Skip to main content

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)

(व्यवस्थापन : निश्चलनीकरणाच्या धाग्यावर ५००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढत आहोत.)

पीएमओ चा इडी च्या धाडींच्या मागे प्रेरणास्रोत.

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-dem…

------
कोटक महिंद्र बँकेतुन ७० कोटी जप्त

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/kotak-mah…

चिंतातुर जंतू Fri, 23/12/2016 - 17:48

Success has but one father, while failure is an orphan dumped on RBI, ED, IT, ...

चिंतातुर जंतू Fri, 23/12/2016 - 18:07

In reply to by अनु राव

  • निश्चलनीकरणामागचा हेतू काळा पैसा पकडणं हा होता
  • पीएम सांगतायत त्यानुसार इडी छापे मारतंय
  • पीएमचं ऐकलं तर इडीला काळा पैसा मिळतोय

निष्कर्ष : पीएम एकदम हॅन्डस-ऑन आहेत. इडी मात्र सांगकामी आहे.

आता सांगा कोण फेल जातंय?

चिंतातुर जंतू Fri, 23/12/2016 - 18:36

फोर्ब्जनं मोदींना दिलेला सन्मान तोंडदेखलाच म्हणावा, की त्यांनी एकाच वेळी मोदीभक्ती आणि देशद्रोह दाखवण्याची कसरत साधली असं म्हणावं?
What India Has Done To Its Money Is Sickening And Immoral

Not since India’s short-lived forced-sterilization program in the 1970s–this bout of Nazi-like eugenics was instituted to deal with the country’s “overpopulation”–has the government engaged in something so immoral.

India is the most extreme and destructive example of the anticash fad currently sweeping governments and the economics profession. [...] But there’s no misunderstanding what this is truly about: attacking your privacy and inflicting more government control over your life.

What India has done is commit a massive theft of people’s property without even the pretense of due process–a shocking move for a democratically elected government. (One expects such things in places like Venezuela.)

बॅटमॅन Fri, 23/12/2016 - 22:13

In reply to by चिंतातुर जंतू

Not since India’s short-lived forced-sterilization program in the 1970s–this bout of Nazi-like eugenics was instituted to deal with the country’s “overpopulation”–has the government engaged in something so immoral.

हागल्यापादल्याला नाझीपर्यंत नेऊन भिडवणे हा पत्रकारितेचा नवीन मानदंड झालेला दिसतोय. एकूणच काळजी वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/12/2016 - 23:05

In reply to by चिंतातुर जंतू

लेखातली शैलीसुद्धा आवडली. चिमटे काढणाऱ्यांबद्दल मला जरा अधिक प्रेम वाटतं. उदाहरणार्थ हा परिच्छेद -

News flash: Human nature hasn't changed since we began roaming this planet. People will always find ways to engage in wrongdoing. Terrorists aren't about to quit their evil acts because of a currency change. As for the digitization of money, it will happen in its own good time if free markets are permitted. And the best cure for tax evasion is a flat tax or, at the least, a simple, low-rate tax system that renders tax evasion hardly worth the effort. Make it easy to do business legally and most people will do just that.

(अवांतर - 'परवा' सिनेमे डाऊनलोड करून बघणाऱ्यांबद्दल अगदी हेच्च म्हणायचं होतं.)

व्हेनेझुएलामधल्या रांगा, ठीकठाक नोकऱ्या असणाऱ्या लोकांनाही दोन वेळच्या जेवणासाठी काय काय सहन करावं लागतंय, लोकांचा किती वेळ रांगा लावण्यात जातोय, अन्न विकत मिळालं तरी चोरीची भीती वाटत्ये, याबद्दल न्यूयॉर्करमधला लेख - Venezuela, a Failing State
लेखातलं सुरुवातीचं चित्र बघून मला नोटबंदी होण्याआधीपासूनच असलेली लोकलट्रेन्समधली गर्दी आठवली. (लेख बराच मोठा आहे. नंतर तक्रार करू नये.)

व्हेनेझुएला, रांगा

अवांतर - संजय गांधीच्या कृत्यांची तुलना नाझींशी झालेली बघून उजव्यांची आदर्श प्रतिक्रिया काय असावी?

अनु राव Sat, 24/12/2016 - 11:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

व्हेनेझुअएलाच्या उदाहरणावरुन ऐसीवरच्या चावेझप्रेमी, फिडेलप्रेमी आणि हाम्रीकाद्वेषी लोकांनी काही धडा शिकला का?
का पालथ्या घड्यावरती पाणीच?

पिवळा डांबिस Sat, 24/12/2016 - 11:57

In reply to by अनु राव

आम्ही एक डॉलरची नोट बंद करणार आहोत.
त्याऐवजी एक डॉलरचं नाणं जास्त प्रमाणात रूजू करणार!!
खणण वाजलं पाहिजे!!!
:)

चिंतातुर जंतू Mon, 26/12/2016 - 12:51

In reply to by अनु राव

>> व्हेनेझुअएलाच्या उदाहरणावरुन ऐसीवरच्या चावेझप्रेमी, फिडेलप्रेमी आणि हाम्रीकाद्वेषी लोकांनी काही धडा शिकला का?
का पालथ्या घड्यावरती पाणीच?

अग्गोबाई चावेझप्रेमी? आमच्या टूलबॉक्सात ना, एक गूगल नावाचं सर्च इंजिन आहे. त्यात शोधलं असता मला किनई माझाच एक जुना प्रतिसाद सापडला. त्यात चक्क क्युबा आणि व्हेनेझुएला आणि इराण आणि नॉर्थ कोरियाला वाईट म्हटलेलं आहे!

अरेरे. आता भारतानं काय व्हेनेझुएला, क्युबा, उत्तर कोरिया आणि इराणचा कित्ता गिरवायचा? माझ्या भयस्वप्नातसुद्धा कुणी शहाणा असले सल्ले देणार नाही.

आहे की नाही गंमत? त्यामुळे अनुताईंच्या वाईड बॉलला माझा तरी पास बुवा. जरा आणखी विदा द्या ना अनुबाई. आपण इथे त्या नाठाळांची नावं जाहीर करून टाकू फर्स्ट अमेंडमेंटखाली. हाकानाका.

अनु राव Mon, 26/12/2016 - 13:21

In reply to by चिंतातुर जंतू

चिंजं - मी चावेझप्रेमी, फिडेलप्रेमी आणि हाम्रीकाद्वेषी लोकांना उद्देशुन लिहीले होते. तुम्ही का उगाच अंगावर घेताय स्वताच्या. आपण एकाच पार्टीचे आहोत.

चिंतातुर जंतू Mon, 26/12/2016 - 14:09

In reply to by अनु राव

>> आपण एकाच पार्टीचे आहोत.

आणि आपली दोघांची, पिडांची आणि अजोसारख्यांची मनंदेखील स्वच्छ आहेत. पण काय करता? इथे काही लोक उगीचच येता जाता ह.ना. आपट्यांच्या कादंबरीतल्या एकोणिसाव्या शतकातल्या गरती स्त्रियांप्रमाणे नथीतून सांगोवांगीचे तीर सोडत असतात. त्यामुळे विदा द्यावा लागतो.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 14:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Human nature hasn't changed since we began roaming this planet. People will always find ways to engage in wrongdoing. Terrorists aren't about to quit their evil acts because of a currency change. As for the digitization of money, it will happen in its own good time if free markets are permitted. And the best cure for tax evasion is a flat tax or, at the least, a simple, low-rate tax system that renders tax evasion hardly worth the effort. Make it easy to do business legally and most people will do just that.

जर मानवी स्वभाव प्रिमिटीव काळापासून बदलला नाहीये तर (उगाच सोयीच्या वेळी बदलला, दुसर्‍या वेळी नाही असं नको. कंसिस्टंसी पाहिजे.) जुन्या काळात लोकांचं वागणं, विचार करणं आजच्या इतकंच चांगलं वा वाईट असावं. स्त्रीयांवर अन्याय म्हणताना एक आणि काळा पैसा, गुन्हा अशा बाबी वर्णिताना वेगळा असं सिलेक्टिव नको.
==========================
अतिरेकी (आर्थिक वा कशी) शिक्षा केल्यानी अतिरेक सोडत नाहीत हे खरं मानू (आता एवढे मोठे पुरोगामी पत्रकार सांगताहेत तेव्हा दुसरा स्कोप नाही.). पण अतिरेक्यांना शिक्षा केल्याने अतिरेक ही मानवी वृत्ती नष्ट होत नाही म्हणून कोणी अतिरेक्यांस शिक्षा केलेले कसे निरर्थक हे लॉजिक देखिल अजब आहे.
====================
भारतीय कर हे जाचक आहेत नि कमी असते तर जाचक वाटले नसते हे लेखक अक्कल वा अभ्यास नसल्यामुळे म्हणत असेल. मुळात सगळ्या सरकारी स्कीमांचा फायदा घेतला तर आणि एरवीही भारतीय कर गरीबांसाठी नगण्य आहे. फ्लॅट टेक्स करून श्रीमंतांना फायदा देऊ इच्छिणारा लेखक अपेक्षा वा डिमांडच मूळात कमी करून मागणीची पूर्तता झाली आहे असे घोषित करा असले काहीतरी (low flat rate = more compliance) विचित्र लॉजिक देतो.
==================
या लोकांना (पत्रकारांना) नोकर्‍या कोण देतं? आणि नोकर्‍या दिल्या तरी वर प्रतिष्ठा कोण देतं?

नितिन थत्ते Sat, 24/12/2016 - 12:38

गब्बर सिंग यांच्यासाठी.... डिमॉनेटायझेशनविषयी-

As far as an anti-corruption narrative of demonetisation is concerned, the government has proved Milton Freedman right. "The government’s solution to a problem is usually as bad as the problem."

गब्बर सिंग Sat, 24/12/2016 - 15:01

In reply to by नितिन थत्ते

एकदम सहमत.

डिमॉनेटायझेशन हे सेंट्रल प्लॅनिंग कसे नाही ? - या प्रश्नाचे उत्तर मिळत नैय्ये. ( खरं तर हे सुपर-सेंट्रल-प्लॅनिंग आहे असं म्हणावंसं वाटतंय.)

आणखी -

(१) “The curious task of economics is to demonstrate to men how little they really know about what they imagine the can design.” ― Friedrich Hayek, The Fatal Conceit: The Errors of Socialism

(२) “The more the state "plans" the more difficult planning becomes for the individual.” ― Friedrich Hayek

नितिन थत्ते Mon, 26/12/2016 - 12:39

आम्ही दरवर्षी डिसेंबर/जानेवारी महिन्यात दहा किलो मटार आणून सोलून फ्रीजमध्ये ठेवतो. ते आम्हाला भाजी/उपमा इत्यादीत घालायला सुमारे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पुरतात. या काळात मटार स्वस्त असतात. त्यांचे भाव क्रमाने उतरत जातात. जानेवारीत सहसा ते नीचतम पातळीला असतात. २०१४ मध्ये आम्ही २० रुपये किलो भावाने मटार आणले होते. गेल्यावर्षी भाव इतके उतरलेच नाहीत आणि आम्ही ३० रुपये किलोने मटार आणले.

यंदा डिसेंबरच्या मध्यालाच भाव २० रुपयांवर आले आहेत.

हे सर्व भाव वेगवेगळ्या ठिकाणचे नसून ठाण्यातल्या एकाच मंडईतले आहेत.

मिलिन्द Tue, 10/01/2017 - 03:39

In reply to by नितिन थत्ते

मटार सोलून फ्रिजमध्ये ठेवल्यास तीन दिवसात त्याच्यातील व्हिटॅमिन सी चे विघटन सुरु होते. (फ्रीझर मध्ये (उणे १८ सी) हे जवळजवळ होत नाही. तसेच न सोलता ठेवल्यासही हे विघटन कमी होते. उदा. पहा:
http://ucanr.edu/datastoreFiles/608-97.pdf
अर्थात हे जाणून घेऊनही तुम्ही हे चालू ठेवू शकता: व्हिटॅमिन सी ची गरज दुसऱ्या मार्गाने पूर्ण केली की झाले (उदा. टॅबलेट घेणे; २५० मिलिग्रॅम , दिवसाला एक)

नितिन थत्ते Tue, 27/12/2016 - 14:55

In reply to by अनु राव

एटीएमच्या रांगा कमी झाल्या आहेत हे खरे आहे. त्याची दोन कारणे आहेत.
१. महिना अखेर जवळ आला आहे. त्यामुळे लोकांना कदाचित पैसे कमी लागत असतील.
२. बहुतांश (९९+%) एटीएममधून दोन हजार रुपयांच्याच कुचकामी नोटा मिळत आहेत. मी आज एटीएमच्या लायनीत उभा राहिले तेव्हा दोन-तीन लोक कुठल्या नोटा मिळताहेत याची चौकशी करून दोन हजारच्याच नोटा मिळत आहेत म्हणून नाक मुरडून निघून गेले- रांगेत उभे राहिले नाहीत.
३. काल एका स्टेट बँक कमला मिल्समधील एटीएममध्ये ५०० च्या नोटा मिळत होत्या. तिथे मोठी रांग होती. पाचशेच्या नोटा मिळत आहेत म्हणून मी रांगेत उभा राहिलो. माझा साधारण आठवा नववा नंबर आला तेव्हा नोटा संपल्या. माझ्या मागे आणखी पंधरा वीस लोकांची रांग होती. त्यातले काही लोक (दोन हजाराच्या नोटा असूनही) रांग सोडून निघून गेले.

तर महिना अखेरीस पैशांची गरज कमी झाल्याने आणि हव्या त्या नोटा मिळत नसल्याने रांगा कमी झाल्या आहेत. हे लोअर परळ भागातले आहे. ठाण्याला अजूनही मला ज्या एटीएमसमोर रांग दिसते तिथे मोठीच रांग दिसते.

अनु राव Tue, 27/12/2016 - 15:01

In reply to by नितिन थत्ते

नविन वर्षात सरकार जोमानी नव्या नोटा पुरवणार आहे. सध्या नोटांचा सप्ल्याय जाणुनबुजुनच थ्रॉटल केलेआ आहे.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 15:20

In reply to by अनु राव

यस. थ्रॉटल नै केला तर साले गडबड करणारे फ्रॉड लोक.
==============
जर तुम्ही ट्रॅक्ड/रेकॉर्डेड पर्सन असाल तर सरासरी एका दिवशी तुमच्याकडे किती कॅश असते हे माहित असते. तुमचे रेकॉर्डच नसले तर परमिटेड थ्रेशॉल्ड खाली सूक्ष्म प्रमाणात जितके दिवस जितका कारभार केला तितका काळा पैसा पांढरा करता येतो. त्या भिकारी बंगालात असं काय आहे म्हणे जिथे देशात दोन क्रमांकावर एक्सचेंज व्हावा जुन्या चलनाचा?

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 10:35

In reply to by अनु राव

>> आज म.टा. मधे आले होते की एटीएम च्या रांगा कमी झाल्या आहेत म्हणून. थत्तेचाचा, तुमचा काय अनुभव?

८ नोव्हेंबरनंतर बंद असलेलं पुणे ४११००४मधलं एक एटीएम आज उघडं दिसलं. आत कुणीही नव्हतं. कार्ड घालून डेली लिमिटच्या आतली रक्कम काढू पाहिलं, तर 'अनएबल टू डिस्पेन्स कॅश' सांगणार्‍या कागदाच्या चिटोर्‍याचं धनी व्हावं लागलं. अर्थात, ९ नोव्हेंबरपासून शटर बंद असलेल्या एटीएमसाठी ही प्रगतीच म्हणायची.

अनामिक Thu, 29/12/2016 - 08:48

In reply to by अनु राव

लोक एटीएम समोर रांगा का लावताहेत कळत नाही. त्यापेक्षा बँकेत अगदी नगण्य रांग होती. माझ्या पुढे काल मोजून तिघेजण होते. पाच मिनिटात १० हजार, ज्यात ४ हजार १००च्या नोटांमधे आणि २ हजार ५००च्या नोटांमधे, मिळाले.

नितिन थत्ते Thu, 29/12/2016 - 11:05

In reply to by अनामिक

कोणती बँक? आणि पुण्यातली का?

बँकेत "स्वत:च्याच" जावं लागतं. सध्या एटीएममध्ये कोणत्याही गेलं तर चालतं.

मला माझ्या बँकेत जायचं असेल तर सुटी घ्यावी लागते. किंवा पहिल्या/तिसर्‍या शनिवारी जावं लागतं. सुटी घेतली आणि नेमकी त्यादिवशी बँकेकडे कॅश नसेल तर? किंवा माझा नंबर यायच्या आत संपली तर?

अ‍ॅट धिस टाइम बँकेत रांग नसण्याचे "महिना अखेर" हे(ही) कारण असावे.

अनामिक Thu, 29/12/2016 - 11:50

In reply to by नितिन थत्ते

अ‍ॅक्सिस बँक, हडपसर पूणे. माझं दूसरच काम होतं म्हणून गेलो होतो काल दूपारी लंच टाईम मधे. काम झालं आणि बघितलं तर रांग नव्हतीच, टेलर काउंटरपाशी गेलो तर दोन्ही काउंटरवर तिघेजण रांगेत उभे.

शनीवारी भयानक रांग असते. मी स्वतः ३-४ तास रांगेत उभा होतो एक वेळ. जेव्हा नंबर आल्यावर आत गेलो तर बरेच "प्रॉयारिटी कस्ट्मर" रांगेत उभे न राहता सरळ आत मॅनेजरकडून टोकन घेऊन ५-१० मिनिटात पैसे काढत होते. त्यानंतर मी एकदा असेच पैसे काढले ते पण लगेच गरज नसताना,महिन्याच्या सुरवातीला मोलकरिणींचे पैसे द्यावे लागतील हे ध्यानात ठेवून.

एटीएममध्ये कोणत्याही गेलं तर चालतं हे मात्र खरं!

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 14:39

बाद झालेल्या नक्की किती नोटा चलनात होत्या, किती परत आल्या, रिझर्व्ह बँकेला किती वेगानं नोटा छापता येतात आणि पुन्हा तेवढीच रक्कम नव्या नोटांमधून चलनात यायला किती वेळ लागेल ह्याविषयीचे काही अंदाज / विश्लेषण : Why demonetisation is a disaster – detailed analysis of RBI data

अनु राव Tue, 27/12/2016 - 15:04

In reply to by नितिन थत्ते

थत्तेचाचा. समजा १५.४ लाख कोटी च्या बदल्यात सगळेच्या सगळे १५.४ लाख कोटी बँकेत जमा झाले.
आणि
सरकारनी १० लाख कोटीच्याच नविन नोटा छापल्या. तरी ५.४ लाख कोटी रुपये बँकींग सिस्टीम मधे उपलब्ध होतील. एम-३ कीती असेल ते बघा ह्या ५.४ लाख कोटींचा. आणि हा एम-३ सिस्टीम मधला असेल, म्हणजे सरकारला कीती अप्रत्यक्ष टॅक्स कीती मिळेल ते बघा.

नितिन थत्ते Tue, 27/12/2016 - 15:24

In reply to by अनु राव

अहो पण एम३ वाढून ग्रोथ होणार नाही असं तुमचंच आर्ग्युमेंट होतं ना? इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्चुनिटीज नाहीत म्हणून कोणीच कर्ज घ्यायला येणार नाही वगैरे....

अनु राव Tue, 27/12/2016 - 15:27

In reply to by नितिन थत्ते

एम-३ फार वाढणार नाही लगेच असे आर्ग्युमेंट होते. ते अजुन बदललेले नाही. मी हे उद्या होइल असे म्हणतच नाहीये.
पण हे जास्तीचे ५.४ लाख कोटी सिस्टीम मधेच रहाणार. १-२ वर्षानी जेंव्हा मागणी वाढेल तेंचा कर्ज देणे पण वाढेल आणि एम-३ वाढेल.

नितिन थत्ते Tue, 27/12/2016 - 15:33

In reply to by अनु राव

हे ५.४ लाख कोटी बिनव्याजी (बँकांच्या दृष्टीने) बाहेर फिरत होते त्यावर आता व्याज द्यावे लागणार. सध्या ते कदाचित सेव्हिंग अकाउंट्समध्ये असतील. लोक फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये टाकतील. मग अजून जास्त व्याज द्यावे लागेल.

सेव्हिंग वरचे व्याज वार्षिक एकवीस हजार कोटी.

सुधीर Wed, 28/12/2016 - 22:15

In reply to by अनु राव

मला वाटतं एम-३ ब्रॉडर मेजर आहे. (ज्यात जवळजवळ सगळच येतं. फेडचा एम२ = आरबीआयचा एम-३ असावा.) या केस (शून्य काळा पैसा) मध्ये जरी आरबीआयने कमी नोटा छापल्या तरी तो सेमच राहील (जर काळा पैसा शून्य असेल तर. नाहीतर जेवढा काळा पैसा नष्ट होईल तेवढा एम-३ पण कमी होईल). तुम्हाला कदाचित एम-३ मधला कमर्शिअल बँकांकडचा टाईम डिपॉझिट्स (वा टाईम डिपॉझिट्स + डिमांड डिपॉझिट्स) कंपोनंट अपेक्षित असावा. आणि नेमका तोच कंपोनन्ट एस्टीमेट करणं हाच सगळ्यात कठीण भाग आहे.

नितिन थत्ते Tue, 27/12/2016 - 15:28

एक प्रश्न .....
एका दोन हजार च्या नोटे बरोबर किमान १५०० रुपयांच्या (किंवा काही विशिष्ट रकमेच्या) लहान नोटा बाजारात असणे गरजेचे असते का?

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 18:15

आपल्या महान परंपरांचा जरा सन्मान करायला शिका!
कॅशलेस दक्षिणा शास्त्रसंमत नाही - पंडे

महाकाल के पंडे कैशलेस दक्षिणा के लिए तैयार नहीं हैं। उनका तर्क है कि यह शास्त्रोक्त नहीं है। संकल्प के लिए यजमान के हाथ में नकद रुपए होना जरूरी है, इसके बगैर संकल्प पूरा नहीं हो सकता, हालांकि उन्होंने नोटबंदी का समर्थन किया है

वेगळ्या शब्दांत - शिवाजी जन्मावा, पण इतरांच्या घरात.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 18:23

In reply to by चिंतातुर जंतू

http://www.businessinsider.com/worst-science-health-myths-2016-1?IR=T/#…
====================
तो जो कोणी पंडा आहे आहे त्याचं धर्मात जे स्थान आहे त्यापेक्षा ही वैज्ञानिक सत्ये पसरावणार्‍या डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ इ इ चं स्थान आपापल्या क्षेत्रात अतिशय उच्च आहे. सबब कोणते क्षेत्र अधिक येडझवे आहे ते सहज कळावे.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 18:33

In reply to by अजो१२३

>> तो जो कोणी पंडा आहे आहे त्याचं धर्मात जे स्थान आहे त्यापेक्षा ही वैज्ञानिक सत्ये पसरावणार्‍या डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ इ इ चं स्थान आपापल्या क्षेत्रात अतिशय उच्च आहे. सबब कोणते क्षेत्र अधिक येडझवे आहे ते सहज कळावे.

मुद्दा नीटसा कळला नाही. लेखाचं शीर्षक आहे : 101 things you thought were true, but have actually been debunked by science. मग येडझवं कोण आहे नक्की?

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 18:42

In reply to by चिंतातुर जंतू

अहो तेच तर म्हणतोय. कोण्या पंड्याने म्हटलेले जर परंपरा, धर्म ठरत असेल तर कोण्या तथाकथित शास्त्रज्ञांनी केलेली ही 'संशोधने' देखिल विज्ञान ठरायला पाहिजे. ही १०१ वी थॉट मंजे काय? आमच्या डोक्यात आलं कुठुन हे सगळं? पेपरातून आणि वाचण्यातून ना? कि मंदिरात सांगतात यातलं/असलं काही? An apple a day keeps the doctor away हे मी शाळेत शिकलो का मंदिरात? मग आता मी शाळेला बदनाम करत फिरतोय का? समजून घेतो ना?
========================
अशा पंड्यांची अशी विधाने धर्म सुद्धा व्यवस्थित डिबंक करतो. फक्त धर्मसंस्थेची योग्य ती पाने वाचायला शिका.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 18:46

In reply to by अजो१२३

>>कोण्या पंड्याने म्हटलेले जर परंपरा, धर्म ठरत असेल

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकाळेश्वर मंदिरातल्या पंड्यांना तुम्ही यःकश्चित ठरवताय. नक्कीच तुम्ही पुरोगामी असणार.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 18:54

In reply to by चिंतातुर जंतू

अहो, स्टीफन हॉकिंग (किंवा साठी बुद्धी नाठी जे काय त्याचे खरे नाव) म्हणालेला कि हिग्ज बॉसॉन (उच्चार टंकताना काळजी घ्यावी लागते) दिसेल त्याक्षणी प्रकाशाच्या वेगाने ब्रह्मांड नष्ट होईल. आता बरीच वार्षे लोटलीत नी आपण सुसंवाद करतोय, कोणाला काही झालं नाही. जर जगातल्या सर्वात महान विज्ञानमार्तंडाला शुद्ध वैज्ञानिक गाढबपणा माफ असेल तर विविध भारतीय धर्मशाखांमधल्या अनेक महान लोकांना हा पंड्या कोण झंड?

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 19:11

In reply to by अजो१२३

काही शास्त्रज्ञ येडझवे असतात ह्याविषयी बहुतेक आपलं एकमत आहे. त्यामुळे प्रतिवाद करण्यासारखं त्यात काही नाही. काही पंडे येडझवे असतात ह्याविषयीही आपलं एकमत असावं असं आता दिसतंय. बाकी वाचनीयता म्हणाल, तर एक अजो ऐसीच्या वाचनीयतेसाठी काफी आहे.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 19:03

In reply to by चिंतातुर जंतू

नक्कीच तुम्ही पुरोगामी असणार.

घटनेत लिहिलेली, घटनेत लिहायला विसरलेली, अन्यत्र लिहिलेली कोणतीही महान मानवी मूल्ये अंमलात आणायला, मानवतेचं कल्याण साधायला धर्म असो, परंपरा असो, विज्ञान असो, कायदा असो वा अजून काहीही असो जे काही वाकवायला लागेल तितकं मांडायला/मोडायला माझं मत अनुकुल आहे. त्या अर्थाने मी स्वतःला पुरोगामी मानतो, भलेही ते ऐसीच्या व्याख्येत न बसो वा बसो.
================
लायटर नोट -
ऐसीवर प्रतिगामी रोल करणे एक भन्नाट काम आहे.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 18:45

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय तुम्ही (अगोदरच आदराने झुकलेले असल्यामुळे) परस्परविरोधी शोध लावणार्‍या महान आणि अतिमहान शास्त्रंज्ञांचा असा आनंद घेताना दिसत नाही.

