Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.

यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---

मुंबईतील पुराच्या निमित्ताने काही प्रश्न डोक्यात आले. दरवर्षी म्हणा किंवा दर काही वर्षांनी म्हणा, मुंबैत असा मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होते. सगळीकडे पाणी तुंबते वगैरे वगैरे. आता मुंबैचा इतिहास पाहिला तर साष्टी बेटाच्या दक्षिणेस असलेली सात बेटे एकत्र जोडून मुंबई तयार करण्यात आलेली आहे. यापैकी जो भाग समुद्र रिक्लेम करून मिळवला तिथे इतर "मूळ" भूभागाच्या तुलनेत पाणी जास्त तुंबते असे काही आहे का?
शिवाय अशावेळेस ब्रिटिश एरिया उदा. फोर्ट इ.इ. भागात पाणी तुंबत नाही असेही अधूनमधून कानावर येत असते. हे खरे आहे का? असेल तर याचे कारण काय?

अनु राव Wed, 30/08/2017 - 10:20

जीएसटी जुलै महिन्यात ९१००० कोटी जमा झाला म्हणे. जो जवळपास मंथली टॅक्स च्या टार्गेट च्या इतका होता.
१. म्हणजे सर्व सिस्टींम अपेक्षेप्रमाणे पहिल्या महिन्यातच चालु लागल्या की काय?
२. जो बागुलबुवा निर्माण केला होता तो झोपलाय की काय? का मोदी खोटे आकडे सांगतायत.?
३. आता लोक म्हणतायत की ऑगस्ट मधे तर अजुन जास्त टॅक्स जमा होइल कारण पहिल्या महिन्या पेक्षा अजुन जनजागृती आणि सुधारणा झाल्या असतील.
४. जर टॅक्स कलेक्षन खरंच वाढले तर तितक्या प्रमाणात काळी अर्थव्यवस्था गोरी झाली असे म्हणायचे का?

थत्तेचाचा, बापटण्णा, आणि जंतुंची मते अपेक्षीत. ढ्रेरेशास्त्री, अजो, गब्बु, संपादक आबा ह्यांनी नाही मते दिली तरी चालतील कारण ती मोदींच्या बाजुनी बायस्ड असतील.

अबापट Wed, 30/08/2017 - 10:39

In reply to by अनु राव

१. म्हणजे सर्व सिस्टींम अपेक्षेप्रमाणे पहिल्या महिन्यातच चालु लागल्या की काय?
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ?
टॅक्स भरणे वगैरे या बाबतीतील असेल तर ते अजून संपले नाहीयेत . २० ऑगस्ट शेवटची तारीख होती भरायची .त्याच्या आदल्या दोन दिवस बराच काळ
सरकारी वेबसाईट बंद होती . त्यामुळे बहुधा तारीख वाढवली गेली २५ पर्यंत . आजच्या घडीला सर्व सिस्टिम्स व्यवस्थित चालू नाहीत . भरपूर मनस्ताप झाला . पण हे घोळ काळाच्या ओघात ठीक होतील अशी अपेक्षा आहे . खरी मजा पुढच्या महिन्यात आठवड्याला एक रिटर्न चालू झाला कि कळेल . तेव्हा खरे
उत्तर देता येईल .

२. जो बागुलबुवा निर्माण केला होता तो झोपलाय की काय? का मोदी खोटे आकडे सांगतायत.?
म्हणजे काय कळले नाही . खोटे आकडे सांगता आहेत का अशी शंका का आली तुमच्या मनात ?

३. आता लोक म्हणतायत की ऑगस्ट मधे तर अजुन जास्त टॅक्स जमा होइल कारण पहिल्या महिन्या पेक्षा अजुन जनजागृती आणि सुधारणा झाल्या असतील.
माहित नाही .
४. जर टॅक्स कलेक्षन खरंच वाढले तर तितक्या प्रमाणात काळी अर्थव्यवस्था गोरी झाली असे म्हणायचे का?
हे कसे ते जरा विस्ताराने सांगाल काय ?
( अवांतर : काळी अर्थव्यवस्था तर नोटबंदीमुळे संपली होती ना ? मग आता कुठली गोरी झाली ?)

अनु राव Wed, 30/08/2017 - 10:51

In reply to by अबापट

१. ओके, म्हणजे रिटर्न भरण्याचे नीट चालतय की नाही हे अजुन कळायचेच आहे. पॉइंट नोटेड्
२. मोदी गेल्या जन्मी स्टॅटिस्टीशिअन असावेत अशी शंका आहे. ते आकडे त्यांना सोयीस्कर रितीने सांगतात असा समज आणि थोडा अनुभव आहे. तसेच ते सर्वात आधी आकडे फेकुन पॉइंट स्कोर करतात. नंतर त्यावर कितीही चर्चा झाली तरी त्यांना मिळालेला पॉइंट तसाच रहातो. ( ही हुशारी आहे हे मान्य केलेच पाहिजे. ).
३. ....
४. जर कर संकलन वाढले असेल ( खरंच ) तर त्याचा अर्थ लोकांना व्यवहार जाहिर करावे लागले आहेत. जे कदाचित पूर्वी केले जात नव्हते. त्याचा इम्पॅक्ट थेट करांवर ही होइल...
--------

काळी अर्थव्यवस्था तर नोटबंदीमुळे संपली होती ना ?

हे अजोंचे मत आहे. माझे नाही.

चिमणराव Thu, 31/08/2017 - 06:27

In reply to by अनु राव

मोठे व्यावसायिकांना माल पुरवणारे छोटे पुर्वी टॅक्समध्ये गोलमाल करत असावेत. मोठ्यांनी जिएसटी बिलचा आग्रह केला असेल ओफसेट मिळण्याकरता।.
हे माझे मत नाही, नागदेवी स्ट्रीटच्या ओळखीच्या व्यापाय्राने सांगितलेल्या माहितीवर आहे. "नाना वेपारिओना काम बंध पडी गयु छे। एलोकोने जिएसटी करवूज पडशे।"

नितिन थत्ते Thu, 31/08/2017 - 11:27

In reply to by अनु राव

>>थत्तेचाचा, बापटण्णा, आणि जंतुंची मते अपेक्षीत

मी "नोटबंदीसारखं डिसरप्शन झालेलं दिसत नाही असं सरकार धार्जिणं मत पूर्वीच व्यक्त केलं होतं.

अजो१२३ Fri, 01/09/2017 - 13:33

In reply to by अनु राव

जर टॅक्स कलेक्षन खरंच वाढले तर तितक्या प्रमाणात काळी अर्थव्यवस्था गोरी झाली असे म्हणायचे का?

होय. अर्थव्यवस्था वाढ ५% ची ४% झाली नि कर तितकाच जमा झाला तर दुसरा काय अर्थ निघतो?

गब्बर सिंग Wed, 30/08/2017 - 10:34

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकरांनी
त्यांच्या साठीनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या
प्रदीर्घ कारकीर्दीचा उल्लेख करताना अमिताभ बच्चन आणि
राजेश खन्ना हे आपल्याला (चित्रपटसृष्टीतील इनिंग्जच्या
लांबीच्या हिशोबाने) ज्युनियर, असं विधान केलं

.
.
असं खरंच बोलले सचिनराव ?
.
.

आदूबाळ Wed, 30/08/2017 - 10:41

In reply to by गब्बर सिंग

हो मग! पब्लिकने चेपुवर अशक्य ट्रोल केलंय म्हाग्रुना.

सिप्पी माझं मार्गदर्शन घेत असत, अमजद खानची कारकीर्द माझ्यामुळे वाचली, एके हंगल मला ज्युनियर होते, बिहारमध्ये प्रत्येक पोराला सात वर्षांचा झाल्यावर 'नदिया के पार' दाखवायची रसम आहे वगैरे अन्य तारेही आहेत (म्हणे).

१४टॅन Wed, 30/08/2017 - 11:07

In reply to by गब्बर सिंग

सगळीकडे हा इसम म्हाग्रू म्हाग्रू म्हणून ज्या ष्टायलीत भाषणं ठोकायचा तेव्हाच हे कळून चुकलं होतं की मराठीतला बच्चन, गेला बाजार ममवंचा शारुख व्हायची ह्याला आस लागली आहे.
चेपुवरच्या एखाद्या ट्रोलचा दुवा द्या प्लिज. हे दिसलं न्हाय कुटं.

चिंतातुर जंतू Wed, 30/08/2017 - 14:21

In reply to by गब्बर सिंग

>>अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना हे आपल्याला (चित्रपटसृष्टीतील इनिंग्जच्या लांबीच्या हिशोबाने) ज्युनियर<<

पिळगावकर पकाऊ आहेत हे मान्यच, पण वरील विधानात तथ्य आहे. बालकलाकार म्हणून सचिन फेमस होता. 'हा माझा मार्ग एकला'साठी (१९६२) आणि 'अजब तुझे सरकार'साठी (१९७२) त्याला राष्ट्रीय पुरस्कार होता. 'मेला', 'ज्वेल थिफ', 'ब्रह्मचारी' वगैरे हिंदी चित्रपटांत तो बालकलाकार होता.

चिंतातुर जंतू Wed, 30/08/2017 - 14:34

In reply to by बॅटमॅन

मराठी माणूसच मराठी माणसाची किंमत ठेवत नाही हेच यातून सिद्ध झालं शेवटी.

नाही. प्रौढवयात सचिननं आपली बालकिंमत कमी केली म्हणून त्याचं हसू झालं :-) बिचारा (पोट धरून किंवा रोटफल हसणारा) मराठी माणूस निमित्तमात्र हो!

१४टॅन Wed, 30/08/2017 - 14:59

In reply to by चिंतातुर जंतू

अडीच वर्षाचा असताना काम केलंय ना म्हणून अंकगणितानुसार तो सिनिअर. युनूस परवेझनी चारेकशे चित्रपटात काम केलंय म्हणून तो बलराज सहानी, अमिताभ, खन्ना, संजीवकुमारपेक्षा महान आहे. 'बनवाबनवी' हा मास्टरपीस आणि तीन चतुर्थांश 'गंमत जंमत' सोडला तर कायम चालू ठेवलेले बालिश प्रकार 'सातपुते'मधे पूर्णत्वास गेले.

जयंतराव विद्वांस ह्यांच्या भिंतीवरून साभार.

अनुप ढेरे Wed, 30/08/2017 - 11:16

म्हागुरुंनी स्वत:च्या हातानी हे ओढऊन घेतलं आहे. महागुरुंनी८०/९०मध्ये बनवलेले बरेच सिनेमे मला आवडतात. पण गेल्या दहा वर्षांतले सिनेमे आणि टीव्हीवर लाल करुन घेणे हे प्रकार अगदीच दयनीय आहेत.

गौराक्का Wed, 30/08/2017 - 11:20

In reply to by अनुप ढेरे

आदेश बांदेकर जुनियर महागुरु, तोतरा स्वप्निल (स्वतःला शारुक समजणार नंबर एक) पायचाटे पणाची हद्द , असले लोक डोक्यात जातात.

बॅटमॅन Wed, 30/08/2017 - 14:36

In reply to by गौराक्का

तरी वरिजिनल म्हाग्रू बराच बरा. म्हणजे अगोदर का होईना त्याने उत्तम कामे केलेली आहेत. हे नंतरचे वॉनाबी म्हाग्रू म्ह. शाकाय वा लवणाय वा.....

१४टॅन Wed, 30/08/2017 - 14:56

In reply to by गौराक्का

बांद्या काय जितेतिते ग्यान पेलायला जात नाय
स्वप्निल बिचारा सुपरस्टारडम म्हंजे विरार लोकल समजतो. कदी चडून बग म्हनावं. नाय ना भायेर फेकलीन् तर...

गौराक्का Wed, 30/08/2017 - 16:26

In reply to by १४टॅन

बावा कंच्या जमान्यातला तू?
त्या माणसाला झी मराठी (झिझिर झिझिर झिझिझि वाले) अवॉर्ड्स मध्ये दर वर्शी अवॉर्ड असतं. कशासाठी तर होम मिनिस्टर इतकी वर्ष चालू ठेवला म्हणून. बाकी विलेक्षन मध्ये पड्ला म्हणून कुणी भाव देत नाही. बाकी एकंदर भाव तोच.

'न'वी बाजू Wed, 30/08/2017 - 15:49

In reply to by बॅटमॅन

(ही सई कोण,कुठली, कशी दिसते वगैरे काहीच माहीत नाही, परंतु...)

बायदवे घुबड हा पक्षी सुंदर असतो.

+१

घुबडांची बदनामी थांबवा!!!!!!

बॅटमॅन Wed, 30/08/2017 - 18:35

In reply to by अबापट

सांगलीची आहे.

पण जिव्हाळा हा त्यापेक्षा जास्त त्या फोटोमुळे आहे. आमच्यासारखे एमसीपी सौंदर्याबाबत एकदम सेकुलर असतात. असा भेदभाव नै करत.

भांबड Wed, 30/08/2017 - 18:10

In reply to by 'न'वी बाजू

न'बा' जी पेटाकरी वाटतायेत, वस्सकन अंगावर येतात, आता उपमा तरी कशा द्याव्यात वो. बादवे बाईच्या धिप्पाडपणाबद्दल बोलून Alison tyler आठवून दिलीत त्याबद्दल....

आदूबाळ Wed, 30/08/2017 - 13:52

भाविकांसाठी मूळ मुलाखत.

खालच्या मौलिक कॉमेंट्सचाही लाभ घ्यावा.

मुलाखतकाराचा टोन महाखवचट आहे, आणि त्याने उचकवणारे प्रश्न विचारले आहेत.

पुंबा Wed, 30/08/2017 - 15:27

In reply to by आदूबाळ

सगळ्यात भारी प्रश्न:
इतके यश मिळूनसुद्धा ग ची बाधा कशी नाय झाली?
उत्तर देताना त्या पत्रकाराचे फेशियल एक्स्प्रेशन्स बघा...

'न'वी बाजू Wed, 30/08/2017 - 16:41

In reply to by अजो१२३

हरिवंशराय बच्चन कोणी लै भारी कवी होता / आहे का?
लाला अमरनाथ कोणी लै भारी क्रिकेटर होता / आहे का?
दीनानाथ मंगेशकर कोणी लै भारी गायक होता / आहे का?

अजो१२३ Wed, 30/08/2017 - 17:21

In reply to by 'न'वी बाजू

मी एक जागतिक क्लासिक कथांचा संग्रह वाचत आहे (१९९३-९४ नंतर पुन्हा वाचन चालू केले आहे.). त्यात भारतीय कथा म्हणून मुल्क राज आनंद यांची द लॉस्ट चाइल्ड नावाची कथा होती. विकिपीडिया पाहिला, म्हटलं लोकांना विचारावं (चिंजंना, इ), मैतंय का.

'न'वी बाजू Wed, 30/08/2017 - 17:33

In reply to by अजो१२३

त्यांची 'अनटचेबल' कॉलेजात असताना वाचली होती. बाकी त्यांचे काही वाचलेले नाही (आणि 'अनटचेबल'ही आता लक्षात नाही), पण तेव्हा त्या पुस्तकाने खिळवून ठेवले होते (आणि 'पोटतिडिकीने लिहिणारा माणूस' अशी लेखकाबद्दल प्रतिमा डोक्यात निर्माण झाली होती), एवढे(च) आठवते.

आदूबाळ Wed, 30/08/2017 - 17:43

In reply to by 'न'वी बाजू

तसंच, मुल्क राज आनंद दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बीबीसी साऊथ एशिया सर्व्हिसमध्ये जॉर्ज ऑरवेलचे सहकारी होते.

राही Wed, 30/08/2017 - 15:45

मुंबईत पाणी साचण्याची अनेक कारणे आहेत. परळ, माटुंगा, शीव हे भाग मुळातच सखल, खोलगट भाग आहेत. परळ हे नावच 'परळ ' या परात, परडी यासारख्या एका मध्यभागी सखल पसरट भांड्याच्या नावावरून पडले आहे (किंवा कदाचित जमिनीच्या अशा खोलगट आणि बाहेर उथळ होत गेलेल्या भागाला परळ म्हणत असतील आणि त्यावरून अशा आकाराच्या भांड्याला परळ म्हणू लागले असतील.) दुसरे म्हणजे टेकड्यांच्या पायथ्याशी पाणी साचते. एकेकाळी साष्टी कुरलेच नव्हे तर मुंबईतील मूळ सात बेटेही डोंगराळ होती. उतारावरून पाणी खाली येऊन त्यामुळे तयार झालेल्या ओढ्यानाल्यांमधून ते वाहून जाई. आता टेकड्यांचे उंचवटे राहिले आहेत पण जलप्रवाह मात्र बुजवले गेले आहेत. पूर्वीचा लोटस सिनेमाचा भाग, अंधेरी पूर्व पश्चिम, साकी नाका कोळ डोंगरी इथे पाणी साचते ते यामुळे . तसेच पूर्वीच्या ओढ्यानाल्यांचे आज रस्ते आणि सब वेज बनले आहेत. मिलन सब वे, आंबोली सब वे, मालाड सब वे, पोयसरच्या दोन प्रवाहांपैकी एक या सर्व एकेकाळच्या ओढ्यांची पात्रे आज रस्ते बनली आहेत. अर्थातच त्यांचीपाणी वाहून नेण्याची क्षमता नाहीशी झाली आहे. समुद्र आणि खाड्यांमधल्या भरणीमुळे खाजण जमिनी नाहीश्या झाल्या आहेत . ही खाजणे पर्जन्यजलाच्या साठवणुकीचे काम करीत असत. ते काम आता थांबले आहे. शिवाय झोपड्या, लोकांच्या कचराविल्हेवाटीच्या सवयी, मनपाची बेदरकारी आणि प्रचंड भ्रष्टाचार यामुळे पाणी साचते. खरे तर मुंबई भौगोलिक दृष्ट्या ज्या कोंकण प्रांतात मोडते त्यात गुढघाभर पाणी october मध्यापर्यंत शेताखाचरात साठून राहाणे ही भौगोलिक विशेषता आहे . या गुढघाभर चिखलातच भाताचे पीक घेतले जाते . पण महानगरे बनतात तीच मुळी आपली मूळ ओळख हरवून घेऊन. त्याला इलाज नाही आणि विकासाला पर्याय नाही. पुण्याचेही तेच होऊ घातले आहे, झाले आहे.

बॅटमॅन Wed, 30/08/2017 - 16:18

In reply to by राही

डीटेल्ड उत्तराकरिता अनेक धन्यवाद.

बायदवे खाजण म्हणजे नक्की काय भानगड आहे? मुंबईत प्रवेश करताना वाशीजवळचा तो खाडी/समुद्रावरला पूल आहे तिथे पर्पेचुअल चिखल असावा असे वाटायला लावणारी जमीन आणि पाचदहाफूट उंचीची झुबकेदार झाडे ढिगाने आहेत. तशा भूभागाला खाजण म्हणता येईल का?

गौराक्का Wed, 30/08/2017 - 16:30

In reply to by बॅटमॅन

बहुतेक शेती करता रबरबित, राडीची जमिन असते तिला खाजण म्हणत असावेत.
गो नी दांच्या पुस्तकात भाताची खाजण अस वाचल्याचं आठवतंय..

नितिन थत्ते Thu, 31/08/2017 - 07:29

In reply to by बॅटमॅन

खाजण म्हणजे मॅनग्रोव्ह्ज म्हणतात ती दलदलीची जमीन. यात खाडीचे खारट पाणी असल्यामुळे ती शेतीयोग्य नसते.

सध्या पूर्व दृत महामार्गावरून ठाण्याकडे जाताना घाटकोपर विक्रोळीपासून हायवेच्या दोन्ही बाजूस अशी खाजण जमीन मुलुंडपर्यंत दिसते. या खाजण जमिनींमुळे हायवेच्या लगत काही वस्ती किंवा इमारती नाहीत.

या भागांमध्ये बगळे वगैरे पक्षी दिसून येतात.

