जय सियाराम

सामुहिक ध्येय जनमानसात रुजविण्यासाठी नेतृत्व पण तेवढेच प्रभावशाली पाहिजे. एकदा का ध्येयपूर्ती झाली की राबत असलेली संघटीत व्यवस्था जनसामान्यांत अधिक बळकट होते. हीच व्यवस्था प्रभावशाली नेतृत्वाचा चपखलपणे वापर करते जनसामान्यांच्या मनात आपापली मूळं बळकट करण्यासाठी.

कधीकाळी अशी जनसामान्यांच्या सहभागातून उभी राहीलेली चळवळ कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. आता श्रीरामाच्या मूर्तीची मंदिरात होणारी स्थापना आणि त्यामुळे देशभरात लोकसहभागातून साजरे होणारे उत्सव याचा भाजपाला फायदा होणार हे निश्चित.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तत्कालीन समाजात वेगवेगळ्या घटकांचे जसे योगदान होते. अर्थातच इंग्रजांसोबत वाटाघाटी करायला कॉंग्रेस अग्रभागी होती कारण व्यवस्था तशी उभी राहिली होती. त्यावेळी कॉंग्रेसची व्यवस्था आघाडीवर होती कारण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तसा कार्यकर्त्यांनी त्याग केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी अशी प्रभावशाली सुरुवात धुमधडाक्यात केली. सार्वजनिकरित्या गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करून. मखरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना जनसामान्यांच्या समुहात गल्लोगल्ली उत्सव साजरे केले. विविध कार्यक्रमांच्या आयोजनात उस्फुर्त लोकसहभाग वाढला. तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन खूप मोठ्या जनसमुदायाला आकर्षित करता आले. टिळक निवर्तले आणि स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे कॉंग्रेस कडे सर्वार्थाने गांधींजी यांच्याकडे आली. गांधीजींचा फार मोठा प्रभाव जनसामान्यांवर होता. त्याचा सर्वाधिक फायदा कॉंग्रेसलाच झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसकडे आपसूकच सगळी व्यवस्था तयार होती तीचा वापर चपखलपणे राजकारणात तत्कालीन नेतृत्वाने यथासांग केला. त्यातूनच पुढे संस्थानिकांच्या आणि घराण्याचा राजकीय वारशांचा उदय झाला. पर्याय नसल्याने जनतेने तो स्वीकारला. मग पुढं जे घडलं त्याचा इतिहास सर्वज्ञात आहे.

तसेच रामजन्मभूमी आंदोलनात अनेक सर्वसामान्य (धार्मिक, हिंदूत्ववादी आणि देवभोळ्या) लोकांचा सहभाग होता. अनेक संघटनांचे योगदान होते. तीस वर्षांपूर्वी अयोध्या प्रकरणात देशाचं राजकारण, समाजकारण ढवळून निघाले होते. तेव्हा भाजपाची संघटना बाळसं धरत होती. आज मात्र भाजपा आघाडीवर आहे कारण त्यांच कार्यकर्त्यांचं जाळं गावागावांत पोचले आहे. या घटनेमुळे भाजपाच्या गावपातळीवरील संघटनेचा फायदाच होणार आहे. स्वातंत्र्यलढ्याची चळवळ आणि रामजन्मभूमी आंदोलन ह्या खूप वेगळ्या घटना आहेत. ह्या दोन्ही मध्ये एकच सामाईक बाब आहे ती म्हणजे जनसामान्यांच्या उस्फुर्त सहभाग. गावागावांत रामरक्षा पठण करणारे किंवा अक्षता कलशाची शोभायात्रा करणारे लोक कोणत्याही एका पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. हिंदुत्ववादी जरी फ्रंटवर असतील तर धार्मिक आणि देवभोळ्या जनतेचा सहभाग हा अभूतपूर्व आहे. जातपात विसरून असं एकत्र येणं खूप सूचक आहे. हा लोकसहभाग वाढतोय.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे, भाजपाचे कार्यकर्ते जरी आघाडीवर असले तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन महोत्सवात सहभागी होत आहेत. जी मंडळी सहसा कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत ती मंडळीही केशरी टोप्या भगवी पताका घेऊन कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. संध्याकाळी हरिपाठ, भजन, किर्तन, भक्तीगीते, गीतरामायणाचे आयोजन केले जात आहे. अनेक सोसायटीच्या आवारात क्लबहाऊस मध्ये किंवा तात्पुरते स्टेज उभारून गाण्याच्या कार्यक्रमात हवशे नवशे गवशे मंडळी गाण्याच्या नावाखाली घसे साफ करत आहेत. गणेशोत्सवात चालणारा डीजेचा दणदणाट, गोंगाट आणि धांगडधिंगा विशेषतः टाळला जातोय हे महत्त्वाचे. कदाचित येत्या रामनवमी , हनुमान जयंती निमित्त डीजे, लेझर लायटीचे आगमन होऊ शकते काही सांगता येत नाही. पण वातावरणात सुरुवातीला जी कृत्रिम निर्मिती होतीय असं जाणवत होतं तसं न राहता गावपातळीवरील मंदीरांपासून ते टाऊनशिप मधल्या उच्चशिक्षित लोकांपर्यंत हे एकत्र जुलूस, शोभायात्रा वगैरे मध्ये जनतेचा सहभाग वाढतोय. असं प्रचंड प्रमाणात लोकांनी एकत्र येणं माझ्या पिढीनं पहिल्यांदा अनुभवलं आहे याची देही याची डोळा. भविष्यात काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

