जाणीव भान - भाग 4

बधिरावस्थेचे गूढ

a1

आपल्यापैकी काहींना तरी ऑपरेशन थिएटरमधील शस्त्रक्रियेचा (कटू) अनुभव नक्कीच असेल. स्ट्रेचरवरून तुम्हाला थिएटरच्या आत ढकलल्यानंतर गाऊन घातलेले डॉक्टर्स तुमचे हसतमुखाने स्वागत करत तुम्हाला (उसने) धैर्य देण्याच्या पावित्र्यात असतात. थोडीशी विचारपूस करतात. चहा – कॉफी पाहिजे का असे विचारतात. तुम्ही हो किंवा नाही असे काही म्हटले तरी चहा कॉफी येत नाही ही गोष्ट अलहिदा. डॉक्टरांपैकी एक जण हळुवारपणे तुमचा डाव्या हातात सुई टोचतो. तुमचे लक्ष घड्याळाकडे असते. हळू हळू सेकंदाचा काटा पुढे सरकत असतो. काय होत आहे हे लक्षात यायच्या आत तुम्ही बधिरावस्थेत जाता. तुम्हाला भुलीचे इंजेक्शन दिलेले असते. तुमच्यासमोर डोळ्यासमोर कोरा पडदा, इतर काहीही नाही.

पुन्हा डोळे उघडल्यानंतर थोडीशी सुस्ती. तुम्ही भलत्याच खोलीत आलेले असता. या पूर्वीच तुम्हाला सुस्ती येईल, झोप लागेल असे सांगितलेले असते. थोडीशी जाग आल्यानंतर सगळे काही संपल्यासारखे वाटते. रिक्तपणा जाणवतो. गंमत म्हणजे डॉक्टर्स भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर नेमके काय होते हे कधीच सांगत नाहीत. कारण..... त्यानाच ते माहित नसते.

a2

भूल दिल्यामुळे शस्त्रक्रिया बिनधोक झाली, हे आपण नाकारू शकत नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा भूल देण्याची सुविधा उपलब्ध नव्हती त्याकाळी शस्त्रक्रिया म्हणजे - सर्जन व रुग्ण या दोघानाही – एक भयंकर अनुभव असेच वाटत होते. परंतु आता जगभरात बिनदिक्कतपणे वापरात असलेली ही एक सुरक्षित वैद्यकीय प्रक्रिया आहे. तरीसुद्धा हे औषध कसे काम करते याबद्दल सर्व संबंधित अजूनही अनभिज्ञ आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण मुळात आपल्याला जाणीव असणे याबद्दलच माहित नसल्यामुळे जाणीव नसणे हेसुद्धा कदाचित कळणार नाही.

परंतु आता MRI स्कॅनिंगमुळे काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. मेंदूतील हालचालींचे दृश्य टिपण्याच्या नवीन नवीन कौशल्यामुळे भूल दिल्यानंतर नेमके काय घडते हे कळू लागले आहे. चेतापेशीतून विद्युतप्रवाह कसा जातो याची कल्पना येत आहे. अभ्यासकांना जाणिवेचे गूढ उकलू शकतो याबद्दल आत्मविश्वास वाटत आहे. भूलीचे औषध/इंजेक्शन दिल्यानंतर जाणिवा कसे बधिर होतात याची (अंधुकशी का होईना) कल्पना येत आहे.

गंधकाच्या ईथरला रुग्णाच्या नाकासमोर धरल्यास माणूस बधिरावस्थेत जातो याची कल्पना १९व्या शतकाच्या प्रारंभी आली होती व ही अवस्था शस्त्रक्रियेस अनुकूल आहे याची हळू हळू खात्री होऊ लागली. तेव्हापासून संशोधक वेगवेगळे रसायन वापरून त्याचे शरीरावर व मेंदूवर कशाप्रकारे परिणाम करतात याबद्दल संशोधन करू लागले. नाकाद्वारे वा इंजेक्शनद्वारे शरीरात गेलेले रसायन काही क्षणातच रुग्णाला बधिरावस्थेत नेत होती. काही वेळानंतर या रसायनाचा ओसर संपल्यानंतर रुग्ण पुन्हा पूर्वीच्या अवस्थेत येत होता. या मधल्या काळात सर्जन आपले कार्यभाग उरकून घेत होते. वरवरून जरी ही क्रिया सुलभ, सोपी व बिनधोक वाटत असली तरी रुग्णाच्या जीवन मरणाची दोरी भूलतज्ञाच्या हाती असते, यावर सांगूनही विश्वास बसत नाही. रुग्णाच्या स्थितीवरून रसायनची निवड, शस्त्रक्रिया होत असलेला शरीराचा भाग, बधिरावस्थेची अपेक्षित कालावधी, शस्त्रक्रियेच्या वेळी काही चुकल्यास त्यावरील तातडीचे उपाय व त्यासाठी जय्यत तयारी, इत्यादी गोष्टींची जवाबदारी भूलतज्ञाची असते. आणि त्याची एखादी क्षुल्लक चूकसुद्धा रुग्णाचा जीव घेऊ शकते.

