Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५२

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

सुंदर, सेक्सी, तरुण स्त्री नि अन्य तशी नसलेली व्यक्ति यांच्याशी तुम्ही, कोण्या एका संदर्भात, वर्तनात फरक करता काय? म्हणजे उदाहरणार्थ बँकेत क्लर्क असाल तर सुंदर स्त्रीला बसायला जागा देऊन, पाणी ऑफर करून, ती फार शहाण्यासारखे बोलत असली नसली तरी गंभीरपणे ऐकत, सगळी माहिती व्यवस्थित देऊन, फॉर्म भरायला मदत करून , इ इ वेगळे वागता का?

अनु राव Fri, 03/07/2015 - 13:22

सुंदर, सेक्सी, तरुण स्त्री

मी तर अश्या बाईला ( हे हल्ली स्त्री, महिला असले शब्द का वापरले जातात? ) दुरच ठेवते.

अजो - प्रश्न कोणत्या ऑडियन्स साठी आहे ते लिहीत तरी जा ना.

धर्मराजमुटके Fri, 03/07/2015 - 14:23

होय. मी त्या बँकेतला क्लर्क असतो तर नक्की वर्तनात फरक केला असता. सुंदर, सेक्सी, तरुण स्त्री ची काळजी घेण्यासाठी आमच्या बँकेतच काय पण एकूण जगतातच प्राण्यांची कमतरता नसावी. त्यामुळे मी नाही काळजी घेतली तरी त्या बाईचे काही अडणार नाही. शिवाय तिने बँकेत खाते उघडले तर मी ती केवळ सुंदर, सेक्सी आहे म्हणून ०.२५% जास्त व्याज ऑफर करु शकणार नाही. त्यामुळे माझा त्या बाईंना जास्त काही फायदा होऊ शकणार नाही.
सबब मी त्या बाईंना वेगळी वागणूक नसती दिली. (आणि असेही शक्यतो मी स्पर्धापरीक्षांमधे भाग घेणे टाळतोच.)
अन्य व्यक्ती असेल तर मी तिला नक्की (स्वतःहून नाही, विचारणा झाली तरच) मदत करीन. 'कारण जिथे कमी तिथे आम्ही' हाच आमचा आजवरचा बाणा राहिलेला आहे.

गवि Fri, 03/07/2015 - 14:26

In reply to by धर्मराजमुटके

फार पूर्वी ऐकलेली ही कविता जालावरही असंख्य ठिकाणी सापडली..

एक बहु और एक सास ,
और उनके पुत्र श्री प्रकाश ,
बैठे थे उदास ।

अचानक माँ ने कहा -
" बेटा कल्पना करो कि
हम और बहू दोनों गंगा जी नहाने जाएँ,
हमारा पैर फिसल जाये,
और हम दोनों डूबने लग जाएं,
तो तू अपना धरम कैसे निभाएगा
डूबती हुई माँ और बीबी में किसको बचाएगा ?"

मेहरबान ! कदरदान ! साहिबान !

लड़का था परेशान।
उसके दिमाग में कोई युक्ति नहीं आई ।
क्योंकी,
एक तरफ था कुआँ
और दूसरी तरफ था खाई ।

अचानक बीबी ने मुंह खोला
और यूँ बोली -
हे पतिदेव,
आप अपना धर्म
श्रवण कुमार की तरह निभाना
डूबती हुई माँ और बीबी में
अपनी माँ को ही बचाना ।
माँ की ममता की लाज को मत लजाना।
अरे हमारा क्या है
हम तो जवान हैं,
मौत से भी जूझ जायेंगे
और हमें बचाने
तो
जिन्हे तैरना नहीं आता
वो भी कूद जायेंगे।"

धर्मराजमुटके Fri, 03/07/2015 - 14:35

In reply to by गवि

गवि,
नेमके संदर्भ शोधून रिलेटेड मटेरीयल उपलब्ध करुन देण्याची कला कुठे शिकलात ? मागच्या जन्मी स्टोअरकिपर होतात काय ?
आत्ता मेरेको 'गुगलबाबाकी जय' असे रेडीमेड उत्तर नक्को होना !

अजो१२३ Fri, 03/07/2015 - 13:02

In reply to by -प्रणव-

१. होतात.
२. पाकिटावर जसं सांगीतलं आहे तसं (फ्रिजमधे, उन्हापासून दूर) नाही ठेवलं तर त्याही पेक्षा लवकर.
३. पाकिट उघडल्यावर सहसा एक्सपायरी डेट्ची वाट पाहू नये. डिपेंड्स, पण खूप अगोदर फेकून द्यावे.
४. बिर्याणी तर शिजवलेले अन्न आहे. दुसर्‍या दिवशी देखिल पाकिट उघडलेले असल्यास खाऊ नये.

अनु राव Fri, 03/07/2015 - 13:17

In reply to by -प्रणव-

फक्त मसाल्याचे पदार्थ असतील आणि ते पाकीट उघडलेले नसले तर ते मसाले एक्स्पायरी डेट नंतर बर्‍याच नंतर पर्यंत वापरायला काहीही हरकत नाही.
अन्न पदार्थावर एक्स्पायरी डेट लिहीणे बंधनकारक असल्यामुळे तशी ती मसाल्यांच्या पाकीटावर लिहायला लागते.

इतकेच काय, शेंदेलोण आणी पादेलोणाच्या पाकीटांवर पण एक्स्पायरी डेट असते. हे मीठ निसर्गात लाखो वर्ष पडुन आहे, फक्त ते पाकीटात भरले की त्याला एक्स्पायरी डेट. :-(

अजो१२३ Fri, 03/07/2015 - 13:39

In reply to by अनु राव

बिर्याणीबाबत कंफ्यूजन झालेलं.
----------------------------
शेंदेलोण, पादेलोण लहानपणी ऐकलेले. अलिकडे शहरात जनरली घरोघरी हे नसावं.

अनु राव Fri, 03/07/2015 - 14:40

In reply to by अजो१२३

शहरात पण मिळते, आणि वापरले पण जाते.
फक्त हल्ली पॅकेज्ड असते आणि त्यावर एक्स्पायरी डेट पण असते.

गवि Fri, 03/07/2015 - 14:45

In reply to by अजो१२३

रॉक सॉल्ट आणि त्यासदृश नावांनी उलट उगीचच समुद्री मिठापेक्षा "जास्त हेल्दी" असे नाव होऊन एलिट फूडच्या शेल्फांमधे जाऊन बसली आहेत.

घाटावरचे भट Fri, 03/07/2015 - 16:14

In reply to by गवि

पादेलोण मिळतं की तेज्यायला बाजारात. ताकात किंचित हिंग आणि पादेलोण टाकल्यास ताक मस्त लागतं असा अनुभव आहे.

बॅटमॅन Fri, 03/07/2015 - 16:23

In reply to by घाटावरचे भट

अतिप्रचंड सहमत. नुस्तं पादेलोण टाकलं तरी मस्तच.

तदुपरि करोलबाग, दिल्ली येथे रामा'ज़ क्याफे नामक सौदिंडियन हाटेलात अंमळ फोडणी दिलेले ताक प्यालोय मागच्या ऑक्टोबरात, काही आगळीच चव होती. आय मीन बादशाहीतलं विनाफोडणीचं ताकही मस्तच, पण इसकी बात ही कुछ और थी. एकदम "दिल मांगे मोर" असं झालं.

मोर = तमिऴ-मलयाळम भाषांतील ताकासाठीचा शब्द.

adam Fri, 14/08/2015 - 09:32

In reply to by .शुचि.

शेंदेलोण = सैंधव = खाणीतलं मीठ.
टेक्निकली हे नॉर्मल मीठासारखच NaCl, सोडिअम क्लोराइअड असावं.(ह्याबद्दल मात्र खात्री नाही)
उपासाला साधं नेहमीचं समुद्राच्या पाण्यातून काढलेलं मीठ चालत नाही; जमिनीतून, खाणीतून काढलेलं मीठ--सैंधव चालतं.
फार पूर्वी ह्याचे प्रमुख साठे सिंध प्रांतात होते. सिंध प्रांतात सापडते ते सैंधव, अशी साधी सरळ व्याख्या.
.
.
पादेलोण = खडे मीठ = काळं/काळ्सर/लालसर्/चॉकलेटी मीठ
हे सामान्यतः स्फटिक-क्रिस्टल रुपात असतं. हल्ली बाजारात ह्याची पावडर करुन विकायला उपलब्ध असते.
चवीला हे फार फार वेगळं असतं. वास वेगळाच्/विचित्र असतो.
(दिवाळीला कुणी पाण्यातला भुइनळा-जलपरी उडवली आहे का ? त्यानंतर पाण्याला विचित्र असा हल्कासा गटारीसारखा वास येतो.
काळ्या मीठाचा वास त्याच धर्तीवर असतो.)
ज्या गावांमध्ये ड्रेनेज अंडारग्राउंड नसते, उघडी गटारे असतात, अशा खूपशा ठिकाणी हाच वास असतो.
(फार पूर्वी बीड-परभणी-लातूर वगैरे ठिकाणी येइ. सध्याचे ठाउक नाही.)
.
.
पचनसंस्थेला उपकारक म्हणून पोट बिघडल्यावर काळं मीठ घेतात
म्हंजे ताज्या आल्याचा कीस, लिंबू, ओवा हे जसे पोट बिघडल्यावर घ्यायचे असते; तसेच हे काळे मीठ सुद्धा.
.
.
तत्वतः तुम्ही सैंधव रोज वापरु शकता नॉर्मल मीठाऐवजी; पण काळं मीथ वापरु गेल्यास डोक्याला शॉट्ट बसेल.
पोट बिघडल्याशिवाय (किंवा पोटाअची नियमित मेन्टनन्स अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून अधून मधून घ्यायच्या मिश्रणाचा एक भाग म्हणून घेतल्याशिवाय) अदरवाइज काळे मीठ फारसे कोणी वापरत नाही; वापरु शकत नाही.

गवि Fri, 14/08/2015 - 10:00

In reply to by adam

वास वेगळाच्/विचित्र असतो.
(दिवाळीला कुणी पाण्यातला भुइनळा-जलपरी उडवली आहे का ? त्यानंतर पाण्याला विचित्र असा हल्कासा गटारीसारखा वास येतो.
काळ्या मीठाचा वास त्याच धर्तीवर असतो.)
ज्या गावांमध्ये ड्रेनेज अंडारग्राउंड नसते, उघडी गटारे असतात, अशा खूपशा ठिकाणी हाच वास असतो.
(फार पूर्वी बीड-परभणी-लातूर वगैरे ठिकाणी येइ. सध्याचे ठाउक नाही.)

इतकी उदाहरणं किंवा उपमा शोधण्यापेक्षा या मिठाच्या नावातच सजेशन आहे की.. !!

बादवे, हा वास हायड्रोजन सल्फाईडचा असतो. केमिस्ट्री लॅबमधे काम केलेल्यांनी हा पादरा वास खूपदा घेतला असणार.

वेगवेगळी सल्फाईड्स या पादेलोणात असतात. आयर्न सल्फाईडमुळे रंग येतो आणि हायड्रोजन सल्फाईडमुळे तो वास.

मन Sun, 05/07/2015 - 14:33

पोळला नसावा तो
अश्रू ज्यास ठाउक नाहित
राजकुमार लुंबिनीचा तो
वार्धक्य ज्यास ठाऊक नाही
.
.

संगति जयाच्या खेळलो मी सदाहि |
हाकेस तो आता ओ देत नाही

adam Mon, 06/07/2015 - 18:03

एक भारतीय इंजिनिअर. चांगला जॉब मिळाला म्हणून सौदी अरेबियामध्ये जॉइन झाला. त्या देशात चांगला सपत्नीक गेला. रस्त्यावर फिरत असताना ए टी एम मधून पैसे काढायला गेला. बाहेर येउन पाहतो तर बायको गायब!!!काहीच ठावठिकाणा नाही.
हा पोलिसांत तक्रार द्यायला गेला. पोलिस म्हणाले तुमच्या प्रकरणामध्ये कारवाई करायची तर सर्वात आधी तुमच्यावरच करावी लागेल. तुमच्याच वर्णनाप्रमाणं बाईनं बुरखा घातलेला नव्हता. शिवाय तुम्ही आत गेलात तितका वेळ ती एकटी होती. अशी स्त्री सार्वजनिक मालमत्ता असते. नेली असेल कुणीतरी. तुम्ही प्रकरण सोडून दिलेलं बरं.
.
.
हा भांबावला. कंपनीकडूनही पुरेसं साह्य मिळालं नसावं. "हा त्या देशाचा कायदा आहे. आणि त्याचा आदर राखणं भाग आहे" अशा छापाचं उत्तर मिळालं.
.
.
इकडे त्या इंजिनिअरच्या सासर्‍याला, म्हणजेच मुलीच्या बापाला हा प्रकार समजला. त्यांनी इंजिनिअरवरच केस टाकली. "बाई अशी एकदम गायबबियब कशी होते; ह्यानच काहीतरी बरंवाईट केलं असणार दूरदेशी नेउन" असं त्याचं म्हण्णं.
.
.
खरं खोटं माहित नाही. पण कोणाचंही(सासर्‍याचं किंवा त्या इंजिनिअरचं) म्हण्णं खरं असलं तरी केस खूपच विचित्र आहे. त्या गायब झालेल्या स्त्रीचं काय झालं तेच डोक्यात येत नाही. ती सुखरुप असण्याची शक्यता वाटत नाही; असती तर आतापावतो तिनं संपर्क केला असता.
.
.
वरील किस्सा माझ्या अत्यंत जवळच्या मित्राकडून समजला.त्याच्या कॉलेजातील सिनिअरसोबत (तीन वर्षे सिनिअर) हे घडलय.
घटनेतील इंजिनिअर म्हणजे तो सिनिअर. मी माझ्या मित्राला चांगलं ओळखतो. तो फेकाड्या नाही. त्याचा सिनिअर कसा आहे;
काय आहे; ठाउक नाही. पण माझ्या मित्राच्या मते त्याचा सिनिअरही खूपच चांगला सज्जन प्राणी आहे; तो बायकोचं बरंवाईट काही
करेल असं वाटत नाही.

बॅटमॅन Mon, 06/07/2015 - 18:18

In reply to by adam

सौदीवाले कसे आहेत ते अख्ख्या जगाला माहिती आहे. तस्मात तूर्त त्यांना शिव्या घालत नाही. (कारण ते या जन्मी बदलतील असे वाटत नाही. ते एक असो.)

मुसलमान असो की बिगर मुसलमान, बाईने सार्वजनिक प्रिमाईसेस मध्ये बुरखा घातलाच पायजे अशी तिकडे सक्ती असते. माझं खोबार नामक बिकांच्या लेखमालेत एक प्रसंग दिलाय बघ. सौ०बिका एकदा बुरखा काढून त्या मुतव्वा नामक धार्मिक पोलिसाकडे बघू लागल्या कुतूहलाने तशी तो आला आणि विचारले- "शी युवर वाईफ?" हो म्हटल्यावर "कॅन यू आस्क युवर वाईफ टु कव्हर हरसेल्फ प्रॉपरलि" असे विचारून पुन्हा बुरखा घालावयास लावले.

इथे बाई नवर्‍याबरोबर असतानाही जर असे असेल तर मग विथौट बुरख्याचं बायकोला रस्त्यावर आणणं ( जणू कुत्र्याला आणल्यागत शब्दयोजना, कय वायझेड/भिकारडी/मनुवादी/मध्ययुगीन/स्त्रीद्वेष्टी मानसिकता, निषेध असो इ.इ.इ.) याकरिता नवर्‍याचा सत्कार नको का करायला? सौदीवाले कसे आहेत हे त्याला जराही माहिती नसणं म्हणजे उदाहरणार्थ अंमळ रोचक वगैरे वाटतं.

===========================

दोनेक वर्षांमागे दिवाळी अंकातही अशीच कथा वाचली होती. मराठी अन अरब असे दोन मित्र. अरब असतो तो सौदीतला धनदांडगा वगैरे. शिकायला मुंबैत आलेला असतो तिथेच मराठी माणसाची ओळख होते. अरबाची कॉलेजातली क्रश ही पुढे मराठी माणसाची बायको होते. पुढे मराठी माणसाला सौदीत जॉब लागतो, अरब मित्र मराठी माणसाला घरीस सपत्नीक बोलावतो आणि परत जाताना मराठी माणूस बायकोस बोलावतो तर काय! बायकोचा पत्त्याच नाय. मग धाकदपटशा दाखवून दहा लाख रुपयांचा चेक देऊन त्याला भारतात हाकलतो. पुढे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कुणी इ.इ.इ.

या कथेचा मिपावर वेगळ्या प्रसंगी जिक्र केला तेव्हा तिथेही लोकांनी सांगोवांगीच्या अशा कथा सांगितल्या. त्यातली एक कथा परफेक्ट मी सांगितलेल्या कथेप्रमाणेच होती- फक्त लोकेशन सौदीऐवजी दुबई होते.

त्यामुळे अरब लोकांबद्दल अशा कथा का जन्माला येतात हेही जरा पाहिले पाहिजे. (बलात्कार वगैरेंबद्दल भारतीयही पुढे असले तरी) तिथे वुमेन्स राईट्सची काय अवस्था आहे हे सर्वश्रुत आहे, परंतु बायका पळवणे हाही प्रकार चालतो का हे जरा पाहिले पाहिजे.

गवि Fri, 10/07/2015 - 14:50

ईमेल स्टॉर्म हा प्रकार कोणी कधी अनुभवला आहे का? चुकून पूर्ण ऑर्गनायझेशनमधल्या सर्वांना किंवा हजारोंच्या मेलिंग लिस्टला एखादा ईमेल चुकून जाणे आणि "रिमूव्ह मी", "व्हाय अ‍ॅम आय इन्क्लूडेड इन धिस थ्रेड?" असे "रिप्लाय ऑल" मोडमधले अनेकांचे ईमेल्स पुन्हा सर्वांमधे फिरणे, त्याखेरीज खरोखर जेन्युइन मदत करणारे, मेलिंगलिस्टमधून काढा असं म्हणणार्‍याला त्याची प्रोसेस किंवा हेल्पडेस्कचा पत्ता देणारे, चक्क "अरे रिप्लाय ऑल करु नका रे" असं "रिप्लाय ऑल" करुन सांगणारे असंख्य ईमेल्स फिरत राहून बराच काळ हे प्रकरण चालतं असा अनुभव फार पूर्वी एकदा मोठ्या संस्थेत आला होता. आपापल्या ऑफिस इनबॉक्समधून त्या तीनेक तासात साठलेल्या ईमेल्स लोक पुढे दोन दिवस नुसत्या डिलीट करत होते. सब्जेक्टलाईनने ईमेल्स सिलेक्ट करुन एका वेळी अनेक मेसेजेस डिलीट करायचे म्हटले तरी सिस्टीम हँग होऊन बराच वेळ लागत होता.

