अग अग म्हशी

अग अग म्हशी
...............
एका गावत एक ब्राह्मण रहात असतो..
पत्नि व २ मुले असतात..बंड्या अन काशी
थोडी शेति असते .. जुने घर..परसदारी २ म्हशी पाळल्या असतात..
शेति व भिक्षुकी करत उदर निर्वाह करत आसे..
पुरोहित तसा प्रेमळ असतो पण स्वभावाने अति कोपिष्ट व रागीट असतो..
एव्हढ्या तेव्हढ्या कारणावरुन चिडत असे ..व रागवत असे..
बायको बिचारी गरीव व मुख दुर्बळ असते..
ति उलट बोलत नसे..मात्र हा ब्राह्मण तिला " संन्यास घ्यायला जात आहे" अश्या धमक्या देत असे.
संन्यासाचे नाव काढले कि ति भार्या व मुले घाबरत असे..पतिने जर संन्यास घेतला तर आपले व मुलांचे कसे होणार ह्या काळजिने घाबरत असे..
मग मुले व पत्नि त्याची विनवणी करत.."बाबा नका ना घेऊ संन्यास" असे मुले व पत्नि म्हणाली व राग शांत झाला कि मग तो ताळ्यावर येत असे...
पुन्हा ७-८ दिवस झाले कि हाच तमाशा..बायको ह्या प्रकरणाला विटली होति..ति सारे त्याच्या मनासारखे करत असे पण हा काहितरी खुसपट काढुन भांडत असे..
नव~याने संन्यास घेतला तर आपले कसे होणार या काळजिने ति खंगत चालली होति.
एकदा दुपारी ति शेजारणी कडे कामा साठी गेली..तिचा उतरलेला चेहरा बघता शेजारणीने "काय झाले" असे म्हणत विचारपुस केली..
त्या वर ति म्हणाली..आहो काय सांगु आमचे हे खुप रागीट आहेत..जास्त बोलले कि "मी संन्यास घेतो" असे म्हणतात..त्यानी संन्यास घेतला तर आमचे काय होणार या भितिने मी कायम काळजित असते..काय करावे तेच समजत नाहि....
शेजारिण हुशार असते ति म्हणते..अग एव्हढेच ना?? मग नको काळजी करु..संन्यास घेणे एवढे सोपे नाहि ..१ दिवसात पळुन येईल तुझा नवरा तिथुन..परत म्हणाली कि त्याला सांग खुशाल जा संन्यास घायला"
हे ऐकताच त्या ब्राह्मणाच्या बायकोस धिर आला.....
.
पुढे ३-४ दिवसात परत नवरोबाच्या अंगात आले..छोटेसे कारण होते पण तो भयंकर रागवला..पत्नि काहिच बोलली नाहि..त्या मुळे हा आणखिनच चिडला व म्हणाला.. " मी जातोच सन्यास घ्याला सन्यास घेतल्यावर तुमचे डोळे उघडतिल...या वर ति भार्या म्हणाली कि "काय बोलणार आपणास जे योग्य वाटते ते करावे"...
पतिच्या या उत्तराने ब्राह्मण आणखिनच चिडला व म्हणाला बस्स ठरल..आता जातो मी सन्यास घ्यायला...
.
त्या क्रोधित पतिने अंगावर सदरा चढवला..पायात पादत्राणे सरकवली अन तो ताडताड घराबाहेर निघाला.
गावाबाहेर एक मठहोता त्या ठिकाणी हे महाशय पोहोचले..
मठात गेल्यावर त्याने मठाधिपतिला नमस्कार केला व म्हणाला" स्वामी मि संसारास कंटाळलेला एक जिव आहे मला सर्वातुन मुक्ति हवि आहे व मला सन्यासी बनुन सन्यस्थ जिवन जगायचे आहे.."
आपले मठात स्वागत आहे..आपल्या सारख्या जिवासाठीच हा मठ उघडला आहे..पण त्या साठी आपणास एक महिना मठात रहावे लागेल व मठाचे नियम काटेकोर पणे पाळावे लागति.व मग दिक्षा मिळाली कि आपण सन्यस्थ जिवन जगु शकाल..व त्याची आज पासुन सुरवार करु यात... मठाधिपति म्हणाले
मात्र तुला मठाचे नियम पाळवे लागतिल त्यात हयगय खपवुन घेतली जाणार नाहि..
त्याला त्या ब्राह्मणाने होकार दिला
.

आज तु आश्रमाचे सारे आंगण झाडुन काढायचे त्या नंतर नदिवर जाऊन आश्रमासाठी पाणी भरु ठेवायचे ..हे ऐकताच त्या ब्राह्मणाच्या पोटात गोळा आला.कधी इकडची काडि तिकडे करायची वेळ त्या वर आलेली नव्ह्ति..पण हे आदेश ऐकताच तो घाबरला..
आणी हो..स्वामी पुढे सांगु लागले.कि हे कामे झाल्यावर भोजनाची वेळ होईल...
जेवण ..जिव्हा..जेवणातले विविध रस हे मानवाच्या -हासाचे प्रमुख कारण आहे त्या मुळे त्या मुळे त्याव वासनावर विजय मिळवण्या साठी आम्हि एक खास कार्यक्रम केला आहे.जेवणात विविध रस असतात.. त्या बद्दल तिटकारा घृणा निर्माण होणे गरजेचे असते..त्या साठी तुला रोज नवरसाची जेवणे दिलि जातिल..जसे आज तिखट हा रस आहे.. कवठा एव्हढा तिखटाचा गोळा चतकोर भाकरिबरोबर तुला संपवायचा आहे..उद्या कडु रस ..त्या साठी कडुलिंबाचा गोळा व भाकरी असा कार्यक्रम चालत राहिल..ज्या योगे तु सर्व या मोहापासुन मुक्त होशिल...
.
हे ऐकताच त्या ब्राह्मणाला घाम फुटला..सारे आयुष्य त्याचे आरामात गेले होते..रोज सुग्रास जेवण सेवा करणारी पत्नी हे सारे आठवताच त्याचे मन गलबलुन जाते.स्वामिच्या कचाट्यातुन तो कशिबशी सुटका करुन घेतो बाहेर येतो व काय करावे त्याला कळेनास होते..विचार करत तो तडक तसाच बाहेर पडतो व गायरान असते तिथे जाऊज एका झाडाखाली बसतो..प्रसंग तर बाका असतो..मारे फुशार्क्या मारत घर सोडलेल असते..घरी गेलो तर बायकोचे टोमणे खावे लागणार..ह्या विचारात असतानाच त्याला आपल्या म्हशिचे हंबरणे ऐकु येते..तो म्हशिकडे जातो व प्रेमाने तिच्या पाठिवर थाप मारतो..मालकाची थाप पडताच ति आनंदते व मालकास चाटु लागते..
.
चरणे झाल्यावर म्हैस निघते..ब्राह्मणाच्या डोक्यात कल्पना येते व तो तिचे शेपुट धरतो व घरी जाण्यास निघतो..मात्र रस्त्यात"अग अग म्हशी मला कुठे नेशी" म्हणत असतो..
म्हैस घरी येते तिचे हंबरणे ऐकताच पत्नी बाहेर येते समोर पतिस पहाते..पण त्या कडे लक्ष न देता म्हशिस गोठ्यात बांधण्यास नेते...
इकडे भटजी बुवा घरात येतात..मुले पण "बाबा आले बाबा आले " म्हणत त्याल्या लडुन पडतात..
पत्नी पण ते द्रुष्य पाहुन मनातुन आनंदित झालेली असते..
"बाबा बाबा तुम्हि सन्यास घायला गेला होतात ना पग मधेच कसे परत आलात?" मुलगा विचारतो..
पत्निकडे पहात बाबा म्हणतात अरे तुला काय सांगु? मधेच आपली म्हैस भेटली..तिला कसे कोणजाणे कळाले कि मी सन्यास घ्यायला चाललो आहे..तिने शेपटिचा विळखा माझ्या हाताला घातला व मला ओढत ओढत घरी आणले.तरी मी तिला म्हणत होतो"अग अग म्हशी मला कुठे नेशी " पण ति ऐकेनाच माझे...मग माझा पण नाईलाज झाला..व घरी आलो..
.
हे ऐकताच पत्नी खुदकन हसली व म्हणाली..असु देत पाणी गरम आहे स्नान करुन घ्या तुमची आवडति भरली वांगी केली आहेत.. स्नान करा मी गरम भाकरी करते व जेवायला बसा..
हे ऐकताच पति मनातुन खुष झाला..स्नान करुन आला तर मुलांनी पाट पाणी केलेलेच होते..वांग्याची भाजी गरमागरम भाकरी लोणी ताक..फक्कड बेत होता..मुला समवेत भोजन करतो.
.
संन्यासाचा अनुभव घेतल्याने ब्राह्मण निवळला होता त्याचा राग हि कमी झाला व तो सुखाने संसार करु लागला ..

मात्र बायको वेळ आली कि त्याल सन्यास या वरुन टोमणे मारित असे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मात्र बायको वेळ आली कि त्याल सन्यास या वरुन टोमणे मारित असे

अस्कसं. मुख-दुर्बळ होती ना आता हुषारी आली वाटतं.
छान आहे बालकथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात कोठेही म्हशीच्या अनावृत शरीरावर चुंबनांचा वर्षाव नाही, म्हशीच्या कोठल्याही अवयवावर पुरळ नाही... छ्याः! मजा नाही.

अकुकाका फॉर्मात नाही राहिले आजकाल. Sad

असो चालायचेच.
..........

अगदी माहिषस्तन देवीसुद्धा नाहीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भटीणबाईंची शेजारीण चांगलीच अनुभवी दिस्तीय.

आणि म्हैस लैच हुश्शार हं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||