कुठेही चपखल न बसणाऱ्या पुरुषाची लक्षणे

Regardez moi by James Gillray

भिकबाळी (किंवा बिगबाळी जे काय असेल ते) घातलेले, हातात मोठाली कडी किंवा ब्रेसलेट घातलेले किंवा गळ्यात पदक असलेल्या चेन घातलेले पुरुष जेव्हा मी बघतो तेव्हा मला त्यांचा अतिशय आदर वाटतो. म्हणजे हे लोक हे असं सगळं कसं काय बरं वागवत असतील? या प्रश्नाने मी हैराण होतो. कामासाठी घराबाहेर गेल्यावर थोड्या वेळातच हातातील घड्याळ आणि खिशातील पाकिटाचंही मला ओझं होतं. घाम आल्यावर घड्याळ नकोसं होतं आणि खुर्चीवर बसताना मागील खिशातील पाकीट अनावश्यक अॅक्युप्रेशर करतंय असं वाटल्याने मी अस्वस्थ होतो.

केसांच्या वेगळ्या रचना करणारे किंवा केस रंगवणारे किंवा पोनीटेल बांधणारे किंवा शाळकरी मुलींसारखा हेअरबॅण्ड घालणारे पुरुष जेव्हा मी पहातो किंवा झिरमिळ्यांची ओढणी घेऊन सलवार कुडते घालून सराईतपणे वावरणारे पुरुष पाहतो तेव्हा मला मनातल्या मनात त्यांच्याबद्दल हेवा वाटतो. पुढे जाऊन मी हिंदी सिनेमाच्या हिरोसारखे मधोमध भांग पाडून त्याचा कोंबडा मिरवू नये याची काळजी घेत परमेश्वराने माझे केस साळींदराच्या काट्यांच्या गुणधर्माचे बनवून मला या भूतलावर पाठवले. आणि दाढीच्या बाबतीत आपल्याला दाढी नीट दिसेल का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत दाढी पांढरी होण्याची वेळ झाली. डोकं आणि खांदे या दोघांच्या मध्ये मान नावाचा एक अवयव देताना विधात्याने हात आखडता घेतल्याने आणि आमच्या मालीशवाल्या बाईंचा ‘ईश्वरेच्छा बलियसी’ वर विश्वास असल्याने ओढणी कुठे लटकवावी हा प्रश्न माझ्या बाबतीत माझ्या हयातीत सुटणार नाही. त्याशिवाय त्या झिरमिळ्यांच्या ओढणीत नेहमी काहीतरी अडकते किंवा मग ती ओढणी स्वतःच कशाततरी अडकते आणि माझ्या कूर्ममानेला ओढ देऊन आपले ओढणी हे नाव सार्थ करते.

केवळ ली कूपर किंवा हश पपीजचे बूट वापरणारे, अॅरो किंवा व्हॅन हयूसेनचेच शर्ट्स वापरणारे, फुलशर्टच्या बाह्या जोडण्यासाठी बटन न वापरता महागाचे कफलिंक्स वापरणारे, रेबॅनचा गॉगल वापरणारे किंवा मग टॉमी हिलफिगरचं घड्याळ वापरणारे, फोन कंपनीने नवीन मॉडेल बाजारात उतरवताच ते विकत घेणारे लोक पाहून मी अचंबित होतो. अर्थशास्त्रातील उपयोगितेचे तत्व यांना आणि ध्यानाकर्षी खरेदीचे तत्व मला शिकवू न शकलेल्या शिक्षकांबद्दल मला सहानुभूती वाटावी की राग यावा ते न कळल्याने मी गोंधळात पडून गप्प बसतो.

मादक पेयांची माझी व्याख्या ही द्राक्षासवापर्यंतच संपत असल्याने टकीला, शॉट्स, पेग, क्वार्टर असे शब्द वापरणारे, वेगवेगळ्या ब्रॅंड्सची नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये माहिती असणारे पुरुष जेव्हा मी पाहतो आणि विशेषतः हॉटेलमध्ये वेटर अदबीने बाटली घेऊन आल्यावर त्याला हात लावून कसला तरी विचार करून त्याला होकार किंवा नकार देणारे पुरुष जेव्हा मी पाहतो तेव्हा मला माझ्या अज्ञानाचा महासागर किती अथांग आहे याची जाणीव होते.

कुठल्याही संगीताच्या मैफलीत माना डोलावणाऱ्या, वा वा करणाऱ्या लोकांबद्दल तर मला अतीव आदर आहे. म्हणजे ही जागा वाहवा करण्याची आहे हे यांना कसं कळत असेल त्याचं मला भयंकर कुतूहल आहे. रागांची नावे चटकन ओळखणारे, कुठली गाणी कुठल्या रागावर बांधली आहेत ते चटकन सांगू शकणारे लोक पाहून माझी मती गुंग होते. इथे मला गाण्याचे बोल लक्षात रहायची मारामार आणि यांना राग, त्याची द्रुतलय की मध्यलय वगैरे गोष्टीही इतक्या आरामात समजतात ते पाहून यांच्याबद्दल आणि यांच्या संगीतशिक्षकांबद्दल माझ्या मनात अपार आदर दाटून येतो.

आपण अभिनय करू शकतो, गाणं म्हणू शकतो, चित्र काढू शकतो, कविता करू शकतो, लेखन करू शकतो, मूर्ती घडवू शकतो; आणि पुढे आयुष्यभर आपल्याला हेच करायचं आहे; हे काही लोकांना नक्की केव्हा कळत असेल हादेखील एक न सुटलेला प्रश्न आहे. म्हणजे मला या सर्व कलांपैकी एकही कला येत नाही हे माझ्या शिक्षकांनी कमी मार्क देऊन किंवा विविध गुणदर्शनच्या स्पर्धेत शिरकाव करण्याच्या माझ्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडून जाहीर रित्या सुचवायचा प्रयत्न केला. आणि मी ही गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून या कलांच्या वाट्याला गेलो नाही.

आपण कुणालाही गाढवात काढू शकतो, आपण फेसबुकवरून मोठमोठ्या राजकारण्यांना सल्ले देऊ शकतो, त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना शाब्दिक चिमटे, गुद्दे, कोपरखळ्या, धपाटे इतकेच काय पण लाथाळ्याही करू शकतो अशी खात्री असलेल्या अनेक फेसबुकी विद्वानांबद्दल तर मला अतीव भीतीयुक्त आदर आहे. इथे मी सोसायटीच्या सेक्रेटरीला साधं पत्र लिहिताना डिअर सर लिहू की रिस्पेक्टेड सर लिहू यावर अडखळतो. पण फेसबुकवर मात्र काही लोक नेत्यांना पप्पू, फेकू, उठा, पेंग्विन अश्या शेलक्या विशेषणांनी संबोधताना बघून मला हे सगळे लोक दाऊदपेक्षा जास्त धैर्यशील वाटतात. नावडत्या पक्षाच्या नेत्याबद्दल आणि त्याच्या अनुययांबद्दल बोलताना यांच्या वाणीला जो त्वेष चढतो तो पाहून आज लोकमान्य असते तर त्यांनी पुनश हरिओम वगैरे करण्याऐवजी अग्रलेख लिहिण्याच्या कामी यांची नेमणूक करुन स्वतः पुन्हा गणित किंवा गीतेत डोकं घातलं असतं आणि यांच्या अग्रलेखातील ज्वल्जहाल भाषेला टरकून स्वदेशीयांचं सरकारही इंग्रजांबरोबर भारत सोडून इंग्लंडला परतलं असतं.

यांच्या घरी कधी काही साधा प्रॉब्लेम झाला तर ही मंडळी सरळ फोन उचलून पप्पूला किंवा फेकूला किंवा उठांना आज्ञा करतील आणि त्या आज्ञेतील जरब ओळखून हे नेतेही धावत धावत, तातडीने, विजेच्या वेगाने, निमिषार्धात यांची कामं करून देतील याची मला खात्री आहे. किंबहुना यांच्या घरची कोथिंबीर, घेवडा, गवार वगैरे निवडून झाल्यावर, दिवसातून अर्धाच तास पाणी येणाऱ्या यांच्या बाथरूममधील ड्रम भरून झाल्यावर मग ही नेतेमंडळी देशाच्या कारभारात लक्ष घालत असावीत असा माझा कयास आहे.

फेसबुकवर सक्रिय होण्याअगोदर आपण ३६ आणि ३८ च्या मधील कंबर असल्याने रेडिमेड पॅन्ट जशीच्या तशी वापरू न शकणारे, ९ आणि १० च्या मधील मापाचा पाय असल्याने मोठे बूट घेऊन पुढे कापूस घालून वापरणारे असे जन्मजात कुठेही चपखल न बसणारे आहोत हे समजून चुकले होते.

पण आता फेसबुकवर सक्रिय झाल्यानंतर ‘आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला जे हवंय तेच योग्य का आहे? आणि आपल्याला जे नकोय ते टाकाऊच का आहे?’ याबद्दल आपल्याला काहीच ठाम मते नसल्याने आपण इथेही चपखल न बसणारे आहोत हे नक्की कळले आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

मस्तच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

हाहाहा
_______
कोणत्याही पेहेरावाला मॅचिंग डुल, कंठहार, रंगरंगोटी वगैरे करता येणाऱ्या बायकांबद्दल मलाही भयंकर असुया वाट्ते. मी जेव्हा एखाद्या पोषाखाला मॅचिंग डुल शोधत दुकानातील विभागात फिरत असते तेव्हा अजिब्बात आत्मविश्वास नसतो. इतके रंग आणि पॅटर्न्स पाहून गरगरायला होते. बरं मग जामनिमा न करता बाहेर पडलं तर तेही रुचत नाही कारण 'होमलेस/भिकारी' दिसतोय असे फीलिंग येते.
.
काही दुकानात कपड्यांचे सर्वात् मोठे माप इतके कृष असते की त्या दुकानात शिरल्याशिरल्या बाहेर पडावे लागते. अशा वेळी तेथिल सर्व सिंहकटी कृषांगना अपल्याला बघुन फिदीफिदिहसताहेत असे वाटते. बरेचदा तर 'ही म्हैस या दुकानात काय करतेय' अशा अर्थाचे भावही चक्क काहीजणींच्या चेहेऱ्यावर उमटलेले दिसतात.
.
इकडे आपल्या ३ स्लाईसेस पिझ्झा खाउन होतो तेवढ्या सबंध वेळात् हातात पिझ्झा घेउन तासन तास तो कुरतडत बसणाऱ्या स्त्रियांच्या इच्छाशक्तिचा अतिव आदर दाटुन येतो. चवथी स्लाइस घेण्याकरता हात पुढे केला की सगळेजण आपल्याला कुत्सित हसतायत असे वाटते, बहुतेक ते खरेच असते असा माझा ठाम विश्वास आहे.
.
ऑफिसमध्ये फ्री खाणे असते, कुकीज, चॉकलेटस तेव्हा आपल्या ब्रेकरुम मध्ये वारंवार होणाऱ्या खेपा , सहकाऱ्यांच्या लक्षात तर येत नाही ना या विचाराने हैराण झालो तरी that doesn't stop me. त्यामुळे लाज आणि मोह या 'दुइ पात के बीच मे शाबुत बचा ना कोय' या कबीरांच्या दोह्याची साक्षात अनुभूती येते.
.
असो एकंदर समस्या लक्षात आली असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणं आवडलं आहे वा एखादी जागा आवडली आहे हे दाखवताना, लोकं (म्हणजे रसिक) 'नाही नाही' अशी निगेटिव्ह मान का हलवतात, तेही कळलं नाहीये. तंबोऱ्यावर मागे बसलेल्यांना तर ते स्टॅच्युटरी असावं, असं वाटतं. तसंच, मोठाल्या ताना मारताना, गवई लोक्स , आकाशातून काय खेचून आणतात आणि पाताळात कोणाला पाठवतात, तेही कळलेलं नाहीये अजून!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणं न येणारे गायक तसे हातवारे करतात किंवा भिमण्णांची नक्कल असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास लेख!!
नेल कटर ते स्पेस शटलपर्यंत कुठल्याही विषयावर अधिकारवाणीने (माझाच शब्द खरा व शेवटचा!) बोलणाऱ्याबद्दलही मला फार आदर वाटतो. (व स्वतःची कीवही वाटू लागते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसं ऑफिसात शेजारच्या मुलानं मेसेंजरवर विनोद केला की प्रत्यक्षातच हसून दाद द्यावी का मेसेंजरवर हसून दाखवावं, असाही प्रश्न मला पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारी.
पुण्याला येताना नगर रोडवर कमीतकमी २-३ जण दरवेळी बघतो जे कार फास्ट लेन मध्ये चालवतात पण स्पीड ३०-३५ च्या वर जाऊ देत नाहीत. अश्या लोकांसाठी खास आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. वाचताना पुलंच्या लेखनाची आठवण झाली. विशेषतः आपण भाबडा ममव असल्यामुळे हे काय स्टाइलीत वागतात, त्याची कौतुक, आदर आणि आत्मगंडातून येणारी वर्णनं ही पुलंची खासीयत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. वाचताना पुलंच्या लेखनाची आठवण झाली.>>> +११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांच्या घरी कधी काही साधा प्रॉब्लेम झाला तर ही मंडळी सरळ फोन उचलून पप्पूला किंवा फेकूला किंवा उठांना आज्ञा करतील आणि त्या आज्ञेतील जरब ओळखून हे नेतेही धावत धावत, तातडीने, विजेच्या वेगाने, निमिषार्धात यांची कामं करून देतील याची मला खात्री आहे. किंबहुना यांच्या घरची कोथिंबीर, घेवडा, गवार वगैरे निवडून झाल्यावर, दिवसातून अर्धाच तास पाणी येणाऱ्या यांच्या बाथरूममधील ड्रम भरून झाल्यावर मग ही नेतेमंडळी देशाच्या कारभारात लक्ष घालत असावीत असा माझा कयास आहे.

हा उतारा कहर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

हे खूपच मस्त लिहिलं आहे. पु.ल. आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी