बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य

पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली अन्यथा काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.

२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.

३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

जय हिन्द ! जय भारत!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

अजित डोवाल काही झाले तरी भारत सरकारचे पगारी सेवक आहेत. पन्तप्रधानांचे आणि त्यांचे नाव एकत्र जोडले जाऊ लागले आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या समजुतीसाठी त्यांच्याकडेहि पाहिले जाऊ लागले तर आयएसआयच्या तालावर नाचणारा पाकिस्तान आणि भारत ह्यांच्यामध्ये फरक काय उरला? लोकशाहीच्या संकेतानुसार पगारी सेवक, मग तो कितीहि वाकबगार असला, तरी सेवकच असतो आणि राज्याचे धोरण ठरविणे केवळ लोकप्रतिनिधींच्या अखत्यारामध्ये पडते अशी माझी समज आहे. ह्याच कारणासाठी अतिशय नाणावलेला जनरल मॅकआर्थर ह्याने धोरणविषयक विधान प्रकटरीत्या केल्याने अध्यक्ष ट्रुमन ह्यांनी त्याला तडकाफडकी कामावरून परत बोलावले होते ह्याची आठवण येते. असे आदर्श आपण मानावेत.

बाकी लेखावर काहीहि मतप्रदर्शन नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा डोवल ना कॅबिनेट मंत्री बनवले तर तुमचे मत हेच राहील का?

तसेही ते रुढार्थाने सरकारचा पगार घेत असतील कदाचित, पण ते टीपिकल प्रशासकीय सेवेतुन पूर्वीच बाहेर पडले असावेत. ह्या सरकारनी त्यांना नेमले आहे.
ह्याचेच इक्विव्हॅलंट उदाहरण म्हणजे आर्थिक सल्लागार हे पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयएसआयच्या तालावर नाचणारा पाकिस्तान आणि भारत ह्यांच्यामध्ये फरक काय उरला?

पाकिस्तान सरकार हे आयएसआय च्या तालावर नाचते हे याला काय आधार आहे ?

पाकिस्तान सरकार हे पाकिस्तानी आर्मीच्या तालावर नाचते हे ठीक आहे.

आर्मी व आयएसआय हे एकच नाही. पाकी आर्मी मधले एक युनिट आयएसआय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी 'बे ऑफ पिग्स' या सैन्य अभियानाला फक्त C. I. A. च्या भरवश्यावर संमती देऊन टाकली होती. Allen Dulles या C. I. A. प्रमुखावर सर्वस्वी विसंबून केनेडींनी क्युबात सैन्य घुसवायचा निर्णय आतताईपणे घेतलेला. अतिउत्साहात हवाईदल आणि नौदल प्रमुखांचा सल्लाही त्यांनी घेतला नव्हता. हे ऑपरेशन अमेरिकेसाठी प्रचंड मोठे डिझॅस्टर ठरले. आणि क्युबात 'फिडेल कॅस्ट्रोची सत्ता अधिकच प्रबळ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची छी-थू झाली ती वेगळीच. भारतात मोदी- डोवाल या इतिहासाची पुनरावृत्ती न करो ही आशा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

जय हिन्द ! जय भारत!?

जय हिन्द अ‍ाणि जय भारत ह्या दोन घोषणांमध्ये नक्की काय फरक आहे ब्वॉ? द्विरुक्तीने नक्की काय होतं. किमान त्रिवार जयजयकाराची परंपरा तरी चालवायची.

वंदे मातरम्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रिकार साधण्यासाठी

जय हिंद, जय भारत, जय इंडिया

असं म्हटलं तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातील बरीचशी गृहीतकेच लेखाच्या मूळावर आली आहेत.
१. वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल यातील कन्वर्ट झालेल्या मुस्लिमांनी परत हिंदु धर्मात येणे शक्य होते, असे मानणे फारच भाबडेपणाचे आहे. आणि तसे झाल्यानंतर दहशतवाद निर्माणच झाला नसता ह्याला आधार काय ?
२. पाकिस्तानमधल्या सत्ताबाह्य केन्द्रांच्या वर्तनावरुन संपूर्ण पाकिस्तान देश विषारी साप, कसा ठरतो ?
३. आपला देश एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे हे पण कल्पनेचेच खेळ आहेत.
४. पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नाहीसा होईल ही पण एक भाबडी कल्पना.

