आजचे दिनवैशिष्ट्य - १७
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
Taxonomy upgrade extras
गदिमा जन्मशताब्दी - आकाशवाणीचा रतीब
पुणे आकाशवाणी व विविध भारतीचा धोबी घाट होऊन युगं लोटली. नवीन टुकार एफ. एम. चॅनेल्सच्या तुटपुंज्या संग्रहातल्या सुमार गाण्यांत लक्षवेधक असं काही नाही. त्यामुळे रेडिओ हा माझ्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्र किंवा व विविध भारती हीच दोन केंद्रं असतात.
नक्की रेडिओ ऐकण्याची वेळ म्हणजे कामावर जाताना - परत घरी येताना. एरवीही आठवड्यात एकदा (वार - वेळ नाही सांगता येणार) गदिमांच्या एकेका गीताचा आस्वाद - निरुपणच म्हणावं असं शंकर अभ्यंकर सांगत आणि मग ते गाणं कडव्याकडव्याने लावत. त्यातलं शेवटचं ३० सप्टेंबरला होतं. एकूण चांगला होता तो कार्यक्रम.
१ ऑक्टोबर उजाडला आणि गदिमा जन्मशताब्दीच्या गंगेत ज्याने त्याने हात धुवून घेतले. एकेका गाण्याचं प्रायोजकत्व !! शेंडेफळ कन्येच्या त्याच आठवणी अनेकवार.
कहर म्हणजे संध्याकाळी दुसऱ्याच कोणाच्या तरी आवाजात - आधी सांगितलं असलं तरी लक्ष नव्हतं आणि नंतर नाव सांगितलं नाही - "स्वये श्रीरामप्रभू ऐकती" हे गाणं अत्यंत बेसूर, शब्दोच्चार ढिसाळ, काही ठिकाणी विपर्यस्त. आणि स्टुडिओत उद्घोषकाने अजीर्ण होऊन कान बंद केले असावेत नाही तर अख्खा कार्यक्रमच आयता आयात असावा त्यामुळे मधे पडून गाणं थांबवणं शक्य नसावं. छळ होता ते गाणं ऐकणं म्हणजे.
धन्यवाद!
गोड मराठी गाणं लावलं आहे बोर्डावर. अभिनय किती गोड, गाणं किती श्रवणीय. अनेक धन्यवाद. यु मेड माय डे!!
प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला
प्रीतीच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला
.
या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढणी तुला हवी का
रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला
.
मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता अधरीच्या या अमृताला
.
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर ((कलाकार : सिमा देव)
चित्रपट - शिकलेली बायको (१९५९).
लेखक कार्ल सेगन
लेखक कार्ल सेगन
सेगनाचार्यांना अभिवादन!!
केवळ लेखक म्हणणे ही कार्ल सेगनची बोळवण करणे वाटते. त्याचे काम किती विविधांगी, मूलभूत स्वरूपाचे होते याची कल्पना अनेकांना असेल. खगोलतज्ज्ञ, सायन्स एज्युकेटर, तत्वचिंतक, विवेकवादी कार्यकर्ते असे अनेकविध आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते असे वाटते.
नादिरा - जन्मदिन (५ डिसेंबर)
नादिरा - जन्मदिन (५ डिसेंबर)
मान मेरा एहेसान, अरे नादान,
के मैने तुझसे किया है प्यार, मैने तुझसे किया है प्यार्
मेरे नजरकी धूप ना भरती रुप तो,
तेरा हुस्न हुवा बेकार .... मैने तुझसे किया है प्यार्
https://www.youtube.com/watch?v=vy-Gd2bbb4w
.
आन हा सिनेमाही छान होता.
२५ डिसेंबर जन्मदिवस
स्वातंत्र्यसैनिक व पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जीना (१८७६)
'पाकिस्तानचे संस्थापक' इथवर ठीक आहे, परंतु 'स्वातंत्र्यसैनिक' कशापायी? स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे नेमके योगदान काय?
'ख्रिसमसला जन्मलेला आणि ९/११ला मरण पावलेला महात्मा' इतकेच म्हणू या फार तर.
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - कैद-ए-आझम दिन (पाकिस्तान)
कैद-ए-आझम नव्हे. काइद-ए-आझम (किंवा कायदेआझम). काइद बोले तो नेता. आझम बोले तो ग्रेट. कायदेआझम यानी कि थोर नेता.
(खरे तर क़ाइद-ए-आझम. क़ाइदमधला क़ नरड्यातला आहे.)
२१ फेब् - सूर्यकांत त्रिपाठी 'निराला'
२१ फेब् - सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' यांचा जन्मदिवस -
'यमुना के प्रति' ही नितांत सुंदर कविता -
https://www.anhadkriti.com/suryakant-tripathi-nirala-yamuna-ke-prati
यमुने, तेरी इन लहरों में
किन अधरों की आकुल तान
पथिक-प्रिया-सी जगा रही है
उस अतीत के नीरव गान?
बता कहाँ अब वह वंशी-वट?
कहाँ गये नटनागर श्याम?
चल-चरणों का व्याकुल पनघट
कहाँ आज वह वृंदा धाम?
कभी यहाँ देखे थे जिनके
श्याम-विरह से तप्त शरीर,
किस विनोद की तृषित गोद में
आज पोंछती वे दृगनीर?
जॉर्जिआ ओकीफ यांचा मृत्यूदिवस/चिंता आपल्या या
चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ यांची चित्रे फार आवडतात. अतिशय व्हायब्रंट असतात. चिंता आपल्या या चित्रकाराविषयी माहीती असल्यास इथे जरुर शेअर करावी.
.
.
अनेकदा समीक्षकांनी तिच्या फुलांच्या चित्रांना, 'स्त्रीचे लैंगिक अवयव' असा रंग दिला. निदान त्यांना ती चित्रे तशी जाणवली. त्यांची चूक नाही खरच तशी वाटतात. परंतु १९४३ मध्ये तिने स्पष्ट केले की लोक/चाहते/समीक्षक, तिच्या फुलांच्या चित्रांवरती स्वत:च्या समजूती आरोपित करत आहेत. त्यांना ती चित्रे स्त्रीच्या लैंगिक अवयवांसम वाटतात.पण ती त्या धारणेशी संमत नाही.
.
.
मुलगी आणि सांड...
१. ती मुलगी आता बैलासमोरून (खरे तर सांडासमोरून) हलवली आहे. आता एनवायएसईच्या बिल्डिंगीसमोर, एनवायएसईच्या बिल्डिंगीकडे तोंड करून उभी असते. (मागच्याच आठवड्यात पाहून आलो.) (बातमी)
२. (त्या सांडाखाली झुकून) त्या सांडाच्या गोट्यांना हात लावून त्या अवस्थेत फोटो काढून घेणे ही एक टूरिष्टी प्रथा आहे. देवळासमोर देवाच्या (किंवा नंदीच्या) दर्शनासाठी लागणार नाही, असली हीऽ मोठ्ठी लाईन लागते त्या सांडाच्या मागच्या बाजूस, या कारणाकरिता. (दुवा)
(पुढील परिच्छेद विकीवरून.)
In addition to having their pictures taken at the front end of the bull, many tourists pose at the back of the bull, near the large testicles "for snapshots under an unmistakable symbol of its virility."[22] According to a Washington Post article in 2002, "People on The Street say you've got to rub the nose, horns and testicles of the bull for good luck, tour guide Wayne McLeod would tell the group on the Baltimore bus, who would giddily oblige."[23] A 2004 New York Times article said, "Passers-by have rubbed—to a bright gleam—its nose, horns and a part of its anatomy that, as Mr. Benepe put it gingerly, 'separates the bull from the steer.'"[5] A 2007 newspaper account agreed that a "peculiar ritual" of handling the "shining orbs" of the statue's scrotum seems to have developed into a tradition. One visitor, from Mississippi, told the Tribeca Trib she did it "for good luck", and because "there's a kind of primal response when you see something like that. You just have to engage it."[7] The enthusiastic reaction to the sculpture continues into the darker hours. "I've seen people do some crazy things to that bull", said a souvenir vendor, "At night sometimes, when people have been drinking, I’ve seen them do stuff to that bull that you couldn’t print in a newspaper."[7]
१९८०ज़मध्ये...
...कॉलेजवयीन तरुण होतो. तेव्हा (त्या वयात) बरी वाटायची ही/असली गाणी. आता स्टुपिड वाटतात.
(खरे तर तेव्हाच स्टुपिड वाटायला पाहिजे होती. आत्यंतिक पर्पज़शून्य गाणी. कदाचित आमच्या तत्कालीन पर्पज़शून्य, अक्कलशून्य तथा यूसलेस आयुष्याचे प्रतिबिंब म्हणूनही भावत असतील त्या काळी, कोण जाणे. आजची तरुण पिढी ही असली गाणी खपवून घेईल, याबद्दल प्रचंड साशंक आहे. असो चालायचेच.)
४ एप्रिल -कवि अज्ञेय /असाध्य वीणा
http://aisiakshare.com/node/2760
अज्ञेय यांचे संपूर्ण नाव ( सच्चिदानंद वात्स्यायन ) माहीत नव्हते. ते आज कळले.
कुतूहल
१७९१ - शनिवारवाड्याला पहिली आग लागली.
यावरून सहज कुतूहल: ब्रिटिशपूर्व हिंदुस्थानात वेगवेगळ्या काळी अग्निशमनाकरिता नागरी/सार्वजनिक व्यवस्था काय होती? पेशवेकाळात? शिवछत्रपतींच्या काळात? सातवाहनकाळात? मौर्यकाळात? वेदकाळात?
जसे, पोलिसांच्या ठिकाणी कोतवाल, राजाचे शिपाई किंवा तत्सम काही वेळोवेळी असावेच. पण मग तसे पाहायला गेले, तर घरांना, इमारतींना इ. आगी लागणे (आणि त्यातून अपरिमित नुकसान होणे - केवळ आग लागलेल्या मूळ इमारतीचेच नव्हे, तर एका इमारतीची आग इतर इमारतींना पसरत जाऊन संपूर्ण मोहल्ल्याचे) ही बाब तर गेला बाजार जगातल्या सर्वात जुन्या व्यवसायाइतकी तरी जुनी असावी; चार मानवे टोळ्यांसह भटकायची सोडून एका ठिकाणी वस्ती करून राहू लागल्यापासूनची ही सामायिक समस्या असावी. मग त्या परिस्थितीत, राज्ये, नगरव्यवस्था वगैरे स्थापन होऊ लागल्यापासून अग्निशमनाची काही सार्वजनिक व्यवस्था न ठेवता, स्वत:च्या मालमत्तेस आग लागल्यास तिच्या निवारणाची डोकेदुखी त्या पीडितावर ढकलणे हे सयुक्तिक वाटत नाही; किंबहुना, आगीच्या बंबवाल्याचा व्यवसाय हा जगातल्या पुरातनतम व्यवसायाइतकाच पुरातन नसण्याचे काहीच कारण दृग्गोचर होत नाही. आणि म्हणूनच, वेदकाळातच मोठमोठे शोध लावलेल्या आपल्या या थोर संस्कृतीत आदिम स्वरूपात का होईना, परंतु इतकी मूलभूत सुविधा१ उपलब्ध होण्याकरिता युरोपियनांच्या२ आगमनाची वाट पाहावी लागली, हे पटत नाही. सबब, या भारतवर्षात वेगवेगळ्या कालावधींत अग्निशमनाच्या नागरी सुविधा कशा प्रकारच्या होत्या, हे जाणून घ्यायला आवडेल.
अशा प्रकारची काही माहिती कोणास आहे काय? किंवा कोठे मिळू शकेल? ('काळ उघडा करणारी पुस्तके'-टैप सदरांसाठी हा चांगला संशोधनविषय आहे.३)
----------
१ नागरी रुग्णवाहिका-सुविधेबद्दल (बोले तो, गंभीरपणे आजारी झालेल्या रुग्णास बैलगाडीवर घालून का होईना, परंतु शक्य तितक्या त्वरित जवळच्या वैद्याकडे घेऊन जाण्याची नागरी व्यवस्था - जिला निरोप्याकरवी वर्दी देऊन त्वरित पाचारण करता यावे.) पुढच्या खेपेस विचारेन. (तेही कुतूहल आहेच.)
२ यात अलेक्झांडरास गणू नये. तो हिंदुस्थानात आगी लावण्याकरिता आलेला असू शकेल, परंतु हिंदुस्थानातील अग्निशमन हे त्याच्या अजेंड्यावर खचितच नसावे.
३ नाही, सीरियसली!
सपशेल असत्य!
१८९३ - द. आफ्रिकेतील आगगाडीत तिकीट काढून पहिल्या वर्गात बसलेल्या गांधींजींनी वंशभेदाचा कायदा मोडून सविनय कायदेभंग केला. त्याबद्दल त्यांना गाडीबाहेर काढले गेले.
हे धादान्त खोटे आहे!
बोले तो:
- महात्मा गांधी द. आफ्रिकेतील आगगाडीत तिकीट काढून पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले: - हे सत्य आहे.
- दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वंशभेदाचा कायदा होता: - पहिल्या वर्गाच्या डब्यात गौरेतरवर्णीयाने बसू नये, असा कागदोपत्री कायदा होता, किंवा कसे, याबद्दल खात्रीशीर कल्पना नाही. (अन्यथा, मुळात त्यांना पहिल्या वर्गाचे तिकीट विकलेच कसे गेले, असा प्रश्न पडतो.) मात्र, तत्कालीन तद्देशीय सामाजिक परिस्थितीस अनुसरून, तसे करण्याचे अलिखित दुष्परिणाम तसे करणाऱ्यावर होत असावेत, हे गांधीजींच्या अनुभवावरून स्वयंसिद्ध आहे. हे अलिखित दुष्परिणाम कायद्यास धरून असतीलही, किंवा नसतीलही. मात्र, ते कायद्यास धरून नसावेत, असे जरी मानले, तरीही, कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशांचाच जर या प्रथेत सहभाग असेल, आणि/किंवा पीडितांप्रति त्यांची सहानुभूती नसेल, तर असे दुष्परिणाम हे कायद्यास धरून नसले, तरीही पीडिताच्या दृष्टीने त्याने काही फरक पडू नये; पीडितास फटका तरीही बसणारच. वंशभेदाचा सरसकट कायदा कागदोपत्री कदाचित नसेलही; वेगवेगळे विशिष्ट कायदे कदाचित वंशभेदमूलक असतील किंवा नसतील, किंवा त्यांची अंमलबजावणी कदाचित वंशभेदात्मक रीतीने होत असेल. ते काहीही असो, परंतु सामाजिक रूढींवर तथा समाजव्यवस्थेवर वंशभेदात्मक विचारसरणीचा पगडा होता, हे निश्चित. त्यामुळे, टू दॅट एक्स्टेण्ट, 'दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वंशभेदाचा कायदा (इन लेटर कदाचित नसला, तरीही इन स्पिरिट) होता', हा मुद्दा ग्राण्ट करावयास मी तयार आहे.
- वंशभेदाचा (कदाचित अलिखित) कायदा मोडल्याबद्दल गांधीजींना गाडीबाहेर काढण्यात आले: - हे सत्य आहे.
मात्र:
- पहिल्या वर्गाचे तिकीट काढून नि त्यानंतर पहिल्या वर्गात बसून वंशभेदाचा कायदा मोडून गांधीजींनी सविनय कायदेभंग केला: हे अजिबात खरे नाही. पहिल्या वर्गाचे तिकीट काढण्यामागे गांधीजींचा उद्देश बाकी काहीही असो१, परंतु एका अनिष्ट कायद्याच्या निषेधार्थ जाणूनबुजून कायदा मोडून सविनय कायदेभंग करणे हा त्यांचा उद्देश खचितच नसावा. (किंबहुना, या प्रवासास सुरुवात करण्यापूर्वी, आपल्या या कृत्यातून एखाद्या अनिष्ट कायद्याचा वा अन्याय्य अलिखित नियमाचा भंग होऊ शकेल, हे गांधीजींच्या गावीही नसावे, असे मानावयास जागा आहे.) त्यामुळे, हा गांधीजींचा 'अडवलीस तू सीट बूडभर, अन्यायाचा खचला पाया' मोमेंट खचितच नव्हता, असे म्हणावेसे वाटते. (तसला मोमेंट बऱ्याच वर्षांनंतर, दांडीयात्रेच्या वेळेस आला. ते जाणूनबुजून केलेले कृत्य होते. आगगाडीतून फेकले जाण्याचा प्रसंग हा फार फार तर 'आलिया भोगासी असावे सादर' मोमेंट होता.)
सबब, गांधीजींबद्दल आणि त्यांच्या सविनय कायदेभंग चळवळीबद्दल संपूर्ण आणि नितांत आदर राखूनसुद्धा, वाट्टेल ते नसते पराक्रम गांधीजींच्या नावावर खपवून देऊ नका, असे कळकळीने सांगावेसे वाटते. असल्या असत्य दाव्यांतून गांधीजींचा रेझ्युमे एंबेलिश करण्याने गांधीजींची थोरवी वाढत नसून, गांधीद्वेष्ट्यांच्या वाइल्डेस्ट वेटड्रीम्समध्येसुद्धा होणार नाही, असा त्यांचा अनादर होतो. तेव्हा, कृपया आवरा!
इत्यलम्|
----------
१ बहुधा, पहिल्या वर्गाचे तिकीट (काढू शकणाऱ्या, आणि) काढणाऱ्या कोणत्याही सामान्य मनुष्याचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढण्यामागे जे-जे म्हणून उद्देश असू शकतात, त्यांपैकीच एक किंवा एकाहून अनेक उद्देश गांधीजींचेही असावेत, असा आमचा कयास आहे. बोले तो: कम्फर्ट; परवडते आहे, तर का नाही; प्रवास करेन, तर स्टाइलमध्ये करेन; कदाचित स्टेटससुद्धा. यात अन्यायाचा निषेध करण्याकरिता औट-ऑफ-द-वे जाऊन तिकीट काढणे हे कोठेही येत नाही, याची कृपया दखल घ्यावी.
तळटीपांनी युक्त प्रतिसाद
पहिला सविनय कायदेभंग बहुधा पासेस जाळण्याच्या प्रसंगी* केला असावा.
*सदर प्रसंग श्री. रिचर्ड अटेनबरा यांनी निर्माण केलेल्या सिनेमातून आम्हांस कळला. अन्यथा गाडीतून फेकणे ते १९१९ ची असहकार चळवळ या मधल्या काळात गांधी काय करीत होते याची आम्हांस काहीच कल्पना** नव्हती.
**आपणास विज्ञान शाखेत*** जायचे असून इतिहास, भूगोल वगैरे विषय हे त्या मार्गातली धोंड**** आहे अशी आमची समजूत होती/समजूत करून देण्यात आली होती.
*** यात आपल्या देशातील थेरडेशाहीचा काही हात नव्हता हे येथे नमूद करून ठेवतो.
**** "स्त्री ही मोक्षाच्या मार्गातील धोंड आहे" या चालीवर वाचावे.
बंकिमचंद्र चटर्जींचा जन्मदिनांक संदिग्ध?
२७ जून
जन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८)
‛चटर्जीं’ची काल (26 जूनला) जयंती साजरी झाली ना? की खरी आज आहे? म्हणजे काल मी तसं रेडीओवर (FM Goldवर) काल होती म्हणून ऐकलं होतं.
काही संदर्भ ‛26 जून’ तर काही संदर्भ ‛27 जून’ सांगताना दिसत आहेत. म्हणजे अजूनही याबाबत संदिग्धता आहे का?
‛ब्रिटॅनिका’वर जन्मदिनाच्या 26जून किंवा 27जून अशा दोन्ही तारखा सांगितल्या आहेत.
अपभू की अपसूर्य?
पृथ्वी अपभू स्थितीत (लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सूर्यापासून सर्वात जास्त अंतर - १५ कोटी २० लाख कि.मी.)
‛अपभू’ हा शब्द मराठीत तरी इथे योग्य वाटत नाही. तो इंग्रजीतील apogee या शब्दाला पर्याय म्हणून जरी पुढे आला असला आणि त्याचा अर्थ ‛खगोलीय वस्तुंमधील जास्तीत जास्त अंतराची स्तिथी’ असा जरी बिनचूक असला तरी त्याचा शालेय शिक्षणातील अर्थ ‛चंद्राची पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असलेली स्थिती’ असा आहे. थोडक्यात, चंद्र-पृथ्वी संदर्भात ‛अपभू’ (apogee) हा शब्द वापरला जातो; तर अशाच प्रकारे पृथ्वी-सूर्य संदर्भात ‛अपसूर्य’ (aphelion) हा शब्द वापरला जातो.
मोल्सवर्थ शब्दकोशानुसार apogee म्हणजे उच्च आणि aphelion म्हणजे मंदोच्च असा स्पष्ट अर्थ सांगितला आहे. मराठीत पर्याय म्हणून हा संदर्भ इथे जास्ती योग्य वाटतो.
व्युत्पत्तीच्या दृष्टीनेही apogeeचा (अपभू/उच्चचा) अर्थ काढायचा झाला तर ‛पृथ्वीपासूनचा त्याच्या कक्षेतील लांबचा बिंदू किंवा तशी स्थिती’ असा व aphelionचा (अपसूर्य/मंदोच्चचा) अर्थ काढला तर ‛सूर्यापासूनची त्याच्या कक्षेतील लांबचा बिंदू किंवा तशी स्थिती’ असा येईल.
थोडक्यात इथे अपसूर्य/मंदोच्च असा शब्द जास्ती योग्य राहील.
चू.भू.द्या.घ्या.
१४ जुलै
संगीतकार मदन मोहन
याबद्दल अनेकदा वाचलं.
याबद्दल अनेकदा वाचलं. चंद्रावर उतरेपर्यंतचा घटनाक्रम नीट समजतो.
परत येताना चंद्राच्या पृष्ठभागावरुन परतीचं उड्डाण, त्या मॉड्युलने चंद्राभोवती फिरत राहिलेल्या मॉड्युलला जाऊन मिळणं, मनुष्याचं या मॉड्युलमधून त्या मॉड्युलमध्ये स्थानांतरण.. आणि परत पृथ्वीकडे प्रयाण.. या परतीच्या प्रवासात चंद्र हे लॉन्च होण्याचं ठिकाण असूनही आवश्यक ती अचूकता आणि नॅविगेशन कसं जमवलं ते नीट समजून घ्यायचंय. व्हिडीओ वगैरे शोधावे लागतील.
जागतिक आणि स्थानिक
हे दिनविशेषात येण्याइतकं महत्वाचं का म्हणे?
एकोळी दिनविशेषात हे सांगता येणं कठीण आहे, पण ह्याला आजच्या 'स्थानिक उद्योजक / शेतकरी / उत्पादक वगैरे टिकावेत ह्यासाठी परकीय उत्पादनांवर बंदी / निर्बंध घालावेत का?' ह्या वादांचा संदर्भ आहे. ह्या प्रकारच्या प्रश्नावरून दंगा होऊ शकतो ह्याचं हे खूप जुनं (कदाचित इतिहासात नोंदलेलं पहिलंच) उदाहरण आहे.
पहिला राज्याभिषेक रायगड वर
पहिला राज्याभिषेक रायगड वर राजधानी वसविल्या नंतर इथल्या शास्त्री,पंडितांनी केलेला आणि दूसरा काशी चे पंडित गागाभट्ट यांनी केलेला, असे आहे का?
गागाभट्टांनी म्हणे राज्याभिषेका चा विधी सिद्ध करण्या आधी अनेक पोथ्या पुराणे आभ्यासिली. कारण बऱ्याच मोठ्या काळानंतर (म्हणजे बहुदा देवगिरीचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर), एका हिंदू राजाला प्रथमच राज्याभिषेक होणार होता.
पहिला गागाभट्टांनी वैदिक
पहिला गागाभट्टांनी वैदिक पद्धतीने केला. सिद्ध/सत्पुरुष कॅटेगरीतील एक तांत्रिक विद्येतील पारंगत गृहस्थ तेथे महाराजांचे निमंत्रणावरून उपस्थित होते. त्यांना बहुधा गागाभट्टांना किंवा जनरल वैदिक पद्धतीला मिळणारा सन्मान बघून पोटात दुखले आणि त्यांनी महाराजांना भेटून "तुम्हारे राज्याभिषेक के टैमपे ऐसे ऐसे अपशकून हुवे. मै तांत्रिक पद्धतसे राज्याभिषेक कर सक्ता, जिससे अप्शकून टळ सकते, पण तुमकू चाहिए तोईच. बाद में मेरेकू बोल्ने का नै" असे काहीसे सांगितले. त्याला वैतागून / त्यांचा अपमान होऊ नये म्हणून महाराजांनी तांत्रिक पद्धतीनेही एक राज्याभिषेक २-३ दिवसांनंतर करून घेतला.
८ ऑक्टोबर: मृत्यूदिवस
सर्वोदयी कार्यकर्ते जयप्रकाश नारायण (१९७९)
हे सद्गृहस्थ त्या वर्षी दोनदा वारले, असे अंधुकसे आठवते. (पैकी, ८ ऑक्टोबर हा कितवा मृत्यूदिवस, हे मात्र नक्की आठवत नाही. बहुधा दुसरा असावा. (चूभूद्याघ्या.))
(अवांतर: "Cowards die many times before their deaths; The valiant never taste of death but once." ही सीझेरियन शेक्सपियरोक्ती (की शेक्सपियरियन सीझरोक्ती?) या निमित्ताने उगाचच आठवून गेली.)
(अतिअवांतर: सध्याच्या काँग्रेसचा फॅन नाही; परंतु तरीही, काँग्रेसच्या राज्यात कधी इतका वाईट फॉ पा झाल्याचे आठवत नाही. (अगदी राजीव गांधींच्या राज्यातसुद्धा.) (चूभूद्याघ्या.))
क्रांतिसिंह नाना पाटील
6 डिसेंबर :
पुण्यस्मरण : चित्रकार जाँ-बातिस्त-सिमेआँ शार्दँ (१७७९), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८८२), गायक व गिटारिस्ट लेड बेली (१९४९), भारतीय घटनेचे शिल्पकार व विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९५६), मानसशास्त्रज्ञ व विचारवंत फ्रँझ फॅनन (१९६१), लेखक अनिल बर्वे (१९८४), गायक व गिटारिस्ट रॉय ऑर्बिसन (१९८८), चित्रकार प्रभाकर बरवे (१९९५), शिल्पकार सेझार (१९९८)
इथे क्रांतिसिंह नाना पाटील add करता येतील का?
दिनवैशिष्ट्य - जन्मदिवस - १० डिसेंबर
स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न सी. राजगोपालाचारी (१८७८)
बस एवढेच?
स्वतंत्र भारताचे अखेरचे गवर्नर जनरल, वगैरे काहीच नाही?
झालेच तर, मद्रास प्रांतात शैक्षणिक संस्थांत हिंदीची सक्ती करू पाहणारे मुख्यमंत्री?
अगदीच नाही, तर गेला बाजार महात्मा गांधींचे व्याही?
७८ : बौद्ध सम्राट कनिष्काने
७८ : बौद्ध सम्राट कनिष्काने शक संवताचा आरंभ केला.
१. बौद्ध सम्राट? कुषाण सम्राट कनिष्क असे हवे का? कनिष्काचे बौद्ध असणे इतके महत्वाचे आहे का?
२. शक संवताचा प्रारंभ कनिष्काने केला नसून चष्टनाच्या राज्यारोहनापासून शकाचा प्रारंभ झाला असावा असे तज्ञांचे मत आहे.
विकिपिडियातून उद्धृत पुढे:
"The beginning of the Shaka era is now widely equated to the ascension of king Chashtana in 78 CE. His inscriptions, dated to the years 11 and 52, have been found at Andhau in Kutch region. These years are interpreted as Shaka years 11 (89 CE) and 52 (130 CE). A previously more common view was that the beginning of the Shaka era corresponds to the ascension of Kanishka I in 78 CE. However, the latest research by Henry Falk indicates that Kanishka ascended the throne in 127 CE. Moreover, Kanishka was not a Shaka, but a Kushana ruler."
तज्ञांनी अधिक प्रकाश टाकल्यास बरे होईल.
शेवटी,
Wikipedia is the best thing ever. Anyone in the world can write anything they want about any subject, so you know you are getting the best possible information.
--- Michael Scott
हेदेखिल खरेच.
कनिष्क
काही ठिकाणी कनिष्काचा दावा आढळतो. उदा. १ आणि २
इथून उद्धृत
इसे कुषाण राजा कनिष्क ने चलाया या किसी अन्य ने, इस विषय में अन्तिम रूप से कुछ नहीं कहा जा सका है। यह एक कठिन समस्या है जो भारतीय इतिहास और काल निर्णय की अत्यन्त कठिन समस्याओं में मानी जाती है।
खात्री देता येत नसल्यामुळे कनिष्काचा उल्लेख काढला आहे.
खुसपट
१९८० : शीतयुद्ध - अफगाणिस्तानमधील सोव्हिएत सैन्याच्या विरोधात अमेरिकेने मॉस्कोत होऊ घातलेल्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
हे वाक्य,
"१९८० : शीतयुद्ध - मॉस्कोत होऊ घातलेल्या ऑलिंपिक खेळांवर अफगाणिस्तानमधील सोव्हिएत सैन्याच्या विरोधात अमेरिकेने बहिष्कार टाकला."
असे पुनर्शब्दांकित करता येईल काय?
सध्या आहे तसे वाचल्यास, अफगाणिस्तानमधील सोव्हिएत सैन्याच्या विरोधात अमेरिकेने मॉस्कोत ऑलिंपिक खेळ होऊ घातले होते, त्यांवर (कोणी कोण जाणे - कर्ता गायब!) बहिष्कार टाकला' असा काही भलताच अर्थ (पार्सिंग एररमुळे) प्रतीत होत आहे.
असो चालायचेच.
(२ मेच्या दिनवैशिष्ट्यांतून)
१९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
जगातले पहिले जेट विमान नव्हे. (ते - जे कोणते असेल ते - तर दुसऱ्या महायुद्धात रणभूमीवर - किंवा खरे तर रणावकाशात - वापरले गेले.) १९५२चे ते जगातले पहिले व्यावसायिक (commercial) जेट-उड्डाण म्हणता येईल.
(आणि, 'जोहान्सबर्ग' नव्हे. जोहानिसबर्ग.)
बादवे, हे विमान (द हॅविलंड डीएच १०६) कॉमेट जातीचे होते. त्याकाळी या विमानजातीची पुष्कळ टिमकी वाजवण्यात आली होती, असे समजते. (माझ्या लहानपणी, मला आठवते, त्याप्रमाणे, हिंदुस्थानात (किंवा किमानपक्षी पश्चिम महाराष्ट्रात, निदान पुण्यात तरी) शाळेच्या वह्यांचा 'कॉमेट' म्हणून एक बऱ्यापैकी लोकप्रिय ब्राण्ड असे, नि त्यावर या विमानाचे (कल्पना)चित्र लोगो म्हणून असे. परंतु ते असो.)
मात्र, या विमानांत एक गंभीर रचनादोष होता, ज्यायोगे, ही विमाने अनेकदा भर उड्डाणात अचानक मध्येच छिन्नविच्छिन्न होत. अनेक अपघातानंतर आणि अनेक चौकशांत यामागचे कारण न कळल्यामुळे या विमानाची उड्डाणे दीर्घकाळाकरिता स्थगित (ground) करण्यात आली. पुढे असे लक्षात आले, की (इतर रचनादोषांबरोबरच) या विमानाच्या खिडक्या चौरस आकाराच्या होत्या; त्यामुळे उड्डाणादरम्यान खिडक्यांच्या कोपऱ्यांच्या ठिकाणी विमानाच्या रचनेवर प्रचंड ताण येत असे, त्यातून हे अपघात घडत. मग विमानाची रचना बदलून खिडक्यांचा आकार बदलून त्यांचे कोपरे निमुळते करण्यात आले, इतर रचनादोषही दुरुस्त करण्यात आले, नि मग हे विमान पुन्हा वापरात आणण्यात आले.
मात्र, मधल्या स्थगितीच्या काळात विमान बनवणाऱ्या कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान तर झालेच, परंतु मध्यंतरी बोइंगने (पुढच्याच्या ठेचांतून शहाणे होऊन) जेटक्षेत्रात आघाडी मारली. त्यानंतरसुद्धा (सुधारित) कॉमेटचे उत्पादन अनेक वर्षे चालू होते, परंतु पुढे त्यास बाजारात तितकेसे यश कधीच मिळाले नाही.
(बरीचशी माहिती विकिपीडियामधून; अधिक माहितीकरिता येथेसुद्धा पाहावे.)
२५ जुलै
२००० : पारीच्या विमानतळाबाहेरच कॉन्कॉर्ड विमान कोसळले; कॉन्कॉर्डला घरघर लागण्याची सुरुवात.
पारीला मराठीत पॅरिस म्हणण्याची पद्धत बंद पडली आहे काय सध्या?
नाही म्हणजे, ठीकच आहे. 'ॲ' हा तसाही (पारंपरिक) मराठीकरिता नैसर्गिक ध्वनि नाहीच.
(पण मग, 'पारी'मधला 'री' घशातून खाकरून काढल्यासारखा म्हणण्याची पद्धत असते ना? (चूभूद्याघ्या.) ते मराठीत/देवनागरीत कसे जमवायचे म्हणे?)
सर्व पुरुषांना शुभेच्छा
बावळट पुरुषी गोष्टींचा दिवसाच्या सर्व पुरुषांना शुभेच्छा.
निटपिक (११ जूनची नोंद)
१९३५ - एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
लहरींमध्ये ए.एम./एफ.एम. असले काही असते काय?
माझ्या त्रोटक समजुतीप्रमाणे, ए.एम./एफ.एम. हे (रेडियो-)लहरींचे प्रकार नसून, एकाच (उच्च कंप्रतेच्या - मराठीत High Frequency) वाहक (Carrier) रेडियो लहरीवर, पाठविण्यात येणाऱ्या ध्वनि-(किंवा, चित्राच्या/चलच्चित्राच्या बाबतीत प्रकाश-)संदेशाबद्दलची माहिती कशी चढवायची१, २, ३, याच्या दोन परस्परभिन्न पद्धती आहेत.
त्यामुळे, ही नोंद
१९३५ - एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. प्रसारण केले.
अशी लिहिल्यास ते अधिक सयुक्तिक ठरावे, असे मला वाटते. ('लहरींचे' हा शब्द काढून टाकावा.)
----------
१ वाहक लहरीच्या उच्चनीचतेवर (Amplitude) ध्वनि-(/प्रकाश-)संदेशाबरहुकूम फेरफार करायचा झाल्यास ते Amplitude Modulation, अथवा AM.
२ वाहक लहरीच्या कंप्रतेवर (Frequency) ध्वनि-(/प्रकाश-)संदेशाबरहुकूम फेरफार करायचा झाल्यास ते Frequency Modulation, अथवा FM.
३ याव्यतिरिक्त, Phase Modulation, अथवा PM, असा एक तिसरा प्रकारसुद्धा असतो, असे ऐकून आहे, परंतु त्याच्या स्वरूपाबद्दल मला कल्पना नाही.
आभार (अधिक थोडे सेल्फ-निटपिक)
वारंवारिता बोले तो फ्रीक्वेन्सी, हे बरोबरच. (मला वाटते तो हल्लीचा प्रमाण शब्द असावा.) कंप्रता म्हणजेसुद्धा तेच; कंप्रता मला वाटते आमच्या अगोदरच्या पिढ्यांतला मराठीकरणाचा प्रयत्न असावा.
'उच्चनीचते'च्या बाबतीत मात्र माझे जरा चुक्याच. उच्चनीचता (जुन्या पिढ्यांतला शब्द) बोले तो अँप्लिट्यूड नव्हे; उच्चनीचता बोले तो पिच. म्हणजे खरे तर फ्रीक्वेन्सीचाच आविष्कार; अँप्लिट्यूडचा नव्हे.
अँप्लिट्यूडकरिता आपण म्हणता तसे आयाम हा सध्याचा प्रमाण शब्द असावा. मात्र, 'आयाम'मधून सामान्य मराठी माणसाला (अर्थ अगोदरच ठाऊक असल्याखेरीज) नेमके काय म्हणायचे आहे ते लक्षात येत नाही. ('आयाम'चा 'ॲस्पेक्ट' असासुद्धा एक अर्थ मराठीत होऊ शकतो, जो, मला वाटते, अधिक प्रचलित आहे. आता, अँप्लिट्यूड काय किंवा फ्रीक्वेन्सी काय, हे खरे तर दोन्ही लहरीचेच आयाम (ॲस्पेक्ट) आहेत (इतरही असतील); तेव्हा, नेमक्या कोणत्या आयामाबद्दल बोलायचे आहे, असा प्रश्न सामान्य (lay) मराठी माणसास पडू शकतो; शिवाय, अँप्लिट्यूड म्हणजे नेमके काय, याबद्दल अर्थबोध होत नाही. याकरिता, असंदिग्ध असा एखादा सोपा, सुटसुटीत, (कदाचित अगोदरच्या पिढ्यांत का होईना, परंतु) प्रचलित शब्द पाहात होतो. नेमका चुकीचा निवडला. चालायचेच!)
तूर्तास, 'अँप्लिट्यूड म्हणजे अँप्लिट्यूड', एवढेच म्हणून सोडून देतो.
----------
सांगायचे एवढेच होते, की ए.एम. आणि एफ.एम. हे (रेडियो)लहरींचे प्रकार नसून, रेडियो लहरींद्वारे संदेशवहनाच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत, असे कदाचित म्हणता येईल. (चूभूद्याघ्या.)
----------
फेज मॉड्युलेशनच्या उपयोगांबद्दल आभार. मात्र, हा नक्की काय प्रकार असतो, ते (मला) कळलेले नाही.
नाही, हे(च) शब्द बरोबर आहेत
नाही, हे(च) शब्द बरोबर आहेत असा काही माझा दावा नाही. पण ह्या सध्याच्या प्रचलित संज्ञा आहेत. आणि त्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदीवरून जशाच्या तशा उचलल्या आहेत. ते एक असो. सांप्रत कंप्रता हा शब्द प्रचलित नाही. आयाम हा शब्द Amplitude ला योग्य प्रतिशब्द आहे की नाही हे सोडून द्या. तसेही 'विभव' आणि 'विभवांतर' ह्या संज्ञांवरून कुठल्या सामान्य मराठी माणसाला काय घंटा बोध होणार आहे?
Phase साठी नक्की कुठली संज्ञा वापरतात हे सापडले नाही. प्रावस्था हा शब्द कदाचित वापरत असावेत. Phase modulation म्हणजे carrier wave आणि modulating wave यांच्या संयोगाने प्रक्षेपित करण्यासाठीची एकच लहर बनवण्याची फेज आधारित पद्धत आहे. यात frequency आणि amplitude हे स्थिर राहतात. त्यातही आणखी बरेच उपप्रकार आहेत. फोनच्या बाबतीत बोलायचं झालं तर Frequency modulation च्या तुलनेत phase modulation चा फायदा हा क्रॉस-कनेक्शन आणि नॉईज टाळण्यासाठी जास्त होतो असे ऐकून आहे. मी काय त्यातला तज्ज्ञ नाही, तेव्हा चुभूदेघे.
२ सप्टेंबर
१९४६ : तात्पुरते मंत्रिमंडळ बनवून, पं. नेहरू भारताचे उपराष्ट्रपती बनले. त्यांच्याकडे पंतप्रधानाचे अधिकारही होते.
हे चुकीचे भाषांतर आहे.
'भारताचे उपराष्ट्रपती' असे कोणतेही पद तेव्हा (२६ जानेवारी १९५०पूर्वी) अस्तित्वात नव्हते.
'व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष' (Vice President of the Viceroy's Executive Council) म्हणजे 'भारताचे उपराष्ट्रपती' (Vice President of India) नव्हे!
----------
मुख्य म्हणजे, तेव्हा भारताला/हिंदुस्थानाला 'राष्ट्रपती' अथवा President नव्हता. होता, तो Viceroy - बोले तो, 'उप-राजा' म्हणू या, हवे तर - होता. हा उप-राजा हा हिंदुस्थानाच्या कार्यकारी मंडळाचा (सरकारची कार्यकारी - प्रत्यक्ष राज्यकारभार करणारी, कायद्यांची अंमलबजावणी करणारी - शाखा; मंत्रिमंडळाच्या समान) पदसिद्ध (ex officio) अध्यक्ष असे, 'हिंदुस्थानचा राष्ट्रपती' नव्हे. १९४६ साली या कार्यकारी मंडळाचे रूपांतर हिंदुस्थानच्या अंतरिम शासनात - हंगामी सरकारात - करण्यात आले, नि (व्हाइसरॉय वगळता) सर्व हिंदुस्थानी सभासदांचा समावेश करण्यात आला, तथा मंडळाच्या (हिंदुस्थानी) उपाध्यक्षास पंतप्रधानांचे अधिकार देण्यात आले.
(बाकी, 'राष्ट्रपती'विना 'उपराष्ट्रपती' बोले तो... हॅ हॅ हॅ.)
----------
परंतु, असो. अखेरीस हे 'ऐसी'वरील 'दिनवैशिष्ट्य' आहे. तसेही, तपशिलांत ढिसाळपणा (किंवा तपशिलांकडे साफ दुर्लक्ष - नि 'ठोकून देतो ऐसा जे'ची घाई) हा भारतीयांचा गुणविशेष तथा स्थायीभाव आहेच, आणि, कितीही म्हटले, तरी 'ऐसी'वाले हे शेवटी बोलूनचालून पडतात भारतीयच. त्यामुळे, चालायचेच!
गोविंदा ..
आजच्या दिन्वैशिष्ट्य मधे हे नाव वाचले. त्यांची दोन गाणी आठवली
एक सांस्कृतिक आणि एक ज्ञानवर्धक
पुण्यस्मरण
शूर, लढवय्ये आणि स्वाभिमानी ... शिवपुत्र संभाजीराजे
यांच्या स्मृतीस शतश: प्रणाम.
शिवाजी महाराजांच्या मृत्य नंतर औरंगजेब बादशहा ससैन्य महाराष्ट्रामध्ये तळ देऊन राहीला होता. त्यामुळे संभाजी राजांना सतत लढाया, मोहीमांवर जाणे भाग होते. त्यांच्या अनुपस्थितीत स्वराज्याची सर्व जबाबदारी त्यांनी महाराणी येसुबाईकडे सोपविली होती. येसुबाई फक्त अभिषिक्त राजाच्या महाराणी नसून राजकर्त्या देखिल होत्या. संभाजी राजांनी त्यांच्या सन्मानार्थ स्वतंत्र राजमुद्रा दिली होती. त्यावर असे शब्द कोरलेले होते..
"गृहिणी सचिव प्रिय शिष्या पत्नी |
स्त्री सखी राज्ञी जयती ||"
गांगुली...
क्रिकेटपटू सौरव गांगुली (१९७२)
कृपया हे नाव 'सौरभ' असे लिहिता येईल काय?
बंगाली रोमनीकरणात अनेकदा व्ही हे अक्षर 'भ'करिता वापरले जाते. त्याचा उच्चार 'व' किंवा 'व्ह' असा करणे अपेक्षित नसून, 'भ' असा करणे अपेक्षित आहे.
(दाक्षिणात्यांच्या रोमनीकरणात अनेकदा 'टी-एच' हे अक्षरद्वय 'त'करिता वापरले जाते; दाक्षिणात्यांच्या नावांचे उच्चार 'श्रीकांथ', 'रोहिथ', 'सविथा', किंवा 'स्मिथा' असे करणे जेणेकरून अपेक्षित नसते, तद्वत्.)
२९ ऑगस्ट - मृत्युदिवस - काझी नझरूल इस्लाम
विद्रोही बांग्लादेशी कवी आणि बासरीवादक काझी नझरूल इस्लाम (१९७६)
यांना बांग्लादेशी कवी म्हणणे हे तांत्रिकदृष्ट्या अगदीच चूक म्हणता येणार नाही, परंतु, ते न्यायास धरून होईल काय?
ते विविध वेळी, तात्कालिक परिस्थितीनुसार, ब्रिटिश हिंदुस्थानी, भारतीय, तथा बांग्लादेशी नागरिक होते, आणि त्यांच्या कवितांतून विभिन्न वेळी भारत तथा बांग्लादेश दोन्हींच्या स्वातंत्र्यलढ्यांस प्रेरणा मिळालेली आहे, या दोन्हीं बाबी खऱ्या आहेत. मात्र:
- त्यांच्या वाङ्मयीन/काव्यात्मक कारकीर्दीचा काल हा पूर्णपणे स्वातंत्र्यपूर्व कालात होता, तथा, त्या कालात ते (१) (अर्थातच) ब्रिटिश हिंदुस्थानी नागरिक होते, आणि (२) कलकत्त्यात स्थायिक होते.
- (भारतीय) स्वातंत्र्यप्राप्तीच्या थोड्या अगोदरपासून ते विकलांग तथा विकलमनस्क होते, तथा कार्यरत नव्हते.
- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे ते (विकलांग तथा विकलमनस्क अवस्थेत) भारतातच (भारतीय नागरिक म्हणून) स्थायिक होते.
- बांग्लादेशच्या स्थापनेनंतर, त्यांच्या मृत्यूच्या जेमतेम चार वर्षे अगोदर, बांग्लादेश सरकारच्या विनंतीवरून त्यांना बांग्लादेशात सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्यात आले, आणि
- त्यांच्या मृत्यूच्या जेमतेम सहा-साडेसहा महिने अगोदर त्यांना बांग्लादेशी नागरिकत्व प्रदान करण्यात आले.
या सगळ्या बाबी लक्षात घेता, त्यांची ओळख (निव्वळ) 'बांग्लादेशी कवी' अशी करून देणे उचित ठरेल काय?
(अतिअवांतर: त्यांची पत्नी प्रमिला ही हिंदू होती.)
अरेरे!
(१ सप्टेंबर)
१६६८ : पोर्तुगालच्या राजकन्येचे इंग्लंडच्या राजाशी लग्न; या लग्नात पोर्तुगीजांकडून इस्ट इंडिया कंपनीला मुंबई आंदण मिळाली.
तपशिलांत गलथानपणा करण्याची परंपरा 'ऐसी' अखेरीस सोडणार नाहीच ना?
- सर्वप्रथम, पोर्तुगीजांकडून ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई आंदण मिळाली नाही. (आंदण बोले तो विवाहप्रसंगी वधूपित्याने वधूस किंवा वरास देऊ केलेली भेट. पोर्तुगालच्या राजकन्येचे लग्न ईस्ट इंडिया कंपनीशी लागले होते काय?) मुंबई आंदण मिळाली, ती इंग्लंडच्या राजाला. त्याने ती नंतर ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने दिली. (आंदण नव्हे.)
- पोर्तुगालच्या राजकन्येचे लग्न (इंग्लंडच्या राजाशी) १ सप्टेंबर १६६८ रोजी लागले नाही. (विकीपीडियावरील माहितीप्रमाणे) या विवाहासंबंधी करार २३ जून १६६१ रोजी झाला (या करारान्वये इंग्लंडच्या राजाला मुंबई आंदण मिळाली); त्यानंतर पोर्तुगालची राजकन्या १३-१४ मे १६६२ दरम्यान पोर्तुगालहून इंग्लंडला आली; त्यानंतर २० मे १६६२ रोजी तिची आणि इंग्लंडच्या राजाची प्रत्यक्ष भेट झाली; त्यानंतर २१ मे १६६२ रोजी प्रत्यक्ष विवाह झाला. यांपैकी कोणतीही तारीख १ सप्टेंबर १६६८ या तारखेशी मिळतीजुळती नाही!
- इंग्लंडच्या राजाने १ सप्टेंबर १६६८ रोजी ईस्ट इंडिया कंपनीस मुंबई भाड्याने दिली नाही. ईस्ट इंडिया कंपनीस मुंबई भाड्याने देण्यासंबंधीचे फर्मान इंग्लंडच्या राजाने २७ मार्च १६६८ रोजी जारी केले. हीदेखील तारीख १ सप्टेंबर १६६८शी मिळतीजुळती नाही.
मग १ सप्टेंबर १६६८ रोजी (मुंबईच्या संदर्भात) नक्की काय घडले?
उपरोल्लेखित २७ मार्च १६६८चे फर्मान घेऊन 'कॉन्स्टँटिनोपल मर्चंट' नावाचे जहाज १ सप्टेंबर १६६८ रोजी सुरतेस पोहोचले.
(त्यानंतर कंपनीने मुंबईचा प्रत्यक्ष ताबा २३ सप्टेंबर १६६८ रोजी घेतला. ही माहिती येथून साभार.)
----------
थोडक्यात, राजाने आपले फर्मान "पोष्टात" टाकले, ते "टपाल" कंपनीच्या मुक्कामपोष्टी १ सप्टेंबर १६६८ रोजी पोहोचले, इतकेच काय ते त्या तारखेचे महत्त्व!
----------
ही सर्व माहिती मला नव्हती. परंतु, जालावर सहज उपलब्ध आहे. गूगल, विकीपीडिया आदि आपले मित्र आहेत!
----------
असे असताना, इतके सोपे असताना, 'ऐसी'कारांनी या सदरात डोळे झाकून काहीतरी ठोकून देण्याअगोदर थोडा ड्यू डिलिजन्स केला, आपण काय छापतो आहोत, ते थोडे पडताळून पाहण्याचे किमान तथा माफक कष्ट घेतले, तर नक्की काय बिघडेल?
(पण लक्षात कोण घेतो? परिस्थितीत सुधारणा होण्याच्या आशा या माझी श्रेणिप्रदानव्यवस्था पुन:प्रस्थापित होण्याच्या आशेइतक्याच फोल आहेत, हे लक्षात आल्याकारणाने, सोडून दिलेल्या आहेत. असो चालायचेच!)
अरे .. गदिमांना विसरले काय
अरे .. गदिमांना विसरले काय तुम्ही लोकं?
१) रम्य ही स्वर्गाहून लंका
https://m.youtube.com/watch?v=juq16lSm6KA&feature=youtu.be
२) धुंद मधुमती
https://m.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E
३) जीवलगा कधी रे ...
https://m.youtube.com/watch?v=00eMksT4tPQ