उंच माझा झोका ..

झी मराठयावर सध्या चालू असलेल्या उंच माझा झोका ह्या मालीकेचे शीर्षकगीत मी लिहीले आहे.

चांदणचाहूल होती.. कोवळ्या पावली
माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली

खेळण्याचे होते वय.. अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या ..भरे नभाचा आशय

थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट

हाती अमृताचा वसा , साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात.. झुले उंच माझा झोका
-----------------------------------------------------
पुढचे अंतरे

दाटुनिया येता मेघ , भरे आकाश ओंजळ
माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ
झिजे पायरी होऊन ..जन्म चंदनासारखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका

आरतीत तेवे माझ्या ..मंद व्रताची ही समई
तुळशीचे रोप माझे ..उंच आभाळात जाई
मीच ओलांडले मला ..सोबतीस माझा सखा
येई कवेत आकाश ..झुले उंच माझा झोका

असे आगळे हे नाते ..ऐक ही रमा सांगते
तेज हे रुजे अंतरी ..जगण्याचे फूल होते
अशा संसार गाण्याला .. त्याचा माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळ्यात ..झुले उंच माझा झोका

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

बहुतांश मालिका बघत नसल्याने या मालिकेचे शीर्षकगीत ऐकले नव्हते
इथे दिल्याबद्दल आभार!
गीत आवडले आहे. मालिकेचा विषय नववधुशी निगडीत आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नववधूशी नव्हे रमाबाई रानडे यांच्या जीवनावर ही मालिका आधारित आहे
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी लहान वयात रमाबाईचा विवाह होतो
पुढे रानडे यांच्या सान्निध्यात राहून त्यांचा विकास होतो यावर कथासूत्र आधारलेले आहे

एक एपिसोड मी बघितलाय
ठीक वाटली मालिका
शीर्षकगीत आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

धन्यवाद जाई.
मालिकेचा विषय रोचक वाटतो आहे. पण एकूण मराठी, हिंदी मालिकांकडून अजिबात काहीही अपेक्षा नसल्यामुळे विषय कितीही आवडला तरीही मालिका बघण्यात वेळ घालवण्यात हशील वाटत नाही. पहिले चार भाग चांगले असतील तरीही ट्यार्पी, जाहिराती इत्यांदींच्या मोहापायी कधी वळचणीचं पाणी रंग दाखवेल याचा भरवसा नाही. त्यापेक्षा पुस्तकं वाचणं उत्तम.

शीर्षकगीत यूट्यूबवर पाहिलं. चाल तशी ताजी वाटली. कविताही आवडलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी सुध्दा जास्त मालिका बघत नाही
कचकड्याच्या मालिका कोण बघणार
24 तास कारस्थान बघून डोक्याला शाँट बसतो

पण या मालिकेची जाहिरात जरा वेगळी होती
म्हणजे अस बघ रानडे बाहरुन येतात तेव्हा लहान रमा खेळ सोडून धावत येते
आणि रानड्यांचे पाण्याने धुतलेले पाय पुसते
वर आई म्हणते अस केल्यान नवरा बायकोच प्रेम वाढत असा डाँयलाँग मारते
आयला म्हटल हे बरय
सुखी संसाराची सोपी वाटचाल
म्हणून म्हटल एक एपिसोड पाहू
बाकी नवाकोऱ्‍या साड्या नवी वेशभूषा वगैरे फँक्टर आहेतच
रानड्यांच चरित्र नव्यान नाही लिहील गेल म्हणजे मिळलल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

या शीर्षकगीताच्या मी प्रेमात पडलो आहे...
कविता अप्रतिम आहे, अरूण सर.
पण त्याचबरोबर निलेश मोहरीर यांच्या संगीताने शब्दांशी योग्य मेळ साधत गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.
कविता शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. अरूण म्हात्रे यांचे अभिनंदन.हे शीर्षगीत अत्यंत लोकप्रिय झालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्याप्रथम इतके सुंदर शीर्षकगीत लिहिल्याबद्दल अरुण म्हात्रे ह्यांचे अभिनंदन.

शीर्षकगीताशिवाय अजूनहि एका गोष्टीबद्दल निर्माते, दिग्दर्शक आणि नटसंच ह्याचे अभिनंदन करावेसे वाटते. उच्च मध्यमवर्गीय घरात राहणार्‍या चकचकीत चेहेर्‍यांच्या आणि 'स्मार्ट' व्यक्तींच्या एकमेकांवरच्या कुरघोडया ह्या साच्यातून बाहेर पडून १९व्या शतकाच्या दुसर्‍या अर्धात घडलेली आणि काही ठोस अर्थ असलेली कथा ते दाखवीत आहेत म्हणून.

इतके चांगले अर्थपूर्ण आणि भरीव कथानक मिळून सुद्धा त्याचे आपल्या समोर येणारे स्वरूप फार बटबटीत आहे. कसे ते पहा.

