ते दिवसच तसे असतात...!!
ती दिसली नि तिच्यावर जीव जडला
असे होते काहो तुमचे ?
[किंवा असे कधी झाले होते काहो तुमचे ?]
तसे माझे तर फार झाले बाबा
माझा तर चक्क बोल्ड झाला !!
काय गमंत असते ह्या प्रेमाची
जीव खरेच खुळावला
काय आवडले मला
तिचे डोळे?
तिचे बोलणे ?
नजरेतील कोवळेपणा ?
काय कुणास ठाऊक ?
पण माझा तर जीव जडला
तिच्या साध्या साध्या संवादातून
माझा जीव हरवून गेला !!!
कधी सकाळी सकाळी ती आली
की , किती छान दिसायची
अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची
आई तिच्याशी बोलता बोलता
माझ्याकडे हलकेच बघायची
कुणास ठाऊक ती का अशी बघायची ??
का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ?
का तिला पण ती आवडायची ?
नि माझ्या भावी आयुष्यचे स्वप्न बघायची ??
कुणास ठाऊक ??
तिला सोडायला म्हणून मी थोडसे अंतर जायचो
तेव्हा आभाळ किती मस्त वाटायचं
निळे निळे एक वेल्हाळ पाखरू
कसे छान झुलायचे
तिचा निरोप घेताना कसे मन भरून जायचे
हलकासा तिचा स्पर्श
केवढा काहूर माजवायचे
असे झाले काहो कधी तुमचे ?
माझे तर फार झाले !!
ते दिवसच तसे असतात
तिला पहिले की दिवस स्वप्न होऊन जातात
आपण आपले राहत नाही
अलगद तिचे होऊन जातो
प्रेमात पडले की असेच होते
सगळे तिचे नि आपले
एक होते
हे अगदी गळया शप्पत खरे असते ...
शप्पत खरे आहेना हे ..?
प्रतिक्रिया
तुमची कविता छान आहे प्रेमात
तुमची कविता छान आहे
प्रेमात पडल्यानंतरचे भाव चांगले टिपलेत
फक्त एक सुचवावस वाटत की कवितेच्या शीर्षकाचा आणि कवितेचा काही एक संबंध लागत नाही
शीर्षकावरुन काही वेगळच वाटल होत
.
जाई - मान्य आहे तुमचे म्हणणे.
जाई - मान्य आहे तुमचे म्हणणे. एकदम ,
नावात बदल केला आहे. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
सगळेच प्रेमात पडतात काही
सगळेच प्रेमात पडतात काही नविन असेल तर येउ द्या.
तुमचीच भीत्री
सुंदर.
सुंदर.