणार नाही.)
सांगायचा मुद्दा हा की लता मंगेशकर व पुलं या धाग्यांत समान सूत्र आहे पण ते असल्यामुळे गिल्टि वाटायचे कारण नाही. (परत पिऱ्या मांग व थत्ते यांना गिल्टी वाटते आहे असे मी म्हणत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही विषय वर उपप्रतिसादांत येऊन गेले त्यांना एकच प्रतिसाद देतो आहे.

बापट म्हणतात त्यांनी खूप दानधर्म केला. हे खरंच आहे. आणि त्याविषयी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे. किंबहुना पुलं मनानं अतिशय चांगले आणि उदारमतवादी आणि सहिष्णु होते ह्याविषयी माझ्या मनात अजिबातच संदेह नाही. माणूस म्हणून मला ते प्रचंडच चांगले आणि आदरणीय वगैरे वाटतात.

अस्वल म्हणतात :

तुझे आहे तुजपाशीमधले काही भाग पुलंनी इतरांच्या लिखाणावरून भले ढापलेही असतील

नाही ते ढापू होते असं माझं अजिबातच म्हणणं नाही. मला जे म्हणायचंय ते असं –
पुलंच्या आधी तितकाच लोकप्रिय विनोदी लेखक कोण असं जर पाहायला गेलं तर चिं. वि. जोशी, राम गणेश गडकरी आणि अत्रे ह्यांच्याकडे पाहायला लागेल (म्हणजे इतरांकडे नाही असं नव्हे, पण हे उदा. प्रचंड लोकप्रिय वगैरे विनोदी लेखक होते). ह्यातले गडकरी प्रचंड भाषाप्रभू होते. पुलंकडेसुद्धा भाषा वळवण्याचं सामर्थ्य उत्तम होतं पण गडकरींच्या मानानं कमी. गडकरी आणि जोशी दोघांची कल्पनाशक्ती आणि लिहायचे विषय अनेकविध होतेच, शिवाय ते लिखाण वेगळ्याच आणि म्हणून अनपेक्षित दिशेला नेऊ शकत. तितकं वैविध्य आणि अनपेक्षितता मला पुलंमध्ये आढळत नाही. पण मग विचार करता असं लक्षात येतं की पुलं लेखक असण्यापेक्षा performer अधिक होते आणि त्यामुळे अत्र्यांना जास्त जवळचे होते. अर्थात ते अत्र्यांपेक्षा सभ्य होते. फडके किंवा भावेंशी असलेल्या वादात किंवा भाऊ पाध्यांबद्दल लिहिताना अत्र्यांनी जी खालची पातळी गाठली ती पुलंनी गाठली नाही. (कदाचित सुनीताबाईंचा त्यांना आटोक्यात ठेवण्यात हातभार किंवा सहभाग होता.) पण मग तिथे मोलिएरशी साम्य दिसायला लागतं, कारण अत्र्यांनी उघड उघड मोलिएरच्या नाटकांचा आधार घेतलेला होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुलंच्या लोकप्रियतेमागचं रहस्य शोधायला गेलं तर ते अत्र्यांची strategy वापरत होते आणि अत्र्यांसारखे तेदेखील लोकप्रिय झाले. आणि अत्रे इन टर्न मोलिएरवरून प्रेरित होते. म्हणजे strategyमध्ये साम्य असण्याविषयी मी बोलतोय. बाकी, पुलंच्या कोट्या, विनोद wit वगैरे त्यांचं स्वतःचंच असणार, कारण ते त्यांना अनेकदा बोलताबोलतादेखील सुचायचं. म्हणजे हजरजबाबी तर ते होतेच. त्याचे अनेक किस्से त्यांच्या ओळखीतल्या अनेक लोकांनी सांगितले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बापट म्हणतात त्यांनी खूप दानधर्म केला. हे खरं आहे. आणि त्याविषयी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. किंबहुना पुलं मनानं अतिशय चांगले आणि उदारमतवादी आणि सहिष्णु होते ह्याविषयी माझ्या मनात अजिबात संदेह नाही. माणूस म्हणून मला ते प्रचंड चांगले आणि आदरणीय वगैरे वाटतात.

