इंद्रधनुष्य

पाउस पडत नसताना
किंवा पाउस पडून गेल्यावर
जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल
त्याच्या मधल्या कालावधीत
सिटी बसने मी प्रवास करत असतो
खिडकीतून बाहेर पाहत राहतो
बाहेर ओली झालेली जमीन
झाडांवरून ठिबकणार पाणी
त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही
आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर
शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला
श्रन्धाजली देणारी ग्राफिटी
कुठल्यातरी stop वर
बस चे automatic दरवाजे उघडतात
ती बस मध्ये येते
अप्रोन घालून
माझ्या बाजूला बसते
आम्ही एकमेकांना नाव न विचारता
बोलायला सुरु करतो
मानसाच डिसेक्शन करताना
कस वाटत यावर बोलतो
ती म्हणते मी इझिली फाडू शकते सगळा
आतडी , फुफ्फुस आणखीन सगळ काही
ती कितीही क्रूर बोलली तरी मला मोहकच वाटते
माझ्या छातीचे डिसेक्शन तिने कराव
आणि तिचा गंध आतमध्ये सामावून ध्यावा
म्हणजे पुन्हा पुन्हा श्वास घ्यावा लागणार नाही
तिचा stop येतो
ती बसच्या पायर्यात उभारून बाय म्हणते
नाहीशी होते एका रस्त्याच्या कडेकडेने चालत
चर्चच्या घंटानादाचा आवाज सामावलेला असतो
पाउस सगळ वातावरण अंधुक करून टाकतो
तिचा गंध
तिचा ब्रेसलेट
तिचे मोठे चोकलेटी डोळे
तिचे सोनेरी केस
तिचा वेल्वेटचा ड्रेस
सगळाच मेमरी मध्ये जमा होत
पावसाला चिरत बस तशीच पुढे चालली आहे
बाजूचे सर्व नाहीस होत
फक्त पाउस आणि पाऊसच शिल्लक
तरल प्रेम
सायकलीच्या pandle ला पाय मारतो तेवढा तरल

सायकल पार्क करून अंधार्या खोलीत
laptop ओपेन करून
सेवड बुकमार्क्स मध्ये
ती खेळत असते
तिच्या सिलीकोन स्तनांबरोबर
दूर दूर कुठल्यातरी देशात
इथेही पाउस असतो तेव्हा रात्रीचा भयानक
फक्त स्क्रीन ची लाईट सुरु
ती तिच्या शरीराचा व्यवहार करते
सेक्स वर्च्यूल आहे
पण ती वर्च्यूल नाही आहे
तिच्या डोळ्यात रिअल भाव आहेत
केसांना हिसडे देत
तिचे मादक हावभाव स्क्रीन व्यापून टाकतात
तिच्या चीत्कारांपुढे
बाकी काहीच एकू येत नाही
पावसाचा आवाज देखील नाही
आत्ता बस मधली ती मुलगी कुठे असेल
मी या स्क्रीनवरच्या बाईच्या प्रेमात पडलोय का?
इंद्रधनुष्य नाहीस झाल का?
रात्री इंद्रधनुष्य तयार होत का?
बस तिच्या हेड्लाइट लावून कुठे गेली असेल?
त्या cartoonist ला गोळ्या का घातल्या?
हि कुठल्या भाषेत बोलेल?
आपण स्क्रीनला भोगतोय का?
निर्जीव झालो आहोत का आपण ?
फक !
स्क्रीन बंद
अंधार
पावसाचा आवाज
lusty प्रेम

स्थळ- France (२०१५)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

अप्रतिम!! निव्वळ सुंदर.
एकाच शरीरात्/मेंदूत नाना तृष्णा आणि व्यक्तीमत्वे नांदू शकतात. व्यक्तीला अनेक डायमेन्शन्स असतात.
पावसाचे रुपक __/\__
या कविच्या कविता वाचायला पाहीजेत.
___
Ile de France हे कविचे नाव दिसत नाही.
मग ही कविता तुमचीच दिसते. आपले लेख्/कविता नेहमीच आवडत आलेले आहेत कारण कामभावनेचे, सेक्सचे अतिसुलभीकरण ते करत नाहीत. तर त्यातील व्यामिश्रता एक्स्पर्टली हाताळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता ज्या ठिकाणी लिहिली त्या जागेच नाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आवड्ली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me