तळटिप्पाळ

रविवार हा आमच्यासाठी मोठ्या आनंदाचा दिवस. भुईमुगाच्या किलोभर शेंगांत एखादा टमाटा लपून यावा तद्वत मराठी दैनिकांच्या पोटात साहित्य आणि सौंस्क्रूतीला वाहिलेल्या पुरवण्या लपून येतात. या पुरवण्यांचे आम्ही बालपणापासून connoisseur आहोत. कधीकधी एखादा conn sseur लागतो, पण ते चालायचेच. आम्ही उदारमतवादी आहोत.१ब

पण सांप्रत असे काहीही घडलेले नाही. किंबहुना मराठी लेखनाच्या क्षितिजावर नवादित्योदय झाला आहे. आमच्या माहितीप्रमाणे हे गृहस्थ तरूण आहेत. आणि तरी एवढं शुद्ध मराठी लिहितात म्हणजे काहीतरी गडबड आहे. अर्थात याचा आम्हाला अभिमानच आहे. यात नेचर आणि नर्चर दोन्हींचा वाटा असावा असा आमचा समज.

प्रत्यक्ष लेखासंबंधी बोलायचे झाले तर मराठी चित्रपटांची एवढी नावे पाहून आमचे परममित्र अमोल उद्गीरकर यांच्या गादीला धक्का लागतो की काय अशी धास्ती वाटली. मग लेख परत एकदा वाचला. त्यात "केवळ ‘मराठी चित्रपटांची शीर्षके’ हा इतका जरी विषय घेतला..." अशी वाक्यरचना आढळली, आणि आम्ही सुस्कारा टाकला. 'घेऊन लिहिणाऱ्यां'ची आम्हांस धास्ती वाटत नाही - ते शेवटी घेतलेल्या (विषयाचे) धनी. आज मराठी चित्रपट आहेत, उद्या 'झेकोस्लोव्हाकियातले फ्लेमिंगो'ही असू शकतात. उद्गीरकरांनी१० निर्धास्त रहावे.

नवादित्यदौणे राहतात त्या भागात पान११ चांगले मिळत असावे. कारण लेखात त्यांनी दोनदा कात टाकली आहे१२, १३. याला म्हणतात बारीक वाचन१८.

नाममहात्म्यावरील लेखाने सुरू झालेल्या नवादित्यदौणे यांच्या लोकसत्तीय कारकीर्दीचे आम्ही स्वागत करतो. या लेखाच्या प्रकाशनाचे खरे कारण (आड)नावमहात्म्य असले, तरी हा नवादित्य स्वयंप्रकाशी तेजाने अखिल महाराष्ट्र सारस्वत१४ ढवळून ठेवेल१५ याबद्दल आम्हाला लवमात्र१६ शंका नाही.१७

_______________________________
पाळलेल्या तळटिपा:
आम्ही स्वत:ला आम्हीच म्हणतो.१अ
१अडोंगराएवढ्या क्यालिबरच्या लेखकांनी स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट लिहिली तरी लोक त्यांना फालतू समजत नाहीत. उलट कौतुकच करतात. पण आम्ही असं काही केलं तर 'आत्मभान, आत्मभान' म्हणून ओरडतील.१ब
१बवशाड मेलो.
हीस पोहायला शिकवणे आवश्यक आहे.
या पुरवण्या आणि त्यांच्या संपादकांबद्दल आ० थो० न्ये० मा० स० कुंडलकर यांचे मत चिंत्य आहे.३अ
३अतरी त्यांना खरे संपादक भेटतात३ब हा मराठी सारस्वतावरचा३क मोठा उपकार आहे.
३ब आणि बाकीचे संपा'डक' असतात
३कहा उल्लेख जातीचा नाही. मोर्चास परवानगी मिळणार नाही.
याचा उच्चार ऐसीवरच्या स्थानिक फ्रेंचाकडून खातरजमा झाल्यावर घालण्यात येईल.
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-articles-on-creative-mov...५अ
५अही लिङ्क एम्बेडही करता आली असती, पण तळटिपदिनाचं औचित्य साधून एवढा बदल तरी पाहिजेच.
म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले नसावेत, पण तरी आपली एक पद्धत.
दया.
'तो' वाटा नाही. 'तो' वाटा आमचे आद्य महागुरू८अ जयवंत दळवी माहीमच्या बाजारातून८ब घेत असत.
८अयावरचे विनोद वाचण्यासाठी आला असाल, तर ताबडतोब वर जा.१ब
८बपहा: "आत्मचरित्राऐवजी".
म्हणजे विषय घेऊन. तुम्हाला काय वाटले?
१०आणि 'अक्षरनामा'कारांनीही. अर्थात ते निर्धास्तच असतात असा आमचा समज आहे.
११खायचे. वाचायच्या पानांचा त्यांजजवळ तोटा नाही.
१२पानात टाकायचा कात पुल्लिंगी असतो याची आम्हांस कल्पना आहे. पण हे संस्थळ स्त्रीवादी असल्याने हा कात ही बनून आला आहे.१२अ
१२अशिवाय, 'स्वभावो कोटिक्रम:'
१३जिद्न्यासूंनी१३अ तपासून पहावे.
१३अअजून आम्हाला 'ज्ञ' टंकता येत नाही.१३ब
१३ब हा मिपावरून आणून इथे चिकटवला आहे. भोचक आणि१ब
१४ एक कोटी एकदाच. धन्यवाद.
१५"स्वयंप्रकाशी तेजाने काही ढवळणं कसं शक्य आहे?" असा प्रश्न मनात आला असेल, तर तुम्ही पदार्थवैद्न्यानिक१ब, १३अ तरी आहात किंवा भोचक१ब तरी.१५अ
१५अवस्तुत: हा mixed metaphorचा प्रकार आहे.
१६कोटी कल्पून घेणे. सोळाव्या तळटिपेला तुम्हाला रेडिमेड कोटी पाहिजे असेल, तर आप आळशी है.
१७अगदी काही नाही तर फेसबुकवरच्या एका पेजास कच्चा माल मिळेल.
१८आणि कत्री सुपारी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

खी: खी: खी:, आबांनी नेहमीप्रमाणेच जोरदार फटकेबाजी केलेली आहे!

बाकी लेखातले हे वाक्य फार्फार रोचक वाटले:

"एखाद्या कलाकृतीचे शीर्षक म्हणजे कलाकृतीच्या महाद्वारात प्रवेश करण्यासाठी लागणारी इवलीशी, पण अतिशय महत्त्वाची अशी जादूची किल्ली असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही."

'सूर्य पेरणारा माणूस' असलं अनोखं शीर्षक प्रा. दवण्यांना कसं बरं सुचलं असेल, असा प्रश्न कायम पडत असे. हे वाक्य वाचून त्यावर अधिक विचार केला. सूर्यासाठी असलेली काही समानार्थी नावं आठवली आणि त्यातूनच "इवलीशी, पण अतिशय महत्त्वाची अशी जादूची किल्ली" सापडली. दवण्यांच्या लेखनाप्रमाणेच हे शीर्षकही सेल्फ-रेफरेन्शियल आणि सेल्फ-रेव्हरेन्शियल आहे! Smile

----------------------------------------------------------------------------------------------------------

१. रोचक ॲज इन बॅटमॅनियन सेन्स. आता बॅटमॅनियन सेन्स म्हणजे काय ते विचारु नका!
२. महाद्वारात की महाद्वारातून. पण ते एक असो.
३. '...असे वावगे ठरणार नाही' ही स्टॉक वाक्यरचना ही म.म.व.ची हरप्रयत्नाने प्रस्थापित संकेतांशी कॉन्फॉर्म व्हायची मानसिकता दर्शवते की काय, यासंबंधी आगामी साहित्य संमेलनात चर्चा व्हायला हवी.
४. कुठे ठरतंय म्हणे हे? दिल्ली का परभणी?
५. काही नाही. असंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी १ब पर्यंतचे प्रवास पूर्ण केले. मजा आली.
अवांतर - छोटा दवणे थोडा नॉर्मल वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही, चौदावे, सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व आदूबाळरावजी ह्यांचे मोठ्ठे पंखे आहोतच. असे लेख लिहून आम्हांस ते कधीकधी सूर्यासमोर काजवा इ. गोष्टींची आठवण करून देतात. ते इतके महान आहेत की लोकसत्ताही त्यांचं लिखाण 'आदूबाळ' ह्या टोपणनावाने छापते. त्यांचा, तळटीपदिन साजरा करायचा लेख ही बराच चिंतनीय आहे.
तरीही 'एक मराठी सारस्वत' ह्या नात्याने आमचे काही आक्षेप आहेत.

आमच्या माहितीप्रमाणे हे गृहस्थ६ तरूण आहेत. आणि तरी एवढं शुद्ध मराठी लिहितात म्हणजे काहीतरी गडबड आहे.

हे काय आहे? आम्हीही तरूण आहोत.१अ आमच्या लिखाणात अशुद्धता आढळल्यास सप्रमाण दाखवून द्यावी. ह्या 'सध्याची पिढी अश्शीच बॉ संस्कृती'चा त्रिवार धिक्कार.
बाकी श्री आदूबाळजी दुसरे, ह्यांचा लेख सुमार आहे, असं प्रतिपादन करतो. हा लेख एखादा पिझ्झा१० समजल्यास त्यांनी त्यात फक्त ओरेगानो आणि भरड दळलेली मिरची११ इतकंच योगदान दिलेलं आहे. श्री आदूबाळजी प्रथम, मा. धागामूर्ती ह्यांनी आधीच नमूद केल्याप्रमाणे श्री आदूबाळजी दुसरे ह्यांनी इथे तिथे कात टाकणे१२, समानार्थी शब्दांची पखरण करून१३ लेखाचे आकारमान वाढवणे, उगीच एक वाक्य वेगवेगळ्या प्रकारे मांडून लेखाचे वस्तुमान फक्त सजवले आहे, वाढवले नाही१४ ह्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
इतके असूनही श्री. मा. धागामूर्ती आदूबाळरावजी पहिले, ह्यांच्या सटीप सविस्तर प्रतिक्रियेची आम्ही ज्या आतुरतेने वाट पहात होतो ती त्यांना देणे जमले नसून१५ त्यांनी ह्या लेखकावर प्रतिक्रिया देऊन आपल्या पंख्यास दूर ढकलले आहे१६, ह्याची आठवण करून देण्यासाठी हा प्रतिक्रियाप्रपंच.
अधिक काय लिहीणे?
इति लेखनसीमा.१६

तळटीपा:
०. लक्ष असू द्या नबाजी. इथे डोक्यावरून हात फिरवण्याची कृती.
१. आमचे बारसे घातले आदूबाळांनीच. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. 'मग जेवायला कधी बोलवलं नाही ते' छाप व्यनि करणाऱ्यांचा१अ
१अ. अपमान करण्यात येईल.
२. ह्यावरून साभार.
३. फॅन फॅन... चांगले मोठ्ठे मेटल फॅन. वाईट कोटी आहे.
४. एसीसमोर पंखा म्हणू शकता. परत वाईट कोटी. मान्य आहे. उगीच टीका केल्यास१अ
५. त्यांच्या साध्या खरडीही चिंतनीय असतात. आदूबाळ रेषेवर५अ दिसतात तेव्हा आम्हांस संगणकास्थानी बोधीवृक्षाचा भास होतो.
५अ: ऑनलाईन.
६. मी ह्या कोटीच्या सगळ्याच बाजूंनी दुखावलो गेलो आहे. ते कसं, हे सूज्ञांस सांगणे नलगे.
७. एका दवणेय लेखकावरून पिढी काढल्याबद्दल धिक्कार. पिढी नाऽय काडायची.७अ
७अ: मालवणी हेलांत वाचणे.
८. इतकं तरी आम्ही बापडे त्रिवार करू शकू अशी आशा आहे.
९. श्री आदित्यजी दवणे ह्यांना आदूबाळ दुसरे म्हणण्याएवढं महापाप दुसरं नसावं. पण हा सात्विक संताप आहे. तो का हे पहा तळटीप १५ मध्ये.
१०. तुम्ही भाकरी आणि झुणका समजू शकता.१०अ ममव कुठचे.
११. चिली फ्लेक्स.१०अ त्याचं भ.द.मि. हे नामकरण आमच्या मातोश्रींचं योगदान आहे.
१०अ: पिझ्झा ऐवजी झुभा ह्या कल्पनेत त्यांचं लिखाण म्हणजे कच्चा कांदा किंवा तळलेली मिरची इतकं असावं.
१२. मी जिज्ञासू आहे. मी खरोखर तिथे जाऊन त्या लेखाने कात टाकताना दोनदा पाहिली.
१३.