स्वप्नरंजन हे नेहमीच रम्य असते. आणि ते केल्यावर त्रिवार, जयहिंद किंवा तत्सम घोषणा दिल्या की ते सत्यच आहे असेही वाटू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दोन दिवसात बलुचीस्तानातील मराठ्यांबद्दल मटा का लोकसत्तात आले होते.
अब्दालीने २०००० पेक्षा जास्त मराठे पकडुन गुलाम म्हणुन नेले होते. आता ते सर्व मुसलमान आहेत पण १-२ शब्द मराठी बोलतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या लोकसत्तामध्ये ह्यावर आलेली एक टिप्पणी :
२०१९ मधील युद्धज्वराची नांदी?

जसजसे सुशासनाच्या पातळीवरील आणि राजकीय पातळीवरील नराश्य वाढत जाईल, तसतसे पाकविरुद्ध कठोर पावले टाकली जातील. पाकच्या राजकारण्यांनाही तेच हवे असल्याने तेही खतपाणी घालत राहतीलच. भारताला डिवचत राहतील.

तूर्त सर्वात कळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे मोदींनी हे वक्तव्य मुळी का केले असावे? याचे सरळ उत्तर म्हणजे काश्मीरमधील अशांततेपासून लक्ष हटवून ते पाककडून बलुचिस्तानमध्ये चाललेल्या क्रूर दडपशाहीकडे वळविणे. पण या तात्कालिक कारणांपेक्षा काही तरी अधिकचा संकेत यामध्ये नाही ना? स्पष्टच भाषेत बोलायचे तर २०१८ च्या शेवटास किंवा २०१९च्या प्रारंभामधील संभाव्य युद्धज्वराची तर ही नांदी नव्हे ना?

अशी शंका घेण्यास पूर्ण वाव आहे. ‘मिशन २०१९’वर डोळा ठेवून २०१८च्या मध्यानंतर पाकला चांगलाच धडा शिकविण्याचे मनसुबे भाजपचे खासदार नेहमीच उघडपणे बोलून दाखवीत असतात. एक तर त्यांना तसे संकेत असतील किंवा पुढील लोकसभा जिंकण्यासाठी युद्धज्वराची गरज लागणार असल्याची व्यावहारिक जाणीव तरी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

याचे सरळ उत्तर म्हणजे काश्मीरमधील अशांततेपासून लक्ष हटवून ते पाककडून बलुचिस्तानमध्ये चाललेल्या क्रूर दडपशाहीकडे वळविणे.

कोणाचे लक्ष ?

(१) भारतातल्याच पण काश्मिरी मधल्या जनतेचे लक्ष
(२) काश्मिरेतर भारतीय जनतेचे लक्ष

उत्तरे -

(१) हे असेल तर ठीकच आहे. कारण त्यांना समोर छोटी रेष ओढून दाखवणे गरजेचे आहेच. भारत ही मोठी रेष आहे.
(२) ह्याची फारशी गरज नाहीच्चे. काश्मिरेतर भारतीय जनतेचे लक्ष काश्मिर मधल्या अशांततेकडे असलेच तरी त्यांना हे पटवून देण्यात आलेले आहे की ह्या अशांततेमागे पाक चा हात आहे. त्यामुळे त्यांना फक्त बलुचिस्तानकडे बोट दाखवून हे दाखवून द्यायचे उरलेले आहे की हा अ‍ॅडिशनल पुरावा घ्या - पाकिस्तानच्या दडपशाहीचा.

---

‘मिशन २०१९’वर डोळा ठेवून २०१८च्या मध्यानंतर पाकला चांगलाच धडा शिकविण्याचे मनसुबे भाजपचे खासदार नेहमीच उघडपणे बोलून दाखवीत असतात. एक तर त्यांना तसे संकेत असतील किंवा पुढील लोकसभा जिंकण्यासाठी युद्धज्वराची गरज लागणार असल्याची व्यावहारिक जाणीव तरी असावी.

(१) २०१८ मधे पाक ला धडा शिकवणे हे इष्ट आहेच. त्यांच्याकडे अण्वस्त्रे आहेत याची कल्पना आहेच सगळ्यांना. आपल्याकडे अण्वस्त्रे आहेत याची ही सगळ्यांना कल्पना आहे. भारताची अरिहंत ही ऑपरेशनल झालेली आहेच.

(२) आणि इलेक्शन जिंकण्यासाठी युद्ध करणे व पाक ला धडा शिकवणे हे सुद्धा चूक आहे असं नाही**. सैनिक दोन्हीकडचे मरतील हे सगळ्यांनाच (निर्णयाशी संबंधित सगळ्यांना) माहीती आहे. पण संभाव्य सिव्हिलियन्स ना (संभाव्य दहशतवादी हल्ल्यांमधे) मरण्यापासून वाचवायचे असेल तर सैनिकांना पुढे करावे लागेलच. अन्यथा क्षेपणास्त्रांचा जोरदार प्रयोग करावा लागेल.

(३) भारत पाक युद्ध हे निर्णायक होईलच असे नाही किंवा भारताचा विजय होईल याची १००% खात्री नाही - हे सुद्धा सगळ्यांना (निर्णयाशी संबंधित सगळ्यांना) माहीती आहेच. पण हे युद्ध (विशेषतः कन्व्हेन्शनल वेपन्स पुरते मर्यादित राहिल्यास) घडवून आणण्यात सुद्धा अमेरिकेचा व रशियाचा फायदा आहे हे विसरून चालणार नाही. अतिमहाप्रचंड फायदा. विशेषतः जर हे युद्ध मर्यादित कालापुरते झाले तर. उदा. ३ आठवडे.

-----

** इलेक्शन जिंकण्यासाठी युद्धं टाळली पण गेलेली असतील तर इलेक्शन जिंकण्यासाठी युद्ध करणे एखाद्यावेळी योग्य ठरू शकतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>इलेक्शन जिंकण्यासाठी युद्ध करणे व पाक ला धडा शिकवणे हे सुद्धा चूक आहे असं नाही. सैनिक दोन्हीकडचे मरतील हे सगळ्यांनाच (निर्णयाशी संबंधित सगळ्यांना) माहीती आहे.

अरेच्चा !!

"काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये, श्रीलंकेत आणि इतरत्र राजकारण्यांच्या राजकीय खेळासाठी सैनिकांना मरावे लागते" या ओरड्याचे मग काय होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये, श्रीलंकेत आणि इतरत्र राजकारण्यांच्या राजकीय खेळासाठी सैनिकांना मरावे लागते" या ओरड्याचे मग काय होणार?

सिव्हिलियन कंट्रोल ऑफ मिलिटरी - चे डॉक्ट्राईन तेच आहे.

की मिलिटरी ही सिव्हिलियन राजकीय नेत्यांच्या पूर्ण ताब्यात असली पाहिजे. राजकीय नेत्यांना मिलिटरीच्या कारभारात हवा तेव्हा हस्तक्षेप करता यायला हवा. अधिक माहीती साठी वीणा कुकरेजा, स्टीव्ह विल्किन्सन, किंवा एलियट कोहेन यांनी लिहिलेले साहित्य वाचणे. यातले वीणा कुकरेजा, स्टीव्ह विल्किन्सन यांचे साहित्य हे स्पेसिफिकली भारतीय केस साठी. व कोहेन यांचे "सुप्रीम कमांड" हे "सिव्हिलियन कंट्रोल ऑफ मिलिटरी" चे डॉक्ट्राईन समजून घेण्यासाठी.

मी अर्थातच नेम ड्रॉपिंग करतोय. पण मुद्दा हा आहे की - सैन्य हे राजकीय नेत्यांच्या ऑब्जेक्टिव्ह्ज साठी काम करते. व आत्ता च्या स्थितीत भारत सरकार बर्‍यापैकी स्थितीत आहे की हे घडवून आणू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला मान्यच आहे.

पण अनेकांच्या मते एकही सैनिक मरणे म्हणजे राजकारण्यांसाठी एक हजार ब्रह्महत्येच्या पातकासारखं असतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काश्मीरमधील स्थिती आपण सहज सोडवू या भ्रमात मोदी होते पण त्यांनी परिस्थिती अजून चिघळवली ...
(तेथील मित्राकडून तसेच वर्तमानपत्रांवरून कळले)
तेथील अपयश झाकण्यासाठी देशाचे लक्ष (आंतर्राष्टीय समूहाचे नाही) बलुचिस्तान कडे वळवले व
काश्मीरमधील परिस्थिती बद्दल आपली जबाबदारी मागील सरकार वर ढकलली..
अतिशय अपरिपकव विधानामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात भारताच्या प्रतीमा खालावली
..
बलुचिस्तान प्रश्नावर भारताची भूमिका नेहमी 1986पासून आतापर्यंत तेथील जनतेला समर्थन अशीच...
मोदी दुसऱ्याचे श्रेय घेण्यात पटाईत असल्यामुळं
त्यांनी देशाचे लक्ष मुख्य प्रश्नावरून भरकटवले..
व काश्मीरमधील जनतेला आगीत एकटे सोडले

जगाच्या इतिहासात सर्व हुकूमशहांनी आपले अपयश नेहमी दुसऱ्या देशांवर लादून स्वतःचे स्थान बळकट केलंय
मोदींचादेखील तोच उद्देश दिसतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..