अबापट Thu, 31/08/2017 - 11:18

In reply to by नितिन थत्ते

श्री बॅटमॅन व थत्ते साहेब ,
खाजण अर्थात मॅन्ग्रूव्हस हि अत्यंत समृद्ध , संवेदनशील इको सिस्टिम असते . त्यातील जैव सृष्टी हि वैविध्य पूर्ण असते . कोस्टल रेग्युलेटरी झोन मुळे तिथे बिल्डिंगी नाहीत . खाजणे व CRZ हे प्रगती व विकास यातील एक अडसर आहेत असे काही विकासवादी राजकारणी व विकासवादी विकसक व बिल्डर्स यांचे म्हणणे आहे . ( अवांतर : खाजणाचे अनेक फायदे उर्वरित मनुष्य प्राण्यांना सुद्धा आहेत , पण ते अलाहिदा )

अबापट Wed, 06/09/2017 - 19:32

In reply to by बॅटमॅन

नक्कीच सांगेन बॅटमॅन . फक्त दोन तीन दिवस दे . माफक आजारी आहे आणि त्यात उद्या टूर ला ... पर्वा सांगतो

धनंजय Thu, 07/09/2017 - 00:01

In reply to by नितिन थत्ते

गोव्यात खाजणचा अर्थ बदललेला आहे (किंवा कोंकणीत मुळातच वेगळा, अर्थ असावा. दुवा)
The khazans are saline floodplains along Goa’s tidal estuaries, covering an area of 17,500 ha, which have been reclaimed over centuries by constructing an intricate system of bunds (dykes) and sluice gates.
The local farming community traditionally practices rice cultivation by growing salt–tolerant species during monsoon in conjunction with shrimp aquaculture during off seasons.
खारट पाण्याचा प्रभाव असला तरी पावसाळ्यात भातशेती करता येते, हे विशेष.
(दुव्यावरती अशीही माहिती आहे की खाजणाच्या बांधाऱ्यांपाशी मॅन्ग्रोव्ह असतात. पण गोव्यात तरी खाजणे म्हणजेच समानार्थी मॅन्ग्रोव्ह्स नव्हेत.)

मिहिर Thu, 07/09/2017 - 00:37

In reply to by धनंजय

मराठी विश्वकोशातही खाजणचा काहीसा असाच अर्थ दिला आहे. मॅन्ग्रोव्हसाठी तिवर किंवा खारफुटी हे शब्द ऐकले होते ह्यापूर्वी.

चिमणराव Thu, 31/08/2017 - 13:12

In reply to by राही

उधोजी चिडून म्हणाले पाऊस थांबवून दाखवा.

या उत्तराने राग आला मुंब्ईकरांना. त्यांनी हे उत्र फेकायला हवं होतं. महापालिका काँग्रोसकडे असती तर त्यांनी माशेलकर, आणि इतर साइन्टस्टांनाच आणलं असतं उत्तर द्यायला. अडिच इंच व्यासावर बारा इंच पाणी पडलं तर मुंबईच्या गटारांतून आणि आठेक मिटर्स अॅल्टिट्युडवरून किती पाणी गणिताने थिअरॅाटिकली जाऊ शकते गुणिले प्लास्टिक कचरा साचलेल्या पायपांची कमी झालेली इफिशन्सी धरून सांगितल्यावर सर्व आइआइटी एंजिनिअरांनी काल्कखलेटर दप्तरातून बाहेर काढले असते. सर्व पेपरवाल्यांनी दमदार अग्रलेखांतून कौतूक केलं असतं, पाठ थोपटून घेतली असती पक्षाकडून.
( डोक्यावरून गेल्यास सोडून द्या)

नितिन थत्ते Thu, 31/08/2017 - 19:39

In reply to by राही

>>एकेकाळी साष्टी कुरलेच

राही इरले, कुरले, वांद्रे, माटुंगे, कळवे, मुंब्रे, दिवेअशी नावे वापरतात ते वाचायला मौज वाटते.

ठाणे/पुणे ही नावे शुद्ध करून घेतली तशी ही नावे शुद्ध केलेली नाहीत.

बॅटमॅन Fri, 01/09/2017 - 04:16

In reply to by नितिन थत्ते

हे इरले काय भानगड आहे? इर्ला? असा काही एरिया आहे मुंबैत? कधी ऐकला तर नाय ब्वा. ते पावसात अंगावर घ्यायचे इरले ते माहिती वेगळेय ते.

चिमणराव Fri, 01/09/2017 - 05:33

In reply to by बॅटमॅन

पश्चिम पार्ले म्हणजे इरले. तिथे आहे होमिओपथी कॅालेज. ते पुर्वी शिव पूर्व किल्ल्याच्या पायथ्याशी होतं.
पार्ले हे खरे विले+ पार्ले - विलेपार्ले होते.

तिरशिंगराव Fri, 01/09/2017 - 11:06

In reply to by चिमणराव

इर्ले हे विले पार्ल्याच्या पश्चिमेला असले तरी ते पार्ले नव्हे. इर्ले आणि पार्ले अशी दोन खेडी होती, ती मिळून विले-पार्ले झाले आहे.
इर्ल्याला 'अल्फा' नांवाची सहा दुकाने ग्रे मार्केटची आहेत. तिथे कुठलाही फारिनचा माल स्वस्त मिळतो. पक्की रिसीट कधीच मिळत नाही. तरीही सगळं राजरोस सुरु आहे.
-पूर्वाश्रमीचा पार्लेकर
(आणि आता पुणेकर)

चिमणराव Fri, 01/09/2017 - 11:17

In reply to by तिरशिंगराव

तेच म्हणतो. पुर्वी ('६०) लोक मी इर्ल्यात/पार्ल्यात/जिआइपि माटुंगा/माटुंगा/काळाचौकीत राहातो सांगत. आता मोघम पार्ल्यात/माटुंग्यात सांगतात.
हल्ली रस्त्याचं नाव सांगण्याची पद्धत पडली.

बॅटमॅन Fri, 01/09/2017 - 13:15

In reply to by तिरशिंगराव

ओहो असंय का! विलेपार्ले आणि पार्ले अशी दोन्ही नावे ऐकल्यामुळे विले ही काय भानगड आहे कै कळत नव्हते. "मालमत्तेची विले केली" वगैरे वाचले होते फक्त. आता कन्सेप्ट क्लीअर झाली. खूप खूप धन्यवाद.

हे म्हणजे थोडे इचलकरंजीसारखे झाले. जुन्या लोकांकडून ऐकलेली कथा म्ह. करंजी, इची आणि अजून कुठलेतरी एक खेडे असे मिळून झाली इचलकरंजी. त्यालाच कैकजण उचलकरंजी म्हणत मजेने.....

बॅटमॅन Fri, 01/09/2017 - 13:21

In reply to by नितिन थत्ते

धन्यवाद. असा हा जुना इतिहास नेटच्या माध्यमातून कळणे खूप सोपे होते. थँक गॉड फॉर इंटरनेट.

अनु राव Fri, 01/09/2017 - 13:34

In reply to by बॅटमॅन

माझ्या मते ( किंवा मला असे वाटायचे ). विले पार्ले म्हणजे Ville Parle. म्हणजे पार्ले गाव. कारण जवळच सांताक्रुझ पण आहे. त्यामुळे पोर्तुगिजांनी पार्ले ला विलेपार्ले केले असण्याची शक्यता आहे.

गौराक्का Fri, 01/09/2017 - 09:59

In reply to by बॅटमॅन

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... अस्सल मुंबईकरांनाच माहीत असतात ही नावं.
अंबोली, चिंचोली, शिंपोली, दिंडोशी,ओशिवरा,मरोळ, मरोशी, चकाला, चांदिवली, बाणडोंगरी, काळाचौकी, कलिना, गोराई, चारकोप हे पण मुंबईत येतात.

