श्यामसुंदर मुळे सरांचा शब्द-मेध यज्ञ
थेट रात्रीचे नऊ वाजता
हजारएक हात इमेल बघायला स्तब्ध असताना मुळे सर
पोतडीतून आज मारायचा विजयी शब्द काढतात
प्रमाथी,दुरंत,अक्षुण्ण
किंवा ग्रामीणपणे
यंग्राट,अत्रंग,आडभंग
एक मिनिटात अर्थ सांगणे दूरच,मात्र
काही स्त्रिया त्यांच्या काही शब्दांनी कामोत्तेजित होतात
व सर्व पुरुष खजील, असे मानले जाते.
शब्द-घोडा दुबईतील इंजिनियर,अमेरिकेतील
संगणक-अभियंते, दिल्लीतील भाग्यनियंते,
लंडन-मधील वेटर्स पर्यंत जाऊन न मरता
परत येतो,
एक मिनिटात सर पुढची इमेल पाठवितात: 'हात रांडेच्च्यो"
कॉम्प्युटर बंद करतात,
आणि विजयी मुद्रेने आपल्या वांगणी (चोराची) या गावी
झोपी जातात.
उद्याचा घोडा
मनात
हळूहळू
आकार घेऊ लागतो.
(आधारित).
प्रतिक्रिया
ही कविता फेसबुकवरील थोर्थोर
ही कविता फेसबुकवरील थोर्थोर मानस-माय-बापांवर आहे का ज्यांच्यावरती लाइक्स चा वर्षाव पडतो आणि जे लोक वादग्रस्त किंवा जडव्यागळ बोलून, आपल्या सनसनाटी वक्तव्यांनी सतत प्रसिद्धीत राहून, मार्क झुकेरबर्गच्या बिझनेस वेन्चर चे(फेसबुकचे) हित साधण्यास कटिबद्ध असतात?
लोल! एक नंबर लिहिता राव
लोल!
एक नंबर लिहिता राव तुम्ही...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तुमच्या सर्वच कविता जबरी आहेत
ही कविता कशावर आधारीत आहे. पण पहील्या वाचनात मला ही अरनब गोस्वामी वरील वाटली.
रोज एक नवा एखादा जबरी इंग्रजी शब्द विशेषण तो डिबेट मध्ये टाकत असतो.
तुमचा श्यामसुंदर मला अरनब गोस्वामी शी मिळताजुळता वाटला
रोज एक शब्द बॉम्ब
नवा कोरा
मी तर फेसबुकवरही नाहीये. पण
मी तर फेसबुकवरही नाहीये. पण मिपावरील या कवितेखाली प्रतिसाद वाचले होते. त्यावरुन तशा अर्थाचा, पण रंगवुन प्रतिसाद दिलेला
एक नंबर कविता!!!!
एक नंबर कविता!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं