ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-२ (C-E)

ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z

===
या भागात आपण इंग्रजी आद्याक्षरे C ते E ने सुरू होणार्‍या क्रीडाप्रकारांची माहिती करून घेणार आहोत. अर्थात यात कनोईंग (Canoe Slalom आणि Canoe sprint), सायकलिंग (Cycling BMX, Mountain bike, Road, Track), सुर मारणे (Diving), घोडेस्वारी (Equestria) अश्या ८ खेळांची माहिती करून घेणार आहोत. कनोईंग व सायकलिंगच्या हरेक प्रकारांना वेगवेगळे क्रीडाप्रकार समजले जाते मात्र इथे सोयीसाठी एकाच शीर्षकाखाली माहिती देत आहे. चला तर सुरू करूयात

----

कनोईंग (Canoe Slalom आणि Canoe sprint)

कनोई स्लालोमः Canoe Slalom स्पर्धांमध्ये शुभ्र फेसाळा - खळाळत्या- (White Water) पाण्यामध्ये कनोईंग केले जाते - शर्यत होते. यात २५ द्वारे (दरवाजे) पार करायची असतात. लाल दारे प्रवाहाविरुद्ध तर हिरवी दारे प्रवाहाच्या सोबतीने पार केली जातात. जर दाराला स्पर्श झाला तर पेनल्टी म्हणून एकूण वेळेत दर स्पर्श झालेल्या दारामागे दोन मिनिटे वाढवली जातात. एकूण सेकंदातला वेळ + पेनल्टी मिळून अंतिम वेळ ठरते. कमीतकमी वेळ लागेल तो विजेता.

या स्पर्धेमध्ये एकूण चार सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. यात कनोई आणि कयाक हे दोन्ही प्रकार खेळले जातात. कनोईंग मध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धा होतात. तर कयाकिंग मध्ये पुरुष व महिलांच्या एकेरी स्पर्धा होतात.

कनोई स्प्रिन्ट Canoe Sprint स्पर्धांमध्ये शुभ्र फेसाळ पाण्याऐवजी शांत पाण्यात स्पर्धा घेतल्या जातात. शिवाय इथे वेळ हा निकष नसून 'हेड टु हेड' स्पर्धा होतात. ऑलिंपिकमध्ये स्पर्धकांना दोन गटांत विभागले जाईल. त्यातील टॉप २ सेमी फायनलला भिडतील. सेमीच्या विजेत्या दोन खेळाडूंमध्ये सुवर्ण पदकाचा तर सेमी फायनल ला हरलेल्या खेळाडूंमध्ये ब्रॉन्झ पदकाचा सामना होईल.

या स्पर्धेमध्ये एकूण १२ पदके पणाला लागलेली असतील. यात कनोई आणि कयाक हे दोन्ही प्रकार खेळले जातील. पुरुषांचे कयाकिंगचे एकेरी व दुहेरी १००० मी व २०० मी चे सामने, चार जणांचे १००० मीचा सांघिक सामना, कनोईंगचे १००० मीचे एकेरी दुहेरी सामने, २००मीचा एकेरी सामना, महिलांचे कयाकिंगचे एकेरी व दुहेरी ५०० मी, एकेरी २०० मी व सांघिक ५००मीचे सामने खेळवले जातील

स्पर्धा कुठे होणार?: स्लालोम स्पर्धा ली व्हॅली व्हाईट वॉटर सेंटरवर होणार आहे तर स्प्रिंट जगातील उत्तम साईट पैकी एक एट्न डॉर्नी येथे होणार आहे. सदर जलस्रोत यासाठी सज्ज झाले आहेत.

स्पर्धा कधी होणारः स्लालोम स्पर्धा २९ जुलैपासून सुरू होतील. व त्या दोन ऑगस्ट पर्यंत चालतील तर स्प्रिंट स्पर्धा ६ ऑगस्टला सुरू होऊन ११ ऑगस्ट पर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः अपेक्षेप्रमाणे स्लोवाकीयाने स्लालोम स्पर्धेत ३ सुवर्ण पटकावली होती (स्प्रिंटमध्ये १ रौप्य) तर स्प्रिन्ट मध्ये जर्मनीने २ (व स्लालोम मध्ये १)सुवर्णपदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

=======

सायकलिंग (Cycling BMX, Mountain bike, Road, Track)

सायकलिंग - BMX बी.एम्.एक्स. अर्थात बायसिकल मोटो क्रॉस! या स्पर्धाप्रकारामध्ये उंचवटे-खड्डे असलेल्या दगड-मातीच्या ट्रॅकवर सायकलिंग केले जाते. या स्पर्धांसाठी वापरल्या जाणार्‍या सायकलींना एकच गियर आणि एकच ब्रेक असतो. खड्यांपुढे टिकाव लागवा या दृष्टीने सायकली अत्यंत मजबूत असतात. चाकेही नेहमीच्या चाकांपेक्षा आकाराने लहान असतात

या स्पर्धेमध्ये एकूण दोन सुवर्णपदके पणाला लागलेली असतील- महिला व पुरुष गटात प्रत्येकी एक. यात आधी क्रमवारी ठरवण्यासाठी पहिली राउंड होईल आणि मग मामला फायनल पर्यंत हेड टु हेड (वेळेनुसार) खेळाला जाईल.

