तुम्ही काय कराल?

ही बातमी वाचली.
http://www.livemint.com/Politics/NHfg6BONdAluTYEizdJMhJ/Vijay-Mallya-sub...

विजय मल्या यांच्यावर ९०००कोटींच कर्ज आहे. ( अ‍ॅक्चुअली कर्ज किंगफिशर एअरलाइन्सवर होतं ज्याला मल्यांनी पर्सनल ग्यारंटी दिली होती.) त्यापैकी ते चार महिन्यात ४००० कोटी देतो असं म्हणाले. अजून २००० कोटी एक वेगळी केस जिंकले तर देतो म्हणाले. समजा तुम्ही बॅ़केचे चालक/मालक आहात. त्यांच्या या पेयमेंट बदल्यात त्यांच्यावरची कर्जवसुलीची कारवाई थांबवा असं समजा मल्या म्हणाले तर तुम्ही काय कराल? जे मिळतय ते घेऊयात असं म्हणून उरलेल्या २/३००० कोटीवर पाणी सोडाल का सगळेच्या सगळे व्याजासकट हवेत म्हणून पुढची काही वर्ष कोर्ट कचेर्‍या करत बसाल?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

ते चार महिन्यात ४००० कोटी देतो असं म्हणाले

खो खो खो खो..

जे मिळतय ते घेऊयात असं म्हणून

काही विनोद खूपच करुण असतात. हसता हसता डोळ्यात पाणी येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर नऊपैकी सहा मिळाले असते तर ताबडतोब घेऊन मल्ल्याला पर्सनल ग्यारेंटीमधून मुक्त केलं असतं. एनपीएपैकी सहासष्ट टक्के सुटणं ही मोठी अचिव्हमेंट आहे.

बाकीच्या तीनसाठी कंपनीवर चालू असलेली न्यायालयीन कारवाई चालू ठेवली असती. विशेषतः किंगफिशर ब्रँड इम्पाउंड करून ठेवला असता, जेणेकरून मल्ल्या तो वापरूही शकणार नाही अन विकूही शकणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जेणेकरून मल्ल्या तो वापरूही शकणार नाही अन विकूही शकणार नाही.

लिक्विड ऑक्सिजनमध्ये टाकणार म्हणा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Lol

--------------

थोडं टेक्निकल स्पष्टीकरण.

बँकेचे ९००० कोटी रुपये अडकलेले आहेत. सध्याचा रिव्हर्स रेपो रेट ५.७५% आहे. म्हणजे बँकेने हे पैसे रिझर्व बँकेकडे ठेव म्हणून ठेवले तर त्यांना ५.७५% व्याज मिळेल. (पब्लिकला कर्ज दिलं तर जास्तही मिळेल, पण कन्झर्वेटिव्ह बेसिसवर ५.७५% धरूया.)

थोडक्यात, मल्ल्यामुळे बँकेला द सा द शे ५.७५ चा बुक्का बसतो आहे (अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ कॅपिटल). बँकेला भविष्यात ९००० कोटी मिळाले, तरी त्यांनी त्यावर ५.७५% घालवलेले आहेत. पर्यायाने, आठव्या वर्षी (सात वर्षं पूर्ण झाल्यावर) मिळालेले ९००० कोटी आजच्या ६००० कोटींच्या समान असतील. त्यापेक्षा आजच ६००० कोटी मिळवणं चांगलं! (बर्ड इन हँड तत्त्व)

पुन्हा, या सात वर्षांत काहीही होऊ शकतं. सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेची प्रतिमा खालावून फिच वगैरेसारख्या एजन्स्या बँकेचं क्रेडिट रेटिंग खालावू शकतात. याचा परिणाम ठेवी इ. वर होऊ शकतो.

म्हणून आत्ता ६ह कोटी घेणं चांगलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रेझेंट व्हॅल्यू आणि अ‍ॅक्युम्युलेशनचा मुद्दा बरोबरे, पण जुनं कर्जच जर ९००० कोटींचं आहे तर त्याची आजची व्हॅल्यू अजून राक्षसी असणार. तरी सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः हे सूत्रही आहेच म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत आहे. आजपर्यंत झालं गेलं गंगेला मिळालं, उर्फ संक कॉस्ट्स आर इर्रिलेव्हंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>आजपर्यंत झालं गेलं गंगेला मिळालं,

अशा जुन्या पुराण्या घिस्यापिट्या प्रतिगामी समजुतींमुळेच गंगेची अवस्था गंभीर झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम तेरी गंगा (उगाचच नै) मैली!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः

हेच आठवत होतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून २००० कोटी एक वेगळी केस जिंकले तर देतो म्हणाले. समजा तुम्ही बॅ़केचे चालक/मालक आहात. त्यांच्या या पेयमेंट बदल्यात त्यांच्यावरची कर्जवसुलीची कारवाई थांबवा असं समजा मल्या म्हणाले तर तुम्ही काय कराल?

नाही जिंकले तर काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आबांचे प्रतिसाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.