kiss (चुंबन)
प्रेम व्यक्त करायला पहिला kiss गरजेचाच असतो मग ती बायको असो वा मैत्रीण, प्रत्येकाच्या "ती" च्या पहिल्या kiss वर काही ....
सहज जाता जाता
kiss देऊन जातेस
रोज एक आठवण
add करून जातेस...
गालावर अोठ टेकवण
तुझ्यासाठी सोपं असतं
स्नानावेळी तोच गाल कोरडा ठेवण
माझ्यासाठी अवघड असतं
जवळ घेतेस अोढून
अन् बर्न होतात कॅलरीज
श्वासांची नुसती चढाओढ
अन् अोठांची बेरीज
मी पोटॅशिअम आयोडाइड(ki)
आणि तू दोन सल्फर(ss)
पृथ्वी उलटी फिरते
अाणि जग होतं धुसर....
अोठातुन गुलाब शिंपडताना तुला
काहीच कसं वाटत नाही
इतक नाजूक या धरतीवर
मोरपिस सुद्धा सापडत नाही ...
सदाफुलीच तुटणं
हेच तिच काम आहे
मी तुझ्या अोठांचा
एक अमर शिकार आहे......
!निनाद!
प्रतिक्रिया
वाह!
दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश झाली. वाजवा रे वाजवा!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
मी फ्लोरिन युरेनियम तू कार्बन
मी फ्लोरिन युरेनियम
तू कार्बन पोटॅशियम
जमीन वरखाली होते
प्रेसिपिटाय टेस्टट्यूबम
३३-१-३-५७-११-६०
तुम्ही एक नंबरचे ३३-१-३-५७-११-६०आहात!
मी ते चुकून ३३-१६-१-८-५७ असं
मी ते चुकून ३३-१६-१-८-५७ असं वाचलं.
सुंदर शब्दांकन राजेश....
सुंदर शब्दांकन राजेश....
काळेंचा एक किस फारच उत्तेजक
काळेंचा एक किस फारच उत्तेजक ठरला
अरे किसींग पोएम वरती गणितं
अरे किसींग पोएम वरती गणितं कसली टाकता रे ?
आस्वादाला अडथळा येतो ना आमच्या.
हायजेनबर्ग
तुम्ही प्रेम गाळण्यातले हायजेनबर्ग आहात का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी पोटॅशिअम आयोडाइड आणि तू
मी पोटॅशिअम आयोडाइड
आणि तू दोन सल्फर
.. उठा ले रे बाबा
केमिस्ट्री
केमिस्ट्री जुळायची असेल तर
मी दोन हायड्रोजन
तू एक सल्फर
असें म्हणून पहावे. लगेच हायड्रोजन सल्फाईडचा वास सुटेल.
लय अपेक्शेने आलों होतों --मला
लय अपेक्शेने आलों होतों --मला वाटल बैंड्स्टैंड --कविता वाचुन झेड ब्रिज चा फ़िल आला
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
तुम्हीं गरवारे ला एमसी केला
तुम्हीं गरवारे ला एमसी केला का केमिस्ट्री मध्ये ?
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
नाही
गरवारे ला असतो, तर एम.सी. आलीच नसती,
अप्रतिम
सदाफुलीच तुटणं
हेच तिच काम आहे
मी तुझ्या अोठांचा
एक अमर शिकार आहे......
....।।।
...।।
पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..
ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त
ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त कविकल्पना आहे किंवा अॅट बेस्ट ओव्हररेटेड आहे - असे माझे मत आहे. हां अन्य गालाचे वगैरे छान असेल पण ....
शिवाय हे कुणाला विचारता पण येत नाही की बाबा खरच आवडण्यायोग्य प्रकार आहे की ढोंग असते
आँ!
हाय कम्बख्त!
तू ने पी ही नहीं!
वगैरे वगैरे!
हाहाहा मला हाच संशय आहे की ही
हाहाहा मला हाच संशय आहे की ही गोष्ट एक्सायटिंग असेल. एवढे लोकं तर खोटं बोलणार नाहीत.
आँ?
सामान्यतः ज्याला गाल म्हणतात (जे चेहर्यावर असतात) त्याचे चुंबन छान असते.
