माजी पईली बायकु - भाग तिसरा -३

तिच्या चाचा कोप थंडगार जालेला आन माज्या कोपावर माशा गुं गूं कराय लाग्ल्या. ही इतका येळ कुटे गेली काय पत्ता लागना. मी हुटलो आन अंग्नात आलो. शवचालयचं दार उगडच व्हतं. आत यिऊन बाद्रुम पायली त ते बी उगडं. सर्वे घरबर फीरून पायलं पन चंदीचा पत्ताच नाय. घरात मी येकलाच. बा आन आय गावाकड. थोर्ला भाव लातुरात, धाकला परबनीत. बईन आन बावजी हुस्मानाबाद मंदी. चंदीला फॉन करु म्हून मोबील घियाला बेद्रुम मंदी ग्येलो. टेबलावं मोबिल दिसला न्हाई. रोज रातच्याला मोबिल टेबलावं त ठिवत हुतो. लई भारी मोबिल हाय सामसुनचा, म्हंजी हाट जीबी राम, येकशे हट्टावीस जीबी मीम्री आन साडीसा ईंच सक्रीन. साडीसा ईंच....... चंदीला त्यो प्वार्न कलीप दाकवु का? सफेत बाय आन काला हबसी आदमी? नगं, नगं.. चंदी परत आपल्या आन त्यो हबसीच्या हत्यारीचं कम्पारीजन करल आन.... अरं, कुटं ग्येला मोबिल? डायनिन टेबलांव त न्हायना रायला? किचान मदी परतलो आन बगितलं, कीचान कट्ट्याव बगितलं, चा साक्रेचा डब्बा बी हिकड तिकड केलं, ग्यासची सेगडी मागं बगितलं पर मोबिल न्हाई दिसला. सर्वे खोल्या धुंडालल्या पन न्हाईच सापडला. आक्रित हाय. बेद्रुम मदी कपाटात ठिवला आसल चंदीनं. बेद्रुम मदी जाऊनश्यान कपाट उघाडलं आन बगतो तर काय? ह्यांगरला लावल्याल्या चंदीच्या सादड्या गायब! माजं छाताड उडाय सुरु जालं. माज्या डॉस्क्यात काय कमकल लोच्या झाला काय ठाऊक पन मी लाकर उघडलं त लाकर साफ! देवानंदचा ज्वेल तीप पिच्चर तुमि पघितलं असाल त टैटल मंदी समदी लाकर साफ जाली हाय त्ये दिसतं. तसलाच ह्यो शीन व्हता. खाटाखाली पघितलं त तितं ठिवल्याली चंदीची ब्याग बी गायब! लाकर मंदी ठिवल्याली माजी आयचीआयचीआय ब्यान्कची कार्ड बी गुल्ल! आरं, ह्यो कस्ला जांगडगुत्ता जाला हाय! काय जालं अचानंक? पैल्यांदा चंदी गायब, मंग मोबिल बेपता, लगीच तिच्या सादड्या हरीवलेल्या, पुढच्याला तिची ब्याग हवा मंदी आन लास्टला आयचीआयचीआय ब्यांक कार्ड गुल्ल! काय बी सुदरेना. मी भाईर आलो, मुक्य दर्वाजा मागं लावल्याली बाईकची आन घरची चावी घितली आन दर्वाजा बंद करुनश्यान बाईककड वळलो. पैल्यांदा चंदीला कल्यान जवेलरकड नेलं व्हतं तवा तिला मी गळ्यामंदी सोन्याचं हार पायजेल का इचारलं व्हतं तर व्हय मनली व्हती. गल्याला तिनं हार लावूनश्यान माला इचारलं कसं दिसतंय तं म्या बोल्लो व्हतो एकदम ज्वेल तीप मदल्या देवानंद इस्टायील मंदी, " ईस मकमलसे गोरे गले में सच्चे मोतियोंका सफेत हार अईसा लगता हय, जईसे चांदणीसे धुले हुए आस्मानमें आकासगंगा लईरा रई हय ". कातील लाजल्याली. मंग बिल अदा करायच्या वख्ताला मी तिला आयचीआयचीआय ब्यांक कार्ड आन त्येचा पिन नम्बर बी देवुन टाकला व्हता. म्हंजी बायकुनं थोडक्यामंदी दागिना आन पैसा आडका लुटूनश्यान धावत, पलत, उड्या मारत ग्येलि हाय हे फिकस जालं. मोबिल बी तीला उगडता येत व्हता. मी येडा तीला पिन देऊन टाकला व्हता. फॉन पे वापराय तीला जमत हुतं. व्वा! चंदीनं आता माजा येगळ्या पद्तीनं उलघा केला व्हता. ग्येली उडत आसं म्हनता बी येत न्हवतं. मी बाईकला कीक मारली आन पैल्याच झटक्यात गाडी सुरू जाली. तीनं बाईकची चावी नेल्याली नव्हती. मिष्टेक केली तीनं. आता पयल्याझूठ पोलिस ठेसन गाटतो. मी ग्येट, बाईक जायील इतपत अर्दा उगाडलं, बाईक वर डांग टाकली आन अक्सीलेतर वाडवला. बाईक घोड्यावानी जी उधालली आन पलटी खाल्ली ते म्होरल्या झाडावं अथाडली आन मी घशटीत ग्येलो ते लोकांडाच्या गेटवं आदळून माज्या हातची साल्ती निगाली, त गाल्फडातनं रगत या लागून त्यानं व्हटाचा मुका घ्येतला. मी हुटून हुबा रायचा पर्यत्न क्येला आन जीव ग्येल्यागत कंब्रेतनं कळ आली. मंग बगीतलं तं बाईकच्या दोनी बी चाका मंदी हव्वा न्होती. माज्या दोल्यातनं आसू वाय लाग्ले. लई वाईट वाटाय लागलं. चंदीनं मला कशापाई फशिवलं आसल काई कलंना. तिचा वायला यार आसल तं माज्या संग लगीन कशापाई केलं? करायची न्होती. जीन्दगी आजुन कीती थपडा मार्नार हाय कलंना.

आपुन शेतकऱ्याचं प्वार. विंग्रजी घेऊन येम्मे केलं आन लेच्ररर म्हूंन कालीजात शिकवाय बी लाग्लो. शेतकऱ्याचं प्वार म्हूंन शेती करावी आसं बा म्हनला. "टू मोस्ट पीपल सॉईल इज डर्ट, बट फॉर फार्मर इट इज पोटेन्शियल" आसं त्यो म्हनला आमच्या भाषेत जे मी तुम्हास्नी विंग्रजीत सांगितलं. पन शेती म्हणलं तं पर्तेक पायरीला संकाट आन जंजाळ. काळी आई लई कस्ट करवून घेतीया.ऊन, वारा,आन पाऊस आसताना बी वर्साला तींसेपासट दीस शेतामंदी इश्रांती न घ्येता कस्ट हुप्सायचे. इंपर्मेसंन टेकनालाजी आल्याव इंपोसिस, टीसीयेस्स, पतनी आन इप्रो मंदी काम कर्नारी प्वार आन प्वारी म्हनाय लागली व्हती कि, " वुई वर्क टेन्टी फ़ॉर बाय सेवन येंड तींसेपासट दीस" आन लै भाव खायाची. हरेक सनी आन रवीला सुट्टी घीउन बाईकवर हुन्दडा घालीत टरापीक जाम करायची आन कुटं बी धाब्याव थांबूनश्यान जंकफुड खायाची आन प्वाट वाडून घ्यायाची. मायला ही प्वारं लगीन जाल्यावं प्वाटाला प्वाटच लावायची का काय? डेरप्वाट्या असल्याव पैल्या रातीला कसं व्हायाचं कुनाला ठाव. प्वारी येगल्या पद्दतीनं प्वाट वाडून घ्यायाची.काय त्ये मनत्यात ना, लीवीन रिलेसंनसीप मंदी. टेन्टी फ़ॉर बाय सेवन येंड तींसेपासट दीस. हुं.. माय फुट्ट..! शेतकरी त पयल्या पासुन घासतोय टेन्टी फ़ॉर बाय सेवन येंड तींसेपासट दीस. शेतीचा जलम जाला तवापास्न, आन ही जत्रा हरेक सनी आन रवीला सुट्टी घीउन म्हंत्यात वुई वोर्क टेन्टी फ़ॉर बाय सेवन येंड तींसेपासट दीस. शेतकऱ्याच्या घरामंदीं जलम घियाचा म्हंजी कस्ट हुप्सायचे. वन्ली कस्ट. दरेक पायरीला नाना पर्कारची संकाट आन त्या बरुबर सामना. अगदी लावनी पास्न कहाडनी पोत्तुर. पेरनी केली त उगवतय का न्हाय , उगवले त भौलानात ला इचारायचं पौस पडेल का, पिकाव रोग अतवा कीड त पडणार न्हाय ना, कीड मारायला फवार्नी कुटली, बी बियानं ब्येस क्वालीतीचं भेटल का, पर्टीलायजर कुटल्या कंपनीचं घ्यावं, त्ये बी नकली निगाला तं कस्काय, टराक्टर नीट चालल का, डिजिल येळेवर मिळल का , पान्याची मोटार येवस्तीत असल का, पायीप लीक असल का, टोलदाड येनार न्हाई न्हवं, बकऱ्या पीक खाऊन जात्याल का, आसल्या परस्नानीं दिल नुस्तं मादुरी दीक्सीत वानी धाक धाक कराय लागायच. त्यातबी शेतीमालाला कदीच ब्येस भाव मिलत न्हाय. सर्कार बी शेतीमालाला कमी भाव आसताना कसली बी हुपाययोज्ना करतय आसं दिसतच न्हाय. कांदा टमाटर भाव वहाडले की लगेच आयात धोरन राबवतय आन भाव कमी करायला लावतंय.

मागच्या साली निसरग राजा आमच्याव कोपल्येला. अख्खा असाढ म्हैना ग्येला तरी बी पौसाचा योक बी तेम्ब न्हाय. असाढ सुरु जाला तवा पैल्या सात दिसातच पेरन्या केलेल्या. ये रे ये रे पौसा तुला देत्यो पैसा म्हन्लो कितींदा पर त्ये म्हनलं 'र भिकुसा, तुज्याकड पैसा न्हाय त मी कशापाई येवू?' दुबार पेरनी कराय पैका कुटं व्हता? चला, ग्या मंग उदारी सावकाराकड. असाढ मैन्याच्या सेवटला आन सावनच्या पैल्या सात दिसात कमरेपोत्तूर वाढुन गुजगुजी करनारा कापुस गुडग्या पोत्तुर बी आला न्हवता. मंग उत्पन काय येनार व्हतं? उत्पन न्हाय तं घेतल्याली उदारी परत अदा कशी करायची? सावकार रोज घरला याय लागलं. मंग त्येनं तगादाच लावला. बा म्हनला पैका न्हाय वो शेट, त्यो म्हनला मंग मी सांगतो त्या पोरी बरुबर भिकुसाचं लगीन लावून दे. काय करनार व्हता बा, व्हय मनला, दुसरा विलाजच न्हवता. आन मंग सावकार येक दीस येक आय, येक बा, आन दोन प्वारं आशी मंडली घिऊन आलं. त्यातल्या पोरीला बगुन मी, " कुन्या गावाचं आलं पाकरू," आसं मनात म्हनलो. "पावनं, कुटल्या गावचं हायसा?" बा नं इचारलं, " कोलार बुदरुक, नगर जिल्ला." प्रौड मानुस बोल्ला. अशा पर्कारे ज्वेल तीप चंदीची येन्ट्री जाली.

" तु हिसाब मत मांग मुजसे अय जीन्दगी, तुने घाव गिने नही तो मईने भी जखम गिने नंही."
…….

करमशा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त लिहीताय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0