Skip to main content

सध्या काय ऐकलंत?

सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ८

मागे कुठल्या तरी धाग्यावर लताबाईंच्या जुन्या कोवळ्या आवाजाचा विषय निघाला होता. कालच अनिल बिस्वासचं 'तराना'मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा त्याची आठवण झाली. 'सीने मे सुलगते है अरमान' किंवा 'नैन मिले नैन हुए बावरे'च्या मानानं हे गाणं क्वचितच ऐकायला मिळतं. मधुबालाप्रेमींसाठीही ती एक पर्वणी ठरावी.

सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ७

सध्या गुलाबबा‍ईंच्य आवाजातलं 'नदी नारे ना जाओ शाम' ऐकते आहे. त्यांचं 'पैंया' खास आवडलं. आश भोसले आणि जयदेव ही माझी आवडती जोडगोळी आहे, पण आता त्यांच्या या गाण्याचा माझ्यावरचा असर उतरला आहे, हे खरयं.
नौटंकी या आता हरवत चाललेल्या लोकनाट्यात पूर्वी फक्त पुरुष काम करत असत त्या काळात नौटंकीने वेड लावलेल्या गुलाबबाईंनी त्यात काम करायला सुरुवात केली. त्यांच्या रुपा-गुणावर पब्लिक फिदा झालं. पद्मश्री गुलाबबाईंची कहाणी इथे बघता येईल.