गरगर गरगर
गरगर गरगर फिरतो पंखा
आजोबांना येतात शिंका
घरघर घरघर फिरतो मिक्सर
आजी म्हणते "आली चक्कर"
शूs शूs शिट्टी कूकर देतो
"भात शिजला" मम्मिला म्हणतो
टिंग्टाँग टिंग्टाँग वाजते बेल
पप्पा येतात घेऊन भेळ...
सगळे जेव्हा जातात झोपी
घड्याळ करते टिकटिक मोठी
- ग्लोरी
प्रतिक्रिया
:)
पुनःश्च स्वागत.
कविता पूर्वी इतक्या कवितांइतकी गमतीशीर वाटली नाही. पण या निमित्ताने तुम्ही परत आलात. उत्तम झालं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
धन्यवाद मुक्तसुनीत.
धन्यवाद मुक्तसुनीत.
अगदी मुक्तसूनीतांसारखेच
अगदी मुक्तसूनीतांसारखेच म्हणतो.
कविता ठिक मात्र परत आलात.. बर वाटले.. आता येऊ दे अजून छोट्यांसाठी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!