" जेथे कर माझे जुळती "

मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो. हा प्रश्न पडण्याचे कारण :-
या संदर्भात नुकताच " TIME " ( २४ सप्टेंबर २०१८ चा ) या प्रसिध्द मासिकात आलेला एक लेख माझ्या वाचनात आला. अमेरिकेचे ३९ वे प्रेसिडेंट म्हणून ज्यांची निवड झाली होती, ते माननीय श्री. जिमी कार्टर यांचे वय आज ९३ वर्षांचे आहे. त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती रोसालीन ( Rosalynn) या सुद्धा ९१ वर्षांच्या आहेत. वयोमानाने त्यांच्या हातात हातोडा घेवून खिळे ठोकण्याचा जोर जरी ओसरला असेल तरीही किमान टेबलावर इलेक्ट्रिक करवत चालवण्याइतके बळ त्यांच्या हातात आहे. प्रेसिडेंट पदावरून पायउतार झाल्यानंतर, मानवतेच्या उत्तुंग अशा भावनेतून,निवारा नसलेल्या कुटुंबास ,निवारा तयार करण्यासाठी,श्री. व श्रीमती कार्टर दोघेजण, वर्षातून एक आठवडा,जगाच्या पाठीवर,कोठेही,कुणालातरी स्वतःचे घर बांधण्यास मदत करण्यासाठी जात असतात. या त्यांच्या व्रतास अनुसरुन,गेल्या ऑगस्ट महिन्याच्या एका गुरुवारी,डोक्यावर आपली निळ्या रंगाची टोपी घालून, दोघेजण,मिशवाका ,ईंडियाना
( Mishawaka ) येथे,एका घराच्या भोजनहॉल साठी लाकडाच्या फळ्यांचे माप घेतांना मग्न दिसले.
" घर " हा विषय श्री.कार्टर यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या विषयाची गंभीरतेने दखल घ्यावीशी वाटणारा अलिकडील काळातील अमेरिकेतील, हा पहिलाच प्रेसिडेंट आहे,असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. आजही जिमी कार्टर व त्यांच्या पत्नी, १९६१ साली त्यांनी बांधलेल्या Plains.Ga. येथील दोन बेडरूमच्या घरात रहातात. स्वतःचे जेवण स्वतःच बनवितात.न चुकता दर रविवारी,स्थानिक चर्च मध्ये जातात. या ठिकाणी श्री.कार्टर Sunday School मध्ये शिकवितात. श्री.कार्टर यांना तुम्ही कधीही, एखाद्या बड्या बँकेत जावून," गुंतवणूक " या विषयावर भाषण देऊन, हजारो डॉलर्स ची कमाई करतांना पाहूच शकणार नाही. त्यांचा तो पिंडच नाही.
ऑगस्ट महिन्यात, South Bend च्या उपनगरात,२३ बेघरांसाठी मंजूर केलेल्या प्लॉट्वर ,
Vinyal Siding प्रकारातील घरांची रचना करण्यात कार्टर पती-पत्नी श्रमदान करीत होते. चार लेकरांची आई असलेल्या, निराधार श्रीमती Cleora Taylor यांना हे घर दिले जाणार आहे. याबाबतीत श्री. कार्टर म्हणतात," आम्ही ख्रिश्चन आहोत आणि आमच्या धर्माच्या श्रद्धेनुसार, प्रात्यक्षिक करुन दाखविण्याची,ही आम्हास प्राप्त झालेली एक संधी आहे.ज्यांना सुंदर घरे रहावयास मिळत नाही,असे लोक व आमच्यासारखे श्रीमंत लोक, यातील दरी मिटविण्यासाठीचा हा एक उपक्रम आहे,जो अनेक श्रीमंत लोकांना जमणे फार कठीण आहे."
श्री.कार्टर यांचा हा विचार, अवाजवी संग्रह करणार्‍यांच्या वा स्वतःच्याच वैभवाच्या दिमाखात रममाण असणार्‍यांच्या पचनी पडणारा नाही.पण कार्टर ठामपणे म्हणतात की,"ज्याच्या त्याच्या जीवनातील प्राधान्याने ज्याने त्याने जगावे.त्यावरून मी माणसांची पारख कधीच करीत नाही. आम्हाला जसे जगावयाचे आहे,तसे आम्ही जगणार,मग कोणी काहीही म्हणोत." त्यांना सध्याची अमेरिकेतील असमानता फारच विषण्ण करीत असते. गेल्या ३५ वर्षांपासून श्री.कार्टर यांचे हे व्रत अखंड सुरु आहे.जोपर्यंत शरीराची साथ मिळेल,तोपावेतो हे काम सुरुच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. श्रीयुत कार्टर यांनी २०१५ साली ' कॅन्सर ' शी यशस्वी झुंज दिली आहे आणि ह्या वर्षी त्यांच्या पत्नीस शस्त्रक्रिया झाल्याने,चालण्यासाठी काठीचे सहाय्य घ्यावे लागते.मिसिसीपी ते मनिला पावेतो १४ देशात व २१ राज्यात त्यांचे प्रॉजेक्ट्स सुरु आहेत. २०१८ मध्ये ते ईंडियना च्या ग्रामीण भागात अशा ठिकाणी आले आहेत की जेथे त्यांचा आर्किटेक्ट मित्र LeRoy Troyer ( वय वर्षे ८० ) काम करीत आहे. ह्याच ग्रुहस्थाच्या देखरेखीखाली, कार्टर ह्यांचे काम सुरु असते. गेली ३३ वर्षे हे ग्रुहस्थ कार्टर यांच्यासोबत काम करीत असल्याने,कार्टर त्यांना " बॉस "म्हणतात.
इतर कामगारांसाठी असलेल्या तंबूवजा राहुटीतच कार्टर सर्वांसोबत जेवण घेतात. आपल्या सभोवती जमलेल्या ,स्वतःचा वेळ खर्च करणार्‍या स्वयंसेवकांकडे बघून,कार्टर म्हणतात की "आम्ही विभागलेलो ( divided)आहोत असे ज्यांना कोणाला वाटत असेल, त्यांनी येथे प्रत्यक्ष पुरावाच बघून घ्यावा. अमेरिकन माणसाच्या अंगी समानता व सदिच्छा हे दोन गुण वंशपरंपरेने आलेले आहेत.मला माझ्या देशाच्या उन्नत भविष्याबाबत खात्री आहे."
श्रीमती रोसालिन ह्या सुद्धा ,त्यांच्याच पुढच्या टेबलाजवळ, फळ्यांना रंग देत असतात.त्या म्हणतात" लोक आम्हाला विचारतात की तुम्ही काय म्हणून ओळखले जावे ? त्यावर कार्टर म्हणतात की सर्वसाधारणपणे शांतता आणि मानवी हक्कांसाठी आमचे कार्य ओळखले जावे. प्रत्येकाचे एक सर्व सोयींनी युक्त एखादे घर असावे,जेथे मुलांना नीट वाढविता येईल,जेथे प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहील,जेथे परमेश्वराने दिलेल्या अंगभूत गुणांचा विकास होऊ शकेल,अशा तर्‍हेचा मानवी हक्क प्रस्थापित व्हावयास हवा." Cleora Taylor साठी हे घर म्हणजे,जेथे कोणतीही घरभाडे वाढ नाही,सुंदर घरासाठी हेका धरणारी आजीची कटकट नाही,जेथे तिची चारही मुले व स्वमग्नतेची बाधा असलेली मुलगी,हकाने राहू शकेल अशी जागा आहे.श्रीयुत जिमी कार्टर बद्दल बोलतांना ती म्हणते, ' खरोखर त्यांना माझ्या घरासाठी परमेश्वरानेच पाठविले आहे. त्यांच्या रुपाने परमेश्वरच काम करीत आहे.त्यांनी केलेले हे काम म्हणजे माझ्यासाठी आयुष्यभराचा चिरंतन असा ठेवा आहे.'
" किं न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने " असा स्वातंत्र्यवीर सावरकारांचा वारसा सांगणार्‍या आम्ही सुद्धा असे एखादे व्रत घेण्यास काय हरकत आहे ? " TIME " मधील हा लेख वाचुन मला ही म्हणावेसे वाटले की " तेथे कर माझे जुळती ".

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. कार्टर दांपत्याबद्दल काहीही वावगे बोलण्याचा मानस नाही. त्यांचे काम/ घेतलेले व्रत उत्तम आहे हे निर्विवाद आहे.
________________________
फक्त मला खूपदा सिनिकल वाटते. उदा. - एका वेट्रेस च्या कामावरती खूष होउन एका वृद्ध स्त्रीने तिच्या कॉलेज शिक्षणाचा भार उचलल्या ची बातमी काही वर्षांपूर्वी वाचली.
खरच त्या वेट्रेस ला फ्री शिक्षण मिळाले असेल का? तिला काय मागण्या पूर्ण कराव्या लागल्या असतील - उदा - त्या वृद्ध स्त्रीची काळजी घेणे आदि. फ्री असं काही असतं का?
_________________________
कालचीच गोष्ट एका बेघर माणसाने, $२० देउन, गाडी बंद पडलेल्या एका स्त्रीची मदत केली. मग त्या स्त्रीने पुढे कृतद्न्यतेने त्याच्या नाववर 'फंड-मी' नावाच्या एका प्रकल्पाद्वारे कित्येक मिलिअन कमावले. नंतर गुंतागुंत अशी झाली की तो बेघर माणुस ज्याला त्याला सांगू लागला की त्याच्या नावावर पैसे कमावलेले आहेत पण त्याला दिले गेलेले नाहीत. हा अन्याय आहे. त्यातून मग त्या स्त्रीला/तिच्या नवऱ्याला अटक झाली वगैरे वगैरे ..... म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे हे फळ मिळाले.
__________________
इन जनरल काहीही फुकट घेउ नये या मताची मी आहे. ज्या स्त्रीला ४ मुले आहेत, घर नाही त्या स्त्रीच्या जागी स्वत:ला कल्पून पहा, तरीही तुम्ही असाच विचार कराल का?
तर हो!! एकदा फुकट काहीही स्वीकारले की मिंधेपणा येतो. आपल्या तत्वांविरुद्ध तडजोडी कराव्या लागू शकतात.
_____________________
परत एकदा कार्टर दांपत्याचे उदाहरण आदर्शच आहे आणि तरीही ...... I would rather not be at receiving end.
___________________
बाय द वे, कार्टर दांपत्याने फक्त श्रमदान केले आहे. उत्तमच. एका कंपनीत आम्हालाही 'Habitat for humanity' करता, असे श्रमदान करण्यास बोलावलेले होते त्याची आठवण आली. ते श्रमदान होण्याऐवजी आम्हा बिनतांत्रिक लोकांची लुडबूडच झाल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मित्रांनो, नुकतेच वर्तमानपत्रातून वाचनात आले की, सर्व माजी खासदार वा आमदार यांना तह-हयात पेन्शन कां म्हणून दिले जाते याचे स्पष्टीकरण न्यायालयाने, केन्द्र सरकारकडे मागितले आहे. आता यातील काही खासदार/आमदार वा पूर्वी कधीतरी मंत्री म्हणून काम केलेले,काहीजण सक्रिय राजकारणात असतील वा नसतीलही. पण असे कितीजण खरोखरच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत असतील हा संशोधनाचा विषय असू शकतो.

.
सरकारदरबारी अनेक कामं असतात. काही कामं चपराशी टाईप (चतुर्थ श्रेणी) असतात. काही कामं लक्षावधी लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी असतात.
चपराशी हा माणूस असतो आणि आमदार खासदार सुद्धा माणसंच असतात.
चपराशी टाईप कामं करणाऱ्या लोकांना सुद्धा तहहयात पेन्शन मिळते त्यांना. एकदा आपली पात्रता, क्षमता सिद्ध केली की त्यांना ५८ वर्षांपर्यंत नोकरी करता येते.
आमदार खासदार यांची कामं शेकडो, हजारो, लक्षावधी लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी असतात. व दर पाच वर्षांनी योग्यता, पात्रता सिद्ध करावी लागते. जनाधार सिद्ध करावा लागतो.
म्हणून आमदार खासदार यांना पेन्शन अवश्य दिली जावी.
..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0