कंटाळा!

कंटाळा
अस्वस्थ कंटाळा
इथून तिथून, तुला मला,
आतून बाहेरून, मुळापासून
खच्ची करत जाणारा
कं टा ळा

स्वस्त, भडक, टिपटिप
गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा

एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.
- नी

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.

खरय. मला तर जेलसी सारखा दुर्गुणही आवडतो. कारण तिच्या फणकार्‍यात जिवंतपणाची चाहूल असते. अगदी हसण्यापेक्षाही रडणं ही आवडतं. पण कंटाळा नको. इन्टेन्स भावना आवडतात.
Love me OR hate me. Please don't ignore me

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण तिच्या फणकार्‍यात जिवंतपणाची चाहूल असते. <<<
खरंय..
म्हणूनच सगळे मनाला शांती देतो म्हणणारे अध्यात्मिक नको होतात.
अस्वस्थ असू तर काहीतरी घडेल ना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

कविता विशेष नाही आवडली. पण माझं एक जुनं पोस्ट आठवलं. त्याची जाहिरात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघनाताई,
तुमचं कंटाळ्यावरचं स्फुट फारच आवडलं.
कविताही आवडली, त्यांत तो एक 'कर्कश्श कंटाळा' घालायचा राहिलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जालावरच्या कर्कश चर्चा वाचून अगदी असाच कंटाळा येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला ही धागे हायजॅक करणार्‍यांचा कंटाळा येतो,
.
एखाद्या कवितेच्या शब्दांशी खेळून तश्शीच आपली कविता जुळवून ती कशी श्रेष्ठ आहे हे सुचविणार्‍यांचा ही अफाट्/अमाप्/अतुलनिय/अचाट कंटाळा येतो. मीटरमध्येच कविता का असावी? कवितेचे अस्तित्व फक्त "बस्स ती आहे.... अशी आहे" असे का असू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी असावी कविता म्हणून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहात मोठे, पुसतो तुम्हांला?

ही केशवसुतांची कविता आहे. आयरनी इज़ दॅट इट इटसेल्फ इज़ इन उपजाती मीटर. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाह! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान संदर्भ.

पण मीटरचा प्रश्न कुठे आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

इदंनमम यांच्या प्रतिसादात आला..तो तिथे कसा आला ते माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

मीटरमध्येच कविता का असावी?

खरे आहे. कविता मीटरमध्ये असू नये. किमान वीसएक हजार तरी किलोमीटरच्या बाहेर असावी. काय आहे, पॉइंट ब्ल्यांक रेंजमध्ये अत्यंत कर्कश भासते.

.....................

पृथ्वीचा सुमारे अर्धा परीघ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा' असे आमची आई आम्हाला लहानपणी सांगायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेत माझं नाव घेतल्याबद्दल धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे, कवितेत घेतलेलं नाव आहे ते, उखाण्यात नैये काही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(वाइल्ड गेस...) म्हणून(च) तर धन्यवाद दिलेत ना त्यांनी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कंटाळा' चांगला जमलाय.
अशाच कंटाळ्यातून आलेले आमचे दोन शब्द.
http://www.aisiakshare.com/node/2564
.
.
http://www.aisiakshare.com/node/1677

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0