इर्ला मार्केट म्हणजे ग्रे मार्केट आहे, पर्फ्युम, घड्याळं असलं काय काय मिळतं तिथे. खादी चं पण मोठ्ठं दालन आहे इर्ल्यात.

बॅटमॅन Fri, 01/09/2017 - 13:16

In reply to by गौराक्का

यापैकी कलिना आणि ओशिवरा ही नावे देशी वाटत नाहीत. जाणकारांकडून यांची व्युत्पत्ती कळेल काय? फिरंग्यांनी दिलेली नावे आहेत का? म्हणजे इंग्रजाअगोदरच्या पोर्तुगीज किरिस्ताव जमान्यापासूनची?

राही Fri, 01/09/2017 - 17:22

In reply to by गौराक्का

आपण दिलेल्या दुव्याचा संदर्भ अनेकांनी अनेक ठिकाणी दिलेला आहे. पण त्यातली कोल्हे कल्याण = कोल्हे सापडतात ते कल्याण ही व्युत्पत्ती बरोबर नाही. ते नाव कोळे (कोळें)कल्याण असेच आहे आणि उघडउघड कोळी या स्थानिक आदिजमातीशी संबंधित आहे. वाकोला - कलिना (सांता क्ऱुझ ) येथे कोळीवाडी नावाची एक गल्ली आहे तिचेही स्पेलिंग colevary असे केले जाते आणि त्यानुसार उच्चार कोलेवॅरी असा होतो.
पूर्वकोळी आणि सद्य ईस्ट इंडियन लोकांना आपली कोळी ही ओळख विसरली जावी असे वाटते. यातल्या अनेकांनी 'कोहली' ही आडनावे घेतली आहेत म्हणा अथवा खार- वांदऱ्याच्या सिंधीपंजाबीबहुल वस्तीत स्पेलिंग्ज त्यांच्यातल्या नावासारखी kohli अशी केली जातात म्हणा.

नितिन थत्ते Wed, 06/09/2017 - 19:58

In reply to by राही

>>त्यानुसार उच्चार कोलेवॅरी असा होतो.

वाय दिस कोलावरी कोलावरी डी !!! =))

राही Fri, 01/09/2017 - 15:51

In reply to by बॅटमॅन

यापैकी ओशिवरा हे ओशिवडे आहे. तळावडे, सोनावडे, भाटवडे सारखे . आता वाटतेय ना देशी नाव? मुंबईच्या जुन्या आगरी/ कोळी ईस्ट इंडियन बोलींत ळ आणि ड चा उच्चार 'र' होत असे .थोडे अवांतर करायचे तर वर्सोवा हे वेसावे आहे. घोडबंदर रोड सध्या अहमदाबाद रस्त्याला जिथे मिळतो तिथे वरसावे या नावाचे आणखी एक गाव चेणे खाडीवर आहे. इथला चेणे खाडीवरचा पूल कमकुवत झाल्याने वेस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वर थोड्या थोड्या वेळाने वाहतूक एकाच दिशेने सुरू ठेवतात. त्यामुळे होणाऱ्या खोळंब्यामुळे हे नाव अलीकडे अनेकांना ठाऊक झाले आहे. अर्थात सरकारी फलक रंगाऱ्यांनी त्यांना माहीत असलेले वर्सोवा हेच नाव इथेही रंगवून टाकले आहे .
विले पारले बद्दल लिहायचे तर विळ्ये किंवा विळ्ळे आणि पाटळे ही दोन जुळी गावे होती. पश्चिम रेल वे मुळे ती विभागली गेली. विळ्ळेचा उच्चार स्थानिक बोलीत विरले होत होता. ( आत्ता आत्तापर्यंत कित्येक लोक विले पारले ला विर्ले पार्ले म्हणत असत .) इंग्रजांनी मात्र मूळ मराठी नावाबरहुकूम इंग्लिश स्पेलिंग Ville असेच केले. मराठी 'ळ' साठी अनेक ठिकाणी डबल एल (ll) वापरला जाई आणि 'ण' साठी डबल एन. जसे नल्ला सोपारा हे नाळा सोपारा आहे , तसेच. ही नावे महिकावतीच्या बखरीत आहेत . कलिना हे मूळचे कोळे कल्याण आहे. लघु रूपात त्याला कल्याण म्हणत. त्याचे इंग्लिश स्पेलिंग Caliana असे होते. कालांतराने त्याचा उच्चार कलिना असा बदलला. मुंबई विद्यापीठाच्या नव्या इमारती 'मौजे कोळेकल्याण' आणि लगतच्या खाजणात उभारल्या गेल्या आहेत.

बॅटमॅन Fri, 01/09/2017 - 16:03

In reply to by राही

ओशिवडे देशी वाटतेय. आगरी बोलीप्रमाणे ड चा र होतो हे बरोबर, ते कनेक्शन इथे लक्षात आले नव्हते.

वर्सोवा-वेसावे हे पटणीय आहे. वेसाव्याची खाडी वगैरे कधीतरी वाचल्याचे आठवते.

कलिना हे कल्याणवरून आले हे सांगितल्यावर लक्षात आले.

बाकी मूळ नावांबद्दल अनेक धन्यवाद. महिकावतीची बखर हा महान प्रकार आहे. राजवाडे झिंदाबाद.

नितिन थत्ते Fri, 01/09/2017 - 17:11

In reply to by राही

शंका/करेक्शन?
१. चेणे खाडीवरचा पूल घोडबंदर कडून ठाण्याकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. तिथे पूर्वी टोल नाका होता. तो हटवून नंतर फाउंटन हॉटेल जवळ नेण्यात आला. आता तो बंद आहे. फाउंटन हॉटेलजवळ आहे ती चेणे खाडी की वसईची खाडी? चेणे खाडी (चेना क्रीक) गूगल नकाशात दिसतच नाही.
२. मला नल्ला सोपारा हे गुजरातीमधील छोटा या अर्थी वाटत होते. मोठा सोपारा आणि नल्ला सोपारा.
३. विरले याचाच उच्चार इरले होतो का (इंग्रजी-विंग्रजी आणि व्हाइसे व्हर्सा)

नितिन थत्ते Wed, 06/09/2017 - 20:00

In reply to by गौराक्का

चेना ब्रीज म्हणून जे दिसतं त्याच्या खाली पाण्याचा प्रवाह दिसत नाही. _प्रत्यक्षात बऱ्यापैकी मोठा आहे.

राही Sun, 03/09/2017 - 23:58

In reply to by नितिन थत्ते

चेणे पुलाच्या बाबतीत थोडी गल्लतच झाली. वरसावे पूल हा वसई खाडीवरच आहे. वरसावे, चेणे ही जवळपासची गावे आहेत. हाच पूल घोडबंदर पूल म्हणूनही ओळखला जातो. हा एन एच ८ वर येतो . घोडबंदर रस्ता आणि एन एच ८ यांच्या छेदनबिंदूच्या नजीक, पण एन एच ८ वर. वसई खाडी पूर्वपश्चिम पसरली आहे . आणि वेगवेगळ्या भागांत वसई, भाइंदर, नायगाव, वरसावे, घोडबंदर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. एकेकाळी चेण्याजवळचा भाग हा चायना क्रीक या नावाचा एक picnic spot होता. आणखी एके काळी भिवंडीपर्यंत सलग प्रवाह होता आणि वसई पासून पुढे मालवाहतूक होत असे. कदाचित कामण नदीतून होत असेल किंवा भिवंडीच्या आसपास वाहती खाडी होती असेल.
नाळे आणि सोपारे ही दोन गावे आहेत. नाळ्यालगत एक पुरातन तलाव आहे. सध्या या प्रदेशाचा पुरातत्वाच्या दृष्टीने बराच अभ्यास चालू आहे. सध्या सोपारे हे बंदर नाही . जवळच खाडी दिसते ती कोरडीठाक आहे. पण एके काळी अर्थातच ते शूर्पारक या नावाने प्रसिद्ध होते. नाळे हे पश्चिम किनाऱ्याला जवळ आहे आणि जलमार्गाने नाळ्यापासून जवळ आरनाळा नावाचे सध्या नाळ्यापेक्षा अधिक प्रसिद्ध गावही आहे.म्हणून नल्ला सोपारा पेक्षा नाळे सोपारे हे अधिक योग्य वाटते. आणि इथे गुजराती ही स्थानिक भाषा नाही, नव्हती. सध्या आणखी एक व्युत्पत्ती चर्चेत आहे. पाण्याचे तुटक तुटक अनेक प्रवाह किंवा तळी या भागात दिसतात . यावरून प्राचीन काळी इथे एक सलग नलिका अथवा नळ अथवा नाला असावा असेही एक मत आहे . पण नालाचे स्पेलिंग इंग्लिशमध्ये नल्ला असे होणे शक्य वाटत नाही.

तुम्ही लिहिल्याप्रमाणे विळ्ळे- विरले- इरले असाच बदल आहे. विठ्ठल चे इट्टल , विचार चे इच्यार प्रमाणे . ( वि आणि इ वाय्से वर्सा अर्थात. )

बॅटमॅन Mon, 04/09/2017 - 00:19

In reply to by राही

नालाचे स्पेलिंग इंग्लिशमध्ये नल्ला असे होणे शक्य वाटत नाही.

अशी अनेक उदाहरणे आहेत, उदा. नर्मदा चे nerbudda, चायवाला चे chaiwallah, मथुरा चे muttra, इ.इ. स्पेलिंग केल्यावर भारतीय वळणाने नव्हे तर ब्रिटिश वळणाने उच्चार करून तो मूळ नावाशी साधर्म्य दाखवणारा असला पाहिजे. त्यामुळे नालाचे स्पेलिंग नल्ला होणे अगदी शक्यतेच्या कोटीतले आहे.

ते स्पेलिंग मुळात ब्रिटिशांनी ब्रिटिशांसाठी केले. ते नल्ला असा उच्चार करतच नाहीत. तो उच्चार भारतीयच करतात. भारतीयांच्या पद्धतीप्रमाणे एक चिन्ह म्हणजे एक उच्चार हे समीकरण धरून आपण बोलतो. एल म्हणजे ल मग डबल एल म्हणजे ल्ल असा आपला हिशेब. पण अनेक इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगमध्ये डबल एल असूनही त्यांचा उच्चार ब्रिटिश पद्धतीप्रमाणे ल्ल वाला होत नाही, उदा. bellow.

उत्तर भारतीय हे आपल्यासारखे शिस्तीत "मथुरा" असे न म्हणता घाईघाईत "मथरा" खरेतर "मथ्रा" असा उच्चार करतात. इंदिरा गांधी असे न म्हणता इंद्रा गांधी असे म्हणतात.

'न'वी बाजू Mon, 04/09/2017 - 02:50

In reply to by बॅटमॅन

हे म्हणजे 'जालंधर'चे स्पेलिंग इंग्रजीत 'जुल्लुंदर' सारखे होणे शक्य नाही (किंवा 'खडकी'चे स्पेलिंग इंग्रजीत 'किरकी'सारखे होणे शक्य नाही) असे म्हणण्यासारखे आहे. (अहो पण तेे 'जुल्लुंदर' किंवा 'किरकी' नव्हतेच मुळात. इंग्रजांनी त्यांना जमला तसा त्याचा 'जलंडर' किंवा 'कर्की' असा उच्चार केला, आणि मग त्याचे स्पेलिंग इंग्रजी पद्धतीने केले.)

सुनील Mon, 04/09/2017 - 08:55

In reply to by बॅटमॅन

ते स्पेलिंग मुळात ब्रिटिशांनी ब्रिटिशांसाठी केले

थोडक्यात, ब्रिटिशांनी (किंवा गोव्यात पोर्तुगिझांनी) स्पेलिंगची वाट लावली, असे म्हणण्यात अर्थ नाही.

बाकी, उर्वरीत भारताने आता भारतीय उच्चारांप्रमाणे बरीचशी स्पेलिंग बदलून घेतली तशी गोव्याने घेतली नाहीत. त्यामुळे पोर्तुगीझ धरतीवर केलेल्या स्पेलिंगांची भारतीय उच्चारी नामे भलतीच मनोरंजक होतात! मराठी जनांनी लिहिलेल्या गोव्याच्या प्रवासवर्णात याचा अनुभव ठायी-ठायी येतो!

'न'वी बाजू Mon, 04/09/2017 - 20:23

In reply to by बॅटमॅन

प्रभात रोडला आडव्या जाणाऱ्या ज्या असंख्य गल्ल्या आहेत, त्यांपैकी एकीवर बंगल्याचे नाव शुद्ध देवनागरीत मोठ्या अक्षरांत 'मॉनामूर' असे लिहिलेला बंगला कधी काळी याचि डोळां (बाहेरून) पाहिल्याचे स्मरते.

अजून आहे की नाही, कोणास ठाऊक!

नंदन Mon, 04/09/2017 - 14:36

In reply to by सुनील

मराठी जनांनी लिहिलेल्या गोव्याच्या प्रवासवर्णात याचा अनुभव ठायी-ठायी येतो!

खरंय. यावरुन आठवलं - बोरकरांच्या 'इतुक्या लवकर येई न मरणा' कवितेत रेंदेरा*सारखे काही खास कोकणी शब्द आहेत. त्यातच पुढे 'चुडतांच्या शेजेवर पडून, भोगू दे मूक नि:स्तब्धपणा' अशी ओळ आहे.

एका कवितेच्या ब्लॉगवर ते 'चुलत्यांच्या शेजेवर पडून' असं लिहिलेलं वाचून, धाय मोकलून हसण्यापलीकडे दुसरा पर्याय उरला नव्हता!

(*हा renderचा गाळीव अपभ्रंश असावा काय?)

१४टॅन Tue, 05/09/2017 - 10:19

In reply to by बॅटमॅन

पडघवली/तांबडफुटी टाईप पुस्तकांत 'घाला चुडत्यात' असं वाचल्याचं आठवतंय. पण थोडं गुगलल्यावर असं दिसतं की वाळलेल्या झावळ्यांची पिऱ्यामिडछाप रचना करून ती (फायनली) पेटवण्यासाठी जी रचना केली जाते त्याला चुडतं म्हणतात.

गवि Mon, 04/09/2017 - 07:22

In reply to by राही

एकेकाळी चेण्याजवळचा भाग हा चायना क्रीक या नावाचा एक picnic spot होता.

चापशी चोर आहे. सोकाजीनाना त्रिलोकेकरांच्या कम्युनिटीची ट्रिप चेण्याला गेली होती तेव्हा बाबलीबाईंनी सर्वांसाठी बिर्याणी बनवली होती आणि चापशीने दिल्ली राईस दिल्ली राईस म्हणून ऑर्डिनरी कोळंबा राईस मारला गळ्यात..

ता.क. कोळंबा म्हणजेच सुरती कोलम असावा का?

'न'वी बाजू Mon, 04/09/2017 - 16:25

In reply to by गवि

'पकाऊ' तरी द्यायचीत. ती आम्ही नुसती गोडच मानून घेतली असती नव्हे, तर शिरपेचात तुरा खोवल्यागत (जमला का वाक्प्रचार?) वागवली असती. पण 'निरर्थक'???

नितिन थत्ते Wed, 06/09/2017 - 20:02

In reply to by राही

मुंबई ठाणे जिल्ह्यात "सर" ने शेवट होणारी अनेक गावे आहेत. उदा. बोईसर, पोयसर, जामसर, एकसर (बोरीवली)

परंतु संस्कृतीकरणाच्या रेट्यात आमच्या ठाण्यातील उथळसरचे उत्तरेश्वर करण्याचा प्रयत्न चालू आहे. :(

बॅटमॅन Wed, 06/09/2017 - 20:05

In reply to by नितिन थत्ते

त्या एकसर स्टेशनजवळच कुठेशीक एका मंदिरापाशी चांगली चारचार पॅनेल्स असलेला इष्टिकाचितीच्या आकाराचा वीरगळ आहे. त्यात कोरलेले प्रसंग अतिदुर्मिळ आहेत. आरमारी युद्धाचे चित्रण वीरगळावर झाल्याची जी काही अत्यल्पसंख्य उदा. आहेत त्यांपैकीच ते एक. शिलाहारांच्या नाविक युद्धाचे उदा. आहे असे म्हणतात. पाहिले पाहिजे कधी......

सुनील Wed, 06/09/2017 - 20:26

In reply to by बॅटमॅन

तो वीरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचे यादव यांच्या युद्धाचा आहे. यात सोमेश्वर मारला गेला.

एकसर नावाचे स्टेशन मुंबईत नाही, दहिसर आहे. पण वीरगळ बहुधा दहिसर येथे नाही, वसईच्या जवळ कुठेतरी आहे, असे वाटते.

सुनील Wed, 06/09/2017 - 20:34

In reply to by नितिन थत्ते

उत्तरेश्वर की उथळेश्वर? कारण येथे उथळेश्वर महादेव ह्या नावाचे मंदिर आहे.

कोपिनेश्वर मंदिर ते उथळेश्वर मंदिर हा रस्ता हा ठाण्यातील "सर्वधर्मसमभावी" रस्ता आहे. कोपिनेश्वर मंदिर - सेन्ट बाप्टिस्ट चर्च - पारसी अग्यारी - ज्युईश सिनेगॉग - जैन मंदिर - बुद्धविहार - पीर - उथळेश्वर मंदिर!

गवि Wed, 06/09/2017 - 20:42

In reply to by सुनील

हे "सर" म्हणजे सरोवर ऊर्फ तलाव अशा अर्थाने आहे अशी समजूत आहे.

चितळसर : शीतलसर : शीतल सरोवर

उथळसर : उथळ सरोवर

दहिसर : दह्याप्रमाणे काही असेल का?

कावेसर :?? समजत नाही

इत्यादि.

नितिन थत्ते Wed, 06/09/2017 - 20:49

In reply to by सुनील

उथळेश्वर असं देवळावर लिहिलेलं आहे. पण हल्ली रस्त्यांवरील होर्डिंग्ज वर उत्तरेश्वर असं वाचलं. (बहुधा उथळेश्वर हे पुरेसे संस्कृत वाटत नसावे- ळ आहे ना त्यात !!! )

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/09/2017 - 02:18

In reply to by नितिन थत्ते

ठाण्याचं नाव श्रीस्थानक असं होईल तेव्हा तुम्हाला समजेल कोण जिंकतंय ते!

गब्बर सिंग Fri, 01/09/2017 - 12:10

In reply to by अजो१२३

दुसऱ्या घटनादुरुस्तीच्या रक्षणासाठी NRA कटिबद्ध आहे. दुसरी घटनादुरुस्ती ही बंदुका बाळगण्यास परवानगी देणारी आहे.
तसंच, त्याचधर्तीवर ... पहिल्या घटनादुरुस्तीच्या रक्षणासाठी ACLU कटिबद्ध आहे. पहिली घदु ही धर्म या विषयाबद्दल आहे. खाली तपशील देत आहे.

US Congress shall make no law respecting an establishment of religion, or prohibiting the free exercise thereof; or abridging the freedom of speech, or of the press; or the right of the people peaceably to assemble, and to petition the Government for a redress of grievances.

चिमणराव Thu, 31/08/2017 - 13:19

In reply to by पुंबा

विश्वासार्ह आहेत बरीच.
दिल्लीत काय भयानक लोक आहेत. खुशवंतचा बय्राच लोकांशी संबंध आला होता. सिखिजमचे दोन भाग लिहिल्यावर टाइम्सने ताबडतोब संपादक बनवलं. खप वाढवला दहापट.
भारी आवडतो.
डेल्ही वाचलं का?
डर्लिंपलचं सिटि अव जिन्स मिळालं नाही.

पुंबा Fri, 01/09/2017 - 08:30

In reply to by चिमणराव

धन्यवाद आबाबा..
खुशवंत खुप मार्मिक आणि प्रांजळ लिहितात. 'मी कसा सदगुणांचा पुतळा' असा आव वाटला नाही. शिवाय पत्रकार म्हटले की कुठल्या तरी आयडियॉलॉजीचा पाईक असलं पाहिजेच असा आग्रहही वाटला नाही. मी वाचतोय हे पुस्तक मला आवडले विशेषत: व्हि. के. अय्यर यांच्याविषयीचा लेख. काय सुमार माणूस होता खरोखर. नेहरूंनी असल्या माणसाची पाठराखण करावी हे विचित्र वाटले वाचताना. जिना, इंदिरा यांच्याविषयीचे लेख देखिल चांगले आहेत. 'दिल्ली' आहे माझ्याजवळ आता ते आणि ट्रेन टू पाकिस्तान वाचणार आहे.

