रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
रात्र कापीत बाहेर पडलो नव्या पहाटेकडे
कळंबोली नाक्यापाशी ट्रक आमचा अडे
वडा पाव, अंडा बुर्जी आधी खाऊन टाका
आणि मग भागवू चला बाकीच्याही भुका!
रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
कळंबोली नाक्यावरती रात्र मारे हाका!
शादीसाठी केंव्हापन आपन तयार हुतो
टरक डायव्हरला पन पोरगी कोण देतो ?
बाप म्हणे तिचा " साला बाईकडे जातो!
आणि मग भxविच्यांना एड्स सुद्धा होतो"
आमची साली जिंदगी रस्ता घाटामधला
जालीम रात्र सरत नाही, ट्रक पुढे ढकला
आमची पण एक दिवस उपरवाला मारेल
एका रात्री मादरxद एड्स आम्हा गाठेल!
नवे युग, नवा यज्ञ, आहुती देऊन टाका
उद्या असेल एड्स पण आज टाळू फाका
रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
कळंबोली नाक्यावरती रात्र मारे हाका!
---
प्रतिक्रिया
सॅड
पण शेवटी 'जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे' हेच खरं!
कविता आवडली...
हे गाणं आठवलं. रच्याकने:
हे गाणं आठवलं.
रच्याकने: तुम्ही लय भारी लिहिता.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जबरदस्त !
जबरदस्त !
प्रोफेशनल हॅझर्डस म्हणावे काय
प्रोफेशनल हॅझर्डस म्हणावे काय या परिस्थितीला?
जबरी लिहिलय!
जबरी लिहिलय!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आवडली!
आवडली!
फडतूसांना...
...गोळ्या घालून मारले पाहिजे.
जबरा!
जबरा!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं