कार्ला कट्टा
मी भूतमूल असे काहीतरी लिहितो, बाकिच्यांनी एडिटावे.
-------------------------------------------------------
आम्ही जेव्हा कट्ट्याला पोचलो तेव्हा पोचण्याआधी देखिल जवळजवळ एकत्रच होतो कि काय असे वाटले. मंजे पुण्याहून सगळे एकत्र आलेलो तेव्हा कट्टा अधिकृत वेळेआधी चालू झालेला. मग कुठून तरी अचरट अवतरले व मला कळले कि एक वयस्कर माणूस देखिल अचरट सारखे नामाभिधान घेऊ शकतो. जागेचा चॉइस त्यांचा होता नि (किमान आम्हा दिल्लीकरांच्या दर्जाने) नयनरम्य जागा होती.
===============
चर्चा झालेले विषयः
१. जलनिस्सारण तंत्रे
२. स्वयंप्रकाशित शैवालके
३. Ratio of invitees and attendees in a Kokanastha marriage
४. १९८० चे भीमाशंकर
५. पुरोगामी लोकांनी केलेले अपप्रचार
६. केंद्र सरकारचे कर्ज व्यवस्थापन
७. शासकीय योजनांची नफाशीलता
८. मनोबीय कट कादंबरी
९. संजय सोनवणी यांचा लेख
१०. भारतीय धर्मांतरांचा इतिहास
११. नव्या व जुन्या नोकर्यांतील (न आढळलेले?) फरक
१२. Procurement philosophy: by Acharat et all (2017)
१३. ब्राह्मण लोकांचे देशाच्या विविध भागांतील वर्गीकरण
१४. मराठी संस्थळांतील स्पर्धा
१५. संस्थळावरील सदस्यांच्या ओळखीपाळखी
१६. दारुचे व्यवन
१७. (अखंड?) भारत इस्लामिक बनलाय का नाही? का?
१८. नथूराम गोडसे
१९. मराठ्यांचे ऐतिहासिक रेप्यूटेशन
२०. बालाजी तांबे
================
अन्न बर्यापैकी लिमिटेड व्हरायटीजचे होते आणि बेचव होते. (तिथेच अचरटांना सांगायची हिंमत झाली नाही.). पार्किंग शांतता, झाडी, इ इ खूप छान होतं. कुटुंबासहित आले (कि आलो) असते तरी चाल्ले असते. मनोबा त्याची ४० कोटीचे हिरे असलेली बॅग घेऊन आलेला म्हणे. बापट सर आणि माझे सूत मस्त जुळले. तरी त्यांनी माझ्यावर प्रतिगामी नसल्याचा लांछनास्पद आरोप केलाच. नशीब म्हणावं. लोणावळ्याला जाउन चिक्की घेऊन कट्टा संपवला. बहुतेक बापटांना आणि मनोबाला झोप येत असताना मी अजून सिलॅबस संपला नाही मोड मधे त्यांना जागे ठेवले.
=============
व्यक्तिगत कामांमुळे, दूर असल्याने इ इ आलो नाही असे लोक म्हणत असले तरी काही अजोसारख्या ड्यांजर मानसापास्नं दूर राहायला पाहिजे असा विचार करत कट्ट्याला बगल देणारे असावेत असा विचार पिंगा घालायचे सोडत नाहेय.
अदिती, कोकणस्थ असे कोकणस्थ
अदिती, कोकणस्थ असे कोकणस्थ तसे असे माझा भाऊ म्हणत असतो. पण मला काही कधी पुराणांमधला खंग्री को़कणस्थ भेटलाच नाही. आजकालची लग्ने, त्यांचे वेळ, मीन्यू असा विषय निघाला. अचरट सांगत होते बरंच काही काही. ते बापटांना सांगत असल्यामुळे त्यांना ते लक्ष देऊन ऐकावंच लागत होतं. बापटांनी एक कोकणस्थ लग्नाचा किस्सा सांगीतला. सकाळी त्यांचे कोणी शेजारी - मोजून तीन - नवरा, बायको नि मुलगी नि तीन बॅगा घेऊन जाताना दिसले. बापटांनी "कुठे?" म्हणून विचारल्यावर त्या पोरीचे लग्न आहे हे कळले. "बाकीची तयारी?" त्यावरही त्यांनी " पाहुणे शहरातलेच आहेत, येतील आपोआप वेळेवर" इ इ टिपिकल कोकणस्थी उत्तरे मिळाली. तास दोन तासानी पुन्हा नवरा, बायको नि दोन बॅगा घरी येताना दिसले. बापटांनी प्रश्न केला - "काय?". उत्तर - "झालं ना. एक बॅग आणि एक पोरगी कमी! लग्न संपलं"
मग पुन्हा अचरटांचा किस्सा चालू झाला. त्यांचा टोन थोडा टिपिकल आहे नि पकडायला वेळ लागत होता. ऑफिस - मित्र - आमंत्रण - पत्रिका - फोन - १०० -१०० -१०० असं काहीतरी ऐकू आलं. मी चौकशी केली. तर कळलं कि कोण्या कोकणस्थाने शंभर निमंत्रणे दिली. तर मोजून शंभरच लोक लग्नाला हजर होते. आणि तेच्च फक्त बोलावलेले लोक. नो सबस्टिट्यूट. (बहुतेक एखादा जास्त आला असता उपाशी परत पाठवला असता असं त्यांना म्हणायचं असावं.)!! आम्ही लातूरकर चाटच!
मळवली एमटिडीसी कट्टा
मळवली एमटिडीसी कट्टा थोडक्यात:-
हो ना हो करत फक्त चारच जण येताहेत हो असं अण्णांचा निरोप आला. म्हटलं घाबरु नका उत्सवमूर्ती येतेय मग तर झालं.
ठरल्या वेळेच्या अर्धा तास अगोदरच अरुणजोशी, A.N.Bapat आणि मन तिघे पुणे मुंबई रस्त्याने आले तेव्हा गाडीतच काही चर्चा झालेली.मी मळवली स्टेशनकडून पावणेअकराला आलो आणि लगेच रेस्टारोंमध्ये चहावड्याने सुरुवात केली. चौघे प्रथमच एकमेकांस पाहात होतो. जागा कट्ट्यासाठी चांगली आहे मत पडले.{ वेटरने तीन चारवेळा ओर्डर दिली का? गिळलंत ना? आता लवकर टेबल रिकामे करा वगैरे तंबी देण्या अगोदरच बाहेर पडलो}
बाहेरचा परिसर एमटीडीसीचाच असल्याने लगेच बाहेर पडून ठिकठिकाणी ठेवलेल्या बाकड्यांवर बसत गप्पा सुरू झाल्या.
विषय अर्थातच पुरोगामी प्रतिगामी. नंतर नदीकाठच्या झाडीत पाचोळ्यावर बसून दीड तास किस्से कथन झाले.पुरोगामी चर्चा थोड्या सूक्ष्म पातळीवर (brass tacks level) -कोब्रा/देशस्थ कडे नेताना लातूरकडचे अरुणजोशींचे फ्लेवर मी प्रथमच ऐकत होतो. सदाशिवपेठ संस्कृतीवर बापटअण्णा बोलले. जसे कोलकाताला गेल्याशिवाय बोंगाली विश्व समजणे अवघड आहे तसं पेठेत दोनचार वर्ष राहिल्याशिवाय पेठ कळणार नाही. मनोबा थोडा गप्प होता कारण त्याच्या वयाचे कोणी नव्हते. तरी अण्णांशी त्याचे सूत जमले अन आइटीवाल्यांचे विश्व त्याने उघड केले. माझ्या पिढीला इंटरनेट थोडे वय उलटल्यावर हाताशी लागले हे पदोपदी जाणवते आणि ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये तरुणांना फुकटचे सावधगिरीचे सल्ले देणारे काका ही भुमिका मी करतोय हे वाटत राहाते. कट्ट्याला मोठा ग्रुप जमला असता तर मौन साधता आले असते परंतू मी धरून चारजणच असल्याने मीपण चारदोन वेळा पुरे म्हणतील इतकी लांबड लावली. दीड वाजता परत रेस्तारोंकडे जाऊन पोटोबा केला. तीन वाजता लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याकडे जाऊन चिक्क्या घेऊन शेवट गोड केला.
१ ) {मी} अचरट आणि अरुणजोशी.

२ ) कालच्या मिनीकट्टा मळवली एमटीडीसीची जागा.इंद्रायणी नदी,बंधारा ,मागे दाट झाडीत कार्ला एमटीडीसी .

३) एमटीडिसी रेस्टारोंमध्ये {डावीकडून} श्री अरुणजोशी, मन आणि A.N.Bapat.

४ ) {मी} अचरट आणि अरुणजोशी. नदीकाठच्या झाडीत.

५ ) मन ,{मी}अचरट.

६ ) लाल प्रतिगामी, आडव्या उभ्या पट्ट्यातले स्मार्त (स्मार्ट) पुरोगामी यांचे एकमत झाल्यावर.

--------------------------------------------------------
अरुणजोशींकडून
१ ) इंद्रायणी नदीच्या बंधाय्रावरून पाठमोरे अचरट,मन,A.N.Bapat.

२ ) अचरट

३ ) मनोबा

४ ) डिजाइनर अँगलमधून मनोबा.

५ ) अचरट,मन, बापट. प्रतिगामी चर्चा देवळाच्या पार्श्वभूमीवर.

६ )

७ ) परिसर

८ ) बापट,मन.

>>>अजो, मदिरापान करणारे कुणी
>>>अजो, मदिरापान करणारे कुणी होते काय, ग्रुपमधे ?व्हिस्की/बियर्/टेकिला/रम्/ब्रँडी/व्हडका/वाईन .
हे सर्व आवडीने घेणारा मी बहुधा एकटाच होतो . ( अरुण जोशी पण ह्यातले असावेत असा उगाचच संशय आला) एकटाच असल्याने मी हा प्रस्ताव मांडला नाही .
आपण इथे आलात कि भेटा , मनोबाला काजू बदाम वगैरे चखना खायला लावायचा कार्यक्रम ठरवू शकतो . ( आपल्याशी बऱ्याच , म्हणजे बहुतेक सगळ्याच विषयांवर मतभेद आहेतच , ते ही मद्याबरोबर उरकून घेता येतील !!!!)
चित्र क्रमांक तीन मध्ये मी
चित्र क्रमांक तीन मध्ये मी अख्खा मनोबा कॅप्चर केलाय. "मनाशी टाकिले मागे गतीशी तुळना नसे, आणोपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे" अशा हनुमन्तालादेखिल लाजवेल असा विराट मनोबा! पण खूप शांत होता त्यादिवशी म्हणून कॅप्चर झाला असावा. बापटांनी त्याला त्याच्या शक्तीची जाणिव करून देऊन आसमंती भरारी घ्यायला सांगीतले पण एखादी लहानशी ढांग सोडता कोणते अॅरोबिक्स पाहायला मिळाले नाहीत.
फोटो पहायला फार मजा येते
फोटो पहायला फार मजा येते :)
____-
एकंदर चर्चेचा आवाका विशाल वाटतोय. - स्वयंप्रकाशित शैवले काय न काय न काय.
___
च्यायला दर फोटोत ते बटाटेवडे तस्से टोणगे आणि ढोले च्या ढोले. कोणी खार्ल्लेत तरी का? की आपले फोटोंपुरता मागवलेले :)
_________
आहा देऊळ किती गोड दिसतय. गेलात की नाही?
अरे मनोबा भीतीदायक अशा
अरे मनोबा भीतीदायक अशा शांतपणे आणि एकाग्रतेने चर्चा ऐकतो. म्हणजे कोणत्याही नवबडबडाधिकारप्राप्ताला आपण खरेच फार विद्वान आहोत अस्सेच वाटावे असा माहौल बनवतो. अगदी ज्या विधानाला ऑब्जेक्शन घ्यायला हवं तिथेही आश्चर्यकारकरित्या मान डोलावतो. आम्हा थोरल्या तिघांना तो लहान, गुणी, आज्ञाधारक, ज्ञानपिपासू आहे असे भासवतो. मात्र मधे मधे इकडे तिकडे पाहून त्याला झालेले आश्चर्य लपवताना मी पाहिले आहे. शिवाय तो सगळे कट्टे श्रद्धेने करतो (प्रत्येकाच्या श्राद्धाला जाणारे लोक असतात तसे). आणि या सगळ्याचं काहीही स्पष्टीकरण त्याच्याकडे नाही. मनोबीय निरीक्षणबुद्धीचं भय मला अगोदरपासूनच आहे. मंजे मुलगा खत्तरनाक हुश्शार आहे नि बहुतेक लपून "मला भेटलेल्या मूर्खांच्या चर्चा" अशी कादंबरी भेजा फ्राय लाइनवर लिहित आहे.
अनुमोदन
>> अरुण जोशीन् वर मी प्रतिगामि नसल्याचा आरोप केला नाही. माझ्या मते ते कट्टर पुरोगामी आहेत. प्रतिगाम्याना गाफिल आणि पुरोगाम्याना एलर्ट रहावे म्हणुन ते जे काही लिहीतात ते लिहीतात.
अजो आणि बॅट्या पुरेपूर पुरोगामी आहेत हे माझं जुनंच मत आहे. बापटांनी अनुमोदन दिल्यामुळे खात्री पटली. बापट आता पुढच्या कट्ट्यात बॅट्याला भेटा आणि मग तुमचं मत ऐकवा.
(कट्टा पुण्यात केलात तर थोडा वेळ येऊन जाईन हे वचन मी बापटांना दिलं होतं. अजोंनी आपल्या उपस्थितीमुळे लोक गळल्याचा माज करू नये!)
अजोंनी आपल्या उपस्थितीमुळे
अजोंनी आपल्या उपस्थितीमुळे लोक गळल्याचा माज करू नये!
मी पुरोगामी आहे असा (सनातन) गैरसमज असल्यामुळे तुमचं तसं नसेल हो, पण देव जाणो कशामुळे मला वाटत राहतं कि खूप ऐसीकर मला "अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे तोटे" या सदराखाली गिनत असावेत.
===========
बाय द वे, तुम्हाला गैरसमज असल्याचा समज अगोदरच नै का कन्व्हे करायचा राव.
माझ्या मते कट्ट्टयाला
माझ्या मते कट्ट्टयाला असलेल्या लोकांची आदर्श संख्या सहा ते आठ. पण बहुतेक वेळा खूप लोकांना एकदम भेटता यावं म्हणून मोठ्ठा ग्रुप बरा पडतो. पण मग लग्नात समोर येणाऱ्यांना हसून नमस्कार करायचा आणि दोन शब्द बोलायचे इतकंच करणं कधीकधी जमतं. कमी लोकं असले की एका टेबलावर बसून सगळ्यांना एका ग्रुपमध्ये बोलता येतं. त्यामुळे चार लोक थोडे कमीच असले तरी कट्टा इंटिमेट झाला असणार याबद्दल खात्री आहे.
फोटोपैकी अचरट यांचा बाकावर बसून हात विस्तारून 'हे, एवढं मोठं...' असं काहीतरी सांगतानाचा फोटो भारी. अरुणजोशींचे फोटो सगळे फारच विचारमग्न आलेले आहेत. बापटअण्णा सतत काहीतरी मांडवली करण्याच्या पोझमध्ये. पण सगळ्यात आवडला म्हणजे मनोबाचा पारावर उभा राहिलेला फोटो. 'ती तिकडची पारंबी पकडून जर जोराचा झोक घेतला तर पलिकडच्या इलेक्ट्रिकच्या खांबाला हात लावता येईल का? लावल्यास किती उंचावर लागेल?' अशी काहीतरी कॅल्क्युलेशन्स चालू असावीत.
'ती तिकडची पारंबी पकडून जर
'ती तिकडची पारंबी पकडून जर जोराचा झोक घेतला तर पलिकडच्या इलेक्ट्रिकच्या खांबाला हात लावता येईल का? लावल्यास किती उंचावर लागेल?' अशी काहीतरी कॅल्क्युलेशन्स चालू असावीत.
स्वतःबद्दल सर्वात कमी माहिती असलेला प्राणी म्हणजे मनोबा. त्याच्याबाबत 'असा विचार का केलास रे मनोबा वा असं का केलंस रे मनोबा' या प्रश्नाचं उत्तर 'मैत नै' असं असण्याची शक्यता ५१% असते. शिवाय असं मैत नसणं थोडं हटके आहे याची जाणिव त्याला अद्यापि नाही.
अरुणजोशींचे फोटो सगळे फारच विचारमग्न आलेले आहेत.
वैचारिक कमतरता लूक्सनि भरून काढायचा भाबडा प्रयत्न.
बापटअण्णा सतत काहीतरी मांडवली करण्याच्या पोझमध्ये.
नै हो. ते मात्र सर्वात कूल होते. पण ते पारावर वा बाकावर वा पाचोळ्यावर बसण्यापूर्वी बराच अनालिसिस करतात म्हणून असे वाटले असावे. (ह. घ्या)
हायला भारी झाला कट्टा. मनोबा
हायला भारी झाला कट्टा.
मनोबा बेसिकली भक्तीभावाने युक्त असा श्रोता दिसतोय. त्याचा चेहरा फोटोजेनिक आहे.
बापटाण्णा त्या पोलीस कमिशनरचे काम करणार्या मराठी अॅक्टरासारखे दिसताहेत. (अॅक्टराचे नाव आठवेना)
जोशीसाहेब कुठल्याही अँगलने जोशी वाटत नाहीत. यादव अथवा झा असावेत.
अच्चुकाका बघून माहीत झालेले आहेत. ते तसेच आहेत.
व्यक्तिगत कामांमुळे, दूर
व्यक्तिगत कामांमुळे, दूर असल्याने इ इ आलो नाही असे लोक म्हणत असले तरी काही अजोसारख्या ड्यांजर मानसापास्नं दूर राहायला पाहिजे असा विचार करत कट्ट्याला बगल देणारे असावेत असा विचार पिंगा घालायचे सोडत नाहेय.
आपल्या असण्यानसण्याने लोकांचे निर्णय बदलु शकतात इतके आपण प्पावरफुल आहोत असा आत्मविश्वास कुठून येतो हो अजो तुमच्यात? ;) (ह. घ्यालच)
बाकी, कट्टा पुण्यातच ठेवला असतात तरी येण्याचे जमले नसते. तेव्हा माझे सोडा - मात्र सगळेच पुण्यातले असूनही मुंबई-पुण्याच्या मध्यावर कट्टा घेण्याने संख्या थोडी तरी नक्की घटली असावी असा माझा कयास!
मात्र, जागा छान वाटतेय. कट्ट्याच्या गप्पांच्या विषयाच्या यादीला अर्थ नसतो. मजा तपशिलात असते आणि ती फक्त उपस्थितांनाच मिळते! ;)
आपल्या असण्यानसण्याने लोकांचे
आपल्या असण्यानसण्याने लोकांचे निर्णय बदलु शकतात इतके आपण प्पावरफुल आहोत असा आत्मविश्वास कुठून येतो हो अजो तुमच्यात?
प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सोयीस्कर असा अर्थ काढावा असे माझे सूत्र आहे. आणि कारण असो नैतर नसो, गावाकडच्या गड्याचा आत्मविश्वास लै भारी असतो; तुम्हाला अनुभव नाही म्हणून काय झालं? अहो मी काही मॉनिटरमधून अवतरत नाही, तरी लोक धाग्यांवर मला प्रतिसाद द्यायची किटकिट नको म्हणतात. मग असा आमने सामने अजोला झेलणे मंजे विचार करायला लावणारीच गोष्ट आहे.
====================
बाकी कट्टा घेण्यास सुयोग्य जागा असा देखिल एक विषय झालेला. त्यात (मला माहित नसलेले) कोणते तरी पॅराडाइज म्हणून गलबल्याचे हॉटेल आहे, तसल्या जागी न ठेवता शहरांपासून दूर नयनरम्य जागी ठेवावा असे एकमत झाले.
मागे न आठवलेले पण चर्चिले
मागे न आठवलेले पण चर्चिले गेलेले विषयः
१. घार आणि (पौराणिक?) गरुड यांचेतील फरक
२. आर एस एस प्रचारकाच्या कन्येचे परधर्मीयाशी लग्न
३. अजोची कोकणस्थ या शब्दाशी ओळख कशी झाली
४. तंत्रज्ञान आणि अचरट यांची रिलेटिव वेलॉसिटी
५. मराठी संस्थळावर आपण कसे धडकलो, कधी?
६. मराठी आंतरजालावरील प्रसिद्ध हेवे दावे
७. अनु राव स्त्री आहेत काय? (त्यांच्या ड्यू आयडी असल्याचा नसल्याचा शोध, बाकी कै नाही.)
---------
मी अजून काही फोटो फेसबूकवर टाकलेत. सदस्यांना फोटो पाहायला आवडते असे दिसते. अचरटांनी ते इकडे आणावेत ही विनंती.
लोणावळ्यात बंगला(ले) घेऊन
लोणावळ्यात बंगला(ले) घेऊन साग्रसंगीत ओव्हरनाईट कट्टा अरेंज करायचा असल्यास सांगा.
हा फक्त पुरुषांसाठी असावा.
यात (बहुतांश) स्त्रियांना मज्जाव असावा.
( मज्जाव का असावा त्याची कारणे स्त्रियांना सांगणे हे पुरुषांसाठी बंधनकारक नसावे. "कारणे सांगणे बंधनकारक नाही" ह्याचे कारणही सांगणे पुरुषांसाठी बंधनकारक नसावे. )
हा फक्त पुरुषांसाठी असावा.
हा फक्त पुरुषांसाठी असावा.
(प्यायल्यानंतरही स्ट्रेट) पुरुष ओव्हरनाईट/एकांतात/दूर जाऊन जे जे करतात तिथे इतर समानशील स्त्रिया(लग्नाच्या/बिनलग्नाच्या/किंवा कशाही समानशील शब्द महत्त्वाचा) असल्याने नक्की काय फरक पडतो?
का गब्बरशी समानशील बाई जन्माला यायचीये असे काही आहे? :प











आणखी गॉसिप हवं.
कोकणस्थांची लग्नं, बालाजी तांबे आणि मनोबाकडे असलेली हिऱ्यांची बँग या दोन विषयांवर आणखी गॉसिप हवं. फोटो इथे लावा की!
--
पारंपरिकरीत्या, म्हणजे १९९१च्या नंतरच्या काळात, एमटीडीश्यांबद्दलचं माझं मत असं की त्यांचं ठिकाण अतिशय सोयीचं आणि नयनरम्य ठिकाणी असतं. आतल्या परिसराची काळजीही व्यवस्थित घेतलेली असते. राहण्याची सोय समाधानकारक असते. पण अन्न सर्व भारतीयांना लाज आणेल असं असतं. अजोंशी या बाबतीत मत जुळलं म्हणजे जगबुडी आली म्हणावं का कसं?