पण अन्य गालाचे म्हणजे? लेखिकेला आणखी कोणते कोणते गाल अपेक्षित आहेत?
शुचि, प्लीज एलॅबोरेट!
:)
अन्य म्हणजे दंड वगैरे.
रात्र चढत चालली!
भारतात तरी रात्र चढत चालली आहे.
'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.
अर्थात, कुठल्याही रंगाच्या 'डांबिस' लोकांना हे लागू नाही म्हणा!
असं कसं?
तुम्हां मेडिकलच्या लोकांना सग्गळे गाल सारखे, असं ऐकून आहे.
पण आम्ही इथे वही-पेणसिल घेऊन नोट्स काढतोय शुचिच्या लेक्चरच्या!!
ज्ञानार्जन केल्याविना आमची प्रगती होणार कशी?
हां नोटस नीट घेणे नाहीतर छडी
हां नोटस नीट घेणे नाहीतर छडी बसेल .... हातावर. हो आधीच स्पष्ट करते कारण इथे वेगळ्याच गालांचा विषय चाल्लाय म्हणुन
.
डिड आय रियली से दॅट? नो वे!!१ मी फार बिघडले ऐसीवर येऊन.
'अन्य' गाल हा प्रकार सज्जन
सज्जन लोकांनीच काय घोडं मारलंय? सगळी मजा दुर्जनांनीच का घ्यावी?
कदाचित तुम्हाला 'या चढत्या रात्रीच्या वेळी नुसताच डिस्कस काय करायचा?' असं म्हणायचं असेल तर ठीक आहे.
कदाचित...
...त्यांना 'बटांचा कीस' अभिप्रेत असावा काय?
...त्यांना 'बटांचा कीस'
नबांच्या या कलाटणीने माझा मराठी कवितांवर पोसलेला सुकुमार पिंड अंमळ गोंधळुन गेलेला आहे.
आम्हास बटांचा एकच मधुबालीय अर्थ माहीत आहे. एकच शेळकीय अविष्कार माहीत आहे.
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली !
आमच्या माहीतीप्रमाणे बट ढळते वा भुरुभुरु उडते
आता दोन "बाटा" हाणा पण आपला म्हणा
पण हा कसला अघोरीपणा आहे मी जेव्हा जेव्हा नबांच्या प्रतिसादाला सामोरा जातो
तेव्हा तेव्हा माझ्यातला एखादा तरी कोवळा अंकुर जळुन जातो.
या न्यायाने म्हणाव तर नबांचे प्रतिसाद अगदी काव्यकोमल विषयावरही
"ज्वलंत" उग्र आदिम असतात
धन्यवाद
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा.
आता असल्या मोठ्या बटा उधळायला किती महाप्रचंड मुजोर वारा लागत असेल.
सॉरी बट
माफ करा तुम्ही कवितेचा अर्थ लावण्यात चुकत आहात
हा वारा साधा नेहमीचा नाही लक्षात घ्या हा "मुजोर" वारा आहे
"घोडा" किती वारं प्यायलेला आहे यावर बटांचे उधळणे वा कोसळणे वा तराहणे अवलंबुन आहे
बटांबद्दल चर्चा चालू आहे,
बटांबद्दल चर्चा चालू आहे, म्हणून मी कोणे एके काळी केलेलं विडंबन आठवलं.
बटबटीत वाटला
धागा उत्सुकतेने वाचला
बटबटीत वाटला.
(घासकडवींना भिऊन इकडे तिकडे पळतोय मला वाटल ते मिपावर आहेत म्हणुन
इकडे आलेलो पण ते लॉगिन दिसताय भाग मिल्खा भाग )
ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त
चुक. ओठांचे चुंबन दाताने घेणारे अथवा त्याचे तन्त्र अवगत नसणारे असे मानु शकतील.