यामधे सिस्टीमवर नेमका किती जास्त ताण येऊ शकतो? खरंच सिस्टीम कोसळू शकते का? यात नेमकं कोणकोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं? हे टाळण्यासाठी काय करायचं? मोठे ग्रुप टाळणे हाच उपाय असतो का?

नितिन थत्ते Fri, 10/07/2015 - 14:57

In reply to by गवि

हो. आमच्या कंपनीत दोन वेळा हा अनुभव आला आहे.

एखाद्या कम्युनिटीत एका माणसाने पोस्ट केल्यावर कम्युनिटीतल्या सर्वांना ईमेल जाणारे सेटिंग असू नये. किंवा त्या मेलच्या बीसीसी मध्ये सर्वांचे मेल आयडी टाकले जावेत.

मेघना भुस्कुटे Fri, 10/07/2015 - 14:53

In reply to by गवि

हो! भलतीच मज्जा येते. होळीच्या आसपास हा प्रकार झाला होता. नंतर नंतर लोकांनी हॅप्पी होलीपासून सुरुवात करून काहीही बरळायला सुरुवात केली होती. अशक्य करमणूक.

.शुचि. Fri, 10/07/2015 - 17:53

In reply to by गवि

होय असा प्रकार दोनदा झाला. दुसर्‍या वेळेस तत्काळ परिस्थिती ताब्यात घेतली गेली व एमेल्स राऊट करुन नो रिप्लाय (आयसोलेटेड) अ‍ॅड्रेस वर केल्या गेल्या.

आदूबाळ Fri, 10/07/2015 - 15:18

In reply to by गवि

माझ्या पूर्वीच्या हपीसमध्ये हा प्रकार वारंवार होत असे. त्यातून तिथे कमलनोंदी वापरत असल्याने कारभार अनागोंदी होता. हे नेहमीचंच झाल्याने लोक न त्रासता उलट येंजॉय करत असत. विनोदी/खवचट उत्तरं लिहीत असत. शेवटी कोणीतरी "आता बास!" ची दटावणी करत असे.

अनेक विनोद होत असत. एका एचार्णीने एकाला भरती करून घेताना पगार काय देणार आहे याची मेल चुकून सगळ्यांना मार्क केली! एकदा एकाने गुप्त ड्यू डिलिजन्स रिपोर्ट सगळ्यांना पाठवून दिला!

शेवटी एक हुषार+कडक सीआयओ आला आणि त्याने सामूहिक मेलिंगचे अधिकार काढून घेतले आणि हे प्रकार थांबले.

(दुसरा असाच विनोदी प्रकार म्हणजे नाव-तेच-माणूस-चुकीचा. उदा - जिग्ना पटेल नावाच्या तीन वेगवेगळ्या बाया मुंबई, कोपनहेगन आणि जोहान्सबर्ग हपीसात असणे!)

बॅटमॅन Fri, 10/07/2015 - 15:45

In reply to by आदूबाळ

(दुसरा असाच विनोदी प्रकार म्हणजे नाव-तेच-माणूस-चुकीचा. उदा - जिग्ना पटेल नावाच्या तीन वेगवेगळ्या बाया मुंबई, कोपनहेगन आणि जोहान्सबर्ग हपीसात असणे!)

माझ्या एका कलीगच्या बाबतीत हे कायम होत असे, उदा. राकेश पाटील या नावाचे दोघे. एकाचा आयडी राकेश.पाटील तर दुसर्‍याचा पाटील.राकेश असा होता. पैकी माझा मित्र नेहमीचा एम्प्लॉयी तर दुसरा बजेट सँक्शनवाला होता. बजेटचे मेल्स माझ्या मित्राला कायम येत. सुरुवातीला एकदा दोनदा सांगून झालं, तरीही फरक पडला नै. मग त्याने सरसकट ओके, येस, ग्रांटेड, इ. उत्तरे लिहिणं सुरू केलं. अखेर काही दिवसांनी तो प्रकार थांबला.

अतिशहाणा Fri, 10/07/2015 - 18:35

In reply to by बॅटमॅन

विप्रो कंपनीत ४०-५० चंद्रशेखर होते. त्यात अनेक दक्षिण भारतीयांमध्ये आडनावाची पद्धतच नाही. त्यामुळे शेखर.चंद्र, चंद्र.शेखर, चंद्रशेखर१, चंद्रशेखर.२३ असे वेगवेगळे कॉम्बो करुन त्यांचे आयडी बनवले होते.

मराठे Mon, 20/07/2015 - 22:51

In reply to by बॅटमॅन

असला प्रकार एकदा माझ्या बाबतीत झालेला. माझं नाव (किरण) आणि आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरचं आडनाव (किराणे) सारखंच असल्यामुळे त्यांना पाठवायचं टॅक्स सर्टीफिकेट मला आलं होतं. (मी पण नाव न वाचता टॅक्स चा आकडा बघून निपचीत पडलो होतो)

नितिन थत्ते Fri, 10/07/2015 - 17:33

In reply to by आदूबाळ

>>तिथे कमलनोंदी वापरत असल्याने

कमलनोंदीसारखं भीकार सॉफ्टवेअर नाही. पण आम्हाला कम्पलसरी आहे.

आडकित्ता Fri, 10/07/2015 - 20:21

In reply to by नितिन थत्ते

कमलनोंदी म्हणजे लोटस नोट्स का?
ते फुकट असल्याने हापिशली परवडत असावेसे दिसते. अनेक ब्यांकातही ते वापरतात.

धर्मराजमुटके Fri, 10/07/2015 - 20:34

In reply to by आडकित्ता

बरोबर. कमलनोंदी म्हणजे लोटस नोटस. मात्र ते फुकट मुळीच नाही. आयबीएम चे एक प्रॉडक्ट आहे.
येथील ईमेल चे धमाल किस्से ऐकून मी ज्या कंपनीला सेवा देत होतो त्याची आठवण झाली.
ही एक प्रख्यात भारतीय इंजिनिअरींग कंपनी आहे. पुर्वी ( ८-१० वर्षापुर्वी) तेथे ट्रेनीजसाठी एक जेनेरीक ईमेल आयडी दिला जायचा. काही डिपार्टमेंटवाले बिच्चार्‍या ट्रेनीजला काम शिकविण्याऐवजी किंवा कंपनीच्या कामाऐवजी दुसरीच कामे सांगत.
एकेदिवशी एका ट्रेनीची सटकली. त्याने सरळ त्या जेनेरीक ईमेल आयडीवरुन कंपनीतल्या मॅनेजर्सना, डायरेक्टर्सना आणि कंपनीच्या सप्लायर्सला ईमेल टाकला आणि लिहिले की 'आमचे येथे शोषण होते. ट्रेनिंगच्या नावाखाली आम्हाला झेरॉक्स काढणे, तिकीट बुक करणे, फायली इकडून तिकडे नेऊन देणे अशी बिनमहत्त्वाची कामे सांगतात वगैरे वगैरे'. त्यानंतर कंपनीत जो भुकंप झाला तो विचारु नका. आमचा आयटी मॅनेजर थयथया नाचत होता. शेवटी तंत्रज्ञानाचा वापर करुन काही त्या ट्रेनीचा शोध लागला नाही. मात्र दोन चार दिवसांनी ट्रेनीजपैकीच कोणतरी फितूर झाला व त्या मुलाची गच्छंती झाली.
या गोष्टीपासून बोध घेऊन कंपनीने जेनेरीक आयडी आणि ट्रेनिजला डोमेनबाहेरील मेल अ‍ॅक्सेस बंद केला. मात्र झेरॉक्स काढायला सांगायचे बंद केले की नाही ते कळाले नाही.

आडकित्ता Fri, 10/07/2015 - 20:47

In reply to by धर्मराजमुटके

समहाऊ मला लोटस सूट फुकट आहे असे वाटत असे. पूर्वी, म्हणजे विंडोज ३x / 9x इ. च्या काळी लोटस ओपन-सोर्स अथवा फ्री (ओपन ऑफिससारखे) होते काय?
माहितीबद्दल धन्यवाद!

धर्मराजमुटके Fri, 10/07/2015 - 20:37

In reply to by नितिन थत्ते

हो पण त्यात पासवर्ड टाकताना बाजूला दिसणार्‍या नाचणार्‍या किल्ल्या व तत्सम आयकॉन्स मला फार आवडायचे.

गवि Fri, 10/07/2015 - 15:59

In reply to by गवि

म्हणजे मोठ्या कंपन्यांमधे असा प्रकार घडल्यास केवळ जास्त ईमेल्स इनबॉक्समधे येऊन पडण्याच्या त्रासाखेरीज / करमणुकीखेरीज अन्य काही नुकसान विशेष होत नाही का?

आत्ता याविषयी आणखी वाचावं म्हणून पाहिलं तर काही टेराबाईट्स अनावश्यक डेटा एकेका प्रकरणात एक्स्चेंज होणे आणि यासम काही आकडे मिळाले. अशा प्रकारे मोठ्या कंपनीत हे घडलं तर सिस्टीम बंद पडणे किंवा तत्सम काही जास्त गंभीर पीडा होत नाही का? मुख्य म्हणजे अमुक इतका "डाटा एक्सचेंज" झाला म्हणजे बँडविड्थ खर्च झाली असं म्हणताना कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कमधे बँडविड्थ "खर्च" होणे म्हणजे नेमके काय असते?

एकाच प्रिमायसेसमधे सर्व एम्प्लॉयीज असतील तर इंटरनेटद्वारे कोणतीही देवाणघेवाण न झाल्याने "खर्च" वाचतो का?

-हार्डवेअर आणि नेटवर्कमधे अडाणी (गवि)

आदूबाळ Fri, 10/07/2015 - 16:23

In reply to by गवि

डेटा सिक्युरिटी हा विषय जिथे आहे तिथे नुकसान होऊ शकतं. उदा० पगाराचे आकडे.

मी टेलिकाम अभियंता नाही, पण कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये बँडविड्थ खर्च होणे याला काही विशेष अर्थ नसावा. कारण टेलिकॉम क्षेत्रामध्ये "एक्सेस कपॅसिटी" ही मोठी जोखीम असते. लीजलायनींच्या पायपांमधून पुरेसा डेटा जात नसावा.

हां - या सगळ्याचा ब्याकप ठेवायला सर्व्हर स्पेस मात्र लागत असावी.

अतिशहाणा Fri, 10/07/2015 - 18:44

In reply to by गवि

मीही नेटवर्कमध्ये अडाणीच आहे पण थोडी अनुभवाच्या आधारे उत्तरे देण्याचा प्रयत्नः

कंपनीच्या अंतर्गत बँडविड्थमध्येच खर्च झाली याला काही प्रॅक्टिकल अर्थ नाही. वेगवेगळ्या ठिकाणी किमान दोन कार्यालये असणाऱ्या कंपनीला पब्लिक इंटरनेट - आयएसपी वगैरे वापरावेच लागते. त्यामुळं चेन्नैतल्या एखाद्यानं पाठवलेला मेल त्याच कंपनीच्या पुण्यातल्या कर्मचाऱ्याला दिसण्यासाठी बँडविड्थ खर्च होतेच

तशीही बँडविड्थ आणि स्टोरेज खूपच स्वस्त आहे. मुख्य अडचण महत्त्वाच्या इमेल्सचा खोळंबा होणे, आणि अनावश्यक इमेलचा घोळ निस्तरण्यासाठी मनुष्यबळ खर्च होणे. (शेकडो कर्मचारी दोन दिवस निव्वळ इमेलबॉक्स साफ करण्यासाठी वापरत असतील तर हा प्रचंड खर्चिक प्रकार आहे)

एकाच प्रिमायसेसमधे सर्व एम्प्लॉयीज असतील तर लोकल नेटवर्क वापरले गेल्याने ब्यांडविड्थचा खर्च नक्कीच वाचतो.

चिमणराव Fri, 10/07/2015 - 16:29

कंप्यूटर येणार , पेपरवर्क कमी होणार ही ९१ सालची हाक होती आता फक्त ओरड राहिली आहे.--अमुक सरकार येणार गरीबी हटणार वगैरे प्रमाणे. "ब्याकप" नावाचा राक्षस पॅकप होईल भितीने भरमसाठ खात राहतो-कंप्यूटर असो वा सरकार.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/07/2015 - 19:28

In reply to by चिमणराव

कोणत्या संदर्भात म्हणताय त्यावर अवलंबून आहे. भारतातच, एलायसीची कोणतीशी पॉलिसी वयात आली आणि तिचे पैसे मिळणार होते. त्यासाठी माझ्या ओळखपत्राची प्रत हवी होती. एजंटाने माझ्याकडून लायसन्सचा फोटो घेतला आणि माझ्यापुरता कागदी राक्षस टळला. लग्ननोंदणी, जमीन नोंदणी कार्यालयांमध्ये (निदान ठाण्याच्या तरी) आपल्याला आपले फोटो घेऊन जावं लागत नाही, तिथेच काढले जातात.

एकेकाळी, म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी ३०० पानांच्या पुस्तकाएवढ्या हार्डडिस्कमध्ये काही जीबी डेटा मावत असे. आता त्याच्या एक चतुर्थांश आकारमानात काहीशे जीबी डेटा मावतो.

.शुचि. Fri, 10/07/2015 - 19:37

सुंदर, सेक्सी, तरुण स्त्री

विसंगत वाटतय. मध्यवयीन स्त्री सर्वात सुंदर दिसते अन स्वतःच्या सेक्श्युअ‍ॅलिटीत कम्फर्टेबल असल्याने सेक्सी भासते. हां तरुण स्त्री बाहुली असू शकते पण .... ;)
___
अर्थात ऐसीवरील पुरुषांची मतमतांतरे ऐकण्यास आवडतील. ;)

अजो१२३ Fri, 10/07/2015 - 20:52

In reply to by .शुचि.

अन स्वतःच्या सेक्श्युअ‍ॅलिटीत कम्फर्टेबल असल्याने सेक्सी भासते.

सगळ्याच वयाच्या बायका अशा "स्वतःच्या सेक्स्योअ‍ॅलिटीशी" कंफर्टेबल असाव्यात.

पिवळा डांबिस Fri, 10/07/2015 - 23:09

In reply to by .शुचि.

मध्यवयीन स्त्री सर्वात सुंदर दिसते अन स्वतःच्या सेक्श्युअ‍ॅलिटीत कम्फर्टेबल असल्याने सेक्सी भासते. हां तरुण स्त्री बाहुली असू शकते पण ....
___

"केल्याने होत आहे रे,
आधी (भरपूर) केलेचि पाहिजे!!"
:)

अनु राव Tue, 14/07/2015 - 13:55

भारतात गेले काही महिने ( ६-७ महिने ) WPI निगेटीव्ह आहे पण CPI मात्र पॉसिटीव्ह आहे ( आणि तो सुद्धा ५-६ % च्या दरम्यान ). म्हणजे दोन्हीत गेले काही महिने ८-९ % चा फरक आहे. इतका फरक मला वाटत नाही की पूर्वी कधी असायचा.

ह्याचा अर्थ काय? मार्केट फोर्सेस भारतात नीट काम करत नाहीयेत? व्यापारी कार्टेलिंग करुन जास्त फायदा मिळवतायत? का ग्राहका कडे जास्त पैसा झालाय?

नितिन थत्ते Tue, 14/07/2015 - 14:53

In reply to by अनु राव

पॉलिटिकल उत्तर> अहो, व्यापार्‍यांच्या पक्षाचं सरकार आलं ना गेल्या वर्षी? मग मधल्या दलालांचा जास्त फायदा होणार हे साहजिक आहे /पॉलिटिकल उत्तर>

खरे उत्तर - माहिती नाही. पण लोकांना तितक्या महागाईची झळ बसत नाही असं दिसतंय. लोक वाढीव किंमत द्यायला तयार आहेत.

अजो१२३ Tue, 14/07/2015 - 16:03

In reply to by अनु राव

१. या दोन्ही इंडायसेसचे बास्केट भिन्न आहे.
२. बास्केटमधल्या आयटम्सचे वेट भिन्न आहे.
३. दोन वेगवेगळी सरकारे हे मोजतात*. तुम्ही कोणत्या राज्याबद्दल बोलताय?
४. सीपीआयचे अनेक उपप्रकार आहेत. तुम्ही कोणता घेतला आहे?
५. या दोन्ही इंडायसेसची अप्प्लिकेशन्स भिन्न आहेत.
६. ते नेहमी युनिफॉर्मली वाढते मानले तर, इन्फेशनचा स्वेल नेहमी wpi level वर कमी आणि cpi level वर जास्त दिसेल.
७. सप्प्लाय चेनच्या एका पातळीवरून प्राईस चेंजेस दुसर्‍या पातळीवर यायला वेळ लागतो.
८. आपण दोन्ही आकडे वार्षिक घेतले असावेत अशी आशा.
दोहोंपैकी wpi driver index मानता येईल. होलसेल इंडेक्स कमी होत असेल तर त्याचा सुपरिणाम लवकरच दिसून यायला हवा.

अनु राव Tue, 14/07/2015 - 16:54

In reply to by अजो१२३

अजो तुम्ही काय लिहीले आहे ते कळले नाही तरी पण

WPI Negative असणे ( -२.५% ) आणि CPI Positive असणे ( +६ % ) हे गेले ६- ७ महीने चालू आहे.
WPI चा इफेक्ट CPI वर दिसायला थोडा वेळ जायला पाहिजे हे मान्य असले तरी ६-७ महिने हा काळ बराच मोठा आहे.

जनरली ह्या दोन इंडायसेस मधे ३-४ % च्या फरक असायचा, पण गेले ६-७ महिने तो ७-८ टक्यावर आहे.
गम्मत म्हणजे कमॉडीटी, पॉवर, तेल, अन्न, खनिजे ह्यांचे दर गेले ७ महिने कमी होत असताना, ग्राहकाला घ्याव्या लागणार्‍या वस्तुंच्या, अन्नधान्यांच्या किमती मात्र वाढत आहेत.

३. दोन वेगवेगळी सरकारे हे मोजतात*. तुम्ही कोणत्या राज्याबद्दल बोलताय?

ह्या वाक्यानी बोल्ड आउट झाले आहे. मला वाटत होते की हे दोन्ही केंद्र सरकार मोजते.

ऋषिकेश Tue, 14/07/2015 - 16:58

In reply to by अनु राव

हे काय माहित नाही पण या विषयाला अवांतर अशी एक बातमी वाचली, की राहुल बजाज यांनी सरकारने प्रकाशित केलेल्या आकड्यांवरच शंका घेतली आहे

विवेक पटाईत Sun, 19/07/2015 - 08:31

In reply to by अनु राव

स्थानीय कर , स्थानीय ट्रान्सपोर्ट, फुटकर विक्रेत्याचे कमिशन इत्यादी बाबी विसरू नका. बाकी सरकार व्यापाराचे नाही. कोळशाच्या निलामी मुले व्यापारांना नुकसान झाले. ppp जागी सरकार स्वत: रस्ते बांधणार, (जसे गडकरींच्या काळात मुंबईत पुले बांधली होती) नुकसान व्यापाराचे होणार. तरी ही अति शिकलेले शहाणे लोक या सरकारला व्यापारांचे सरकार म्हणतात, काय म्हणावे ...

गवि Wed, 15/07/2015 - 11:29

प्लुटो फ्लायबाय मिशन (न्यू होरायझन्स स्पेसक्राफ्ट) याविषयी कोणी लेख लिहीणार आहे का? गेले दोन दिवस याबाबतीतल्या न्यूज फॉलो करत आहे. काल नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर या मिशनविषयी एक तासाचा प्रोग्राम होता.

या निमित्ताने अशा प्रकारचीच पण मानवासहित मोहीम कशी असेल याविषयी चर्चा वाचायला/करायला / ऐकायला आवडेल.

चंद्रापेक्षा जास्त दूर मोहीम काढली (सध्या तरी मंगळच आवाक्यात आहे असं म्हणता येईल) तर अशा मोहिमेत माणूस इन्क्लूड केल्यामुळे निर्माण होणारी आव्हानं मुख्यतः खालीलप्रमाणे असावीतः

१. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी लागणार्‍या सप्लाईजचा साठा (अन्न, ऑक्सिजन, वस्त्र, मनोरंजन इत्यादि)
२. तापमान आणि हवादाब नियंत्रणाची मोठी दीर्घकालीन यंत्रणा
३. संपर्क साधण्यातला अंतरासोबत वाढता टाईमलॅग आणि घटती बँडविड्थ.
४. मर्यादित जागेत एकट्याने किंवा खूप कमी संख्येने अनेक वर्षे एकत्र काढणे. एकमेकांपासून सुटकेचा मार्ग नसणे.
५. वैद्यकीय आणीबाणीची शक्यता
६. कोणत्याही कारणाने यानातल्या व्यक्ती अक्षम झाल्या तर पूर्ण मिशनचा उद्देश विफल होणे. (उदा. मरण, बेशुद्धावस्था, नैराश्य, भांडण, आजार)
७. अन्य ग्रहांवरदेखील वातावरणाची घनता आणि ऑक्सिजन / पाणी यांची उपलब्धता माहीत नसल्याने तिथे लँडिंग केल्यास त्याजागीही वरील सर्व सप्लाईज घेऊनच उतरावे लागणे
८. सप्लाईज पुन्हा पुन्हा उगवणारे नसल्यास (कारण अश्या जिवंत सप्लाईजना पुन्हा इतर सप्लाईज द्यावेच लागतील), मर्यादित सप्लाईजमुळे तिथला कार्यकालही मर्यादितच ठरणे
९. उदा. मंगळावर उतरुन तिथे खाद्य अन्नाचे पुन्हा उगवणारे स्रोत तयार करण्याच्या शक्यतेची खात्री नसतानाही तिथे पोहोचणे
१०. चंद्राखेरीज इतर ग्रहांवरुन (गुरुत्वाकर्षण आणि वातावरणामुळे) पुन्हा परतीचं उड्डाण फारच अवघड किंवा अशक्य असल्याने एकदा गेलेली व्यक्ती तिकडेच कायमची राहणे किंवा कार्यकाल संपवून तिने आत्मत्याग करणे हाच पर्याय उरणे

यापैकी शेवटची शक्यता गृहीत धरुन (परतीची शक्यता अत्यंत महाग ठरत असल्याने किंवा परवडत नसल्याने) "मार्स टु स्टे" अशी एक संकल्पना पुढे आली आहे आणि त्यावर गंभीरपणे कृती चालू आहे. यामधे स्त्री-पुरुष अशा काही जोड्या कायमसाठी, उर्वरित आयुष्य तिकडेच सेटल करण्याच्या उद्देशाने "वन वे" प्रवासासाठी निघणं असं गृहीतक आहे. यात परत येणे नाही. सप्लाईज पुढे भविष्यात टप्प्याटप्प्याने अन्य वन वे यानांतून तिथे पाठवण्यात येतील.

याकरिता मध्यंतरी व्हॉलंटियर्सचं नॉमिनेशनही चालू होतं असं वाचलं.

हे सर्व प्रत्यक्षात यायला अजून बराच वेळ असला तरी ते प्रयत्न घडणं बर्‍यापैकी शक्य कोटीतलं दिसतं आहे.

प्रश्न असा पडतो की:

१. आपल्यापैकी कोणी (फिटनेस वगैरे सर्व योग्य आहे असं मानून) असं जायला तयार होईल का?
२. परग्रहावर अनंत संकटांच्या आणि प्रतिकूल परिस्थितीच्या पूर्ण विरोधात शक्ती आणि प्रचंड पैसा लावून पाचदहा लोकांची का होईना पण परग्रहावर वसाहत करण्याची आवश्यकता आजच्या घडीला आहे का? यातून काय साध्य होईल?

https://en.wikipedia.org/wiki/Mars_to_Stay

ऋषिकेश Wed, 15/07/2015 - 11:40

In reply to by गवि

यावर खूप पूर्वी डिस्कवरीवर एक काल्पनिक फिल्म बघितली होती.
त्यात लोकांना अशा दुरच्या प्रवासाला नेताना फक्त मेंदु व हृहय मरणार नाही अशा अवस्थेत ठेऊन - बाकी अवयव शिथील करून (एका क्युबमध्ये बंद करून.) नेले जाईल असे होते.
थोडक्यात गर्भाशयातील जीव जसा अन्न ग्रहण करतो, हालचाल करतो मात्र 'सजग' नसतो, तसेच काहीसे.

त्यामुळे १,४,६ मधील धोका बराच कमी होतो.

अजुनही काही भन्नाट कल्पना आहे. वेळेच्या अनुपलब्धतेमुळे त्यावर नंतर लिहेन

.शुचि. Sun, 19/07/2015 - 07:14

https://chiemeziemokwara.wordpress.com/ हा ब्लॉग वाचत होते.आवडत होता. बरेच विचार पटत होते की "प्रत्येकजण काही ना काही विकत असतो. May be tangible may be intangible. मग ते एखादं प्रॉडक्ट असो, स्वतः असो, स्वतःची कल्पना असो की स्वतःचा सहवास असो." तो लेख आवडला अन बरेच मुद्दे आधीच ऐकलेले, किंवा मला सुचलेलेही होते - https://chiemeziemokwara.wordpress.com/2015/06/24/create-do-not-compete/

दुसरा लेख वाचला - https://chiemeziemokwara.wordpress.com/2015/07/13/10-signs-youre-wastin… की सतत तक्रारी करणे, अगदी क्वचित का होइना, पोर्नोग्राफी पहाणे हा वेळेचा अपव्यय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पालक, पाल्य, अमके अन टमके तुम्हाला काही देणं लागतात तर ते एकदम चूकीचे आहे. No one owes you a dime. वगैरे. अन लेखकाची मते माझ्या मतांशी १००% जुळत असल्याने पुढे वाचत गेले. अर्थात नवीन काही मिळत नव्हतं एकदम इझी गुरगुटं, मऊ अन्न , मेंदू ग्रहण करत होता
.
अन मग या पुढील लेखापाशी आले ज्यात ब्लॉगर म्हणतो की पितृसत्ताक पद्धत मागे पडली आहे, पुरुष हे ताटाखालचे मांजर होऊन बसले आहेत. घरात पुरुषाचा धाक असा राहीलेला नाही. नोकरीवरही पुरुषांना कोणी स्त्री काम देऊ शकते, पाठीत दट्ट्या घालू शकते, अगदी फायर करु शकते वगैरे...... अन मग पुढे आलं पहा तरी याचे दुष्परिणाम - नाक्यानाक्यावरती गँग वॉर्स, टीनेज प्रेग्नन्सी, ड्रग प्रॉब्लेम्स वगैरे ही सगळी घरातील पुरुषाचे वर्चस्व गेल्याचा परीणाम आहे.
https://chiemeziemokwara.wordpress.com/2015/07/18/can-the-real-men-plea…
.
तेजायला आतापावेतो कमावलेली सगळी गुडविल त्या ब्लॉगरने पार धूळीला मिळवली. प्रत्येक समस्येचे खापर फेमिनिझम वरती फोडतय येडं. विदा काही नाही देत नुसतीच अतिरंजित विधानं करतय. हा मनुष्य कडवा ख्रिश्चन आहे अन चर्च वगैरे मध्ये स्वतःचा वेळ तथाकथित सत्कारणी लावतोय. कसलं तत्वज्ञान सांगणार बोडक्याचं - टीनेज प्रेग्नन्सीज वडीलांचा धाक न राहील्याने होतायत??????? येडपट तेजायला.
.
असो. जे योग्य वाटतं ते घ्यायचं बरोबर? नाही ना होत एखादा ब्लॉगर, लेखक मनातून उतरला की कान एकदम बंदच होऊन जातात.

अजो१२३ Sun, 19/07/2015 - 20:30

In reply to by .शुचि.

प्रत्येकजण काही ना काही विकत असतो.

या विधानाच्या संदर्भात आपलं, माझं चर्चबद्दलचं, ब्लॉगर्बद्दलचं मत आणि परस्परांबद्दलची मतं क्षणभर गौण मानू.

या भूतलावर मनुष्यांचं सहअस्तित्व आहे. त्यांचेतील सर्व संबंध व्यवहार या सदरात मोडत नाहीत. व्यवहार आणि व्यवहार ही संज्ञा निरर्थक न ठरण्यासाठी आवश्यक असलेली मूल्य ही संज्ञा - या दोन्ही संज्ञा - मानवाच्या मनात उपजलेल्या अमूर्त, अस्पष्ट, निराधार संकल्पना आहेत.

आणि समजा व्यवहार आणि मूल्य या संज्ञांना सुनिश्चित, नि:संदिग्ध अर्थ आणि संदर्भ आहेत असे मानले तरी मानवी मनाची रचना अशी आहे कि समूल्य आणि विमूल्य व्यवहारांपैकी विमूल्य व्यवहारांच्या यशातच तो आपल्या जीवनाची परिपूर्णता पाहतो.
======================================================================================

विवेक पटाईत Sun, 19/07/2015 - 08:35

आजकाल ई पुस्तक प्रकाशित करण्या कडे कल आहे, काही प्रश्न मनात येतात
१. २०० पानांच्या ई-पुस्तक प्रकाशित करायला किती खर्च येतो
२. ई-पुस्तके खरोखरंच विकल्या जातात का. (खरी पुस्तके विकले नाही गेली तर लेखक स्वत:च भेट म्हणून लोकांना देऊन टाकतो, इथे ते ही नाही). मला मिळालेली माहिती ९०% चे नाही. कितपत खरी आहे, माहित नाही.
३. ऐसी वरील कुणी ई-पुस्तक प्रकाशित केले आहे का? त्याचा अनुभव

धर्मराजमुटके Mon, 20/07/2015 - 20:45

In reply to by विवेक पटाईत

जरुर करा.
फायदे :
१. छापील प्रकाशनापेक्षा कमी खर्च.
२. तुम्ही भारतात राहता. येथे मुळातच पुस्तक विकत घेऊन वाचण्याची परंपरा नाहिये. जी काही पुस्तके वाचायची ती लायब्ररीतून आणून किंवा दुसर्‍याकडून (कधीही परत न करण्याकरीता). अर्थात अपवाद देखील आहेतच.
३. ई पुस्तके विकली नाही गेली तर फुकट देतात येतात. तुम्हाला स्वतःला नाही करता आले तरी तुम्ही फक्त एकाला पाठवा. तो तुम्हाला कळुही न देता (आणि स्वतःही न वाचता) लगेच दुसर्‍याला फॉरवर्ड करेल.
४. मी छापील पुस्तकांचा व्यवसाय केला आहे (दिवाळी अंक) पण ई-पुस्तक प्रकाशित केलेले नाही. दिवाळी अंकासाठी आम्ही जाहिराती जमवून आणायचो व त्यातूनच खर्च भागवायचो. त्यामुळे नंतर अंक रद्दीत विकले तरी येणारे उत्पन्न हे नफाच असायचे.

.शुचि. Mon, 20/07/2015 - 19:37

बार्न्स & नोबल्स मध्ये पुस्तक व्यवस्थित चाळून नंतर घरी जाऊन ते पुस्तक ऑनलाइन कमी किंमतीस पदरात पाडून घेणे - कितपत नैतिक आहे?
बार्न्स अँड नोबल्स चा मी फुकट वापर केला याबद्दल मला गुन्हेगार वाटायला हवं का?

धर्मराजमुटके Mon, 20/07/2015 - 20:31

In reply to by .शुचि.

१००% अपराधी वाटायला नको. अहो तुमच्यामुळेच तर आमच्यासारख्या जीवांना बार्न्स & नोबल्स नावाचे पुस्तकांचे दुकान आहे हे माहित झाले. तुम्ही त्या दुकानाची फुकटात जाहिरात केली आहे. आमच्यासारखे काही सदस्य असते तर त्यांनी दुकानवाल्यांकडून जाहिरात करण्याचे पैसेदेखील मागीतले असते. (ते त्यांनी दिले अस्तेच असे नाही म्हणा).

.शुचि. Mon, 20/07/2015 - 20:40

In reply to by धर्मराजमुटके

हाहाहा =))
आवो दादा, Barnes & Nobles is my favorite hangout. Totally cool place. त्यामुळे विशेष ममत्व आहे. अन बॉर्डर्स नावाची पुस्तकविक्रेती चेन बंद पडल्याने तर अधिकच वाईट वाटतय की आपल्यासारख्या फुकट्या ग्राहकांमुळे बार्न्स & नोबल्स देखील बंद पडणार तर नाही? :(

आदूबाळ Mon, 20/07/2015 - 21:36

In reply to by .शुचि.

काही वर्षांत "पुस्तकांचं दुकान" (प्रत्यक्ष + अमेझॉनसारखं ई-दुकान सुद्धा) हे बिझिनेस मॉडेल कालबाह्य होईल असं माझं पष्ट मत आहे. (अर्थात मला कोण विचारतो! पण तरीसुद्धा...)

पुस्तकांची प्रत्यक्ष दुकानं पुस्तकांचा स्टॉक + अ‍ॅक्सेसेबिलिटी विकत होती.
ई-बुकमुळे स्टॉक हा प्रकार उरलाच नाही. अमेझॉन अ‍ॅक्सेसेबिलिटी विकतं.
आता सोसल नेटवर्किंगमुळे लेखक डायरेक वाचकाच्या खिशातला मोबाईल व्हायब्रेट करून पुस्तकं त्याच्यापर्यंत पोचवू शकतो. मध्ये अमेझॉनसारखा दलाल कशाला हवा?

.शुचि. Mon, 20/07/2015 - 21:43

In reply to by आदूबाळ

आदूबाळ होय ही संभावना (शक्यता) च प्रचंड आहे. अन तरीही माझ्यासारख्या काही लोकांना पुस्तक हातात धरुन्,पाने चाळत पुस्तक वाचनाचा पारंपारीक आनंद मनस्वी आवडत असेलही. अर्थात माझ्या पीढीनंतर तो वाचकवर्ग १००% कालबाह्य होणार आहे, हे दिसतेच आहे.

आदूबाळ Mon, 20/07/2015 - 22:11

In reply to by .शुचि.

हम्म. मलापण पुस्तक हातात धरून वाचण्याचा वगैरे पारंपारिक आनंद आवडतो. पण किमतीतला फरक, कागदी पुस्तकं सांभाळण्याची उस्तवार, अडणारी जागा वगैरे लक्षात घेता ईबुकं बरी पडतात.

माझ्या नळीटेशनच्या रस्त्यावरच्या एका घरातल्या लोकांनाही हाच पारंपारिक आनंद आवडत असावा आणि जागा कमी पडत असावी. दर गुरुवारी कचरा बाहेर ठेवायचा असतो. त्या कचरापेटीच्या डोक्यावर दोन-तीन कागदी पुस्तकं नक्की असतात! मी दर गुरुवारी नेहेमीच्या वेळेआधी पाच मिनिटं निघून माझ्याच बा० चा मा० असल्यासारखी ती पुस्तकं चाळतो, आणि आवडलं तर सरळ उचलून घेऊन जातो!

.शुचि. Mon, 20/07/2015 - 22:19

In reply to by आदूबाळ

मी दर गुरुवारी नेहेमीच्या वेळेआधी पाच मिनिटं निघून माझ्याच बा० चा मा० असल्यासारखी ती पुस्तकं चाळतो, आणि आवडलं तर सरळ उचलून घेऊन जातो!

वावा! कीप इट अप.
.
आय आय टीत मी हॉस्टेलच्या ग्रंथालयाचं काम काही महीने सांभाळलेलं. तेव्हा मला "शॉर्ट स्टोरीज - गाय द मोपासा" हे पुस्तक विलक्षण आवडलेलं. म्हणजे आता आपण ग्लोबली कनेक्ट होऊन अपरिमीत रोचक लेख्/कथा/कविता वाचतो पण तेव्हा हे एक्स्पोजर नव्हतं त्यातून हाती लागलेलं ते पुस्तकच बे-फा-म आवड्लेलं होतं. क्वचित विचार यायचा आपणच ग्रंथालय सेक्रेटरी आहोत ढापावं तेजायला.
.
अर्थात चोरलं नाही पण त्या प्रचंड मोहावर मात केलेली आठवते.

* हा प्रसंग असाच आठवला. तुम्ही चोरी करता असा आशय या प्रसंगात नाही. प्लीज तसं वाटूनही घेऊ नका.
.
पुस्तकं ही मिळतील तेथून वाचावी + आपली पुस्तके सत्पात्री दान करावीत

बॅटमॅन Mon, 20/07/2015 - 23:08

In reply to by आदूबाळ

मी दर गुरुवारी नेहेमीच्या वेळेआधी पाच मिनिटं निघून माझ्याच बा० चा मा० असल्यासारखी ती पुस्तकं चाळतो, आणि आवडलं तर सरळ उचलून घेऊन जातो!

लकी यू!!!!!

अतिशहाणा Tue, 21/07/2015 - 19:09

In reply to by आदूबाळ

अमेझॉन अ‍ॅक्सेसेबिलिटी विकतं यात केवळ पुस्तकाचा अ‍ॅक्सेस इतकीच मर्यादित सेवा नाही. पुस्तकाच्या अ‍ॅक्सेससोबत डिजिटर राईट्स मॅनेजमेंटची सोय, वाचक आणि लेखक यांना एकत्र आणणारं मार्केटप्लेस, ग्रंथालयं किंवा तत्सम ठिकाणी ओवरड्राईव सारख्या माध्यमातून इ-पुस्तकांची सेवा, ई पुस्तकं एकमेकांना उधार देण्याची सोय असं बरंचसं इन्फ्रास्ट्रक्चर परवडेल अशा भावात अमेझॉननं उभं केलं आहे.

अमेझॉन (वा गूगल बुक्स, अॅडोबी इ.) ला वळसा घालून लेखकाने थेट वाचकालाच पुस्तक द्यायचं असं ठरवलं तर लेखक आणि वाचक एकमेकांना सहज शोधू शकतील अशी दुसरी सोय लेखकाला करायला हवी. उदा. सध्या अमेझॉनमध्ये 'राजेश घासकडवी' असं शोधलं तर सोबतच्या रेकमेंडेशनमध्ये 'नगरीनिरंजन'ही येण्याची बरीच शक्यता आहे. गूगलसारख्या सर्चइंजिनपेक्षा मार्केटप्लेसमधले सर्चेस खूपच रिलीवंट आहेत.
लेखक आदूबाळ आणि वाचक बॅटमॅन एकमेकांना ओळखत आहेत असे गृहित धरले तरी आदूबाळ यांनी बॅटमॅन यांना 'विकलेले' इ पुस्तक, बॅटमॅन हळूच दुसऱ्या कुणाला विकणार नाहीत याची सोय आदूबाळ यांना स्वतः करावी लागेल.

आदूबाळ Tue, 21/07/2015 - 19:32

In reply to by अतिशहाणा

अगदी बरोबर.

हेच मार्केटप्लेसचं काम गुडरीड्ससारखी संस्थळं फुकट करत आहेत.

डिजिटल राईट्स मॅनेजमेंट &/ पायरसी प्रतिबंध हे अ‍ॅमेझॉनच नीटसं करू शकलेले नाहीयेत. (कित्येक डीआरएम युक्त/मुक्त पायरेटेड किंडल पुस्तकं डाऊनलोडायला मिळतात. किंडलवरचं नेटवर्क बंद ठेवलं की झालं.) पण तरी त्यातल्या त्यात बरं आहे.

हे सोपं होईल तेव्हा अ‍ॅमेझॉनचा धंदा बसायला मोठी चालना मिळेल.

गब्बर सिंग Tue, 21/07/2015 - 22:17

In reply to by आदूबाळ


स्पर्धकाला खाऊन टाकायचा प्रयत्न?

खरंतर गुडरीड्स हा अ‍ॅमेझॉन चा स्पर्धक नाही.

पण स्पर्धक मानलाच तर - कॉस्ट्स कमी करून कस्टमर चा व्/वा इन्व्हेस्टर्स चा फायदा करून द्यायचा यत्न.

अतिशहाणा Tue, 21/07/2015 - 21:36

In reply to by आदूबाळ

माझा मुद्दा अमेझॉन केंद्रित नाही. लेखकाने वाचकाला थेट पुस्तकं पुरवणे या मॉडेलमध्ये आर्थिक व्यवहाराची सोय किंवा पायरसी अशा अडचणी आहेत. अमेझॉन / गूगल बुक्स व तत्सम सेवा या अडचणी सोडवताहेत. नवीन बिझनेस मॉडेल सुरु होईल तेव्हा या कंपन्यांना त्याचा फायदा घेण्याइतपत चुणूक नक्कीच लागली असेल.

हे सोपं होईल तेव्हा अ‍ॅमेझॉनचा धंदा बसायला मोठी चालना मिळेल.

अॅमेझॉनवर नक्की राग का बॉ? ;) अॅमेझॉनने क्लाऊड-मोबाईल सर्विसेस इ. मध्ये स्वतःच प्रचंड साम्राज्य उभं केलंय. आपल्याला तर आवडते बॉ ही कंपनी.

अतिशहाणा Tue, 21/07/2015 - 22:40

In reply to by आदूबाळ

प्राईम डे बराच फ्लॉप गेलाय. पण ऑनलाईन रिटेल कन्झ्युमर बिझनेस सोडला तर अमेझॉन वेब सर्विसेस हा अत्यंत उत्तम प्रॉडक्ट आहे. गूगलला टक्कर देणारी तशी दुसरी समर्थ कंपनी दिसत नाही. अॅमेझॉनशी तुलना केली तर अॅपल निव्वळ ज्वेलरी कंपनी वाटते.

उदय. Wed, 22/07/2015 - 00:34

In reply to by आदूबाळ

गुडरीड्स हे बर्‍याच वर्षांपूर्वी अ‍ॅमॅझॉनने विकत घेतले. सध्या त्याच तोडीची एकच साईट मला माहीत आहे ती म्हणजे LibraryThing. (पण माझा तिच्यावर पण १००% विश्वास नाही कारण त्यांची ४०% मालकी AbeBooks कडे आहे, जी स्वतः अ‍ॅमॅझॉनची कंपनी आहे). रिव्हू लिहिणार्‍या कंपन्या विकत घेऊन आपले बस्तान मजबूत करण्याचा खेळ अ‍ॅमॅझॉन बरीच वर्षे खेळत आहे.

ई-पुस्तके वाचायला सोयीस्कर आहेत, असा मतप्रवाह असला तरी मला कागदी पुस्तकेच अधिक आवडतात.
With printed books,
■You can buy one with cash, anonymously.
■Then you own it.
■You are not required to sign a license that restricts your use of it.
■The format is known, and no proprietary technology is needed to read the book.
■You can give, lend or sell the book to another.
■You can, physically, scan and copy the book, and it's sometimes lawful under copyright.
■Nobody has the power to destroy your book.

Contrast that with Amazon e-books (fairly typical):
■Amazon requires users to identify themselves to get an e-book.
■In some countries, including the US, Amazon says the user cannot own the e-book.
■Amazon requires the user to accept a restrictive license on use of the e-book.
■The format is secret, and only proprietary user-restricting software can read it at all.
■An ersatz “lending” is allowed for some books, for a limited time, but only by specifying by name another user of the same system. No giving or selling.
■To copy the e-book is impossible due to Digital Restrictions Management in the player and prohibited by the license, which is more restrictive than copyright law.
■Amazon can remotely delete the e-book using a back door. It used this back door in 2009 to delete thousands of copies of George Orwell's 1984.

यासंदर्भात "राईट टू रीड" हा लेखपण जरूर वाचावा.

मेघना भुस्कुटे Wed, 22/07/2015 - 07:14

In reply to by उदय.

हे सगळं ठीक आहे. पण इथे कुणीच फुकट, बेकायदेशीरपणे पुस्तकं उतरवून घेत नाही का? त्या पुस्तकांच्या बाबतीत amazon किंवा तत्सम कंपनी कुणाचं काय वाकडं करू शकते? माझ्यासारखे लोक नाहीत का जगात फार? किंडलवरचं कायदेशीर पुस्तक आणि असं ढापून वाचलेलं पुस्तक यांच्यात नक्की काय नि किती फरक असतो?

उदय. Wed, 22/07/2015 - 00:41

In reply to by .शुचि.

बार्न्स & नोबल्स मध्ये पुस्तक व्यवस्थित चाळून, नंतर bn.com वरूनच विकत घ्यायचे म्हणजे गिल्टी वाटायला नको. मी अ‍ॅमॅझॉनवर ऋण श्रेणीचे रिव्हू वाचून bn.com वरून पुस्तके विकत घेतो कारण बार्न्स & नोबल्स बंद पडू नये, असे मला वाटते.
मी शक्यतो ई-बुक्स वाचत नाही. अगदीच दुर्मिळ असेल किंवा खूप महाग असेल + लायब्ररीतपण मिळत नसेल, तरच वाचतो. त्यातही DRM असेल तर वाचत नाही.

उडन खटोला Tue, 21/07/2015 - 05:04

काही दिवसापूर्वी सागरिका घोष नामक पत्रकार महिलेने असे ट्वीट केले होते की, “पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही “. या बाई व अन्य अनेक तथाकथित “ धर्मनिरपेक्ष सेक्युलर इत्यादि इत्यादि “ पत्रकार व मीडिया मुघल्स यांचीदेखील विचारसरणी व वर्तन पाहता ह्या मंडळींना भारतीय म्हणावे का? व ही मंडळी नक्की भारताच्या भल्यासाठी काम करत असावेत की परकीय अथवा देशविघातक शक्तींच्या अजेंड्याचे समर्थन करण्यासाठी? असा प्रश्न पडतो!

भाजपाप्रणीत केंद्र सरकार अन विविध राज्यातील भाजप सरकारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पराकोटीचा द्वेष करत सतत कुठलीतरी खुसपटे काढून त्रास देण्याचा प्रयत्न करणे , संघपरिवार आणि अन्य उजव्या विचारांच्या संस्थांना बदनाम करण्याची कारस्थाने करणे , मीडियातून सरकार भ्रष्ट आणि निष्क्रिय असल्याचे खोटे चित्र सतत उभे करणे असे अनेक उद्योग ही मंडळी करत असतातच ,पण भारतीय सैन्यदल आणि प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी यांच्यावरही यां मंडळींचा डोळा असतो . यांना पैशाचा पुरवठा नक्की कुठून होतो? देशविघातक शक्ती तर अशा मीडिया हाऊसेस ना अप्रत्यक्ष रीत्या कंट्रोल करत नाहीत ना? असा दाट संशय येतो.

असा प्रकार यापूर्वी कथित “पर्यावरणारक्षक” एनजीओज बद्दल झालेला आहे . जगातील भारतद्वेष्ट्या संस्था आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीस खीळ घालू पाहणार्यान मंडळींनी अशा “पर्यावरणारक्षक” एनजीओज ना छुपे फंडिंग करत पर्यावरणाचे बाहुले उभे करून उद्योगधंद्याना व विशेषत: पॉवर प्रोजेक्टस ना अडचणी आणल्या होत्या . तसाच प्रकार मीडिया च्या बाबतीत होत आहे का ? आज किंवा उद्या प्रत्यक्ष युद्ध झाले ,तर मीडिया ची भूमिका नक्की काय असेल ? व त्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात ? अशा अनेक शन्का मनात दाटून आल्या .कारण आजकाल “मीडिया म्हणजे उपाय कमी अन अपाय जास्त” अशी स्थिती सध्या दिसत आहे . म्हणून हा लेखनप्रपंच!

जाणकारांनी आपली मते अवश्य मांडावीत !

पिवळा डांबिस Mon, 20/07/2015 - 23:53

In reply to by उडन खटोला

“पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही

कुणीच देशभक्त असले पाहिजे असा काही नियम नाही, ती एक अपेक्षा असते...
ज्यांना ते मान्य नसेल तर ठीक, पण त्यांनीही मग इतर जनांनी त्यांना देशद्रोही/ गद्दार म्हणून वागवल्यास राग/वाईट वाटून घेऊ नये!!

कोण ती चिमूटभर सागरिका घोष, आणि तिच्या म्हणण्याला का इतकं महत्व देऊन तिला उगाच फुकटची प्रसिद्धी द्यायची?
उसकेभी पापी पेटका सवाल है ना!!
आपण 'गच्छ सूकरं..' असं म्हणायचं!!

हे म्हणजे,

आज किंवा उद्या प्रत्यक्ष युद्ध झाले ,तर मीडिया ची भूमिका नक्की काय असेल ?

युद्ध नक्की कुणाशी होणार आहे? "उडन खटोला काही कारण नसतांना युद्धाची भाषा वापरून देशभर युद्धखोर वातावरण निर्माण करत आहेत!!"
असं म्हणण्यापैकी आहे!! :)

पिवळा डांबिस Tue, 21/07/2015 - 10:11

In reply to by गब्बर सिंग

चिमुटभर च्या ऐवजी क्युट हा शब्द जास्त उचि.....

आम्हाला कोणशीशी ती सागरिका घोष म्हायती नव्हती...
तुम्ही तिला क्यूट म्हंटल्यामुळे मुद्दाम तिला गुग्गलून पाह्यली...
आम्हाला काय ती क्यूट वगैरे वाटली नाय,
पण अर्थातच तुम्हाला ती क्यूट वाटायला आमची कायबी हरकत नाय!!!!
:)
व्यक्ति तितक्या प्रकृती, काय!!!!

अस्वल Tue, 21/07/2015 - 00:01

In reply to by उडन खटोला

तुम्ही स्वतःच्याच धाग्यावर ज्या दिवशी प्रतिक्रिया द्याल, तेव्हाच ह्या खंडप्राय देशावर आलेलं संकट टळेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/07/2015 - 00:03

In reply to by उडन खटोला

“मीडिया म्हणजे उपाय कमी अन अपाय जास्त” अशी स्थिती सध्या दिसत आहे

धागा वाचून मलाही हेच म्हणावंसं वाटतंय.

बस कर पगले, अब रुलायेगा क्या!

राजेश घासकडवी Tue, 21/07/2015 - 00:12

In reply to by उडन खटोला

'ऐसी अक्षरे'ला मीडिया समजावं का? त्यावर येणाऱ्या भडक लेखांमुळे उपाय कमी अपाय जास्त अशी परिस्थिती निर्माण होते का? काही मीडिया हाउसेस अंबानी वगैरेंसारख्या बिझनेसधार्जिण्या लोकांकडे आहेत ना, मग काळजी करायचं कारण काय? असे अनेक प्रश्न मनात तरळून गेले.

गब्बर सिंग Tue, 21/07/2015 - 02:11

In reply to by उडन खटोला

यांना पैशाचा पुरवठा नक्की कुठून होतो? देशविघातक शक्ती तर अशा मीडिया हाऊसेस ना अप्रत्यक्ष रीत्या कंट्रोल करत नाहीत ना? असा दाट संशय येतो.

पैशाचा पुरवठा नक्की कुठून होतो

तुमच्या हातात आहे मिडियाचे व पर्यायाने देशाचे भवितव्य सुद्धा. NDTV, Zee, Sahara यासारख्या मिडिया चॅनल्स चे शेअर्स विकत घ्यायचे आणि या मिडिया चॅनल्स ना होणारा पैशाचा पुरवठा नियंत्रित करायचा. अर्थात या यादीत प्रत्येक बडे चॅनल नाही हे माहीती आहेच. पण जे तुमच्या हातात आहे ते तरी तुम्ही ....

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/07/2015 - 03:30

In reply to by गब्बर सिंग

गब्बरच्या "फडतूस" विधानांशी सहमती दाखवायची वेळ येईल असा विचार मी कधी केला नव्हता. पण आलीच ती वेळ.

अजो१२३ Tue, 21/07/2015 - 12:12

In reply to by उडन खटोला

काही दिवसापूर्वी सागरिका घोष नामक पत्रकार महिलेने असे ट्वीट केले होते की, “पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही.

स्वप्रसृत मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक विचारसरणीच्या लोकांचा एक मोठा लोचा आहे. त्यांचेमते नियम म्हणजे बहुतेक विज्ञानाचे नियम असे अभिप्रेत असावे.
एका समूहात काही गोष्टींचा अलिखित करार असतो. त्याचे पालन करणे नैतिक आहे. आपल्या देशाच्या बाजूने नसणे कराराचा भंग आहे. अशा करारभंगाचा भावनिकतेपलिकडे परिणाम नसावा अशी अपेक्षा करू या.

adam Tue, 21/07/2015 - 12:19

In reply to by अजो१२३

criticizing my nation's policy doesn't make me antinational.
Sense of "crime against humanity " should supercede so-called patriotism.
imagine a German person in 1940 challenging Nazi regime or an American challenging Vietnam war; these people would've got labelled as anti-national.
In reality, they were anti-govt, but nt exactly anti-national.
things are complicated. Even more complicated to explain.

अवांतर :-
तुम्हाला निरर्थक श्रेणी मी दिलेली नाही.

अजो१२३ Tue, 21/07/2015 - 12:34

In reply to by adam

In the way there are criminal physical persons, there are criminal nations.
कोणतेही उदाहरण मांडताना प्रामुख्याने अपवाद डोळ्यासमोर ठेऊ नयेत.

गब्बर सिंग Tue, 21/07/2015 - 12:47

In reply to by अजो१२३

कोणतेही उदाहरण मांडताना प्रामुख्याने अपवाद डोळ्यासमोर ठेऊ नयेत.

मुद्दा एकदम उचित आहे अजो.

पण जालावर नेमकी हीच बाब उचलून एखादा अपवाद मांडून - "तुम्ही मका अपवादात्मक मुद्दा कन्सिडर केलेला नैय्ये व म्हणून तुमचे म्हणणे एककल्ली, अनभ्यस्त, अनवॉरंटेड अझम्शन्स करणारे आहे" असा प्रतिवाद होतो.

अजो१२३ Tue, 21/07/2015 - 14:02

In reply to by अजो१२३

मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक

अशा लोकांच्या आत्मश्रेष्ठत्वाचा भाव इतका जबरदस्त असतो कि त्यांच्यात काही उणिव, लोचा आहे असे विधानही त्यांना सहन होत नाही. कट्टर धार्मिकांशी यात त्यांचे साम्य आढळून येते.

नितिन थत्ते Tue, 21/07/2015 - 21:10

In reply to by उडन खटोला

>>मीडियातून सरकार भ्रष्ट आणि निष्क्रिय असल्याचे खोटे चित्र सतत उभे करणे

मे २०१४ पूर्वी जे सरकार होते ते सरकार भ्रष्ट आहे आणि निष्क्रीय आहे असा लोकांचा ग्रह झाला आणि त्यामुळे ते सरकार सत्ता गमावून बसले. ते सरकार भ्रष्ट असल्याची माहिती (उदा. राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनावेळी २० रुपयाचे टोयलेट पेपर काहीशे रुपयांना विकत घेतले गेले, २जीच्या वाटपात १.७६ लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू लॉस झाला असे कॅगने अहवालात म्हटले इत्यादि गोष्टी) किंवा सरकार निष्क्रीय असल्याची माहिती (उदा. अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होत आहे, अनेक प्रकल्प मंजूरीविना अडकून पडले आहेत इत्यादि गोष्टी) लोकांना अंतर्ज्ञानाने समजल्या की मीडियाने प्रसिद्ध केल्यामुळे माहिती झाल्या?

मीडिया त्याहीवेळी सरकारविरोधातील बातम्या देत होती आताही देत आहे. तेव्हाच्या बातम्या ही "मीडियाची जागरूकता" आणि आताच्या बातम्या ही "मीडियाची खुसपटे" अशी व्याख्या असली तर क्लिअर करून टाका.

अनुप ढेरे Tue, 21/07/2015 - 21:39

In reply to by नितिन थत्ते

बाकी प्रतिसादाशी सहमत आहे पण २जी मध्ये केवळ रेव्हेन्यु लॉस हा गैरव्यवहार नव्हता. राजानी काही कंपन्यांना दिलेला फेव्हर, एअरसेल मॅक्सिस डील हेही प्रकार होते. जर विशिष्ट कंपन्यांना फेव्हर न करता नुस्तच ऑक्शन ऐवजी फष्ट कम फश्ट सर्व अस केलं असतं तर एव्हढा गाजावाजा नसता झाला.

नितिन थत्ते Tue, 21/07/2015 - 22:20

In reply to by अनुप ढेरे

येस राइट.... पण या गोष्टी लोकांना मीडियातूनच कळल्या ना?

मीडियाने त्या झाकून नव्हत्या ना ठेवल्या? सध्या भक्तांमध्ये सगळा मीडिया हा काँग्रेसधार्जिणा आणि मोदी विरोधी आहे असे म्हणण्याची फ्याशन आहे. म्हणून मी आधीच्या गोष्टी (याच) मीडियातूनच कळल्या होत्या हे दाखवले.