FLAME

वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं. मी पण उजीवर (उज्वला) लाईन मारणं सोडून दिले. गुडघ्याला मात्र राजाचा लयी राग आला.
एक दिवस गुडघ्यानं मला एक पोरगी दाखवली. म्हणला हिला मी पटवणारच. पोरगी धिप्पाड , भरलेली व जवान होती. मोठ्या खानदानी घरातली वाटत होती. गुडघ्या मला रोज बरोबर नेत असे मग आम्ही तिची शाळा सुटली की पाठलाग करत असू. हळूहळू तिच्या लक्षात आलं. मला असं करताना जाम हसायला यायचं पण गुडघ्या दटावायचा " बाप्या लेका हरामखोरा गप चल की" त्या पोरीला आमचा पाठलाग आवडायला लागला आहे हे कळून आले. थोड्या थोड्या अंतराने ती सिंहिणावलोकन करुन आमच्या कडे तिरप्या नजरेने पाहून घेई.
आता गुडघ्यानं आणि मी तिचं घर पाहून घेतले. लगेच गुडघ्यानं तिकडं रुम बघायला सुरुवात केली. आम्हाला शेजारच्या गल्लीत रुम मिळाली. आधीची रुम गुडघ्यानं कांगावा करत हिथं पाणी नाही, लोक चांगले नाही अशी कारणं देऊन सोडायला लावली. गुडघ्याचा मेंदू गुडघ्यात असल्यानं त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही. मग गेलो तिकडे रुमवर.
त्या मुलीच्या घरी पाण्याचा मोठा हौद होता. आम्हाला पाण्याची काही कमी नव्हती तरीही गुडघ्या मला " बाप्या चल पाणी आणू" म्हणून तिच्या हौदावर नेत असे. तिलाही ठराविक वेळ माहित असल्याने नजरेने एकमेकांकडे कटाक्ष टाकत असत. मी बळंच हसू दाबायचो. पण आतमध्ये फार गुदगुल्या व्हायच्या. गुडघ्या मार खायची वेळ आली तर मला पुढे करेल कदाचित असे वाटून मी त्याला स्वातंत्र्य देऊन टाकले.
गुडघ्यानं मला FLAME विषयी पहिल्यांदा सांगितले.
आपलं नाव व मुलीचं नाव इंग्रजीत लिहायचे. कॉमन अक्षरं काट मारून बाद करायची व उरलेली अक्षरं मोजायची. मग एफ वरून मोजत ई वर जायचं. पाचपेक्षा जास्त असतील तर परत ई वरून एफ कडे यायचं. जास्त असतील तर परत ई कडे मोजत जायचं. शेवटच्या अक्षरावरून रिलेशनशिप कशी राहील हे कळणार.
उदा.
F = friendship
L= love
A= attraction
M= marriage
E= enemy
मग काय मलाही चाळाच लागला. मुलींच्या नावाबरोबर स्पेलिंग लिहून flame पैकी काय येते याचा. पुढेपुढे हवेतल्या हवेत ही गणितं मला करता येऊ लागली. असो गेले ते सोनेरी दिवस. उरल्या केवळ आठवणी. गुडघ्याची प्रेमकहाणी मात्र पुढे सरकली नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे मी देखील केलेले आहे. तेव्हा काय बावळट असतो आपण. अक्षरक्ष: बावळे!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मी देखील केलेले आहे.

तुम्ही मुलींच्या नावांची FLAME-चाचणी करायचा??????

(हल्ली कोणाचे काही सांगता येत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सामो जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

एकदम भालु नेमाडे टाईप लिहिलंय गोल्डी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद सुशेगाद भाऊ. लयी दिवस गायपले होते तुम्ही. नेमाडेंचे लिखाण अजून वाचलं नाही मी. कोसला, हिंदू.. ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

'रत्ताळ्या' हेसूद्धा पाहतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबाबा कुणाला बोलले आहात? कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

अहो च्रट्जी म्हणतायत "'च्या मारी असली अंध श्रद्धाही असते होय त्या वयात!!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

FLAME विषयी पहिल्यांदा सांगितले.
आपलं नाव व मुलीचं नाव इंग्रजीत लिहायचे. कॉमन अक्षरं काट मारून बाद करायची व उरलेली अक्षरं मोजायची.
~~~

जशी आवडती मुलगी, तिच्याशी आपले जमेल का मुले बघतात.
यावरून सुचलं.
मुली नको असलेल्या मुलांना 'रत्ताळ्या' म्हणतात. (सैराट सिनेमा). त्यांचे स्पेलिंग मुली पडताळून पाहात असतील का? नक्को असलेलं ध्यान गळ्यात पडेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावर अभ्या.. प्रकाश टाकू शकेल (जी नाईन, मायबोलीवर). त्याच्याकडे लेटेस्ट ट्रेन्ड्सचे रेपर्ट्वा (= श्टॉक) असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आबाबा रत्ताळ्या हे सर्वनाम किंवा विशेषनाम झाले ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

पण आबाबा रत्ताळ्या हे सर्वनाम किंवा विशेषनाम झाले ना?

सर्वनाम नसावे. विशेषनाम असू शकेलही कदाचित.

पण मग विशेषनामांचेच म्हणाल, तर मग त्या ज्या मुलींच्या नावांची तुम्ही FLAME-चाचणी करायचा, ती काय सर्व सामान्यनामे होती?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण आबाबा रत्ताळ्या हे सर्वनाम किंवा विशेषनाम झाले ना?

हे व्याकरणविषयक मत (किंवा शंका) म्हणून क्वालिफाय होऊ शकते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोले तो, ती एकपत्नीव्रत (किंवा एक-व्हॉटेवर-व्रत) वगैरे तथाकथित मूल्ये आमच्या काळापर्यंत इतिहासजमा झालेली असल्याकारणाने, हे एकवचन आमच्याकालीन तरुणाईला झेपण्यासारखे नव्हते.

आमच्या काळी FLAME नसे; FLAMES असत.

बोले तो, FLAMEनंतर S हे जास्तीचे अक्षर असे (S = sister), आणि एकंदरीत (मॉड-५ ऐवजी) मॉड-६ शिष्टम होती. (शिवाय, A = affection; attraction नव्हे; असा एक सूक्ष्म पाठभेद होता.) पण एकंदरीत मूलभूत तत्त्व तेच.

(याचप्रमाणे, पाश्चात्त्य जगतात फूल-ना-फुलाची-पाकळी तत्त्वावर काहीशी वेगळी निर्णयनपद्धती पारंपरिकरीत्या प्रचलित आहे, असे आयुष्यात खूप उशिरा कळले. अर्थात, ही पर्यायी निर्णयनपद्धती मॉड-२ असल्याकारणाने तितकीशी कल्पक नाही, या कारणास्तव आम्हांस ती तितकीशी दखलपात्र वाटत नाही. याव्यतिरिक्त, तीत निर्माल्यनिर्मिती विपुल होते, यास्तव पार्यावरणिकदृष्ट्या आम्हांस ती त्याज्य वाटते, हे वेगळेच. असो.)

..........

शेवटी काय, जगात कोठेही जा; तरुणाई इकडून तिकडून सारखीच - स्टूपिड आणि डेस्परेट१अ. चालायचेच!

१अ हॉर्मोन्स!!! त्याला कोण काय करणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही तरुणपणी तरुण होतात, हे वाचून माझ्या मनात मूर्तीभंजन झालं आहे.

पण लिहिलंत हे बरं केलंय. एवढे तपशील वाचून मला काही समजलं नव्हतं. mod-5 (किंवा mod-6) म्हणल्यावर लगेच शिष्टम समजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.