|| जय सियाराम ||

©भूषण वर्धेकर
१६ जानेवारी २०२४
पुणे

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

सहकार महर्षी लोकांनी लोकांना सहकार चळवळीचा रस्ता दाखवला आणि ग्रामीण भागात सहकारी तत्व वर ग्रामीण भागात विविध उद्योग उभे राहिले.
ग्रामीण अर्थ व्यवस्था सुधारली.

हरितक्रांती चे वेड लागलेल्या लोकांनी लोकांना हरित क्रांती चां रस्ता दाखवला देश अन्न धान्यात स्वयं पूर्ण झाला.

सामाजिक समतेसाठी त्या वेळच्या महापुरुषांनी समतेची चळवळ उभी केली समाजात बदल झाला.

असे उन्नती चे मार्ग समाजाला दाखवायचे असतात लोकांचा सहभाग अशा गोष्टीत हवा.

आणि हे आताचे नेते लोकांना अधोगती कडे घेवून जात आहेत.

धर्म घरात च असणे चांगले तो रस्त्यावर आला की विकास नक्कीच थांबणार

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>धर्म घरात च असणे चांगले तो रस्त्यावर आला की विकास नक्कीच थांबणार

धर्म तुमच्या वागण्या बोलण्यात सगळ्या आयुष्यात असायला हवा. विकास म्हणजे केवळ भौतिक विकास आणि पैशाची छन छन नसते.
आजकाल या साईटवर हिंदूंवर गरळ काढण्याचे काम जोरात चालू आहे. त्याबद्दल ऐसीच्या संस्थापकांना मन:पुर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

आपल्यासारख्या शुभेच्छुकांच्या सदिच्छांमुळेच ऐसी दिन दुगनी रात चौगुनी प्रगती करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डावे आणि उदारमतवादाची तुमची व्याख्या काय आहे... आणि हे लोक कसे काय स्वार्थी ठरतात
आणि स्वत:ला उदारमतवादी न समजणारे कसे काय बरे थोर होतात
भौतिक विकास म्हणजे काय आणि न-भौतिक विकासाची उदाहरणे द्याल का
"धर्म रस्त्यावर येणे" हे "हिंदूंवर गरळ काढण्याचे काम" कसे काय... Rajesh188 कोणत्याच धर्माचे नाव घेत नाहीयेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय कल्पना नाही.
बाबरी वगैरे पाडून, ९२-९३ मध्ये शेकडो (हिंदू/अहिंदू) बळी घेऊन (हजारोच खरंतर) वगैरे आता बांधलेल्या मंदिरात कधी जाणार नाही.
असो.
उन्माद जोरात सुरू आहे, आम्ही प्रेक्षक आहोत. चाललं आहे ते आवडत नाहीये, पण अपना टाईम आयेगा.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे स्पष्टपणे बोलणारे तुम्ही पहिले भेटलात.

आहे. आशेला वाव आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच आम्हाला पण वाटत.
सर्व धर्म हेच सांगतात.
१) खोटे बोलू नका.
२) कमजोर व्यक्ती,स्त्रिया ह्यांच्यावर अन्याय करू नका.
३) कोणाची संपत्ती लुबाडू नका.
४) प्राणी मात्रा न वर प्रेम करा.
५) निसर्गाचे रक्षण करा.
६) संपत्ती चा मोह सोडा.
७) व्यसन करू नका.
८) नेहमी सत्य बोला.
खूप आहेत .
आणि प्रतेक धर्म हेच सांगतो.
किती धर्माचा उन्माद असणारी लोक हा धर्माचा संदेश पाळतात.

धार्मिक असणे म्हणजे.
धर्माचा गर्व असणे.
दुसऱ्या धर्माच्या लोकमा कमी समजणे त्यांच्या वर अत्याचार करणे.
सर्रास खोटे बोलणे..
लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी
सर्रास कमजोर लोकांवर,स्त्रियांवर अन्याय करणे.
कर्मकांड करून सर्व गैर कृत्यावर पांघरून टाकणं

हे सर्व केले की माणूस धार्मिक समजला जातो.
असे धार्मिक पण मानव जाती साठी धोकादायक च आहे.

धार्मिक असणे म्हणजे भक्ती असणे उन्माद असणे म्हणजे धार्मिकता नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) धर्माचे पालन करणं म्हणजे कर्तव्य बजवाणे की कर्मकांड करणे?

२) सध्याच्या काळात समाज नेमका कसा पाहिजे? अज्ञेयवादी, विवेकी, आस्तिक, धार्मिक, नास्तिक, निधर्मी, निरीश्वरवादी की धर्मनिरपेक्ष?

३) धर्माची चिकित्सा वेळोवेळी करणे गरजेचे असते का?

