Skip to main content

(विविधरूपे एक जीव)

मूळ कवितेतलं मला काहीही कळलेलं नाही, तरी त्या कवितेचा कच्चा माल म्हणून वापर करून खालील विडंबनाचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. या विडंबनाचा अर्थ लागेलच असे नाही, तेव्हा त्याचा अर्थ समजावून घेण्याकरता मला कॉल करू नये. ईतर कुणी आणखी कुणाला कॉल करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. तिसर्‍या कोणाला त्या दोघांमधे नाक खुपसावेसे वाटले तर जरूर खुपसावे.

ये संस्थळावर
रहायला
खुशाल
मुखवटा घालून

आयडीला बिलग
कर सलग
वाद प्रतिवाद.
हो व्हायरस
कर
इन्फेक्शन.
बेअक्कल!

(संपादकांच्या)मेंदूवरच्या
आठ्या
होऊन
वाट
डोक्यावर मिर्‍या
दे त्रास!

विकतचे दुखणे

Taxonomy upgrade extras

कालच माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. गेल्या शुक्रवारीतिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.
पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरंएवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अ‍ॅडीक्टीव्ह असते. :(

रवीन्द्रनाथ आणि कृष्णकळी!

Tagore

" क्रीश्नोकोली आमी तारेई बोली.. " ह्या अतिप्रचलित रवींद्रगीतात रवींद्रनाथ म्हणतात : " अगं लोक तुला काळी म्हणतात पण माझ्यासाठी तर तू कृष्णकळी आहेस.. " आणि पुढे सबंध गीतात एकूणच सावळाईची अद्भूत नवलाई सांगत राहतात.. आपल्याला माहित असेलच कि रवीन्द्रनाथ स्वतःच ह्या गीतांचे गीतकार, संगीतकार एवं गायक असत... कित्येक विद्वान नवंकवींना ठाकूर हा कंटाळवाणा प्रकार वाटतो... परंतु ह्या माणसाने मला एक वेगळ्या संगीतविचाराचे दालन खुले करून दिले..

सुगरण..

दोनतीन हॉटेलं वाईट निघाल्यामुळे आता पुढचं किमान बरं निघावं अशी इच्छा होती. लाऊंज, बिस्त्रो, फाईन डाईन, कॅफे अशा टाईपच्या हॉटेलिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या झणझणीत आणि खानावळवजा ठिकाणावर धाड टाकायची ठरवली.

कुठेतरी ऐकलेल्याच्या आठवणीवरून पुण्यात पेरुगेट पोलीस चौकीजवळ असलेलं सुगरण गाठायचं ठरवलं आणि गल्ल्या शोधत तिथे पोहोचलोसुद्धा..

एका गाळ्याएवढा एंट्रन्स दिसत होता. माझ्यासारख्या प्रशस्त माणसाला बसायलातरी पुरेशी रुंदी असलेली जागा आत असेल का असं वाटत वाटत आत शिरलो. वरती बोर्ड लावला होता त्यावर "सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज" असं लिहिलं होतं.

विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो.

Taxonomy upgrade extras

जगात गुन्हेगार निर्माण होत नाहीत अथवा गुन्हेगारी सापडत नाही, असा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य. ही गुन्हेगारी विशेषतः पैशासाठी अथवा अथवा आपली हौसमौज भागविण्यासाठी केली जाते. भ्रष्टाचार, शेतीवाडी प्लॉट अशी स्थावर मालमत्ता हडपणे, लाच खाणे, खून- बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीने सगळीकडे थैमान घातले आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असते. गुन्ह्याच्या आवाक्यानुसार गुन्हेगाराला कमी- अधिक शिक्षा होत असते. पण त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करावे लागतात. अर्थात इथेही भ्रष्टाचार फोफावला आहे. पैशासाठी साक्षी फिरवण्याच्या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत.

भरल पापलेट

साहित्यः
५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल

पाककृती:
१) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.

अर्थ समजून सांगा ना: उत्तरार्ध

Taxonomy upgrade extras

'अर्थ समजुन सांगा ना' या चर्चेदरम्यान काही प्रश्न समोर आले. त्यावर मी मांडलेली मते लोकांसमोर यावीत म्हणून हा धागा. काही श्रेणीबहाद्दरांनी प्रतिसाद दिसू नयेत अशा श्रेण्या दिलेल्या आहेत. 'धाग्यांना श्रेणी देता येत नाही' ही त्यांच्या जीवनात केवढी मोठ्ठी पोकळी आहे हे त्यांना जाणवावे हा उद्देशही आहेच.

१. सगळे सगळ्या क्षेत्रात तज्ञ नसतात. मग न समजलेले विचारण्यात काय कमीपणा?
=> मला समजा माझ्या कंप्युटरच्या आत काय चालते ते माहीत नाही. ते काय आहे हे विचारण्यात अजिबात कमीपणा नाही. चर्चा त्याविषयी नाही.

२. भाट आणि अर्थ सांगणे यात काय संबंध?