बधिरावस्थेत जाणे म्हणजे स्विच ऑन – ऑफ केल्यासारखे नाही. तुम्ही जाणीवावस्थेत तरी आहात किंवा बधिरावस्थेत तरी आहात असे होत नाही. ही काही डिजिटल प्रक्रिया नाही. डिमर स्विचसारखी ही एक अँनालॉग प्रक्रिया आहे. रुग्णाला भुलीचे इंजेक्शन (वा औषध) दिल्यानंतर रुग्णाची अवस्था अट्टल दारुड्यासारखी होते. कारण बधिरावस्थेच्या अगोदर काय घडले, नंतर काय घडले याची त्याला कल्पना नसते. आणि ते तो योग्य शब्दात सांगू शकत नाही. या संधीकाळात प्रवेश केल्यानंतर रुग्णाला सर्जन काय करत होते, श्वासोच्छ्वासासठी असलेली सुविधा, थिएटरमधील हालचाली इत्यादीविषयी काहीही माहित नसते. आजकाल भूल देम्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ व वेदनारहित झाल्यामुळे भुलीचे इंजेक्शन/औषध घेतल्या घेतल्या शस्त्रक्रिया पूर्ण झालेली असते व भूलतज्ञ प्रत्येक क्षण मॉनिटर करत असतो
.a3
यामुळे भूलसाठी वापरात असलेल्या रसायनाबद्दल उत्सुकता वाढते. ही रसायनं कसे काम करतात हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या शंभर – दोनशे वर्षात इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रसायनं रसायनं वापरले गेले की त्यामुळे मेंदूत/शरीरात कुठे कुठे बदल होतात, रुग्ण बधिरावस्थेत कसा जातो, त्याची जाणीव कशी नाहिशी होते, ती पुन्हा पूर्वस्थितीत कशी येते, असे अनेक प्रश्न यासंबंधात विचारावेसे वाटतात. इतर प्रकारची औषधं वा रसायनं रेणूच्या आवरणाला चिकटून – विशेषकरून प्रथिनांना चिकटून – एखाद्या किल्ली – कुलुपाप्रमाणे कार्य करत शरीरावर झालेल्या दुष्परिणामाला थांबवण्याचे प्रयत्न करतात. परंतु भुलीसाठी वापरात असलेले स्टेरॉइड्स वा बार्बिच्युरेट्स किंवा xenonसारखा वायू रेणूऐवजी अणुच्या स्थितीत असल्यामुळे किल्ली-कुलुपासारखे ते कसे काय काम करू शकतात याचा अजूनही उलगडा झाला नाही.

काही तज्ञांच्या मते भूलसाठी दिलेल्या औषधाची परिणामकारकता त्याचे घटक किती वेळ ऑलिव्ह ऑइलमध्ये विरघळत होत्या यावर अवलंबून आहे. लिपिड सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांना मात्र प्रथिनांच्या रेणूंना रसायन चिकटण्याऐवजी चेतापेशीतील मेंब्रेनच्या कामात ही रसायन अडथळा आणून पुढील कार्य करू शकतात, असे वाटते. इतर काही संशोधकांच्या मते पेशीत मेंब्रेन नसल्यास ते प्रथिनांच्यावरही चिकटू शकतात. हे सर्व संशोधन अजूनही प्राथमिक अवस्थेत असून निश्चित असे निष्कर्ष निघाले नाहीत. मेंदूत कुठेतरी ‘अबोधना’ चे स्विच असू शकेल का, हाही प्रश्न विचारला जातो. काही तज्ञांच्या मते मात्र ही शक्यता नसावी. कदाचित मेंदूतील पेशीच्या मेंब्रेनवर रसायनाचा परिणाम होऊन पूर्ण नेटवर्क निकामी केल्यामुळे माणसाची शुद्ध हरपत असावी. कॉर्टेक्स आणि मेंदूच्या आवरणातील EEG वरून हा अनुमान काढला असावा. काही अभ्यासकांच्या मते भूलीवरील हे संशोधन माणूस कोमात का जातो यालाही उत्तर देऊ शकेल.

संपूर्ण जीवन, आपले विश्व व इतर सर्व काही आपल्या जाणिवेशी निगडित आहेत. आपल्यातील प्रत्येकाला थोड्या फार प्रमाणात का होईना याचा अनुभव येत असतो. परंतु अजूनही आपण त्याची नीटपणे व्याख्या करू शकत नाही, हेही खरे आहे. जेलीसारखा असलेला हा मेंदूचा गोळा संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे जिवंतपणाची संवेदना कसा काय देत असेल? आताचे प्रगत तंत्रज्ञानसुद्धा मेंदूच्या आत नेमके काय आहे, तिची रचना कशी आहे आणि ही रचना जाणिवेला कशी काय पोषक ठरू शकते याची उकल करू शकली नाही.

केवळ भूल दिल्यामुळे जाणिवेत बदल होतो असे नाही. कारण आपण झोपेतून उठल्यानंतर किंवा डोक्याला इजा झाल्यास हा बदल होऊ शकतो. फक्त भूलतज्ञ आपल्यातील जाणिवेला नियंत्रित करतात व त्याला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता पूर्वस्थितीत आणून सोडतात.

ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर तेथील नर्स हसतमुखाने जेव्हा स्वागत करते तेव्हा आपल्या डोळ्यासमोरील अंधार गायब झालेला असतो. ‘मी जेव्हा थिएटरमध्ये निद्रितावस्थेत होतो तेव्हा काही जणांनी scalpel वापरून माझ्या शरीरावर अनेक गोष्टी केल्या, कापाकापी केली व नंतरची जोडणी झाली. परंतु त्या कालखंडात माझ्यातला ‘मी’ कुठेतरी गुप्त झाला होता. माझा अनुभव भूलतज्ञाच्या कौशल्याला सलाम करतो. त्यांच्या मते हे नेहमीचे असले तरी माझ्या मेंदूत बदल करून पुन्हा पहिल्या अवस्थेत आणून सोडणे हे येरा गबाळाचे काम नव्हे.’

क्रमशः

या पूर्वीचेः
बुद्धीमान रोबो: जाणीव भान -1
मेंदू’ नावाचे मशीन : जाणीव भान भाग - 2
बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे : जाणीव भान भाग - 3

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)