एल पावो रेआल (उत्तरार्ध)

(उत्तरार्ध)

ब्रेकफास्ट आटपला, तेव्हा महाबळेश्वरकर म्हणाले,

"आता तुम्ही विश्रांती घ्या. दोन तासांनी शिंपी येईल, आणि तुमची मापं घेऊन कपडे शिवून आणेल. पाऊलोला पाठवून तुमचं इतर सामानसुमान आणवतो."

"ठीक आहे सर," मी म्हणालो. दुसरं काय बोलणार?

पाऊलोने मला माझी खोली दाखवली आणि तो निघून गेला. मी आरामखुर्चीत बसून विचार करू लागलो. मुक्काम वाढल्याचं घरी कळवलं की झालं. पीएचडीच्या गाईडना सांगीन, पण त्या तशाही हॅन्ड्स-ऑफ आहेत. इथे मजा येईल, एल पावो रेआलचा पाहुणचार आहेच, गप्पा मारू, थोडा अभ्यास करू. तशीही पीएचडी संपवायची घाई नाहीये.

मग एक झोप काढली. जाग आल्यावर घरी फोन करू म्हटलं तर नेटवर्क नव्हतं. मग खोलीतली मॅगझिन्स चाळत बसलो. थोड्या वेळाने शिंपी येऊन मापं घेऊन गेला. मग बाहेर चक्कर टाकली पण बंगल्यात कोणी दिसलं नाही. परत रूमवर गेलो.

दुपारी दोन वाजता एकजण जेवण घेऊन आला. त्याने एक चिठ्ठी दिली. "काही अपरिहार्य कारणांमुळे मी सायंकाळपर्यंत तुम्हाला भेटू शकणार नाही. क्षमस्व. तुम्हाला भोजन आवडेल अशी आशा आहे. महाबळेश्वरकर."

भरली वांगी, ज्वारीच्या भाकऱ्या, मसालेभात, आणि दही असा बेत होता. पोटभर जेवलो आणि झोपलो. दुसरं करायला काहीच नव्हतं.

संध्याकाळी दारावर टकटक झाली. एकजण कपड्यांचा गठ्ठा घेऊन आला होता. "एल पावो रेआलने सांगितलंय, आंघोळ करून नवे कपडे घालून डिनरला या."

आंघोळ वगैरे आटपली. नवे कपडे पाहिले तर डार्क पॅन्ट आणि लाईट बुशशर्ट होते. त्यातलाच एक जोड घातला. अशा कपड्यांची सवय नसल्याने ऑड वाटत होतं. आरशात पाहिलं तर हसूच आलं.

डायनिंग रूममध्ये गेलो. महाबळेश्वरकर हसत म्हणाले,

"आरशात बघितल्यासारखं वाटतंय!"

"ॲक्चुअली मला अशा कपड्यांची सवय नाहीये," मी म्हणालो.

"ॲक्चुअली नाही. खरंतर." महाबळेश्वरकरांची चूक दुरूस्त केली. "माझ्या शिंप्यानं नेहमीच्या धर्तीने कपडे शिवलेत. असो. तुम्हाला शोभून दिसताहेत. दोनचार दिवसांत सवय होईल."

मी नुसताच हसलो.

"या, जेवूया," महाबळेश्वरकर म्हणाले, आणि आम्ही जेवायला बसलो. मुगाची उसळ, फुलके, काकडीची कोशिंबीर असा मेनू होता.

"आज तुमचा उपवास आहे का? का तुम्ही व्हेजिटेरियन आहात?" मी विचारलं.

"मी शाकाहारी आहे. या घरात सगळेच शाकाहार करतात. मांसाहार, मद्यपान, धूम्रपान अशी व्यसनं मी कटाक्षाने टाळतो."

"ही व्यसनं मी कटाक्षाने पाळतो" हे सांगायची ऊर्मी मी आवरली. न जाणो, एल पावो रेआल रागवायचे.

जेवताना महाबळेश्वरकर जरा गप्पच होते. जेवण झाल्यावर मीच विषय काढला,

"सर, मला जरा घरी फोन करायचाय, पण नेटवर्क मिळत नाहीये. तुमच्या मोबाईलवरून करू का?"

