ॐ ऐं र्हीं फट चिकन: स्वाहा!

(माझ्यासह सर्व ब्राम्हणांची क्षमा मागून!)

जर्सीमधला गोरा गडी गरब्यामध्ये नाचे,
जर्सीमधला कृष्णवर्णी भगवद्गीता वाचे,
जर्सीमधला ब्राम्हण मात्र काय करतो पहा,
ॐ ऐं र्हीं क्रीम् चिकन: स्वाहा!

विमानात बसून आला ब्राम्हण इतका दूर,
उतरल्यावर लावला त्याने नवाच आता सूर,
भला मोठा हॅमबर्गर रोज खातो पहा,
ॐ ऐं र्हीं ड्रीम चिकन: स्वाहा!

पुण्यामध्ये इष्टमित्र , नातलगांची गर्दी,
ब्रान्डी सुद्धा वर्ज्य तेथे, झाली जरी सर्दी,
अमेरिकेत आता काय, व्हिस्की मध्ये नहा,
ॐ ऐं र्हीं फट चिकन: स्वाहा!
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मजा आली. अशाच धर्तीवरचा एक लेख मी लिहिला. त्यात चहाबद्दल संस्कृत मध्ये प्रसिद्ध लेखक यशवंत पाठक यांनी मजेशी लिहिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

माझ्यासह सर्व ब्राम्हणांची क्षमा मागून!

थर्डक्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

ब्राह्मणांची क्षमा कशाबद्दल मागितली आहे ते कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब्राह्मणांवर कविता करता तर सडकून झोडा की. क्षमा कसली मागताय.
उलट, तुंदिलतनु ब्राह्मणांनी ब्रा घातली पाहिजे, असा आग्रह धरा म्हणजे त्यांच्याबद्दल एक नवीन व्युत्पत्ती तयार होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मणांची क्षमा कसली मागताय? आमच्यासकट आमचे अनेक जातभाई आजकाल वैदिक परंपरेस अनुसरून मांसाशन करते झाले आहेत.

त्याबद्दल एक रोचक काव्य इथे सापडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उतरल्यावर लावला त्याने नवाच आता सूर,
भला मोठा हॅमबर्गर रोज खातो पहा,
ॐ ऐं र्हीं ड्रीम चिकन: स्वाहा!

पुण्यामध्ये इष्टमित्र , नातलगांची गर्दी,
ब्रान्डी सुद्धा वर्ज्य तेथे, झाली जरी सर्दी,
अमेरिकेत आता काय, व्हिस्की मध्ये नहा,

लेखक पुराण पुरुष असावा १९ व्या शतकातला.

ब्राह्मण हाम्रीकेत जायच्या खुप आधी पासुन "बामणांची मटणाचे भाव वाढवले" असा आरोप होत आला आहे.
पुण्यात ब्रँडी वगैरे वर्ज असणे ५० वर्षापूर्वीच बंद झाले होते. कैच्या काही निरर्थक लिहायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिलिंदजी, या सगळ्यांवरून एकेक कोंबडं ओवाळून टाका पाहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.