स्वातंत्र्याचा आकांत
काल जरा दाराशी उघड्झाप झाली
तुरुंगाच्या खिडकीतून निरभ्र आकाश दिसाव
तसं मला दिसलं बाहेरच जग
वाटलं याव एक चक्कर टाकून मोकळा श्वास घेऊन
पण किती धावाधाव केली तरी अंधाराचा रस्ता संपेना
चकवा लागल्यासारखा फिरत राहिलो तुरुंगात
शेवटी थकून बसून राहिलो प्रकाशाच्या एका किरणाची वाट बघत
एक दिवस पुन्हा दाराशी हालचाल जाणवली
मी दबा धरून बसून होतो
अखेर तो क्षण आला, लख्ख प्रकाश होता,
हवेत छान गारवा होता
तडक बाहेर पडलो आता सगळं जग माझं होतं
इथून तिथे पसरलेल्या अस्ताव्यस्त साम्राज्याचा मी आता सम्राट झालो होतो
पण सगळ्या शांततेला भेदुन एक किंकाळी विरली
काहीतरी पळत होतं ओरडत होतं भूत पाहिल्या सारखं
आता त्याने शस्त्र ही काढले होते, केसाळ केसाळ टोचंनार
त्याच्या एका स्पर्शाने अंगाची लाही लाही होत होती
लपतछपत मी जिवाच्या आकांताने पळत होतो
माझा आक्रोश कुणाला ऐकू जाण शक्य नव्हतं
कारण कानठल्या बसवणार्या आवाजात एकचं चित्कार ऐकू येतं होता
"मार मार ते झुरळ"
प्रतिक्रिया
__/\__
__/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरे काय हे ..सुरुवातीला एकदम
अरे काय हे ..सुरुवातीला एकदम गंभीरपणे वाचत होते . Twist जबरी आहे
:ड
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काहीतरी पळत होतं ओरडत होतं
इथे खूप हसले.
मस्त. अशक्य हसलेय.
मस्त. अशक्य हसलेय.
(No subject)
झुरळारून अस्वलाची आठवण आली.
झुरळारून अस्वलाची आठवण आली. कुठे आहे अस्वल?
!!!
अश्लील!!!!!!
जाम आवडली.
जाम आवडली.