"मी भ्रमणध्वनी वापरत नाही. या घरात कोणीही भ्रमणध्वनी वापरत नाही. घरी कळवण्यासाठी कोपऱ्यात उपग्रह-दूरध्वनी आहे तो वापरा, पाऊलो मदत करेल. पण थोडक्यात आटपा. पेसो काही वृक्षांना लागत नाहीत." महाबळेश्वरकर घुश्श्यातच म्हणाले.

त्यांनी विचार बदलण्यापूर्वी मी पटकन घरी फोन करून मुक्काम वाढल्याचं कळवलं आणि पीएचडी गाईडना मेसेज द्यायला सांगितलं. टेबलपाशी परतलो तोवर महाबळेश्वरकरांचा मूड पालटला होता.

"उद्या सकाळी लवकर उठा. आपण गेंड्यांना चारा द्यायला जाऊया. काहींना गेंड्यांविषयी भीती वाटते, पण ते घोड्यासारखेच प्रेमळ आणि उमदे जनावर आहे. दोघेही विषमखुरी प्राणी, त्यामुळे त्यांच्या स्वभावधर्मात साम्य असणे स्वाभाविक आहे."

पुढचा अर्धा तास महाबळेश्वरकर गेंड्यांविषयी बोलत होते. मी कशाबशा जांभया रोखून धरत होतो. त्यांनी सोडल्यावर खोलीत जाऊन मी ताणून दिली. दुपारी झोपल्यामुळे आता झोप येत नव्हती.

ओव्हरऑल विचित्र दिवस होता. एल पावो रेआल हा काय प्रकार आहे हे कळत नव्हतं. ड्रग डाॅन असूनही तो साधी सिगारेटही ओढत नव्हता किंवा दारू पीत नव्हता. नाॅनव्हेजला व्यसन म्हणत होता. बरं, व्हेजमधेही अगदी टोटल मराठी जेवणच होतं. माझ्या मराठीतल्या चुका दुरूस्त करत होता पण एरवी मला फारसं बोलू न देता स्वतःच बोलत होता. घरी कोणाकडेच मोबाईल नव्हते आणि नेटवर्कही नव्हतं. आणि त्याच्या शिंप्याने त्याच्यासारखेच बुशशर्ट माझ्यासाठी शिवले होते.

काहीतरी विचित्र होतं, पण काय ते कळत नव्हतं.

त्या रात्री झोपसुद्धा नीट लागली नाही. चित्रविचित्र स्वप्नं पडत होती. बालकथांमधली चित्रं, नार्कोजमधली दृश्यं, जुन्या गोलमोलमधले सीन्स, नाच रे मोरा गाणं या सगळ्यांची सरमिसळ झाली होती.

सकाळी जाग आली. आंघोळ करायला गेलो आणि अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

एल पावो रेआलची आणि माझी उंची आणि बिल्ड साधारण सारखी होती. चेहर्‍यात फारसं साम्य नसलं तरी रंगरूप लांबून सारखं वाटलं असतं. एस्पेशली कपडे सारखे असले तर. एल पावो रेआल नेहमी डार्क पॅन्ट आणि लाईट बुशशर्ट घालतो. त्याच्या प्रतिस्पर्धी गँग त्याला मारायचा प्रयत्न करत असणार. त्याच्यासारखे कपडे घालून मी कुठे गेलो तर, त्याचा मारेकरी मला उडवणार. एल पावो रेआल प्लास्टिक सर्जरी करून गायब होईल.

च्यायला अख्ख्या कोलंबियात भेटलेला एकमेव मराठी माणूस माझ्या जीवावर उठलाय. आता काय करायचं? सावध राहिलं पाहिजे.

मी येताना घातलेली चुरगळलेली जीन्स घातली. वर नुसताच बिनबाह्यांचा बनियन घातला. केस जमतील तेवढे विस्कटले, आणि खाली लिव्हिंग रूममध्ये गेलो.

वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी, हे ठाऊक होतं. एल पावो रेआलला डायरेक्ट कन्फ्रन्ट न करता पण ठामपणे बोलायचं असं मी ठरवलं होतं.

"काय हा अवतार? या घरी कोणीही असे कपडे घालत नाही!" महाबळेश्वरकर म्हणाले.

"हो. पण मी या घराचा सदस्य नाही. तुम्ही दिलेले कपडे मला कम्फर्टेबल वाटत नाहीत," मी ठामपणे बोललो. "आणि मी विचार बदललाय. तुमच्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद, पण मला परत भारतात जायचंय."