खरे तर सर्वात जास्त उब जिव्हाळा प्रेम अन कलरि लोस फक्त ओठांच्या चुंबनातुन मिळतो. दुर्दैवाने बरेच भारतीय पुरुष (अन अर्थातच स्त्रिया)यात कौशल्यहिन आहेत वेड्या सारखे आपले ओठ समोरील व्यक्तिच्या ओठाच्या वर ओठ ओलसरपणे स्पर्शत ठेवण म्हणजे ओठानी चुंबन घेण्ने असा त्यांचा गोड(?) गैरसमज असतो... खरे तर ओठानी करायची क्रिया जरा वेगळी आहे अन यात एंट्री एक्स्गीट चे टायमिंग अन जिभेचा वापर विशिष्ट कौशल्याने केल्यासच त्याची लज्जत उमजू लागते अदरवाइज आल गोज मेकेनिकल अन बोरिंग.
जालावर यासाठी नक्कीच बरेच दुव्वे उपलब्ध असावेत ? अधिक मार्गदर्शन मी करू शकत नाही क्षमस्व_/\_
actions not reactions..!...!
सहमत . फक्त तुमच्या सारखे
सहमत . फक्त तुमच्या सारखे तांत्रिक भाषेत विशद करून सांगण्याच्या कौशल्य माझ्याकडे नसल्यामुळे. गप्प बसलो. मूळ गैरसमज वाल्याना एकच म्हणावेसे वाटते कि ' तू ने पी ही नहीं ......'
मी इतकच म्हणेन
लुफ्त-ए-पप्पी क्या जानोगे बाप्या
हाय रे पाप्या
तुने पप्पी ली ही नही
;)) =))
xD xD xD
actions not reactions..!...!
अति इन्हिबिशन्स, अरेंज्ड
अति इन्हिबिशन्स, अरेंज्ड लग्ने, तडजोडीस प्राधान्य, एकत्र कुटुंब, व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच - त्यामुळे मॅजिक हरवलेले असते किंवा अनेकानेकांना ते कधीही सापडत नाही यास मान्यता.
राहून गेले!
'आम्हाला इतका धाक होता घरच्यांचा की दोन मुले झाली तरी एकमेकांशी एक शब्दही बोललो नव्हतो हो!'
हा कुठल्याश्या सिनेमातला की नाटकातला संवाद आठवला.
त्यावरून आमचे एक सर ' पढो बेटा पढो, नहीं तो पास हो जाओगे' असे कळकळीने (अभ्यासाबाबत) सांगायचे ते आठवले.
ऑफ कोर्स सगळी जबाबदारी
ऑफ कोर्स सगळी जबाबदारी समाजपद्धतीवर, कुटुंबव्यवस्थेवर टाळून चालणार नाही. ज्याचा त्याचा स्वभावही कारणीभूत असतो. मी ज्योतिषात रस घ्यायचे एक कारण हेदेखील आहे की खरच कंपॅटिबिलिटी मॅटर करते का? तर हो पण ती कुंडलीतून कळते का? माहीत नाही.
आणि तू दोन सल्फर(ss) एकदम
एकदम शाळेत असतांना पाहिलेलं 'अकार्य गंधक' आठवलं!!!!
हायजिन!
लिप कीस कधीच ट्राय न करण्याचे कारण 'शूचि' तेच्या अवास्तव कल्पना , हे असावं काय?
किस
या विषयावर व्हाट्स अप वरची पोस्ट.
एका पुणेरी मुलीने तीन मिनिटे दीर्घ चुंबन घेतल्यावर ती दमली.
तिने त्याच्याकडे पाणी मागितले.
त्यानेही तत्परतेने सॅकमधली बिसलेरी काढून दिली.
पाणी पिण्याआधी ती म्हणाली, ए, उष्टी नाहीये ना बाटली ?
ह्याला म्हणतात संस्कार!
पाणी पिण्याआधी ती म्हणाली, ए,
याच्यापुढे आणखी एक वाक्य आहे..
आज संकष्टी आहे नं.. म्हणून
हां आता कळला संस्काराचा
हां आता कळला संस्काराचा मुद्दा. ये हुइ बात!
kiss म्हणजे चुंबन होय?
kiss म्हणजे चुंबन होय?
जरा केमिस्ट्रीकडे वळून पोटॅ
जरा केमिस्ट्रीकडे वळून पोटॅ सॅाल्ट कडू असतात आणि सल्फरने ठसका लागतो.