लोकसत्ताच्या एखाद्या मोदी"कौतुक" पेशल अग्रलेखाची सुरुवात भासली.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दानधर्म ही कसोटी ?
दान ????????????//
ध्रर्म ????????????/
कुठे नेऊन ठेचलाय जंतु माझा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवी बाजुच्या दोन खरडी आवडल्या.
--
मुंबईपुण्याकडच्यांनी वर्हाड निघालय लंडनला हे त्यातील भाषेमुळे पुलंएवढं डोक्यावर घेतले नसावे. पुलंचा श्रोता इकडच्या भागातला अधिक. कोकणचा मुंबईपुण्यात गेलेला श्रोता. त्यांचा वैचारिक पाया बराचसा पिढ्यानपिढ्या वरून खाली ढकललेला आहे.
अमच्या काळात प्रवास करून देशविदेश बघणारे कमीच, टिवी नाही त्यामुळे लेखक लेखनातून घडवतील ते पाहायचे हा आनंद. निळे आकाश लाल माती -काणेकर, किंवा इतरही. शि वाय गुदगुल्या करून हसवले का चिमटे काढून हसवले हे गौण होते. हसवले हे मुख्य. रमेश मंत्रीही लिहीत पण त्यांचे लक्ष रस्त्यात वेगळ्या शोभिवंत वस्तुंकडे असायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत चर्चेचा विषय पुलंचं साहित्य आणि त्यातील त्रुटी/उणीवा/मर्यादा असा आहे

इतक्या वेळा पु.ल. वाचूनही त्यातल्या त्रुटी फारशा कधी जाणवल्या नाहीत. जीवनातील व्यंगांकडे हसतखेळत बघण्याची त्यांची वृत्ती होती. इथे कुणीतरी म्हणल्या प्रमाणे त्यांना चिकित्सेचे वावडे असेल असे नाही वाटत. पण प्रत्येक लेखकाची देखिल एक वृत्ती म्हणा किंवा प्रकृती म्हणा असते. तशी त्यांची अती चिकित्सक वृत्ती नसेल कदाचित. पण तो दोष समजावा असे वाटत नाही.

त्यांचा विनोद कुणाला दुखावणारा अथवा टोचणारा नाही. सखाराम गटणे त्यांना विचारतो लेखनाची पूर्वतयारी तुम्ही कशी करता? तेव्हा ते म्हणतात "-- पेन्सिलला टोक करतो, कोरे कागद टेबलवर ठेवतो"

खुर्च्या अथवा सदु आणि दादु अशा नाट्य प्रवेशातून त्यांनी उपहासच केला आहे. ते त्यांचा उल्लेख न- नाट्य असा करतात. परकीय भाषांतील साहित्य नीट समजून न घेता, केवळ उच्चभ्रूपणा मिरविण्याच्या वृत्तीचा त्यांनी उपरोध केला आहे. सदु आणि दादु मधे देखिल केवळ एक पुस्तक वाचून त्यांच्या स्वभावात आणि विचारात अमूलाग्र बदल घडतो असे काहीसे दाखवले आहे. त्याचे देखिल हसूच येते.

व्यक्तीचित्रणातील बारकावे, गुणदोष समजून घेण्याची सहिष्णु वृत्ती, यामूळे त्या व्यक्तीरेखा काल्पनिक असल्या तरी खऱ्या आणि ओळखीच्याच वाटतात. स्वत:चा गाव सोडून फारसे कुठेच न गेलेले हरीतात्या जेव्हा म्हणतात, "तो कोहीनूर तेव्हढा बघायचा राहिला, पिंडाला कावळा शिवला नाही तर कोहीनूर कोहीनूर म्हणा, शिवेल " त्यातली विसंगती जाणवून,किंबहूना त्यामूळेच आपणही हळवे होतो.
या सगळ्यात केवळ गल्लाभरूपणा अथवा नुसताच लोकानुनय आहे असे नाही वाटत.