जितके आव्हानात्मक; तितकेच किंवा त्याहून कठीण आणि जोखमीचे काम

इत्यादी. उगीच आमटीत पाणी. जिज्ञासूंनी लेख वाचावा.
१४. हा पिढीदोष आहे. मान्य. जि.ले.वा. पहा १३.
१५. म्हणून आहे तो सात्विक संताप मंडळी.
१६. उगीच. आम्हीही आमटीत पाणी घालू नये काय? एका तळटीपेसाठी काय पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

सटीप सविस्तर प्रतिक्रियेची आम्ही ज्या आतुरतेने वाट पहात होतो ती त्यांना देणे जमले नसून१५

हा आपला सणासुदीचा स्वयंपाक आहे. मराठी मालिकांवर डित्तेल प्रतिसाद देणं हे परमकर्तव्य विसरू दिलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख आणि पहिली प्रतिक्रिया उच्च उच्च.
सामान्य वाचकाला मात्र, सारखे खाली लक्ष ठेवावे लागत असल्यामुळे, अंतर्गळ झाल्याचा भास होतो. प्रत्येक तळटीपेचा आकडा कसा, ठुसठुसत रहातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आद्यबाळाचार्यांच्या प्रतिभेत नेचरचा वाटा किती नर्चरचा वाटा किती? असा प्रश्न आम्हास पडला आहे.वाटा असतात तिथे पळवाटा असतात याची आम्हास जाणीव आहे. परंतु आम्हास प्रश्न केवळ जाणीवेच्या पातळीवर पडत नाहीत ते नेणीवेच्या पातळीवर ही पडतात. काहींना असे प्रश्न सोमरसवंतीगृहातच पडतात. हे प्रश्न आमचा पाठलाग करतात त्यामुळे आम्हास ते आम्ही जिथ जाउ तिथे पडतात.ते पडल्याने आम्हीही पडतो व आमच्या मेंदुस दुखापत होते. मेंदुची दुखापत फार वाईट. ती झाली माणस कुरापती काढायला सुरवात करतात. या कुरापतींमुळे पुन्हा अन्य माणसांच्या मेंदुला दुखापत होते. हा संसर्गजन्य रोग आहे. यावर अद्याप उपाय सापडला नाही. ऐसीवर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. या रोगावर उपाय करु इच्छिणार स्वत:च त्याचे बळी होतात. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात तसे इथेही होते. इथे तर ते केवळ वाहक नसतात ते चालकही असतात. वाहक व चालक एकच असेल तर दोन माणसांचे पगार द्यावे लागत नाहीत. इथे तर यांना पगार ही द्यावे लागत नाहीत. हे स्वत:च्या खिशातून खर्च करत असतात. इथे खर्च हा खर्च नसतो. ती जमाच असते. ज्ञान हे इतरांना दिल्याने आपल्याकडचे कमी होत नाहि पण दुसऱ्याकडचे मात्र वाढते तसे इथे आहे. या ज्ञानसंचयामुळे एक नवीनच प्रश्न उदभवला आहे तो म्हणजे मेंदुवर ज्ञानकण इतके साचले की त्यामुळे मेंदुचा आकार प्रचंड वाढला आहे. इतका वाढला की त्यामुळे तो कवटी फोडून बाहेर येवु लागला. आता लोक कवटीचा आकार कसा वाढवता येईल याकडे लक्ष देउ लागले. त्यातून विलॅष्टिकची कल्पना बाहेर आली त्याविषयी मिसळपाव खाताना आम्ही मागे लिहिले आहे पण तो जुना विषय झाला उगाळण्यात अर्थ नाही. असो. कालकुपीत जायला नको......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मूळ लेख वाचला. त्यातले अजूनेक रोचक वाक्य:

महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या तरुणाईला मोहात पाडणाऱ्या दिग्दर्शक-अभिनेत्यांचा काळ सुरू झाला.

अस्मदीय सेन्सातले रोचक.

नवादित्याचे दावण्य बाकी कसेही असो, जुनादित्याची फटकेबाजी मात्र मस्तच.

आता आम्हांला खरी प्रतीक्षा कशाची असेल तर जुनादित्याने मराठी सारस्वतात प्रवेश करायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक तर आहेच.

जुनादित्याने मराठी सारस्वतात प्रवेश करायची.

अश्लील!!!!!!

बाकी, नवादित्य आता त्या कशात तरी घुसलेलाच आहे, तर आता त्यानंतर जुनादित्यही तेथे शिरल्यास त्यास 'नवनवादित्य' म्हणावे लागेल काय?

..........

खास करून,
'महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या तरुणाईला' आणि 'मोहात पाडणाऱ्या दिग्दर्शक-अभिनेत्यांचा काळ' अशी फोड केल्यामुळे.१अ

१अ चुकीचे पार्सिंग करण्याची आमची खोड अंमळ जुनीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी साजरा होतो आहे ऐसीतळटिपादिवस.
९/११ झालं. २६/११ चं काय ठरलं?
वसंत व्याख्यानमालाही वाइच साजरी करा.
विशेष किइबोअर्ड दिवस - मिरगाच्या पहिल्या पावसाला?
( ममव ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख एकदा वाचला. त्यातही मियां मूठभर आणि दाढी हातभर हा प्रकार असल्यामुळे आम्हांला सार्वजनिक लाज आलेली आहे.

मात्र 'अक्षरनामा'कार बिनधास्त आहेत, असं आमचं अत्यंत आततायी आणि खाजगी मत आहे. बाकीची मतं तळटीपा वाचल्यानंतर देण्यात येतील.

१. याला लेख का म्हणावं?१अ
१अ. फेसबुकवर लिहिला असता तर त्याला स्टेटस१आ म्हटलं असतं.
१आ. मराठी आंजावर लिहिणाऱ्यांना स्टेटस वगैरे काही नसतं. उगाच काय काहीही!
२. काय करणार. महाराष्ट्रीयन२अ हय वह.
२अ. इथे मराठी हा शब्द वापरणं डब्बल फॉल्ट झाला असता.
३. नाही, यूएस ओपन बघायला वेळ झाला नाही. अरेरे. तसंही नेत्रसुख३अ फार नव्हतंच म्हणतात.
३अ. त्यासाठी शशी थरूर उत्तम. डोकं आणि डोळे दोन्हींना चालना.३आ.
३आ. हां, तर मूळ मुद्दा काय होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विनोदाकडे एक मजा म्हणून पाहण्याची राजकीय असहिष्णुता वाढल्याने गुळमुळीत लिहिण्याचे प्रमाण कॅटलक्लास१ झाले आहे.
*१हे समजण्यासाठी शशी थरूर वाचणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भलतंच काही शोधताना हा कोळसा सापडला. मग उगाळून घेतलाच! हिरा निघाला तर काय घ्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.