Skip to main content

बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे

Taxonomy upgrade extras

प्रतिसादांना मिळणाऱ्या श्रेणी आणि आता धाग्यांनाही मूल्य देता येणं या सुविधांवर अनेक मतमतांतरं वाचतो आहे. मराठी आंतरजालावर याविषयी अजूनही चर्चा होत राहणार हेही जवळपास निश्चित आहे. कोणतीही गुणवत्तानिर्देशक व्यवस्था ही अधिकाधिक निर्दोष कशी करता येईल हा प्रश्न कठीण आहे. गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं. बुकर पारितोषिकाच्या निमित्तानं नुकतंच उठलेलं वादळ मला या निमित्तानं आठवलं. त्याचा हा थोडक्यात परिचय. त्या अनुषंगानं साहित्यिक दर्जाविषयी चर्चा होऊ शकते किंवा धागे आणि प्रतिसादांच्या श्रेणी यांवरही काही मुद्दे मांडले जाऊ शकतात.

हिची, तिची अवस्था

'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?

शांता गोखले: "त्या वर्षी"

शांता गोखले यांची "त्या वर्षी" कादंबरी अलिकडेच वाचली, आणि खूप आवडली. त्यातील पात्रे, त्यांच्या मधली नाती, आणि त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये कादंबरी वाचकाला आपल्या सरळ, मोकळ्या भाषेने लगेच खेचून घेते. कथानकाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन भयानक, हिंसक घटना असल्या तरी तिचा एकूण वेग संथच राहतो. त्यामुळे पात्रांची छान ओळख पटते. एकूण हलकेच विनोदी टच असलेला संथपणा मला फार रुचकर वाटला. वाचून झाल्यावर बरेच दिवस कादंबरी डोक्यात घर करून बसली. त्या निमित्ताने काही स्फुट विचार.

जन्मठेप

हजार पायांच्या गोमीसारखी लपलपत चाललेली ही लोकल आणि तिच्या अंगावरच्या असंख्य सूक्ष्म चिकट तंतूंसारखी तिला चिकटलेली लोचट आणि घामट माणसं. पायाखाली टचकन फुटणार्‍या शेंबड्या गोगलगायीसारखं आपलं लिबलिबीत आयुष्य गोंजारत निघालेली. त्या गिळगिळीत गोगलगायीने गळ्यापर्यंत गिळलेला एक रिटायरमेंटला आलेला म्हातारा गर्दीत उभा राहून शिवलीलामृत वाचतो आणि त्या गोगलगायीचं उरलेलं गिळणं सुखद व्हावं म्हणून गदगदत प्रार्थना करतो.

हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांच्या 'रेषाटन आठवणींचा प्रवास' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा

।। प्रकाशनसोहळा ।।

''रेषाटन' हा माझ्या आठवणींचा प्रवास आहे; होडीतून.
ज्या नदीतून तो होतोय त्या नदीचा प्रवाह माझ्या ब्रशच्या रेषेवरून जातोय....'

'रेषाटन आठवणींचा प्रवास' - ज्येष्ठ हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांचे आत्मचरित्र
प्रमुख उपस्थिती - पत्रकार, संपादक व विचारवंत भानू काळे, विनोदीलेखक द.मा.मिरासदार

- दिनांक - 10 नोव्हेंबर 2011
- वेळ - सायंकाळी 6.30
- स्थळ - अक्षरधारा बुकगॅलरी, सणस प्लाझा, अत्रे सभागृहाशेजारी, बाजीराव रोड, पुणे

सर्व रसिकवाचकांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.

आयोजक
ज्योत्स्ना प्रकाशन

गरजूला मदत करावी काय?

Taxonomy upgrade extras

गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील.
आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे?
http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली.
पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते.

ह्या खिडकीतून...[part-2]

ध्यान तर लागले.डोळेपण मिटून गेले.झोपेने आपले पाश आवळले.
मग मध्येच जाग आली. डोळे किलकिले करून सहज बघून घेतले.
उंच आभाळात आमचे विमान तरंगत होते.
बाहेर जांभूळ रंगाचा प्रकाश पसरलेला
विमानात हवाई सुंदरीची लगबग चालू होती. ट्राल्या घेऊन काहीकाही देणे सुरु होते...
चहा ,कॉफी ,थंड पेय
मग हलके हलके बाहेर आभाळाचे रंग बदलू लागले .जांभूळ रंग बदलू लागला .तांबूस छटा आभाळात मिसळू लागल्या
मग कधीतरी हलकेच खिडकीची झडप उघडली.
नि भळकन प्रकाश खिडकीतून घुसला .डोळे दिपून गेले. सगळे झोपेत होते.
हवाई सुंदरी लगबगीने जवळ आली. मंजुळ आवाजात किंचाळली -
"नका उघडू खिडकी. सगळे झोपलेत..!"

साडेसाती

Taxonomy upgrade extras

मला साडेसाती या विषयावरील अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा आहे म्हणून हा धागा. शिवाय लिंबूटिंबू यांच्या राशींच्या धाग्यावर कोणीतरी ज्योतिषाला अंधश्रद्धा म्हटले असल्याने वाईट वाटूनही हा धागा काढला गेला आहेच (खोटं कशाला बोलू). ज्या ज्या गोष्टी सहज सिद्ध करता येत नाहीत त्यांची लगेच अंधश्रद्धेत बोळवण होऊ नये. यावर जर कोणी विचारेल की - ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध कर तर मी आत्ताच हार मानते पण माझे काही अनुभव आहेत त्यावरून मी या शास्त्रावर श्रद्धा ठेवते.

आता मूळ मुद्द्याकडे ,साडेसाती बद्दल थोडेसे -

आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?

Taxonomy upgrade extras

आभासी दुनिया ही काही नवीन कल्पना नाही. लहानपणी मायावी राक्षस, सुंदर पर्‍या, चेटकिणी आणि जादुगार यांच्या सोबतीने आपण या दुनियेत प्रवेश करतो. पुढे जसजसे मोठे होतो, तसतसे आपल्याला दोन्हीतल्या फरकाची जाणीव होते, आणि वास्तव व आभास यांच्यातली सीमारेखा आपण आपल्यापुरती निश्चित करतो ...किंवा करायचो असे म्हणूया. आंतरजाल आणि फेसबुक यांमुळे वाढत्या वयातली नवीन आभासी दुनिया तयार होत आहे. या दुनियेत प्रत्येकजण जादुगार आहे, स्वता:चे व्यंग, वय, दोष लपवून स्वता:हाला हवे तसे रंगवून स्वता:ची विक्री करण्याचे स्वातंत्र आहे. शिवाय ही जादू वापरून, मैत्री एकदम जोडता किंवा तोडताही येते.