आजीबाईचा बटवा - केसांची निगा

केसांची निगा:

प्रदुषणामुळे केस कोरडे पडतात, दुतोंडी होतात, कोंडा होतो, गळतात, तेलकटही होतात.

हे टाळण्यासाठी आठवड्यातुन दोनदा साधारण दोन -तीन दिवसांनी केस शांपुने धुवावेत. आपल्याला योग्य तो शांपु अन कंडीशनरच वापरावं. सारखा बदल करत राहीला तर केसांवर परीणाम होतो हा माझा अनुभव.

तेल लाउन झाल्यावर दोन - तीन तासात किंवा घरीच असाल तर ४-५ तासांनी केस धुवावेत म्हणजे धुळ, प्रदुषण केसात चिकटुन राहात नाही.य
घरात अ‍ॅलोव्हेरा असेल तर त्याचा गर काढुन लावला तर केस मउ होतात. कंडीशनरसारखाच प्रकार.

दुतोंडी केस हे आरोग्य चांगले नसल्याचंच लक्षण आहे. त्यामुळे पालेभाज्या, बीट , कडधान्य, अ‍ॅव्हाकाडो, फळं असा चौरस आहार ठेवला तर केसंसुद्धा निरोगी राहतात.

कडक उन्हात वावरताना टोपी / स्कार्फ वापरावा.

उगाच केसं कलर करु नयेत. उन्हाळ्यात शक्यतो ब्लो ड्रायर न वापरलेलं बरं.

अजुन कोणाचे अनुभव असतील तर लिहा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्या अनुभवाप्रमाणे कोंड्यावर सर्व पारंपरिक आणि बिगर-पारंपरिक उपाय तात्पुरते प्रभावी असतात.

केसांना एक-एक करून हे सर्व पदार्थ लावून बघितले आहे. (पदार्थ केशांना १-२ तास लावून मग धुवून टाकायचा.) प्रत्येक उपाय एखाद-दोन दिवस रामबाण असतो - कोंडा एक-दोन दिवसांकरिता नाहिसा होतो.
(१) खोबरेल
(२) दही
(३) लिंबू
(४) कोकम
(५) मेंदी
(६) शिकेकाई
(७) "हेड अँड शोल्डर्स" नावाचा शांपू
(८) "सेल्सन" नावाचा शांपू

एक-दोन दिवसांकरिता नाहिसा झाला, तरी मग कोंडा परत येतो, आणि तो-तो उपाय तितकासा प्रभावी राहात नाही. हा प्रयोग केलेला नाही, पण करून बघायला हवा. वरील ८ उपायांचे एक-एक आठवड्याचे चक्र सुरू करायचे. कदाचित नवव्या आठवड्यापर्यंत पहिला उपाय पुन्हा प्रभावी होईल. अशा प्रकारे कोंड्याचा त्रास पुरता बंद होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गार्निए'चा रंग एकदाच केसांना लावला होता. त्यानंतर केस एखाद आठवडा फारच मऊसूत झाले होते. पण त्यामुळे कोंडा, केस गळणं कमी-जास्त झालं नाही.

मेंदीमुळे केस कोरडे होतात, त्यामुळे मी मेंदी भिजवतानाच त्यात खोबरेल किंवा कोरफडीचा गर (aloe vera gel) घालून ठेवते.

बांधून ठेवण्याएवढे लांब केस ठेवले आणि केस बांधूनच ठेवले तर केसांचा त्रास फारच कमी होतो. हा पर्याय अवलंबण्यासाठी पुरूषांना थोडा अधिक काळ साधना करावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खालील उपाय मी कुठेतरी वाचलेले आहेत. स्वतःचा अनुभव नाही.
* अँटी डेन्रफ शांपू नियमीत अजीबात वापरु नये. केमीकली स्ट्राँग असतो. त्यामुळे केसांची जाडी कमी होते.
* इतर नियमीत वापरायचे शांपू देखील एखाद वर्षाने बदलावेत.
* कोँड्यावर एक उपाय, मेथ्या रात्रभर भिजवुन, सकाळी पेस्ट करुन स्काल्प वर लावणे. १ २ तासाने धुणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाम्पु खरंतर वापरावेत का? असा माझा प्रश्न आहे
मी अनेकांनी अनेकदा सांगितल्यामुळे आठवड्यातून एखादवेळीच शाम्पु वापरतो (तोही ब्रॅन्डेड नव्हे, कोरफडीच्या चिकापासून बनवलेला).. एरवी दररोज नेहमीचा साबणच केसांनाही वापरतो .. फक्त काहिहि लावले तरी केस ओलसर असताना तेलाने मालिश करतो (चिकटपणा नसलेल्या हेअर ऑईलने) आणि धुळ खूप असेल तर टोपी चालतो. केस (अजूनतरी) कोंडारहीत आणि सुदृढ आहेत

बाकी, कित्येकदा शाम्पु लावल्यावर अधिक केस गळतात असे वाटते - निदान माझ्या केसांसाठी तरी - शाम्पु गरजेपेक्षा अधिक तीव्र वाटतो. (खरंतर नेहमीचा साबण शाम्पु पेक्षा तीव्र असतो असे अनेकांनी सांगितले आहे पण प्रत्यक्ष अनुभव विपरीत आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. केसांची नीट निगा राखण्यासाठी काही गोष्टी पोटातूनही जायला हव्या, त्यात आवळा हा महत्त्वाचा घटक आहे असे बरेच वाचून/ऐकून आहे. विविध-भारती वर मागे ऐकले होते की रोज एक तरी ताजा आवळा खावा ज्याने केसांची गळती कमी होते आणि कोंडा कमी होण्यासही मदत होते.
(इथे माझा प्रश्न असा आहे की कच्चा आवळा जर आवडत नसेल किंवा जर अख्खा खाल्ला जात नसेल - म्हणजे अगदी रोजच तर मग आवळा सुपारी ने तोच परिणाम मिळेल का? - कारण आवळा सुपारी त्यामानाने सहज आणि रोज खाल्ली जाऊ शकते कच्च्या आवळ्यापेक्षा)

२. केस पांढरे होण्याची सुरुवातच असेल तर त्वरित जास्वंदाचं तेल वापरण्यास चालू करावे (बाजारात मिळतेच किंवा हे बालाजी तांबे, आर्ट ऑफ लिव्हींग, असाराम, रामदेव बाबा ह्याच्या स्टॉल मधे ही मिळतात)

३. केस मऊ होण्यासाठी दही किंवा कच्चे अंडे ही केसाला लावू शकता.

४. एका मराठी न्युज चॅनलवर ह्याच विषयावरील चर्चासत्रात तज्ञ सांगत होते की - मुळात कुठल्याही प्रकारचे तेल लावल्याने केसाची सुधारणा होण्यात विशेष काही फरक पडत नाही पण तेल लावयचेच झाल्यास ते नेहमी अंघोळी आधी २-३ तासच आधी लावावे, त्या पेक्षा जास्त काळ ठेऊ नये शिवाय तेल हे केवळ केसांनाच वर-वर लावावे, त्याच्या मुळांना किंवा 'स्काल्प' ला लावू नये - त्याने कोंडा होण्याची शक्यता असते (कारण कितीही स्वच्छ डो़कं धुतलं तरी तेलाचे काही अंश हे उरतातच हे थर जमा होत गेले की 'स्काल्प' चे छिद्र बंद होतात आणि केसांचं पोषण रोखलं जातं- ज्यानं कोंडा, दु-तोंडी केस, केस गळणे, पांढरे होणे असले विकार सुरू होतात.)

५. केस कोरडे करुनच मग त्यांना बांधावे (किंवा केशरचना करावी - भांग पाडावा) केस जास्त काळ ओले ठेवणे किंवा तसेच बांधणे ह्यामुळेही केसांची गळती होते.

६. शिकेकाई ने केस "खसाखसा" Blum 3 धुवु नये, त्यामुळे केस तुटतात - स्काल्प ला इजा होऊ शकते आणि बाकि विकार ही त्यांमुळे होऊ शकतात. तसेच पंच्याने केस पुसतांना ते हलकेच आणि वर वर पुसावेत.

७. मानसिक-तणाव, अती-काळजी, अहाराच्या चुकिच्या सवयी, डिप्रेशन, नकारात्मक विचारसरणी हे असले मानसिक विकारही केसांच्या हानिस जबाबदार असतात. म्हणुन नियमित व्यायाम, योगा करून उत्तम शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य ठेवावं.

(ह्यातले बरेच मुद्दे किंवा 'नुस्खे' तुम्हाला आधीच माहिती असतीलच, कारण हे सर्व नेहमीचेच आणि साधारण उपदेश आहेत, पण ह्या धाग्याच्या निमीत्ताने त्याची उजळणी करावी वाटली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केसाची निगा राखण्यासाठी केस कमी ठेवावेत. म्हणजे मेंटेन करणे सोपे जाते. स्त्रियांनी सरळ बॉयकट करावा. पुरुषांनी ही झिरो कट मारावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मस्तकशूळाकरिता (मराठीत: डोकेदुखी) शिरच्छेद हाही उपाय सुचवला गेलेला आहे, नि करून पाहण्यासारखा आहे.

(अतिअवांतर: याच धर्तीवर, मूळव्याध, तसेच पुरुषांमधील लैंगिक कमकुवतपणा (मराठीत: इंपोटेन्स) वगैरेंकरिता आजीबाईंच्या नाही तरी असल्या आजोबांच्या बटव्यातून कसलेकसले रामबाण उपाय सुचवले जातील, हे एक तो राम जाणे, नि दुसरे ते आजोबा जाणोत!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झिरोकट एकदा करायला ठीक आहे, पण हाय-मेंटेनन्स असतो. रोजच केस कापावे लागणार. त्यापेक्षा केसांना त्यांच्या मनाप्रमाणे राहू दिलं (ड्रायर्स, स्ट्रेटनर्स, कर्लर्स न वापरणे) तर काहीही त्रास होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

योगायोग म्हणजे, आजच्या टाइम्सच्या जालीय आवृत्तीवर अशाच विषयावरचा हा एक लेख आढळला.

त्याहीपेक्षा गंमत म्हणजे, त्याच लेखाच्या लगेचच वरती हाही दुसरा एक लेख टाइम्सच्या पोतडीतून निघाला.

आता यानंतर आजीबाईंच्या पोतडीतून (हो! बटवा कसला? पोतडीच ती!) नेमके काय निघेल याबद्दल कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढच्या आठवड्यात अजुन कशावरतरी कैतरी उपाय सांगेनच. तुम्ही तोपर्यंत जालावर सगळीकडे कुठे काय आहे त्याच्या लिंका शोधुन ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील सर्व उपाय केले तरी केस जर मुळातच पातळ अगर विरळ असतील तर फारसा उपयोग होत नाही.
केसांच्या दाट व सतेजपणामध्ये आनुवंशिकतेचाही सहभाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा विग वापरावेत. मराठीत स्त्रीयांच्या विगना गंगावन म्हणतत असे वाटते (चुभुद्याघ्या).

वेग-वेगळ्या रंगांचे (काळे, ब्लाँड इ.), आकाराचे (लांबसडक, छोटे इ.)आणि प्रकाराचे (पातळ, कुरळे इ.) विग आणून ठेवावेत म्हणजे वैविध्य आणता येईल!

अवांतर १ - ब्रिटिश काळात न्यायाधीश विग घालून कोर्टात बसत, असे वाचले आहे. त्याचे करण काय होते? सध्याचे न्यायाधीश तसे बसतात काय? आजतागायत कोर्टाची पायरी न चढल्यामुळे ठाऊक नाही!

अवांतर २ - पूरब और पश्चिम ह्या चित्रपटात सायराबानू इंग्लंडमध्ये जन्मलेली-वाढलेली दाखवली आहे. संपूर्ण चित्रपटात ती सोनेरी केसांचा विग घालून वावरते! भारतीय माता-पित्यांच्या पोटी, इंग्लंडात जन्मलेली मुलगी आपॉप सोनेरी केसांची जन्मते काय? सध्याच्या अनिवासीयांचा काय अनुभव आहे?

अवांतर ३ - महिन्यातून एकदा, नाव्ह्यापुढे मान तुकवून, तो करील ती हजामत (दाम मोजून) स्वीकारणे, हा केसांची निगा राखण्याचा उत्तम उपाय आहे; असे आमचे नम्र मत आहे. तुम्हाला काय वाटते?

अवांतर ४ - येत्या दीर्घ वीकांताच्या हुरुपात दीर्घ प्रतिसाद दिला असला तरी, केस दीर्घ न ठेवता लघु ठेवले, तर निगा राखणे सोपे जावे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विन म्हणजे टोप. गंगावन लावून केसांच्या लांबीचा आभास निर्माण करतात.

डोक्यावर लेझर मारून झिरोकट केल्यास केस कापायचा आणि सांभाळायचा त्रास कमी होईल. डोकं उन्हाने जळू नये याची कल्जि घेने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डोकं उन्हाने जळू नये याची कल्जि घेने.

त्यासाठी टोपी वापरता येईल!

किंबहुना प्रसंगानुरूप विविध रंगाच्या म्हणजे पांढरी (२ ऑक्टोबर), काळी (दसरा), निळी (१४ एप्रिल) वा लाल (१ मे), अशा टोप्या वापरून इतरेजनांत संभ्रमदेखिल निर्माण करता येईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आणि शासकीय शिवजयंती पाळता की 'कालनिर्णय'ची त्यानुसार भगव्या टोपीची तारीखही ठरवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर २ - पूरब और पश्चिम ह्या चित्रपटात सायराबानू इंग्लंडमध्ये जन्मलेली-वाढलेली दाखवली आहे. संपूर्ण चित्रपटात ती सोनेरी केसांचा विग घालून वावरते! भारतीय माता-पित्यांच्या पोटी, इंग्लंडात जन्मलेली मुलगी आपॉप सोनेरी केसांची जन्मते काय? सध्याच्या अनिवासीयांचा काय अनुभव आहे?

परदेशात रहाणारे (फक्त जन्माला आलेलेच नव्हे!) आपल्या नावांची स्थानिकांना उच्चारता येणारी रूपं बनवतात. केस रंगवण्याची पद्धत तशी अलिकडची, पण पाश्चात्य परदेशात मूळ भारतीय वंशाचे लोकांमधे केस रंगवण्याचं प्रमाणही अधिक दिसतं. हे Be Romans in Rome म्हणता येईल तसं आहे. सायरा बानूच्या या कॅरॅक्टरने इंग्लंडात इंग्लिश दिसण्यासाठी केस रंगवले असतील किंवा विग घातला असेल.
किंवा
तिच्या आई-वडलांपैकी निदान एक कॉकेशन वंशाचे असतील, आणि भाग मुख्य कथेत महत्त्वाचा नसल्यामुळे वगळला असेल.
किंवा
तिच्यात म्यूटेशन झालं असेल.

मी मूळ चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे अधिक बोलू शकत नाही. सुनील अशा प्रकारचे तपशील चुकवणार नाहीत यावर विश्वास आहे. त्यांनी हा मुद्दा काढल्यामुळे सकृतदर्शनी हा मुद्दा उथळ वाटला तरी त्यात खोलवर अर्थ दडला असणार याची मला खात्री आहे. (आता पळा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रकाश घाटपांडे व सुनील यांच्याशी सहमत. निर्जीव, निरुपयोगी आणि उपद्रवी केस झिरो कट/रेझर मारुन, वेगवेगळ्या लांबी, रंग, पोत चे टोप वापरणे ही लै भारी आयडीया.
अवांतर २ बद्दल: केसांना पेरॉक्साइड वापरुन रंग देणे तसे बरेच जुने आहे. १५०+ वर्ष. आणि मेहेँदी वगैरे तर त्यापेक्षा जुने.
मर्लीन मन्रो ब्रुनेट ची ब्लाँड झाली. मला तर ब्रुनेट, नाकावर कॉस्मेटीक सर्जरी न केलेली मन्रोच जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस गळण्याचे मूळ कारण हे हार्मोनल चेंजेस आणि पोषक आहाराचा अभाव हे आहे. तेल लावून केस उगवले असते तर जगात टकलांची संख्या एवढी दिसली नसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0