जुन्या काळातील घटनांवर आधरित एखादी कलाकृति पाहतांना प्रेक्षकांकडून अशी योग्य अपेक्षा केली जाते की त्यांनी त्यांची आजची मूल्ये आणि जीवनाची पद्धति दूर ठेवून जुन्या काळाच्या चष्म्यातून तिच्याकडे पहावे. प्रेक्षकांकडून ही अपेक्षा ठेवल्यावर निर्माता-दिग्दर्शक ह्या अटीपासून सुट्टी घेता येत नाही पण सर्व मालिकेत हा विचार संपूर्ण दूर ठेवल्यासारखे वाटते. रानडे कुटुंब सुस्थितीत आहे हे मान्य करूनसुद्धा त्यातील बायकांनी कायम किलोभर सोने आणि जरीच्या रेशमी साडयातच वावरले पाहिजे का? अगदी झोपतांना सुद्धा? त्यांचे केस असेच हेअर-स्टायलिस्टने बसवून दिल्यासारखे कायम हवेत काय? विधवा स्त्रिया सर्ववेळ चेहर्‍याभोवती अलवण घट्ट बांधलेल्याच का? आणि काम करतांनाहि त्यांची अलवणे जमिनीपर्यंत घोळत असत काय? ६०-७०सालापर्यंत अशा स्त्रिया आसपास दिसत पण त्या अशा नव्हत्या.

प्रत्येक पुरुषाच्या - मुलांच्या सुद्धा - कानात भिकबाळ्या हव्यात काय? सगळेच पुरुष सर्ववेळ बाहेर पडायला तयार असल्यासारखे घट्ट बाराबंद्या आणि पायघोळ अंगरख्यात कशास हवेत? प्रत्येक पुरुष सर्व काळ गुळगुळीत दाढी केलेला आणि तुळतुळीत डोके असलेला असे काय? त्या काळात जिलेट ब्लेड नव्हते आणि कट-थ्रोट वस्तराहि नव्हता. (रॅ. परांजपे १९०१ साली इंग्लंडातून परतले तेव्हा त्यांनी बरोबर एक कट-थ्रोट वस्तरा आणला होता आणि तो वापरून ते स्वत:ची दाढी करीत असत. त्याची इतरांना खूप मौज वाटत असे असे वाचले आहे.) जुन्या ब्राह्मणी घरात नाभिकाने घरी येऊन पुरुषांची दाढी आणि डोकी करायची पद्धत होती आणि ते काम आठपंधरा दिवसांतून एकदा होत असे. साहजिकच पुरुषाचे डोके आणि चेहरा तुळतुळीत हे रोजचे चित्र नव्हते. हे आणि असेच काही कपडयाबद्दल आणि वैयक्तिक नेपथ्याबद्दल लिहिता येईल पण येथे थांबतो.

अन्य नेपथ्याचे तसेच. संपूर्ण रानडे वाडा ब्रिटिश उमरावाचे घर असावे तसा सजवला आहे. त्यात जागोजागी antique वस्तु symmetrically मांडलेल्या आहेत. जमिनीवर इराणी गालिचांसारख्या सतरंज्या पसरल्या आहेत. भिंतींवर पूर्वजांचे मोठेमोठे फोटो आहेत. १८८०च्या पुढेमागे फोटोग्राफी महाराष्ट्रात इतकी पसरली होती का? रविवर्म्याची रंगीत चित्रे सुद्धा मागच्या काळात उडी मारून पोहोचली आहेत! जिकडेतिकडे हिरव्या रंगाचे प्रभाकर कंदिल लावले आहेत तेहि symmetrically. मी सधन कुटुंबांचे बरेच वाडे पाहिले आहेत पण असा well-appointed वाडा कधी नजरेस पडला नव्हता.

कोकणस्थी बोलण्याच्या समजुतीखाली सर्व पात्रे अतिशुद्ध आणि छापलेले वाचून दाखवावे असे बोलत असतात. पुलंनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या तोंडात दात आहेत का छपाईचे खिळे? पुण्यातील कोकणस्थ कुटुंबांच्यात माझा जन्म गेला पण अशी विद्वज्जड आणि शुद्धलेखनी भाषा वापरणारे एकहि कुटुंब मी कधी पाहिलेले नाही.

भाषेतील अनेक शब्दप्रयोग कालबाह्य आहेत. 'अभ्यासिका' असा कृत्रिम शब्द त्या काळात होता का? त्यांतील पात्रे एकमेकांस साहेब-मडमांसारखी 'शुभेच्छा'का देतात?

त्या काळच्या कुटुंबांचे वागणुकीचे नियम पूर्ण धाब्यावर बसविले आहेत. पहिल्याच भेटीत विहीणबाई व्याह्यांच्या पुढे बैठकीच्या खोलीत उभे राहून मुलीला पोटाशी घेत आहेत आणि तोंड वर करून व्याह्यांशी बोलताहेत? हर हर, बायकांनी अगदीच रीतभात सोडली वाटते! त्यांच्या आयांनी त्यांना काही चालचलणूक शिकवलेली दिसत नाही.

असे हे चर्‍हाट खूप वेळ वळता येईल पण येथे थांबतो. जीए कुलकर्णींनी एका ठिकाणी म्हटल्यासारखे प्रत्येक पात्राला काही चांगल्यावाईट गुणावगुणाची varicose vein झाल्यासारखे वाटते. दुसरी उपमा द्यायची तर सुग्रास भोजन मिळणार म्हणून कोठे जावे आणि तेथे भो़जनास फक्त तूपगूळ हा एकच पदार्थ ठेवलेला असावा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म ... आलेच!! वाटलच होतं एखादा विसंगत सूर कसा लागला नाही अजुन.

पुलंनी एका ठिकाणी म्हण्टलं आहे की टिकाकार हे बोहारणी सारखे असतात .... बोहारणीला एखादा कोरा करकरीत शालू जरी काढुन दिला ... तरी ती म्हणते कशी .... बाई.... जरा काही तरी बरं दाखवा.... टिकाकार सुद्धा त्यातलेच ....

असो .... प्रदीर्घ प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

संतत्प्त (कोल्हटकरांचा मान राखून)

मिलिंद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0