प्रसिद्धीचे गौड्बंगाल - एका प्रयोगाची गोष्ट

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा संगणक-संगीत या विषयात प्रा. एच व्ही सहस्रबुद्धे (एचव्हीएस) यांच्या बरोबर संशोधन करत होतो. एचव्हीएसनी मला या प्रकल्पाच्या आरेखनात बराच मोकळा हात दिला होता. मी मला सुचणार्‍या वेड्यावाकड्या कल्पना सरांना सांगत असे. कधी कधी एचव्हीएस त्यातली हवा काढत तर एखाद्या कल्पनेत तथ्य वाटले तर अधिक तपास करण्यास ते उत्तेजन देत असत. या प्रकारात आमच्यात बराच युक्तीवाद होत असे, आणि त्यातून मला बरेच काही शिकायला मिळाले.

असंच एकदा मी सरांशी बोलताना विधान केले की, "मला अमुक एका गायकाचे गाणे आवडते" असे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या संगीतातल्या आवडीविषयी सांगते, तेव्हा ती आवड त्या व्यक्तीची खरी आवड नसण्याची शक्यता बरीच आहे. सरांनी मला चमकून विचारले, "तुला नक्की काय म्हणायचे आहे"?

मी त्यावर खुलासा केला की बहुतांश लोकांच्या गाण्यातल्या आवडीनिवडी या जाणीवपूर्वक विकास पावलेल्या नसतात, तर त्या आवडीनिवडी निर्माण होण्यात त्या त्या कलाकाराभोवती निर्माण झालेले वलय कारणीभूत ठरते किंवा संगीतेतर कारणे यात प्रभाव पाडतात.

"Can you elaborate this further" - एचव्हीएसनी मला चावी मारली.

मी त्यांना म्हटले की, बरेच कलाकार हे लहरीपणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा कधीकधी आवडायला लागून त्या कलाकाराची कला आवडायला लागली असे होण्याची बर्‍याच जणांच्या बाबतीत शक्यता आहे. मग मी अनेक कलाकारांचे दाखले देऊन माझा मुद्दा त्यांना पटविण्याचा प्रयत्न केला. त्यावर एचव्हीएस म्हणाले की "केवळ एक दावा केला आहे म्हणून हे स्वीकारता येणार नाही. हे प्रयोग करून सिद्ध करता आले पाहिजे".

माझा मुद्दा प्रयोगाने कसा सिद्ध करता येईल या विचारानी माझ्या डोक्याला चालना मिळाली आणि मी काही दिवसानी एका प्रयोगाचा आराखडा सरांच्या पुढे ठेवला. तो साधारणपणे असा होता -

- शास्त्रीय संगीत आवडते पण कळत नाही असे सांगणार्‍या जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या व्यक्ती गोळा करायच्या.
- एक प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध कलाकरांची यादी तयार करायची
- या व्यक्तींना प्रथम वरील यादीतून त्यांना आवडणारे पाच शास्त्रीय गायक/गायिका प्राधान्यक्रमाने घोषित करायला सांगायचे.
- यानंतर या सर्व व्यक्तीना या यादीतील गायकांच्या गाण्याचे नमुने निश्चित कालावधीसाठी ऐकवायचे. हे नमूने असे निवडायचे ठरले की त्यातून गायक कोण हे सहज ओळखता येणार नाही. यासाठी प्रत्येक गायकाच्या गाण्याचा सुरवातीला फक्त तंबोर्‍याची साथ असलेला आलापीचा भाग ३० सेकंद ऐकवायचा असे ठरले.
- प्रत्येक तुकडा ऐकल्यावर प्रयोगात सहभागी झालेल्या सदस्यांनी ० ते ५ गुण प्रत्येक गायकाला आपल्या आवडी प्रमाणे द्यायचे. सर्व तुकडे ऐकून झाले की सर्वात जास्त गुण मिळालेल्या तुकड्यांची एक यादी तयार करायची. ही यादी तयार झाली की प्रत्येक तुकड्यातील कलाकाराचे नाव घोषित करायचे. आणि मग प्रयोगापूर्वी घोषित केलेली आवड आणि प्रयोगोत्तर लक्षात आलेली आवड ही सारखीच की वेगवेगळी हे तपासायचे.

या प्रयोगाला प्रा. एच व्ही सहस्रबुद्धयानी संमती दिली.

हा प्रयोग केल्यानंतर असे लक्षात आले की जवळजवळ सर्वच सहभागींची प्रयोगपूर्व घोषित आवड आणि प्रयोगोत्तर आवड यात मोठ्ठी तफावत आहे. बहुतेक सर्वच जणांनी प्रयोगापूर्वी आवडतात म्हणून घोषित केलेले कलाकार प्रयोगानंतर कमी पसंतीचे ठरवले होते. या प्रयोगातील सर्वच सहभागी त्यांची गाण्यातली खरी आवड वेगळीच असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्यचकित झाले. याला वीसेक वर्षे झाल्यामूळे मला आता आकडेवारीचा तपशील देता येणार नाही. पण माझा दावा खरा ठरला होता.

हे सर्व सांगायचे एव्हढयासाठी की एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते किंवा आपल्याला आवडते ती तिच्या अंगभूत गुणांमुळेच असे नाही. त्याव्यक्ती भोवती वेगवेगळ्या कारणांनी (मग त्या माकडचेष्टा का असेनात) निर्माण होणारे वलय पण प्रसिद्धीला पूरक ठरते.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

सहस्रबुद्ध्यांच्या कामाविषयी ऐकून आहे. प्रयोग रोचक वाटला, पण त्याचा निष्कर्ष मला अपेक्षित होता तसाच निघाला.

>>शास्त्रीय संगीत आवडते पण कळत नाही असे सांगणार्‍या जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या व्यक्ती गोळा करायच्या.<<

आवडते आणि कळते असं सांगणार्‍या व्यक्तीसुद्धा खोटं बोलू शकतात. त्यांनाही घेतलं असतं तर कदाचित आणखी रोचक निष्कर्ष आले असते Wink

>>गाण्याचा सुरवातीला फक्त तंबोर्‍याची साथ असलेला आलापीचा भाग ३० सेकंद ऐकवायचा असे ठरले<<

चांगला गायकसुद्धा सुरुवातीला किंचित अडखळतो, थोडा बेसूर होतो, किंवा फारसा बरा गात नाही; पण मैफिल रंगल्यावर आणि आवाज चांगला लागल्यावर खूपच चांगला गातो असं पुष्कळदा होताना दिसतं. याउलट सर्वसाधारण गायक (म्हणजे अगदीच वाईट नाहीत, तर तसे बरे) मात्र सुरुवातीलाही बरे गातात आणि सर्व वेळ तसे बरेच गातात (पण फार चांगले नाहीत) असा अनुभव अनेकदा येतो. अशा कारणामुळे प्रयोगाच्या निष्कर्षावर परिणाम होईल का असा प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या प्रयोगासाठी ध्वनीमुद्रित संगीत निवडले होते. त्यात सुरुवातीपासून शेवट पर्यंत चागले देण्याचा जास्तीत प्रयत्न असतो कारण रीटेकची सोय असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे.

अनेक गाणी ही ऐकून ऐकून आवडू लागतात असा अनुभव आहे. लगेच आठवणारे उदाहरण म्हणजे दीदी तेरा देवर दीवाना हे गाणे मी प्रथम ऐकले तेव्हा ते अतिशय विचित्र वाटले होते. पुढे टीव्ही/रेडिओ च्या मार्‍यामुळे ते आवडू लागले.

काही गाणी विशेषतः अ‍ॅडोलेसंट वयात, त्या वयात तीच गाणी आवडायला हवी (उदा माझ्या बाबतीत इंग्रजी गाणी) असे वाटल्याने आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"काही गाणी विशेषतः अ‍ॅडोलेसंट वयात, त्या वयात तीच गाणी आवडायला हवी (उदा माझ्या बाबतीत इंग्रजी गाणी) असे वाटल्याने आवडतात."

~ परफेक्ट पॉईन्ट. माझ्या अ‍ॅडोलसंट वयात आजुबाजूचे ज्येष्ठ (अकारण ज्येष्ठ्त्वाचा तोरा मिरवायचा म्हणून...) आम्हाला क्लिफ रिचर्ड आणि पॅट बून आवडतो म्हणून कपाळावर आठ्या घालून आमच्याकडे पाहत आणि दुसरीकडे आम्ही कसे समजावून सांगायचे याना "समर हॉलिडे" आणि "यंग वन्स" मधली क्लिफ रिचर्डची जादुमय वाटणारी गाणी, अशा संभ्रमात असू. आता पटते की तो त्या त्या वयाचा वातावरणाचा फरक. [अर्थात व्यक्तिशः मला आजही ती गाणी अवीट अशीच वाटतात.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयोग रोचक आहे. निष्कर्ष धक्कादायक वाटला नाही तरी पुरेसा रोचक आहे. या वर्तनामागची कारणं काय काय असतील याबद्दल तुमची काय मतं आहेत? पीअर प्रेशर, समूहापासून वेगळं न पडण्याचा प्रयत्न का आणखीही काही?

या विषयात पुढे आणखी काही काम केलंत का? ते ही वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या वर्तनामागची कारणं काय काय असतील याबद्दल तुमची काय मतं आहेत? पीअर प्रेशर, समूहापासून वेगळं न पडण्याचा प्रयत्न का आणखीही काही?

सर्वसाधारण व्यक्तीची स्वतंत्र निर्णय घ्यायची क्षमता मर्यादित असते. तसेच "समूहापासून वेगळं न पडण्याचा प्रयत्न" हेही कारण असू शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लहानपणी कसल्याच संगीताची आवड नव्हती. सुमारे २० वर्षांपूर्वी मला असा जाणवले की आपल्याला शास्त्रीय संगीत - जरी मला त्यातील 'शास्त्र' बिलकुल कळत नाही - ऐकायला आवडते. तेव्हापासून मी ते नियमितपणे ऐकू लागलो. माझ्या आवडत्या गायकांचे pieces आता मला ऐकायला आवडतात - जितके लांब आणि संथ तितके अधिक आवडतात! शास्त्र अजूनहि कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रयोगाचा अप्रत्यक्ष निष्कर्ष असा की तुमच्या बुद्धीमत्तेला न्याय मिळायला हवं असेल तर तुमच्या व्यक्तीमत्त्वाने अशी नाही तर तशी छाप टाकायला हवी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर!

असा एक श्लोक आहे:

घर्टं छिन्द्यात्पटं भिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्|
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्||

कपडे फाडावे, भांडे फोडावे, गाढवावर बसावे...काहीहि करून माणसाने प्रसिद्धि मिळवावी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजले नाही. आणखी थोडं स्पष्टीकरण द्याल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'काळी अंबॅसॅडर पाठवली तरच मी गायला येईन' असे मागे एका प्रथितयश गायिकेने आग्रह धरल्याचे ऐकिवात आहे. पण त्याआधीही आम्हाला त्या बाईंचे गाणे खूप आवडत होते व हा प्रसंग कळल्यावरही त्यांच्या गाण्याविषयीची ओढ जराही कमी झाली नाही. कारण त्यांचा अहंकारी विक्षिप्तपणा आणि गाण्यातली दैवी प्रतिभा याची आम्ही कधी गल्लत केली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0