दिवाळी अंक २०१२

बदलती माध्यमे आणि निवडणूका

बदल सतत होतच असतात, काही बदल हे वैयक्तिक पातळीवर असतात तर काही बदल अधिक व्यापक प्रमाणात घडतात. या लेखात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानातील तसेच माध्यमांतील बदलामुळे निवडणूक प्रचार आणि एकूणच प्रक्रियेत झालेल्या काही बदलांची चर्चा करण्याचा मानस आहे. या लेखात उल्लेखलेल्या बदलांची यादी संपूर्ण नाही याची जाणीव आहे. मात्र निवडणुक प्रक्रियेत झालेल्या, माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या, बदलांचा ढोबळ आढावा घेणे हे या लेखाचे उद्दिष्ट आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Average: 4 (2 votes)

ऐकू आनंदे!

- लेखक: समीर धामणगावकर व वैभव कुलकर्णी

(श्री. समीर धामणगावकर व श्री. वैभव कुलकर्णी हे दोघे 'स्नॉवेल' या ऑडियोबुक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. बी.ई. आणि एम.बी.ए. केल्यानंतर नोकरी करताना, मुळात असणारी आवड आणि व्यावसायिकता अशा दोन्हीचा मेळ घालून त्यांनी ही कंपनी सुरू केली. या क्षेत्रात त्यांना अल्पावधीत यश मिळत आहे. 'ऐसीअक्षरे'च्या दिवाळी अंकासाठी त्यांनी दिलेल्या मुलाखतीचे हे ऋषिकेशने केलेले शब्दांकन)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Average: 4 (1 vote)

मूल्य आणि किंमत

कॉस्ट, प्राइस, व्हॅल्यू या तीनही शब्दांसाठी मराठीत बहुतेक वेळा 'किंमत' हा एकच शब्द वापरला जातो. परंतु प्रत्यक्षात हे तीन शब्द वेगवेगळे अर्थ ध्वनित करतात.

त्यापैकी 'प्राईस' या शब्दाने मुख्यत्वे विक्रीची किंमत दर्शवली जाते किंवा दोन व्यक्तींमध्ये जो खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो त्याची किंमत दर्शवली जाते.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Average: 4 (3 votes)

Souls at 2 PM

सेन्योरा,
तेवत ठेव उघडा दिवा
इंद्रियांचा गुंता घेऊन,
सडत चाललेल्या देहाला
पहा आरसे लावून,
तेव्हा फुलपाखरांचे थवे
जातील रेडलाईटमधून.

एंटोनिओ,
तुझा स्पर्श तुझाच असतो
माझा स्पर्शही तुझाच असतो
तुझी किडत जाणारी पेशी तरी
जगता येईल मला?
हा सल मोकळा ठेऊन मी
आत लपवलाय फुलपाखरांचा थवा.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Average: 3 (2 votes)

शून्यस्पर्श

मिटलेल्या शरीरावर
फिरू द्यावा नांगर
भळाभळा सांडावी झिंग
आणि चंद्र असावा सहयात्री

असावीत त्याची पाळंमुळं
या लंबकांच्या देहात
विस्तव रंध्रकल्लोळात
ध्यानस्थ करुणा रत व्हावी

किल्मिषांचे रूतावे रंग
भग्नावे शून्यशिल्प,
या चंद्र समाधीवरती
चंद्रपुष्प मी व्हावे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Average: 4.5 (2 votes)

दोन कविता

प्रचंड स्फोटानंतर
नवं विश्व तयार होतं म्हणे!
हि-याचे आवरण
असलेला नवा ग्रह
दिसतो आहे
किंवा तशी शक्यता आहे
म्हणून तू वाट
बघू शकतेस!
पण
प्रदक्षिणेचे काय?
ती किती काळात होते?
मार्ग कसा आहे?
त्याच्या बरोबरीनं /मागून /
ठरवलेल्या मार्गावर
चालणं.... वगैरे..
शेवटी तो ग्रहही
ता-याभोवती फिरतो!
हे लक्षात असू दे!

फर्टिलायझिंग फ्रोजन एग्ज
ट्रेंड आहे सध्याचा..
(म्हणून तू स्वीकारणार नाहीसं)
(शेळ्या मेंढ्यांच) क्लोनिंग
कधीच करून झालय!
त्यात काही मजा नाही!
यू आर स्पेशल
यू आर नेक्ट!

------------------

कोणं आहेस तू?
वेडंवाकडं,
लक्ष वेधणारं,
अव्यवहारी,व्यवहारी

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Average: 3 (1 vote)

नवं पाखरू

स्क्रीनवरच्या नजरा आधी गर्रकन फिरतात...
टवकारले जातात कान... आणि भलेभलेही हरतात...

इश्यूत घुसलेल्या विश्वामित्रांचीही तपश्चर्या होते भंग...
पांढर्‍या केसांवर चढतो गुपचुप गोदरेज हेअर डायचा काळा रंग..

विवाहित टीम लीडलाही हलकेच स्वतःच्या बायकोचा पडतो विसर..
छप्पर उडालेल्या मॅनेजर्सवरही तिच्याच यौवनाचा असर..

टीममधल्या सगळ्यांशीच मग हळूहळू तिची ओळख होते..
"च्यायला कसली भारीय" म्हणत चर्चा भलतंच वळण घेते..

एके दिवशी इनबॉक्समध्ये फाटकन् मेल येऊन पडतो..
लग्नपत्रिका पाहून तिची ओठांपाशीच घास अडतो..

प्रोजेक्टमधलं नवं पाखरू भर्रकन कधीच उडून जातं..

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Average: 4 (2 votes)

कविता आणि वादळ

कविता

सगळे शब्द
ओंजळीत घेऊन
तू कागदावर शिंपडतेस...
आणि त्यातले
तुला नको असलेले शब्द
अलगद पुसून टाकतेस...
बाकी उरते
कागदावर
ती
कविता...

वादळ

कालच्या वादळात
बरंच काही उद्ध्वस्त झालं...
तुझी कविता
ती ही पडून फुटली...
आता
घरभर पसरलेले
हे शब्द
गोळा करण्यात
किती काळ जाईल
काय माहीत...

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Average: 4 (2 votes)

अपग्रेड प्रेम

मी वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रेम करत आलो आहे असं म्हणालो तर इतर कुणाच्या आधी मीच ते खोडून काढेन. म्हणजे एका मुलीच्या आणि माझ्या शरीरा-मनामधल्या काही घटना मी प्रेम या एका मोठ्या कॅटेगरीत टाकल्या, त्या वेळेच्या माझ्या भावनांबद्दल असलेल्या माझ्या आताच्या भावना शब्दांनी रि-घडवल्या तरी त्यानी व्याख्येसारखं प्रेम समोर ठेवता तर काही येत नाही. त्यावेळी प्रेम नावाची गोष्ट सिनेमात दिसायची, शरीरातलं प्रेम हे अनोळख्याप्रमाणे स्वतःचं स्वतः मुक्त जगायचं. आणि आता मोठं झाल्यावर या प्रेमाला मी अनुभवण्याची, त्याचे नियम आणि एटीकेट सांभाळण्याची जबाबदारी असते हे कळतंय एवढाच या दोन स्थितींमधला फरक आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.25
Average: 4.3 (4 votes)

अधांतर

अशीही एक अवस्था येईल
जेव्हा आपण एकमेकांशी फॉर्मली बोलु

बोलयचंच असतं म्हणून
आणि किंवा आपल्याला 'पोचणारच' नाही
एकमेकांचं बोलणं

अशीही एक अवस्था येईल
आपल्या नात्यात
जेव्हा
आपल्याकडे बोलायलाच काही नसेल

तुला माहितेय का?
अशीही एक 'अधांतर' अवस्था येईल

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

पाने

Subscribe to RSS - दिवाळी अंक २०१२