४) धर्म, संस्कृती, सभ्यता आणि आचार विचार ह्या वेगळ्या करता येतील का?

आणि शेवटचा खोचक प्रश्न,

५) धार्मिक आणि देवभोळ्या भारतीय जनतेवर कॉंग्रेस सारखा सेक्युलर म्हणवून घेणारा पक्ष जर कैक वर्षे सत्ता गाजवू शकतो तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा भाजपा पक्ष किती वर्षे सत्ता गाजवेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

प्रशांत भूषण बोलला ते मला पण लॉजिकल वाटले आहे -
राम मंदिरामुळे भाजपची मतं वाढणार नाहीत. जी आहेत, ती नक्की consolidate होतील, त्यांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे बूस्ट जरूर मिळेल. ३७० कलम काढणे ही घटना राम मंदिरापेक्षा भाजप साठी जास्त नवी मते मिळवणारी राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राममंदिर होणे हा एक राजकीय स्वरूपाचा प्रश्न आहे. त्याची पाळंमुळं खूप खोलपर्यंत रुजली आहेत. तिथूनच सोकॉल्ड सेक्युलॅरिझम ला हादरे बसायला सुरुवात झाली. राममंदिर झाले म्हणून भाजपाची मतं वाढतील वगैरे फार्स आहे. भाजपाला भव्यदिव्य कार्यक्रम करायची सवय आहे आणि ज्वलंत समस्या दुर्लक्षित होण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कैक हिंदुत्ववादी संघटनांना पण या सोहळ्यात बाजूला फेकल्या सारखं जाणवलं असणार. मात्र सत्तेत येण्यासाठी जे संख्याबळ लागतं ते आणण्याची धमक ज्यांच्याकडे असते ते महामहीम असतात. कधीकाळी कॉंग्रेस मध्ये असे हुकुमी एक्के होते सत्तेत येण्याची 'गॅरंटी' घेणारे. आता असा गॅरंटीवाला भाजपाला सापडला आहे. त्यामुळे मोदी भाजपाचे फेवरेट पोस्टरबॉय झाले आहेत. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोदींच्या नावावर निवडणुका झाल्या म्हणजे लोकल लीडर्स ने होती नव्हती ती पण राजकीय अब्रू घालवण्यासारखं आहे.

भाजपाच्या अजेंड्यावर कितीतरी वर्षं महत्वाचे तीन मुद्दे होते. ३७० कलम, राममंदिर आणि समान नागरी कायदा. त्यापैकी समान नागरी कायद्याला विरोध खूप होणार आहे. आज हिंदुत्ववादी जरी युसीसी ला समर्थन करत असतील पण एचयूएफ कायद्याच्या आधारे कंपन्या स्थापन करून कौटुंबिक व्यवसायात लाखो रूपये वाचणारा कर हा युसीसी मुळे वाचवता येणार नाही हे समजेल तेव्हा बऱ्याच ठिकाणी कुरबुरी वाढतील. युसीसी हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यावर वेगळी चर्चा होईल. पण राममंदिर हे फक्त आणि फक्त राजकीय स्वप्नपूर्तीसाठी झालं आहे. नंतर मग लोकांच्या धार्मिक आस्था, अस्मिता वगैरे. राममंदिर झाले आता पुढं काय? काशी, मथुरा? यावर भविष्यातील बऱ्याच घडामोडी निवडणुकीत प्रभाव टाकतील. मध्यममार्गी प्रश्न निकाली निघाला ठिक. पण जर हिंसाचार, दंगल वगैरे झाल्या तर खूप मोठा सेटबॅक बसेल मोदींना. २००२ चा परिणाम २००४ ला लोकसभेत दिसला. त्यामुळे मोदी सहजासहजी तिसरी टर्म हातची जाऊन देणार नाहीत. आता भाजपा गॅरंटी वगैरे शब्द वापरून स्वतः ची डिलिव्हरी कॅपेबिलिटी वाढवतोय. लोकांना भुरळ त्याचीच पडतेय. आजवर बहुतेक सर्व निवडणुका प्रश्न, समस्या यावर प्रभावीत झाल्या. २०२४ ची पहिली निवडणूक असेल जी ३७० कलम आणि राममंदिर हे प्रश्न मार्गी लागल्यावर काय होणार हे बघण्यासाठी. भरपूर मजा येणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

गर्दी जमली तरी त्याचे रूपांतर मतांमधे होतेच असे नाही.

"मंदिर वही बनाएंगे" असे वचन देऊन आधीच्या निवडणूकीत मते मागीतली. ते पूर्ण केल्यावर आता काय अश्वासन देऊन मते मागणार?
भ्रष्टाचार निर्मूलनाचे वचन अजून पूर्ण केलेले नाही. स्विस बँकेतला भरतीयांचा बेकायदेशीर मार्गाने साठवलेला सगळा पैसा म्हणे भारतात येणार होता.
"मन हे रामरंगी रंगले" असे सध्याचे चित्र असले तरी ते किती काळ टिकणार ते बघायला पाहिजे. तोवर काही नविन वचने शोधायला हवीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

लेख लिहायची इतकी घाई? २२ जानेवारी पर्यंत थांबावे तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वीन खान