अशक्य हेडलाइन्स - १
वर्तमानपत्रात आलेल्या ज्या हेडलाइन्स वाचून हसू येते त्यांना इथे संकलित करु शकता. एखाद्या बातमीत वर्णन केलेली विनोदी घटना देखील शेअर करू शकता.
टीप: पॉलिटिकल हेडलाइन्स शक्यतो टाळाव्यात. हलका-फुलका धागा आहे.
वर्तमानपत्रात आलेल्या ज्या हेडलाइन्स वाचून हसू येते त्यांना इथे संकलित करु शकता. एखाद्या बातमीत वर्णन केलेली विनोदी घटना देखील शेअर करू शकता.
टीप: पॉलिटिकल हेडलाइन्स शक्यतो टाळाव्यात. हलका-फुलका धागा आहे.
प्रतिक्रिया
न्यायालयात पुराव्यासाठी
एखादे उदाहरण द्या की प्रणव
एखादे उदाहरण द्या की प्रणव सेठ. मला एकतर फ्रष्ट्रेशन तरी येते किंवा हसु येते. फ्रष्ट्रेशनयुक्त हसु कधी येते?
दिले दिले..
दिले दिले..
बादवे नुसत्या हसू येणाऱ्या पण चालतील.
हे बघा हनिमूनसाठी जाणाऱया
हे बघा
हनिमूनसाठी जाणाऱया जोडप्यांमुळेच केदारनाथला महापूर- शंकराचार्य -
http://www.loksatta.com/desh-videsh-news/swaroopanand-saraswati-now-says...
+१
+१
एकदा नवाकाळ मध्ये हेडलाइन
एकदा नवाकाळ मध्ये हेडलाइन होती" कालच्या जोरदार वादळात तीनशे वक्ष उन्मळून पडले" .स्पेलींग मिश्टेकमुळे होत्याचा नव्हता अर्थ निघाला.
™ ग्रेटथिंकर™
लॉल, तिसऱ्या वेळेस 'बरोबर'
लॉल, तिसऱ्या वेळेस 'बरोबर' वाचलं.
मी देखील तीनदा वाचले तेव्हा
मी देखील तीनदा वाचले तेव्हा मेख दिसली!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लॉल
तुमच्या 'लॉल'मुळे धक्का बसून पुन्हा वाचलं तेव्हा कळलं. त्यामुळे मला दोनदाच वाचावं लागलं.
कालच्या जोरदार वादळात
ह्यात अशक्य हेडलाईन ती काय ?
अहो जिथे जोरदार वादळात वृक्ष उन्मळून पडू शकतात तिथे तीनशे वक्ष उन्मळून पडणे अशक्य खचितच नसावे.
तुम्ही खाडीलकरांच्या अलंकारीक भाषेला नीट जाणलेले दिसत नाही. "कालच्या जोरदार वादळात दिडशे माणसे पडली" असे त्यांना म्हणायचे होते.
काय म्हणता ?
पानिपत
मला तर पानिपताची आठवण झाली. किती मोत्यें गळालीं, चिल्लर खुर्दा किती उडाला वगैरे.
मुले बिघडतात म्हणून टीव्ही
मुले बिघडतात म्हणून टीव्ही फोडले
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हाहा, बिघडल्यावर मुलांना
टीव्ही बिघडल्यावर मुलांना फोडतील काय
डिटेल्स तर अजूनच भारी
डिटेल्स तर अजूनच भारी आहेत!
कापूस संशोधन केंद्रच का बरं निवडलं
संशोधन तर करत नसतील?
कापसावर टीव्ही आपटला तर फुटतो का, याबद्दल टीव्ही आणि/किंवा कापूस कंपन्यांना संशोधन करायचं असेल. (कापूस कंपन्या? बरं, बरं!)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमच्य सातारा गावातील एक भन्नाट जाहिरात.
सातारा गावात आमच्या शाळेच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिंतभर रंगवलेली एक जाहिरात होती, ती वाचून आम्ही येताजाता हसत असू.
'पर्गोलॅक्स - गोड जुलाबाच्या गोळ्या.'
एका रसवंतीगृहावरची - उसाचा रस - पाटी.
'देशबंधूंनो विचार करा - चहापेक्षा रस बरा!'
'उषाचा रस' असं लिहिलेल्या
'उषाचा रस' असं लिहिलेल्या पाटीचा फटू व्हाट्सापावर फिरत होता काही महिन्यांपूर्वी.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
____ ___ _____ ___
____
___
_____
___