महाबळेश्वरकरांनी माझ्याकडे पाहिलं. काही मिनिटं ते न बोलता स्तब्ध बसून होते. मग ते उठून उभे राहिले, आणि माझ्याकडे न बघता, येरझारा घालत बोलू लागले.

"काल आपण बालकथांबद्दल बोलत होतो. शूर तरूणाला राजा फक्त अर्ध राज्य देत नाही; त्याचा राजकन्येशी विवाहदेखील करून देतो. तुम्ही लीलावतीशी एकदा बोला, आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा."

महाबळेश्वरकर खोलीबाहेर निघून गेले. मला काहीच सुचेना. एवढ्यात घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि एक लातिना ब्यूटी लिव्हिंग रूममध्ये आली. शी लुक्ड एक्झॅक्टली लाईक शकीरा ऑर जेनिफर लोपेझ!

मी स्तंभित झालो होतो. तीच पुढे येऊन म्हणाली, "हाय! मी लीलावती. बाबांनी सांगितल्यावर मी इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा तू कूल दिसतोयस."

हीसुद्धा मराठीत बोलत होती. म्हणजे महाबळेश्वरकरांसारख्या शुद्ध मराठीत नाही, पण नाॅर्मल मराठीत. मी जवळपास अवाक झालो होतो, पण कसाबसा बोललो,

"म्हणजे? एल पावो रेआल तुझे बाबा?"

शकीरा हसली. (तिचं नाव लीलावती आहे हे स्वीकारणं जरा कठीण जात होतं.) "बस, सगळं सांगते," म्हणत ती माझा हात धरून मला डायनिंग रूममध्ये घेऊन गेली. दोघांसाठी काॅफी ओतून ती बोलू लागली,

"मयूर महाबळेश्वरकर माझे जन्मदाते नाहीत. माझे जीवशास्त्रीय पिता एका कार्टेल बाॅसचा उजवा हात होते. मी तान्ही बाळ होते तेव्हा ते, आई, आणि मी सुट्टीसाठी म्हणून मायामीला गेलो होते. खरंतर ती सुट्टी नव्हती, कन्साइनमेंटचं काहीतरी काम होतं. तिथल्या एका लोकल गँगच्या दोघांनी आमच्यावर हल्ला केला. ते साधं मगिंग आहे असं वाटल्याने, आणि मी तान्ही बाळ आहे हे बघून, जवळून जाणाऱ्या एकाने आम्हाला मदत करायचा प्रयत्न केला. माझे जन्मदाते आई-वडील दोघेही मृत्यूमुखी पडले. त्या फरिश्त्यालाही बरीच इजा झाली. पण मला काहीही झालं नाही. आणि या गोंधळात माझ्या जन्मदात्याचे काही सहकारी तिथे पोचले त्यामुळे लाखोंची कन्साइनमेंट शाबूत राहिली. जन्मदात्या वडलांचे बाॅस याबद्दल कायम कृतज्ञ राहिले आहेत."

"म्हणजे, तो फरिश्ता म्हणजे..."

"हो. मयूर महाबळेश्वरकर. त्यांच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च बाॅसने केला. पण डोक्यावर झालेल्या आघातामुळे महाबळेश्वरकर कूड नेव्हर बी द सेम अगेन. म्हणून बाॅसने त्यांना इथे आणलं, त्यांची सगळी व्यवस्था करून दिली. त्यांच्या कलानं घेतलं. त्यांच्या मनात येणाऱ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या - अगदी एकशिंगी गेंड्यांच्या कळपापर्यंत. कधी त्यांचं ऐकून, कधी आपल्याला हवं ते त्यांचीच कल्पना आहे असं त्यांना कन्व्हिन्स करून, त्यांचं आयुष्य जमेल तेवढं सुखकर केलंय बाॅसने.

आणि हो - माझा सांभाळही महाबळेश्वरकरांनीच केला, अगदी मनापासून. त्यामुळे तर मी मराठी शिकले. ते माझे बाबा नाहीत हे बाॅसने मला पाच वर्षांपूर्वी सांगितलं - माझ्या अठराव्या वाढदिवशी. तेव्हा खरंच धक्का बसला होता, पण आता मी सावरलेय."

"पण या सगळ्याशी माझा काय संबंध?" मी विचारलं.

"बाबांचं वय होतंय. त्यांना एकच चिंता आहे - माझं कसं होणार? मला लवकर आयुष्याचा साथीदार मिळावा असं त्यांना वाटतं. बोगोटात मराठीभाषिक तरूण आलाय हे कळलं तेव्हा त्या विचारानं उचल घेतली. बाबांच्या काही कल्पना, पाऊलोच्या काही कल्पना, आणि बाॅसची साथ यामुळे तू इथे आलास. आय नो धिस इज एक्स्ट्रीमली अनकन्व्हेंशनल, बट लेट्स ट्राय टू डेट. इफ इट वर्क्स आऊट, ग्रेट. आणि हो, आपण बोगोटात किंवा बहामाला जाऊ शकतो. तू तुझी पीएचडी पूर्ण कर. मी फॅशन डिझायनिंग शिकणार आहे. लेट्स गिव्ह इट सिक्स मन्थ्स. मग पुढचं पुढे. आणि हो, सगळा खर्च बाबा करतील. यू डोन्ट हॅव टू वरी अबाऊट दॅट."

मला हर्षवायू व्हायचाच शिल्लक होता. ऑल एक्सपेन्सेस पेड ट्रिप टू बहामाज. तेही शकीराबरोबर. मला काय बोलायचं ते सुचेना.

शकीराने माझ्या मौनाचा निराळा अर्थ काढला. "डोन्ट डू इट फाॅर मी. बट डू इट फाॅर बाबा. अगदी प्रेमळ, साधे, निरूपद्रवी आहेत ते. कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी साधी मुंगीही मारली नाही. प्लीज त्यांच्यासाठी एवढं कर."

मी हसून म्हणालो, "मला तुझा प्रस्ताव मान्य आहे."

शकीरा हसली. "मी पटकन बाबांना खूषखबर देते, आणि मग शहरात जाऊन येते. शाॅपिंग करायला. दोन तासात परतते. तू बाबांचा निरोप वगैरे घे तोवर."

दहा मिनिटांत ती घराबाहेर पडली. मला एकदम एक्साईटेड वाटत होतं. काॅफीचा मग घेऊन बाहेर गझिबोत जाऊन बसलो, आणि मयूर महाबळेश्वरकरांबद्दल विचार करत बसलो. त्यांच्याबद्दलची भावना किती पटापट बदलत गेली होती - आधी भीती, मग कन्फ्यूजन, मग राग, आता आदर आणि कणव...

असा विचार करत बसलो होतो. सगळं शांत होतं. आणि अचानक कुठूनतली एक कार रोरावत आली आणि कचकन ब्रेक दाबत थांबली. तीनचार जणांनी कारमधून बाहेर उड्या मारल्या आणि पिस्तुलं घेऊन धावू लागले. मला काही सुचेना. गझिबोतल्या टेबलखाली लपलो.

आणि घराच्या खिडकीतून उडी मारून मयूर महाबळेश्वरकर - नाही, डाॅन एल पावो रेआल - बाहेर आला. असाॅल्ट रायफल घेऊन. क्षणाचीही वाट न पाहता त्याने गोळ्यांच्या फैरी झाडायला सुरूवात केली. गोळ्या उडत होत्या आणि काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्यांचा खच जमिनीवर पडत होता.

सगळे पिस्तुलधारी आणि कारचा ड्रायव्हर मिनिटाभरात कोसळले. एल पावो रेआलने विजयी मुद्रेने हवेत फैरी झाडल्या, आणि तो गुणगुणू लागला - "पुंगळ्यांची माळ उडे अजुनि अंगणात!"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच आहे प्रकार.
शी लुकड सो लुकडी असे आधी वाटले पण शकिरा म्हटल्यावर तसे नक्की नसणार.

पण शी लुक्ड एक्झॅक्टली लाईक शकीरा ऑर जेनिफर लोपेझ! या जागी , शी लुक्ड एक्झॅक्टली लाईक शकीरा ऑर किशोरी आंबिये किंवा अलका कुबल, किंवा... ,... असे काही म्हणाले असतेत तर पुलं, सॉरी, भाईंच्या "कानन बाला ऑर दुर्गा खोटे"शी समकक्ष झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘ऐसी’वरील श्रेणिव्यवस्था आता चालू झालेली आहे खरी; मात्र, माझी श्रेणिप्रदानक्षमता अद्याप पुनरुज्जीवित करण्यात आलेली दिसत नाही. असती, तर ‘मार्मिक’, ‘माहितीपूर्ण’, अथवा ‘विनोदी’, यांपैकी एक निश्चित दिली असती.

असो चालायचेच.

——————————

‘ऐसी’ भिकाऽऽऽऽऽऽऽऽरी! माझी श्रेणिव्यवस्था काढून घेऽऽऽऽऽऽऽऽतली! ढुम् ढुम् ढुमाक्! ढुम् ढुम् ढुमाक्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनोदी दिली आहे तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मी तुमच्या वतीने 'माहितीपूर्ण' दिल्येय गव्याला.

या रेयालच्या गोष्टित काही फारसा जीव रमला नाही माझा म्हणून म्हंटलं जाता जाता
एव्हढं सत्कार्य करून तरी वेळ सत्कारणी लावावा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

या रेयालच्या गोष्टित काही फारसा जीव रमला नाही माझा

ज्याचीत्याची मर्जी, अर्थात.

मी ही कथा टिपिकल मराठीमानसरंजकफँटसीकथांची प्यारडी म्हणून वाचली. शिवाय, क्लासिक देवदत्तियन फॅशनमधल्या अशक्यकोटीतल्या सिच्युएशन्स भरीला आहेतच. तो suspension of disbelief वगैरे राहूद्यात; हा disbelief जो प्रकार असतोय, तो पार वेशीवर टांगावा लागतोय बघा.

(पण जोहानिसबर्गमध्ये स्वाहिली खपवून घेणारी मराठी ज्यन्ता काय वाट्टेल ते खपवून घेईल, बघा. एकदा का ‘जगाच्या कोठल्यातरी कोपऱ्यात जाऊन कशाततरी यशस्वी झालेला आफ्रिकन बापाचा मराठी मुलगा’ ही कल्पना डोक्यावर उचलून घ्यायची म्हटली, की त्या emotionalismच्या नावाखाली तपशिलातल्या काय वाटेल त्या घोडचुकांकडे (बहुधा टिपिकल मराठी सनातन (eternal अशा अर्थी) अज्ञानापोटी (किंवा ‍अडाणचोटपणामुळे म्हणा, हवे तर.)) दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. (वाचकांची तर असतेच, पण वाटेल ते दडपून देण्याची लेखकांचीसुद्धा.) मला वाटते मराठी वाचकाच्या (आणि लेखकांच्यासुद्धा!) याच स्वभावाची लेखकाने खिल्ली उडविलेली आहे.)

(म्हणजे, ष्टोरीम्याटर अर्थात कैच्याकै आहे (हीदेखील क्लासिक देवदत्तियन ट्रेट!), सिच्युएशन्स अशक्यकोटीतल्या आहेत… परंतु, that does not matter. ही ष्टोरी नसून वाचकवर्गाच्या मानसिकतेवरची रनिंग कॉमेंटरी आहे, या परिप्रेक्ष्यातून जर का या ष्टोरीकडे पाहिले, तर भरपूर मजा येतेय बघा! (बाकी, ते महाबळेश्वरकर, ती शकिरा वगैरे सर्व निमित्तमात्र.) (शिवाय, देवदत्तचे आपण डेडिकेटेड फ्यान आहोतच.))

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची श्रेणी सोय कुठे पेंड खातेय हे शोधणारा एकही कोड डीकोडर ऐसीला सापडू नये ही कमालच नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इच्छा नसेल, तर मार्ग दिसणार नाही.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणी वंचित म्हणून कणवपूर्ण देत आहे.
..............
मला हर्षवायू व्हायचाच शिल्लक होता. आम्हालाही.
.........
बाकी असे पाचपन्नास लेखक ऐसीवर आगामी वर्षात येवोत किंवा असलेल्या लेखकांनी शैलीला थोडी ढील द्यावी. आता
देवदत्त धरून साडेतीन लेखक अगोदर आहेतच. पण अजून हवेत. गेंड्याचं रूपक ( रूपकच असणार) आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता शकिराचं पुढे काय तेही लिहीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शकिरा कथानायकाशी खोटे बोलली असे या कथेत सकृद्दर्शनी दिसते (चुभू देघे). कथानायक अत्यंत सज्जन असून त्याने शकिराचा फक्त चेहराच पहिला आणि शब्दांवर विश्वास ठेवला असे मानता येईल. तो जर अधिक मेटीक्युलस निरीक्षक असता तर त्याने खोटे ओळखले असते. कारण हिप्स डोन्ट लाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0