लेखनाखेरीज, नाटक, चित्रपट, संगीत यातील त्यांचा सहभाग देखिल तितकाच उल्लेखनीय आहे.
"अंम्मलदार" आणि "ती फुलराणी " ही त्यांची नाटके मला अतिशय आवडतात. परकीय कलकृतींवरून प्रेरीत असली तरी आपल्याच मातीतील वाटतात. "तुला शिकविन चांगलाच धडा, तुझ्या पापांचा भरलाय घडा" म्हणणाऱ्या मंजी चे मूळ रूप परकीय आहे अशी शंका देखिल येत नाही.
आणि त्यांचा गुळाचा गणपती, आणि त्यातले इथेच टाका तंबू इ. गाणी अविस्मरणीय आहेत. देवबाप्पा मधील नाचरे मोरा देखिल.

त्यांनी पं वसंतराव देशपांडेंची एक मुलाखत घेतली आहे (आकाशवाणीवर). ती ऐकताना देखिल त्यांची रसिकता, कला आणि कलाकरांविषयीचा आदरभाव, ममत्व इ. जाणवते. त्यातही लोकांना आवडेल तितकेच शक्यतो बोलायचे वगैरे काही जाणवत नाही.

विवादास्पद विषय टाळणे अथवा त्याविषयी मतप्रदर्शन न करणे ही त्यांच्या साहित्यिकते ची मर्यादा आहे असे कसे म्हणायचे. तो देखिल अभिव्यक्तीस्वतंत्र्याचा एक प्रकार आहे ना?

कुठलीही व्यक्ती, लेखक, कलाकार परिपूर्ण नसणारच. कुणाला न कुणाला त्यांच्यातील त्रुटी जाणवणारच. त्यात काही वावगे नाही. परंतु पु.ल. बहूआयामी, बहुश्रुत आणि संपन्न व्यक्ती होते यात दुमत असण्याचे कारण नाही. जुने ते सर्वच चांगले आणि नविन ते वाईटच असे ते कधीच म्हणले नाहीत. चांगल्याला चांगले म्हणावे, आणि वाईटाकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपल्या लोकप्रियतेला बाधा येऊ नये म्हणून विरोधी मतप्रदर्शन न करणे असे होत नाही. मला तर हा गुण अनुकरणीय वाटतो.

प्रवासवर्णन करताना ते तुलना फार करतात, असे म्हणले आहे. पण ही तुलना म्हणजे त्यांचे किती छान आणि आपले फालतु, अशा अर्थाची वाटत नाही. तर अरे आपल्याकडे असे का नाही? अशी कळकळ जाणवते. त्यांनी परदेशात मुक्त व्यासपीठ अशा प्रकारची काही संकल्पना पाहिली. कुणाला आपले विचार व्यक्त करायचेत, अथवा कलेचा अविष्कार लोकांसमोर करायचा आहे, तर त्या साठी सभागृह, नाट्यमंच इ. शोधा, त्यासाठी निधी जमवा असे करायला लागू नये यासाठी एक मंच असावा, त्याचा वापर कुणीही, कधीही करावा अशी कल्पना. त्यांनी तसा एक मंच फर्ग्युसन कॉलेज मधे बांधलाय. म्हणजे इतरांचे जे चांगले आहे, ते आत्मसात करावे, त्याचे अनुकरण करावे ही वृत्ती.

पुलंच्या साहित्यात, साहित्यविषयक जाणीवांमधे त्रुटी नसतील असे नाही, परंतु मला त्या फारशा उल्लेखनीय वाटत नाहीत ही माझी मर्यादा असावी. त्यांनी माझ्यासारख्या असंख्य सामान्य वाचक, प्रेक्षक आणि श्रोत्यांच्या आयुष्यात, काही आनंदाचे क्षण दिले हे मात्रं खरे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

प्रतिसाद आवडला.
तुमची भूमिका मान्य आहे.
पुलंच्या लेखनात गल्लाभरूपणा आहे हे साफ अमान्य आहे. इतकी साधी पोटार्थी इच्छा ठेवून लेखक करणं हे पुलंबाबतीत अशक्य वाटतं.