गब्बर सिंग Wed, 30/08/2017 - 22:25

Many, many years ago, my wife would come home after shopping, complaining about the unreasonable prices. Then she’d ask me to help unload her car full of groceries. When the task was complete I’d ask her whether she was unreasonable, for only an unreasonable person would buy things at unreasonable prices. Afterwards the conversation would go downhill.

___ Walter Williams

अजो१२३ Thu, 31/08/2017 - 11:17

बिफोर द पार्टि नावाची एक इंग्लिश लोकांबद्दलची कोलोनियल जमान्यातली कथा वाचली. तिथे पण लोकांना तेव्हा दारूबद्द्ल किळस असे हे पाहून चान वाटले.

पुंबा Thu, 31/08/2017 - 13:13

In reply to by अजो१२३

अजो, पण बाकीचे उपाय जितके हार्श आहेत/होते त्यापेक्षा निश्चलनीकरण किती तरी अधिक हानीकारक ठरले, विशेष करून इनफॉर्मल इकॉनॉमीसाठी. किती तरी रोजावर कामाला जाणार्‍यांचे काम दोन महिन्यामध्ये गेले. कित्येकांना कधी काम, कधी आराम, पगार नंतर अशा अटीवर काम मिळाले. लोकांना त्रास झाला. पण अजूनसुद्धा लोकांचा मोदींवर विश्वास आहे असे दिसते, नोटाबंदीला पुर्ण फेल्युअर नाहीत म्हणत लोक. कित्येक जण तर सांगतात त्यांच्या ओळखीतल्या कुणीतरी कसे paise पांढरे करून घेतले, कुठल्या सोनाराने कसे उखळ पांढरे करून घेतले वगैरे. पण लोकांमध्ये असंतोष दिसत नाही हे खरंय.

अजो१२३ Fri, 01/09/2017 - 13:26

In reply to by पुंबा

विशेष करून इनफॉर्मल इकॉनॉमीसाठी.

हा विनोद होता कि गंभीर विचार?
==============================
अर्थातच इन्फॉर्मल इकॉनॉमी बुडणे अपेक्षित आहे.

नितिन थत्ते Fri, 01/09/2017 - 14:35

In reply to by अजो१२३

इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणजे काळे धंदे असा काहीतरी अजोंचा समज दिसतो. (अर्थात तसंच पढवलं जातंय).

माझ्याकडे आठवड्यातून तीन वेळा एक धोबी येतो आणि इस्त्रीसाठी कपडे नेतो/आणून देतो. तो इन्फॉर्मल इकॉनॉमीचा भाग असतो. किती असो त्याचं उत्पन्न (आम्ही देत असलेले पैसे वजा त्याचा खर्च) कधीच करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त होत नाही. तो कोणतीही करचोरी करत नाही. तरी त्याने बुडावे अशी मोदींची (आसुरी) अपेक्षा आहे.

कोपऱ्यावरचा भाजीवाला, पानवाला, चहावाला इव्हन रिक्षावाला वगैरे या क्याटेगरीत येतात. त्यांनीपण बुडावे अशी अपेक्षा आहे. किंवा जगायचं असेल तर जीएसटी नंबर आणि कार्डस्वाइप मशीन घेऊनच जगावं अशी इच्छा आहे. ते कसलीही चोरी करत नसले तरी.

अजो१२३ Mon, 04/09/2017 - 10:55

In reply to by नितिन थत्ते

तुमचा धोबी इन्फॉर्मल इकॉनॉमीमधे येत नाही. उगाच गैरसमज नसावा. जी डी पी मोजताना त्याचं उत्पन्न धरलं जातं.

What is the difference between formal and informal economy?
The informal sector, informal economy, or grey economy is the part of an economy that is neither taxed, nor monitored by any form of government. Unlike the formal economy, activities of the informal economy are not included in the gross national product (GNP) and gross domestic product (GDP) of a country.

सबब अंधश्रद्धा पसरावू नयेत ही विनंती.

नितिन थत्ते Mon, 04/09/2017 - 19:35

In reply to by अजो१२३

>>जी डी पी मोजताना त्याचं उत्पन्न धरलं जातं.

मग त्याने स्वाईप मशीन/पेटीएम/जीएसटी नंबर घ्यावा असा आग्रह का ब्रे? त्याने हे सगळं घेतलं तरी त्याच्याकडून शून्यच टॅक्स मिळणार आहे.

गब्बर सिंग Mon, 04/09/2017 - 10:55

In reply to by नितिन थत्ते

इन्फॉर्मल इकॉनॉमी म्हणजे काळे धंदे असा काहीतरी अजोंचा समज दिसतो. (अर्थात तसंच पढवलं जातंय). माझ्याकडे आठवड्यातून तीन वेळा एक धोबी येतो आणि इस्त्रीसाठी कपडे नेतो/आणून देतो. तो इन्फॉर्मल इकॉनॉमीचा भाग असतो. किती असो त्याचं उत्पन्न (आम्ही देत असलेले पैसे वजा त्याचा खर्च) कधीच करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त होत नाही. तो कोणतीही करचोरी करत नाही. तरी त्याने बुडावे अशी मोदींची (आसुरी) अपेक्षा आहे. कोपऱ्यावरचा भाजीवाला, पानवाला, चहावाला इव्हन रिक्षावाला वगैरे या क्याटेगरीत येतात. त्यांनीपण बुडावे अशी अपेक्षा आहे. किंवा जगायचं असेल तर जीएसटी नंबर आणि कार्डस्वाइप मशीन घेऊनच जगावं अशी इच्छा आहे. ते कसलीही चोरी करत नसले तरी.

.
.
मोदींची अशी अपेक्षा असेल तर ती योग्यच आहे. I wholeheartedly endorse it.

One must be paying for each and every service that one obtains from Govt.

Let's have a toll tax.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 10:25

१ रुपये के लिये कितना मचमच

दो रुपयों के लिये ना?

एम आर पी पेक्षा जास्त किमतीत तुम्ही विकू शकत नाही म्हणून वाद घातला तेव्हा त्याने वरचे वीस रुपये माझ्यावर उपकारकेल्यागत तोंड करून कमी केले.

माझ्यामते त्याला काँप्लेक्स द्यायचा कसा यावर विचार करा. पुढल्या वेळी ट्राय करा. विजय साजरा करता आला पाहिजे.

तिरशिंगराव Wed, 06/09/2017 - 13:47

समजा, तुम्ही बसमधे बसलेले आहात. बस थांब्यावर उभी आहे. समोरच्या दुकानातला १० रुपयांचा पाऊच तुम्हाला हवा आहे. तुमच्या खिडकीशीच एक टपोरी उभा आहे. तुम्ही त्याला तो पाऊच आणून द्यायचे सांगता. तो त्याचा १० रु. सर्विस चार्ज मागतो. तुम्हाला जाग्यावरुन न उठता ती वस्तु हवीच असेल तर, तो सर्व्हिस चार्ज द्यायलाच हवा.