माऊंटन बाइक Cycling: Mountain Bike या क्रीडाप्रकारात डोंगराळ-खडकाळ भागात स्पर्धा होईल. साधारण दीड तास चालणार्‍या या स्पर्धेचे स्वरूप 'रेसिंग' सारखे असेल. जागतिक क्रमवारीनुसार 'स्टार्ट लाईन' वरून ही शर्यत सुरू होईल व 'अंतिम रेषा' जो पहिला ओलांडेल तो विजयी ठरेल.

यात स्पर्धकांना स्वतःची सायकल दुरुस्त करावी लागते. केवळ विवक्षित ठिकाणीच टेक्निकल पिट-स्टॉप्स असतात. याव्यतिरिक्त अत्यंत प्रेक्षणीय स्पर्धेची कॉमेंट्री रोचक असते. त्यात तुम्हाला हे जार्गन्स ऐकायला मिळतील (ऐनवेळी अडायला नको म्हणून इथे देतोय ;))
फुल सस(Full sus): पुढे आणि मागे सस्पेन्शन असणारी बाइक
हार्ड टेल (Hardtail): मागील सस्पेन्शन नसणारी बाइक
किक्-आऊट (Kick-out): शार्प वळण घेतेवेळी मागचे चाक एकाबाजुला झपकन् वळवायचे तंत्र
पिंच फ्लॅट (Pinch flat): एखाद्या कठीण वस्तूवर टायर इतक्या जोरात आदळणे की त्याच्या आतल्या ट्यूबचाही चुराडा होणे
या स्पर्धेमध्ये एकूण २ पदके पणाला लागलेली असतील - महिला व पुरुष

सायकलिंग - रोड रोड सायकलिंग या स्पर्धाप्रकारामध्ये सपाट रस्त्यावर सायकलिंगची शर्यत घेतली जाते. या पारंपरिक शर्यती खुल्या रस्त्यांवर होतील. 'रोड रेस' प्रकारात सर्व स्पर्धक एकत्र सुरू करतील व पहिला आलेला विजेता होईल. तर 'टाइम ट्रॅप' प्रकारात लहान रस्त्यांवर कमीत कमी वेळ देणारा विजेता सेल. या दोन्ही स्पर्धा पुरुष व महिला गटांत खेळवल्या जातील अर्थात चार सुवर्णपदके पणाला असतील.
ही स्पर्धा बघताना काही जार्गन्स कानावर येतील ते असे:
ब्रेकअवे (Breakaway) – एखादा स्पर्धक किंवा गट ज्याने बाकी स्पर्धकांना बरेच मागे टाकले आहे
लीड-आऊट (Lead-out) – एखादा स्वाराने आपल्या गटाच्या नेत्याला शर्यतीच्या शेवटी आपणहून वाट करून देणे
पेलोटॉन (Peloton) – महत्त्वाच्या स्वारांचा गट

सायकलिंग - ट्रॅक रोड सायकलिंग या स्पर्धाप्रकारामध्ये सपाट खुल्या रस्त्याऐवजी बांधलेल्या ट्रॅकवर सायकलिंगची शर्यत घेतली जाते. या प्रकारात गट पाडले जातील व प्रत्येक गट एकत्र सुरू करतील व पहिले काही पुढील फेरीसाठी पात्र होतील. फायनल स्पर्धेतील पहिले तीन पदके जिंकतील. या दोन्ही स्पर्धा पुरुष व महिला गटांत वेगवेगळ्या अंतरांसाठी खेळवल्या जातील.

यात तुम्हाला सर्वाधिक जार्गन ऐकायला लागेल ते म्हणजे गियर रेशो(Gear ratio): पुढच्या चेयरिंग मधले कॉग्स भागिले मागच्या चेयरिंग मधले कॉग्स.
या क्रीडाप्रकारात सर्व शर्यती मिळून तब्बल ११ सुवर्णपदके पणाला असतील.

स्पर्धा कुठे होणार?: ऑलिंपिक पार्कमध्येच बीएमेक्स ट्रॅक तयार केला आहे. तर माऊंटन बायकिंग इसेक्स काऊंटीतील हाड्ले फार्म इथे होतील. तर रस्त्यावरील शर्यत सरे काऊंटीतील बॉक्स टेकड्यांमध्ये होतील. अन् ट्रॅक स्पर्धा वेलोड्रोन या नव्या बांधलेल्या स्टेडियम मध्ये होतील. सारी स्थाने आता सज्ज घोषित केलेली आहेत

स्पर्धा कधी होणारः विविध स्पर्धा विविध वेळी चालू असतील. सर्व स्पर्धा १० ऑगस्ट पर्यंत संपलेल्या असतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः बहुतांश प्रकारात युरोप व अमेरिकन देशांचा बोलबाला होता. त्यातही ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, स्वित्झर्लंड ही प्रमुख नावे

