संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्तांना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.

प्रेस्टिट्यूट्स, सिक्युलर, विचारजंती, मोदीद्वेष्टे वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.

सुरूवात मी करून देतो. नुकतंच मुस्लिम राष्ट्रीय मंचाने 'गायीच्या शेणामुळे अणुबॉंबचा प्रतिकार करता येऊ शकतो' असं म्हटलं आहे. कदाचित बाटगे अधिक कडवे असतात हे खरं आहेसं दिसतंय.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

जीव घेतला!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गौरक्षकांना आवरायला हवं वेळीच.

गर्दीतला दर्दी

वेळीच??????

म्हणजे, वेळ अजून यायचीच आहे की काय? की आत्ता आली?

बोले तो, त्या मुहंमद अखलाकाला मारले, तेव्हा वेळ नव्हती काय?

की तो मुसलमान होता, नि मुसलमानांनाच मारत होते, तोवर ठीकच होते, पण आता तर हिंदूंनाही मारू लागले आहेत, तेव्हा अबब, तोबा तोबा, असे काही?

छे! वेळ तेव्हा होती. आता आहे तो फक्त प्रघात! आता पायंडा पडलेला आहे, रादर स्वखुशीने पाडून घेतलेला आहे. हे 'अच्छे दिन' यायचेच होते. किंबहुना, यांचिसाठी केला होता अट्टाहास!

('तेव्हा' काहीही न केल्यावर आता केवळ 'आपल्यां'वर उलटू लागले असता कृतिशील होणे हा त्या मुहंमद अखलाकावर - आणि एकंतरीतच 'मुहंमद अखलाक' मंडळींवर - अन्याय तर आहेच, परंतु त्यापेक्षासुद्धा, 'मुहंमद अखलाक' मंडळी ही 'आपली' नव्हेत, या भावनेचे - आणि एका प्रकारे 'टू नेशन थियरी'चे - अधोरेखन आहे. आणि हे जर योग्य वा इष्ट असेल, तर मग पाकिस्तान - भले कितीही भिकारचोट असले तरी - झिंदाबाद!)

बाकी सर्व सहमत... पण फक्त भिकारचोट असलं तरी पाकिस्तान झिंदाबाद अस म्हणता याच कारण काय कळलं नाही. ( मी हे ते मुस्लिम राष्ट्र आहे ,किंवा ते शत्रू वगैरे राष्ट्र आहे म्हणून म्हणत नाहीये , पण पाकिस्तान इतकी धार्मिक , तसेच जातीय असहिष्णुता इतर कुठे नसावी ....म्हणून .. )

पाकिस्तान इतकी धार्मिक , तसेच जातीय असहिष्णुता इतर कुठे नसावी

पाकिस्तान (अ‍ॅज़ इट एक्झिस्ट्स) भिकारचोट आहे, हे आगाऊ मान्य केलेलेच आहे. मुद्दा तो नाही.

मुहंमद अखलाकाच्या वेळेस मूग गिळल्यानंतर आता केवळ हिंदूंना (आणि त्यातही भाजपवाल्यांनासुद्धा) मारू लागल्यावर त्याबद्दल जागे/सक्रिय होणे हे जर योग्य असेल, तर '(या देशात हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत, सबब) उपखंडातल्या मुसलमानांना राहण्याकरिता स्वतंत्र देशाची गरज आहे' या पाकिस्तानमागच्या raison d'etreचे ते अधोरेखन आहे, म्हणून 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हटले, इतकेच.

>>की तो मुसलमान होता, नि मुसलमानांनाच मारत होते, तोवर ठीकच होते, पण आता तर हिंदूंनाही मारू लागले आहेत, तेव्हा अबब, तोबा तोबा, असे काही?

प्रधानसेवकसुद्धा दलितांना मारण्याबद्दलच फक्त बोलले आहेत. इतरांना न मारण्याविषयी त्यांनी काही सांगितलेले नाही.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"मुहंमद अखलाक हा मुसलमान नव्हताच" असा अहवाल येऊ द्या, म्हणजे वरील प्रकारच्या चिल्लर आरोपांमधली सगळी हवाच निघून जाईल असा सल्ला आम्ही संबंधितांना देऊ इच्छितो.

अमित
लिपिक, मूषक निवारण विभाग,
म न पा, पुणे

न. बा. तुम्ही जे म्हणताय ते बरोबरच आहे. फक्त माझ्या म्हणण्याचा तुम्ही विपर्यास केलात. अखलाकच्या वेळीच गौरक्षकांना आवरले पाहिजे हे मला मान्यच आहे. मी लिहिलेल्या वाक्यातल्या 'वेळीच' चा अर्थ अजूनही वेळ गेलेली नाही असा होता. गौरक्षक दिवसेंदिवस जास्तीच आक्रमक आणि हिंसक होत चाललेत. जे चिंताजनक आहे.
' गौ में ही गोविंद समाये, फिर काहे गौसेवा ना भाये' अश्या निरुपद्रवी घोषणांनी आता 'गौमाता करे पुकार, कहाँ गई हिंदू तलवार' असं रूप घेतलंय.

गर्दीतला दर्दी

पण प्रधानसेवक फार कल्पकतेने आणि काळजीपूर्वक विधाने करतात असं गृहीत धरलं तर....

आतासुद्धा प्रधानसेवकांनी फक्त "दलितांना मारण्याविषयीच" नाराजी व्यक्त केली आहे.

मला मारा पण मुसलमानांना मारू नका (किंवा दलितांना आणि मुसलमानांना मारू नका) असं ते म्हणालेले नाहीत.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी मुस्लिमांना चेचणारे खमके नेते अशी इमेज आहे मोदीभक्तांच्या बर्र्याच मोठ्या ग्रुपमधे. ते त्यासाठी मोदींना पार चाटून वल्लं करत असतात. मोदींनी दलित आणि मुसलमान बांधव म्हंटलं रे म्हंटलं की या चाटू मोदीभक्तांच्या जिभा लाकडासारख्या होणार. मोदी अशी रिस्क घेणार नाय.

अवांतर : 'मला मारा' या डायलॉगवर एक फोटो पाहिला नुकताच फेसबुकवर-

हिटलर भाषण देतोय आणि फोटोवर लिहिलं होतं " पाहिजे तर मला मारा पण माझ्या ज्यू बांधवांना मारू नका" Smile

गर्दीतला दर्दी

>>किंबहुना, यांचिसाठी केला होता अट्टाहास!

बिंगो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

The more, the merrier!!!

विकास घडवताना संस्कृतिचे बलिदान नको - इति सुमित्रा महाजन

आमच्या संस्कृतित यंव व्हायचं अन त्यंव होत असे. आणि म्हणून विकास घडवताना सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला पायजे वगैरे वगैरे वगैरे. मोदींनी फर्ग्युसन कॉलेजात भाशान ठोकताना "मॉडर्नायझेशन विदाऊट वेस्टर्नायझेशन" चा नारा दिला होता तो ह्याचाच बाप.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परदेशी पर्यटक महिलांनी भारतात वावरताना स्कर्ट घालू नये. इति केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा. म्हणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.

+१.
ट्रॅफिकच्या दृष्टीने धोकादायक असते ते !!! Blum 3

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

पाने