अनामिक Thu, 29/12/2016 - 08:44

In reply to by चिंतातुर जंतू

सरकारबरोबर माझ्यासारख्या कित्येकांचा अपे़क्षाभंग झालाय जंतू. तोंडावर आपटलं तरी सरकार काही ऐकत नाही.... नवीन अध्यादेश काय काढतंय... सगळा मूर्खपणा चाल्लाय!

अजो१२३ Fri, 30/12/2016 - 00:19

In reply to by अनामिक

अपेक्षाभंग? तोंडावर आपटलं? काशामुलं मनायचं भाउ?
==================
तुमी कु़ंकडचे अर्थतज्ञ? पोस्ट ८ नोवे?

सरकारचा लेटेस्ट फतवा : खबरदार! जुन्या नोटा बाळगू नका; अन्यथा दंडात्मक कारवाई

तुरूंगात नाही जावं लागणारे. पण शिक्षा कशासाठी? त्यामागे काय लॉजिक आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 30/12/2016 - 02:25

In reply to by अस्वल

माझा अडाणी अंदाज - पुरेशा लोकांनी जुन्या नोटांचा चलन म्हणून स्वीकार केला तर जुन्या नोटांची किंमत तशीच राहील किंवा थोडीच कमी होईल. पण समांतर अर्थव्यवस्था चालू शकेल. या विषयात गती असणारे लोक कदाचित आणखी चांगले तर्क मांडू शकतील.

अनामिक Thu, 29/12/2016 - 11:53

In reply to by चिंतातुर जंतू

त्रास सगळ्यांनाच झालाय चिंजं; शेतकरी, कास्तंकार, छोटे व्यापारी, आणि हातावर पोट असणार्‍यांना सर्वात जास्तं. पण हे ही खरयं की तक्रार करणारे खूप कमी आहेत. तरी लोकांचा पेशंस संपतोय, आणि सरकार उपाय शेधण्यापे़क्षा नवनवीन नियम काढतेय!

नितिन थत्ते Thu, 29/12/2016 - 11:59

In reply to by अनामिक

>>हे ही खरयं की तक्रार करणारे खूप कमी आहेत.

+१.

५० दिवस साथ द्या- दिली. आता रांगांची सवय झाली.

गब्बर सिंग Thu, 29/12/2016 - 22:33

India’s Demonetization Policy Triggers Famine In Rural Areas -

...are trying to adapt to demonetisation by eating less, the cash shortage in the Roddam branch of Canara Bank that has shaken many families in the village is not the main concern in the SC colony. “We don’t have much money with us. All we want is some work,” says Narayanappa.

माओ ची "ग्रेट लीप फॉर्वर्ड" आठवली.

गब्बर सिंग Tue, 10/01/2017 - 01:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नमोनम: लई च चु* बना रहा है लोगोंको !!!

(असे माझी एक मैत्रीण म्हणाली ... नुकतेच)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/01/2017 - 21:22

In reply to by अनुप ढेरे

५४००० रुपये प्रतिकिलो हा दर गंडका आहे, हे मला सहज समजतं. त्या आकड्यात मुद्दाम गोलमाल केला नसेल, ती हातच्यांची चूक असेल किंवा काही. पण आता जे सुधारित आकडे प्रकाशित केलेले आहेत त्यांत अशी 'ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड' चूक नसेल तर ते योग्य का अयोग्य हे मला समजणार नाही. पण एकदा अशी धडधडीत चूक करणारे लोक पुन्हा योग्य माहिती प्रकाशित करतील का नाही, अशी शंका यायला सुरुवात होते. (त्यातून मी पडले शंकासूर आणि राज्यकर्त्यांच्या राजकीय विचारसरणी-विरोधी विचार करणारी.)

केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी 'ट्वीट' केलेल्या प्रत्येक आकड्यावर मला शंका वाटेल. सोम्यागोम्यानं असं केलं ठीकच, पण केंद्रीय मंत्र्याबद्दल असा अविश्वास वाटू नये. ही आदर्श व्यवस्था असेल.

म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावतो.

नितिन थत्ते Tue, 10/01/2017 - 15:44

Govt takes bold decision to demonetize....