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

=============

सुर मारणे (Diving)

खरं तर सूर मारण्याचा खेळ अनेक जण अनेकदा खेळत असतात पण एक क्रीडाप्रकार म्हणून तो भारतात फारसा प्रचलित नाही. मात्र तब्बल ८ सुवर्णपदके मिळवून देणार्‍या या खेळाला जलक्रीडेमध्ये मोठे स्थान आहे.
यात पुढील चार प्रकारात स्पर्धा होते (महिला आणि पुरूष)
३मी स्प्रिंगबोर्ड, १०मी प्लॅटफॉर्म, सिंक्रोनाईज्ड ३मी स्प्रिंगबोर्ड, सिंक्रोनाईज्ड १०मी प्लॅटफॉर्म,

मारण्यात येणारा सूर चार भागात विभागला असतो: सुरवातीची पोझिशन, टेक-ऑफ, सूर आणि पाण्यातील प्रवेश. आणि जजेस या प्रत्येक विभागावरून गुणांकन देतो. जरी स्पर्धक प्रत्येक भागाला प्रचंड महत्त्व देतो व त्यात अचूकता साधायचा प्रयत्न करतो, सर्वाधिक महत्त्व पाण्यात शिरण्याला असते. शक्य तितके उभे (वर्टीकल) आणि कमीत कमी पाणी उडवत शिरण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो. जर तुम्ही अगदी नाममात्र पाणी उडालेले पाहिलेत तर अधिक गुणांची खात्री बाळगा. प्रत्येक प्रकारात काही कसोट्यांवर काठिण्यपातळी ठरते. जजने दिलेल्या गुणांच्या सरासरीला काठिण्यपातळीने गुणले जाते. सिंक्रोनाईज्ड प्रकारात जोडीने तारतम्याने सुर मारायचा असतो. त्यांच्यातील तारतम्याला खूप गुण असतात.
काही जार्गन्सः
आर्मस्टँड (Armstand): प्लॅटफॉर्म प्रकारातील असा सूर जो हातांपासून सुरू होतो
प्लॅटफॉर्म (Platform): हा एक स्थायी (fixed) डायविंग बोर्ड असतो. हा किमान ६मी लांब आणि ३मी रुंद असतो. ऑलिंपिकमध्ये हा पाण्यापासून १०मी उंचावर असतो
पाईक (Pike): अशी डायविंग पोझिशन ज्यासाठी डायवर आपले शरीर कमरेत वाकवतो, मात्र पाय सरळ ठेवतो.

स्पर्धा कुठे होणार?: अ‍ॅक्वॅटीक सेंटर. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २९ जुलैपासून सुरू होतील. व त्या ११ऑगस्ट पर्यंत चालतील.

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः चीनने आठपैकी ७ पदके कमावून अनेकांना तोंडात बोटे घालायला लावले होते

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू
==========

घोडेस्वारी (Equestria)

या क्रीडाप्रकारात तीन उपप्रकार असतीलः ड्रेसेज, एव्हेन्टिंग आणि जम्पिंग. तीनही स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात खेळवल्या जातील. अर्थात ६ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील.

(या तीनही प्रकारांबद्दल फारसे माहीत नाही. वाचून कळलेही नाही. कोणाला माहीत असल्यास प्रतिसाद/व्यनी/खरडीतून कळवावे)

स्पर्धा कुठे होणार?: ग्रिनिच पार्क. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. व त्या ९ ऑगस्ट पर्यंत चालतील.

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी जर्मनीने ३ पदके जिंकली होती तर अमेरिका, कॅनडा व नेदरलँड्सने प्रत्येकी १ पदक पटकावले होते

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त चालली आहे लेखमाला! बरेच नवीन वाचायला मिळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूर मारण्यातही एवढे प्रकार असतात हे माहित नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरे आहे. काहि वर्षांपूर्वीपर्यंत माझेही असेच व्हायचे. गेल्या व त्याच्या गेल्या ऑलिंपिकच्या निमित्ताने अनेक खे़ळांचे नियम लोकांशी चर्चा करून, पुस्तकात किंवा जालावर वाचून मिळवली होती. अशी माहिती असल्यावर तो खेळ बघताना अधिक मजा आली हे वेळगे सांगायला नकोच.

ऐसीअक्षरेवरही मुळ खेळ सुरू होण्यापूर्वी खेळांची माहितीची देवाघ-घेवाण झाली तर स्पर्धा चालु झाल्यावर अधिक वाचकांना तीचा आनंद घेता येईल.

दुर्दैवाने C-E मधे एकहि भारतीय खेळाडू माहितीही नाही. हे खेळ भारतात खेळले जातात का? असल्यास त्यांची स्थिती वगैरेवरही सदस्यांकदून भाष्य आल्यास सर्वांनाच माहिती कळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!