पुलंच्या साहित्यात, साहित्यविषयक जाणीवांमधे त्रुटी नसतील असे नाही, परंतु मला त्या फारशा उल्लेखनीय वाटत नाहीत ही माझी मर्यादा असावी. त्यांनी माझ्यासारख्या असंख्य सामान्य वाचक, प्रेक्षक आणि श्रोत्यांच्या आयुष्यात, काही आनंदाचे क्षण दिले हे मात्रं खरे.

दुसऱ्या वाक्याबद्दल १००% सहमत.
आणि पहिल्या वाक्याची उत्तरं माझ्या कुवतीप्रमाणे शोधतो आहे. कदाचित मीही त्याच निष्कर्षाप्रत पोचेन. बघू!

टीप- खुस्पटं काढली तर "कोहिनूर कोहिनूर..." हे अंतू बर्व्याचं वाक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच की ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आणि त्यांचा गुळाचा गणपती, आणि त्यातले इथेच टाका तंबू इ. गाणी अविस्मरणीय आहेत. देवबाप्पा मधील नाचरे मोरा देखिल.

छ्या.... स्वत: संगीतकार असले म्हणजे संगीताची समज असतेच असं नाही. त्यांची संगीताची समज क्षुद्र होती असं म्हणेन मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

का हो?
काय झालं..?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सारक्याझम होतं ते Smile

http://www.aisiakshare.com/comment/175422#comment-175422

हा प्रतिसाद प्रेरणा होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एखाद्या लेखकाबद्दल इतक्या जिव्हाळ्याने लिहिलेले सर्व लेखन वाचले. मला मंगला गोडबाले यांनी त्यांच्या पु.ल. प्रेमावर लिहिलेला लेख (क्र.२) आठवला. "पु.ल. देशपांडे या व्यक्तीबद्दल अधूनमधून प्रशंसोद्गार काढा, संसार सुखाचा होईल तुमचा" असा सल्ला त्यांच्या नवऱ्याला मैत्रिणींनी त्यांच्या लग्नसमारंभात दिला होता. पुढे मंगला गोडबोले यांनीच एका लेखात (क्र.१) पु.लं.वर थोडी टीका केली होती ते वाचून "परांजपे, तू, आणि पु.लं.वर टीका ?" अशी त्यांच्या मैत्रिणीची प्रतिक्रिया होती. हा उल्लेख सदर लेख क्र. २ मध्ये होता. त्या लेखाच्या शेवटी घरी पु.लं.ची कॅसेट ऐकताना वाजून वाजून मधेच चिरकायला लागली या अनुरोधाने त्यांची मुलगी "आई, तुझे पु.ल. आता म्हातारे झाले बरं का" या आशयाचं काहीतरी म्हणाली. तर त्या लेखाच्या शेवटी मंगलाबाई (मनात ?) म्हणाल्या की "असं भरभरून देणारे आणि प्रेम करावं वाटणारे असे तुझे पु.ल. तुला मिळोत."
पु.लं.बद्दल आत्मीयतेने आणि म्हणूनच कधी खेदाने - प्रेम करतो तोच रागावतो इ. - बरेच लिहिले जातेय, चांगली गोष्ट आहे.
पण सहभागी मूठभर लोकांच्या खेरीज इतरांना त्यांचे पु.ल. मिळाले आहेत का आणि कोण ? लेखक मराठीत लिहितात का ?
प्रतिसाद आले तर धागा निघू शकेल. नाही तर हेही पु.लं.चं वैशिष्ट्य ठरेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा प्रतिसाद आता बघितला -
इतरही लेखक असतीलच की प्रत्येकाचे आवडते -त्यांच्या लिखाणाबद्द्ल खरं तर लिहायला पाहिजे.
पण "लेखक मराठीत लिहितात का" - हा प्रश्न कठीण आहे. सांप्रतकालीन लेखकांचं लेखन किती जणांनी वाचलं असेल? त्यातलेच फार थोडे लोकं चर्चा करणार.
जुन्या लेखकांचे वाचक पुष्कळ असल्याने चर्चा झालीच तर त्यात भर पडण्याची शक्यता वाढते.

-----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने