मनमोहिनी

पावलांचे सोनेरी ठसे तुझ्या
उमटले ह्रदयी माझ्या
हळूच वाजली पैंजण तुझी आणि
रेशीमगाठी बांधल्या जन्मांतरीच्या
 

खुणावती तुझी कर्णफुले मज
अन् नवनीताची श्वेत तनु तव
मिश्रण करूनिया पटल मधु चे 
बनले ग मृदु ओठ ओले तुझे

कमलपुष्पाची जशी लाली
विस्कटली ती संगती तुझ्या गाली
सप्तसुरांनी मग तुझ्या स्वरांसह
मांडली मैफल तुझिया भोवताली

मृदगंध हवेत जातो विरुनी
क्षणोक्षणी मज भुरळ घाली
गंध तुझ्याच कस्तुरीचा 
कमनीय बांध्यावरून तुझ्या साजणी
दवमोतीही घसरून जाई

तेजपुंजसम तुझी ही कांती 
वर्तली ती मज सुखस्वप्नी
मृगनयने की मीनाक्षी असे तू 
मनमोहीनी की तु निलांगिनी

लागली चाहूल सुखद क्षणांची
परिभाषा कळली तुझ्या सोबतीची 
आणि अखंडपणे तुझी सावली 
उभी राहिली मज पाठीशी

field_vote: 
0
No votes yet