डोळे भरून

ललित

डोळे 'भरून'...

- नील

शौर्य फ्लॅटच्या गॅलरीत आला... सहजच. त्यानं छातीभरून श्वास घेतला. मुंबईचा वास, मुंबईची हवा.
बाराव्या मजल्यावरून त्यानं डावीकडे नजर टाकली. कालीना युनिव्हर्सिटीचा अंमळ हिरवा पट्टा.
आणखी लांबवर दिसणारा एअरपोर्टचा कंट्रोल-मनोरा. तो मनोरा नेहमी त्याला 'बुदबळा'तील वजिरासारखा वाटायचा. 'बुदबळं' त्याच्या आजीचा शब्द. भारी गोड वाटायचं त्याच्या कानांना ते.
आजीच्या आठवणीनं हलकेच हसत त्यानं नजर उजवीकडे फेकली.

बॅन्ड्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या रस्त्यापलीकडे तिवरांच्या झाडीचा छोटासा तुकडा अजून शाबूत होता.
त्यापलीकडे खाडी... पाणी... हलके झुळमूळ वाहत असलेलं पाणी!
आपल्या घरातून पाणी दिसावं अशी त्याची कैक वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती नवीन फ्लॅट घेतल्यावर. आणि आता लगेचच.
मनातनं ते विचार काढून टाकत गॅलरीतून त्यानं सरळ खाली बघितलं :
गव्हर्न्मेंट कॉलनी आणि भारतनगरच्या मधल्या पट्ट्यात पसरलेली ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी.
अधल्यामधल्या छपरांवर घातलेल्या त्या इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या ताडपत्र्या.
वरून दिसणारी अगणित छपरं, काही राखाडी काही इलेक्ट्रिक ब्लू आणि वरती केबलच्या थाळ्या.
ते ग्रे आणि ब्लू तुकड्यांचं विचित्र पॅटर्न तो बघत राहिला...

आणि एका राखाडी पत्र्यावर अवचित ती मुलगी आली.
चादरी वाळत घालायला. पावसाच्या ब्रेकमध्ये.
हार्डली चौदा-पंधरा वर्षांची असेल ती. शिडशिडीत, बहुतेक मुस्लिम.
तिनं जर्द निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता आणि फुश्चिया फिटेड लेगिंग्ज
निळा आणि फुश्चिया त्याचं आवडतं कॉम्बिनेशन, सुखविंदर आणि रेहमानसारखं.
इतक्यात अजून एक मुलगी छपरावर आली तिच्या मदतीला. बहुतेक तिची लहान बहीण.
तिचंपण कॉम्बिनेशन छानच होतं : फिकट पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता आणि तशाच पेस्टल गुलाबी रंगाचा सैलसर पतियाळा.
पावसाळी हवेत राखाडी छपरावर लगबगीनं चादरी वाळवत घालणाऱ्या त्या मुलींचं कंपोझिशन.
निळं फुश्चिया हिरवं गुलाबी.
चंद्रमोहन कुलकर्णींच्या चित्रासारखं.
त्यानं डोळ्यांत भरून घेतलं आणि तो आत वळला.

आतमध्ये न्यूजपेपर्सचा पसारा पडला होता.
तसेच वाचायचा तो रविवारचे पेपर्स. पसरून.
न्हाव्यानं सगळ्यांच्या अर्ध्या दाढ्या करत जावं तसे.
मध्येच पंकज भोसलेचा इंग्लिश फिल्म्सवरचा लेख, मध्येच चिन्मय मांडलेकरचे स्ट्रगलर्सचे किस्से, मध्येच सचिन कुंडलकरची आयुष्यावरची तिरकस (पण प्रचंड लॉजिकल) टिप्पणी असं सगळं तो थोडं थोडं चिवडत वाचायचा. मजा घेत.
पण आता?
लोकसत्ताची ऑडिओ एडिशन मिळते का बघायला पाहिजे.
परत त्याच्या छातीत बारीक कळ आली.

दोन दिवसांपूर्वी :
फार कमी लोकांना माहितीय हे पण आपल्या 'रॉ'ची सुद्धा 'ब्लॅक-ऑप्स' डिव्हिजन आहे.
कित्येक गुंतागुंतीची धाडसी मिशन्स चुपचाप पार पाडली जातात.
अजिबात बवाल न करता.
तशाच यशस्वी मिशननंतरचं हे ब्रिफींग. जे जगापुढे कधीच येणार नाही.

शौर्य, आदिल, डॉक्टर अप्पाराव मोटे आणि 'ब्लॅक-ऑप्स'चे प्रमुख कर्नल पार्थसारथी.
चौघांचेही चेहेरे गंभीर होते.

"किती वेळ आहे शौर्यकडे?", कर्नलनी विचारलं.
"साधारण दोन दिवस", डॉक्टर उत्तरले.
"मारलेल्या अतिरेक्याच्या प्रेताबरोबर तीन दिवस क्रॉसफायरिंगमध्ये अडकून राहिल्याचा परिणाम आहे हा. त्या अतिरेक्याला साधारण टॉक्सोप्लास्मा गोंडायसारखं इन्फेक्शन होतं. प्रेत सडायला लागताना कधी कधी त्या बॅक्टेरियाजचं विचित्र म्युटेशन होतं आणि या प्रकारची लागण होऊ शकते. दुसऱ्या महायुद्धात अशा प्रकारची इन्फेक्शन्स झाल्याचे काही रेकॉर्ड्स आहेत मेडिकल जर्नल्समध्ये."

"शौर्यकडून दुसऱ्यांना इन्फेक्शन व्हायची शक्यता?"

"शून्य! कारण हे म्युटेटेड बॅक्टेरियाज फक्त प्रायमरी इन्फेक्शन करतात. सी... आपल्या डोळ्यांत 'बेसल' टिअर्स असतात कायम. त्याच्यामुळेच आपले डोळे पाणीदार वगैरे दिसतात. त्यांच्यातलं लॅक्रिमल फ्लुइड बाहेरच्या इन्फेक्शन्सशी लढतं. आणि शौर्याच्या डोळ्यांतल्या बेसल टिअर्सनी ऑलरेडी या बॅक्टेरियांना अरेस्ट केलंय. सो ते बाहेर पसरू शकत नाहीत."

"पण मग ते असेच नष्ट नाही होणार का?"

"दुर्दैवानं नाही. नंबर्सच द्यायचे झाले तर या क्षणी त्यांचा काउंट वीस मिलियन आहे. आणि ते असेच वीस मिलियन राहिले आणखी अट्ठेचाळीस तास तर इर्रिव्हर्सिबल डॅमेज चालू होईल. ग्लॉकोमाची लक्षणं झपाट्यानं चालू होतील. अंधुक दिसायला लागेल आणि..."

"औषध?"

"ऑफकोर्स आमचं युद्धपातळीवर काम चालू आहेच. पण म्हणावं तसं यश नाहीये अजून. लस बनवायला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा नक्कीच जास्त वेळ लागेल. असं समजा की बॅक्टेरिया आणि शौर्यच्या डोळ्यांची प्रतिकारशक्ती यांचं युद्ध चाललंय आणि त्यात बॅक्टेरिया जिंकतायत सध्यातरी."

परत आत्ता :
आदिलचा फोन वाजत होता.
शौर्यनं भानावर येत तो घेतला,
"ओय, चल तयार हो फटाफट. जेवायला जायचंय तुझ्या आवडत्या 'रॉकस्टार'मध्ये"

पुढच्या पाच मिनिटांत आदिल धडकला खाली.
त्याची काळीशार 'व्हेन्टो' आणि तिचा तो जर्मन बांधा.
दोन क्षण डोळ्यांत साठवत राहिला आदिल.
आणि मग एक सुस्कारा सोडून पॅसेंजर सीटवर बसला.
नेहमी खरं तर शौर्यच चालवायचा 'व्हेन्टो' दोघं एकत्र असले की.
पण आज नको.
नजरेचा काय भरोसा नाय च्यायला.

सी लिंकवरनं गाडी बिंग बिंग चालली होती.
शौर्याला त्यांचे असंख्य लॉंग ड्राईव्ह्ज आठवत राहिले,
"आठवतंय आदिल? आपण कोकणात उतरत होतो... गगनबावडा घाटातून.
आणि एका अडनिड वळणानंतर अवचित समोर आलेला तो गुलमोहर.
गच्चम फुललेला... लालभडक."

"ऑफकोर्स... आणि तुझ्या दंडावर पण एक गुलमोहर होता. लालभडक रक्ताचा.
गोळी चाटून गेली होती तुला."

"हो. पण तो एक क्षण आपलं मिशन, पाठी असलेल्या जिवावर उठलेल्या गाड्या, दंडावरची जखम सारं काही विसरायला झालं होतं... ते लाल गारुड बघून."

"आणि लगेचच त्या सेक्सी गुलमोहराकडे उडती पापी फेकून पाठच्या गाडीचा टायर फोडला होतास तू तुझ्या ग्लॉकनी"

"हा हा येस्स!"

"आणि मनालीच्या घाटातला तो बाइकवाला आठवतोय?
कसला चालला होता त्या वेड्यावाकड्या वळणांवरून. कॉन्फिडन्ट.
त्याची ती पोपट ग्रीन स्पोर्ट्स बाईक : अलट-पलट होणारी.
आणि एका टर्नवर त्याचा गुडघा चिकटला होता जमिनीला. ऑलमोस्ट.
काय ब्रिलियंट व्हिजन होतं ते."

"हो ना आणि पुढच्याच वळणावर ठोकून दरीत फेकला आपण त्याला.
इलाज नव्हता. जैश ए मुहम्मदचा फिदायीन होता तो.
पण येस्स, अप्रतिम रायडर."

दोघंही थोडा वेळ गप्प झाले.
आपापल्या पर्सनल दृश्यांची रिळं डोळ्यांपुढे चालवत.
अबोल राहून एकमेकांना स्पेस देणाऱ्या जिगरी दोस्तांसारखे.

मग हळूच आदिल म्हणाला,
"आमची बॅकअप टीम लवकर पोचली असती तर इतके दिवस तुला अडकून पडावं लागलं नसतं."

"सोड ते आता. तेवढा गॅम्बल असतोच स्ट्राइक्समध्ये! हे तुलाही माहितीय.",
शौर्य हलकेच हसत म्हणाला.

"तरीपण..." आदिल चुकचुकला.
दोघं 'रॉकस्टार'मध्ये पोचले.
शौर्यची खूप आवडती जागा.
कामा रोडवरच्या आतल्या शांत गल्लीत एका रॉकवेड्या पारसी बाबानं चालू केलेली.
मोठ्या मोठ्या हाईपवाल्या रॉक कॅफेंपेक्षा कैकपट अधिक निवांत, सुंदर आणि चांगलं म्युझिक वाजवणारी."

आल्या-आल्या शौर्यनं डोळे भरून त्याच्या आवडत्या फोटोकडे बघितलं.
समोरच लावलेलं ते जेम्स हेटफील्डचं मोठ्ठ पोस्टर. मेटालिका या त्याच्या आवडत्या बॅण्डचा लीड सिंगर.
बहुतेक 'व्हिप्लाश' वाजवतानाचा.
त्याचं ते देखणं पाय फाकवून उभं रहाणं.
आडवी धरलेली गिटार.
मनगटातलं काळं रिस्टबॅन्ड.
कपाळावर आलेले लांब सोनेरी केस.
गलमिश्या.
आणि किंचाळणाऱ्या तोंडातून दिसणारे ते जगप्रसिद्ध उभट भयसुंदर दात.

हेटफील्ड

शौर्य नेहमीसारखा हरखून काही क्षण बघत राहिला आणि त्याला ती दिसली.
पोस्टर्सच्या बरोब्बर खालचं टेबल तिचं होतं.
जाडसर कुरळे केस.
मोठ्ठे मोठ्ठे काळेशार डोळे. काजळमाया करणारे.
नाकात सिल्व्हर रिंग. फुगीर ओठ.
छान हेल्दी रसरशीत. साईझ झिरो-बिरोला फिंगर देणारी फिगर.

शौर्यचा टाईप होती ती. आदिलला कळलंच.
"गो टॉक टू हर", तो पुटपुटला.
"नको आज नको", शौर्य बॅकफूटवर गेला.
"नाही आजच", त्यानं शौर्यचा हात पकडला आणि तो सरळ तिच्याकडे गेला.

"हाय!"

तिनं पुढ्यातल्या बिअरचा सिप घेऊन वर बघितलं. प्रश्नार्थक.

"मी आदिल, हा माझा दोस्त शौर्य. ही लाईक्स युअर स्टाईल."

"थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट, मेक्स माय सण्डे.", ती गोड हसून म्हणाली आणि पुढे फारसा रिस्पॉन्स न देता तिनं परत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं.

शौर्य, आदिलला परत त्यांच्या सीटकडे खेचायला लागला.

आदिलनं जाता जात शेवटचा प्रयत्न केला,
"तुला एक सांगू माझ्या मित्राचे उद्या डोळे जाणार आहेत, त्याच्या आधी त्याला तुझ्याबरोबर गप्पा मारायच्यात. फार नाही फक्त पंधरा मिनटं."

तिच्या काळ्याभोर डोळ्यांत सूक्ष्म राग तरळला,
"काहीही, खूप फिल्मी आणि चीजी आहे हे."

शौर्य पार ओशाळून गेला होता,
"सॉरी मॅम. एन्जॉय युवर ड्रिंक."

आदिलनं खांदे उडवले, "ऍटलीस्ट वुई ट्राईड."

दोघं परत त्यांच्या टेबलवर आले.
तितक्यात आदिलला त्याच्या एकशेएक मैत्रिणींपैकी कोणाचातरी कॉल आला आणि तो फोनवर चिपकला.
शौर्य टिश्यू पेपरवर काहीतरी रेखाटत बसला.
त्याचं आवडतं डूडल : जेम्स हेटफील्डचं.

डूडल

त्याच्या खांद्यावर हलकेच टकटक झाली.
तीच होती. काजळमाया. बाथरूमला चालली असावी बहुतेक,
"चांगलं काढलंयस स्केच. ऑलमोस्ट देअर."

शौर्य संकोचून उत्तरला,
"थँक्स."

"मेटालिका फॅन?"
"प्र ऽऽऽ चंड."

"मी पण. फेवरेट गाणी?"

दोघंही एकदम उत्तरले,
"नथिंग एल्स मॅटर्स"

"ओरायन"
परत एकदम.

"एंटर सॅण्ड मॅन"
तिसऱ्यांदा.

तिच्या डोळ्यांत हसू फुलायला लागलं होतं हळूहळू.
आणि कॅफेच्या ज्यूकबॉक्सवर अवचित 'नथिंग एल्स मॅटर्स' लागलं.

शौर्य आणि जमुनाच्या गप्पा रंगत गेल्या.
लंचनंतर आदिलनं त्यांना एकटं सोडत अलगद कल्टी मारली.

ते दोघं उबेर पकडून शौर्यच्या फ्लॅटवर आले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.
आजूबाजूच्या बिल्डिंग्ज आणि खालच्या झोपडपट्टीतसुद्धा दिवे लागले होते.
जमुना बघत राहिली. उंचावरून दिसणारी ती लखलखती मुंबई... डोळे भरून.

आणि शौर्य तिला बघत राहिला. डोळे भरून.
तिला ते जाणवलंच.
मिश्कील हसत ती म्हणाली,
"तुझ्या फ्रेंडची ओपनिंग लाईन भारी चीप होती.
मी तर काटच मारली होती तुम्हा दोघांवरही. पण मेटालिकाचा फॅन म्हटल्यावर मला रहावेना.
पण काहीही होतं ते, तुझे डोळे जाणार आहेत वगैरे. नॉन्सेन्स."

शौर्य हलकेच उत्तरला,
"पण ते खरं असेल तर"

"चल घटकाभरासाठी मान्य करू या की ते खरं आहे.
काय काय मिस् करशील तू असं काही झालं तर?"

शौर्यनं एकदा आजूबाजूला बघितलं,
"सगळंच.
ही पसरलेली मुंबई. खालची झोपडपट्टी.
विंडसस्क्रीनमधून भर्र उलगडणारा एक्सप्रेस-वे.
पंकज भोसलेचे रविवारचे सिनेमावरचे लेख आणि नंतर जाऊन बघितलेले ते सिनेमे.
चित्रं, चंद्रमोहनची, व्हॅन गॉगची, पॉल क्लीची.
फेसबuकवरल्या रेणुका खोतच्या बेधडक पोस्ट्स.
त्या त्या समोरच्या ज्वेलरीच्या ऍड मधल्या केवड्यासारख्या दिसणाऱ्या श्रुती मराठेचं होर्डिंग.
'पुणे बावन्न'मधले सईचे ते गारुड करणारे डोळे.
माधुरीचं स्माईल.

आणि अर्थातच आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या असंख्य बायकांची व्हिजन्स :
विविध वयाच्या जाड्या-बारीक काळ्या-गोऱ्या प्रत्येकीत काहीतरी जीव ओवाळून टाकावं असं.
कुणाची खळी, कुणाच्या हनुवटीवरचा खड्डा, कुणाचे मधाच्या रंगाचे केस.
कोणाचं हसू, कोणाचं रडू,
कुणाचे वेडेवाकडे सेक्सी दात,
कुणाचा पिंपल भरलेला गोंडस चेहेरा,
कुणाच्या ओठांची धनुकली.
कुणाचं पोट... कुणाचं कॅमल टो... कुणाचा मफिन टॉप... कुणाची लव्ह हँडल्स, स्ट्रेच मार्क्स.
कुणाची सालसाची गिरकी,
कुणाचे जीन्समधून अलंग-मलंग डुलणारे कुलंग.
कुणाच्या मानेवरचा तीळ.
कुणाची सिग्रेट प्यायची लकब,
कुणाचा चकाकता चष्मा,
कुणाचं रुबाबदार स्टिअरिंग वळवणं.
कुणाची पांढऱ्या लखनवी कुर्त्यातली कलंदर ब्लॅक ब्र."

भडाभडा बोलणारा शौर्य गप्पकन थांबला.
त्याची छाती धपापत राहिली.

जमुना दोन क्षण बघत राहिली त्याच्याकडे स्थिर नजरेनं. मग हसली. आईच्या मायेनं.
"तुम्हा पुरुषांचं सगळंच खूप व्हिज्युअल असतं. हो ना?"

शौर्यनं मान हलवली लहान बाळासारखी. आणि जमुनानं तिचा टी-शर्ट काढून टाकला.
जांभळ्या ब्रेसियरमधल्या तिच्या त्या गाभाऱ्यातल्या दिव्यांसारख्या सावळ्या स्तनांकडे शौर्य बघत राहिला कितीतरी वेळ आणि अचानक त्याला रडू फुटलं.

हमसून हमसून रडत तो तिच्या कुशीत शिरला आणि त्याच्या अश्रूंनी तिची वत्सल छाती पार भिजवून टाकली.

दुसऱ्या दिवशी
डॉ. मोटेंच्या चेकअप रूममध्ये :

डॉक्टर बाबाराव मोटे जागच्या जागी एक्साइटमेन्टनी उसळ्या मारत होते,
"इंटरेस्टींग. इंटरेस्टिंग. व्हेरी, व्हेरी इंटरेस्टींग..."

"अहो डॉक्टर, इंटरेस्टिंग आहे ते कळलं ऽऽऽ पुढे बोला.",
पार्थसारथींनी वैतागून म्हटलं.

डॉक्टर सांगू लागले,
"गुड न्यूज अशी आहे की बॅक्टेरियांचा काउंट किंचित का होईना कमी झालाय.
म्हणजे वीस मिलियन होता तो अठरा मिलियन झालाय.
ऍंटीडोट बनवण्यासाठी आपल्याला आणखी एक दिवस डेस्परेटली हवा होता... तो मिळालाय.
आता आपण शौर्यचे डोळे वाचवू शकू.
पण मी विचार करतोय की हे झालं कसं?
शौर्य काल दिवसभर काय काय केलंस सांग बघू?"

"विशेष काही नाही, सगळ्या गोष्टी बघून घेतल्या डोळे भरून"

"काही स्पेशल बघितलंस किंवा केलंस?"

शौर्य अडखळत म्हणाला,
"एका छान मुलीबरोबर. रात्री. वुई मेड लव्ह!"

मोटे विचारात पडले,
"हं. सेक्सचे फिजिओलॉजिकल फायदे आहेतच. पण डोळ्यांसाठी एवढा फरक पडेल. वाटत नाही. अजून काही?"

शौर्य ओशाळला,
"ढसाढसा रडलो मी काल रात्री."

"रडलास. हं ओके. म्हणजे अश्रू. येस्स!"
मोटेंचा चेहेरा उजळला,
"सिम्पल व्हेरी सिम्पल. काय झालं असणार सांगतो. आपल्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या अश्रूंचे विविध प्रकार असतात.
एक म्हणजे 'बेसल टिअर्स'. मी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे कायम बाहेरच्या इन्फेक्शन्सशी लढत असतात.
शौर्यच्या डोळ्यांतल्या जिवाणूंचं मुख्यत्त्वेकरून ह्याच बेसल टिअर्सबरोबर युद्ध चाललं होतं आणि तेव्हातरी जीवाणू जिंकत होते.
पण मग काय मज्जा झाली." डॉक्टर मोटे परत उसळ्या मारू लागले.
"दुसऱ्या प्रकारचे अश्रू म्हणजे सायकॉलॉजिकल टिअर्स ज्याला आपण विपिंग किंवा रडणं म्हणतो ते.
जे माणूस खूप दु:खी किंवा चिंताक्रांत किंवा आनंदी झाल्यावर येतात.
त्यांच्यात प्रो-लॅक्टीन, ल्यू-एन्केफेलीन इत्यादी द्रव्यं असतात. जी नॅचरल पेन किलर्सचं काम करतात.
पण कदाचित त्यांच्यातही बॅक्टेरियाजशी लढण्याची शक्ती असावी असं वाटू लागलंय.
किंवा किमान या नवीन प्रकारच्या विचित्र बॅक्टेरियांशी झगडण्याचं काही रासायनिक अस्त्र या अश्रूंमध्ये असावं.
म्हणजे मूळ बेसल अश्रूंच्या मदतीला हे मानसिक अश्रू धावून आले. शौर्यच्या रडण्यामुळे.
फायटिंगमध्ये अमिताभच्या मदतीला शत्रुघ्न सिन्हा, बॅटमॅनच्या मदतीला रॉबिन किंवा हॅरी पॉटरच्या मदतीला नेव्हिल लॉंगबॉटम धावून जातो तसं.
या सगळ्यामुळे आपल्याला वेळ मिळालाय ऍंटीडोट बनवायला आणि नवी दिशाही."

...
...
...
शौर्यच्या डोळ्यांतून पुन्हा घळाघळा पाणी वाहू लागलं. आनंदाने.
आणि डॉक्टर मोटे धावत जाऊन ते अश्रू टेस्टट्यूबमध्ये गोळा करू लागले.

---

आदिलच्या फोनवर जमुनाचा मेसेज झळकला,
"पैसे मिळाले. ठरल्यापेक्षा खूप जास्त आहेत. थँक्स Smile
होप युवर बिलव्हेड फ्रेंड हॅड अ गुड टाइम ;)"

आदिलनं रिप्लाय केला,
"तुला थँक्स खरंतर. फॉर एव्हरीथिंग :)"

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आभार मॅम Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे पण एक पंकज भोसले आहेत. तेच का योगायोग???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तेच पंकज भोसले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथेत बरेच नवीन संदर्भ आहेत. छान. वेगळं-वेगळं, नवं ललित हवं असणाऱ्यांसाठी चांगलंय.
पण, ती भावनाशीलता, अश्रूंची शक्ती इ. वाचताना नवीन, ताज्या बांधणीत काहीतरी जुनंच गुंडाळून दिल्यासारखं वाटत राहतं. अर्थात हेही चांगलंच आहे म्हणा. हेही खूप दुर्मिळ आहे.
प्लीज अजून लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

खुप आभार १४टॅन Smile
एका वळणानंतर कथा कन्ट्रोलमध्ये नाहीच रहात आणि नवं-जुनं काय ते आपले-आपणच लिहिलं जातंय Smile
(तुम्ही अर्थात ते जाणलंयच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिशन बद्दल पण येऊ द्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

आभार "राव पाटील साहेब" (छान वाटतंय हे बोलताना Lol
मिशनचं बघूया कसं जमतंय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा आणि या आयडीचा काहीही संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

गतिमान कथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप आभार अचरटबाबा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

For science fiction to be appealing, the science in it has to be good... There are far too many fundamental errors here, which come in the way of enjoying an otherwise decently written story.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

Appreciate the ernest feedback...
Let me know if you have some specific concerns and I will try and resolve?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच हृदयवेधी वाटली, नाट्यमयता टिकून राहिली हेही आवडलं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठोक-घसघशीत अभिप्रायाबद्दल आभार फुटकळदादा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली कथा .. छान आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार सखी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0